Home Blog Page 3637

बांधकाम कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा

0

पुणे – सीटू संघटनेच्या वतिने आज बांधकाम कामगारांच्या प्रलंबीत प्रश्नावर अपर कामगार आयुक्त कार्यालयावर निदर्शने करण्यात आली. शुभा शमीम , अजित अभ्यंकर , वसंत पवार यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले
बांधकाम कामगारांसाठीचे स्वतंत्र जिल्हास्तरीय मंडळाचे गठण करुन, त्यासाठी पुरेसाआधिकारी/कर्मचारी भरावे.गृहपयोगी वस्तू खरेदीसाठीचे रु.3000/- त्वरीत द्या. स्थालांतरीत नोंदीत बांधकाम कामगारांना तात्पुरते रेशन कार्ड द्या.

· स्थालांतरीत नोंदीत बांधकाम कामगारांना लाभ देताना कागदपत्रासाठी आग्रह धरू नका.

· सर्व बांधकाम कामगारांना विनाअट अन्नसुरक्षा कायद्याअंतर्गत रेशन (धान्य) द्या.

· टॅब/लॅपटॉप जाहिर केल्याप्रमाणे विद्यार्थ्यांना ताबडतोब द्या.

· मागील वर्षातील शिष्यवृत्ती त्वरीत द्या.

· लाभामधील जाचक अटी काडून टाका.

· जनता आरोग्य विमा योजना इंश्युरन्स कंपनीला न देता, ती मंडळाने राबवावी.

· नोंदीत बांधकाम कामगारांना जनता आरोग्य विमा कार्ड कामगारांची नोंदणी झाल्यावर तात्काळ

द्या.

· घर दुरूस्ती व बांधणीचे अर्ज स्विकारून त्याची ताबडतोब पुर्तता करा.

· दिवंगत बांधकाम कामगारांच्या वारसाला कायमस्वरूपी रू.3000/-पेन्शन द्या.

· साठ वर्षावरील बांधकाम कामगाराला कायमस्वरूपी रू.5000/-पेन्शन द्या.

· बांधकाम कामगार कल्याणनिधीत साठलेले दोन हजार आठशे कोटी कामगारांसाठी खर्च करा!

· बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या लग्नाचा खर्च द्या.

· जनरल नॉलेज पुस्तिका संच कामगाराला देण्यासाठीचा वाहतूक खर्च मंडळाने करावा. अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या .
यावेळी अभ्यंकर यांनी सांगितले कि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई या नावाने

बांधकाम कामगारांचे कल्याण करण्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. मंडळाकडे आज अखेर सुमारे

तीन हजार कोटी रुपये जमा आहेत. सदर मंडळाने 23 योजना जाहीर करुन कामगारांना लाभ देण्यास सुरुवात केली

आहे. परंतू या कामगारांना मंडळाचा स्वतंत्र आधिकारी/कर्मचारी वर्ग नसल्यामुळे कामगारांना त्याचा लाभ मिळत

नाही.

मे 2014 बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी रु.3000/- देण्याचे जाहीर केले व

कामगाराकडून विहीत नमुन्यात 2476 अर्ज भरुन दिले होते. परंतू मंडळाकडून फक्त 300 कामगारांना त्याचा लाभ

मिळाला. त्यामुळे बाकी राहिलेल्या कामगारामध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले व संतापाची लाट तयार होऊ

घातली. त्यामुळे कामगारांच्या अग्रहाखातर आज निदर्शनाचा कार्यक्रम आयोजिक केला होता. मागील काँग्रेस आघाडी

सरकारने 6 सप्टेंबर 2013 च्या बालेवाडी, पुणे येथिल जाहिर कार्यक्रमात माजी अर्थमंत्री व उपमुख्यमंत्री अजित

पवार, माजी कामगार मंत्री हसनजी मुश्रीफ, कामगार आयुक्त गायकवाड या सर्वांनी सर्व जाहिर योजना

मिळतील अशी घोषणा केली. परंतू या घोषणा फक्त हवेतच राहतात की काय अशी शंका येत आहे. घरबांधणी व

घरदुरूस्ती ही योजना मिळणे तर लांबच राहिले, ते अर्जही आधिकारी स्विकारत नाहीत.

तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने जुलै 2013 अखेर नोंदणी ज्या

कामगारांची झाली आहे. त्यासाठी 2013 मध्ये 25 कोटी रुपये 2014 साठी 37 कोटी मंडळाने न्यु इंडिया अश्योरन्स

कडे भरल्याचे सांगितले. परंतू त्याचे कार्ड अद्यापपर्यंत मिळाले नाहीत. जनता आरोग्य विमा अंतर्गत बांधकाम

कामगारास व त्यांच्या कुटुंबास औषधोपचारासाठी मंडळाने 6 सप्टेबर 2013 रोजी जाहिर केल्याप्रमाणे ज्या

कामगारांना आरोग्य विमा कार्ड मिळाले आहे अशाच कामगारांना त्याचा लाभ मिळत आहे. असे कार्ड फक्त 31 डिसेंबर

2012 पुर्वी ज्यांची नोंदणी झालेली आहे. त्यांनाच आरोग्य विमा कार्ड मिळाले आहेत. त्याची मुदत जुलै 2014 ला संपत

आहे. या योजने अंतर्गत प्राथमिक उपचार मिळतील अशी घोषणा कामगार मंत्री हसन मश्रीफ यांनी 6 सप्टेंबर

2013 च्या कार्यक्रमात केली होती, परंतू न्यु इंडिया एश्योरन्स कंपनी.लि./मेडिकेअर टी.पी.ए सर्वव्हिसेस (आय) प्रा.लि.

यांनी रूग्णालयात पेशंट दाखल झाला तरच लाभ देत आहेत. 1 जानेवारी 2013 पासून नोंदणी केलेल्या कामगारांना

त्याचे लाभ मिळत नाहीत.आता असे सांगण्यात येत आहे की, जे सेवा पुस्तक (ओळखपत्र) दिले आहे. त्यावरच हा लाभ

घेता येईल. परंतू मेडिकेअर टी.पी.ए सर्वव्हिसेस (आय) प्रा.लि. यांनी रूग्णालयाची यादी दिली आहे. त्या रुग्णालयांत

कामगार पेशंट जातो, ते रुग्णालय ही योजना आमच्याकडे नाही असे सांगत आहे. ही तर कामगारांची फसवणूकच होत

आहे.

याप्रसंगी सीटूचे पुणे जिल्हा सचिव वसंत पवार यांनी मंडळाच्या कार्यपध्दतीवर खरपूस समाचार घेतला.

‘मिस्टिक माऊन्टन्स’ : मिलिंद ढेरे यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन

0

पुणे
ईशान्य भारतातील लेह-लढाख म्हणजे हिमालयातील पर्वतराजीने वेढलेला रम्य प्रदेश. या पर्वतराजीच्या सौंदर्याचे वर्णन जेवढे करता येईल तेवढे ते कमीच असेल. निसर्गाने जणू काही खास प्रयत्न करून या सृष्टीसौंदर्याची उधळण केली आहे असेच या पर्वतराजीकडे पाहिल्यावर वाटते. सृष्टीसौंदर्याने नटलेल्या या पर्वतरांगा छायाचित्रांच्या रूपाने प्रत्यक्ष पाहण्याची संधी पुणेकर रसिकांना चालून आली आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार मिलिंद ढेरे यांच्या कैमेऱ्यातून टिपलेल्या या ”मिस्टिक माऊन्टन्स” च्या छायाचित्रांचे प्रदर्शन नववर्षाच्या प्रारंभीच म्हणजे दि. २ जानेवारीपासून पुण्यात आयोजित करण्यात आले आहे.
श्री मिलिंद ढेरे यांनी लेह-लढाख भागात प्रत्यक्ष जाऊन तेथील पर्वतराजींच्या ‘कुशीत’ पहुडलेल्या निसर्गाचे मनोहारी रूप आपल्या कैमेऱ्यात चित्रबद्ध केले असून त्यांच्या या छायाचित्र प्रदर्शनात विविध रंगातील पर्वतांच्या छटा पहावयास मिळतील. सूर्याची पिवळसर किरणे अंगावर झेलणारे पर्वत, धुक्याची शाल लपेटलेले पर्वत , गडद निळी दुलई परिधान केलेले पर्वत अशा विविध रंगाच्या पर्वतराजीबरोबरच सोबतीला तेथील अन्य निसर्गाची बोलकी छायाचित्रेही पहावयास मिळणार आहेत.
दि. दोन ते पाच जानेवारी दरम्यान, कोरेगाव पार्क भागातील ‘मोनालिसा कलाग्राम’ ( पिंगळे फार्म्स, साऊथ मेन रोड ) येथे भरविण्यात आलेल्या या छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन २ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता पिनैकल ग्रुप, पुणे चे सीएमडी श्री गजेंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे. हे प्रदर्शन रसिकांसाठी दि. दोन ते पाच जानेवारी दरम्यान रोज सकाळी नऊ ते रात्री आठ या वेळेत पाहण्यासाठी खुले राहील.

महेंद्र सिंग धोनीचा क्रिकेट संन्यास

0

मुंबई – मेलबोर्न टेस्ट ड्रॉ झाल्यानंतर बरोबर अर्ध्या तासानंतर टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने खळबळजनकरीत्या कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतला. धोनीच्या या निर्णयाने क्रिकेट विश्वाला आश्चर्याचा धक्का दिला आहे.
सर्वसाधारणपणे मोठे खेळाडू सांगून सवरून संन्यास घेतात. मात्र धोनीने त्याच्या पत्नीलाही सांगितले नाही. बीबीसीआयचे सचिव संजय पाटील यांना मीडियाला सुचित करण्यास सांगितले. बातमी कळताच खळबळ उडाली. यामुळे टीमच्या मनोधैर्यावर परिणाम होईल, असे वेंगसरकर, बिशनसिंह बेदीसह अनेक खेळाडूंनी म्हटले आहे, तर गावस्कर, सचिन आणि गांगुलीने हा धक्कादायक निर्णय असल्याचे म्हटले.
२००८ मध्ये अनिल कुंबळेनेही ऐन कसोटीतच कर्णधारपद सोडले होते. तेव्हा धोनीनेच टीमचे नेतृत्व सांभाळले होते. २०१३ मध्ये गांगुलीच्या ४९ टेस्टमध्ये २१ विजयाचा विक्रम मागे टाकला आणि सर्वात यशस्वी कर्णधार ठरले. मात्र वर्ष संपता-संपता त्याच पद्धतीने धोनीनेही कर्णधारपद सोडले.
धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वनडेचा विश्वचषक पटकावला. या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध नाबाद ९१ धावा काढल्या. यासह त्याने शानदार विजय मिळवून देत भारताला विश्वचषक मिळवून दिला. यासह त्याने वनडे करिअरमध्ये सहा हजार धावांचा पल्लाही यशस्वीपणे गाठला.
धोनीने वनडेतील कामगिरीचा कित्ता कसोटीतही यशस्वीपणे गिरवला. त्याने करिअरमधील पाचव्या कसोटीत शानदार शतक झळकावले. त्याने २३ जानेवारी २००६ रोजी फैसलाबादच्या मैदानावर हे यश संपादन केले. त्याने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात ही कामगिरी केली. त्याने या कसोटीत १४८ धावा काढून करिअरमधील पहिल्या शतकाची नोंद केली.
धोनीची यशस्वी कारकीर्द
– २००० मध्ये गांगुलीच्या नेतृत्वात संघाने कसोटीच्या सिंहासनाकडे आगेकूच
– २००९ मध्ये अव्वल स्थान काबीज. १८ महिन्यांपर्यंतआता सहाव्या स्थानी.
– २००० ते २०१० पर्यंत : ४१ सामने, १२ विजय, १४ पराभव, १५ अनिर्णीत.
– २०११ पासून आतापर्यंत : २३ सामने, २ विजय, १५ पराभव, ६ अनिर्णीत.

अबकारी कर वाढल्याने २०१५ मध्ये महागाई

0

नवी दिल्ली
सरत्या वर्षाला निरोप देण्याची आणि नव्या वर्षाचे स्वागत करण्याची तयारी सुरू असतानाच, नववर्षात गृहपयोगी वस्तू आणि मोटारी-दुचाकी महागणार यावर शिक्कामोर्तब झाले आहे. या दोन्ही क्षेत्रांसाठी मागील युपीए सरकारने दिलेली अबकारी करातील सवलत सुरू न ठेवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला असून, त्यामुळे टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन्ससारख्या वस्तू आणि मोटारी, बाइक घेण्यासाठी ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत.
या दोन क्षेत्रांना चालना देण्यासाठी अबकारी करात सवलती देण्याचा निर्णय युपीए सरकारकडून गेल्या फेब्रुवारीच्या अर्थसंकल्पात घेण्यात आला होता. त्यानुसार छोट्या मोटारी, दुचाकी आणि व्यापारी वाहनांवरील अबकारी कर १२ वरून ८ टक्के, एसयुव्हींवरील अबकारी कर ३० वरून २४ टक्के, मध्यम आकाराच्या मोटारींवरील कर २४ वरून २० टक्के तर मोठ्या आकाराच्या मोटारींवरील कर २७ वरून २४ टक्क्यांवर आणण्यात आला होता. गृहपयोगी वस्तूंसाठी हा दर १२ वरून १० टक्के करण्यात आला होता.
युपीएनंतर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारनेही ही सवलत कायम ठेऊन तिला ३१ डिसेंबरपर्यंत (सहा महिने) मुदतवाढ दिली होती. मात्र, यापुढे तिला मुदतवाढ न देण्याचे सरकारने ठरवले असल्याचे अर्थ मंत्रालयातील एका वरिष्ठ अ‌धिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे मोटारी-दुचाकी आणि गृहपयोगी वस्तू महागण्याचे संकेत या क्षेत्रातील कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

माजी महापौर तरवडे यांचे निधन

0

पुणे – पुण्याचे माजी महापौर पांडुरंग दगडोबा तरवडे (वय 74) यांचे दीर्घ आजाराने मंगळवारी येथे निधन झाले. त्यांच्या मागे तीन मुलगे व दोन मुली असा परिवार आहे.
आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने तरवडे यांनी लहानपणापासूनच हमालीला सुरवात केली. त्याचवेळी समाजवादी विचारांनी प्रेरित होऊन एस. एम. जोशी, नानासाहेब गोरे, भाई वैद्य यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी चळवळीत त्यांनी कार्यकर्ते म्हणून काम केले. 1974 मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यानंतर 1979 ते 80 या वर्षात त्यांनी महापौरपद भूषविले. गरवारे भुयारी मार्ग, फरासखाना पोलिस स्टेशनचे नूतनीकरण, पर्वती जलतरण तलाव असे अनेक महत्त्वाचे प्रकल्प त्यांच्या काळात मार्गी लागले. त्यांच्याकडे सर्वपक्षीय नगरसेवकांना सोबत घेऊन काम करण्याची हातोटी होती. राजकारणाबरोबरच सामाजिक क्षेत्रात ते अप्पा म्हणूनच परिचित होते. राजकारणानंतर ते वाहतूक व्यवसायात रमले. त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

‘सोंगाड्या’चे दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी यांचे निधन

0

कोल्हापूर- ‘सोंगाड्या’, ‘एकटा जीव सदाशिव’ यासारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांचे दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी(८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. कुलकर्णी हे मुळचे पैठणचे. त्यांच्याकडे कुलकर्णीपदाचे वतन होते. दादा कोंडके यांच्या सुरूवातीच्या काळात गोविंद कुलकर्णी आणि त्यांच्या भट्टी चांगली जमली होती. यातूनच मग वरील दोन चित्रपटांबरोबरच बन्या बापू, अशी रंगली रात्र, अंगार, शपथ तुला बाळाची, मर्दानी, दैवत अशा चित्रपटांची कुलकर्णी यांनी निर्मिती केली. चित्रपट व्यवसायात आल्यानंतर कोल्हापूर हीच कर्मभूमी मानून ते येथेच वास्तव्य करू लागले. अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले. गंगोत्री हॉस्पिटलचे डॉ.चारूहास भागवत यांच्यासह दोन मुले, पत्नी,सुना, नातवंडे असा त्यांच्या पश्चात परिवार आहे.

महामंडळाचे उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, कार्यवाह सुभाष भुरके, निर्माते, दिग्दर्शक यशवंत भालकर, बाबुराव पेंटर फिल्म सोसायटीचे सचिव दिलीप बापट यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले.

घनकचरा आणि सांडपाणी याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुणे महापालिकेवर खटला दाखल करण्याचा इशारा

0

पुणे – घनकचरा आणि सांडपाणी याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पुणे महापालिकेच्या आयुक्तांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस बजाविली आहे. त्याबरोबरच कचरा आणि सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन न केल्यास महापालिकेवर खटले दाखल करण्याचा इशाराही दिला आहे.
पुणे विभागात पुणे, सोलापूर, पिंपरी-चिंचवड महापालिकांबरोबरच सातारा, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यांतील 29 नगरपरिषदा आणि नगरपालिकांनाही नोटिसा पाठविल्याची माहिती मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी जे. एस. सांळुके यांनी दिली. पुणे शहरातील घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनाचा ठराव महापालिकेने अद्यापही मंडळाकडे दिला नसून, अपुरी माहिती दिली असल्याचे मंडळाचे म्हणणे आहे. त्यामुळे महापालिकेला नोटीस मिळाल्यानंतर 15 दिवसांत स्थायी समिती आणि सर्व साधारणसभेत झालेला ठराव मंडळाकडे सादर करण्याची मुदत दिली आहे. ठरावाची प्रत योग्य वेळेत न दिल्यास जल अधिनियम 1974, पर्यावरण संरक्षण कायदा 1986 आणि नागरी घनकचरा नियम 200 अंतर्गत महापालिकेवर खटला दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट उल्लेख मंडळाने आदेशपत्रात केला आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांवर सांडपाण्यावर योग्य ती उपाययोजना करणे, शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावणे, तसेच योग्य ते संमतिपत्र मंडळाकडून घेऊन त्यातील अटी आणि शर्तीची पूर्तता करणे बंधनकारक आहे. याबद्दल साळुंके म्हणाले, “”पुणे महापालिका हद्दीत दरडोई 744 एमएलडी सांडपाणी निर्माण होते. त्यावरील 567 एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते आणि उर्वरित सांडपाणी कोणतीही प्रक्रिया न करता नदीत सोडले जाते. तसेच शहरात 1500 ते 1600 मेट्रिक टन घनकचरा प्रतिदिनी निर्माण होतो. त्यापैकी अंदाजे 950 ते 100 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होते आणि उर्वरित कचरा तसाच साठून राहत आहे. परिणामी, संस्थांना सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापन आणि प्लॅस्टिकमुक्त व्यवस्थापन करण्याचे आदेश दिले

पीके चित्रपटाच्या विरोधात आंदोलन

0

पुणे – राजकुमार हिरानी दिग्दर्शित पीके हा हिंदी चित्रपट १९ डिसेंबर यादिवशी प्रदर्शित झाला. त्यामध्ये हिंदूंच्या देवता, साधू-संत, मंदिरे, पूजाविधी यांची बदनामी करण्यात आली आहे. त्यामुळे हिंदूंमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. हिंदूंच्या धर्मभावनांची दखल घ्यावी, असा आरोप करीत डेक्कन येथील गुडलक चौकात पीके चित्रपटाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.
या वेळी पीके चित्रपटावर त्वरित बंदी आणण्यात यावी, तसेच हिंदूंचा तीव्र विरोध असतांनाही त्याला कानाडोळा करून चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये न काढण्याची भूमिका घेणारे चित्रपट परिनिरीक्षण मंडळ त्वरित बरखास्त करून त्याची पुनर्रचना करण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली. हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठान, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती आदी संघटना या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. हिंदू स्वाभिमान प्रतिष्ठानचे सचिव अधिवक्ता देवदास शिंदे, सनातन संस्थेच्या राजश्री खोल्लम, हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले आदी उपस्थित होते.

दुष्काळग्रस्त गावांसाठी “जलयुक्त शिवार योजना” : पंकजा मुंडे

0

पुणे- दुष्काळग्रस्त गावांसाठी राज्य सरकार लवकरच जलयुक्त शिवार योजना सुरु करणार असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. आज (सोमवार) पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पंकजा मुंडे बोलत होत्या.

जलयुक्त शिवार योजने अंतर्गत दरवर्षी राज्यातली ५ हजार गावं निवडली जातील आणि या योजनेच्या माध्यमातून या गावांमधील दुष्काळ कायमस्वरूपी घालवण्यास राज्य सरकार प्रयत्नशील राहील, असंही पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं आहे.

याशिवाय या योजनेला ५ हजार कोटींच्या निधीची आवश्यकता असून सध्या राज्य सरकारनं यासाठी १ हजार कोटी रूपये मंजूर केले असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं.

महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे हटाव मोहीम

0

पुणे- महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया केल्या. तसेच पक्षातील महिला कार्यकर्त्यांची गळचेपी केली. त्यामुळे व्यवहारे यांना पदावरून हटवावे, अशी मागणी काँग्रेस पक्षातील महिला कार्यकर्त्यांनी पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात पुणे महापालिका शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा संगीता तिवारी, महिला आघाडीच्या शहर कार्याध्यक्षा शोभना पणीकर, उपाध्यक्ष व अन्य पदाधिकारी महिलांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
या पदाधिकारी म्हणाल्या, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पुण्यामध्ये काँग्रेस पक्षाची पिछेहाट होण्यास प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांची पक्षविरोधी भूमिकाही कारणीभूत आहे. पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यापासून त्यांनी अनेक महिला कार्यकर्त्यांना रोखले. प्रसंगी त्यांना धमकावलेही. पुणेच नव्हे तर अन्य जिल्ह्यातही पक्षातील प्रामाणिक महिला कार्यकर्त्यांना डावलून ज्यांचा पक्षाशी संबध नाही, अशांना पदाची संधी देण्यात आली.

बेंगळुरू स्फोटामागे मेहंदी अटक?

0

बेंगळुरू – बंगळुरूमध्ये झालेला स्फोट हा एक दहशतवादी हल्ला असल्याची माहिती गृह राज्यमंत्री किरण रिजीजू यांनी दिली आहे. आपल्याला सुरक्षा व्यवस्था वाढवून अधिक सतर्कतेने काम करावे लागणार असल्याचेही ते म्हणाले आहेत. ISISचा ट्विटर हॅंडलर मेहंदी मसरूर बिस्वास याच्या अटकेचा बदला घेण्यासाठी हा स्फोट घडवण्यात आला असावा, असा संशय खुद्द कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनीच व्यक्त केल्याने या स्फोटाचे गांभीर्य वाढले आहे.

बंगळुरूमध्ये रविवारी रात्री 8.30 वाजता वरदळ असलेल्या चर्च स्ट्रीट परिसरात स्फोट झाला होता. त्यात एका महिलेचा मृत्यू तर चारजण गंभीर जखमी झाले होते. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. एका रेस्तरॉच्या बाहेर झालेला हा स्फोट कमी तीव्रतेचा असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. या स्फोटानंतर संपूर्ण परिसरात नाकाबंदी करण्यात आली होती. सीमीच्या फरार संशयित दहशतवाद्यांचा या घटनेमागे हात असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बॉम्ब स्फोटानंतर दिल्ली, कोलकाता, मुंबईसह देशभरात प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट घोषित केला आहे.

पोलिसांच्या मते हा बॉम्बस्फोट कोकनट ग्रोव्ह रेस्टॉरंटच्या जवळ एका नाल्यात झाला. स्फोटात कमी तीव्रतेच्या आयआयडीचा वापर करण्यात आला आहे. घटनेबाबत माहिती मिळतात मोठ्या संख्येने फौज फाटा घटनास्थळी रवाना झाला होता. त्यानंतर लगेचच पोलिसांनी याठिकाणी तपास सुरू केला.

या घटनेत तामिळनाडूची महिला भवानी (35) आणि कार्तिक (25) हे दोघे जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याठिकाणी उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. तर दुस-या तरुणाची स्थितीही गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.

वैभव जोशींची ‘तेव्हाची कविता कोरी” सागरिकाने केली पूर्ण!!

0

सागारिकाची ‘तेव्हाची कविता कोरी’ सोशल साईट्सवर लोकप्रिय!!

मराठी तसेच बंगाली म्युझिक क्षेत्रात आघाडीचे नाव असलेल्या सागरिका म्युझिकने आजवर अनेक गायकांना उत्तम संधी देऊन त्यांचे करिअर घडविण्यात मोलाची साथ दिली आहे. सतत काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न सागरिका म्युझिक करत असते आणि त्यांच्या या अथक प्रयत्नांना उत्तम यशही प्राप्त झाले आहे.
नेहमीच काही तरी वेगळे करण्यात व्यग्र असलेल्या सागरिकाचे लक्ष गेले ते प्रियंका बर्वे या नव्या गायिकेकडे. ‘प्रेमाला’ या हिट गाण्यानंतर सागरिकाने प्रियांका बर्वे साठी आणखी एक गाणं करायच ठरवल. वैभव जोशींनी लिहिलेलं ‘तुझ्यासवे तुझ्याविना’ हे गाण करायचं शेवटी ठरवलं.यावेळी मात्र सागरिकाला संगीतकार ही नवीन हवे होते. तेव्हा प्रियांकाने तिच्या ग्रुपमधील जसराज जोशी, हृषिकेश दातार आणि सौरभ भालेराव यांच नाव सुचविल. त्यांनी याआधी रेकॉर्ड केलेल ‘तेव्हाची कविता कोरी’ हे गाणं प्रियांकाने सागरिकाला ऐकायला दिलं. सागरिकाला हे गाणं इतकं आवडलं की तिने प्रियंकाच्या नव्या गाण्यासाठी ह्या बॅण्डला निश्चित तर केलंच त्याचप्रमाणे ”सागरिका म्युझिक च्या १६ व्या Anniversary कॉन्सर्टमध्ये हे गाणं पुन्हा नव्याने रिलीज करण्याचे ठरविले. सागरिकाने तर या बॅण्डला त्यांच्या आद्याक्षरावरून JSH असे नावही दिले.
”तेव्हाची कविता कोरी” हा व्हिडीओ सागरिकाने बनविण्याचे ठरविले ते केवळ या गाण्यातील वेगळेपणामुळे. उत्तम शब्द, JSH ने दिलेली सुमधुर चाल यासर्व गोष्टींमुळे ह्या व्हिडीओला चार चाँद लागले आहेत. ह्या गाण्याचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे गाणं जसराज जोशी, सौरभ भालेराव आणि ऋषिकेश दातार ह्या तिघांवर चित्रित करण्यात आले आहे. एका जमता-जमता राहून गेलेल्या या कवितेचे शब्द वैभव जोशी यांनी लिहिले असून या व्हिडीओची संकल्पना आणि दिग्दर्शन सागरिका दास यांचे आहे.
हे गाणं आम्ही दोन वर्षापूर्वी करून ठेवले होते. कवितेचे शब्द आम्हाला आवडले होते त्यामुळे आम्ही त्याचे गाण्यात रुपांतर केले होते. साधारणतः एक दीड वर्षापूर्वी हे गाणं रिलीजही झाले होते. जेव्हा सागरिकाने हे गाणं पुन्हा रिलीज करून या गाण्याचा व्हिडीओ बनविण्याचे ठरविले त्यावेळी तो आमच्यासाठी खरच एक सुखद धक्का होता. आमच्याच गाण्याचा व्हीडीओ आमच्यावरच चित्रित होणार होता. सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्यक्षात हे गाणं आमच्याकडे येण्याची आणि आणि ते गाणं बनण्याची प्रोसेस होती तिच या व्हिडीओमध्ये चित्रित करण्यात आल्याची प्रतिक्रिया JSH बॅण्डने व्यक्त केली.

‘ते’ बेपत्ता विमान समुद्राच्या तळाशी?

0

जाकार्ता

इंडोनेशियातील विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर रविवारी सकाळी रहस्यमयरित्या बेपत्ता झालेल्या एअर एशियाच्या विमानाचा अद्याप नेमका ठावठिकाणा लागलेला नाही. मात्र, हे विमान समुद्रात कोसळल्याचा अंदाज इंडोनेशियाने व्यक्त केला असून त्यादृष्टीनं शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.

मलेशियन विमान कंपनी असलेल्या ‘एअर एशिया’चे क्यूझेड ८५०१ हे विमान रविवारी पहाटे ५.२० वाजता सिंगापूरसाठी रवाना झाले होते. सिंगापूरच्या चंगी विमानतळावर ते सकाळी ८.३० वाजता उतरणार होते. मात्र, उड्डाणानंतर ४२ मिनिटांतच ते बेपत्ता झाले. खराब हवामानामुळे पायलटने विमानाचा नियोजित मार्ग बदलण्याची विनंती केली होती. त्यानंतर विमानाचा रडारशी संपर्कच तुटला होता. तब्बल ३० तास उलटल्यानंतरही विमानाच्या ठावठिकाण्याबद्दल केवळ शंकाकुशंकाच व्यक्त होत आहेत. इंडोनेशिया सरकारने कालपासूनच विमानाच्या शोधाचं काम सुरू केलं आहे.

गेल्या २४ तासांतील शोधानंतर आणि विविध ठिकाणांहून माहिती घेतल्यानंतर इंडोनेशियन शोधपथक विमान समुद्रात बुडाल्याच्या निष्कर्षाप्रत आलं आहे. ‘हे विमान समुद्राच्या तळाशी असावं अशी आमची प्राथमिक माहिती आहे. आम्ही बेलीतुंग बेटाच्या पूर्व आणि उत्तरेकडील जलभागावर लक्ष केंद्रित केलं आहे,’ असं शोधपथकाचे प्रमुख सोलिस्तो यांनी सांगितलं.

वायुसेनेची विमानं, पाणबुड्या, तसेच इंडोनेशियासह मलेशिया,

Ritesh Deshmukh, Ayushman Khurana, Shaan and Sudesh Lehri Celebrated Mulund Festival

0

2

3

4

5

6

7

8

A five-day-long festival of Mulund the “Entertainment ka Mela” witness by the Leading lights from the Bollywood and Television industry have arrived in the Festival. Mulund Festival initiated by Charan Singh Sapra Ex – MLC & Chairman of Sewak (NGO) concluded yesterday with a Starring Goodbye to year 2014. The 5 day event started from 25st – 29th Dec 2013 was a Grand Success. It featured more than 10000 participants in 10 different events which included Karaoke Singing, Dancing, Box Cricket, Body Building, Badminton, Painting, Rangoli, Marathon, Carnival Junction, Harley Davidson Bike Rally and many more. Charan Singh Sapra said, “The Mulund Festival has proven to promote our great city and province by showcasing local and international talents in fashion, entertainment and cultural performing arts. I applaud all the sponsors, organizers, participants and attendees for promoting this annual cultural festival”. The festivals provide attendees with the chance to get up close and personal with their favorite celebrity.

The Entertainment ka Mela flag off my Singer-Comedian Sugandha Mishra, and followed Harley Davidson Bike rally with the message of “Save Girl Child”. Body Building competition was a mega hit where Body Builders from around the World flexed their muscles thereby amazing the Mulundites with their hulky structures Chief Guest Bollywood Actor Mukesh Rishi who himself is a Body Builder, considering the participations from all over the world, said “Mr. Sapra has organised this event on a very Grand Scale & it can be rather called “World Festival” instead of “Mulund Festival”.

On the grand finale of the festival people was seen grooving on the tune of Shaan which made crowd go crazy. Charan Singh Sapra was seen bonding with Ritesh Deshmukh, Sapra said, “We are bringing all the sections of societies & people of different age groups on a common platform & also give them a chance to exhibit & excel their talents.” Standup Comedian Sudesh Lehri was seen making people rolling on the floor with his jokes.

Ritesh Deshmukh who was all in Marathi mood said, “Mulund Fest is an initiative for bringing about togetherness by the cosmopolitan crowd of Mulund. The festival was a great fun. I enjoyed a lot the audience was amazing.” Sapra was seen honoring Bollywood star Ayushman Khurana who enthrall the audience with his melodious voice and sung his popular song “Mera Mann Kehne Laga”, Ayushman said, “Its fun to celebrate mulund festival with all my fans. It’s a beautiful fest I have ever seen.” Bigg Boss fame Actor Pratyusha Banarjee was seen enjoying the performance, she said, “It was great fun and I am grateful to be here.” Others who were present at the Harshad Chopra, Sumeet Raghvan, Rupali Bhosale, Atul Parchure, Paresh Ganatra, Aditi Sajwan and Manav Gohil. The festival was celebrated by mulundies with lots of fun and pomp.

पुण्याच्या श्री लक्ष्मी को-ऑप बँकेला, बँकोचा पुरस्कार

0

पुणे येथील श्री लक्ष्मी को-ऑप. बॅकेला , बँको या संस्थेच्या वतीने, तोट्यामधुन बाहेर पडून नफा कमविणारी बँक म्हणून पहिला पुरस्कार देण्यात आला असून, सदर पुरस्कार राष्ट्रीय सहकारी बँक फेडरेशनचे अध्यक्ष डॉ. श्री मुकूंद अभ्यंकर यांच्या हस्ते, लोणावळा येथील लगून रिसॉर्ट येथे देण्यात आला.

श्री लक्ष्मी को-ऑप. बँक ही गेल्या काही वर्षापासून थकबाकीमुळे तोट्यात होती. बँकेचे अध्यक्ष मा. श्री सुरेश कोते, उपादध्यक्ष श्री संजय गुगळे तसेच संचालक मंडळ व कर्मचारी वृंद यांच्या अथक परिश्रमातुन बँक तोट्यातुन बाहेर पडून सन 2013 – 2014 या आर्थिक वर्षात बँकेने रू. 1,09,85,296.41एवढा नफा कमविला आहे. यामुळे बँकेचा सर्व तोटा भरला जावून बँकेस वर्षाखेर शिल्लकनफा रू. 1,93,174/- झाला आहे.

बँकेचे अध्यक्ष श्री सुरेश कोते आणि आधारस्तंभ व जेष्ठसंचालक मा. अ‍ॅड. अभयजी छाजेड, माजी आमदार मोहन जोशी तसेच डॉ.अशोककुमार पगारिया, श्री विजयकुमार मर्लेचा व संचालक मंडळाचे उर्वरित सदस्य यांचे या कामी सहकार्य लाभलेले आहे.

यापुढे बँकेची प्रगती अधिक वेगाने होईल व लवकरच बँकेच्या ठेवी रू. 100 कोटी रूपयापर्यंत पोचवू असा विश्‍वास मा. अध्यक्ष श्री सुरेश कोते यांनी व्यक्त केला.

सदर पुरस्कार बँकेच्या वतीने अध्यक्ष श्री सुरेश कोते, डॉ. अशोककुमार पगारिया तसेच संचालक श्री नितिन ओस्तवाल, श्री नारायण गोंजारी यांनी स्विकारला.