Home Blog Page 336

दिल्लीत एकनाथ शिंदे PM मोदींना भेटल्यावर :पुण्यात केंद्रीय मंत्री मोहोळ जैन मुनींच्या सभेत दाखल

पुणे- अखेर केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ जैन मुनींच्या सभेत हजर ,म्हणाले अन्नत्याग करू देणार नाही, त्या अगोदर समाजाची मागणी मान्य आहे..जैनमुनी म्हणाले, १ नोव्हेंबर च्या आधी जैन धर्माच्या या मंदिराचे जागेचे डील रद्द होत नाही तोपर्यंत संतुष्ट होणार नाही अन्यथा प्राणत्याग देखील करेल .पण आपणावर तशी वेळ येऊ देणार नाही असे त्यांना मोहोळ यांनी आश्वस्त केले .

जैन बोर्डिंग घोटाळ्यावरून सातत्याने आरोप होत असताना, खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज जैन बोर्डिंग उपोषणस्थळी जाऊन जैन मुनींची भेट घेतली. शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यासह विरोधकांच्या वाढत्या आक्रमक भूमिकेमुळे मोहोळ यांच्या अडचणी वाढल्या असताना, या भेटीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. भेटीनंतर माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले. “मी या प्रकरणात सहभागी आहे किंवा माझे कोणीतरी सहभागी आहे, असे आरोप केले गेले. परंतु माझा यामध्ये कोणताही सहभाग नाही, हे मी वारंवार पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “मी येथे केवळ वंदनीय जैन गुरुदेवांचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. जर मी दोषी असतो, तर इथे येताना 100 वेळा विचार केला असता आणि आलोच नसतो.” मोहोळ यांनी आरोप-प्रत्यारोपांवर बोलताना स्पष्ट केले की, या संपूर्ण विषयावर केवळ राजकारण झाले आणि वैयक्तिक हेतूने या गोष्टी वाढवल्या गेल्या.
जैन समाजाला संबोधित करताना मोहोळ यांनी न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. “मी आपल्याला आश्वासित करतो की, या प्रकरणात योग्य न्याय होईल. मी तुम्हाला न्याय मिळवून देईल. काही दिवसांत हा प्रश्न आपल्या मनासारखा संपेल,” असे ते म्हणाले. “लोकप्रतिनिधी आणि खासदार म्हणून मला तुम्ही निवडून दिले आहे. हा विषय संपवण्यासाठी तशी भूमिका घेण्यासाठीच मी इथे आलो आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, जैन मुनींनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “जोपर्यंत तुम्ही हा विषय संपवत नाही, तोपर्यंत आम्ही समाधानी नाही.” तसेच, प्रसार माध्यमांनी हा विषय लोकांपर्यंत पोहोचवल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. यावर प्रतिक्रिया देताना मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींनी दिलेल्या सूचना आपण लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण करू, त्यासाठीच आपण इथे आलो आहोत, असे आश्वासन दिले.


या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुढच्या काळात काही निर्णय होणे अपेक्षित असेल, तर या शहराचा खासदार, लोकप्रतिनिधी म्हणून माझी भूमिका महत्त्वाची यामध्ये काय असावी, याबाबत जेव्हा विषय झाला. मी माझ्या जैन बांधवांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, राजकीयदृष्ट्या आरोप-प्रत्यारोप खूप झाले. काही लोकांना या विषयाचा आधार घेऊन व्यक्तीगत पातळीवर जाऊन टीका केली. पण माझ्या जैन बांधवांनी एकही दिवस, एकदाही कधी माझे नाव या विषयात घेतले नाही.
राजू शेट्टी हे जैन समाजाचे येतात, त्यामुळे त्यांनी शंका उपस्थित केली होती की कदाचित मी पार्टनरशिप असलेल्या विकासकाने हा जैन बोर्डिंगचा व्यवहार केलाय. पण ज्यावेळी मी स्पष्टपणे माझे कागदोपत्री आणि सगळे पुरावे सादर केल्यानंतर, पुढे कुठेही असा विषय जैन समाजातून आला नाही. परंतू याचा वेगळा गैरफायदा स्वत:ची राजकीय पोळी भाजण्यासाठी, राजकीय अस्तित्व जीवंत ठेवण्यासाठी काही मंडळींनी सातत्याने चालवले.
मागील दोन दिवसांपूर्वी जैन धर्मियांचे गुरुदेव आज या ठिकाणी या विषयासाठी बसलेले आहेत. त्यांचे शांततेत आंदोलन चालू आहे. त्यांनी मला आवाहन केले की, तुम्ही पुण्याचे लोकप्रतिनिधी आहात, आमच्या जैन समाजाला तुमची मदत हवीये. तुम्ही येथे या आणि आमच्यासाठी उभे राहा. या प्रकरणात जे काही राहिले, त्याबाबत पडदा दूर होईल, असे आवाहन त्यांनी केले.
माझा या प्रकरणात काही सहभाग असता, तर मी इथे येताना शंभरवेळा विचार केला असता. आलो नसतो. समाजाची आणि माझी या विषयातील भूमिका स्पष्ट आहे. इथे आल्यानंतर माझी भूमिका मांडली. लवकरात लवकर हा विषय संपला पाहिजे, असे गुरूदेवांनी सांगितले. हा व्यवहार रद्द होण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. आमची तुमच्याकडून अपेक्षा आहे, असेही त्यांनी मला सांगितले. त्यामुळे समाजाच्या भावना लक्षात घेऊन हा विषय कसा सोडवता येईल? यासाठी प्रामाणिकपणे तुमच्या सोबत उभा आहे. लवकरात लवकर यातून मार्ग काढू, असे मी त्यांना आश्वस्त केल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.
मुरलीधर मोहोळ जैनमुनींची भेट घेऊन बाहेर निघाल्यानंतर जैन बांधवांनी त्यांना घेराव घातला. यावेळी जैन बांधव मुरलीधर मोहोळांविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बोर्डिंग संदर्भात झालेला व्यवहार रद्द करावा, अशी मागणी जैन बांधवांनी यावेळी केली, तसेच जैन बोर्डिंग वाचवा, अशी घोषणाबाजी केली.

महावितरणमधील पुनर्रचना ग्राहक-कर्मचारी हिताचीच- राजेंद्र पवार

संचालक राजेंद्र पवार यांनी घेतला पुनर्रचना अंमलबजावणीचा आढावा

पुणे, दि. २५ ऑक्टोबर, २०२५ – महावितरणने लागू केलेली सुधारित मनुष्यबळ पुनर्रचना ही ग्राहक व कर्मचारी या दोघांच्याही हिताची असून, ग्राहकांना समर्पित व चांगली सेवा देण्यासाठीच असल्याचे प्रतिपादन महावितरणचे संचालक (मासं) यांनी केले. शुक्रवारी (दि. २४) गणेशखिंड (पुणे) येथील विश्रामगृहात झालेल्या मनुष्यबळ पुनर्ररचना आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी बैठकीला पुणे प्रादेशिक संचालक भुजंग खंदारे, मुख्य अभियंता सुनिल काकडे, अधीक्षक अभियंता युवराज जरग, संजीव नेहते, अनिल घोगरे व सहा. महाव्यवस्थापक (मासं) सत्यजित राजेर्शिके यांचेसह पुणे परिमंडलातील सर्व कार्यकारी अभियंते उपस्थित होते. पुणे परिमंडलात दोन आठवड्यांपासून सुधारित मनुष्यबळ पुनर्रचनेनुसार महावितरणचे कामकाज सुरु आहे. त्याचा आढावा संचालक राजेंद्र पवार यांनी घेतला.

बैठकीत दरम्यान ते म्हणाले, ‘वीज अभियंते व तांत्रिक कर्मचारी यांना वीजपुरवठा, वीजबिल वसुली अशा सर्वच कामांचा ताण होता. नविन पुनर्रचनेत सरसकट कामाचा ताण कमी करुन निवडक कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. आता कामे करताना ती निश्चित स्वरुपाची व केंद्रित पध्दतीने असणार आहेत. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ होण्यास मदत होईल. पर्यायाने ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देता येईल.’

सेवेप्रती व्यावसायिक दृष्टीकोन ठेवावा- राजेंद्र पवार

पुनर्रचनेचा बदल अभियंते व कर्मचाऱ्यांनी मनापासून स्विकारावा. ग्राहकांना महावितरणकडून सेवेप्रती खूप अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी सेवेप्रती व्यावसायिक दृष्टीकोन बाळगणे गरजेचे असून, बदलत्या तंत्रज्ञानाचाही पुरेपूर वापर करावा. तसेच तक्रारींचा निपटारा वेळेत करुन वसूलीचे लक्ष शंभर टक्के गाठावे.

पुनर्रचनेत आवश्यकतेनुसार बदल करु- राजेंद्र पवार

महावितरणने पुनर्रचनेचे प्रारुप लागू करताना ते अधिक चांगले कसे राहील यावर भर दिलेला आहे. तसेच अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या त्रूटी देखील दूर करण्यात येणार आहेत. त्यासाठी सूचना मागविण्यात येत असून, बदल सुचविताना त्याची आवश्यकता व निकड याबाबतचे स्पष्टीकरण जरुर द्यावे. जेणेकरुन पुनर्रचना अधिकाधिक ग्राहक केंद्रित होईल.

धंगेकर यांच्यावर कारवाई करणार काय ? काय म्हणाले दिल्लीत DCM एकनाथ शिंदे …

नवी दिल्ली- पुण्यातील माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपचे केंद्रीय मंत्री मोहोळ यांच्यात जैन धर्मियांच्या भूखंडावरून झालेल्या वादाबद्द आज दिल्लीत देखील मध्यम प्रतिनिधींनी DCM एकनाथ शिंदे यांना धंगेकर यांच्यावर कारवाई करणार काय ? असा प्रश्न केला तेव्हा पहा काय म्हणाले एकनाथ शिंदे

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सत्ताधारी शिवसेनेचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आपण दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचे स्पष्ट केले.
एकनाथ शिंदे शुक्रवारी रात्री अचानक दिल्ली दौऱ्यावर गेले. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या येथील बंगल्यावर मुक्काम केल्यानंतर त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपल्या भेटीचे कारण सांगितले. ते म्हणाले, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान दिवाळीत बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. त्यामुळे त्यांना तेव्हा भेटता आले नव्हते. पण त्यांनी आज मला वेळ दिली होती. त्यानुसार मी त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ही राजकीय नव्हे तर सदिच्छा भेट होती.एकनाथ शिंदे हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे जागावाटप व रवींद्र धंगेकर प्रकरणी दिल्ली दौऱ्यावर आल्याचा दावा केला जात आहे. पत्रकारांनी याविषयी त्यांना छेडले असता ते म्हणाले, मी दिल्लीत आलो तरी चर्चा होते आणि गावी गेलो तरी चर्चा होते. त्यामुळे आता चर्चा करणारे, चर्चा करतातच. त्यांचे चर्चेचे चर्वण सुरूच असते. मी माझे काम करत असतो. पंतप्रधान मोदी जे काही देशासाठी व देशाच्या प्रगतीसाठी करत आहेत, त्याचा अभिमान आम्हा सगळ्यांना आहे. त्यामुळे मी त्यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.मोदी व मी जेव्हा – केव्हा भेटतो तेव्हा आमची विकासावरच चर्चा होते. यात महाराष्ट्र व देशाच्या विकासाचाही समावेश आहे. त्यांची भेट घेतल्यानंतर मला आनंद होतो. प्रेरणा मिळते. शिवसेना एनडीएचा घटकपक्ष आहे. त्यामुळे मोदींकडून शिवसेनेला आदराचे स्थान मिळत आले आहे. याचा आम्हाला आनंद आहे. त्यांचे व्यक्तिमत्व खूप मोठे आहे. त्यांना जगभरात विश्वगुरू म्हटले जाते. ते जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आहेत. त्याचा आम्हाला गर्व आहे. एक कुटुंबप्रमुख म्हणून त्यांची प्रतिमा आमच्या मनात आहे. मोदींनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींनाही उजाळा दिला.
सर्वांनीच महायुती जपली पाहिजेस्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागावाटपात शिवसेनेला आदराचे स्थान मिळावे यावर तुमची मोदींशी चर्चा झाली का? असा प्रश्न पत्रकारांनी यावेळी त्यांना विचारला. त्यावर शिंदे म्हणाले, मोदींचे एनडीए व महायुतीविषयी अत्यंत स्पष्ट मत आहे. एनडीए व महायुती ही आघाडी एक विचारधारा घेऊन पुढे जात आहे. विकासाचा अजेंडा व विचारधारा आपण राबवली पाहिजे यावर त्यांचा भर होता. महायुती व एनडीए ही प्रत्येक निवडणुकीत मजबुतीने किंबहुना विकासाच्या प्रत्येक कामात आपण एकत्र राहिले पाहिजे अशीच भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.

महायुतीत एकत्र लढण्यावर कोणतेही मतभेद नाहीत. मला तसे वाटतही नाही. शेवटी कार्यकर्ते असतात. त्या त्या भागातील नेते असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक ही ग्रास रूटची असते. त्यामुळे कार्यकर्त्यांची ही निवडणूक लढण्याची इच्छा असते. पण अंतिम निर्णय हे वरिष्ठ घेत असतात. त्यामुळे एकदा महायुतीच्या वरिष्ठांनी निर्णय घेतला की, त्याची अंमलबजावणी कार्यकर्ते करत असतात. कारण, आम्ही शिस्तीने चालणारे व शिस्तीने वागणारे लोक आहोत.
एकनाथ शिंदे यांनी यावेळी पुण्यातील मुरलीधर मोहोळ व रवींद्र धंगेकर यांच्यातील राजकीय वादावरही भाष्य केले. ते म्हणाले, रवींद्र धंगेकर माझ्याकडून निरोप गेला आहे की, महायुतीत कुठेही मतभेद होता कामा नये. महायुतीत कुठेही मिठाचा खडा पडता कामा नये. याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. मी पुण्यात गेलो तेव्हाही मी यावर भाष्य केले होते. आजही करतो. प्रत्येक कार्यकर्त्याने महायुती जपली पाहिजे. महायुतीत कुठेही बेबनाव होईल अशा प्रकारचे कृत्य, वक्तव्य करू नये.पत्रकारांनी या प्रकरणी रवींद्र धंगेकरांवर कारवाई करणार काय? असा प्रश्न केला. त्यावर ते म्हणाले, रवींद्र धंगेकरांना पक्षाचा जो काही निरोप मिळायचा होता तो मिळाला होता. त्यांचा जो काही दावा आहे, त्याविषयी मी त्यांच्याशी बोलेन. तेही मला भेटतील.

तरुणांना केंद्रस्थानी ठेवूनच केंद्र सरकार कार्यरत – मुरलीधर मोहोळ


17व्या रोजगार मेळाव्याअंतर्गत पुण्यातील 103 उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वितरण

पुणे-

देशात तरूणांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. तरूण पिढी ही आपल्या देशाची ताकद असून त्यांना केंद्रस्थानी ठेवूनच केंद्र सरकार कार्यरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी उड्डाण आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

पुण्यात टपाल विभागाच्या वतीने आयोजित 17व्या रोजगार मेळाव्यात श्री. मोहोळ बोलत होते. आज केंद्र सरकार तर्फे देशभरात 40 ठिकाणी रोजगार मेळाव्याचे एकाचवेळी आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून देशभरातील सुमारे 51 हजार तरूणांना आज नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नवनियुक्त उमेदवारांशी संवाद साधला व संबोधित केले. याचाच एक भाग म्हणून पुण्यात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुरलीधर मोहोळ होते. तर याप्रसंगी भारतीय टपाल सेवेतील पुणे विभाग संचालक अभिजित बनसोडे उपस्थित होते.

या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या टपाल विभागासह भारतीय रेल्वे, सीमा सुरक्षा बल, सीजीएसटी आणि कस्टम, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ), सशस्त्र सीमा बल, भारतीय विमानतळ प्राधीकरण, केंद्रीय राखीव पोलीस बल तसेच जिओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया आदी विभागांमधील तब्बल 103 उमेदवारांना मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात मुरलीधर मोहोळ यांनी केंद्र सरकार तरुणांसाठी करत असलेल्या कार्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले, गेल्या दहा वर्षात देशातील असंख्य तरूणांना केंद्र सरकारच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. गुणवत्ता पूर्ण शिक्षण, कौशल्य विकास आदी धोरणांमुळे अनेक क्षेत्रात तरुणांना रोजगार मिळू लागले असून, सर्व समावेशक विकास या उद्देशाने केंद्र सरकार कार्यरत आहे, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये तरूण पिढीला सामावून घेणे हा रोजगार मेळाव्यांचा उद्देश आहे. या माध्यमातून आजपर्यंत 10 लाखांहून अधिक उमेदवारांना नोकरी देण्यात आली, याचा आनंद वाटतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार शैक्षणिक दृष्टिकोनातूनही योग्य दिशेने काम करत आहे. गेल्या 10 वर्षात  देशात 760 विद्यापीठे होती. आज देशात 1334 विद्यापीठे तयार झाली आहेत. आयआयटींची संख्या वाढून 23 झाली आहे. केवळ शिक्षण-नोकरीच नव्हे तर आत्मनिर्भर भारतासाठी उद्योग उभारणीचे कामही अत्यंत वेगाने करण्यात येत आहे, लघु उद्योगासाठी 36 लाख कोटींचे कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. आजघडीला देशातील 50 टक्के नागरिक केंद्र सरकारच्या कोणत्या ना कोणत्या योजनांचा लाभ घेत असून प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहेत, असे ते म्हणाले.

महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात आरोपी प्रशांत बनकरला पुण्यात पहाटे ४ वाजता धरला, अटक.

तळहातावर सुसाइड नोट लिहून फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने भाऊबीजेच्या दिवशी जीवन संपवले होते. या प्रकरणातील प्रशांत बनकरला आता पोलिसांनी अटक केली आहे. तर गोपाल बदनेचाही कसून शोध सुरु आहे.या प्रकरणातील महिला डॉक्टर या बीड जिल्ह्यातील वडवणी येथील मूळ रहिवासी होत्या. त्यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी आहेत. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक गोपाल बदने अद्यापही फरार आहेत. मूळ परळी येथील रहिवासी असलेल्या बदनेवर निलंबनाची कारवाईही करण्यात आली आहे. बनकर सामान्य नागरिक असल्याचा पोलिस अधिकाऱ्यांचा दावा आहे.सुसाइड नोटमध्ये जे म्हटले ते शब्दश: असे,माझ्या मरण्याचे कारण पोलिस निरीक्षक गोपाल बदने ज्याने माझा 4 वेळा rape केला आणि प्रशांत बनकर ज्याने मागच्या 5 महिने शारीरिक व मानसिक छळ केला.तळहातावर उपनिरीक्षक गोपाळ बदने यांचे नावही लिहिलेले होते. गेल्या पाच महिन्यांत बदने यांनी डॉक्टरवर चार वेळा बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपींवर बनावट फिटनेस प्रमाणपत्रे सादर करण्यासाठी दबाव आणत होते.गोपाळ बदनेयांच्यावर बलात्कार आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोपही आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा पोलिस अधीक्षकांना आरोपी उपनिरीक्षकाला निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

ही महिला डॉक्टर बीड जिल्ह्यातील रहिवासी होती आणि फलटण तहसीलमधील सरकारी रुग्णालयात काम करत होती. पोलिसांना आणखी एक चार पानांची सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये एका खासदार आणि त्यांच्या दोन पीएचे नाव आहे.असा आरोप आहे की हे लोक डॉक्टरवर आरोपीसाठी बनावट फिटनेस प्रमाणपत्र देण्यासाठी दबाव आणत होते. जेव्हा तिने नकार दिला तेव्हा खासदाराने महिला डॉक्टरला बोलावले

या प्रकरणात मुख्य आरोपी प्रशांत बनकरला पोलिसांनी अखेर अटक केली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी वेगवान तपास सुरू करत अनेक ठिकाणी छापे टाकले. प्रशांत बनकर फरार झाल्यानंतर तो आपल्या एका मित्राच्या फार्महाऊसमध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर सातारा ग्रामीण पोलिसांच्या पथकाने मध्यरात्री सापळा रचून पहाटे चारच्या सुमारास पुणे परिसरात ही कारवाई केली. पोलिसांनी फार्महाऊसला वेढा घालून त्याला बेड्या ठोकल्या. अटकेनंतर बनकरला फलटण शहर पोलिस ठाण्यात आणण्यात येणार असून, त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, दुसरा आरोपी जो पोलिस असल्याचे सांगितले जाते, तो अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. प्रशांत बनकरला अटक झाल्याने या प्रकरणाच्या तपासाला वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही अविवाहित महिला डॉक्टर दोन वर्षांपासून फलटण येथे कार्यरत होती. गेल्या काही महिन्यांपासून ती पोलिस आणि आरोग्य विभागाच्या वादात भरडली जात होती. कारण वैद्यकीय तपासणी अहवालाविषयीच्या वादातून तिची चौकशी सुरु होती. त्यामुळे ती खूप मानसिक तणावात होती. तिने वारंवार वरिष्ठांकडे याबाबत तक्रार केली होती. माझ्यावर अन्याय होत आहे. मी आयुष्याची अखेर करेन, असे ती वारंवार म्हणत होती. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. अखेर तिने नामांकित हॉटेलात गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा अखेर केला. त्या फलटण शहरातील विद्यानगर परिसरात पेईंग गेस्ट म्हणून राहत होत्या.या प्रकरणात निलंबित पोलिस उपनिरीक्षक बदने बीड जिल्ह्यातील परळीचा रहिवासी आहे. परळीतच त्याचे शिक्षण झालेले आहे. फलटणमध्ये त्याची या महिला डॉक्टरशी ओळख झाली. त्याने आपण म्हणू तसाच अहवाल देण्यासाठी तिच्यावर दबाव आणल्याचे निदर्शनास आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याशी चर्चा केली आणि महिला डॉक्टरने सुसाइड नोटमध्ये नमूद केलेल्या पोलिसांवर तसेच इतर सर्व आरोपींवर कठोर कारवाई करा, असे आदेश दिले. दोशी म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक बदनेला निलंबित करण्यात आले आहे. प्रशांत बनकर पोलिस नसून सामान्य नागरिक आहे.

मोहोळ मिडियाशी खोटं बोलले ,त्यांच्यावर ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा देखील दाखल:घ्या हा पुरावा ;म्हणाले धंगेकर

कुठलीही राजकीय किंमत मोजावी लागली तरी चालेला, जैन धर्मियांना न्याय मिळवून देईल.फडणवीस जैन धर्मियांना दुखावणार नाहीत हा विश्वास आहे .भाजपचे सच्चे कार्यकर्ते माझ्याबरोबर ..माझी भूमिका सर्वांना पटलेली आहे , जैन मंदिर पाहिजेच

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी काल (शुक्रवारी) माध्यमांशी बोलताना दिलेल्या उत्तरानंतर (Pune Politics) धंगेकरांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत मोहोळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.(Dhangekar on Mohol)माझ्यावर एकही गुन्हा नाही, असे त्यांनी धडधडीत खोटे ऑन कॅमेरा सांगितले होते .पण हा घ्या पुरावा त्यांच्यावर ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा देखील दाखल आहे असे शिवसेनेचे महानगरप्रमुख रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज म्हटले आहे.
धंगेकरांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत मोहोळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी काल माध्यमांशी बोलताना म्हटलं होतं, रोज सकाळी तुम्ही तिथे जाता, ते बोगस ट्विट करतात आणि तुम्ही ते दाखवता. त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीचा पुरावा मागा. व्यक्तिगत दोष, आकास यामधून हे बोललं जात आहे. बोगस कार्यक्रम चालला आहे त्याचा, कागद दाखवा, पुरावे दाखवा आणि मग बातमी दाखवा. मला या माणसाबद्दल काही बोलायचं नाही. २०११ मध्ये जमीन हडपली म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल आहे. त्यांच्यावर १० गुन्हे दाखल आहेत, माझ्यावर एकही नाही, त्यांना काय काम धंदा नाही असं म्हटलं होतं, त्यावर आता पुराव्यांसह धंगेकरांनी मोहोळ यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांची यादी दिली आहे.

अगदी ॲट्रॉसिटीसारखा गुन्हा देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर दाखल
धंगेकरांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय, अतिशय सुसंस्कृत व सरळमार्गी वाटणारे मुरलीधर मोहोळ हे कशा पद्धतीने खोटे बोलतात याचे उदाहरण मी तुम्हाला देतो. काल माध्यमांशी बोलताना त्यांनी सरळ सांगितले की त्यांच्यावर एकही गुन्हा नाही. मी या ट्विट सोबत आपल्याला त्यांच्या इलेक्शन एफिडेविट मधील पानांची कॉपी जोडतोय त्यांच्यावर किती गुन्हे आहेत ते कशाकशा संदर्भात आहेत अगदी ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर दाखल आहे.

मला माहित आहे, राजकीय कार्यकर्ता म्हटलं की गुन्हे असतात. काही हेतूपरस्पर केलेले असतात काही आंदोलनातले असतात. परंतु केवळ बदनामी करण्यासाठी माझ्यावर 13 केसेस आहेत आणि त्यांच्यावर एकही नाही असं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस आपण त्या प्रेसची सुद्धा फसवणूक करत असतो आणि तमाम पुणेकरांची देखील फसवणूकच करत असतो, हे एका केंद्रीय राज्यमंत्री व खासदाराला अशोभनीय आहे, बाकी थेट जमीन चोरांचा थेट सहभाग असलेली २ प्रकरणे घेऊन लवकरच भेटुयात!


दिवाळीनंतरही पाऊस: 5 दिवस यलो अलर्ट; कोठे बरसणार? पहा IMDचा ताजा अंदाज

यंदा दिवाळी झाली तरी पाऊस महाराष्ट्रात सुरु आहेच . आगामी पाच दिवस पुन्हा एकदा राज्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने आपल्या ताज्या अंदाजात वर्तवली आहे . बहुतांश ठिकाणी यलो अलर्ट देण्यात आलाय. या काळात विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे .यंदा अतिवृष्टीने महाराष्ट्र बेजार झालाय. शेतकऱ्यांना चक्क काळी दिवाळी साजरी करावी लागली. हाता-तोंडाशी आलेले पीकच काय जमीन सुद्धा पावसाने खरवडून नेली. मात्र, आता पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवल्याने चिंता व्यक्त होते आहे .


24 ऑक्टोबर, शुक्रवार

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे आणि पुणे घाट, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट, सांगली, सातारा, सातारा घाट, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता.


25 ऑक्टोबर, शनिवार

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे आणि पुणे घाट , सांगली, सातारा, सातारा घाट, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता.
26 ऑक्टोबर, रविवार

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, धुळे, नंदुरबार, नाशिक आणि नाशिक घाट , अहिल्यानगर, पुणे आणि पुणे घाट, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता.

27 ऑक्टोबर, सोमवार

रायगड, अहिल्यानगर, पुणे आणि पुणे घाट, बीड, अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता.
28 ऑक्टोबर, मंगळवार

सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि घाट कोल्हापूर, नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. येथे विजांच्या कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यताय.

इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग – सीजन 2 चीपुण्यात 26 ऑक्टोबरला होणार धमाकेदार सुरुवात

●       राईज मोटो फॅन पार्क दुपारी 2 वाजता खुले होईल | उद्घाटन समारंभ संध्याकाळी 6:20 वाजता | शर्यती रात्री 7 वाजल्यापासून शिव छत्रपती क्रीडा संकुलपुणे येथे सुरू होतील

●       जगभरात थेट प्रक्षेपण ISRL यूट्यूब आणि रेव टीव्ही कॅनडा वर

●       भारतात थेट प्रक्षेपण युरोस्पोर्ट इंडिया आणि फॅनकोड वर

पुणे – इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. दुसऱ्या सीजनचा पहिला राऊंड रविवारी, 26 ऑक्टोबरला शिव छत्रपती क्रीडा संकुल, महाळुंगे बालेवाडी येथे पार पडणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे आणि भारतातील सर्वोत्तम रायडर्स जेव्हा जगातील पहिल्या फ्रँचायझी-आधारित सुपरक्रॉस लीगमध्ये गौरवासाठी लढतील, तेव्हा प्रेक्षकांसाठी हा विकेंड रोमांचक ठरणार आहे.

दमदार स्पॉन्सर लाइनअप

आयएसआरएलने राऊंड 1 साठी मजबूत स्पॉन्सर पूल निश्चित केला आहे. यात राईज मोटो, लिलेरिया ग्रुप, बिसलेरी, कावासाकी इंडिया, टीव्हीएस अपाचे, रेड बुल आणि मॅक्स प्रोटीन यांसारख्या अग्रगण्य ब्रँड्सचा समावेश आहे. यावरून भारतातील सुपरक्रॉस इकोसिस्टमबद्दल वाढत चाललेला व्यावसायिक आत्मविश्वास अधोरेखित होतो.

विकेंड शेड्यूल

शनिवार, 25 ऑक्टोबरला सराव सत्रे होतील. त्यानंतर रविवार, 26 ऑक्टोबरला सहा ग्लोबल टीम्स शर्यतींच्या पहिल्या राऊंडमध्ये उतरणार आहेत. पुण्यातील हा अॅक्शन-पॅक्ड रविवार राईज मोटो फॅन पार्कसोबत सुरू होईल. येथे प्रेक्षकांना लाईव्ह म्युझिक, इंटरॅक्टिव्ह झोन्स, फूड स्टॉल्स आणि टीम मर्चेंडाईजसह एक अद्वितीय अनुभव मिळेल.

संध्याकाळी उत्साही ओपनिंग सेरेमनी आणि प्री-शो होईल, ज्यामध्ये टीम इंट्रोडक्शन्स आणि लाईव्ह परफॉर्मन्सेस असतील. त्यानंतर प्रेक्षकांची सर्वाधिक प्रतीक्षा असलेल्या आयएसआरएल राऊंड 1 रेस लाईट्सखाली रंगणार आहेत.

वेळकार्यक्रम
2:00 PM – 6:00 PMराईज मोटो फॅन पार्क एक्स्पेरियन्स
5:00 PMस्टेडियमचे गेट उघडणार
6:15 PM – 7:00 PMउद्घाटन समारंभ आणि प्री-शो
7:00 PM – 8:30 PMआयएसआरएल राउंड १ रेसेस

स्ट्रीम आणि कसे पाहणार

जे चाहते थेट स्टेडियममध्ये सर्व थरार अनुभवू इच्छितात, त्यांच्यासाठी तिकीटांची सुविधा बुकमायशोवर उपलब्ध आहे. तर दूरवरून पाहणाऱ्यांसाठी आयएसआरएल सीजन 2 चे थेट प्रक्षेपण युरोस्पोर्ट इंडियावर होणार आहे. तसेच हे सामने जगभरातील प्रेक्षकांसाठी आयएसआरएल चॅनेलवर यूट्यूबवर थेट स्ट्रीम केले जाणार असून, फॅनकोडवर ऑन-डिमांड उपलब्ध असतील. कॅनडामधील सुपरक्रॉस चाहत्यांसाठी विशेष थेट प्रक्षेपण रेव्ह टीव्हीवर पाहता येईल.

वीर पटेलडायरेक्टरइंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग म्हणाले : सीजन 2 हा केवळ रेसिंगपुरता मर्यादित नाहीतर तो चाहत्यांना सुपरक्रॉसच्या थरारऊर्जा आणि आवेशाच्या आणखी जवळ नेणारा आहेया विकेंडला पुणे खेळमनोरंजन आणि फॅन कल्चरच्या नव्या युगाचे साक्षीदार ठरणार आहे.”

सीजन 2 कॅलेंडर

●      पुणे – ऑक्टोबर 25 आणि 26, 2025 – श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी

●      हैदराबाद – डिसेंबर 6 आणि 7, 2025 – गाचीबौली स्टेडियम

●      कोझिकोड (ग्रँड फिनाले) – डिसेंबर 20 आणि 21, 2025 – ईएमएस कॉर्पोरेशन स्टेडियम

खासदार मेधा कुलकर्णींमुळे शहर दंगलीच्या उंबरठ्यावर – राहुल डंबाळे यांचा गंभीर आरोप

कुलकर्णी यांच्यावर कारवाई करण्याची पोलिस आयुक्तांकडे मागणी
पुणे : शनिवार वाडा येथील कथित नमाज प्रकरणाच्या निमित्ताने शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याच्या दृष्टिकोनातून राज्यसभा सदस्य मेधा कुलकर्णी यांच्याकडून करण्यात आलेले बेकायदेशीर आंदोलन व त्यानंतर त्यांनी केलेली वक्तव्य ही पुणे शहराला दंगलीच्या उंबरठ्यावर घेऊन जाणारी असल्यामुळे त्यांच्यावर तातडीने कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन युवा मोर्चाचे नेते राहुल डंबाळे यांनी पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेऊन केली आहे .

19 ऑक्टोबर रोजी शनिवार वाडा येथे यापूर्वी नमाज अदा केल्याचा दावा करत मेधा कुलकर्णी यांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या समवेत परवानगी न घेता शनिवार वाड्यात घुसून आंदोलन केले आहे पोलिसांचे आदेश न जुमानता त्यांनी शुद्धीकरणाचा घाट घातला आहे ही बाब खासदार म्हणून अत्यंत अशोभनीय आहे तसेच यानंतर या घटनेच्या अनुषंगाने त्यांनी केलेली वक्तव्य ही धार्मिक तेढ निर्माण करणारी व दंगलीला प्रोत्साहन देणारी असल्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आज नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने करण्यात आली आहे

मेधा कुलकर्णी यांनी यापूर्वी देखील अशाच प्रकारे कसबा पेठ येथील छोटा शेख सालाउद्दीन दर्गा येथे कृती केली होती त्यानंतर पुन्हा अशा प्रकारची कृती ही शहराची कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा त्यांचा इरादा आहे की काय असा प्रश्न निर्माण करणारी असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई न केल्यास मुंबई उच्च न्यायालयामध्ये विशेष जनहित याचिका दाखल करून न्याय मिळवला जाईल अशी स्पष्ट भूमिका नॅशनल कॉन्फरन्स फॉर मायनॉरिटीच्या वतीने घेण्यात येत आहे

पोलीस आयुक्त यांना निवेदन सादर केल्यानंतर सविस्तर त्यांच्या निदर्शनास आणून दिली असून याप्रकरणी आपण लक्ष घालून योग्य ती कारवाई करू असे त्यांनी आश्वासन दिले

स्वातंत्र्योत्तर भारतात, ‘गोहत्या बंदी’ कायदा काँग्रेस काळात लागू झाला ⁃ काँग्रेस नेते गोपाळदादा तिवारी

संविधानातील कलम ४८ मधील शिफारसी प्रमाणे राज्यांना अधिकार..!
पुणे दि २४
भारतात ‘गोहत्या बंदी’ कायद्याची सुरुवात स्वातंत्र्यानंतर झाली असुन, उत्तर प्रदेशमध्ये गोहत्या प्रतिबंधक कायदा (The U.P. Prevention of Cow Slaughter Act) हा १९५४-५५ मध्ये देशात व राज्यात काँग्रेस शासीत सरकारच्या काळात लागू झाला असल्याचे विधान काँग्रेस नेते व वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केले.

‘अखिल नवी पेठ कला – क्रिडा सांस्कृतिक महोत्सव’ तर्फ भव्य “वसुबारस निमित्ताने गो-पुजनाचा” कार्यक्रम घेण्यात आला होता. यावेळी कै. श्रीराम महादेव सपकाळ यांच्या स्मरणार्थ ५०० तुळशीची रोपे वाटण्यात आली. हिंदवी स्वराज्य संस्थापक श्रीमंत छ शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ताई ठोंबरे यांते हस्ते पुष्पहार अर्पण करून ‘गो-माता पूजन कार्यक्रमास’ सुरुवात करण्यात आली.
संविधानाच्या कलम ४८ (Directive Principles of State Policy) मध्ये राज्यांना ‘गोवंश संरक्षण आणि गोहत्या प्रतिबंध’ करण्याची शिफारस केली आहे.
ते पुढे म्हणाले की, स्वातंत्र्य सेनानी व काँग्रेस नेते उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री व देशाचे गृहमंत्री पंडित गोविंद बल्लभ पंत यांचे कारकीर्दीत ‘ऊत्तर प्रदेश’मध्ये “गोहत्या बंदी” कायदा लागू झाल्याची वस्तुस्थितीगोपाळदादा तिवारी यांनी यावेळी सांगितली.
ते पुढे म्हणाले की,२३ एप्रिल १९५८ रोजी, सर्वोच्च न्यायालयाने, राज्यांच्या कायद्यांना मान्यता दिली, पण काही अपवाद (जसे की वृद्ध, रोगीष्ट, किंवा आजारी जनावरांच्या हत्येला परवानगी) ठेवला.या प्रसंगी कार्यक्रमाचे संयोजक-निमंत्रक सर्वश्री पै. गणेश श्रीराम सपकाळ, रोहित खंडागळे, शेखर पवार, अजय राजवाडे, राकेश क्षीरसागर, नितीन सपकाळ, अनंत वनंगे, तेजस सपकाळ इ सहकारी मित्र परिवार व कार्यकर्ते उपस्थित होते.

जैन ट्रस्टच्या मालमत्तेचा वाद PM मोदींच्या दरबारात; मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर कारवाईची मागणी

पुणे-येथील जैन ट्रस्टच्या मालमत्ता व्यवहारातील कथित अनियमिता आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या त्यातील सहभागाचा मुद्दा आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
विजय कुंभार यांनी या प्रकरणी आपल्या पत्रात म्हटले आहे की, पुण्यातील जैन ट्रस्टच्या मालमत्ता व्यवहारातील अनियमितता आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सहभागाबाबत चौकशी करून कारवाईची विनंती मी आजपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. पुण्यातील हिराचंद नेमचंद दोशी मेमोरियल ट्रस्टच्या सुमारे 3 एकर जमिनीचा व्यवहार गोखले लँडमार्क्स एलएलपी या कंपनीने कायदेशीर आणि प्रक्रियात्मक नियमांचे उल्लंघन करून केला आहे. या व्यवहारासाठी बुलढाणा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी (महाराष्ट्र) आणि श्री बिरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटी (कर्नाटक) यांनी नियमांचे उल्लंघन करून मोठ्या रकमेचे कर्ज दिले. या संस्थांनी कर्ज देताना आवश्यक तपासणी केली नाही, ज्यामुळे त्यांच्यावर बाह्य प्रभाव किंवा दबाव असल्याचा संशय निर्माण होतो.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे या मल्टी-स्टेट को-ऑप सोसायटींच्या प्रशासकीय देखरेखीची जबाबदारी आहे. तसेच त्यांनी गोखले लँडमार्क्स एलएलपीच्या “गोखले बिझनेस बे” प्रकल्पाला प्रोत्साहन दिले असून, त्यांचे या कंपनीच्या भागीदारांशी जवळचे संबंध असल्याचे जाहीर आहे. त्यामुळे दोन्ही बाजूने त्यांचा या प्रकरणाशी संबध असल्याचे दिसून येते.

विजय कुंभार आपल्या पत्रात पुढे म्हणतात, मुरलीधर मोहोळ यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रातून असे दिसते की, ते गोखले इस्टेट्स एलएलपीमध्ये 50% भागीदार होते, जी गोखले लँडमार्क्सशी संबंधित आहे. महाराष्ट्र रिअल इस्टेट नियामक प्राधिकरणाने (महारेरा) गोखले लँडमार्क्सवर रेरा कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाई केली आहे. “गोखले बिझनेस बे” आणि “तेजकुंज” प्रकल्पांसाठी एकच बँक खाते वापरल्याने आणि 70% निधी स्वतंत्र ठेवण्याच्या नियमाचे पालन न केल्याने प्रकल्प नोंदणी रद्द, बँक खाती गोठवली आणि विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या उल्लंघनांनंतरही सहकारी संस्थांनी सुमारे ₹70 कोटींचे कर्ज मंजूर केले आणि नंतर तारण हक्क सोडले, त्यामुळे या प्रकरणातील गैरव्यवहारांबाबत संशय वाढतो.
मुरलीधर मोहोळ यांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई न करता “आपला या प्रकरणाशी काही संबध नाही’ असे म्हणत स्वतःला दूर ठेवले आहे. खरेतर या प्रकरणी लोकप्रतिनिधी आणि मंत्री या नात्याने त्यांनी आवर्जून लक्ष घालून कारवाई केली असती, तर ते जास्त संयुक्तिक दिसले असते. तसे ना केल्याने या प्रकरणातील त्यांचा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट दिसून येतो आणि सहकारी प्रशासनावरील विश्वास कमी होतो.

वरील बाबींचा विचार करून सरकारने जैन ट्रस्टच्या जमीन व्यवहाराची सखोल चौकशी करावी, गोखले लँडमार्क्स एलएलपी, दोन्ही सहकारी संस्था आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची तपासणी करावी व मुरलीधर मोहोळ यांच्या सहभागाची चौकशी करून हितसंबंधांचा गैरवापराबाबत त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विजय कुंभार यांनी आपल्या पत्राद्वारे केली आहे.

1.जैन ट्रस्टच्या जमीन व्यवहाराची सखोल चौकशी करावी.

2.गोखले लँडमार्क्स एलएलपी, दोन्ही सहकारी संस्था आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची तपासणी करावी.

3.श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या सहभागाची चौकशी करून हितसंबंधांचा गैरवापराबाबत त्यांच्यावर कारवाई करावी.

विमा आवाक्यात आणण्यासाठी आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने संपूर्ण जीएसटी लाभ दिला

0

कोणत्याही व्यक्तीच्या आर्थिक नियोजनाचा मुदत विमा हा एक आवश्यक भाग आहे. जर घरातील कमावत्या सदस्याचे निधन झाले तर कुटुंबासाठी उत्पन्नाचे साधन म्हणून याचा उपयोग होऊ शकतो. या मजबूत पायाच्या आधारे आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्याची खात्री होते.

सर्व विमा पॉलिसींना जीएसटीमधून वगळण्यासाठी भारत सरकारने अलीकडेच सुधारणा आणल्या. पूर्वी ग्राहक जीएसटीपोटी प्रीमियम रकमेच्या 18% भरत असत, उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला 100 रुपयांचा प्रीमियम भरावा लागत असेल तर त्यापेक्षा 18 रुपये जास्त जीएसटी म्हणून आकारले जात होते. मात्र, आता जीएसटी सूट मिळाल्याने त्या व्यक्तीला फक्त 100 रुपये द्यावे लागतील. यामुळे जीवन विमा उत्पादने स्वस्त झाली आहेत, यात मुदत विमा उत्पादनांचा देखील समावेश आहे.

ग्राहकांना सर्वोत्तम मूल्य देण्याच्या वचनबद्धतेनुसार आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने त्यांच्या ग्राहकांना संपूर्ण जीएसटी सूट लाभ दिला आहे. अशा प्रकारे, प्रत्येक भारतीय कुटुंबासाठी विमा योजना अधिक परवडणाऱ्या आणि सुलभ बनविल्या जात आहेत.

टर्म इन्शुरन्स उत्पादनांच्या किंमतीवर याचा काय परिणाम झाला आहे ते पाहूया. पूर्वी, 30 वर्षांचा धूम्रपान न करणारा पुरुष, जीएसटीसह 825 रुपये मासिक प्रीमियम भरत असे. आता त्याच व्यक्तीला 30 वर्षांच्या कालावधीसाठी 1 कोटी रुपयांच्या जीवन विमा कव्हरसाठी फक्त 699 रुपये द्यावे लागतील. शिवाय, तेच कव्हर आणि त्याच कालावधीसाठी धूम्रपान न करणाऱ्या 30 वर्षांच्या महिलेला आता जीएसटीसह 697 रुपयांऐवजी फक्त 594 रुपये मासिक प्रीमियम भरावा लागेल.

आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचे ​​मुख्य उत्पादन अधिकारी श्री. विकास गुप्ता म्हणाले, “आमच्या ग्राहकांसाठी जे योग्य आहे ते करणेच महत्त्वाचे आहे, यावर आमचा विश्वास आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना जी परतफेड करतो त्या प्रत्येकातून विश्वास मजबूत होतो, परवडणारी क्षमता वाढते आणि आम्हाला अशा भविष्याच्या जवळ नेते जिथे विमा प्रत्येकाच्या आवाक्यात असेल. अधिकाधिक व्यक्तींना त्यांचे भविष्य सुरक्षित करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकण्यास प्रोत्साहित करून भविष्य सुरक्षित करण्यासाठी कंपनीच्या सध्या सुरू असलेल्या प्रयत्नांना ते पूरक आहे.”

महत्त्वाचे म्हणजे, टर्म इन्शुरन्स हा एक आर्थिक सुरक्षा  उपाय आहे जो एखाद्या व्यक्तीच्या प्रियजनांची त्याच्या अनुपस्थितीतही काळजी घेतो. म्हणूनच, संरक्षण उत्पादने सर्वांच्या आवाक्यात असणे महत्त्वाचे असते. आता कमी केलेल्या प्रीमियममुळे विम्याचा विस्तार वाढेल आणि लाखो भारतीयांच्या जीवनात आर्थिक संरक्षण आणण्याच्या उद्देशाला पाठबळ मिळेल.

मीशोने सेबीकडे दाखल केला अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस

0

मीशो लिमिटेड ही भारतातील ई-कॉमर्स क्षेत्रात ग्राहक, विक्रेते, लॉजिस्टिक्स भागीदार आणि कंटेंट क्रिएटर्स या चार प्रमुख घटकांना एकत्र आणणारे मल्टी-साइडेड टेक्नॉलॉजी कंपनी आहे. कंपनीने भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाकडे (सेबी) आपला अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (UDRHP) दाखल केला आहे.

प्रस्तावित प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) मध्ये ₹4,250 कोटींच्या नवीन इक्विटी शेअर्सचा इश्यू (फेस व्हॅल्यू ₹1 प्रत्येकी) तसेच 17,56,96,602 इक्विटी शेअर्सचा ऑफर फॉर सेल (OFS) समाविष्ट आहे. या ओएफएसमध्ये एलेव्हेशन कॅपिटल व्ही लिमिटेड, पीक एक्सव्ही पार्टनर्स इन्व्हेस्टमेंट्स व्ही, हायवे सिरीज 1 (व्हेंचर हायवे एसपीव्ही एलएलसीचा एक भाग), वाय कॉम्बिनेटर कॉन्टिन्युइटी होल्डिंग्ज I एलएलसी, गोल्डन समिट लिमिटेड, व्हीएच कॅपिटल, व्हीएच कॅपिटल एक्सआय हे कॉर्पोरेट सेलिंग शेअरहोल्डर्स आहेत. विदित आत्रेय आणि संजीव कुमार हे प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स आहेत, तर मॅन हे टॅम हे इंडिव्हिज्युअल सेलिंग शेअरहोल्डर म्हणून सहभागी आहेत.

कंपनीने नेट प्रोसीड्सचा वापर पुढील कारणांसाठी करण्याचा प्रस्ताव मांडला आहे : मीशो टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (सबसिडियरी) मध्ये क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चरवरील गुंतवणूक; मशीन लर्निंग, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि टेक्नॉलॉजी विकासासाठी काम करणाऱ्या टीम्सच्या विद्यमान व नव्या कर्मचाऱ्यांचे वेतन भरणे; मीशो टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडमध्ये (सबसिडियरी) मार्केटिंग आणि ब्रँड इनिशिएटिव्हसाठी खर्चाची गुंतवणूक; तसेच अधिग्रहण (Acquisitions) व इतर धोरणात्मक उपक्रमांद्वारे इनऑर्गॅनिक ग्रोथ साधणे आणि सामान्य कॉर्पोरेट कामकाजासाठी निधी वापरणे.

FY25 मध्ये मीशो भारतातील सर्वात मोठे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म म्हणून उदयास आले. वार्षिक ट्रान्झॅक्टिंग युजर्स आणि वार्षिक प्लेस्ड ऑर्डर्स या दोन्ही बाबतीत मीशोने सर्व ई-कॉमर्स कंपन्यांना मागे टाकले. या प्लॅटफॉर्मने 5 लाखांहून अधिक ट्रान्झॅक्टिंग विक्रेत्यांना सुमारे 199 दशलक्ष वार्षिक ट्रान्झॅक्टिंग युजर्स सोबत जोडले आणि वर्षभरात जवळपास 1.8 अब्ज ऑर्डर्स सुलभ केल्या — हे भारतभरातील ग्राहकांसाठी ई-कॉमर्स अधिक परवडणारे, सुलभ आणि आकर्षक करण्याच्या मीशोच्या प्रयत्नांचे खरे प्रतिबिंब आहे.

मीशोचे वार्षिक ट्रान्झॅक्टिंग युजर्स (ATU) FY25 मध्ये सुमारे 28% वार्षिक वाढीसह सातत्याने मजबूत कामगिरी करत राहिले असून, जून 2025 ला समाप्त झालेल्या मागील बारा महिन्यांत (LTM) ते सुमारे 213 दशलक्षांवर पोहोचले. FY23 ते FY25 या कालावधीत ऑर्डर फ्रिक्वेन्सी वर्षाला 7.5x वरून 9.2x पर्यंत सुधारली, तर जून 2025 ला समाप्त झालेल्या मागील बारा महिन्यांत ती 9.4x झाली. यामुळे प्लॅटफॉर्मवरील वाढता एंगेजमेंट आणि विश्वास अधोरेखित होतो, ज्याला सतत उत्तम डिस्कव्हरी व युजर एक्सपीरियन्स देण्याच्या प्रयत्नांची साथ आहे.

एकूण ऑर्डर्स FY23 मधील सुमारे 1 अब्ज वरून FY25 मध्ये 1.8 अब्जांवर पोहोचल्या. फक्त 30 जून 2025 ला समाप्त झालेल्या तीन महिन्यांतच जवळपास 562 दशलक्ष ऑर्डर्स नोंदल्या गेल्या, जे Q1 FY26 मध्ये सुमारे 50% वार्षिक वाढ दर्शवते. FY25 मधील प्लेस्ड ऑर्डर्सची वाढ संपूर्ण भारतभर दिसली, विशेष म्हणजे टॉप 8 शहरांमधील ऑर्डर्स ~46% वाढल्या, तर एकूण प्लॅटफॉर्म वाढ 37% इतकी होती.

या वाढत्या प्रमाणावर आधार घेत, नेट मर्चेंडाइज व्हॅल्यू (NMV) मध्ये FY25 दरम्यान सुमारे 29% वार्षिक वाढ झाली आणि ती ₹29,988 कोटींवर पोहोचली. FY24 मध्ये ही वाढ सुमारे 21% होती. Q1 FY26 मध्ये NMV वाढ आणखी वेगवान झाली असून ती वार्षिक आधारावर सुमारे 36% वाढून ₹8,679 कोटींवर गेली. उत्तम प्राइसिंग, डिस्कव्हरी आणि असॉर्टमेंटद्वारे प्लॅटफॉर्मची वॅल्यू प्रपोजिशन सुधारल्यामुळे आणि वाढीसाठी केलेल्या गुंतवणुकीमुळे ही गती साधता आली.

ई-कॉमर्स क्षेत्रात NMV म्हणजे करांसह यशस्वीरीत्या वितरित केलेल्या ऑर्डर्सचे एकत्रित चेकआऊट मूल्य. हे प्लॅटफॉर्मच्या हेल्थचे मुख्य मोजमाप मानले जाते, कारण यातून ग्राहकांचा स्वीकार (adoption) आणि पुनर्वापर (repeat usage) किती मजबूत आहे हे स्पष्ट होते. त्यामुळेच हे उत्पन्न, मार्जिन्स आणि रोख प्रवाह (cash flow) या सर्व घटकांचे महत्त्वाचे चालक मानले जाते.

उल्लेखनीय बदल घडवून आणत, मीशो FY25 मध्ये भारतातील स्केल्ड लिस्टेड ई-कॉमर्स कंपन्यांपैकी सर्वाधिक फ्री कॅश फ्लो निर्माण करणारी कंपनी ठरली. मागील बारा महिन्यांचा फ्री कॅश फ्लो निगेटिव्ह ₹2,336 कोटींवरून पॉझिटिव्ह ₹1,032 कोटींवर (व्याज उत्पन्नासह) आणि ₹591 कोटींवर (व्याज उत्पन्न वगळता) पोहोचला. हे अ‍ॅसेट-लाइट आणि कॅपिटल-इफिशियंट मॉडेलचे फायदे दर्शवते, ज्यामुळे मोठ्या भांडवली खर्चाशिवाय कंपनीला प्रमाण (scale) आणि सखोलता (depth) साधता आली.

कर व अपवादात्मक बाबींआधीचा तोटा FY23 मधील ₹1,672 कोटींवरून FY25 मध्ये केवळ ₹108 कोटींवर आला. हे होत असतानाच, वाढीचा प्रवास (growth trajectory) अधिक मजबूत करण्यासाठी कंपनीने टेक्नॉलॉजी व युजर अ‍ॅक्विझिशनमध्ये गुंतवणूक वाढवली.

तथापि, FY25 मध्ये कंपनीचा निव्वळ तोटा ₹3,942 कोटी इतका राहिला. यामागचे प्रमुख कारण म्हणजे वन-टाइम अपवादात्मक खर्च, ज्यामध्ये रिव्हर्स फ्लिप टॅक्स आणि पर्क्विझिट टॅक्सचा समावेश होता. हे खर्च कंपनीच्या पब्लिक स्ट्रक्चरमध्ये रूपांतर प्रक्रियेसाठी आवश्यक होते.

Q1 FY26 मध्ये मीशोने वाढीसाठी गुंतवणूक सुरूच ठेवली. याच काळात नेट मर्चेंडाइज व्हॅल्यू (NMV) वार्षिक आधारावर सुमारे 36% वाढून ~562 दशलक्ष ऑर्डर्सवर पोहोचली, ज्यात प्लेस्ड ऑर्डर्समध्ये सुमारे 50% वाढ दिसून आली. कंपनीने प्रमाण (scale) वाढवल्यामुळे सर्व्हर आणि टेक्नॉलॉजीवरील खर्चही वाढले, जे प्लॅटफॉर्मच्या वाढीस पाठबळ देण्यासाठी आवश्यक असलेल्या गुंतवणुकीचे प्रतिबिंब होते. परिणामी, या तिमाहीत अपवादात्मक बाबींआधीचा तोटा ₹148 कोटी आणि निव्वळ तोटा ₹289 कोटी इतका राहिला. हे कंपनीकडून मार्केट शेअर वाढवण्यासाठी करण्यात आलेल्या धोरणात्मक गुंतवणुकीशी सुसंगत आहे.

FY25 आणि Q1 FY26 यांनी पुन्हा एकदा हे अधोरेखित केले की मीशो इंटरनेट कॉमर्सचे लोकशाहीकरण (democratization) करण्याच्या बाबतीत देशात अग्रणी आहे. कंपनीचे लक्ष आता बाजारपेठेचा विस्तार, परिसंस्थेसाठी दीर्घकालीन मूल्यनिर्मिती आणि शाश्वत वाढीच्या पुढच्या टप्प्यासाठी मजबूत पाया तयार करण्यावर आहे.

या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, जे. पी. मॉर्गन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, अॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड काम पाहत आहेत.

UDRHP 1 Linkhttps://www.bseindia.com/corporates/download/381966/IPO%20Prior/MeeshoLimited_UDRHP1_20251018222146.pdf

एक्वस लिमिटेड आयपीओ द्वारे 720 कोटी रु. चे फ्रेश कॅपिटल उभारणार

0

एरोस्पेस व कंझ्युमर सेगमेंटमध्ये पूर्णपणे व्हर्टिकली इंटिग्रेटेड उत्पादन क्षमता सादर करण्यासाठी भारतात एका सिंगल स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये कार्यरत एकमेव प्रिसिजन कॉम्पोनंट (अचूक घटक) उत्पादक एक्वस लिमिटेड (“एक्वस”) (स्रोत: F&S अहवाल) प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) द्वारे 720 कोटी रु. पर्यंत फ्रेश कॅपिटल उभारणार आहे.

एक्वसने फ्रेश इश्यूसाठी अपडेटेड ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (UDRHP1) दाखल केले असून त्यामध्ये 720 कोटी रु. पर्यंत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे. याशिवाय, ऑफर फॉर सेल अंतर्गत प्रत्येकी 10 रु. दर्शनी मूल्य असलेले एकूण 31,772,368 पर्यंतचे इक्विटी शेअर्स विक्रीसाठी आहेत.

एक्वसचे नेतृत्व स्वतंत्र प्रवर्तक, कार्यकारी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद शिवपुत्रप्पा मेलिगेरी करत असून ते कंपनीला धोरणात्मक दृष्टीकोन देत नेतृत्व करत आहेत. तसेच, कंपनीकडे अनुभवी व्यवस्थापन संघ असून त्यांना या उद्योग क्षेत्रातील कामाचा चांगला अनुभव आहे. याशिवाय, अमायकस कॅपिटल प्रायव्हेट इक्विटी I एलएलपी, अमायकस कॅपिटल पार्टनर्स, अमांसा इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड, स्टेडव्ह्यू कॅपिटल मॉरिशस लिमिटेड, कॅटामरान एकम् आणि स्पार्टा ग्रुप एलएलसी हे गुंतवणूकदार एकत्रितरीत्या ऑफरपूर्व इक्विटी शेअर भांडवलातील 25.54% हिस्सा धरून आहेत.

जरी एक्वस प्रामुख्याने एरोस्पेस क्षेत्रात कार्यरत असले तरी गेल्या काही वर्षात कंपनीने कंझ्युमर क्लायंट साठी आपल्या उत्पादन पोर्टफोलिओचा विस्तार करत कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स, प्लॅस्टिक्स आणि कंझ्युमर ड्युरेबल्सचा समावेश केला आहे. यामध्ये कुकवेअर सारखी कंझ्युमर ड्युरेबल्स, प्लॅस्टिक्स (आउटडोअर टॉयज, फिगरिन्स), तसेच पोर्टेबल कॉम्प्युटर्स आणि स्मार्ट डिव्हाइसेस सारखी कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्ससाठी कॉम्पोनंट्स यांचा समावेश आहे.

आयपीओ मधील फ्रेश इश्यूमधून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचा उपयोग कंपनी खालील उद्देशांसाठी करणार आहे: 1. कंपनी उपकंपन्यांमध्ये गुंतवणुकीच्या माध्यमातून कंपनी आणि  तिच्या दोन संपूर्ण मालकीच्या उपकंपन्यांनी एरोस्ट्रक्चर्स मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि एक्वस कंझ्युमर प्रॉडक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी घेतलेल्या काही प्रलंबित कर्जाची संपूर्ण/अंशतः परतफेड किंवा प्रीपेमेण्ट (जिथे लागू असेल तिथे प्रीपेमेण्ट पेनल्टीसह) करण्यासाठी;

2. कंपनी आणि तिची एक उपकंपनी एरोस्ट्रक्चर्स मॅन्युफॅक्चरिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड द्वारे यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदीसाठी भांडवल खर्चाला निधी पुरवण्यासाठी आणि 3. अजून काही अधिग्रहणांद्वारे, इतर धोरणात्मक उपक्रमांद्वारे इनओर्गानिक विकासाला निधी आणि सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापर करणार आहे.

एक्वसने 2009 मध्ये एरोस्पेस ग्राहकांसाठी बेलगावी मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरमधील युनिट्समध्ये एरो-स्ट्रक्चर कॉम्पोनंट्स आणि एरो-इंजिन कॉम्पोनंट्सचे उत्पादन सुरू केले. मागील 15 वर्षांमध्ये, कंपनीने सातत्याने नवीन उत्पादन क्षमता विकसित करून आणि त्यांचे  अधिग्रहण करून विकास साधला आहे. यामुळे एरोस्पेस आणि कंझ्युमर सेगमेंटमध्ये पोर्टफोलिओ आणि ग्राहकवर्ग दोन्ही वाढले आहेत. कंपनीने 2015 आणि 2016 मध्ये अनुक्रमे उत्तर अमेरिका आणि फ्रान्समध्ये अधिग्रहणाच्या माध्यमातून धोरणात्मकदृष्ट्या उत्पादन कामकाजाचा विस्तार केला. त्यामुळे एरोस्पेस क्षेत्रातील नवीन क्षमता कंपनीला मिळाली, उत्तर अमेरिका व युरोपमध्ये कंपनीने आपले स्थान विस्तारले आणि उत्पादन पोर्टफोलिओ वाढविला.

गेल्या काही वर्षात एक्वसने स्वतःला ग्राहकांसाठी एक महत्त्वपूर्ण जागतिक पुरवठादार म्हणून प्रस्थापित केले आहे. कंपनीच्या मुख्य ग्राहक/क्लायंट्स मध्ये एरोस्पेस विभागात—एअरबस, बोइंग, बॉम्बार्डियर, कॉलिन्स एरोस्पेस, स्पिरिट एरोसिस्टम्स इंक, सफ्रान, GKN एरोस्पेस, म्यूबेया एरोस्ट्रक्चर्स, हनीवेल, ईटन आणि साब्का; तर कंझ्युमर विभागात—हासब्रो, स्पिनमास्टर, वंडरचेफ आणि ट्रॅमोंटिना यांचा समावेश आहे.

एक्वसने ग्राहकांना आवश्यक असलेल्या जटिल आणि विशेष उत्पादनांच्या उत्पादनासाठी संयुक्त कंपन्यांच्या परस्पर पूरक तज्ज्ञतेचा लाभ घेत नवीन उत्पादने विकसित करण्याच्या आणि अभियांत्रिकी उपायसुविधा सादर करण्याच्या क्षमता विस्तारासाठी संयुक्त कंपन्यांमध्ये प्रवेश केला. कंपनीचा संयुक्त उपक्रम SQuAD फॉर्जिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (“SQuAD”) ने कंपनीला इंजिन्स, लँडिंग गियर आणि  ब्रेकिंग सिस्टम घटकांसाठी लहान ते मध्यम आकाराचे एरोस्ट्रक्चरल भाग अल्युमिनियम, स्टील, टायटॅनियम किंवा निकेल-आधारित मिश्रधातूंमध्ये तयार करणे यामध्ये सुधारित क्षमतांनी सुसज्ज केले आहे. जोडीला कंपनीची मॅगेलन एरोस्पेस लिमिटेड, कॅनडा च्या साथीने एरोस्पेस प्रोसेसिंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (“API”) ही संयुक्त कंपनी 2007 मध्ये स्थापन झाली. तिने कंपनीला नाविन्यपूर्ण सरफेस ट्रीटमेंट उपायसुविधा  पुरविण्यास सक्षम केले आहे. कंपनीची ट्रॅमोंटिना सोबतची संयुक्त कंपनी एक्वस कुकवेअर प्रायव्हेट लिमिटेड नाविन्यपूर्ण ग्राहक उत्पादने विकसित करण्यासाठी तांत्रिक क्षमतांनी सुसज्ज आहे.

एरोस्पेस आणि कंझ्युमर विभागांमध्ये दोन दशलक्ष चौ.फूटांहून अधिक उत्पादन जागांसह एक्वस भारतातील उत्तर कर्नाटक मधील तीन अद्वितीय, अभियांत्रिकी-आधारित व्हर्टिकली इंटिग्रेटेड व्हर्टिकली इंटिग्रेटेड अचूक उत्पादन क्षमता “इकोसिस्टिम्स” मध्ये कार्यरत आहे. याशिवाय, एक्वस एरोस्पेस विभागासाठी शोलेट  (फ्रान्स) आणि पॅरिस, टेक्सास (यू.एस.)मध्ये दोन समर्पित प्रिसिजन कॉम्पोनंट उत्पादन सुविधा केंद्रही चालवते. 

भारतामधील तीन उत्पादन इकोसिस्टिम्स आणि भारताबाहेरील दोन समर्पित एरोस्पेस सुविधा यांमध्ये, एक्वसकडे एरोस्पेस आणि कंझ्युमर विभागातील उत्पादनांसाठी 2,919,058 वार्षिक मशीनिंग/मोल्डिंग तास क्षमता असून, एरोस्पेस विभागासाठी 200 पेक्षा जास्त कंप्युटर न्यूमेरिकल कंट्रोल (“CNC”) मशीन आणि कंझ्युमर उत्पादनांसाठी 161 मोल्डिंग मशीन 31 मार्च, 2025 पर्यंत वापरात आहेत.

हडपसर येथील सह्याद्रि हॉस्पिटलला इन्फ्युजन थेरपीच्या सेवेमुळे इन्युझ या प्रतिष्ठित प्रमाणपत्राने सन्मान

0

पुणे२४ ऑक्टोबर२०२५:  सह्याद्री हॉस्पिटल, हडपसरला हे सांगताना अभिमान वाटत आहे की त्यांनी प्रतिष्ठित इन्फ्युझ (INFUZE) प्रमाणपत्र प्राप्त केले असून, हे मानांकन मिळवणारे हडपसरमधील पहिले हॉस्पिटल ठरले आहे. या मानांकनामुळे हॉस्पिटलने उच्च दर्जाची आरोग्यसेवा प्रदान करण्याची आणि इन्फ्युजन थेरपी (शिरेवाटे औषध देण्याची पद्धत) मध्ये जागतिक सर्वोत्तम निकष व कार्यपद्धती आत्मसात करण्याची आपली बांधिलकी सिद्ध केली आहे.

इन्फ्युजन नर्सिंग सोसायटी-इंडिया (INS-India) तर्फे दिले जाणारे इन्फ्युज प्रमाणपत्र हे इन्फ्युजन थेरपीसाठी ठरवलेल्या कठोर नियम आणि निकषांचे पालन करणाऱ्या आरोग्य संस्थांना दिले जाते. या कार्यक्रमाचा उद्देश इन्फ्युजन प्रक्रियांमध्ये सुधारणा करून त्यांना एकसारखे आणि व्यवस्थित बनविणे, तसेच रुग्णांची सुरक्षितता आणि उपचारांचे परिणाम अधिक चांगले करणे हा आहे. हे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संबंधित संस्थेची सविस्तर तपासणी केली जाते, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम पद्धती आणि नियमांचे पालन नीटपणे पाहिले जाते.

रुग्णालयाच्या मुख्य नर्सिंग सेवा प्रमुख श्रीमती सोनाली तांबे यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षित चॅम्पियन टीमच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हा सन्मान मिळाल्याची माहिती रुग्णालयाने दिली. या टीमला सघन उपचार युनिटचे संचालक डॉ. कपिल बोरवाके आणि हडपसर येथील सह्याद्रि सुपर स्पेशलिटी रुग्णालयाचे मुख्य व्यवस्थापक – ऑपरेशन्स, डॉ. अभिजित शिवणकर यांचे मार्गदर्शन लाभले. या दोन्ही अधिका-यांचे सक्षण क्लिनिकल नेतृत्व, उत्कृष्ट प्रशासकीय कार्यक्षमता आणि सामूहिक सांघिक कार्य या गोष्टी मान्यता मिळवण्यात अत्यंत निर्णायक ठरल्या.

हडपसर येथील सह्याद्रि सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे मुख्य व्यवस्थापक – ऑपरेशन्स डॉ. अभिजीत शिवणकर म्हणाले, “ इन्फ्युज प्रमाणपत्र मिळाल्याने आम्हांला खूप आनंद होत आहे. हे प्रमाणपत्र आमच्या उत्कृष्ट रुग्णसेवेसाठी आणि इन्फ्युजन थेरपीसाठी उच्च मानकांचे पालन करण्याच्या आमच्या निरंतन बांधिलकीला प्रतिबिंबित करते. आमच्या संपूर्ण टीमच्या समर्पणाशिवाय हा टप्पा गाठणे शक्य नसते. हे सन्मान मिळवणारे सह्याद्रि रुग्णालय हे हडपसरमधील पहिले रुग्णालय असल्याचा आम्हांला अभिमान आहे.”

हे यश सह्याद्रि हॉस्पिटलच्या मूळ संकल्पाला अधिक बळकटी देते. त्यांचा संकल्प केवळ पुणे शहरापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात वैद्यकीय सेवांची गुणवत्ता वाढवण्याचा आहे. यासाठी ते आरोगय सेवेत नवनवीन उपक्रम राबवून नेतृत्व स्वीकारुन आणि रुग्णांना उत्कृष्ट व दर्जेदार आरोग्य सेवा देऊ सर्वोत्तम कामगिरी करण्याचे आपले ध्येय पुन्हा अधोरेखित करते.