Home Blog Page 334

लेन्सकार्ट सोल्युशन्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री शुक्रवार 31 ऑक्टोबर 2025 पासून होणार सुरू

0

·         लेन्सकार्ट सोल्युशन्सलिमिटेड (“कंपनी”)च्या प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 382  रुपये  ते प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) 402  रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.  

·         प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक गुरूवार, 30 ऑक्टोबर 2025आहे.

·         बोली/ऑफर शुक्रवार 31 ऑक्टोबर 2025रोजी खुली होईल आणि मंगळवार, 04 नोव्हेंबर 2025 रोजी बंद होईल.

·         बोली किमान 37 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 37 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

·         रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) लिंक:

https://static.lenskart.com/media/desktop/corporate/LenskartSolutionsLimited-RHP_signed.pdf

पुणे , 27 ऑक्टोबर 2025लेन्सकार्ट सोल्युशन्सलिमिटेड (“कंपनी”)ने प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) शुक्रवार 31 ऑक्टोबर 2025 पासून प्राथमिक समभाग विक्रीखुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक कार्यालयीन एक दिवस आधी म्हणजेच गुरूवार, 30 ऑक्टोबर 2025आहे. बोली/ऑफर मंगळवार, 04 नोव्हेंबर 2025 रोजी बंद होईल.

प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 382  रुपये  ते प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 402  रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे. बोली प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 37 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 2 रुपये दर्शनी मूल्याच्या 37 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. कर्मचारी राखीव भागामध्ये बोली लावणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना प्रति इक्विटी शेअर 19 रु. इतकी सवलत देण्यात येत आहे.

ऑफर मध्ये 21,500 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू आणि ऑफर फॉर सेल मध्ये 127,562,573 पर्यंतचे इक्विटी शेअर्स समाविष्ट आहेत. यामध्ये पेयुष बन्सल, नेहा बन्सल, अमित चौधरी आणि सुमित कपाही (“प्रवर्तक विक्री समभागधारक”) हे काही विद्यमान समभागधारक आणि SVF II लाईटबल्ब (Cayman) लिमिटेड, श्रोडर्स कॅपिटल प्रायव्हेट इक्विटी एशिया मॉरीशस लिमिटेड, PI ऑपॉरच्युनिटीज फंड- II, MacRitchie इन्व्हेस्टमेंट पीटीई लिमिटेड, केदारा कॅपिटल फंड II LLP आणि अल्फा वेव्ह व्हेंचर्स LP (“गुंतवणुकदार विक्री समभागधारक”) यांचा समावेश आहे. या ऑफरमध्ये 150 दशलक्ष रु. पर्यत कर्मचारी राखीव भागाचा समावेश असून उर्वरित ऑफरला पुढे “नेट ऑफर” म्हणले जाईल.

ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित  नियम 6(2) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या किमान 75% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. त्यापैकी किमान एक तृतीयांश हिस्सा देशांतर्गत स्थानिक म्युच्युअल फंडांसाठी उपलब्ध राहील. त्यासाठी स्थानिक म्युच्युअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदार वाटप किंमतीच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीसाठी वैध बोली प्राप्त व्हायला लागतील. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स नेट QIB Portion मध्ये समाविष्ट केले जातील. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBsसाठी प्रमाणात वाटप केले जाईल. तसेच, ऑफरच्या 15 टक्क्यांपेक्षा जास्त नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. (“Non-Institutional Investors” or “NIIs”) (the “Non-Institutional Portion”) त्यापैकी (अ) एक तृतीयांश भाग 200,000  रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि (ब) दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना वाटप केला जाऊ शकतो सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार Retail Individual Bidders (RIBs) साठी निव्वळ ऑफरच्या (“Net Offer”) 10% पेक्षा अधिक भाग वाटपासाठी उपलब्ध राहणार नाही. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल.

येथून पुढे, पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव असलेल्या कर्मचारी आरक्षण भागांतर्गत अर्ज करणाऱ्या पात्र कर्मचाऱ्यांना त्यांची वैध बोली ऑफर किंमती एवढी किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास इक्विटी शेअर्सचे प्रमाणात वाटप केले जाईल. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.

कंपनीचे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE”) (BSE आणि NSE एकत्रितपणे “स्टॉक एक्सचेंज”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे.

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, मॉर्गन स्टँनले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, अव्हेन्डस  कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड, सिटीग्रुप ग्लोबल मार्केट्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ॲक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि इंटेसिव्ह फिस्कल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड हे या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.

येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.

स्टड्स ऍक्सेसरीज लिमिटेडच्या इक्विटी शेअर्सची प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) 30 ऑक्टोबर 2025 रोजी

0

·         ₹5 दर्शनी मूल्यावर (“इक्विटी शेअर”) प्रति इक्विटी शेअर ₹ 557 ते ₹ 585 असा प्राइस बँड निश्चित केला आहे.

·         बोली/ऑफर गुरुवार30 ऑक्टोबर 2025 रोजी उघडेल आणि सोमवार3 नोव्हेंबर 2025 रोजी बंद होईल. अँकर इन्व्हेस्टर बिडिंग बुधवार29 ऑक्टोबर 2025 रोजी होईल.

·         किमान 25 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 25 च्या पटीत बोली लावता येईल.

·         आरएचपी लिंक: https://www.iiflcapital.com/institutional-equities/Upload/InvestmentBanking/Prospects/Studds_Accessories_Limited_-_Red_Herring_Prospectus.pdf

मुंबई, 27 ऑक्टोबर 2025: स्टड्स ऍक्सेसरीज लिमिटेड (“स्टड्स” किंवा “द कंपनी”)गुरुवार30 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांच्या इक्विटी शेअर्सच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफरच्या (“ऑफर”) संदर्भात बोली/ऑफर कालावधीचा प्रस्ताव ठेवते आहे.

टोटल ऑफर साइझमध्ये कंपनीच्या काही विद्यमान शेअरहोल्डर्सद्वारे (“विक्री करणारे शेअरहोल्डर्स”7,786,120 पर्यंत इक्विटी शेअर्स (“विक्रीसाठी ऑफर”) विक्रीसाठी उपलब्ध आहेत. (“टोटल ऑफर साइझ”).

विक्रीसाठीच्या ऑफरमध्ये मधु भूषण खुराणा यांचे 3,800,000 पर्यंत इक्विटी शेअर्स, सिद्धार्थ भूषण खुराणा यांचे 800,000 पर्यंत इक्विटी शेअर्स, चांद खुराणा यांचे 2,100,000 पर्यंत इक्विटी शेअर्स (“एकत्रितरित्या प्रमोटर सेलिंग शेअरहोल्डर्स”) आणि संजय लीखा यांचे 342,000 पर्यंत इक्विटी शेअर्स, संजय लीखा यांचे चारू लीखा यांच्यासोबत संयुक्तपणे 258,000 पर्यंत इक्विटी शेअर्स, चारू लीखा यांचे 249,600 पर्यंत इक्विटी शेअर्स, निशा लीखा यांचे 100,800 पर्यंत इक्विटी शेअर्स, नैन तारा मेहता यांचे 57,600 पर्यंत इक्विटी शेअर्स, सुनील कुमार रस्तोगी यांचे 36,000 पर्यंत इक्विटी शेअर्स, एसई शूज प्रायव्हेट लिमिटेड यांचे 25,920 पर्यंत इक्विटी शेअर्स, अजय कुमार सखुजा यांचे 16,200 पर्यंत इक्विटी शेअर्स (“इतर सेलिंग शेअरहोल्डर्स”) यांचा एकत्रितपणे (“विक्री करणारे भागधारक”) समावेश आहे.

अँकर इन्व्हेस्टर बिड/ऑफर कालावधी बुधवार, 29 ऑक्टोबर 2025 रोजी सुरू होईल आणि त्याच दिवशी बंद होईल. बिड/ऑफर कालावधी गुरुवार, 30 ऑक्टोबर 2025 रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि सोमवार, 3 नोव्हेंबर 2025 रोजी बंद होईल.

ऑफरचा प्राइस बँड प्रति इक्विटी शेअर ₹ 557 ते ₹ 585 असा निश्चित करण्यात आला आहे. किमान 25 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 25 च्या पटीत बोली लावता येईल.

इक्विटी शेअर्स कंपनीच्या 25 ऑक्टोबर 2025 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (RHP”) द्वारे ऑफर केले जात आहेत. रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, दिल्ली आणि हरियाणा (RoC”) तर्फे तो नवी दिल्ली येथे दाखल करण्यात आला आहे.

25 ऑक्टोबर 2025 रोजीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसद्वारे ऑफर केले जाणारे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड या स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे. या ऑफरसाठी, बीएसई लिमिटेड हे नियुक्त स्टॉक एक्सचेंज आहे.

आयआयएफएल कॅपिटल सर्व्हिसेस लिमिटेड (आधीचे IIFL सिक्युरिटीज लिमिटेड) आणि आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड हे ऑफरचे बुक रनिंग लीड मॅनेजर आहेत.

येथे वापरल्या गेलेल्या/जाणाऱ्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड संज्ञांचा अर्थ RHP मध्ये दिलेल्या अर्थाप्रमाणेच असेल.

सेबी आयसीडीआर नियमांमधील नियम 31 सह वाचल्या जाणाऱ्या सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट्स (रेग्युलेशन) रूल्स, 1957 च्या सुधारित (“एससीआरआर“) नियम 19(2)(ब) च्या अंतर्गत ही ऑफर दिली जात आहे. सेबी आयसीडीआर नियमांच्या नियम 6(1) नुसार बुक बिल्डिंग प्रक्रियेद्वारे ही ऑफर दिली जात आहे, ज्यामध्ये ऑफरचा 50% पेक्षा जास्त भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“क्यूआयबी श्रेणी”) प्रमाणबद्ध आधारावर वाटपासाठी उपलब्ध नसेल. आमची कंपनी बीआरएलएमशी सल्लामसलत करून, पण मुखत्यारीने (“अँकर इन्व्हेस्टर पोर्शन”) अँकर इन्व्हेस्टर्सना क्यूआयबी श्रेणीच्या 60% पर्यंत वाटप करू शकते, ज्यापैकी एक तृतीयांश देशांतर्गत म्युच्युअल फंडांसाठी राखीव असेल. यात देशांतर्गत म्युच्युअल फंडांकडून अँकर इन्व्हेस्टर्सना इक्विटी शेअर्स वाटप केलेल्या किमतीवर किंवा त्याहून अधिक किमतीवर वैध बोली प्राप्त होण्यासाठी पात्र असेल. अँकर इन्व्हेस्टर पोर्शनमध्ये सबस्क्रिप्शन कमी झाल्यास किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स QIB श्रेणीमध्ये (अँकर इन्व्हेस्टर पोर्शन वगळून) (“नेट QIB श्रेणी“) जोडले जातील.

याशिवाय, नेट क्यूआयबी श्रेणीतील 5% रक्कम केवळ म्युच्युअल फंडांना प्रमाणानुसार वाटपासाठी उपलब्ध असेल. आणि जर ऑफर किंमतीवर किंवा त्यापेक्षा किमतीवर वैध बोली जास्त मिळाल्या असतील तर उर्वरित नेट क्यूआयबी श्रेणीतील रक्कम ही म्युच्युअल फंडांसह सर्व क्यूआयबींना प्रमाणानुसार वाटली जाईल.

सेबी आयसीडीआर नियमांनुसार, ऑफरचा किमान 15% हिस्सा गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांना (“गैर-संस्थात्मक श्रेणी“) वाटपासाठी उपलब्ध असेल, ज्यापैकी एक तृतीयांश हिस्सा गैर-संस्थात्मक श्रेणी ₹200,000 पेक्षा जास्त आणि ₹1,000,000 पर्यंतची बोली लावणाऱ्यांसाठी उपलब्ध असेल. तर गैर-संस्थात्मक श्रेणीचा दोन तृतीयांश हिस्सा ₹1,000,000 पेक्षा जास्त बोली लावणाऱ्या बोलीदारांसाठी उपलब्ध असेल. गैर-संस्थात्मक श्रेणीच्या या दोन्ही उपश्रेणींपैकी कोणत्याही एका उपश्रेणीमध्ये कमी-सबस्क्रिप्शन असेल तर सेबी आयसीडीआर नियमांनुसार, वैध बोली ऑफर किंमतीवर किंवा त्याहून अधिक बोली लागल्यास, गैर-संस्थात्मक श्रेणीच्या इतर उपश्रेणीतील बोलीदारांना त्याचे वाटप केले जाऊ शकते.

ऑफरचा किमान 35% भाग रिटेल वैयक्तिक गुंतवणूकदारांना (“रिटेल कॅटेगरी“) वाटपासाठी उपलब्ध असेल. सेबी आयसीडीआर नियमांनुसार, ऑफर किमतीच्या किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीवर त्यांच्याकडून वैध बोली लागल्यासच तो उपलब्ध होईल. सर्व बोलीदार (अँकर इन्व्हेस्टर्स वगळता) या ऑफरमध्ये केवळ ब्लॉक केलेल्या रकमेद्वारे समर्थित अर्ज (“ASBA“) प्रक्रियेद्वारेच सहभागी होतील आणि त्यांच्या संबंधित बँक खात्याची माहिती (UPI बोलीदारांच्या बाबतीत UPI आयडीसह) देतील. या अंतर्गत बोलीची रक्कम सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँका (“SCSBs“) किंवा प्रायोजक बँकेद्वारे (बँक) ब्लॉक केली जाईल. अँकर इन्व्हेस्टर्सना ASBA प्रक्रियेद्वारे ऑफरमध्ये सहभागी होण्याची परवानगी नाही. तपशीलांसाठी, RHP च्या पृष्ठ 403 वरून सुरू होणारी “ऑफर प्रक्रिया” पहा.

‘पीएम जनमन’ योजनेतील कामगिरीसाठी विद्युत मंत्रालयाकडून महावितरणचे कौतुक

0

मुंबई, दि. २७ ऑक्टोबर २०२५: केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान म्हणजेच पीएम जनमन योजनेमध्ये महावितरणने केलेल्या कामगिरीचे व १३१ टक्के उद्दिष्टपूर्तीचे केंद्रीय विदयुत मंत्रालयाने कौतुक केले आहे. याबाबत केंद्रीय ऊर्जा सचिव श्री. पंकज अग्रवाल यांनी राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांना पाठवलेल्या पत्रामध्ये महावितरणच्या कामगिरीचा गौरव केला आहे.

देशातील दुर्गम भागात निवासी व सर्वार्थाने दुर्बळ आदिवासी गट (PVTGs) यांच्या सामाजिक-आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी केंद्र शासनाने पीएम जनमन योजना सुरू केली आहे. दुर्गम भागातील अतिमागास जनजाती समूहांना सुरक्षित घरेपिण्याचे पाणीस्वच्छताशिक्षणआरोग्यउपजीविकेच्या संधी आणि वीज यासारख्या मूलभूत सुविधा व सेवा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.

मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात या योजनेअंतर्गत राज्यातील १६ जिल्ह्यांतील ११३७ गावांमध्ये लाभार्थ्यांना नवीन वीजजोडण्या व त्यासाठी विद्युतीकरणाची कामे महावितरणकडून वेगाने सुरू करण्यात आली. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनीही या कामांचा वेळोवेळी आढावा घेतला. त्याची फलनिष्पत्ती म्हणजे योजनेमध्ये १३१ टक्के उद्दिष्टपूर्ती झाली आहे. महाराष्ट्रासाठी ८ हजार ५५६ लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्याचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात तब्बल ११ हजार २३५ घरांमध्ये नवीन वीजजोडणी कार्यान्वित करण्यात आली आहे.

नवी दिल्ली येथे आदि कर्मयोगी अभियान २०२५ची राष्ट्रीय परिषद नुकतीच झाली. पीएम जनमन योजनेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मा. राष्ट्रपती महोदया यांच्याहस्ते केंद्रीय विद्युत मंत्रालयाचा या परिषदेत गौरव करण्यात आला. या गौरवासाठी महाराष्ट्राचा ऊर्जा विभाग व महावितरणचे देखील मोठे योगदान आहे. दुर्गम भागात निवासी आदिवासी गटांच्या घरांचे विद्युतीकरण करण्यासाठी महाराष्ट्राने केलेल्या कामगिरीचे कौतुक आहे. आदिवासी कल्याणसक्षमीकरण व सर्वसमावेशक विकासात महाराष्ट्राच्या ऊर्जा विभागाचे व महावितरणचे योगदान महत्त्वाचे आहे, असे केंद्रीय ऊर्जा सचिव श्री. पंकज अग्रवाल यांनी पत्रामध्ये नमूद केले आहे.

पुण्याच्या होम टीम बीबी रेसिंगने इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग सीझन २ ची पहिली फेरी गाजवली

~ बिगरॉक मोटरस्पोर्ट्सच्या मॅट मॉस (ऑस्ट्रेलिया) ने कावासाकीवर स्वार होत ४५०सीसी आंतरराष्ट्रीय वर्गाचे विजेतेपद पटकावले. ~
~ बीबी रेसिंगच्या हंटर श्लॉसर (अमेरिका) ने होंडावर स्वार होत २५०सीसी आंतरराष्ट्रीय वर्गात सर्वोच्च सन्मान मिळवला. ~
~ गुजरात ट्रेलब्लेझर्सच्या बेन हॉलग्रेन (थायलंड) ने केटीएमवर अप्रतिम कामगिरी करत २५०सीसी इंडिया-एशिया मिक्स वर्गात विजय मिळवला.

पुणे: इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग (ISRL) सीझन २ ची सुरुवात पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथे अतिशय थरारक वातावरणात झाली, जिथे होम टीम बीबी रेसिंग ने आज विजेता म्हणून बाजी मारली. जगातील पहिल्या फ्रँचायझी-आधारित सुपरक्रॉस लीगच्या उद्घाटन फेरीत अखंड रोमांच, जबरदस्त गती, आणि थरारक स्पर्धा अनुभवायला मिळाली. हजारो प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये भारतीय आणि आंतरराष्ट्रीय रायडर्सना प्रकाशझोतात रोमांचक शर्यतीत एकमेकांविरुद्ध झुंजताना पाहिले.
सीझनच्या पहिल्या फेरीत बीबी रेसिंग टीमने संघ गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून आगामी हंगामासाठी जोरदार सूर लावला. ४५०सीसी आंतरराष्ट्रीय वर्गात बिगरॉक मोटरस्पोर्ट्सच्या मॅट मॉस (ऑस्ट्रेलिया) यांनी कठीण ट्रॅकवर अप्रतिम नियंत्रण दाखवत कावासाकीवर स्वार होऊन विजय मिळवला. २५०सीसी आंतरराष्ट्रीय वर्गात हंटर श्लॉसर (अमेरिका) यांनी होंडावर अप्रतिम गती आणि कौशल्य दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकली. २५०सीसी इंडिया–एशिया मिक्स वर्गात गुजरात ट्रेलब्लेझर्सच्या बेन हॉलग्रेन (थायलंड) यांनी जोरदार प्रदर्शन करत शर्यतीत पहिला क्रमांक मिळवला.
रेस सप्ताहांतात ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि थायलंडसारख्या देशांतील रायडर्ससोबत भारतातील प्रतिभावान रायडर्स रुग्वेद बार्गुजे, इक्षान शानबाग आणि प्रज्वल विश्वनाथ यांनीही सहभाग घेतला. या हंगामात २१ देशांतील ३६ हून अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू सहभागी झाल्याने भारत आता जागतिक सुपरक्रॉस प्रतिभेसाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून नावारूपास येत आहे.
कार्यक्रमात राईज मोटो फॅन पार्क देखील आयोजित करण्यात आला होता, जिथे चाहत्यांसाठी इंटरॅक्टिव्ह गेम झोन, खाद्य स्टॉल्स, लाईव्ह संगीत आणि खास वस्तूंचे स्टॉल्स होते. हजारो उत्साही प्रेक्षकांनी भरलेल्या स्टेडियममध्ये झालेल्या या फेरीने सीझन २ ला भव्य सुरुवात करून दिली आणि भारतात सुपरक्रॉसची वाढती लोकप्रियता अधोरेखित केली.
ISRL चे सह-संस्थापक ईशान लोखंडे म्हणाले:“आंतरराष्ट्रीय दर्जाचे रायडर्स भारतीय खेळाडूंसोबत भारतीय भूमीवर स्पर्धा करताना पाहणे आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. भारत आता फक्त प्रेक्षक नाही, तर जागतिक मोटरस्पोर्ट्समधील एक गंभीर स्पर्धक बनत आहे. आमचे ध्येय नेहमीच युवा रायडर्सना प्रोत्साहन देणारे, पुढील पिढीला प्रेरणा देणारे आणि भारताला जागतिक सुपरक्रॉस नकाशावर ठळकपणे स्थान मिळवून देणारे व्यासपीठ तयार करणे हेच राहिले आहे.”
ISRL चे सह-संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक वीर पटेल म्हणाले:
“पुण्यात मिळालेला अप्रतिम प्रतिसाद पुन्हा एकदा सिद्ध करतो की भारताला रेसिंगची खरी आवड आहे. स्पर्धेचा दर्जा, चाहत्यांचा उत्साह आणि कार्यक्रमाचा विस्तार हे दाखवतात की भारतातील मोटरस्पोर्ट्स झपाट्याने विकसित होत आहेत. ही फक्त शर्यत नाही, तर मनोरंजन, नाविन्य आणि समुदायभावना एकत्र आणणारी नवी क्रीडा चळवळ आहे.”
आता दुसरी फेरी ६–७ डिसेंबर २०२५ रोजी हैदराबादमध्ये होणार असून ग्रँड फिनाले २०–२१ डिसेंबर २०२५ रोजी कोझिकोड (केरळ) येथे पार पडणार आहे.

खासदारांचे ४ हजार कोटीचे स्वप्न धुळीस मिळाले त्यानंतर मिशन लोकमान्यनगर लवकरच

धंगेकरांच्या सूचक वक्तव्याने भाजपमध्ये कुठे अस्वस्थता तर कुठे आनंदाची लहर

पुणे -जैन आचार्य महाराजांनी सांगितलं तसं 1 तारखेला आंदोलन करेल.असे सांगून आज येथे रवींद्र धंगेकर म्हणाले,’ मला तुम्ही सगळ्यांनी ताकद दिली म्हणून आज संस्था समाजाला परत मिळत आहे. तुमच्यामुळ हा आवाज दिल्लीत गेला, आता कुणी पुढाकार घेऊ नका. घेणाऱ्याने पुढाकार घेतला. आता खासदार साहेबांनी त्यांची स्वतःची काळजी करावी, पुढे काय होणार आहे ते. त्यांनी 4 हजार कोटी रुपयांचं स्वप्न बघितलं होतं. आता, ते धुळीस मिळेल. चुकीचे लोकं कुठल्याही पक्षात असू द्या, मी लढा देणार. आता माझा मोर्चा लोकमान्य नगरमध्ये वळवणार आहे. निलेश घायवळवर बोलणार आहे, ज्यांना खुमखुमी आहे त्यांना विनंती आहे की, आता माझ्याशी लढाच. मी तयार आहेच. सगळे विषय काढू, लढत राहू. मोहोळ यांच्याशी माझी लढाई आहे, त्यांच्या कुटुंबाशी नाही मंदिर आता वाचलं आहे, मी जिलेबी काढून वाटणार असे म्हणत मोहोळ यांच्या राजीनामावर दोन दिवसांनी बोलू, असेही रविंद्र धंगेकर यांनी म्हटले.

रविंद्र धंगेकर यांनी आज सकाळी जैन बोर्डिंगमध्ये जाऊन जैन मुनींचाआशीर्वाद घेतला त्यांनतर माध्यमांशी ते बोलत होते , ते म्हणाले,’अनेक लोकांनी अनेक सहकाऱ्यांनी यात पाठिंबा दिला होता, पुण्यातून अनेक लोक आणि सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं. गोखले बिल्डर यांच्यासोबत ज्यांचे संबंध आहेत, त्यांचं नाव आता मी घेणार होतो. पण, मी आता नाव घेणार नाही, कारण शिंदे साहेबांनी मला सांगितलं आहे, अशी भूमिका जैन बोर्डिंग जागा प्रकरणात सातत्याने केंद्रीयमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका करणारे, आरोप करणारे शिवसेना नेते रविंद्र धंगेकर यांनी मांडली. एकनाथ शिंदे साहेबांनी काल मला सांगितलं होतं की तोडगा काढू, जे 230 कोटी गोठवले आहेत ते रुपये संस्थेला द्या. योग्य माणसाची निवड यावर करावी, संस्था पुन्हा उभा करण्यासाठी मदत करा. हा धर्म दानशूर आहे, मी समाजाला शब्द दिला होता तो आज खरा होत आहे. सगळ्यांचा मी आभारी आहे की, तुम्ही सगळ्यांनी ही संस्था वाचवायला मदत केली, असेही धंगेकर यांनी व्यवहार रद्द झाल्यानंतर पहिली प्रतक्रिया देताना म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, आमित शाह आणि एकनाथ शिंदे यांचे मी आभार मानतो. कारण, त्यांनी मला रोखलं नाही, माझ्यावर कारवाई केली नाही. मी विकृतीच्या विरोधात बोलत राहील, एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो की मला अडवलं नाही. पण, सांगितलं होतं की महायुतीमधल्या पक्षांवर बोलू नका, असेही धंगेकर यांनी स्पष्टपणे सांगितलं. माझा लढा संपला नाही, घायवळवर अजून बोलणार आहे. तो कसा पळून गेला, त्यावर पण बोलेन, माझा लढा सुरूच आहे, असे धंगेकर यांनी म्हटलं. चोरी करणाऱ्यापेक्षा चोरीचा माल घेणारा दोषी असतो, यात कोण गुन्हेगार होते, कोण दोषी होते, त्यांना शिक्षा व्हावी अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांना करणार आहे. आचार्य गुप्तीनंद महाराज यांचे रवींद्र धंगेकर यांना आशीर्वाद आहेत. एकत्र आंदोलन करूया, महाराज यांचे रवींद्र धंगेकर यांना सांगणे आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी याठिकाणी यावं, असं देखील महाराजांचे मत असल्याचे धंगेकर यांनी म्हटले. मिडिया ने हा विषय घराघरापर्यंत नेला, तुम्ही जी जनक्रांती करत आहात, त्यात समतोल ठेवा. 1 तारखेपर्यंत निर्णय नाही झाला तर तुम्ही आंदोलनाला बसा महाराज यांचे रविंद्र धंगेकर यांना आवाहन.

मंदिराच्या जागाही सोडेनात ,भाजपमधील भूमाफिया विरोधात कॉंग्रेसचे आंदोलन

पुणे- पुणे जिल्हा धर्मदाय आयुक्त कार्यालयासमोर आज महाविकास आघाडीच्या वतीने जैन मंदिर व बोर्डींग हाऊसची जागा गिळंकृत करणाऱे गोखले बिल्डर व त्यांचे भागीदार केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले.

सदर प्रसंगी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे हे आपल्या भाषणात म्हणाले की, पुणे शहरातील जैन मंदिर व बोर्डींग हाऊसची कोट्यावधी रूपयांची जागा कवडीमोल भावाने दादागिरी करून ताब्यात घेऊन एक दिवसात सर्व परवानग्या घेण्यात आल्या. या कोट्यावधी रूपयांच्या जागेत कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्या केंद्रीय मंत्र्यांचा ताबडतोब राजीनामा घ्यावा व जैन समाजाला न्याय द्यावा. तसेच मुरली मोहोळ यांनी पुणे शहरामध्ये केलेले अनेक जमिन घोटाळे यांची सुध्दा चौकशी करण्यात यावी. अशा या घोटाळेबाज मंत्र्याला मुख्यमंत्री महोदय पाठिशी घालण्याचे काम करीत आहे याचा अर्थ त्यांचा सुध्दा सहभाग या घोटाळ्यामध्ये दिसत आहे.’’

यावेळी महाष्ट्र प्रदेश काँग्रेसचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी, कमल व्‍यवहारे, अजित दरेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख, मेहबुब नदाफ, राजेंद्र भुतडा, उस्मान तांबोळी, संतोष आरडे, महिला अध्यक्ष स्वाती शिंदे, प्राची दुधाने, अर्चना शहा, सिमा सावंत, उषा राजगुरू, माया डुरे, ब्लॉक अध्यक्ष सुजित यादव, राजू ठोंबरे, रमेश सकट, भरत सुराणा, अरुण कटारिया, लतेंद्र भिंगारे, फिरोज शेख, रवि आरडे, देवीदास लोणकर, नुर शेख, अभिजीत महामुनी, संतोष सुपेकर, चेतन पडवळ आदींसह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

फलटणच्या महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या:शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे

पुणे–शिवसेना (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी फलटण येथील शासकीय रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या मृत्यूबाबत गंभीर आरोप केला आहे. त्यांनी हा मृत्यू आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा केला. माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या दबावामुळेच हा प्रकार घडल्याचे अंधारे यांनी म्हटले आहे.

सोमवारी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अंधारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकर यांना ‘क्लीन चिट’ कशी दिली, असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर, महिला डॉक्टरला त्रास देणारे पोलीस अधिकारी आणि निंबाळकर यांच्या दोन स्वीय सहाय्यकांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. या प्रकरणातील ‘गौडबंगाल’ पाहता उच्च न्यायालयाने यासाठी समिती स्थापन करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

सातारा जिल्ह्यातील फलटण येथील शासकीय रुग्णालयातील एका महिला डॉक्टरने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात भाजप नेते आणि माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांचा सहभाग असल्याचा आरोप होत आहे. मात्र, फलटण येथे रविवारी झालेल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निंबाळकर यांना ‘क्लीन चिट’ दिली होती. या पार्श्वभूमीवर अंधारे यांनी ही पत्रकार परिषद घेतली.

अंधारे यांनी निंबाळकर यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांना त्यांच्या साखर कारखान्यासाठी आणले जात होते. कामगार कारखाना सोडून जाऊ नयेत म्हणून त्यांना मारहाण केली जात होती. फलटण पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या मदतीने कामगारांवर खोटे गुन्हे दाखल केले जात होते. सरकारी दवाखान्यात त्यांना दाखल करून कामगार ‘फिजिकली फिट’ असल्याचे दाखवण्यासाठी संबंधित महिला डॉक्टरवर दबाव टाकला जात होता. यासंदर्भात संबंधित महिला डॉक्टरने वरिष्ठांना चार पानी पत्र दिले होते.

डॉक्टरच्या कुटुंबीयांनी दावा केला आहे की, आत्महत्येवेळी तिच्या हातावर लिहिलेला मजकूर तिचे हस्ताक्षर नाही. फलटण येथे घर असतानाही, घटनेपूर्वी ही महिला निंबाळकर यांच्या निकटवर्तीयाच्या हॉटेलवर गेली होती. ती तिथे का गेली, याची चौकशी झाली पाहिजे, असे अंधारे यांनी सांगितले. हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

अंधारे यांनी पुढे सांगितले की, रणजितसिंह निंबाळकर भाजपमध्ये गेल्यानंतर २०२२ पासून पोलिसांनी हाताशी धरून २७७ तक्रारी केल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी संबंधितांना त्रास दिला आणि एफआयआर नोंदवले आहेत. निंबाळकर फडणवीसांच्या जीवावर ‘उड्या मारत’ असून, त्यातूनच त्यांना ‘क्लीन चिट’ देण्यात आली आहे, असा आरोपही अंधारे यांनी केला. पत्रकार परिषदेला शहरप्रमुख गजानन थरकुडे आणि प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत उपस्थित होते. निंबाळकर यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेल्या फलटण येथील एका कुटुंबातील महिला सदस्यही यावेळी उपस्थित होत्या आणि त्यांनीही निंबाळकर यांच्यावर आरोप केले.

‘गिव्ह विथ डिग्निटी™’ उपक्रमाच्या पाच वर्षांच्या यशाचा फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनकडून उत्सव साजरा

0

करुणा आणि सामूहिक सद्भावना यांच्या पाच वर्षांच्या प्रवासाचा हा उत्सव; या उपक्रमाद्वारे स्थानिक पातळीवर तयार केलेल्या उत्सवी ‘डिग्निटी किट्स’च्या माध्यमातून वंचित घटकांचे सशक्तीकरणाचा प्रयत्न.

पुणे२७ ऑक्टोबर, २०२५ : फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि या कंपनीची सीएसआर शाखा मुकुल माधव फाउंडेशन (एमएमएफ) यांनी त्यांच्या ‘गिव्ह विथ डिग्निटी™’ अभियानाचा पाचवा वर्षपूर्ती सोहळा नुकताच यशस्वीरित्या पूर्ण केला. २०२० मध्ये कोविड साथीच्या काळात सुरु झालेला हा उपक्रम आज देशभर आशा आणि सकारात्मकतेचे प्रतिक बनला आहे.

एमएमएफ आणि फिनोलेक्स यांच्या टीमने पारंपरिक उत्सवी भेटवस्तूंच्या ऐवजी ‘गिव्ह विथ डिग्निटी™’ या उपक्रमाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. या उपक्रमाद्वारे त्यांनी दुर्लक्षित आणि वंचित समुदायांना मदत पोहोचवण्यासाठी आपली संसाधने वळवली आहेत. या माध्यमातून रिक्षाचालक, रोजंदारीवर काम करणारे कामगार, दिव्यांग व्यक्ती, शेतमजूर, तसेच ट्रान्सजेंडर आणि आदिवासी समुदाय अशा देशभरातील अनेक घटकांपर्यंत एमएमएफ आणि फिनोलेक्स हे पोहोचले आहेत.

बचत गट, स्थानिक लघु उद्योग, महिला उद्योजक यांच्या सहकार्याने एमएमएफ ही संस्था धान्य, उत्सवी भेटवस्तू आणि स्वच्छता किट्सचे संकलन, निर्मिती आणि वितरण करते. या उपक्रमातून केवळ गरजू लोकांच्या उपजीविकेला आधार मिळतोच, त्याशिवाय “स्थानिक वस्तू खरेदी करा, स्थानिक वस्तू द्या” या तत्त्वज्ञानातून स्थानिक समुदायांनाही बळकटी मिळते. या प्रत्येक किटमध्ये काही वस्तूंचा आणि पौष्टिक खाद्यपदार्थांचा समावेश असतो. त्यातील दिवे हे दिव्यांग व्यक्तींनी हस्तकलेने तयार केलेले असतात. त्यामुळे ‘देणे’ ही कृती एक ‘उत्पन्न कमावण्याची’ साखळी बनते. या उपक्रमाच्या पाचव्या वर्षात, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल या ११ राज्यांमध्ये एकूण १० हजार किट्स वितरित करण्यात आले.

२०२० मध्ये सुरू झाल्यापासून ‘गिव्ह विथ डिग्निटी™’ उपक्रमाने कॉर्पोरेट, देणगीदार आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने २४ राज्यांतील तीन लाखांहून अधिक व्यक्तींना सहाय्य केले आहे. २०२० ते २०२५ या कालावधीत, एमएमएफच्या टीमने या उपक्रमाद्वारे एक लाखाहून अधिक ‘डिग्निटी किट्स’ वितरित केल्या, १२० बचत गटांना खरेदी प्रक्रियेच्या माध्यमातून पुनरुज्जीवित केले आणि ३० गटांना एमएसएमई म्हणून नोंदणी करण्यास मदत केली. या उपक्रमाच्या सुरुवातीच्या काळात ४० कॉर्पोरेट कंपन्यांनी (त्यांपैकी सहा बहुराष्ट्रीय कंपन्या) भाग घेतला होता आणि ४५०० हून अधिक फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना मदत करण्यात आली होती. त्यावेळी त्यास १० राज्यांच्या प्रमुखांचा आणि मान्यवरांचा पाठिंबा मिळाला होता.

या उपक्रमाबद्दल बोलताना मुकुल माधव फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “गेल्या पाच वर्षांमध्ये आम्ही दिवाळीमध्ये केवळ किट्सचे वाटप केले नाही, तर आशा, सन्मान आणि मानवी सहृदयता या भावनाही लोकांपर्यंत पोहोचविल्या आहेत. सणाचा आनंद समाजाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत, विशेषतः दुर्लक्षित समाजापर्यंत पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. इतरांना उभे करणे आणि जिथे अंधार आहे तिथे प्रकाश पसरवणे हा सण साजरा करण्य़ाचा खरा अर्थ असतो, यावर आमची श्रद्धा आहे. हा उपक्रम हे त्याचेच प्रतिक आहे. कोविड साथीच्या काळातही पुढे येऊन आम्हाला साथ देणाऱ्या सर्व कॉर्पोरेट्सचे, देणगीदारांचे आणि स्थानिक भागीदारांचे मी मनःपूर्वक आभार मानते. एकत्र येऊन प्रयत्न केल्यास कोणतीही अडचण पार करता येते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. २०२०मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमाला सातत्याने पाठिंबा दिल्याबद्दल मी फिनोलेक्सचे व्यवस्थापन आणि संचालक मंडळ यांची मनापासून कृतज्ञ आहे. दरवर्षी हा उपक्रम आम्हाला आठवण करून देतो की करुणेचा एक थेंबसुद्धा कल्पनेपलीकडील बदल घडवू शकतो आणि समाजात एकता व सन्मान यांच्या भावना निर्माण करू शकतो.”

‘गिव्ह विथ डिग्निटी™’ हा उपक्रम कोविडच्या काळात रुजलेले एक स्वप्न आहे. दरवर्षी ते अधिकाधिक बळकट होत आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीज आणि कंपनीची सीएसआर भागीदार संस्था मुकुल माधव फाउंडेशन या सक्षम आणि आत्मनिर्भर समाजनिर्मितीसाठी कटिबद्ध आहेत. आरोग्य, शिक्षण, जलसंवर्धन आणि सामाजिक कल्याण या क्षेत्रांत त्या सातत्याने काम करतात. समाजाचे ऋण फेडून भारतभरातील असंख्य नागरिकांच्या जीवनात प्रकाश आणण्यावर दोन्ही संस्थांचा विश्वास आहे.

जैन मंदिर,बोर्डिंग: धर्मदाय आयुक्तांपासून ते विकणारे,खरेदी करणारे आणि सेल डीड नोंदविणारे सर्वच वादाच्या भोवऱ्यात

कायदेशीररीत्या व्यवहार रद्द होत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही: रविंद्र धंगेकर म्हणाले

पुणे-येथील जैन बोर्डिंग ट्रस्टच्या जागेच्या विक्री व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी हा व्यवहार पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी याबाबतचा निर्णय ई-मेलद्वारे जैन ट्रस्टचे चेअरमन आणि ट्रस्टींना कळवला असून, धर्मदाय आयुक्तालयालाही याबाबत पत्र पाठवलं आहे. ई-मेलमधून त्यांनी स्पष्ट केलं आहे की, नैतिकतेच्या आणि धर्मीय भावनांचा आदर राखत ते या व्यवहारातून माघार घेत आहेत. तसेच, आधी जमा केलेले 230 कोटी रुपये परत देण्याची मागणीही गोखले यांनी केली आहे. भाजपचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर या व्यवहारात अप्रत्यक्षरीत्या भूमिका बजावल्याचा आरोप करण्यात आला होता. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर हे या प्रकरणात सर्वात आक्रमक भूमिकेत होते. त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर भ्रष्टाचार आणि राजकीय दबावाचे आरोप करत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मात्र मोहोळ यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते आणि हा व्यवहार पूर्णपणे कायदेशीर असल्याचं म्हटलं होतं.वास्तविक पाहता अशी धर्मदाय जागा कोणालाही विकत येत नाही आणि विकत घेता येत नाही आणि धर्मदाय आयुक्त देखील या जागेची व्यावहारिक विक्रीची परवानगी देऊ शकत नाहीत.त्यामुळे हा व्यवहार बेकायदेशीरच होता .हे स्पष्ट झाल्यावर आणि जैन समाजच एकवटला हे पाहिल्यावर आता बिल्डर विशाल गोखले यांनी व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने या प्रकरणात गोलमाल झाल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. धर्मादाय आयुक्तांनी जागा विक्रीची दिलेली परवानगी कायदेशीर नसल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. त्यामुळे या आयुक्तांपासून जागा विकणारे आणि खरेदी करणारे असे तिघे आणि जागेचे खरेदीखत करणारे निबंधक देखील वादाच्या भोवऱ्यात सापडू शकणार आहेत .

रवींद्र धंगेकर यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे की, दोन दिवसांत जर हा व्यवहार पूर्णपणे रद्द झाला, तर मी स्वतः मुरलीधर मोहोळ यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जिलेबी भरवेन. त्यांनी पुढे सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला आश्वासन दिलं आहे की दोन दिवसांत या प्रकरणाचा तोडगा निघेल. त्यामुळे मी दोन दिवस काही बोलणार नाही. पण जर हा व्यवहार कायदेशीरदृष्ट्या रद्द झाला नाही, तर मी पुन्हा मैदानात उतरेन. धंगेकरांनी गोखले यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना म्हटलं, विशाल गोखले फार मोठा उद्योगपती नाही. तो एकेकाळी लहान बिल्डर होता. मात्र गेल्या दहा-बारा वर्षांत त्याची प्रचंड प्रगती झाली, आणि ती काही योगायोगाने झाली नाही.

या संपूर्ण प्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचाही उल्लेख धंगेकरांनी केला आहे. त्यांनी सांगितलं की, मी एकनाथ शिंदे साहेबांना शब्द दिला आहे की, दोन दिवस मी गप्प बसेन. ते माझे नेते आहेत आणि त्यांच्या सन्मानासाठी मी काही बोलणार नाही. पण चुकीचं घडत असेल तर मी शांत बसणार नाही. त्यांच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आणखी राजकीय रंग मिळाला आहे. धंगेकरांनी पुढे म्हटलं की, विशाल गोखले याने ई-मेल पाठवला असेल तरी मला अजून विश्वास बसत नाही. जोपर्यंत कायदेशीररीत्या हा व्यवहार रद्द होत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. हा व्यवहार ट्रस्टींनी केला होता आणि आता तेच लोक गायब झाले आहेत. त्यांना पकडून आणणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

दरम्यान, जैन धर्मीय समाजामध्ये या निर्णयाचे मिश्र प्रतिसाद उमटले आहेत. अनेकांनी विशाल गोखले यांच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे, कारण त्यांच्या म्हणण्यानुसार हा व्यवहार धार्मिक स्थळाशी संबंधित असल्याने तो श्रद्धा आणि भावनांवर घाव घालणारा होता. दुसरीकडे काही व्यावसायिक मंडळींनी हा निर्णय राजकीय दबावाखाली घेतल्याचं मत व्यक्त केलं आहे. आता धर्मदाय आयुक्तालय या प्रकरणाचा पुढील कायदेशीर तपास करणार आहे. दरम्यान, रवींद्र धंगेकर, मुरलीधर मोहोळ आणि विशाल गोखले या तिघांच्याही हालचालींवर सर्वांचं लक्ष केंद्रीत झालं आहे. दोन दिवसांच्या आत व्यवहार रद्द होतो का, की पुन्हा नव्या आरोप-प्रत्यारोपांचा फेऱ्याचा खेळ सुरू होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

श्री विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे छटपूजेचे भव्य आयोजन

अयोध्या येथील महंत श्री राजू दास महाराज मोशी येथील छटपूजा उत्सवात आशीर्वाद देणार – लालबाबू गुप्ता

पिंपरी, पुणे : गतवर्षी प्रमाणे या वर्षी देखील श्री विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या घाटावर शनिवार पासून छटपूजेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या श्री सूर्यषष्ठी महोत्सवाचा मुख्य कार्यक्रम सोमवारी, (दि.२७) सायंकाळी, पाच वाजता सुरू होणार आहे. यावेळी पारंपरिक पद्धतीने भव्य गंगा आरती करण्यात येणार आहे. अयोध्या येथील सिद्धपीठ हनुमान गढीचे महंत श्री श्री १००८ श्री राजूदास महाराज हे उपस्थित राहून शुभाशीर्वाद देणार आहेत. तसेच आमदार महेश लांडगे, विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री शंकर गायकर, आळंदी देवस्थानचे विश्वस्त निरंजन महाराज, हिंदू आघाडी संस्थापक मिलिंद एकबोटे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत, यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री विश्व श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष व आयोजक लालबाबू अंबिकालाल गुप्ता यांनी केले आहे.
कुटुंब आणि विश्वाच्या कल्याणासाठी तसेच पिक पाणी मुबलक यावे यासाठी
सूर्याला अर्ध्य देऊन त्याची उपासना आणि छट मातेची पूजा करून व्रत केले जाते. उत्तर भारतात आणि विशेषतः बिहार मध्ये मोठ्या भक्ती भावाने हे व्रत केले जाते. मागील अनेक वर्षांपासून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात देखील छटपूजा, श्री सूर्यषष्ठी महाव्रत मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
मोशी येथील इंद्रायणी नदीघाट येथे भोसरी, मोशी, पिंपरी नेहरू नगर, चिंचवड़, चिंबळी, कुरुळी, कोयाळी, चाकण, मोशी, जाधववाडी, चिखली, निघोजे, आकुर्डी, तळवडे, आळंदी कृष्णानगर आदी भागातून भक्त भाविक उपस्थित राहणार आहेत. यावेळी पारंपरिक पूजा करून भजन, छट लोकगीते सादर करण्यात येतील व महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.

सोमवारी, सायंकाळी, ६:०४ वाजता, सूर्यास्त वेळी हजारो भाविकांच्या साक्षीने वाराणसी येथून आलेल्या प्रतिनिधींच्या हस्ते भव्य गंगा आरती करण्यात येईल. या महोत्सवाचा समारोप मंगळवारी (दि.२८) सकाळी ६:३३ वाजता, सूर्योदय वेळी सूर्याला अर्ध्य देऊन होईल अशी माहिती लालबाबू गुप्ता यांनी प्रसिद्धीस दिली आहे.

सलमान खान दहशतवादी पाकचे नापाक फर्मान

प्रसिद्ध अभिनेता सलमान खानला त्यांच्या एका वक्तव्यामुळे पाकिस्तानने दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. काही दिवसापूर्वी सलमान खानने सौदी अरेबियामध्ये एका कार्यक्रमात बलूचिस्तानला वेगळा देश म्हटलं होतं.
या त्याच्या वक्तव्यावरुन शहबाज शरीफ यांच्या सरकारने एक अधिसूचना जारी करत सलमान खानला दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आलं. माहितीनुसार गृह मंत्रालयाने त्याचे नाव चौथ्या शेड्यूलमध्ये समाविष्ठ केलं आहे.

माहितीनुसार चौथ्या शेड्यूलमध्ये नाव असणं म्हणजे, त्या व्यक्तीच्या प्रत्येक हलचालीवर नजर ठेवली जाईल. परंतु याबाबत सलमान खान किंवा त्यांच्या प्रतिनिधीकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली गेली नाही. परंतु सध्या सोशल मीडियावर सलमान खानची मोठी चर्चा होताना पहायला मिळतेय.

काय म्हणाला सलमान खान?

सौदी अरेबियामध्ये एक कार्यक्रमात बोलताना सलमान खान म्हणाला की, ‘हे बलूचिस्तानचे लोक आहेत, अफगानिस्तानचे लोक आहेत, पाकिस्तानाचे लोक आहेत. प्रत्येक जण सौदी अरेबियामध्ये मेहनतीने काम करताना पहायला मिळतय.’ सलमानच्या या वक्तव्यावर पाकिस्तानला मिर्ची लागली. कारण गेल्या काही दिवसापासून बलूचिस्तानमध्ये पाकिस्तानातून वेगळं होण्यासाठी आंदोलन सुरु आहे. त्यामुळे त्यात सलमानने बलूचिस्तानला पाकिस्तानला वेगळं सांगितलं.

एका बाजूला पाकिस्तानने सलमान खानला दहशतवादी म्हणून घोषित केलय, तर दुसरीकडे बलूचिस्तानचे नेत्यांनी सलमान खानचे आभार मानलेत. हे सगळं असलं तरी सलमान खान अनावधानाने बोलून गेला की, त्याने हे मुद्दाम वक्तव्य केलंय, हे लवकरच स्पष्ट होईल. बलूचिस्तानमध्ये स्वातंत्र्यासाठी गेल्या काही दिवसापासून आंदोलन सुरु आहे.

बलूचिस्तानमध्ये गेल्या काही दिवसापासून स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू आहे. या ठिकाणी अनेकदा हिंसाचाराच्या घटना घडताना दिसतात. बलूचिस्तान हा पाकिस्तानच्या सुमारे ४६ टक्के भूभागावर पसरलेला आहे, परंतु येथेची लोकसंख्या केवळ सुमारे १.५ कोटी आहे.

बहुआयामी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य दुर्लक्षित : योगेश सोमण

पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना देवत्व देऊन केवळ देव्हाऱ्यात न बसविता त्यांच्या हिंदुत्वाच्या मांडणीचा अभ्यास होणे तसेच त्यांच्या कार्यातून प्रभावित होऊन ते समाजापुढे आणण्याचे कार्य व्यापक स्तरावर होणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे अभ्यासक योगेश सोमण यांनी केले. स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे दरवर्षी प्रकाशित होत असलेल्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून हे कार्य होत आहे, असे गौरवोद्‌गारही त्यांनी काढले.

स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिपुष्प २०२६चे प्रकाशन खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी योगेश सोमण बोलत होते. लोकमान्य टिळक यांचे वंशज, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष कुणाल टिळक, स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेचे संस्थापक श्रीनिवास कुलकर्णी, अतुल रेणाविकर, पुणे शहर अध्यक्ष विक्रम दिवाण, अश्विनी कुलकर्णी आदी मंचावर होते. लोकमान्य सभागृह, केसरी वाडा येथे आज (दि. २६) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

योगेश सोमण पुढे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अनेक अंगांनी बहरलेले होते.  त्यांचे कार्य उत्तुंग हिमालयासारखे आहे. अंदमानातील काळ्यापाण्याच्या शिक्षेव्यतिरिक्त एक क्रांतिकारक म्हणून त्यांनी निर्माण केलेला इतिहास दुर्लक्षित राहिला आहे. तो समाजापुढे मांडण्याची आज गरज आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर क्रांतिपुष्प २०२६ या दिनदर्शिकेच्या माध्यमातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याचा फक्त गौरव केलेला नसून त्यांच्या कार्याविषयीची सत्यता समाजापुढे मांडण्यात आली आहे.

केवळ शाब्दीक निष्ठा उपयोगाची नाही : प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी..

अध्यक्षपदावरून बोलताना प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याविषयी निष्ठा असणाऱ्या महनीय व्यक्तींचा परिचय या दिनदर्शिकेच्या माध्यमातून घडत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मांडलेल्या प्रमाणित मराठी भाषेच्या वापराचा धरलेला आग्रह महत्त्वाचा असून त्यातील बारकावे शोधले जाणे गरजेचे आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला असला तरी जागतिकिरणाच्या रेट्यात आज मराठी भाषेकडे दुर्लक्ष होत आहे, अशा वेळी प्रमाणित, लिखित मराठी भाषेचा आग्रह धरणे गरजेचे आहे. या करिता फक्त शाब्दिक निष्ठा उपयोगाची नाही तर कृतीतून कार्यात सहभाग असणे अपेक्षित आहे.

कुणाल टिळक म्हणाले, मराठी भाषेविषयी जवळीक आणि जपणूक मान्य असली तरी येणाऱ्या पिढीला सावरकर, टिळक आदींचे हिंदुत्ववादी विचार पोहोचविताना त्यांचे कार्य सर्व भाषांमधून, सोप्या मांडणीद्वारे समाजापुढे जाणे आवश्यक आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर दिनदर्शिका विविध भाषांमध्ये यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रविण तरडे यांचा शुभेच्छा संदेश ऐकविण्यात आला.

श्रीनिवास कुलकर्णी म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार घरोघरी पोहोचवावेत आणि रुजवावेत या संकल्पनेतून दिनदर्शिकेची दरवर्षी निर्मिती करण्यात येत आहे. सावरकर आणि त्यांच्या कुटुंबाने स्वातंत्र्य चळवळीत केलेले कार्य करोडो भारतीयांपर्यंत पाहोचवावेत असा मानस आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कार्याला निष्ठेने वाहून घेणाऱ्या महनीय व्यक्तींविषयी क्रांतिपुष्प दिनदर्शिका २०२६ यातून माहिती देण्यात आली आहे.

दीपप्रज्वलन, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर रचलेली आरती आणि शंखनादाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

संस्थेचे महाराष्ट्र राज्य समन्वयक सागर बर्वे यांनी संस्थेच्या कार्याविषयी माहिती दिली. तर मान्यवरांचा परिचय समाजमाध्यम प्रमुख सौरभ दुराफे यांनी करून दिला. स्वागत सतिश काळे,अजित कुलकर्णी, अतुल रेणावीकर, निशिगंधा आठल्ये, अश्विनी कुलकर्णी, नेहा गाडगीळ, विदुला कुलकर्णी यांनी केले. सोलापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील 60 कुटुंबीयांना महिनाभर पुरेल एवढा किराणा व जीवनावश्यक वस्तू गिरीश कुलकर्णी यांच्या पुढाकाराने संस्थेतर्फे पुरवण्यात आल्या. या कार्याकरिता त्यांचा सत्कार करण्यात आला.

तनुश्री सोहनी यांची पुणे शहर महिला आघाडी संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. आभार विक्रम दिवाण यांनी मानले.

जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा व्यवहार रद्द करण्याचा गोखले बिल्डरचा निर्णय:राजू शेट्टींची माहिती

पुणे –
जैन बोर्डींग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय विशाल गोखले यांनी घेतला आहे.अशी माहिती शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी येथे रात्री उशिरा सोशल मिडिया मधून दिली . या ⁠जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय गोखले यांनी ईमेल वरुन ट्र्स्टला कळवला असल्याची माहिती आहे. या ⁠व्यवहारातून बाहेर पडण्याचा गोखले यांनी निर्णय घेतला आहे. हा निर्णय घेताना ⁠नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं गोखले याचं ईमेल मध्ये म्हणणं आहे. याशिवाय ⁠जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या, असंही विशाल गोखले यांनी म्हटलं आहे.

⁠राजू शेट्टी यांच्या आज संध्याकाळी केलेल्या आवाहानानंतर गोखले यांच्याकडून जैन बोर्डिंग ट्रस्ट सोबत झालेला व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ⁠व्यवहार रद्द करण्याच्या निर्णयाची माहीती राजू शेट्टी यांना कळवली गेली असल्याची माहिती आहे. दरम्यान, गोखले बिल्डर जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्यासंदर्भात अर्ज देण्याची शक्यता आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज दुपारी 86 हून अधिक जैन संस्था, संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीत जैन बोर्डिंग विकण्याचा निर्णय ट्रस्टींनी घेतला तो बेकायदेशीर आहे. पुणे हे विद्येचं माहेरघर असताना 60 वर्षांहून अधिक वर्ष सुरु असलेल्या वसतिगृहाची जागा विकणं ही लाजिरवाणी बाब आहे. हा व्यवहार ट्रस्टींनी रद्द करावा,अशी विनंती ट्रस्टींना करण्याचं त्याचबरोबर ही प्रॉपर्टी खरेदी केलेली आहे त्या गोखले बिल्डर यांना विनंती करण्याचा ठराव झाला, असं राजू शेट्टी म्हणाले. गोखले बिल्डरला केलेल्या विनंतीनुसार त्यांनी जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करण्याचा मेल केलेला आहे. जोपर्यंत हा विक्री व्यवहार रद्द होत नाही, या मालमत्तेवर गोखले बिल्डरचं नाव चढलेलं आहे ते काढून जैन बोर्डिंगचं नाव लागत नाही तोपर्यंत लढा संपणार नाही, असं राजू शेट्टी म्हणाले. व्यवहार पूर्णपणे रद्दबातल झाला पाहिजे, सरकारनं पुढाकार घ्यावा, असं राजू शेट्टी म्हणाले.

पुण्यात मोक्याच्या जागी असणाऱ्या जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गदारोळ सुरु होता. ही जागा गोखले बिल्डर्सने विकत घेतली होती.गोखले बिल्डर्स आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांचे आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) केला होता. रवींद्र धंगेकर यांनी हे प्रकरण लावून धरले होते. अखेर रविवारी रात्री विशाल गोखले (Vishal Gokhale) यांनी जैन बोर्डिंग हाऊसला ई-मेल पाठवून जागेचा व्यवहार रद्द झाल्याचे सांगितले. यानंतर रवींद्र धंगेकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. (Jain Boarding House Land)

पुढील दोन दिवस मी मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल काही बोलणार नाही. येत्या दोन दिवसांत जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेचा व्यवहार रद्द करावा. एकनाथ शिंदे यांनी मला सांगितले की, दोन दिवसांत तोडगा निघेल. त्यामुळे मी आज आनंदी आहे. चंद्रकांत पाटील हे आज अमित शाह यांचा निरोप घेऊन मुरलीधर मोहोळ यांच्याकडे आले होते. त्यामुळे आता दोन दिवसांत जैन बोर्डिंगचा पूर्ण व्यवहार रद्द झाल्यावर मी मुरलीधर मोहोळ यांच्यासह सगळ्यांना जिलेबी भरवेन, असे रवींद्र धंगेकर यांनी सांगितले.

हा गतीमान आणि बोगस व्यवहार झाला, त्याची चर्चा संपूर्ण देशात झाली. विशाल गोखले यांनी ई-मेल पाठवला असेल तरी मला अद्याप विश्वास नाही. जोपर्यंत हा व्यवहार रद्द होत नाही, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. आता ट्रस्टीच पळून गेले तर त्यांना कुठून पकडून आणणार. ट्रस्टींनी हा व्यवहार केला होता. खऱ्या अर्थाने विशाल गोखले खूप पैसेवाला नाही. तो पूर्वी लहान होता. पण 10-12 वर्षांत मुरलीधर मोहोळ पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाले तेव्हापासून विशाल गोखले यांची संपत्ती वाढत गेली. पण मला या विषयावर बोलायचं नाही. कारण मला शिंदे साहेबांनी सांगितले आहे की, यावर बोलायचं नाही. विशाल गोखले हा दिलेल्या भाकरीचा आणि सांगितलेल्या कामाचा आहे. विशाल गोखले खूप मोठा माणूस नाही. त्याला व्यवहार कोणी करायला सांगितला आणि नंतर कोणी काढायला लावलं यावर आपल्यलाा बोलायचे नाही. पण दोन दिवसांत हा व्यवहार कायदेशीरदृष्ट्या संपला पाहिजे. मी आता रात्रीही हा व्यवहार करणाऱ्या रजिस्ट्रारला आणू शकतो. तो कुठे राहतो, मला माहिती आहे. दोन दिवस मी गप्प बसेन हा शब्द मी एकनाथ शिंदे साहेबांना दिला आहे. ते माझे नेते आहेत. त्यांच्या मानसन्मान ठेवणं माझं काम आहे. पण मी त्यांच्याकडून शब्द घेतला आहे की, मी चुकीचं वागणार नाही. पण चुकीचं घडत असेल तर मी बोलणार, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.

जैन बोर्डिंग जागा बळकावण्याच्या प्रकाराची देशभर जैन समाज दखल घेईल:आचार्य गुप्तीनंद महाराज

पुणे : शहरातील मॉडेल कॉलनी येथील जैन समाजाच्या जमीन व्यवहार प्रकरणी आज जैन बोर्डिंग या ठिकाणी असंख्य जैन संघटनांची बैठक झाली. त्या बैठकीनंतर आचार्य गुप्तीनंद महाराज म्हणाले, “एखादी जमीन समाजाला दान केल्यानंतर किंवा एखाद्या समाजासाठी आरक्षित असलेली जमीन ती कोणालाही विकण्याचा अधिकार नाही. पण पुण्यात जैन समाजाची जमीन विकण्याची घटना घडली असून, ट्रस्टींनी चुकीच्या पद्धतीने कारभार केला आहे.

त्यामुळे यापुढील काळात देशभरात कुठेही जैन समाजाच्या जमिनीच्या विक्रीचा व्यवहार होता कामा नये. याबाबत सरकारने कडक पाऊल उचलावे, जैन समाजाच्या बोर्डिंग जमिनीच्या विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात यावा,” या मागणीसाठी उद्या देशभरात मूक मोर्चा काढला जाणार आहे.
२८ तारखेला सुनावणी असल्याने, त्यावेळी पूजा केली जाईल. तसेच २९ तारखेला एक दिवसीय उपवास केला जाणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जमीन विक्रीचा व्यवहार रद्द करावा, अन्यथा १ नोव्हेंबरपासून उपोषण सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच ते पुढे म्हणाले, “काल जैन बोर्डिंगच्या ठिकाणी मुरलीधर मोहोळ आले होते. त्यावेळी आमच्या मंदिरात येऊन, समाजासमोर त्यांनी सांगितले की, ‘मी आपल्या समाजासोबत आहे आणि जमीन व्यवहार प्रकरण १०० टक्के रद्द केले जाईल,’ असा शब्द मोहोळ यांनी देवासमोर दिला आहे. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. पण त्यांनी विश्वास तोडला नाही पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे.”

तसेच ते पुढे म्हणाले, “जैन समाजाच्या जमीन व्यवहार प्रकरण समोर येताच, या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सर्वात प्रथम दखल घेऊन या ठिकाणी भेट द्यायला यायला पाहिजे होते. मात्र ते काही अद्यापपर्यंत आलेले नाहीत, हे अत्यंत खेददायक आहे. तसेच मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील आवाहन केले होते. पण त्यांनी ॲक्शन घेतल्याने आठ दिवसांचा ‘स्टे’ (स्थगिती) आल्याचे त्यांनी सांगितले.”

मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना

मुंबई, दि. २६:  राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम किनारपट्टीवर २५ ते २९ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे वाऱ्याचा वेग ३५ ते ४५ किमी प्रतितास राहील. काही ठिकाणी तो ५५ किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दलाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे.

समुद्रामध्ये असलेल्या सर्व मासेमारी नौकांनी तात्काळ सुरक्षितपणे बंदरात परत यावे तसेच स्थानिक बंदर अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.