Home Blog Page 3826

दलित हत्याकांडाचा निषेध -” रास्ता रोको ” आंदोलन

0

पुणे-
नगर जिल्ह्यातील जवखेडा मधील पाथर्डी येथील दलित कुटूबियांवर झालेल्या अत्याचार विरोधात पुणे लष्कर भागातील विविध सामाजिक संघटनांनी आज सकाळी महात्मा गांधी रस्त्यावरील ट्रायलक चौकात ” रास्ता रोको ” आंदोलन करण्यात आले . गेले अनेक दिवसापासून नगर जिल्ह्यामध्ये दलित समाजावर अन्याय अत्याचार वाढत आहेत ,त्याविरोधात वेळोवेळी आंदोलन घेऊन सुद्धा हे अत्याचार थांबत नाहीत त्यामुळे या अत्याचाराला विरोध करून निषेध करण्यासाठी ” रास्ता रोको ” आंदोलन करण्यात आले . या आंदोलनाचे आयोजन संदीप भोसले , रोहिदास गायकवाड , जगन्नाथ गायकवाड , विठ्ठल केदारी , रणजीत परदेशी , अनिल जगताप , संजय सोनावणे , भगवान गायकवाड , अक्षय गायकवाड , वसंतराव साळवे , घनश्याम सुसगोहेर , श्याम औचरे , रवि शिंदे , शशिकांत मोरे , विनोद साळवे , कुमार शिंदे , सुजित म्हस्के , मोहन यादव , अशोक चेटपेल्ली , उमेद कांबळे , विनोद चव्हाण , विक्रम मोरे , उमेश कदम , अनिरुद्ध सोनवणे , अक्षय चाबुकस्वार , सतीश वाघेला , सुनील जगताप , जितेंद्र कांबळे , नितीन म्हस्के , संदीप गाडे , पोपट गायकवाड , रमेश गाडे , तुकाराम मोरे , सागर परदेशी , मोहन जगताप , गंगाधर आंबेडकर , सनी भोसले आदी आंबेडकर चळवळीतील मोठ्या संख्यने कार्यकर्ते सहभागी झाले होते .

यावेळी जवखेडा दलित हत्याकाडाचा निषेध असो … , नगर जिल्हा पोलिसांचा निषेध असो । , या हात्याकाडाच्या रोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी अन्यथा दहा दिवसाच्या आत आरोपींना अटक न झाल्यास पुणे कॅम्प बंदचा इशारा देण्यात आला , असे आंदोलनाचे सयोजक संदीप भोसले यांनी दिला .
4

5

पुस्तक प्रदर्शनात नारायण राणे

0

पुणे – महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री व कॉंग्रेस पक्षाचे नेते नारायण राणे यांनी बाजीराव रोडवरील अत्रे सभागृहातील ” अक्षरधारा ” या पुस्तक प्रदर्शनास भेट देऊन पुस्तकांची खरेदी केली , त्यांच्यासमवेत विद्याधर अनास्कर उपस्थित होते .
2

3

उर्मिलाबेन कीर्तीकुमार शहा यांचे निधन

0

पुणे कॅम्प मधील सेंटर स्ट्रीटवरील राहणारे उर्मिलाबेन कीर्तीकुमार शहा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले . त्या ७३ वर्षांच्या होत्या . त्यांच्या मागे २ मुले , २ मुली , सुना, जावई , नातवंडे असा परिवार आहे .

भारतीय जनता युवा मोर्चा पुणे कॅम्प विभागाचे अध्यक्ष सागर शहा यांच्या त्या मातोश्री होत्या .तसेच , पुणे कॅम्प मधील सेंटर स्ट्रीटवरील केशवलाल माणिकलाल या कपड्याचे फर्मचे व्यापारी अमर शहा यांच्या त्या मातोश्री होत्या . त्यांच्यावर शंकरशेठ रोडवरील मुक्तिधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले . अंत्यसंस्कार समयी पुणे कॅम्प भागातील व्यापारी बांधव , सर्व सामाजिक , राजकीय क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होते .
shaha(mahesh jambhulkar)

बेळगावात मराठी भाषिकांकडून कडकडीत हरताळ

0

बेळगाव- केंद्र आणि कर्नाटकाच्या निषेधार्थ 1 नोव्हेंबर काळ्यादिनाची सायकल फेरी बेळगावात मराठी भाषिकांकडून काढण्यात आली. मराठी नगसेसवकांनी महापालिकेत सीमाप्रश्‍नाचा ठराव न मांडल्याचे पडसादही फेरीत उमटले. महापौर महेश नाईक यांच्या निवासस्थानावर ठिय्या आंदोलन करण्यात आले तर, नगरसेवक राजेंद्र बिर्जे यांच्या घरावर किरकोळ दगडफेक झाली.
मराठी बेळगावसह सीमाभागाचा समावेश कर्नाटकात केल्याच्या निषेधार्थ दरवर्षी बेळगावात काळादिन पाळला जातो. आज काढण्यात आलेल्या सायकल फेरीत म. ए. समितीच्या नेतृत्वाखाली हजारो मराठी भाषिक एकत्र आले होते. काळा शर्ट, दंडास काळ्या फिती बांधून केंद्र सरकार व कर्नाटक शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. बेळगावच्या नामांतराविरोधातही या वेळी रोष व्यक्‍त झाला.
महापौर नाईक यांनी सीमाप्रश्‍नाचा ठराव मांडला नसल्याने तसेच काळ्यादिन फेरीपासून दूर राहिल्याने मराठी भाषिकांना त्याचाही निषेध नोंदविण्यात आला. काळ्यादिनाच्या फेरीत मराठी भाषिक सहभागी होउ नयेत यासाठी सकाळपासूनच परिवहन मंडळाने बससेवा बंद ठेवली होती, तरीही हजारो लोक फेरीत सहभागी झाले होते. म. ए. समितीच्या आवाहनास प्रतिसाद देत शहरासह उपनगर परिसरात कडकडीत हरताळ पाळण्यात आला.

वल्लभभाई पटेल यांची जयंती ; इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथीनिमित अभिवादन सभा

0

1

2
पुणे शहर कॉंग्रेस कमिटी व पुणे कॅंटोन्मेंट विधानसभा मतदार संघातर्फे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती व राष्ट्रमाता माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांची पुण्यतिथीनिमित अभिवादन सभा झाली . यावेळी या महापुरुषांच्या प्रतिमेस माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले . तसेच ,संकल्प दिन म्हणून सर्व कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सामुहिकपणे सामाजिक एकता आणि अखंडतेची शपथ घेतली . या शपथेचे वाचन माजी राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले .

पुणे कॅम्प भागातील इस्ट स्ट्रीटवरील राणी लक्ष्मीबाई उदयानजवळील इंदिरा गांधी चौकामध्ये हा कार्यक्रम झाला . यावेळी पुणे शहर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अभय छाजेड , नगरसेवक सुधीर जानजोत , अविनाश बागवे , नगरसेविका लता राजगुरू , लक्ष्मी घोडके , माजी स्थायी समिती अध्यक्ष रशीद शेख ,शिक्षण मंडळ उपाध्यक्ष नुरुद्दीन सोमजी, पुणे कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक मंजूर शेख , करण मकवानी , प्रसाद केदारी , शैलेन्द्र बिडकर , संगीता पवार , विनोद मथुरावाला , गौतम महाजन , निझाम काझी , पुणे कॅंटोन्मेंट ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष असिफ शेख , राजाभाऊ चव्हाण , वाल्मिक जगताप ,रमेश अय्यर , अड. अनुपमा जोशी , प्रदीप परदेशी , सुजित यादव , स्मिता मुळीक , विठ्ठल थोरात , लतीफ शेख , अझीम गुडाकुवाला, अरविंद अंगीरवाल, अच्युत निखळ , क्लेमंट लाझरस , सुरेंद्र परदेशी , विनोद मोगरे , रशीद खिजर , जोस्वा रत्नम आदी मान्यवर , कॉंग्रेस शहर पदाधिकारी , महिला कॉंग्रेस ,युवक कॉंग्रेस , एन. एस. यू. आय . , सेवा दल व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी माजी आमदार रमेश बागवे यांनी सांगितले कि , देशाची अखंडता टिकविण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित आले पाहिजे , देशाच्या अखंडतेला धक्का लावण्याचे काम सध्याचे सरकार करत आहे . त्यासाठी या सरकारची संकुचित वृत्ती बदलण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी आपला पक्षासाठी एकत्रित आले पाहिजे . राज्य हे लोकशाही पद्धतीने चालले पाहिजे , परंतु सध्याचे सरकार हे वेगळा विदर्भ करण्याचे बोलते , तर दुसरीकडे एकता दौड काढता ? हा काय प्रकार चालला आहे , विरोधी निर्णय घेणाऱ्या या सरकारला लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकविण्यासाठी कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एकत्रित या . असे आवाहन त्यांनी केले . गुजरात सरकारचे मुख्यमंत्री होते तेव्हां त्यांनी कधीही वल्लभभाई पटेल यांची जयंती घेतली नाही आताच त्यांना जयंतीनिमित एकता दौड काढता , नगरला दलित हत्याकांड झाले , त्याची दखल अद्यापदेखील या सरकारने घेतली नाही , या हत्याकांडातील पिडीत कुटुंबीयाची भेट घेवून सांत्वन केले नाही . हे सरकार सत्तेसाठी असून त्यांना जनतेचे कोणतेच सुख दुख नाही .

या कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत आणि सूत्रसंचालन राजाभाऊ चव्हाण यांनी केले तर आभार पुणे कॅंटोन्मेंट ब्लॉक कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष असिफ शेख यांनी मानले .

पुण्याचा सुरज राठी सब ज्युनीयर स्नूकर स्पर्धेत महाराष्ट्र राज्यात पहिला

0

मुंबई : द मलाबार हिल क्लब आयोजित महाराष्ट्र राज्य सब ज्युनीयर स्नूकर स्पर्धेत पुण्याचा सुरज राठी ने महाराष्ट्र नंबर १ खेळाडू २०१४-२०१५ चा किताब शुक्रवार दिनांक ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता मिळविला. हा मोठा किताब मिळवण्या साठी सुरज ने मुंबईच्या रोहन सहानी वर ३:२ ने मात केली.

स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकही फ्रेममध्ये पराभूत न होता पोहोचलेल्या सुरजने पहिल्या फ्रेममध्ये ७८-६२ असा विजय मिळवला. पण दुसऱ्या फ्रेममध्ये त्याला ५९-६७ असे पराभवाला सामोरे जावे लागले. तिसऱ्या फ्रेममध्ये त्याने सामन्यात पुन्हा पुनरागमन करत ५९-५५ असा विजय घेत आघाडी घेतली. चौथ्या फ्रेममध्ये सहानीने ७०-४४ अशी फ्रेममध्ये बाजी मारत सामना २-२ असा बरोबरीत आणला. पण पाचव्या निर्णायक फ्रेममध्ये सुरज राठीने आपला खेळ उंचावत ५८-३८ असा विजय मिळवत महाराष्ट्र नंबर १ चा किताब व जेतेपद पटकावले.

विजयात भर म्हणजे सुरज राठीने महाराष्ट्र राज्य सब ज्युनीयर बिलीयर्ड स्पर्धेत देखील महाराष्ट्र नंबर २ खेळाडू २०१४-२०१५ चा किताब मिळविला.

१८ वर्षाचा सुरज हा नेस वाडिया कॉलेज मध्ये पहिल्या वर्षात शिकत असून पूना क्लब येथे स्नूकर खेळतो. माझ्या या यशामधे पूना क्लब चे मार्केर्स तसेच सिनिअर खेळांडूचा व अर्थात माझे वडील शाम राठी यांचा मोठा सहयोग आहे असे सुरज म्हणाला.

मुंबईत सध्या चालू असलेल्या महाराष्ट्र राज्य ज्युनीयर स्नूकर स्पर्धेत देखील सुरज राठीची विजयी घोडदौड चालुच आहे.

पत्नीच्या वाढदिवसावर २०० कोटीचा खर्च

0

01mukesh-nita-ambani2
वाराणसी-शहाजहान ने मुमताज साठी ताजमहाल बांधला हा इतिहास ज्या देशात अभिमानाने मिरविला जातो आहे आहे त्याच देशात आपल्या पत्नीच्या वाढदिवसावर २०० कोटी रुपये खर्च करण्यासाठी एक उद्योजकसरसावले आहेत… मुकेश अंबानी असे त्यांचे सुपरिचित नाव आहे . नीता अंबानी यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमावर यंदा २०० कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय मुकेश अंबानी यांनी घेतल्याचे वृत्त आहे . पत्नी नीता यांचा ५१ वा वाढदिवसा साजरा करण्यासाठी उद्योजक मुकेश अंबानी कुटुंबीयांसह वाराणसीला आज आले आहेत. त्यांच्यासोबत खास ५०पाहुणे आहेत. यात बॉलिवूड, क्रिकेट, बिझनेस आणि राजकारणाशी संबंधित व्यक्ती आहेत.विशेष म्हणजे दिवाळीनंतर येणाऱ्या या कार्यक्रमाबाबत अंबानी यांच्या विविध कंपन्यांमधून कामगार-अधिकारी वर्गातही कुतूहल आहे . विविध क्षेत्रात अंबानी यांनी आपली व्यावसायिकता वाढविलेली आहे आणि उत्पन्नातही भरारी घेतलेली आहे .
काशीत त्यांची दोन चार्टड विमाने आली . सर्वांत आधी मुकेश यांची आई किकोलाबेन विमानातून उतरल्या. यावेळी विमानतळावर६ बीएमडब्ल्यू,८मर्सिडीज गाड्या ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय पाहुण्यांसाठी५० लक्झरी गाड्या आहेत.दरम्यान अंबानी कुटुंंबीयांनी काशी विश्वनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. सुमारे तासभर अंबानी कुटुंबीय येथे थांबले होते. यावेळी मुकेश आणि नीता यांना बघण्यासाठी मंदिराबाहेर बरीच गर्दी जमली होती. नागरिकांनी नीता यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
पाहुण्यांसाठी नादेसर पॅलेसमध्ये १० खोल्या आणि ३० सुट बुक करण्यात आले आहेत. त्यावर ३५ लाख रुपये खर्च झाला आहे. काशी विश्वनाथाचे दर्शन घेतल्यावर अंबानी कुटुंबीयांनी राजेंद्र प्रसाद घाटावर गंगा आरती केली. यासाठी मंदिर आणि घाटांवर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. यासाठी १० लाख रुपये खर्च करण्यात आला. या घाटावर पहिल्यांदाच लाकडी शिड्या तयार करण्यात आल्या होत्या.
नीता अंबानी यांच्या वाढदिवसासाठी स्पेशल मलाई केक तयार करण्यात आला. वाराणसी येथील प्रसिद्ध हलवाई राजबंधू मिष्ठान भंडार यांनी केक तयार केला आहे. सायंकाळी होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात बॉलिवूडचे अनेक कलाकार सादरीकरण करणार आहे. या संपूर्ण दौऱ्यावर सुमारे २०० कोटी रुपये खर्च येणार असल्याचे सांगितले जात आहे.येत्या सोमवारी अंबानी दांपत्य मुंबईत परतणार आहे .
Mukesh-Ambani-with-wife-Nita-in-NDTV-Top-25-Greatest-Living-Legend

राष्ट्रीय एकतेची महावितरणमध्ये शपथ

0

पुणे – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या पुणे परिमंडलातील मंडल व विभागीय कार्यालयात राष्ट्रीय एकतेची शपथ घेण्यात आली.
पुण्यातील रास्तापेठ येथील मुख्य अभियंता कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता निळकंठ वाडेकर, अधिक्षक अभियंता अंकुश नाळे, उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार, सहाय्यक महाव्यवस्थापक (मानवसंसाधन), धैर्यशील गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर, वरीष्ठ व्यवस्थापक माधुरी राऊत आदी उपस्थित होते.
उध्दव कानडे यांनी राष्ट्रीय एकता दिवस शपथेचे वाचन करुन ती उपस्थितांकडून वदवून घेतली.
4

पेट्रोल ,डिझेल दर अडीच रुपयांनी उतरले

0

नवी दिल्ली – आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भाव कमी झाल्याने पेट्रोलचे दर 2 रुपये 41 पैशांनी तर डिझेल दर 2 रुपये 25 पैशांनी कमी झाले आहेत. ऑगस्टपासून दर सहाव्यांदा कमी झाले आहेत.
एकाच महिन्यात डिझेलचे दर दुसऱ्यांदा कमी झाले आहेत. शुक्रवारी मध्यरात्रीपासून हे दर लागू होतील.
सरकारने 18 ऑक्‍टोबररोजी देशातील तेलकंपन्यांना नियंत्रणमुक्त केले आहे. त्यामुळे त्यांना दरनिश्‍चितीचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे. तसेच विनाअनुदानित स्वयंपाकाच्या 14 किलोच्या एलपीजी गॅसचे दर 18.5 रुपयांनी कमी होणार आहेत. गेल्या चार महिन्यात विनाअनुदानित एलपीजी गॅसचेही दर चौथ्यांदा कमी करण्यात आले आहेत.गेल्या दशकभरात पहिल्यांदाच पेट्रोल आणि डिझेलवरील नियंत्रण काढल्याने हे दर कमी झाल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे जाहीर केले.

शाही थाटामाटा त देवेंद्रराज सुरु…

0

Dilip Kamble
मुंबई – देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी वानखेडे मैदानावर आयोजित दिमाखदार सोहळ्यात राज्याच्या 18 व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीस यांच्यासह एकूण आठ कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्र्यांना राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी या मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. वानखेडे स्टेडियमवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रमुख उपस्थितांमध्ये लालकृष्ण अडवानी, भाजपशासित राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे, मुरली मनोहर जोशी, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, चंद्राबाबू नायडू, तसेच अनेक आध्यात्मिक गुरू व इतर अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांतदादा पाटील, पंकजा मुंडे-पालवे, विष्णू रामा सवरा, या कॅबिनेट मंत्र्यांसह दिलीप कांबळे व विद्या ठाकूर या राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. विनोद तावडे यांनी आईच्याही नावाचा आवर्जून उल्लेख करीत विनोद श्रीधर विजया तावडे या नावाने शपथ घेतली. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव करत सत्तेवर आलेल्या भाजपने शपथविधीसाठी वानखेडे मैदानावर दिमाखदार सोहळ्याचे आयोजन केले होते. सोहळ्यासाठी मैदानावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. राज्यातील सर्व क्षेत्रातील दिग्गजांची यावेळी उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वानखेडे मैदानावर आगमन होताच राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
देवेंद्र फडणवीस यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. त्यांच्या पाठोपाठ एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, विष्णू सावरा यांनी मंत्रिपदाची तर दिलीप कांबळे, विद्या ठाकूर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रगीतानेच कार्यक्रमाची सांगता झाली. त्याआधी महाराष्ट्राची लोककला दर्शवणा-या गीतांनी कार्यक्रमाची सुरुवात झाली. अशोक हांडे यांच्या मराठी बाणा कार्यक्रमाच्या कला पथकातील कलाकार याचे सादरीकरण केले. या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यातीलच नव्हे तर देशभरातील साधुसंत मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. हरियाणा सरकारच्या शपथविधी सोहळ्यालाही अशाच प्रकारे साधुसंतांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या सर्व साधुसंतांसाठी खास वेगळी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्यासाठी स्टेज आणि कार्यक्रमाच्या स्थळाच्या सजावटीची आणि संकल्पनेची जबाबदारी भव्य दिव्य सोहळ्यांच्या कला दिग्दर्शनात हातखंडा असलेल्या प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई म्हणजेच एन.डी.देसाई यांच्यावर होती. देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेल्या इच्छेनुसार प्राचीन आणि आधुनिक महाराष्ट्राची सांगड घालणारा सोहळा याठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
वानखेडे स्टेडियमवर दुपारी चार वाजून २० मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व्यासपीठावर आले. या सोहळ्यासाठी मोदी यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी, मुरलीमनोहर जोशी यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अनंत कुमार, रविशंकर प्रसाद, वेंकय्या नायडू, निर्मला सीतारामन उपस्थित होते. त्याचबरोबर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह, हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आदींसह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण; तसेच छगन भुजबळ, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, खासदार प्रफुल्ल पटेल हे उपस्थित होते.
भाजपचे घटक पक्ष असलेले रासपचे महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, रिपब्लिकन पक्षाचे रामदास आठवले, शिवसंग्रामचे विनायक मेटेही उपस्थित होते. त्यांच्याबरोबर विविध धर्मांचे प्रमुख, संत, साधू उपस्थित होते. त्यात शांतीमहाराज, नरेंद्रमहाराज, प्रल्हाद वामनराव पै, अनिरुद्धबापू, अप्पा धर्माधिकारी, भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज, अच्च्युतानंद सरस्वती, जगतगुरू शंकराचार्य, अंजनगाव सुर्जीचे जितेंद्र महाराज, ख्रिस्ती धर्मगुरू, मुस्लिम मौलवी आदी उपस्थित होते.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, अनुराधा पौडवाल, अभिनेते विवेक ओबेराय, रमेश देव, अजिंक्‍य देव, सीमा देव आदी उपस्थित होते. अभिनेते नाना पाटेकर आले आणि थोड्या वेळात गर्दीतून वाट काढता न आल्याने निघून गेले. वानखेडेवर उसळलेल्या गर्दीमुळे बाबासाहेब पुरंदरे यांच्यासाठी रस्ता मोकळा करा, अशी घोषणा माजी आमदार मधू चव्हाण यांनी केली. उद्योगपती आदी गोदरेज, ‘सकाळ’ वृत्तसमूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार, बांधकाम व्यावसायिक निरंजन हिरानंदानी आदी उपस्थित होते. रिलायन्स उद्योगसमूहाचे अनिल अंबानी यांना मात्र गर्दीमुळे जागा मिळू शकली नाही.

Pankaja_Munde

Vinod_Tawde

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ्या ।

0

आमचे मित्र , मराठी चित्रपट क्षेत्रात अल्पावधीत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कौशल्याचा ठसा उमटविणारे ख्यातनाम निर्माते निलेश नवलखा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछ्या –
शुभेच्छुक -अभिनेता संतोष जुवेकर ,संतोष चोरडिया , मयुर लोणकर ,संगीतकार आदी रामचंद्र , निखिल महामुनी , सोनिया बर्वे , जितेंद्र वाईकर ,शैलेंद्र साठे , आशिष लोणकर , अभिषेक लोणकर ,पत्रकार – श्रीकांत कुलकर्णी ,नरेंद्र शिंदे , शरद लोणकर , सुभाषचंद्र जाधव ,समीर सरदेशमुख , राम झोंड ,विवेक तायडे

आंबेगावमध्ये सहामजली इमारत कोसळली, एक व्यक्ती अडकल्याची भिती

0

aambe1
पुणे- – आंबेगाव बुद्रुकमधील न-हे येथील सिताराम कॉम्प्लेक्स ही सहा मजली इमारत आज (शुक्रवारी) पहाटे तीनच्या सुमारास कोसळली. इमारतीच्या ढिगा-याखाली एक व्यक्ती अडकल्याची भिती आहे. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युध्दपातळीवर सुरु आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, न-हेतील भुमकर मळा येथे असलेल्या या सिताराम कॉम्प्लेक्समध्ये २० सदनिका आहेत. त्यात आठ कुटुंबामधील सुमारे ३५ जण वास्तव्यास होते. वर्षभरापूर्वीच ही इमारत उभारण्यात आली होती. पहाटे तीनच्या सुमारास या इमारतीला तडे जावू लागले. त्याचा कर्णकर्कश असा आवाजही आला.
साखरझोपेत असलेले रहिवाश्यांना भुकंप झाल्याचा भास झाला. घाबरुन रहिवाश्यांनी इमारतीतून खाली धाव घेतली. काही रहिवाश्यांनी इतरांना झोपेतून उठवून खाली आणले. त्यानंतरच्या दहा मिनिटांनीच इमारत टप्प्या-टप्प्याने खाली कोसळली. येथील रहिवाश्यांचे नशिब बलवत्तर म्हणायला हवे.
दरम्यान, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पहाटेच्या सुमारास असलेल्या अंधारामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. क्रेनच्या सहाय्याने मातीचा ढिगारा उपसून पाच ते सहाजणांना बाहेर काढण्यात यश आले. परिसरातील नागरिकही मदतीसाठी धावून आले आहेत. एका महिलेसह तिघेजण ढिगा-याखाली अडकल्याची भिती व्यक्त केली जात आहे.
या इमारतीचे बांधकाम अपूर्णावस्थेत तसेच निकृष्ट दर्जाचे होते असा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. या इमारतीला तीन मजल्यांची परवानगी असताना बेकायदेशीरपणे पाच मजले उभारण्यात आल्याचे समोर आले आहेत. न-हे आंबेगावचा हा परिसर बेकायदा बांधकामांसाठी कुप्रसिध्द आहे. दरम्यान, पोलिसांनी बिल्डरला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. धनकवडी तळजाई पठार येथील इमारत कोसळण्याच्या प्रकारानंतर नगर रस्त्यावर एक इमारत कोसळली होती इमारती कोसळण्याचा सिलसिला पुण्यात सुरूच असून अशा इमारती बांधणाऱ्या बिल्डरांवर मात्र कोणतीही जरब बसेल अशी कारवाई होताना दिसली नाही आणि त्यामुळे दिसेल ती जागा बळकावा आणि जमेल तशी बांधकामे करा आणि करोडो कमवा हा धंदा येथे जोरात सुरु आहे राजकारणी गुंड आणि तलाठी यांच्या संगनमताने होणार्या या कारभारास महापालिका प्रशासनाची चांगलीच साथ मिळाली असल्याचे येथे झालेल्या बांधकामांवरून स्पष्ट होते आहे
aambe2

aambe3

Tags :

गिरीश बापट , दिलीप कांबळे , बाळा भेगडे यांच्यासह मंत्रिपदासाठी 25 नावे निश्चित ?

0

मुंबई- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शुक्रवारी शपथ घेण्यासाठी सज्ज झालेले देवेंद्र फडणवीस हे आपल्या आगामी मंत्रिमंडळातील नावे अंतिम करण्यासाठी व त्यावर शेवटचा हात फिरविण्यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. फडणवीस यांनी अमित शहा यांच्याशी विस्तृत चर्चा केली.फडणवीस यांनी प्राथमिक म्हणून पहिल्या टप्प्यात 25 नावे निश्चित केली आहेत.
पश्चिम महाराष्ट्रातून गिरीश बापट, बाळा भेगडे, राम शिंदे, सुभाष देशमुख, दिलीप कांबळे यांची नावे मंत्रिपदासाठी आघाडीवर आहेत. मुंबई, कोकण, ठाणे पट्ट्यातून विनोद तावडे, प्रकाश मेहता, आशिष शेलार, विष्णू सावरा व राज पुरोहित यांची नावे आघाडीवर आहेत. गिरीश बापट, खडसे, हरिभाऊ बागडे व हरिभाऊ जावळे यांची नावे विधानसभा अध्यक्षपदासाठी घेतली जात आहेत. खडसेंनी मात्र यास नकार दिला आहे. विदर्भातील भाऊसाहेब फुंडकर यांच्याकडे विधान परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते. विदर्भातून फडणवीस यांच्यासह सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, चैनसुख संचेती, गोवर्धन शर्मा यांची नावे आघाडीवर आहेत. तर, मराठवाड्यातून पंकजा मुंडेंसह हरिभाऊ बागडे, सुधाकर भालेराव, संभाजी निलंगेकर यांच्या नावाची चर्चा आहे. उत्तर महाराष्ट्रातून एकनाथ खडसे, गिरीश महाजन, जयकुमार रावल तर
फडणवीस स्वत:कडे अर्थ खात्यासह गृह खाते ठेवण्याची शक्यता आहे. खडसे यांच्याकडे महसूल, तावडेंकडे शिक्षण (एकत्रित सर्व विभाग), मुनगंटीवार यांना कोणते खाते द्यावे याबाबत चर्चा सुरु आहे. त्यांनाही वजनदार खाते दिले जाऊ शकते. शेलार यांच्याकडे नगरविकास, पंकजा मुंडेंकडे ग्रामीण विकास खात्यासह महिला व बाल कल्याण विभाग सोपवला जाऊ शकतो. शिवसेना सत्तेत सहभागी झाली तर त्यांना दोन महत्त्वाची खाती देण्याबाबत चर्चा सुरु आहे.
याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट उद्याचे सोहळ्याचे औपचारिक निमंत्रण दिले. याचबरोबर फडणवीस यांनी गडकरींशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सविस्तर चर्चा केली. यात फडणवीस यांच्या शपथविधी वेळी फक्त भाजपच्याच मंत्र्यांना शपथ देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते आहे. याचबरोबर फडणवीस यांनी दिल्लीतील भाजपच्या सर्व प्रमुख नेत्यांना भेटून शपथविधीसाठी निमंत्रण दिले.
\देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. यासाठी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर जोरदार तयारी सुरु आहे. शपथविधी सोहळा काही तासांवर आला असताना उद्याच्या सोहळ्यात कोणा-कोणाला शपथ द्यायची व त्यांच्याकडे संभाव्य कोणती द्यावीत यावर फडणवीस पक्षाध्यक्ष शहा यांच्याशी चर्चा करत आहेत. महाराष्ट्राचे भाजपचे नेते नितीन गडकरी व पक्षाध्यक्ष शहा हे आज मुंबईत येणार होते. मात्र, फडणवीस यांनी शहा यांना मुंबईत येण्यापासून थांबवले व मीच दिल्लीला येत असल्याचे सांगत आज दुपारी दिल्लीकडे रवाना झाले. यामागे पक्षातंर्गत राजकारण असल्याची माहिती मिळत आहे.गडकरींचा हस्तक्षेप टाळण्यासाठी फडणवीस-शहांनी ही खेळी केल्याचे समजते आहे. गडकरी हे आपल्या काही समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबरोबरच वजनदार खात्यावर वर्णी लावावी यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, शहा यांनी फडणवीस यांना फ्री-हॅड दिल्याचे कळते.

विरोधी बाकावरच बस माझ्या वाघा …

0

उद्धवसाहेब आणि राजसाहेब ठाकरे
हिंदूहृद्यसम्राट , सरसेनापती , बाळासाहेब ठाकरे यांचे तुम्ही दोघे वारसदार आहात . नुसते वारसदारच नाही तर बाळासाहेबांचीच परंपरा तुम्ही पुढे चालवाल अशी तमाम मायमराठी जनतेची अपेक्षा आहे अर्थात ज्याचे मराठी आणि आपल्या मायभूमी वर खरे प्रेम आहे, श्रद्धा आहे, अशा जुन्या जाणत्या बाळासाहेबांवरही प्रेम करणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाची हीच अपेक्षा आहे जो स्वार्थी नाही जो कुठल्या पडला हपापलेला नाही , लोलपू नाही
बाळासाहेबांची ताकद मोठ्ठी होती , वकृत्व आणि शक्ती त्यांच्याकडे होती , धनशक्ती फारशी नव्हतीच , पण त्यांच्या शब्दावर मान कापून हातावर घेणारी मराठी तरुणाई ची ताकद बाळासाहेबांजवळ होती . त्याच ताकदीने त्यांनी शिवसेना घडवली मराठी माणसाच्या स्वाभिमानाची मशाल पेटविली हीच मशाल तुम्हालाही तेवत ठेवायची आहे . आता बाळासाहेबांचे नाव , त्यांचे असामान्य कर्तुत्व त्यांची पुण्याई तुमच्या पाठीशी आहे . ती सोबत घेवून घरदार – कुटुंब – आणि मन-धन विसरून … बाळासाहेबांकडे जी ताकद होती ती ताकद तुम्हाला मिळवायची आहे .तुमच्या जवळ असणारी माणसे निष्ठावान,शक्तिशाली असावीत लालसी नसावीत याची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे , सारे काही अर्पण करून मरठी अस्मितेसाठी , मराठी स्वाभिमानासाठी तुमची कवचकुंडले होवून लढणारी असावीत आणि अशाच माणसांच्या मनाशी तुमची थेट -भेट रुजलेली असावी . राजकीय घोडेबाजार – सौदेबाजी यात कधी हि पडायचे नाही कोणत्याही पदाची लालसा ठेवायची नाही पण महारष्ट्र घडवायचा मराठी स्वाभिमानाची मशाल तेवत ठेवायची जबाबदारी -परंपरा आता तुम्हाला चालवायची आहे . ती व्यवस्थित चालविली तर बाळासाहेबांचे नाव आणि कर्तुत्वाला शोभेल असा वारसा मराठी साम्राज्याला मिळाला याची नोंद निश्चित होईल. गद्दारीची हिम्मत करणारी मतलबी माणसे जवळ नसलेली बरी … अशा माणसांच्या शक्तीमुळे मराठी अस्मिताही बाजारात बसेल . तेव्हा अशांची साथ नकोच . शिवसेनेचे गतवैभव कुठल्या मार्केटिंग ने नाही तर मावळा -मावळा जोडा अभियानाने परत मिळवावे लागेल . बाळासाहेबांची नुसती वाणी नको नीती चा हि अवलंब करा . वाघासारखे जगा … सत्तेच्या मोहापायी । कुणाच्या दबावा पायी तुम्ही इकडे -तिकडे कराल तर … बाळासाहेबांची पुण्याई देखील कधी न कधी तुमची साथ सोडेल… वादळात सापडलेल्या नौकेला दीपस्तंभाप्रमाणे इशारा समजा आणि हीच घडी आहे अखेरची वेळ आहे आता मराठी बाणा ,मराठी स्वाभिमान जपा … … वेळ आलीच आहे तर विरोधी बाकावर बसा , पण वाघासारखे रहा , बाळासाहेबांसारखे जगा ,त्यांचाच वारसा चालवा… त्यातच मराठी महाराष्ट्राचे हित आहे आणि तीच बाळासाहेबांना हि सलामी असेल .
—————————–
फेसबुक वर गाजणारे हे चित्र पहा …
10636196_824644907586494_1156020927606443532_n

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अनावृत्त पत्र

0

प्रसाद सुर्वे (वाई -महाराष्ट्र ) यांनी हे मोदी साहेबांना फेसबुक द्वारे लिहिलेले पत्र )

ज्यांच्या पायाचं तीर्थ घ्यावं (?) अशा मुकेश आणि नीता अंबानी यांच्या रुग्णालयाचं नुकतंच पंतप्रधानांनी उद्घाटन केलं.. त्या गरीबांकरता बांधल्या गेलेल्या रुग्णालयाचे दर –

OPD – Rs 1100

30 days follow up – Rs 750

अनेक धन्यवाद..!

आदरणीय मोदीसाहेब,

मुंबईला आलाच होतात तेव्हा थोडा वेळ काढून आमच्या मुंबईची शान असलेल्या आमच्या के ईम एम रुग्णालयाला भेट द्यायला हवी होतीत..!

मान्य करतो की तिथे खूप गर्दी असते.. ते रुग्णालय मुळीच पॉश नाही.. परंतु तरीही तिथे ज्या प्रकारची ट्रीटमेन्ट रुग्णांना दिली जाते.. अनेक अत्यंत महागड्या शस्त्रक्रिया किती कमी पैशांमध्ये होतात ते एकदा बघा..

रात्री दोन दोन वाजता कसे सगळे पाच पाच, सहा सहा डॉक्टर एखादी इमर्जन्सी हाताळून एखाद्या रुग्णाचे प्राण वाचवायचा कसा निकराचा प्रयत्न करतात हे किमान डोळे उघडे ठेउन बघा.

मोदीसाहेब.. अनेक वर्षापूर्वी अरुणा शानभाग या परिचारिकेवर बलात्कार होऊन ती परिचारिका कायमची स्तब्धच झाली..माणसातून उठली.. तिला आजही के ई एम च्या इतर सगळ्या परिचारिका आणि डॉक्टर्स आणि तमाम कर्मचारी वर्ग ती आपली मोठी बहीण असावी.. आई असावी या भावनेने कसा फुलासारखा जपतात ते पाहा एकदा मोदीसाहेब..!

आणि एक-दोन नाही.. तर आज जवळजवळ ३५ वर्ष झाली या गोष्टीला..!

मोदीसाहेब, नीता आणि मुकेश करता तुम्ही आपला बहुमोल वेळ देता.. तशीच केव्हातरी १० मिनिटं सवड काढून अरुणा शानभागलाही एकदा बघायला जा.. तुम्हाला कळेल की सेवा कशाला म्हणतात..प्रेम, आपुलकी कशाला म्हणतात..!

एरवी सचिन, बच्चन, सलमान यांच्यासारख्या अनेक बड्या बड्या धेंडांच्या उपस्थितीमध्ये गरीबांबद्दल बोलणे खूपच सोपे आहे..!

असो..!

1100 रुपये निदान आज तरी अनेकांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.. त्यापेक्षा सायन, केम आणि नायरची आमची गरीबांची OPD च खूप बरी आणि आपुलकीची..!

नीता आणि मुकेशला त्यांच्या या नव्या व्यवसायाबद्दल अनेक शुभेच्छा..!