इंदोर/पुणे-“कचऱ्यातून सोने निर्माण करणे” ही केवळ बोलण्यासाठीची म्हणी न ठेवता इंदौर शहराने ती सत्यात उतरवलीय. गेली सात वर्षे स्वच्छ सर्वेक्षणात देशात अव्वल स्थान मिळवणाऱ्या इंदौरने 100% कचऱ्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारले आहेत. कचऱ्याचे सहा प्रकारे वर्गीकरण करण्यात येत असून त्यापासून बायो-सीएनजी, सेंद्रिय खत तसेच प्लास्टिकचा कचरा रस्ते निर्माणासाठी वापरला जात आहे. या मॉडेलच्या माध्यमातून शहर स्वच्छ राहण्यासोबत करोडोंचे उत्पन्नही मिळवत आहे. इंदौरच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी “स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा” अभियाना अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या अभ्यास दौऱ्यात आज या कचरा प्रक्रिया प्रकल्पांना भेट देत माहिती जाणून घेतली.असे पुण्यातील कसब्याचे आमदार हेमंत रासने यांनी म्हटले आहे.

इंदूर महानगरपालिका (IMC) सह सार्वजनिक-खाजगी भागीदारीमध्ये चालवलेला, एव्हर एन्विरो बायोगॅस हा प्रकल्प शहराच्या पर्यावरण धोरणाचा आधारस्तंभ म्हणून उभा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून इंदूरमधील वायू प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे या प्रकल्पात प्रतिदिन ५५० मेट्रिक टन कचरा गोळा त्यावर प्रक्रिया करून १७ हजार किलो बायोगॅस निमित केला जातोय. स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियाना अंतर्गत आमदार हेमंत रासने यांच्या नेतृत्वात ३०० जणांच्या शिष्टमंडळाने आज इंदूरमधील २ कचरा पुनर्चक्रीकरण (रिसायकलिंग) प्रकल्पास भेट दिली. या मध्ये शहरातील नेपरा रिसोर्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि एव्हर एन्विरो बायोगॅस या दोन्ही प्रकल्पांचा समावेश होता. या दोन्ही प्रकल्पांना भेट देऊन महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि कसबा मतदारसंघाचे आमदार यांनी संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली. दोन्ही प्रकल्पांच्या अधिकाऱ्या येथील संपूर्ण प्रक्रियांची माहिती दिली. ‘