Home Blog Page 339

पोलीस हुतात्मा स्मृतिस्थळावर पोलीस दलाच्या वतीने आदरांजली

पोलीस स्मृतिदिन संचलन २१ ऑक्टोबर २०२५ शोक कवायत


लडाख येथे दि.२१ ऑक्टोबर १९५९ या दिवशी हॉटस्प्रिंग या कडाक्याच्या थंडीच्या ठिकाणी, सुसज्ज चिनी सैन्याने केंद्रीय निमलष्करी पोलीस दलाच्या १० शुर शिपायांच्या तुकडीवर पुर्व तयारी निशी अचानक हल्ला केला. त्यावेळी त्या १० शुर वीरांनी शत्रुशी निकराने लढत देऊन देशासाठी आपले देह धारातिर्थी ठेवले. तेव्हापासुन २१ ऑक्टोबर हा दिवस देशातील विविध पोलीस दलाचे वतीने पोलीस स्मृतीदिन म्हणुन पाळला जातो. पोलीस स्मृतिदिनाचे दिवशी एकाच वेळी देशातील सर्व पोलीस मुख्यालयाचे ठिकाणी मागील एका वर्षाचे कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व कर्मचा-यांनी आपले कर्तव्य बजावत असताना प्राणांची आहुती दिली त्या सर्वांना आदरांजली वाहण्यात येते.
मागील एका वर्षाचे कालावधीत ज्या पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना आपले कर्तव्य बजावत असताना, वीरमरण आले, अशा संपुर्ण भारत देशातील सर्व राज्य, केद्रातील निमलष्करी पोलीस दलातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार/जवान यांचे स्मृतिला आज दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ०७/३० वा.ते ०८/३० वा.चे दरम्यान पाषाण रोड स्थित महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र, (सीपीआर), पाषाण पुणे येथील पोलीस हुतात्मा स्मृतिस्थळावर पोलीस दलाच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली.
आज दिनांक २१ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे येथे महाराष्ट्र राज्य पोलीस संशोधन केंद्र, (सीपीआर), पाषाण पुणे येथील पोलीस हुतात्मा स्मृति स्मारकावर सकाळी ०८/०० वा. मा.ना.श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई तथा पालकमंत्री पुणे व वीड जिल्हा यांचे हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन आदराजंली वाहण्यात आली. सदर क्रार्यक्रमास श्री. संजीवकुमार सिंघल महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई, श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड, पुणे, श्री. दीपक पाण्डये अप्पर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस दळणवळण माहिती तंत्रज्ञान व परिवहन महाराष्ट्र राज्य पुणे, श्री. सुनिल रामानंद अपर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिपसिंह गिल्ल पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण तसेच पुणे शहरातील सर्व कार्यरत व सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.मा.ना.श्री. अजित पवार, उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री महाराष्ट्र राज्य, मुंबई तथा पालकमंत्री पुणे व बीड जिल्हा, श्री. अमितेश कुमार पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. विनयकुमार चौबे पोलीस आयुक्त, पिंपरी-चिंचवड, पुणे, श्री. रंजनकुमार शर्मा पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप सिंह गिल्ल पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामीण, श्री. संजय पाटील अपर पोलीस आयुक्त प्रशासन पुणे शहर यांनी पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर उपस्थित इतर मान्यवर, पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी पुष्प अर्पण करुन श्रध्दांजली वाहिली.
दि.१ सप्टेंबर २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत महाराष्ट्रातील १. पोलीस कॉन्स्टेवल महेश कावडु नागुलवार या पोलीस जवानाला कर्तव्यावर असताना शहिद झाले.
दि.१ सप्टेंबर २०२४ ते ३१ ऑगस्ट २०२५ या कालावधीत आपले कर्तव्य बजावित असताना, वीरगती प्राप्त झालेल्या देशातील पोलीस अधिकारी व पोलीस जवान (सर्व दर्जाचे) असे एकुण १९१ जवानांच्या नावाच्या यादीचे वाचन शोक कवायतीचे दरम्यान श्री. सुनिल जैतापुरकर सहा. पोलीस आयुक्त, नियंत्रण कक्ष, अभियान, पुणे शहर व श्री. सरदार पाटील, सहा. पोलीस आयुक्त, मानव संशाधन, पुणे शहर यांनी केले.
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. सिताराम नरके, सेवानिवृत्त, सहा. पो. फौज. एसआरपीएफ, ग्रुप-२. रामटेकडी, पुणे व दत्तात्रय निकम, पोलीस अंमलदार, पिंपरी पो. स्टे यांनी केले.

बंगाली बांधवांचा काली माता पूजा उत्सव उत्साहात सुरू

श्री श्री श्यामा काली पूजा उत्सवाचे रौप्य महोत्सवी वर्षे

पुणे: सध्याच्या काळात सांस्कृतिक राजधानी समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात वाढलेली गुन्हेगारी पाहता हे शहर भयमुक्त व्हावे, स्वच्छ पुणे, सुंदर पुणे शहर असावे अशी प्रार्थना माजी आमदार आणि शिवसेना शिंदे गटाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी काली मातेकडे केली.

बंगाली समाजाकडून साजरा केल्या जाणाऱ्या काली पूजा उत्सवात रविंद्र धंगेकर बोलत होते. यावेळी पुणे शहर सार्वजनिक काली पूजा कमिटीचे कमिटी चे सेक्रेटरी सुब्रतो मजुमदार,विनोद संतरा- खजिनदार ,अमर माझी-उपसेक्रेटरी ,अनुप माईती – सदस्य , महादेव माझी – सदस्य ,पूनचंद्र दास- सदस्य,संकेत मजुमदार
आणि मान्यवर उपस्थित होते.

मागील पंचवीस वर्षापासून हा उत्सव आपल्या भागात साजरा केला जात असून त्यात अनेक बंगाली बांधव सहभागी होत असतात. महाराष्ट्रात 45 वर्षापासून बंगाली बांधव सोन्याचे कारागीर म्हणून पुणे शहरात कार्यरत असून त्यांच्याशी आपला घरगुती संबंध आहे, असे धंगेकर यांनी नमूद केले.

काली मातेवर श्रद्धा बाळगणाऱ्या बंगाली नागरिकांसाठी आवश्यक त्या उपलब्धता मिळवून देणे हे आपले कर्तव्य असून त्यांच्या भावनांचा आपण आदर करत असल्याचे धंगेकर यांनी सांगितले.

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जमीन हडपणाऱ्यांना काँग्रेस सोडणार नाही, मंत्र्यांच्या भ्रष्टाचारात प्रशासन व बँकेचीही मदत.

पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरण..
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसची जागा हडप करण्याचा प्रकार युवक काँग्रेसने उघड केला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा जवळचा संबंध असल्याचे उघड झाले आहे. या जमीन व्यवहारात धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयातून तत्काळ परवानग्या देण्यात आल्या, हे धर्मादाय आयुक्त व मुख्यमंत्री यांचे निकटचे संबंध असल्याचे दिसत आहे तर बँकेकडून एकाच दिवसात कर्जही मंजूर करण्यात आले. मोहोळ हे भ्रष्ट मार्गाने माया जमवण्याचा प्रयत्न करत आहेत पण पुण्यातील हा जमीन व्यवहार रद्द केल्याशिवाय काँग्रेस गप्प बसणार नाही. असे सपकाळ म्हणाले.

मुंबई- देशात व महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे आलेले सरकार हे मतचोरी करून आलेले आहे. मतचोरी करूनच नरेंद्र मोदी पंतप्रधान तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत म्हणूनच निवडणूक आयोगाची पाठराखण भारतीय जनता पक्ष व देवेंद्र फडणवीस करत आहेत, असा ह्ल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, मतदार याद्यांमध्ये प्रचंड घोटाळे करण्यात आलेले आहेत. भारतीय जनता पक्षाला अनुकूल नावे समाविष्ट करणे व विरोधांना अनुकुल असलेल्यांची नावे वगळणे, एकाच घरात ८० किंवा १०० मतदार, घर नंबर नसलेल्यांची नावे, वयांमध्ये फेरफार असे अनेक प्रकारचे गोंधळ या यादीत आहेत. मतदारांची वाढलेली संख्या ही सुद्धा अनाकलनीय आहे. याचे पुरावे निवडणूक आयोगाला सादर केलेले असताना निवडणूक आयोगाकडून जी उत्तरे दिली जात आहेत ती समाधानकारक नाहीत व पटणारीही नाहीत. निवडणूक आयोगाची भूमिका कठपुतली बाहुल्यासारखी आहे. निवडणूक आयोगाचा कारभार पहाता त्यांच्याविरोधात मोर्चा काढण्याची तयारी केली जात आहे आणि तसा निर्णय झाला तर काँग्रेस पक्ष त्याचे समर्थन करेल असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

“माऊलींच्या कृपेनेच विठ्ठल दर्शन घडले,बळीराजाला आळंदीकरांनी धीर द्यावा ” — उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांचे दिवाळी पहाट निमित्त प्रतिपादन

आळंदी तीर्थक्षेत्र विकासासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याची दिली ग्वाही

आळंदी (ता. खेड) दि २१ ऑक्टो: श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती, आळंदी यांच्या वतीने आयोजित दिवाळी पहाट संगीत महोत्सवात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांनी उपस्थित राहून पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायन सेवेचा आस्वाद घेतला .

डॉ. गो-हे म्हणाल्या, “भाऊबीजेला विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला जाण्याचा मानस होता, परंतु माऊलींनीच बोलावल्यामुळे आळंदी येथेच माऊलींसह विठ्ठल दर्शन घडले. त्यामुळे आजचा दिवस अत्यंत आनंददायी आहे. या निमित्ताने आळंदीकरांशी संवाद साधण्याची संधी मिळाली.”

त्या पुढे म्हणाल्या, “संगीताच्या माध्यमातून अनेक तरुण मुले-मुली आध्यात्म आणि वारकरी संप्रदायाशी जोडली जात आहेत. दिवाळी पहाटसारखे कार्यक्रम या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरतात. आपण सर्वजण गुरुकुल परंपरेतून वारकरी संप्रदायाची सेवा करत आहोत. माऊलींचे आपल्यावर आणि सरकारवरही आशीर्वाद आहेत.”

डॉ. गो-हे यांनी यावेळी आळंदी तीर्थक्षेत्र विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार महायुती सरकारची कटिबद्धता अधोरेखित केली. “विधानपरिषदेचे माजी सभापती कै.ना. स. फरांदे हे माऊलींचे निष्ठावंत भक्त होते. त्यांनी विधानपरिषदेतून सातत्याने आळंदी तीर्थक्षेत्र विकासासाठी पाठपुरावा केला. मीदेखील वैयक्तिक आणि शासनस्तरावर या कार्यासाठी प्रयत्नशील आहे,” असे त्यांनी नमूद केले.

त्या पुढे म्हणाल्या, “आपली बांधिलकी बळीराजाशी आहे. अलीकडील पुर, अतिवृष्टी व पीक नुकसानीमुळे शेतकरी खचला आहे. आळंदीच्या या आध्यात्मिक केंद्रातून त्याला सहकार्य, वात्सल्य आणि आपुलकीचा आधार मिळावा, यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत.”

“आजचे दर्शन माऊलींनी दिले असून आपण त्यांच्या चरणी सदैव नतमस्तक आहोत. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विश्वस्त मंडळाच्या माध्यमातून नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्यास त्या सोडविण्यासाठी मी नक्की प्रयत्न करीन,” असे आश्वासनही त्यांनी दिले.

या कार्यक्रमास आळंदी संस्थान समितीचे विश्वस्त डॉ भावार्थ देखणे,श्री कबीरबाबा, अॅडव्होकेट रोहिणी पवार,श्री प्रकाश वाडेकर , स्थानिक लोकप्रतिनिधी, मान्यवर नागरिक आणि भक्तगण उपस्थित होते.

प्लास्टिकमुक्त नवी मुंबईसाठी नवी मुंबई महानगरपालिकेसह प्रोजेक्ट मुंबई व माइंडस्पेस आरईआयटी एकत्र

0

२०० हून अधिक ठिकाणी  लाख नागरिकांना सहभागी करून घेत प्लास्टिक  कचऱ्याचा पुनर्वापर आणि कचऱ्याचे सार्वजनिक उपयोगी साहित्यात रूपांतर करणारा अभिनव उपक्रम

शाश्वत शहरी जीवनमान उंचाविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या सहकार्याने ‘नवी मुंबई प्लास्टिक अँड ई-वेस्ट रिसायक्लोथॉन’ हा अभिनव उप्रकम राबविण्यास सुरूवात केलेली आहे. प्लास्टिक आणि ई-वेस्टला आळा घालणे आणि चक्राकार प्रक्रिया पद्धतींना प्रोत्साहन देणे या उद्दिष्टाने सुरु असलेल्या या उपक्रमामध्ये माइंडस्पेस बिझनेस पार्क REIT (माइंडस्पेस REIT) हे उद्योग – व्यावसायिकांची सामाजिक जबाबदारी (CSR) या धोरणांतर्गत सामाजिक बांधिलकी जपत या उपक्रमात सक्रीय सहभागी झालेले आहेत.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या समवेत आज प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.  शिशिर जोशी आणि माइंडस्पेस REIT मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रमेश नायर यांच्या झालेल्या विशेष बैठकीत यापुढील काळात प्लास्टिकमुक्त नवी मुंबईचा उद्देश साकरण्यासाठी राबविण्यात येणा-या रिसायक्लोथॉन उपक्रमाच्या अंमलबजावणीविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. सुनिल पवार उपस्थित होते. यावेळी प्लास्टिक बॉटल पासून बनविलेल्या आकर्षक टिर्शटचे अनावरणही  संपन्न झाले.

रिसायक्लोथॉन उपक्रमाचे उद्दिष्ट हे वर्तनात्मक बदल घडवून आणणे आणि दैनंदिन जीवनात जबाबदार घनकचरा व्यवस्थापनाचा समावेश करणे असून या अंतर्गत 200 हून अधिक ठिकाणी हा उपक्रम राबवून 2 लाखाहून अधिक नवी मुंबईकर नागरिकांना सामावून घेणे आहे. विविध गृहनिर्माण संस्था, कॉर्पोरेट्स, शाळा आणि सेवाभावी संस्था यांच्या सहयोगाने ‘क्षेपणभूमीवर शून्य कचरा नेणे (नो वेस्ट टू लँडफिल)’ हे ध्येय या उपक्रमाच्या माध्यमातून साध्य करावयाचे आहे व याव्दारे नवी मुंबई शहराला भारतातील शाश्वत शहर विकासाचे मॉडेल म्हणून अग्रभागी आणावयाचे आहे.

या उपक्रमांतर्गत गोळा केलेले प्लास्टिक आणि ई-कचरा याव्दारे बेंचेस, प्लांटर्स, वॉकिंग ट्रॅक आणि शालेय साहित्य यासारख्या वस्तू व साहित्य बनविण्यात येणार असून याचा पुनर्वापर केला जाणार आहे. या माध्यमातून कचरा कमी करणे (Reduce), कच-याचा पुनर्वापर करणे (Reuse) आणि कच-यावर पुनर्प्रक्रिया करणे (Recycle) हे थ्री आर तत्व प्रत्यक्षात उपयोगात आणले जाणार आहे. या मोहीमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे झिरो वेस्ट गार्डन्सची निर्मिती हा आहे. या अंतर्गत पूर्णपणे रिसायकल केलेल्या प्लास्टिक कचऱ्यापासून बनविलेल्या सुविधांनी उद्याने विकसीत केली जाणार असून याव्दारे शहर सुशोभिकरणाचा एक नवा आदर्श प्रस्थापित केला जाणार आहे.

संपूर्ण वर्षभरात अनेक जागरूकता मोहिमा राबविल्या जाणार असून त्यासोबतच नवी मुंबईला विस्तृत सागरी किनारा लाभला असल्याने किनारपट्टी व खारफुटी स्वच्छता आणि प्लास्टिक संकलन मोहिमा राबवल्या जाणार आहेत. यामध्ये ऐरोली येथील 2 माइंडस्पेस बिझनेस पार्कमधील कर्मचारी, स्थानिक स्वयंसेवक आणि विद्यार्थी सक्रिय सहभाग घेतील. ही स्वच्छता व प्लास्टिक मुक्तीची चळवळ नवी मुंबईच्या इकोसिस्टमला नवा आयाम देईल.

महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी प्लास्टिकमुक्त नवी मुंबई शहर साकारण्यासाठी महानगरपालिकेने प्रोजेक्ट मुंबई या संस्थेच्या सहयोगाने हाती घेतलेली रिसायक्लोथॉन मोहीम नवी मुंबईच्या स्वच्छता व प्लास्टिक मुक्त चळवळीला नवी गती दईल असा विश्वास व्यक्त करीत यामध्ये माइंडस्पेस REIT या संस्थेने पुढाकार घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. सर्वांच्या एकत्रीत सहयोगाने नवी मुंबई शहर देशातील सर्वोत्तम पर्यावरणशील म्हणून पुढे येईल असे ते म्हणाले.

प्रोजेक्ट मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक श्री.शिशिर जोशी यांनी हा उपक्रम कच-याचे संधीत रुपांतर करणारा असल्याचे सांगत टाकून दिलेल्या वस्तूंचे आम्ही नागरिकांच्याच सहयोगाने सार्वजनिक वापराच्या मालमत्तेत रुपांतर करुन सामाजिक बांधिलकी जपत आहेत असे सांगितले. या माध्यमातून पर्यावरणाला घातक प्लास्टिकविरोधी सक्षम चळवळ उभी राहील अशी खात्री असल्याचे ते म्हणाले.

माइंडस्पेस REIT मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. रमेश नायर यांनी नवी मुंबई सारख्या देशातील एका आधुनिक शहरात व्यवसाय करीत असतांना शहराप्रती असलेली कर्तव्य भावना जपत आम्ही यामध्ये सक्रीय सहभाग घेत असल्याचे सांगत याचा अभिमान असल्याचे मत व्यक्त केले. रिसायक्लोथॉन उपक्रम हा भारताचे उज्ज्वल भविष्य घडविण्याचे माध्यम असून यामधील सहभाग नवी मुंबईच्या पर्यावरणशीलतेला नवी गती देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  

स्वच्छ सर्वेक्षण 2024 मध्ये नवी मुंबई महानगरपालिकेला शहरांच्या क्रमवारीपेक्षा वरच्या स्थानावर असलेल्या देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या सुपर स्वच्छ लीगमध्ये मानांकन प्राप्त झाले असून प्रोजेक्ट मुंबईच्या माध्यमातून आणि माइंडस्पेस REIT यांच्या सहयोगाने राबविण्यात येत असलेला रिसायक्लोथॉन उपक्रम स्वच्छता आणि प्लास्टिकमुक्त नवी मुंबई शहरासाठी एक यशस्वी सकारात्मक पाउुल आहे, जे नवी मुंबई शहराला शाश्वत पर्यावरणशील विकासाच्या दिशेने पुढे घेउन जाईल.

“तुफानातील दिवा’’, “कुणाची वाट बघताय?’’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : कलावंताला जात-धर्म नसतो. नास्तिकता, आस्तिकता असलेल्या आपल्या देशात समन्वयातूनच सांस्कृतिक संवाद घडत असतो. भगवान धेंडे यांचे लेखन विरोधाभासी असले तरी अंत:करणात बुद्ध असून गुरुदेव यांच्याविषयी भक्तीभाव आहे. प्रत्येकाच्या जीवनातील अर्थ समजून घेण्याची त्यांची समन्वयाची भूमिका आहे. त्यांच्या लेखनाचा धर्म हा माणुसकीचा आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

भगवान धेंडे लिखित ‘तुफानातील दिवा’ आणि ‘कुणाची वाट बघताय?’  या दोन पुस्तकांचे प्रकाशन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे जिल्हा प्रतिनिधी रावसाहेब पवार आणि डॉ. सबनीस यांच्या हस्ते झाले. त्या वेळी डॉ. सबनीस बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह ॲड. प्रमोद आडकर, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, चित्रपट निर्माते आप्पा बोराटे, अभिनेते जगन्नाथ निवंगुणे, ॲड. रंजना भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. मयूरी प्रकाशनतर्फे पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत.

जाती-पातीच्या व्यवस्थेत राहूनही भगवान धेंडे यांचे साहित्याच्या क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. श्रद्धेचा सन्मान करताना त्यांनी लिखाणातून साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित केले आहे, त्याचप्रमाणे माणुसकीचा धर्म जोपासला आहे. त्यांना जीवनात अनेक संकटांचा सामना करावा लागला तरी जीवनातील सकारात्मकता हे त्यांच्या यशाचे खरे कारण आहे.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना रावसाहेब पवार म्हणाले, सध्याचे समाजकारण, राजकारण याकडे बघितल्यानंतर आपण का जगतो आहोत असा प्रश्न पडतो. सकारात्मकता जपणारी माणसे वेचावी लागतात. सकारात्मक वृत्तीने जगणाऱ्या व्यक्तींकडे पाहिल्यानंतर जगण्याची उमेद मिळते. माणसाला माणूस म्हणून उभे करणे ज्याला समजते तो खरा माणूस होय.

ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, आयुष्यात सेवाभाव महत्त्वाचा आहे. भगवान धेंडे यांच्या कथा-कवितांचे अभिवाचन झाल्यास त्यांच्या लेखनाची महती कळू शकेल.

डॉ. शरद कुंटे म्हणाले, धेंडे यांच्या कथा-कविता वाचल्यानंतर त्यांची विचारपद्धती समजून येते. विपरित पस्थितीत त्यांनी सकारात्मकता अंगी जोपासली असल्याने त्यांच्या लेखानात हुंकार दिसून येतो.

भगवान धेंडे यांनी लेखन प्रवास उलगडला. डॉ. सिद्धार्थ धेंडे, आप्पा बोराटे, जगन्नाथ निवंगुणे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली अवचरे यांनी केले. सागर धेंडे, ब्रह्मानंद धेंडे यांनी स्वागत केले.

शब्दसुरांच्या साथीने तीन भारतरत्नांना सांगीतिक अभिवादन

मराठवाड्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी निधी संकलन; रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजतर्फे आयोजन

पुणे: भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या बुलंद स्वरांच्या आठवणी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या मधुर स्वरांच्या स्मृती आणि ज्येष्ठ राजनीतिज्ञ, कवी अटल बिहारी वाजपेयींची समर्थ शब्दकळा, यांचा त्रिवेणी संगम रसिकांनी शनिवारी सायंकाळी अनुभवला. विद्यार्थी सहाय्यक समितीच्या फर्ग्युसन रोडवरील संकुलातील मोडक सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

निमित्त होते, मराठवाड्यातील पूरग्रस्त भागातील मुलामुलींसाठी सहाय्यता निधी उभारण्यासाठी आयोजिलेल्या ‘तीन भारतरत्न’, या सांगीतिक मैफलीचे! भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, गानसम्राज्ञी लता मंगेशकर व कवी अटलबिहारी वाजपेयी यांच्या गाणी, कविता आणि आठवणी असा गोफ या मैफलीच्या माध्यमातून रसिकांनी अनुभवला. गायिका मनीषा निश्चल, गायक अमोल निसळ व संजीव मेहेंदळे यांच्या बहारदार सादरीकरणाने ही मैफल दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी झाली. मनीष आपटे यांच्या ओघवत्या निवेदनाने मैफलीचा आनंद द्विगुणित झाला. 

गायिका मनीषा निश्चल यांनी ज्योतिकलश झलके, अपनेही मन से कुछ मांगे, राम का गुणगान करिये, मेंदीच्या पानावर, दिल हुम हुम करे… ही गीते सादर केली. संजीव मेहेंदळे यांनी आरंभी वंदिन अयोध्येचा राजा, भाग्यदा लक्ष्मी बारम्मा, राम का गुनगान करिये, भेटीलागी जीवा… या रचना ऐकवल्या, तर अमोल निसळ यांनी आता कोठे धावे मन, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, राजस सुकुमार मदनाचा पुतळा.. यांचे सादरीकरण केले. बाजे रे मुरलिया बाजे या रचनेने या रंगतदार मैफलीची सांगता झाली.

पं. भीमसेन जोशी यांच्या संतवाणीतील काही निवडक रचना, प्रखर राजनीतिज्ञ तथा कवी अटल बिहारी वाजपेयी यांच्या काही कविता आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची काही अभिजात गीते, असा मेळ या कार्यक्रमाच्या निमित्ताने जुळून आला. विवेक परांजपे (सिंथेसायजर आणि संगीत संयोजन), यश भंडारे (की बोर्ड), अमेय ठाकूरदेसाई (तबला), अनिल करंजवकर (पखवाज), चेतन परब (आक्टोपड) यांनी पूरक साथसंगत केली. 

रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गेट सेट गो हॉलिडेज प्रस्तुत, मनीषा निश्चल्स महक निर्मित ‘तीन भारतरत्न’ या कार्यक्रमाला सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापकअध्यक्ष डाॅ. संजय बी. चोरडिया, दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिकाई) रघुनाथ येमुल गुरुजी, विद्यार्थी साहाय्यक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, ‘रोटरी’चे अध्यक्ष जीवराज चोले, सचिव तेजस्विनी थिटे उपस्थित होते.

रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजचे अध्यक्ष जीवराज चोले यांनी उपस्थितांचे स्वागत केले. मी स्वतः समितीचा माजी विद्यार्थी आहे. विद्यार्थी समितीला कधीच विसरत नाहीत. त्यामुळे मराठवाड्यातील पूरग्रस्त विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात पुढे करणे, हे कर्तव्य समजून, या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. रोटरी क्लब ऑफ पुणे सनराईजच्या वतीने विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी एक लाख ५१ हजारांचा निधी समितीला देत असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रा. डाॅ. संजय बी. चोरडिया म्हणाले, समितीच्या कार्याला मी अभिवादन करतो. अशा कार्यात सहभागी होणे हे नैतिक व मूल्याधिष्ठित कार्य आहे, असे आम्ही समजतो. त्यामुळे जिथे कमी आहे, तिथे सूर्यदत्त आहे, असे आश्वासन मी देतो.

तुषार रंजनकर म्हणाले, समितीमध्ये निम्मे विद्यार्थी मराठवाड्यातील आहेत. विद्यार्थ्यांसाठी कमवा आणि शिका योजना असून, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, कौशल्यविकासाच्या संधी हे समितीचे ध्येय आहे. विद्यार्थ्यांची वेगळ्या प्रकारची जडणघडण समितीमध्ये होते.

निराधार आजी-आजोबांसोबत ‘मनसे’चा पहिला दिवा

पुणे: निराधार आजी-आजोबांना दिवाळीचा फराळ, नवा पोशाख, आकाश कंदील देऊन त्यांच्यासोबत दीपोत्सवाचा आनंद साजरा करण्यात आला. पहिला दिवा निराधार व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते लावून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुणे शहर व प्रल्हाद गवळी मित्र परिवाराच्या वतीने दिवाळी साजरी करण्यात आली. या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे.

भवानी पेठेतील पुष्पा पचनूर सभागृहात ज्येष्ठ नागरिक, निराधार आजी-आजोबा यांच्यासाठी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, ‘मनसे’चे संघटक प्रल्हाद गवळी, मनसे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, कॉंग्रेसचे बाळासाहेब दाभेकर, संदिप महाराज जाधव, आळंदी देवस्थान, विक्रम अगरवाल, प्रल्हाद गवळी मित्र परिवाराचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

समाजाला अनेक प्रश्न सध्या भेडसावत आहेत. अलिकडे मुले आई-वडिलांनाही जुमानत नाहीत. अशावेळी सामाजिक बांधिलकी जपत घरात मुले, नातवंडे नसलेल्या, तसेच मुले संभाळत नसलेल्या आजीआजोबांचा सन्मान करून त्यांची दिवाळी गोड करून त्यांना प्रेरणा देण्याचा प्रयत्न सुखावणारा आहे. हा उपक्रम स्तुत्य आहे, असे अंकुश काकडे यांनी नमूद केले.

प्रल्हाद गवळी म्हणाले, “मागील पाच वर्षापासून आजी-आजोबांसोबत पहिला दिवा हा उपक्रम राबवत आहे. वसुबारसेदिवशी गाईची पूजा करून पहिला दिवा लावला जातो. सामाजिक भान ठेवून सुदृढ समाज निर्माण करण्यासाठी समाजातील ज्येष्ठ मंडळी, महिला, विधवा अशा घटकांना सन्मानाची वागणूक मिळावी, त्यांचे दुःख कमी करण्याच्या उद्देशाने अशाच प्रकारचे विविध उपक्रम वर्षभर राबवत असतो.”

इंटेरिओ बाय गोदरेज ब्रँण्डकडून मुंबईतील २२ हजार चौरस फूट जागेवर नव्या फर्निचर खरेदी दुकानाची उभारणी  

नवनव्या डिझाईन्सची माहिती देणारी पुस्तके, नामांकित फर्निचर ब्रँण्डसोबत भागीदारी, अर्काइव्ह गॅलरी आणि फर्निचर दुकानातच कांदळवनाच्या जंगलाचे महत्त्व पटवून देणारे कॅफे आदी वेगवेगळ्या सोयी-सुविधा उपलब्ध

मुंबई: घरातील फर्निचर निवडताना प्रत्येक भारतीयाला उत्कृष्ट डिझाईन मिळावी, ग्राहकांना खरेदीचा चांगला अनुभव यावा याकरिता गोदरेज एन्टरप्राइज ग्रुपच्या अग्रगण्य फर्निचर ब्रँण्ड असलेल्या इंटरियो बाय गोदरेज ने आपल्या कंपनीच्या धोरणाशी सुसंगत राहून, मुंबईतील विक्रोळी येथे फर्निचर खरेदीचे मुख्य दुकान सुरु केले आहे 

विक्रोळी येथील २२ हजार चौरस फूट या विस्तीर्ण जागेवर इंटेरियो बाय गोदरेज फर्निचर खरेदीचे मुख्य दुकान उभारण्यात आले आहे. नव्या फर्निचर खरेदीच्या दुकानातून इंटरिओ हा ब्रँण्ड आपली नवी ओळख ग्राहकांसमोर आणत आहे. घरात आधुनिक भारतीय जीवनशैली दिसावी म्हणून हे फर्निचर खरेदीचे दुकान वन-स्टॉप डेस्टिनेशन म्हणून उभे राहिले आहे. फर्निचरनिर्मितीचा वारसा, कारागिरांची कामगिरी आणि ग्राहकांच्या गरजेनुसार बदलता येणारे डिझाईन्स यांचा मिलाफ म्हणजे इंटरियो बाय गोदरजेचे फर्निचर. ग्राहकांनी या नव्या फर्निचर खरेदीच्या दुकानाला भेट दिल्यास त्यांना मॉड्युलर, बदलण्यायोग्य आणि वैयक्तिकृत फर्निचरच्या नवनव्या रेंज पाहता येतील. यासह गेमिंग, आउटडोअर, लहान मुलांचे फर्निचरही येथे खरेदी करता येईल. ग्राहकांना फर्निचर खरेदीत सॉफ्ट फर्निशिंगची नवी रेंजही पाहता येईल.

गोदरेज एन्टरप्राईजेस ग्रुपचे कार्यकारी संचालक नायका होळकर म्हणाले, ‘‘ विक्रोळी येथील आमच्या फर्निचरच्या मुख्य खरेदीच्या दुकानात डिझाइन आणि कलाकुसर यावर खास लक्ष दिले जाते. ही खास योजना आमच्या शंभर वर्षांची वारसागत परंपरा दर्शवते. पारंपरिक वारसा जतन करताना आम्ही आधुनिक राहणीमान आणि कामाच्या पद्धतीचा स्विकार केला आहे, हे नव्या फर्निचरच्या निर्मितीतून दिसून येते. इंटेरिओ बाय गोदरेज हा ब्रँण्ड भारतीय घर आणि कार्यालयासाठी नव्या डिझाईन्स सादर करत आहे. हे डिझाईन्स मॉड्युलर स्वरुपातही उपलब्ध आहेत. ग्राहकांना नव्या रचनेतील फर्निचर सोयीनुसार बदला येतील. या डिझाईन्समधून आधुनिक विचारही अभिव्यक्त होतात. ग्राहकांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे डिझाईन्स मिळतील. नव्या फर्निचरच्या दुकानातच आमच्या दृष्टीकोनातून उभारलेले इन हाऊस द मँग्रोव्ह किचन कॅफे पाहिल्यास आमचे विचार प्रतिबिंबित आहे. आपण ज्या प्रकारे आपले घर किंवा इतर जागा तयार करतो त्यातून आपल्या पृथ्वीचेही भविष्य आकार घेते, हे कॅफेच्या निर्मितीतून दिसून येतो.’’

आगामी आर्थिक वर्ष २०२९पर्यंत देशभरात विविध स्वरुपाची ५०० नवीन फर्निचर खरेदीची दुकाने सुरु केली जातील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा इंटेरियो बाय गोदरजेने केली आहे. यात फर्निचर खरेदीच्या मोठ्या दुकानासह लहान आकारच्या इंटेरिओ स्टुडियोजचाही समावेश असेल.

गोदरेच्या विक्रोळी येथील फर्निचर खरेदीच्या दुकानात फर्निचर खरेदीसह इतर काही वैशिष्ट्यपूर्ण रचनाही पाहता येतील. विक्रोळीतील हिरव्यागार खारफुटीच्या जंगलापासून प्रेरणा घेऊन या दुकानात मँग्रोव्ह किचन हे इन-स्टोअर कॅफे उभारण्यात आले आहे. नजीकच्या परिसरातील समृद्ध जैवविविधतेचा उत्सव साजरा करता येईल अशा पद्धतीने कॅफेची रचना करण्यात आली आहे. घरातले डिझाइन्स निवडण्यासाठी तीन क्युरेटेड लूक बुक्सही सादर करण्यात आले आहेत. घरातले प्रत्येक क्षण अविस्मरणीय करण्यासाठी इंटेरियो बाय गोदरेजच्या नव्या डिझाईन्स यात पाहता येतील.

विक्रोळीतील फर्निचर दुकानाला भेट देणा-या ग्राहकांनी आर्काइव्ह गॅलरीलाही जरुर भेट द्यावी. हे डिझाईन गोदरेजच्या समृद्ध डिझाईनच्या वारशाचा अनुभव देते. यात १०० वर्ष जुन्या भारतीय घरांतील तसेच कार्यालयातीन गोदरेजची तत्कालीन डिझाईन्सही पाहता येतील.

इंटेरिओ बाय गोदरेजचे व्यापार प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष स्वप्नील नागरकर म्हणाले, ‘‘आम्ही कंपनीच्या नव्या फर्निचर खरेदीच्या दुकानात ग्राहकांसोबतचे नाते अधिक दृढ करण्यावर प्रयत्नशील आहोत. प्रत्येक ग्राहकाला आपले घर आपापल्या व्यक्तिमत्त्वाच्या अभिव्यक्तीनुरुप हवे असते. भारतीय फर्निचर ब्रँण्ड्ससोबतचे आमचे सहकार्य, पहिल्यांदाच फर्निचर खरेदी दुकानात सुरु केलेले कॅफे या सर्व नवीन कल्पना इंटेरिओची आधुनिकता तसेच सर्वांना सामावून घेणारी आणि डिझाईन्सची संकल्पना आणि दैनंदिन जीवनाला प्रेरणा देण्याची आमची बांधिलकी दर्शवते. आम्ही व्यवसाय वृद्धीवर लक्ष केंद्रित करत आहोत. यात व्यापाराची व्यापकता वाढवताना डिझाईन्स, नवनव्या अंमलबजावणीतील अचूकता यांचा समन्वय साधून इंटरओ बाय गोदरेज हा आधुनिक भारतीय घरे आणि कार्यक्षेत्रांसाठी पसंतीचा जीवनशैली ब्रँण्ड म्हणून स्थापित होत आहे. २०२९ पर्यंत देशभरात किरकोळ विक्री केंद्रे वाढवणे, १ हजाप ५०० पर्यंत फर्निचर खरेदीची दुकाने स्थापन करणे हे आमच्या दीर्घकालीन योजनेचा भाग आहे. भविष्यातील हे उद्दिष्ट काढण्यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन खरेदीचे मार्ग योग्य पद्धतीने उपलब्ध व्हावेत, याकरिता काम केले जाईल. ब्रँण्डच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या प्रयत्नांसाठी कटिबद्ध आहोत. आमच्या सर्व प्रयत्नांना गोदरेजच्या विश्वास आणि भरवशाची जोड असल्यामुळे ही उत्पादने ग्राहकांना अधिक आश्वस्त वाटतात.’’

विक्रोळीतील विस्तीर्ण जागेत उभारलेल्या फर्निचर खरेदी दुकानाची संकल्पना आणि  अंतर्गत रचना मजुमदार ब्राव्हो आर्किटेक्ट्स या वास्तुकला कंपनीने तयार केली आहे.

इंटेरिओने अनेक नामांकित फर्निचर ब्रँण्डसोबत भागीदारी केली आहे. आधुनिक भारतीय सौंदर्यदृष्टीचे प्रतिनिधित्व करणा-या भारतीय कारागिरीला प्रोत्साहन देण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. अदिगामी स्टुडिओ बाय अदिती अनुजबी.आर.पंडितकेन कॉन्सेप्टहेअररुम नागामकान बाय ताहिर सुलतानाऊर्जा, सिरोहीस्वभू कोहली या प्रसिद्ध कंपन्यांसोबत इंटेरिओने भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारीमुळे भारतीय कलाकुसरीचे उत्कृष्ट नमुने जागतिक स्तरावर सादर करता येईल.

नुकतेच विक्रोळी येथीन फर्निचर खरेदी दुकानाचे अनावरण करण्यात आले. यावेळी प्रसिद्ध फॅशन डिझायनर डेव्हिड अब्राहम यांच्यासोबत फायरसाइड चॅट या अनौपचारिक गप्पांचे आयोजन करण्यात आले. भारतीय डिझाइनवर बॉहॉस चळवळीच प्रभाव कसा पडलायाबद्ल त्यांनी माहिती दिली. याव्यतिरिक्त अरन माईल्स यांनी घर किंवा कार्यालयात विचारपूर्वक नियोजनातून डिझाईन केलेली सुंदर जागा आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणांना आकार देण्यासाठी महत्त्वपूर्ण रते हा खास अनुभव सर्वांसमोर डिजीटल माध्यमातून मांडला. 

नव्या फर्निचर खरेदीच्या दुकानामुळे गेल्या महिन्यात इंटरिओ बाय गोदरेजच्या री-ब्रँडिंगला नवी ओळख मिळाली आहे. शंभर वर्ष विश्वासार्हतेचा ब्रँण्ड इंटेरिओ बाय गोदरेज हा ब्रँण्ज आता डिझाईन ओरिएंटेड जीवनशैली ब्रँण्ड म्हणून नावारुपास येत आहे. चमकदार कोरल रंगाच्या लोगोसह ही नवी ओळख ब्रँण्डची सर्जनशीलताउबदारपणा आणि आधुनिक भारताचा आत्मा यांना समरस ठरणारे उत्पादन उपलब्ध करुन देत असल्याचे दर्शवते.

लक्ष्मीपूजनाला देवीला १६ किलो सोन्याची साडी

पुणे :  लक्ष्मीपूजनानिमित्त सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी देवीला शुद्ध सोन्यात बनविलेली सुमारे १६ किलो वजनाची साडी मंदिर प्रशासनाकडून नेसविण्यात आली. श्री महालक्ष्मी देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्याकरीता देवीभक्तांनी मोठी गर्दी केली. वर्षभरात केवळ दोन वेळा म्हणजेच दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ही साडी देवीला नेसविण्यात येते. तसेच मंदिराला आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे. 

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने लक्ष्मीपूजनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात केले जाते. ट्रस्टच्या प्रमुख विश्वस्त अमिता राजकुमार अग्रवाल, प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, डॉ.तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, प्रविण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, रमेश पाटोदिया, नारायण काबरा, निलेश लद््दड, राजेश सांकला, मुरली चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.

लक्ष्मीपूजनाला देवीला नेसविण्यात आलेली ही सोन्याची साडी दक्षिण भारतातील कारागिरांनी साकारली आहे. सुमारे ६ महिने ही साडी तयार करण्याचे काम सुरु होते. आकर्षक नक्षीकाम करुन ही सोन्याची साडी साकारण्यात आली आहे. दिवाळीच्या निमित्ताने मंदिरात आकर्षक विद्युतरोषणाई व आरास करण्यात आली आहे. तसेच महालक्ष्मी मंदिराच्या वेबसाईट www.mahalaxmimandirpune.org यावरुन आॅनलाईन सुविधांची सोय देखील करण्यात आली आहे, असे अमिता अग्रवाल यांनी सांगितले.

स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि पुणे मर्चंटस बँके च्यावतीने पूरग्रस्तांना १ हजार ५०० किट 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थितीत धान्याचे किट पुण्यातून रवाना ;  पाथर्डी आणि बीड मध्ये वितरण
पुणे : महाराष्ट्रातील ‘बळीराजा’चे यंदा अतिवृष्टीमुळे अपरिमीत नुकसान झाले जे लगेच भरून येणे शक्य नाही. अशा या अस्मानी संकटापुढे उद्ध्वस्त झालेला शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे. त्यामुळे गुरुवार पेठेतील स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि पुणे मर्चंटस को ऑप बँकेच्या वतीने पूरग्रस्तांना १ हजार ५०० धान्य किट पाठविण्यात आले. तसेच पाथर्डी आणि बीड मध्ये त्याचे वितरण करण्यात आले. 

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे रस्त्यावरील बीएसएनएल कार्यालयासमोर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मदतीचा ट्रक पाथर्डी आणि बीडकडे रवाना झाला होता. यावेळी ट्रस्टचे आणि बँकेचे अध्यक्ष विजय ढेरे, बँकेचे उपाध्यक्ष सुधीर शेळके, अंकुश काकडे, रवींद्र रच्चा, हेमंत जगताप, योगीराज खिलारे, प्रसन्न जगताप, अजित खेसे, रावसाहेब खंडागळे, प्रदीप मिसाळ, उदय महाले, युवराज खेडकर, राजन उडाणे, हेमा खात्री, प्रमिला कोंढरे, प्रकाश पेटवे, ऍड. अभिजीत बोरकर, ऍड. शिरीष शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज जगदाळे आदी उपस्थित होते. तसेच स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी देखील उपस्थित होते.

स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बीडमधील पूरग्रस्तांना १ हजार धान्य किट आणि पुणे मर्चंटस को ऑप बँकेच्या वतीने पाथर्डी येथे ५०० धान्य किट पाठविण्यात आले. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला असून अशा परिस्थीतीत बळीराजाला संकटातून सावरणे हे आपले ‘सामाजिक’ कर्तव्य आहे. हीच भावना समोर ठेवत दोन्ही संस्थांकडून ही मदत देण्यात आली.

शेतकऱ्यांसाठी धान्यासह कोणत्या स्वरूपाची मदत दिली जात आहे, याची पाहणी अजित पवार यांनी केली. ऊन वारा पावसात राबणाऱ्या आणि जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी अडचणीत असताना पुण्यातून सहकारी बँकेतर्फे दिली जाणारी मदत अत्यंत महत्वाची असल्याचे पवार यांनी सांगितले. ‘शेतकरी बांधवांना – एका हात मदतीचा’ याअंतर्गत ही मदत दिली जात असून सामान्य नागरिकांचाही या उपक्रमात सक्रिय सहभाग असल्याचे बँकेतर्फे सांगण्यात आले.

विजय ढेरे म्हणाले, शेती प्रधान असलेला आपला विशाल भारत देशाचा शेतकरी बांधव हा देशाचा मुख्य कणा आहे. मुळातच शेतकरी बांधव हा निसर्गाच्या तसेच बाजारामधील दर न मिळाल्यामुळे नेहमीच संकटात असतो. निसर्गावर अवलंबून असलेल्या या ‘बळीराजा’ वर आलेल्या संकटाला तोंड देण्याकरिता आम्हीही त्याच्यासोबत  खंबीरपणे उभे आहोत, असेही त्यांनी सांगितले.  

सुरेल गीतांनी सजली दीप संध्या’..दिवाळीच्या आनंदोत्सवात रसिकांचा उत्स्फूर्त सहभाग

0

पुणे: दिवाळीच्या शुभसंध्येला आयोजित करण्यात आलेला ‘दीप संध्या’ हा मराठी सुरेल गीतांचा मनमोहक कार्यक्रम रसिक प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. मराठी संगीत, मोहक स्वर आणि शब्दसुमनांनी सजलेल्या निवेदनाने या सायंकाळी रसिकांनी टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाचा आनंद घेतला.आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी भाजपा कसबा मंडल अध्यक्ष अमित कंक, कार्यक्रमाचे आयोजक भाजपा शहर सरचिटणीस राघवेंद्र बाप्पू मानकर व ओंकार ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.

ओंकारेश्वर मंदिराच्या परिसरात रंगलेल्या ‘दिप संध्या’ कार्यक्रमाचे संगीत संयोजन संगीतकार निनाद सोलापूरकर यांनी केले होते. गायक अक्षय घाणेकर, अभिजीत वाडेकर, तसेच गायिका अंजली मराठे आणि रश्मी मोघे यांनी आपल्या सुमधुर गायनाने दिवाळीच्या उत्सवाला सुरांचा सुंदर साज चढवला. स्नेहल दामले यांच्या प्रभावी निवेदनाने कार्यक्रमाला ओघवतेपणा मिळाला.वादनसाथ नितीन शिंदे (तबला), मंदार देव (कीबोर्ड), नागेश भोसेकर(पखवाज), अभिषेक काटे (वेस्टर्न रिदम) आणि राधिका अंतुरकर (गिटार )यांनी सुरेल साथ देत कार्यक्रमाची लय अधिक खुलवली. आयोजनासाठी एकनाथ बुरसे, सचिन रणसिंग, निलेश खजिनदार, प्रकाश खडतरे, संतोष जमदाडे, रवींद्र बलकवडे, हनुमंत दगडे, दिलीप ठोंबरे, संतोष चव्हाण यांच्यासह राघवेंद्र बाप्पू मानकर मित्र परिवार, ओंकार ग्रुप आणि वर्तक बाग परिवाराच्या सदस्यांनी सहकार्य केले.

“विविध मंडळाना उपयुक्त वस्तू भेट देताना दीपावली चा आनंद द्विगुणित – संदीप खर्डेकर”.

क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून “राजकारण” विरहित “समाजकारणाची” पंचवीस वर्षे.

विविध मंडळाना उपयुक्त वस्तू भेट देताना दीपावली चा आनंद द्विगुणित होत असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले. दीपावली निमित्ताने विविध गणेशोत्सव मंडळ, विविध संस्था, संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, ज्ञाती संस्था,अनाथाश्रम, दिव्यांग केंद्र, वृद्धाश्रम यांना उपयुक्त भेट वस्तू देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मा. नगरसेविका व क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या विश्वस्त मंजुश्री खर्डेकर, भाजपा च्या कोथरूड मंडल उपाध्यक्ष अनघाताई जगताप,भाजपा चे सुधीर फाटक, बाल तरुण मंडळ पौड फाटा चे पदाधिकारी अनिकेत मोकर,युवराज कोंडे, यश मोकर, सिद्धांत कुडले, ओंकार मित्र मंडळ चे तुषार दिघे, गणेशनगर मंडळाचे मनीष चव्हाण, पार्थ पालकर, सिद्धांत मगर, साई पालकर,कुमार युवक मित्र मंडळाचे प्रसाद तावरे, उमेश माने,बाल तरुण मित्र मंडळ पांडुरंग कॉलोनी चे हर्षल होजगे, अभिजित साबळे, पार्थ तावरे, अष्टविनायक मित्र मंडळाचे सिद्धेश करंजकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या माध्यमातून राजकारण विरहित समाजकारणाचे हे पंचवीसावे वर्ष असून 2001 साली ह्या कार्याला सुरुवात झाली आणि 2007 साली सह धर्मादाय आयुक्तांकडून नोंदणी प्रमाणपत्र व सचोटीने समाजकार्य व पारदर्शी व्यवहारामुळे आयकर विभागाचे कर सवलतीचे “80 जी” हे प्रमाणपत्र देखील मिळाले असेही संदीप खर्डेकर म्हणाले.पुण्यनगरीत अनेक दानशूर व्यक्ती असून त्यांच्या देणगीवर फाउंडेशन चे काम सुरु असून येणाऱ्या काळात सी एस आर निधीच्या माध्यमातून शाश्वत प्रकल्प उभारणीवर भर देणार असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.
यावेळी ओम नवनाथ मित्र मंडळ, बाल तरुण मित्र मंडळ, पांडुरंग कॉलोनी,एरंडवणा मित्र मंडळ,कर्वे रोड,दशभुजा मित्र मंडळ, कर्वे रोड यांना कपाट तर इतर मंडळाना खुर्च्या व वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले व दीपावली च्या शुभेच्छा देण्यात आल्या.
सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी दीपावली च्या शुभेच्छा देतानाच ” आपण आपल्या कुटुंबासह दिवाळी साजरी करत असताना समाजात ज्यांच्या कडे काही कमी आहे जे गरजू आहेत त्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करून घेतले पाहिजे व फूल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांच्यासाठी ही काही मिठाई, कपडे, दिवे किंवा इतर वस्तूंचा छोटासा का होईना वाटा देऊन आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असे सांगितले.
उपस्थित कार्यकर्त्यांच्या वतीने सुधीर फाटक यांनी आभार व्यक्त करताना ” क्रिएटिव्ह फाउंडेशन तर्फे कायमस्वरूपी उपयोगी वस्तूंची भेट हा नवा पायंडा सर्वांनीच अनुकरण करावे असा असल्याचे मत व्यक्त केले.

जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या व्यवहाराशी माझा संबंध येत नाही:मुरलीधर मोहोळ

पुणे:शेठ हिराचंद नेमचंद जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या व्यवहाराशी संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या भागीदारातून मी बाहेर पडल्यानंतर ११ महिन्यांनी हा व्यवहार झाला. त्यामुळे या व्यवहाराशी माझा संबंध येत नाही. राजू शेट्टी किंवा कोणीही वस्तुस्थिती पडताळल्यास ही बाब समजेल, त्यामुळे माहिती न घेताच चुकीचे आरोप करू नयेत, असे पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी स्पष्ट केले.

मोहोळ यांनी रविवारी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. ‘३०-३२ वर्ष  सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत असताना  असे चुकीचे आरोप झाल्यास एखाद्या कार्यकर्त्याचे मनोबल खच्ची होते. एखाद्याचे करिअर उद्ध्वस्त होऊ शकते. पुणेकरांचा खासदार असल्याने माझ्यावर होत असलेल्या आरोपांवर पुणेकरांना स्पष्टीकरण देणे मला गरजेचे वाटले, म्हणून मी माझी बाजू मांडली, असे मोहोळ यांनी नमूद केले.

‘जैन बोर्डिंगचे खरेदीखत, व्यवहार गोखले बिल्डर्स या बांधकाम व्यावसायिकाने केला. मी गोखलेंचा भागीदार आहे, असा आरोप माझ्यावर केला गेला. मी माझ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात तसे घोषित केले आहे. मी शेती व्यवसाय करतो, बांधकाम व्यवसाय करतो, हे सर्व मी स्पष्टपणे नमूद केले होते. मी स्वच्छपणे व्यवसाय केला व त्याची माहिती कागदावर दाखवली,असे मोहोळ म्हणाले.

‘गोखले इस्टेट एलएलपी’ आणि ‘गोखले फ्यूचर एलएलपी’ या दोन कंपन्यांमध्ये मी भागीदार होतो. यातील एक संस्था २०२२ आणि दुसरी २०२३ मध्ये स्थापन झाली. या दोन्ही कंपन्यांमध्ये एकही रुपयाचा व्यवसाय, व्यवहार झालेला नाही, ही माहिती कंपनी व्यवहार मंत्रालयाच्या वेबसाइटवरून कोणालाही पडताळून पाहता येईल. केंद्रात मंत्री झाल्यानंतर नोकरी करता येत नाही, भागीदारी करता येत नाही. त्यानुसार या दोन्ही भागीदारी संस्थांमधून मी २५ नोव्हेंबर २०२४ रोजी राजीनामा देत बाहेर पडलो. त्यानंतर जैन बोर्डिंग ट्रस्टची बैठक १६ डिसेंबर २०२४ रोजी बैठक झाली. त्यात बोर्डिंगच्या पुनर्विकासासाठी विकसकाला देण्याचा निर्णय घेतला. २० डिसेंबर २०२४ रोजी त्यांनी पुणे आणि मुंबईतील काही वर्तमानपत्रांत निविदा प्रसिद्ध केली. पुढे गोखले बिल्डर्सने आठ ऑक्टोबर २०२५ रोजी जैन बोर्डिंग ट्रस्टसोबत खरेदीखत केले. मी या भागीदारी संस्थांमधून बाहेर पडल्यानंतर ११ महिन्यांनी हा व्यवहार झाला. मग यात माझा संबंध येतोच कुठे ? असा सवाल मोहोळ यांनी या वेळी केला. या व्यवहाराशी माझा काहीही संबंध नसताना मुरलीधर मोहोळ यांनी तीन हजार कोटींची जमीन ३०० कोटी रुपयांत घेतली, असा आरोप केला गेला.

जमिनीची किंमत २४० कोटी

जमीन एक लाख २० हजार चौरस फूट आहे. मोकळ्या जमिनीसाठी २० हजार रुपये चौरस फूट इतका दर कुठेही नाही. एक वेळ हा दर गृहीत धरला तरी या जमिनीची किंमत २४० कोटी रुपयेच होते. मग अशा परिस्थितीत जमिनीची किंमत तीन किंवा चार हजार कोटी भासवून बेताल आरोप केले जात आहेत. आरोप करणाऱ्यांनी वस्तुस्थिती जाणून घ्यावी आणि मगच आरोप करावेत, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.

पुण्यातील जैन बांधवांवर माझा विश्वास आहे, पुण्यातील एकाही जैन बांधवाने माझ्यावर आरोप केलेला नाही. मी त्यांच्या व ते माझ्यासोबत आहेत. त्यांच्या भावना समजून घेत त्यांना मदत कशी करता येईल, हाच माझा प्रयत्न आहे,असे मोहोळ यांनी नमूद केले.

राजू शेट्टींची नूरा कुस्ती

‘राजू शेट्टी यांना चुकीची माहिती देण्यात आली. त्यांनी शहानिशा न करताच, मला न विचारताच बेछूट आरोप केले. त्यांनी मला विचारले असते, तर मी वस्तुस्थिती मांडली असती. त्यांच्यावर माझा आक्षेप नाही. एक खरी कुस्ती असते आणि दुसरी नुरा कुस्ती. राजू शेट्टी हे मला नूरा कुस्तीचे खेळाडू वाटतात. दोन्हीतला फरक पुणेकर व कोल्हापूरकर चांगलाच जाणतात,’असा टोला मुरलीधर मोहोळ यांनी लगावला.

राजू शेट्टींनी आरोप केल्यानंतर काही बिळात लपलेले उंदीर बाहेर येऊन बोलू लागले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या वेळी या नेत्याने सगळ्यांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली होती. मी तेव्हाही आणि आताही एकही शब्द बोलणार नाही. ही व्यक्ती वैफल्यग्रस्त आहे, सगळीकडून नाकारली गेली आहे, अशा शब्दात मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांना टोला लगावला. तर महायुतीत आमच्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका स्पष्ट आहे. नेत्यांचे आदेश आम्ही ऐकतो. धंगेकर हा काय प्रकार आहे त्यांचे त्यांनाच माहित. त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोप केले पण एकही कागद दाखवला नाही, असे मोहोळ म्हणाले.

ऑलिंपिक समितीच्या निवडणुकीत मी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही आहेत. राज्यातील युती आणि खेळ हा वेगळा विषय आहे. मात्र, ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात होईल.

गुन्हेगारी खपवून घेणार नाही

कोथरूड मध्येच काय, पुण्यातही गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. पोलिस त्यांचे काम करत आहेत. कोणीही पुण्याला बदनाम करू नये. काही गोष्टी घडल्या आहेत ते स्वीकारून पोलिस दलामार्फत योग्य कारवाई व्हावी, यासाठी मी सातत्याने पोलिस आयुक्तांच्या संपर्कात आहे

पुणे–अक्कलकोट–पुणे वारीचा विधायक उपक्रम

पुणे : दिवाळीच्या आनंदसोहळ्यात समाजातील विशेष मुलांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने श्रीकांत सौंदणकर यांच्या *‘पुणे–अक्कलकोट–पुणे वारी’*तर्फे एक अनोखा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत सिंधू विद्या भवन शाळेतील विशेष मुलांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले.

 या प्रसंगी शाळेचे वातावरण उत्साह, आनंद आणि भावनिक ऊर्जेने भरून गेले.कार्यक्रमास सिंधू विद्या भवनाच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा सूर्यवंशी, आयईसी शाळेच्या रूपा साळवी, अमृता भागवत, देवयानी बोरसे, अमित होळकर तसेच संस्थेचे सेवेकरी उपस्थित होते. उपस्थित पाहुण्यांनी मुलांशी संवाद साधत त्यांच्या प्रयत्नांचे व कौशल्याचे कौतुक केले.

श्रीकांत सौंदणकर यांनी सांगितले की, “प्रत्येक वर्षी दिवाळीच्या काळात समाजातील विविध घटकांपर्यंत प्रेम आणि आनंद पोहोचवणारे उपक्रम आम्ही राबवतो. विशेष मुलांसोबत वेळ घालवणे आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे हे आमच्यासाठी सर्वात मोठे समाधान आहे. हे उपक्रमाचे चौथे वर्षे असून संस्थेकडून वर्षभर विविध सेवाभावी व सामाजिक कार्यक्रम घेतले जातात. समाजसेवेचा हा सातत्यपूर्ण धागा आता पुण्यातील अनेक शाळा आणि सामाजिक गटांपर्यंत पोहोचला आहे. 

विशेष मुलांनी तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन

 सिंधू विद्या भवन शाळेतील विशेष मुलांनी स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन आज झाले. मुलांनी तयार केलेल्या वस्तूंमध्ये जेली मेणबत्त्या, आकर्षक पणत्या, लटकन, तोरणे, टी-कोस्टर, सुबक पाकिटे, ब्रेसलेट, कानातले अशा विविध वस्तूंचा येथे विक्रीसाठी उपलब्ध होत्या. नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मुलांचा उत्साह वाढवला.