पुणे-इंदोर :- ‘गेली सात वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिल्या क्रमांकावर राहणाऱ्या इंदूरमध्ये शहर स्वच्छ ठेवण्यासोबतच निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. या अनुषंगाने पुणे महापालिकेच्या इंदूर दौऱ्यात एव्हर एन्विरो बायोगॅस प्रकल्पाला भेट देण्यात आली. २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झालं होतं. या पाहणी आणि अभ्यास दौऱ्यात महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम, आमदार हेमंत रासने त्यांच्यासोबत नगरसेवक विशाल धनवडे, राजेश येनपुरे, योगेश समेळ, नगरसेविका, पल्लवी जावळे, गायत्री खडके,मनीषा लडकत, भजपा चे प्रमोद कोंढरे, राजेंद्र काकडे, प्रणव गांजीवाले,अमित कंक, राजू परदेशी, चंद्रकांत पोटे, वैशाली नाईक आदी कार्यकर्ते यांचा समावेश आहे.
इंदूर महानगरपालिका (IMC) सह सार्वजनिक-खाजगी भागीदारीमध्ये चालवलेला, एव्हर एन्विरो बायोगॅस हा प्रकल्प शहराच्या पर्यावरण धोरणाचा आधारस्तंभ म्हणून उभा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून इंदूरमधील वायू प्रदूषण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.या प्रकल्पात प्रतिदिन ५५० मेट्रिक टन कचरा गोळा त्यावर प्रक्रिया करून १७ हजार किलो बायोगॅस निमित केला जातोय. स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा अभियाना अंतर्गत आमदार हेमंत रासने यांच्या नेतृत्वात ३०० जणांच्या शिष्टमंडळाने आज इंदूरमधील २ कचरा पुनर्चक्रीकरण (रिसायकलिंग) प्रकल्पास भेट दिली. या मध्ये शहरातील नेपरा रिसोर्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि एव्हर एन्विरो बायोगॅस या दोन्ही प्रकल्पांचा समावेश होता. या दोन्ही प्रकल्पांना भेट देऊन महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि कसबा मतदारसंघाचे आमदार यांनी संपूर्ण प्रक्रिया समजून घेतली. दोन्ही प्रकल्पांच्या अधिकाऱ्या येथील संपूर्ण प्रक्रियांची माहिती दिली. ‘गेली सात वर्षांपासून स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिल्या क्रमांकावर राहणाऱ्या इंदूरमध्ये शहर स्वच्छ ठेवण्यासोबतच निर्माण होणाऱ्या कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया करणारे प्रकल्प उभारण्यात आले आहेत. येथे कचऱ्याचे ६ वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करण्यात येत असून त्यापासून बायो-सीएनजी, सेंद्रिय खत तसेच प्लास्टिक कचरा रस्ते निर्माणासाठी वापरला जात आहे. या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्यासोबतच करोडोंचे उत्पन्न देखील इंदूर मिळवत आहे.” अश्विनी सिंह, वरिष्ठ सुपरव्हाझर, नेपरा रिसोर्स मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी दररोज ३०० मेट्रिक टन पेक्षा अधिक पुनर्चक्रीकरण (रिसायकलिंग) म्हणजे कचऱ्याच्या मालाचा पुन्हा वापर करून नवीन उत्पादन व वस्तूंमध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया पार पडते. यातील २० टक्के पेक्षा अधिक कचरा चे रिसायकलिंग हून त्यातून विविध गोष्टी तयार होतात. अॅल्युमिनियम फॉइल, प्लास्टिक बॉटल, तेलाच्या पिशव्या, कार्डबोर्ड यासारखे अनेक वस्तूंचे याठिकाणी पुनर्चक्रीकरण होते. या कंपनी मध्ये २०० अधिक कर्मचारी करतात. दरवर्षी या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे चेक अप केले जाते तसेच त्यांची सुरक्षा म्हणून हेल्मेट, ग्लोव्ह घालूनच त्यांना काम करायला परवानगी आहे.