Home Blog Page 333

धनकवडीत दोन गटात मारामारी ; तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन केला खुनाचा प्रयत्न

पुणे-धनकवडीत दोन गटात एकमेकांकडे पाहण्यावरुन जोरदार धुमचक्री उडाली असून त्यात एका गटाने तरुणाच्या डोक्यात हत्याराने वार करुन जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. त्याविरोधात दिलेल्या फिर्यादीत चौघांवर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अविनाश महादेव घोडके (वय ३९, रा. ठाकर गिरणीसमोर, शंकर महाराज वसाहत, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी विकी बाळासो कांबळे (वय २५,रा. शंकर महाराज वसाहत, धनकवडी) याला अटक केली आहे. विशाल बाळासो कांबळे (वय २७) याच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना धनकवडी येथील ठाकर गिरणीसमोर २४ ऑक्टोंबर रोजी रात्री ९ वाजता घडली.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीचे नातेवाईक अभिषेक नरसिंगे यांचे विकी कांबळे याच्याशी शाब्दिक बाचाबाची होत असल्याचे अविनाश घोडके यांना दिसले. त्यांनी विकी कांबळे याला याबाबत विचारले असता, त्याने घोडके यांना तुला बघुन घेतो, अशी धमकी दिली. घरी जाऊन भाऊ विशाल याला घेऊन आला. विकी याने हातातील कोयत्याने घोडके यांच्या डोक्यात, डाव्या कानावर वार केले. विशाल याने पायाच्या नडघीवर वार करुन त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. सहायक पोलीस निरीक्षक रुपेश जाधव तपास करीत आहेत.

त्याविरोधात विकास ऊर्फ विकी बाळासो कांबळे याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी अविनाश महादेव घोडके (वय ३९), ओमकार दीपक घोडके (वय २१), अविनाश घोडके यांची मेव्हणी (वय ३५) व मेव्हणीचा मुलगा अशा चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. अविनाश घोडके यांच्या मेव्हणीचा मुलगा हा विकी कांबळेकडे रागाने पहात असल्याने त्यास रागात पाहण्याचे कारण विचारले. तेव्हा अविनाश घोडके याने विकीला शिवीगाळ करुन धमकी दिली. डोक्यात, कपाळावर लोखंडी प्लेटने मारुन जखमी केले. ओमकार घोडके याने पाठीत दांडक्याने मारहाण करुन जखमी केले. पोलीस हवालदार धोत्रे तपास करीत आहेत.

पुढच्या दीड वर्षात चित्रपट इंडस्ट्री संपेल:महेश मांजरेकर यांचे AI बाबत भयावह भाकीत

बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे चित्रपटसृष्टीचे अस्तित्वच धोक्यात येईल, असे भाकीत केले आहे. पुढच्या दीड वर्षांत सिनेमा पूर्णपणे बंद होईल, कारण AI जे व्हिज्युअल्स तयार करतं, ते कॅमेऱ्याद्वारे निर्माण करणे अशक्य असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे पुन्हा सगळ्यांनी नाटकांकडे वळले पाहिजे, असेही ते म्हणाले.सध्या बऱ्याच क्षेत्रात एआयचा वापर वाढला आहे. केवळ एका प्रॉम्प्टवर अवघड काम सोपे होते. अनेक क्षेत्रांत एआयमुळे अनेकांचे रोजगार जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अशातच आता चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांनी एआयच्या संदर्भाने चित्रपटसृष्टीविषयी भयावह भाकित केले आहे. ते एबीपी माझाच्या एका कार्यक्रमात बोलत होते.

महेश मांजरेकर म्हणाले, “AI ने एवढं टेकओव्हर केलंय की आता मानवी सर्जनशीलतेची गरजच उरणार नाही. माझं मत आहे, दीड वर्षानंतर सिनेमा बंद होईल — बंद म्हणजे बंदच! तुम्ही कितीही चांगले VFX केले, तरी AI तयार करत असलेली दृश्यं कॅमेऱ्यावर देणं अशक्य आहे. मी घरबसल्या बसून ‘टायटॅनिक’मधली लायटिंग, लिओनार्डो डिकॅप्रियोपेक्षा चारपट सुंदर हिरो तयार करून सिनेमा बनवू शकतो. म्हणजे, आता घरी बसूनच चित्रपट निर्मिती शक्य झाली आहे.”

महेश मांजरेकरांनी एआयने तयार केलेल्या ‘महाभारत’च्या ट्रेलरचाही उल्लेख केला. “तो ट्रेलर अक्षरशः डोळे दिपवणारा आहे. जर हे सर्व एका क्लिकवर होऊ शकत असेल, तर लोक कलाकारांवर पैसे का खर्च करतील? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. मात्र, AI वापरण्यासाठीही हुशारीची गरज लागेल, असेही त्यांनी नमूद केले. पण मी सहा महिन्यांपूर्वी पाहिलेला AI आणि आजचा AI यात जमीन-अस्मानाचा फरक आहे,” असे ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, ज्या दिवशी AI ला सिनेमा बनवण्याचा कोड मिळेल, त्या दिवशी आपण संपणार! कारण रोज दहा हजार सिनेमे तयार होतील आणि त्यासाठी जवळपास काहीच खर्च लागणार नाही. माझ्या एका मित्राने एआयच्या मदतीने अॅड फिल्म केली आणि त्याला खर्च आला फक्त दोन हजार रुपये.

लोक एआयच्या मदतीने मोठ्या प्रमाणात सिनेमे तयार करतील, पण ते बघणार कोण? त्यामुळे येत्या दीड वर्षांत सिनेमे बंद होणार, हे मला नक्की दिसतंय. म्हणून आता सगळ्यांनी गुपचूप नाटकांकडे वळले पाहिजे. कारण येत्या दीड वर्षांत सिनेमा संपणार हे माझे भाकीत आहे.

‘जमतारा 2’ तील अभिनेता सचिन चांदवडेची आत्महत्या

पुणे-नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय मालिका “जामतारा – सबका नंबर आयेगा सीझन २” मध्ये दिसलेला २५ वर्षीय मराठी अभिनेता सचिन चांदवडे याने आत्महत्या केली आहे. २३ ऑक्टोबर रोजी दुपारी त्याचा मृतदेह पुण्यातील त्याच्या अपार्टमेंटमध्ये छताच्या पंख्याला लटकलेला आढळला.

जेव्हा कुटुंबाने दरवाजा तोडला, तेव्हा आतील दृश्य भयानक होते. त्यांनी ताबडतोब सचिनला खाली आणले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याची प्रकृती सतत खालावत गेली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्याला त्या रात्री धुळे येथे हलवण्यात आले, परंतु तेथेही तो जीवनाची लढाई हरला. २४ ऑक्टोबरच्या रात्री सचिनचे कायमचे निधन झाले.चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्री या घटनेवर शोक व्यक्त करत आहे. सचिन चांदवडे यांनी मराठी रंगभूमी आणि लघुपटांमध्ये स्वतःचे नाव कमावले होते. नेटफ्लिक्सच्या “जामतारा २” मधील त्यांची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच भावली. त्यांनी अलीकडेच काही ओटीटी प्रोजेक्ट्सचे शूटिंग पूर्ण केले होते आणि सोशल मीडियावर सक्रिय राहिले होते, त्यांनी अनेक प्रेरणादायी पोस्ट शेअर केल्या होत्या.

कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सचिन गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावात होता. तथापि, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. वृत्तानुसार, त्याच्या खोलीतून कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहे. पुणे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि प्राथमिक अहवालात ही आत्महत्या असल्याचे दिसून येत आहे.

जैन बोर्डिंग व्यवहारातील 230 कोटी रुपये जप्त करा , ट्रस्टींना बरखास्त करा; रविंद्र धंगेकरांची मागणी

पुणे- जैन बोर्डिंगची जागा विकत घेणाऱ्या गोखले बिल्डर्सने या व्यवहारातून माघार घेतली आहे. विशाल गोखले (Vishal Gokhale) यांनी रविवारी जैन बोर्डिंग हाऊसचे (Jain Boarding House) अध्यक्ष आणि विश्वस्त मंडळाला यासंदर्भात ई-मेल पाठवला होता. पुण्याच्या जैन बोर्डिंगच्या जागेचा व्यवहार आपण रद्द करत आहोत आणि आपले 230 कोटी परत मिळावेत, असा ई मेल विशाल गोखले यांनी केला आहे. आता . शिवसेना शिंदे गटाचे नेते रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी आज एक्सवर ट्विट करत 230 कोटी रुपये जप्त करून सामाजिक कामासाठी वापरावेत अशी मागणी केली आहे.पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जमीन खरेदी करताना कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता केलेल्या व्यवहाराबद्दल व अशाप्रकारे जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा बसविण्यासाठी 230 कोटी रुपयांची रक्कम जप्त करत ती ट्रस्टच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी, असंही रविंद्र धंगेकरांनी म्हटलं आहे.

रविंद्र धंगेकर नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रश्न ट्रस्टच्या जागेच्या व्यवहारातून माघार घेणाऱ्या गोखले बिल्डरने जो करार या जागेच्या विक्रीच्या दरम्यान केला होता त्या करारात असे नमूद आहे की, जर बिल्डरच्या बाजूने बॅक आउट झाले तर संबंधित रक्कम परत देण्यात येणार नाही. आता जैन बोर्डिंग ट्रस्टच्या विक्रीमध्ये जी 230 कोटी रुपयांची रक्कम बिल्डर करून ट्रस्ट ला मिळालेली आहे, ती रक्कम गोठविण्यात यावी. पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टची जमीन खरेदी करताना कुठल्याही कागदपत्रांची पडताळणी न करता केलेल्या व्यवहाराबद्दल व अशाप्रकारे जमीन चोरी करणाऱ्या टोळीला धडा बसविण्यासाठी 230 कोटी रुपयांची रक्कम जप्त करत ती ट्रस्टच्या कल्याणासाठी वापरण्यात यावी. तसेच अशा प्रकारचे गैर व्यवहार करणाऱ्या संबंधित ट्रस्टच्या सर्व ट्रस्टींना बरखास्त करत शासनाने यावर प्रशासक नियुक्त करावा. या पुढील काळात ट्रस्ट चालविण्यासाठी जैन समाजातील चांगल्या सामाजिक कार्य करणाऱ्या मंडळींची या ट्रस्टवर निवड करण्यात यावी. यात काही न्यायमूर्ती तसेच आय.ए.एस अधिकाऱ्यांची देखील निवड करण्यात यावी. यात अजून एक पळवाट अशी आहे की, चॅरिटी कमिशनरकडे आज याबाबत सुनावणी होणार आहे,यावेळी त्यांनी पुन्हा पहिल्यासारखं राजकीय दबावात काम करत वेगळा निकाल दिला तर ही 230 कोटी रुपयांची रक्कम पुन्हा एकदा बिल्डरला देण्याचा घाट घातला जाईल, असा माझा अंदाज आहे. हे 230 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम आहे की यात पुण्यात शिकणाऱ्या तमाम विद्यार्थ्यांसाठी दहा हजार मुला मुलींची रहिवासी क्षमता असलेले असलेले चांगले वस्तीगृह होऊ शकते, असं रविंद्र धंगेकर म्हणाले.

‘जैन बोर्डिंग’चा घटनाक्रम- (Jain Boarding House)
15 मे 2025- ट्रस्टी आणि गोखले कंपनीत विक्री करारनामा दस्त नोंदणी

23 जुलै 2025- ट्रस्टकडून बांधकाम आराखडा परवानगीसाठी पालिकेकडे प्रस्ताव दाखल

8 सप्टेंबर 2025- ट्रस्ट जमिनीवर निवासी आणि व्यापारी बांधकामास परवानगी, मनपाकडून आराखडा मंजूर

6 ऑक्टोबर 2025- बुलडाणा अर्बन को.ऑप.क्रेडिट सोसायटीकडून कर्ज प्रस्तावास मंजुरी

7 ऑक्टोबर 2025- श्री बीरेश्वर को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी कडून कर्ज प्रस्तावास मंजूरी

8 ऑक्टोबर 2025- ट्रस्टी आणि गोखले कंपनीत जागा विक्री खरेदीखत दस्त नोंदणी

8 ऑक्टोबर 2025- खरेदी खतात 230 कोटींच्या मोबदल्याचा उल्लेख, पण बाजारभाव 311 कोटी, 81 कोटींनी कमी दाखवला

8 ऑक्टोबर 2025- गोखले कंपनी आणि बुलडाणा अर्बन (20 कोटी) व श्री बीरेश्वर को ऑपरेटिव्ह (50 कोटी) यांच्यात गहाणखत दस्त

20 ऑक्टोबर 2025- धर्मादाय आयुक्तांकडून खरेदी-विक्रीला प्रकरणात जैसे थे ठेवण्याचे आदेश

24 ऑक्टोबर 2025- गोखले कंपनी आणि बुलडाणा अर्बन व श्री बीरेश्वर को ऑपरेटिव्ह यांच्यात कर्ज परतफेड दस्त

27 ऑक्टोबर 2025- गोखले कंपनीची ट्रस्टींना ईमेल करुन व्यवहारातून माघार

28 ऑक्टोबर 2025- धर्मादाय आयुक्तांसमोर आज पुन्हा सुनावणी

पाळीव कुत्री चावल्याने कुत्री पाळणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

भटकी कुत्री चावली तर महापालिकेच्या आरोग्यप्रमुखांवर गुन्हा दाखल होऊ शकेल..

पुणे:शिवाजीनगर गावठाण परिसरातील समग्र युवक क्रांती मंडळाजवळ एका तरुणाला ‘पीटबुल’ जातीच्या श्वानाने चावा घेतला. श्वानाने तरुणाच्या पोटरीचा चावा घेतल्याने त्याला गंभीर जखम झाली. या घटनेनंतर तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, श्वान मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादीनुसार, श्वान मालकाने आक्रमक स्वभावाच्या ‘पीटबुल’ श्वानाला साखळी न बांधता रस्त्यावर मोकळे सोडले होते. पोलीस उपनिरीक्षक जगताप या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

दुसरी घटना खडकीतील रेंजहिल्स भागात घडली. किरकोळ वादातून एका श्वान मालकाने त्याचे पाळीव श्वान एका तरुणाच्या अंगावर सोडले. या श्वानाने चावा घेतल्याने तरुण जखमी झाला. याबाबत तरुणाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्याच्या पाळीव श्वानासह थांबला असताना त्याने तक्रारदार तरुणाच्या गाडीच्या दिशेने दगड भिरकावला. तक्रारदार खाली उतरून विचारणा करत असताना आरोपीने श्वान त्यांच्या अंगावर सोडले. पोलीस उपनिरीक्षक एन. शेख या घटनेचा तपास करत आहेत.

हिंदू राष्ट्र होण्यासाठी समर्पण भावनेने योगदान द्या – महंत श्री राजुदास महाराज

छट मातेचे व्रत आस्था, विश्वास, त्यागाचे प्रतीक – महंत श्री राजुदास महाराज

श्री विश्व श्रीराम सेनेच्या वतीने मोशी येथे छट पूजेचे भव्य आयोजन

पुणे, (दि. २७ ऑक्टोबर २०२५) छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याने, विश्वाला शांती आणि संयमाचा मार्ग दाखवणारे ज्ञानेश्वर माऊली, वृक्षवल्ली आम्हा सोयरे असा संदेश देणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र इंद्रायणी मातेच्या तीरावर सर्वांनी संकल्प करावा की, सर्वांना सामावून घेणारा एकमेव धर्म म्हणजे सनातन धर्म आहे. याची पताका जगात उंचावण्यासाठी आणि भारत देश हिंदू राष्ट्र होण्यासाठी सर्वांनी समर्पण भावनेने योगदान द्यावे असे आवाहन अयोध्या येथील सिद्धपीठ हनुमान गढीचे महंत श्री श्री १००८ श्री राजुदास महाराज यांनी केले.
उत्तर भारतात आणि विशेषतः बिहार मध्ये सूर्याची उपासना करून छटपुजेचे व्रत मोठ्या भक्तीभावाने केले जाते. सर्व मनोकामना पूर्ण करणारे हे व्रत आस्था, प्रेम, विश्वास, त्याग आणि पर्यावरण प्रति समर्पणाची भावना आहे अशी सनातन काळापासूनची धारणा आहे असेही महंत श्री राजुदास महाराज यांनी सांगितले.
गतवर्षी प्रमाणे या वर्षी देखील श्री विश्व श्रीराम सेनेच्या वतीने संस्थापक डॉ. लालबाबू अंबिकालाल गुप्ता यांच्या वतीने मोशी येथे इंद्रायणी नदीच्या घाटावर सोमवारी छटपूजा श्री सूर्यषष्ठी महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पारंपरिक पद्धतीने महंत श्री राजुदास महाराज यांच्या हस्ते इंद्रायणी मातेचे पूजन करण्यात आले. यानंतर गंगा आरती करण्यात आली.
यावेळी आमदार महेश लांडगे, विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री शंकर गायकर, माजी महापौर राहुल जाधव, आयोजक डॉ. लालबाबू अंबिकालाल गुप्ता, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग साने, सुधीर काळजे, निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे, विकास पाटील, प्रमोद गुप्ता, श्याम गुप्ता, दीपक चव्हाण, विजय पाटील, संदीप साकोरे व छटपूजा निमित्त आलेले भक्त भाविक उपस्थित होते.
यावेळी आमदार महेश लांडगे म्हणाले की, छट माता तुमच्या सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो, अशी मी प्रार्थना करतो आणि सर्व हिंदू भगिनींचे रक्षण करण्यासाठी छट मातेने मला शक्ती द्यावी असे आशीर्वाद मागतो.
विश्व हिंदू परिषदेचे सहमंत्री शंकर गायकर म्हणाले की, या सूर्यषष्ठी महोत्सवात छट मातेचे व्रत केले जाते. निसर्गात आणि समाजात एकरूपता यावी. सर्वांचे कल्याण व्हावे, पिक पाणी मुबलक यावे, यासाठी सूर्याला अर्ध्य देऊन त्याची उपासना केली जाते. सनातन धर्मात नदीला मातेचा दर्जा आहे. या महोत्सवात मातेचे पूजन करून पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश जगभर दिला जातो.
स्वागत,प्रास्ताविक करताना श्री विश्व श्रीराम सेनेचे संस्थापक अध्यक्ष व आयोजक लालबाबू अंबिकालाल गुप्ता यांनी सांगितले की, महंत श्री राजुदास महाराज हे प्रभू श्री रामाची जन्मभूमी अयोध्या येथून प्रभू श्री रामाचे दूत म्हणून आशीर्वाद देण्यासाठी प्रथमच पुण्यनगरीत आले आहेत. त्यांनी भारत देश अखंड हिंदुराष्ट्र व्हावे असा केलेला संकल्प पूर्ण होण्यासाठी श्री विश्व श्रीराम सेना कायम त्यांच्या सोबत राहील. मोशी येथील इंद्रायणी नदीघाट येथे भोसरी, मोशी, पिंपरी नेहरू नगर, चिंचवड़, चिंबळी, कुरुळी, कोयाळी, चाकण, मोशी, जाधववाडी, चिखली, निघोजे, आकुर्डी, तळवडे, आळंदी कृष्णानगर आदी भागातून भक्त भाविक उपस्थित होते. यावेळी पारंपरिक पूजा करून भजन, छट लोकगीते सादर करण्यात आली व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.


पुण्याचे पालकमंत्री असूनही अजित पवारांच्या दुर्लक्षाची जैन समाज दखल घेईल ?

पुणे- पुण्यात बड्या बड्या बिल्डरांकडून जैन समाजाच्या धर्मादाय संस्थेची जी जागा विकत येत नाही , विकत कोणाला घेता येत नाही , आणि ज्या जागेचा व्यावहारिक विक्रीसाठीचे खरेदी खत देखील होऊ शकत नाही अशा मोडेल कॉलनीतील साडेतीन एकराच्या भूखंडाचा बेकायदेशीर व्यवहार झाला आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या , कधीकाळी कलमाडींच्या नेतृत्वाची जागा घ्यायला निघालेल्या सध्या उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी कळवूनही सरार्स याकडे दुर्लक्ष केल्याने जैन समाज याबाबत असमंजस भावनेत आहे . या पार्श्वभूमीवर आज जैन समाजाचे आचार्य गुप्ती नांदी महाराज यांनी देखील पत्रकार परिषदेतून नाराजीही व्यक्त केली आहे.

काय म्हणाले जैन मुनी:आमची लढाई कोणत्‍याही पक्षाशी नव्‍हे, तर भ्रष्टाचाराशी आहे, असे स्पष्ट करत जैन मुनींनी ट्रस्‍टींना सुनावले.जैन बोर्डिंगचा जमीन व्यवहार रद्द झाला. हा समाजाचा मोठा विजय आहे, असे सांगून जैन मुनींनी पुढची दिशा काय असणार आहे, याविषयी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका मांडली.बांधकाम व्‍यावसायिक विशाल गोखले आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मैत्री काय असते हे त्यांनी दाखवून दिले आहे. हा करोडोचा व्यवहार होता. मात्र, मैत्रीसाठी करोडोंचा व्यवहार त्यांनी तोडून टाकला. त्यामुळे मैत्रीची नवी परिभाषा त्यांनी कायम केली असून अशी दोस्ती सर्वांची असली पाहिजे, असेही जैनमुनी आचार्य गुप्तीनंद महाराज यांनी सांगितले. या सर्व प्रकारास ट्रस्‍टचे काही पदाधिकारी जबाबदार असून, त्‍यांच्‍यामुळेच हा सर्व प्रकार घडला आहे.तसेच, हा व्‍यवहार पूर्णपणे रद्द होत नाही, तोपर्यत येत्‍या १ तारखेपासून होणारे उपोषण सुरुच राहणार असल्‍याचे ते म्‍हणाले.उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार अद्याप या प्रकरणामध्ये काही बोललेले नाहीत. याठिकाणी आलेले नाहीत, हे अत्यंत चुकीचे आहे. १७ ऑक्टोबरला काढलेल्या मोर्चापूर्वीच आम्ही पालकमंत्री अजित पवार यांना आमचं म्हणणे पाठवले होते. मात्र त्यांच्यापर्यंत हे सर्व पोहचून देखील ते का आले नाहीत, याबाबत आम्हाला काही कल्पना नाही. या प्रकरणामध्ये अजित पवार यांनी शब्द देखील काढलेला नाही. ते समाजासोबत उभे राहावी, अशी अपेक्षाही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

दरम्यान अजित पवार यांच्या पक्षात असंख्य बिल्डर असून त्यांच्याबाबत देखील जनतेच्या असंख्य तक्रारी असतात . आणि हेच बिल्डर निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांच्या जनसंपर्क अभियानाची सूत्रे आपल्या हातही ठेऊन असतात या बाबींचा मोठा फटका अजित पवार यांच्या पक्षाला आगामी महापालिका निवडणुकीत बसेल असा अंदाज वर्तविला जातो आहे. रवींद्र धंगेकर यांच्या मुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आता या राजकीय स्पर्धेत पुढे येऊ पाहते आहे तर भाजपने महापालिकेच्या कारभारात तेच तेच नेते रिपीट करून आणि मुंबई दिल्लीच्या राजकारणात देखील त्याच चेहऱ्यांना संधी दिली त्यांच्या भेदभावी कारभारावर भाजपच्या १०० नगरसेवकांच्या गोटातील मोठी संख्या नाराज आहे त्याचाही फटका भाजपला बसू शकणार आहे.

अशा स्थितीत आता जैन समाजाच्या जागेबाबत , मंदिर आणि बोर्डिंग बाबत चुप्पी साधून अजित पवार गटानेही नाराजी ओढवून घेतली आहे. कॉंग्रेसचे अरविंद शिंदे , शिवसेनेचे संजय मोरे हे या विषयामुळे जैन समाजाच्या संपर्कात राहिल्याचे दिसून आले आहे.

सुमारे एक ट्रिलियन डॉलर्स मूल्याच्या भारतातील सागरी क्षेत्रामध्‍ये गुंतवणूकीच्या विशाल संधी : नितीन गडकरी

0

मुंबई, 27 ऑक्टोबर 2025

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत आयोजित ‘इंडिया मेरीटाईम वीक 2025’ मध्ये “जहाज क्षेत्रामध्‍ये वित्तपुरवठा करण्यासाठी नाविन्यपूर्ण यंत्रणा” या विषयावर संबोधित केले.  

याप्रसंगी केंद्रीय मंत्री गडकरी यांनी अधोरेखित केले की, सुमारे एक ट्रिलियन डॉलर्स मूल्याच्या (84 लाख कोटी रु) भारतातील सागरी क्षेत्रामध्‍ये बंदरे, जहाज वाहतूक आणि लॉजीस्टीक  यामध्ये प्रचंड गुंतवणूक क्षमता आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, टोल ऑपरेट ट्रान्स्फर,खाजगी आणि सार्वजनिक भागीदारीतून म्हणजेच ‘पीपीपी’ मॉडेल्सद्वारे 1.4 लाख कोटी रुपये उभारण्यात यश मिळवले आहे. यामध्‍ये  खाजगी सहभाग 10 % वरून 35% पर्यंत वाढवला आहे असेही मंत्री गडकरी यांनी सांगितले. असा दृष्टीकोन    प्रकल्प अंमलबजावणीला गती देऊ शकतात, तसेच  गुणवत्ता सुधारणे शक्य होते, असे सांगून मंत्री गडकरी म्हणाले, खाजगी क्षेत्रातील नवोपक्रम आणि कार्यक्षम निधी ओघाद्वारे  सरकारवरील आर्थिक भार कमी केला जावू  शकतो. त्यांनी “एकात्म  महासागर, एक सागरी दृष्टीकोन : भारताचे सागरी झेप  ” या शीर्षकांतर्गत तयार करण्‍यात आलेला सीएमईजी (आरआयएस) – ‘इंडिया मेरीटाइम रिपोर्ट 2025-26’ जारी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनातून तयार करण्‍यात आलेला सागरमाला 2.0  उपक्रम  पुढे नेल्याबद्दल नितीन गडकरी यांनी केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांचे कौतुक केले. जहाजबांधणी, दुरुस्ती आणि पुनर्वापराला चालना,  बंदरांची कार्यक्षमता वाढवणे, तसेच  किनारी भागाची  अर्थव्यवस्था मजबूत करणे त्याचबरोबर अंतर्गत जलमार्गांचे  पुनरुज्जीवन करण्याचा या योजनेचा उद्देश आहे. 

खाजगी नवोपक्रम, पारदर्शक प्रशासन आणि कालबद्ध अंमलबजावणीमुळे भारत आपल्या सागरी नेतृत्वावर  आणि स्पर्धात्मकतेवर कायमस्वरूपी जागतिक विश्वास निर्माण करू शकतो, यावर गडकरी यांनी यावेळी  भर दिला.

‌‘वन्दे मातरम्‌‍‍ 150‌’: अभिवाचनात्मक आणि दृकश्राव्य कार्यक्रमाचे आयोजन

0

पुणे : ऋषी बंकिमचंद्र लिखित ‌‘वन्दे मातरम्‌‍‍‌’ या राष्ट्रमंत्राच्या निर्मितीस तिथीनुसार कार्तिक शुद्ध नवमी; 31 ऑक्टोबर 2025 रोजी 150 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने ‌‘वन्दे मातरम्‌‍‍‌’ गौरव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून महोत्सवाचे उद्घाटन ऋषी बंकिमचंद्र यांचे वंशज पार्थ चॅटर्जी यांच्या हस्ते होणार आहे.

मएसो सिनिअर कॉलेज, वन्दे मातरम्‌‍‍ सार्ध शती जयंती समारोह समिती, पाज्चजन्य फाउंडेशन आणि जन्मदा प्रतिष्ठानतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून गौरव महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवार, दि. 31 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता मएसो सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड येथे होणार आहे, अशी माहिती जन्मदा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मकरंद केळकर, मएसो सिनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. रवींद्र वैद्य, वंदे मातरम्‌‍‍चे अभ्यासक मिलिंद सबनीस, पाज्चजन्य फाउंडेशनचे सचिव समीर कुलकर्णी यांनी आज (दि. 27) पत्रकार परिषदेत दिली. वन्दे मातरम्‌‍‍ सार्ध शती (150 वर्षे) जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.

ऋषी बंकिमचंद्र यांच्या अलौकिक प्रतिभेतून ‌‘वन्दे मातरम्‌‍‍‌’ हे गीत कार्तिक शुद्ध नवमी या दिवशी जन्माला आले. हे वर्ष ‌‘वन्दे मातरम्‌‍‍‌’च्या निर्मितीचे 150 वे वर्ष आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा युद्धघोष असणाऱ्या तेजस्वी काव्याचा अभिवाचनात्मक आणि दृकश्राव्य ‌‘वन्दे मातरम्‌‍‍ 150‌’ हा कार्यक्रम या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे. संहिता लेखन मिलिंद सबनीस यांचे असून दिग्दर्शक प्रसाद कुलकर्णी आहेत. संगीत अजय पराड यांनी दिले असून अभिषेक खेडकर, अवंती लोहकरे, प्रदीप फाटक अभिवाचन करणार आहेत. महेश लिमये आणि सुरेंद्र गोखले यांनी तांत्रिक बाजू सांभाळली आहे.

SRA मध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आंबेडकरांचा दावा:५०० चौ. फुटांची घरे देण्याची मागणी

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात SRA प्रकल्पग्रस्तांना पंधरा हजार रुपये घरभाडे देण्यात यावे.

पुणे : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एसआरए (झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यांनी पाच वर्षांपासून काम सुरू न केलेल्या कंत्राटदारांचे करार रद्द करण्याची मागणी केली. तसेच, झोपडपट्टीधारकांना ५०० चौरस फुटांची घरे देण्याचा प्रस्ताव पाठवावा, विकासकांकडून १५ हजार रुपये भाडे वसूल करावे आणि अपात्र ठरलेल्या नागरिकांच्या अपीलावर महिनाभरात निर्णय घ्यावा, अशा विविध मागण्या केल्या आहेत.

या भ्रष्ट कारभाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने सोमवारी शिवाजीनगर येथील एसआरए कार्यालयावर मोर्चा काढला. महायुती सरकार आणि एसआरएच्या ‘भ्रष्ट, भोंगळ आणि बिल्डरधार्जिण्या’ कारभाराविरोधात हा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. या मोर्चात प्रकाश आंबेडकर यांच्यासह शहराध्यक्ष अरविंद तायडे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

शिवाजीनगर परिसरातील ॲग्रीकल्चर कॉलेज चौकात पोलिसांनी मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त तैनात केला होता. या भागातील वाहतूकही काही काळासाठी वळवण्यात आली. निळ्या टोप्या आणि पक्षाचे झेंडे घेऊन घोषणाबाजी करत कार्यकर्ते एसआरए कार्यालयाच्या दिशेने निघाले, मात्र पोलिसांनी त्यांना कार्यालयाच्या रस्त्यावरच अडवले.

यावेळी बोलताना आंबेडकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी गरिबांना स्वस्त घरे उपलब्ध करण्याऐवजी बिल्डरचा खिसा भरण्याचे धोरण स्वीकारले आहे. झोपडपट्टीधारकांना स्वस्त घरे कशी मिळतील, न्याय कसा मिळेल आणि त्यांना त्यांच्या सध्याच्या जागेवरच घर कसे मिळेल, यावर वंचित बहुजन आघाडी बाजू मांडत आहे.

आंबेडकर यांनी यावेळी जैन बोर्डिंग वादावरही भाष्य केले. ट्रस्टच्या जागा गरज नसताना विकल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. धर्मदाय आयुक्त कार्यालयाच्या परवानगीशिवाय ट्रस्टच्या जागा विकता येत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.

ट्रस्ट डीडनुसार, ट्रस्टमध्ये काही बदल करायचे असल्यास त्याचे सर्वाधिकार केवळ संबंधित राज्यातील उच्च न्यायालयाला आहेत. राज्य सरकारलाही नाहीत. ट्रस्ट डीडमध्ये जागा विकसित करता येते, परंतु विक्रीची परवानगी नसते. धर्मदाय आयुक्तांनी कलम ३६ (अ) नुसार ट्रस्ट डीड पाहिले आहे का, हे तपासणे गरजेचे आहे. एकदा मालमत्ता ट्रस्टकडे गेल्यानंतर त्यावर संबंधित कुटुंबाचा कोणताही अधिकार राहत नाही; ती ट्रस्टची मालकी होते. शासनालाही त्यात बदल करण्याचा अधिकार नाही. जागेचे मूळ स्वरूप कायम राहावे हा यामागील उद्देश असून, सध्या त्याचा गैरवापर होत असल्याचे दिसत आहे.

पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेची आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला

0

पुणे : पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेतील आरक्षण सोडतीची तारीख निश्चित झाली आहे. ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत पार पडणार असल्याची अधिकृत माहिती निवडणूक विभागाकडून मिळाली आहे. या सोडतीकडे सर्वच राजकीय पक्ष आणि इच्छुक उमेदवारांचे लक्ष लागले आहे.राज्य सरकारकडून अलीकडेच प्रभाग रचना अधिसूचना मंजूर झाल्यानंतर पुढील टप्पा म्हणून आरक्षण सोडतीची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेच्या निवडणूक विभागाने सर्व तयारी पूर्ण केली असून, सोडतीची प्रक्रिया पारदर्शक आणि संगणकीकृत पद्धतीने होणार आहे.

या आरक्षण सोडतीत महिलांसाठी, अनुसूचित जाती-जमातींसाठी तसेच इतर मागासवर्गीय समाजासाठी आरक्षित प्रभाग निश्चित केले जाणार आहेत. एकूण 41 प्रभागांपैकी कोणता प्रभाग कोणत्या श्रेणीत येणार, याबाबतची अधिकृत माहिती याच सोडतीत जाहीर होणार आहे. त्यामुळे शहरातील प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याचे, संभाव्य उमेदवाराचे आणि पक्षनिष्ठांचे लक्ष या तारखेकडे लागले आहे.

निवडणुकीच्या दृष्टीने आरक्षणाचा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण, कोणत्या पक्षाला कोणत्या प्रभागात महिला उमेदवार देणे आवश्यक ठरेल किंवा कोणत्या प्रभागात अनुसूचित समाजातील प्रतिनिधी उभे राहतील, हे यावरून ठरणार आहे. परिणामी, पक्षांच्या उमेदवार निवडीची प्राथमिक समीकरणे देखील या सोडतीनंतर स्पष्ट होणार आहेत.

निवडणूक विभागाने सांगितले की, “आरक्षण सोडतीसाठी आवश्यक असलेली सर्व प्रशासकीय आणि तांत्रिक तयारी पूर्ण झाली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार प्रक्रिया राबवली जाईल.” महापालिकेच्या सभागृहात सोडतीची प्रक्रिया होईल आणि पत्रकार व नागरिकांसाठीही ती खुली असेल.

दरम्यान, पुण्यातील काही प्रभागांमध्ये लोकसंख्या आणि भौगोलिक मर्यादा यावरून नागरिकांकडून आक्षेप घेण्यात आले होते. मात्र, राज्य शासनाने सुधारित रचना मंजूर केल्यानंतर आता आरक्षण प्रक्रियेला अंतिम रूप देण्यात येत आहे.

शहरातील सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या गटांतर्गत बैठकांना सुरुवात केली आहे. संभाव्य उमेदवारांची चर्चा, गटांतील तणाव, आणि नव्या समीकरणांचा अंदाज घेत, आरक्षणानंतर लगेचच प्रचारयंत्रणा गती घेईल, असे राजकीय जाणकार सांगत आहेत.

पुणेकरांसाठी ही निवडणूक अत्यंत निर्णायक ठरणार आहे. नवीन प्रभाग रचना, वाढती लोकसंख्या आणि विविध विकास प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर नागरिक आता पारदर्शक आणि उत्तरदायी नेतृत्वाची अपेक्षा करत आहेत. त्यामुळे ११ नोव्हेंबरची आरक्षण सोडतीनंतर महापालिका निवडणुकीच्या आखाडा रंगणार फायनल होणार आहे.

पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार केवळ रद्द करून चालणार नाही तर व्यवहारात सहभागी सर्वांवर कठोर कारवाई करा.

राहुल गांधींनी महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी केलेल्या ट्विटवर मुख्यमंत्री फडणवीसांनी केलेली टीका राजधर्माला शोभत नाही: हर्षवर्धन सपकाळ

फलटणची घटना राजकारणाचा विषय नाही तर महिला सुरक्षेचा, माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच.

मुंबई, दि. २७ ऑक्टोबर २०२५

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी फलटणच्या महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी ज्या संवेदना व्यक्त केल्या आहेत, तेवढ्या सर्वांच्या मनात असल्या पाहिजेत. राहुल गांधी यांनी व्यक्त केलेल्या भावना योग्यच आहेत. हा राजकारणाचा विषय नसून महिला सुरक्षेचा विषय आहे, त्याअनुषंगाने राहुल गांधी यांचे ट्विट मार्गदर्शक म्हणून पहावे असे प्रतिपादन करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी राहुल गांधींच्या ट्विटवर केलेली टीका राजधर्माला शोभा देत नाही, असे प्रत्युत्तर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरने केलेली आत्महत्या अत्यंत गंभीर व संवेदनशील आहे. राहुल गांधी यांनी त्याच अनुषंगाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे कुचकामी गृहमंत्री ठरेल आहेत, त्यांच्या काळात महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तर दुसरीकडे फडणवीस यांच्या गृहमंत्रीपदाच्या काळात कोयता गँग, आका, खोक्या ही देणगी त्यांनी राज्याला दिली आहे. कायदा सुव्यवस्था वेशीवर टांगली गेली आहे त्यामुळे राज्याला किमान पूर्ण वेळ गृहमंत्री असणे गरजेचे आहे पण फडणवीस यांना गडचिरोलीतील खाणीत जास्त रस असून पंतप्रधानपदावर नजर असल्याने कायदा सुव्यवस्था, विकास व महिला सुरक्षा याच्याशी त्यांचा काहीही संबंध राहिलेला नाही.
भाजपा ही वॉशिंग मशीन आहे. अजित पवार, छगन भुजबळ यांच्यासह अनेकांवर भाजपाने भ्रष्टाचाराचे आरोप केले होते पण त्यांनाच पक्षात व सत्तेत सहभागी करून पवित्र करुन टाकले आहे. फलटणच्या घटनेत माजी खासदाराचा उल्लेख होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना क्लिन चिट देणे म्हणजे त्यांचा या कटात सहभाग असल्याचा पुरावाच असल्याचेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
महायुतीचे शेतकरी पॅकेज थोतांड..
महायुती सरकारने राज्य दिवाळखोरीत काढले असल्याने त्यांच्याकडे योजनांसाठी पैसाच नाही. पंतप्रधान आवास योजनेसाठी पैसे नाहीत, लाडकी बहिण योजनेसाठी पैसे देऊ शकत नाही. पंतप्रधान महाराष्ट्रात येणार म्हणून शेतकऱ्यांना ३२ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले, हे पॅकेज फसवे आहे हे आम्ही आधीच सांगितले होते आता या पॅकेजचा फोलपणा समोर येत आहे. हे पॅकेज एक थोतांड आहे. शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्यावे, रब्बी हंगामासाठी बियाणे व खते मोफत द्यावीत तसेच कर्जमाफी करावी. एक मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांनी दिल्लीत जाऊन राज्यासाठी विशेष पॅकेज आणावे, असेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
जैन बोर्डींग व्यवहाराप्रकरणी कारवाई करा…
जैन बोर्डींगची जमीन केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ गिळंकृत करु पहात होते पण हे प्रकरण चव्हाट्यावर आल्याने मुरलीधर मोहोळ यांना वाचवण्यासाठी तो व्यवहार रद्द करावा लागला आहे परंतु हा व्यवहार रद्द करून चालणार नाही तर या व्यवहारात जे लोक सहभागी होते त्या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. जमीन हडप करण्याच्या कटात कोण कोण होते याचा पर्दाफाश झाला पाहजे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

अमित शाह यांनी भूमीपूजन केलेल्या भाजपा कार्यालयाच्या जागेचा व्यवहार संशयास्पद, राज्य सरकार व बीएमसीने खुलासा करावा.

अभिनेता सुशांतसिंह प्रकरणाच्या चौकशीला सीबीआयला ५ वर्षे लागली; पालघर साधू प्रकरणाला किती वर्षे लागणार?

पालघर साधूंची केस सीबीआयकडे देण्यास धर्मवीर-२ सरकारला तीन वर्षे का लागली ?- सचिन सावंत.

मुंबई, दि. २७ ऑक्टोबर.

भाजपा सरकारने सीबीआय सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांचा केवळ आपल्या राजकीय फायद्यासाठी गैरवापर केला आहे. अभिनेता सुशांतसिंह राजपूत व पालघर साधू प्रकरणात मविआ सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपाने केला. सुशांतसिंह प्रकरणाची चौकशी करण्यास सीबीआयला ५ वर्षे लागली आता पालघर साधू प्रकरणाला किती वर्षे लागणार, असा प्रश्न उपस्थित करून पालघर साधूंची केस सीबीआयकडे देण्यास धर्मवीर- २ सरकारला तीन वर्षे का लागली? आता पालघर साधु हत्येच्या विषयाचा राजकीय उपयोग महायुतीसाठी संपला का? असे सवाल काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी विचारले आहेत.

टिळक भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, पालघरमधील साधूंच्या दुर्दैवी हत्येचा तपास मविआ सरकारने केला होता. ही हत्या मुले पळविणाऱ्या टोळीच्या अफवेमुळे गैरसमजातून झाली हे स्पष्ट होते. मरण्यापूर्वी स्वतः साधूंनी त्यांना जमाव चोर समजत आहे हे पोलिसांना सांगितले हे प्रथम तपासणी अहवालात स्पष्ट नमूद आहे. गडचिंचले गावात दहा वर्षे भाजपा ची सत्ता असून आरोपींमध्ये काही भाजपाचे कार्यकर्ते होते असे असूनही भाजपाने मात्र या प्रकरणाचा राजकीय फायदा उठवण्यासाठी यामागे मोठे कारस्थान असल्याचा बोभाटा केला होता. मविआचे सरकार अनैतिक पद्धतीने घालवल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने ही केस सीबीआय ला सोपवली. धर्मवीर २ चित्रपटात महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ही घटना कारणीभूत असल्याचे दाखवण्यात आले आहे.
याच अनुषंगाने महायुती सरकारने ११ ऑक्टोबर २०२२ रोजी हे प्रकरण सीबीआयकडे देत असल्याचे सुप्रीम कोर्टात सांगितले. परंतु त्यानंतर जवळपास चौदा महिन्याच्या कालावधीनंतर ६ फेब्रुवारी २०२४ ला सरकारने त्याचा आदेश काढला. या आदेशान्वये तपास करावयाची कलमे चुकीची असल्याचा साक्षात्कार राज्य सरकारला त्यानंतर अजून सव्वा वर्षानंतर झाला. २२ मे २०२५ रोजी मुळ आदेशाचे शुद्धीपत्रक काढून कलमे बदलण्यात आली आणि या आदेश व शुध्दी पत्रकान्वये ८ ऑगस्ट २०२५ ला केंद्र सरकारने सीबीआयकडे हे प्रकरण सोपवण्यात आले. त्यानंतर १६ ऑक्टोबर २०२५ रोजी सीबीआयने पालघर मधील कासा पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेले तीन एफआयआर पुन्हा नोंदवले. सरकारने सीबीआयकडे हे प्रकरण देण्यात तीन वर्षे एवढा वेळकाढूपणा का केला, असा प्रश्न उपस्थित करून पालघर हत्या प्रकरणाची राजकीय गरज संपली आहे का, धर्मवीर -२ याचे उत्तर देतील का? असे सावंत यांनी म्हटले आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या दुर्दैवी मृत्यूचा राजकीय उपयोग करण्यासाठी सीबीआय तपासावर बसून राहिली. एका मृत्यूचा तपास करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेला पाच वर्षे लागतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. आता पालघर साधु हत्येच्या प्रकरणावर किती काळ बसून राहणार हे सीबीआयने स्पष्ट करावे असे सावंत म्हणाले.

भाजपा कार्यालयाच्या जागेचा व्यवहार संशयास्पद…

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज मुंबईत भाजपा कार्यालयाचे भूमीपूजन करण्यात आले पण भाजपा कार्यालयासाठीच्या या जागेचा व्यवहार संशयास्पद आहे. ही जागा शेड्यूल W मध्ये असताना व महापालिकेने ताब्यात घेतली असताना हस्तांतरण कसे झाले? व महाराष्ट्र राज्य सहकारी हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशनला भाडेकरार वाढवून का दिला नाही? याचे उत्तर महापालिका आयुक्तांनी दिले पाहिजे. या जागेच्या हस्तांतरणाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला होता का? याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले पाहिजे. पालिकेच्या कोट्यवधी रुपयांची जागा केवळ ८ कोटी ९१ लाख रुपयात भाजपाला कशी मिळाली? या व्यवहारात तीन राष्ट्रीय बँकाही गुंतल्या आहेत. या बँकांनी महापालिकेची संमती न घेता या जागेच्या ४६% हिस्सेदाराला कर्ज कसे दिले व ज्याच्या बरोबर या बँकांनी या कर्जाची व महाराष्ट्र राज्य सहकारी हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशनने आपल्या ५४% हिश्शाची सेटलमेंट केली तो एकनाथ बिल्डर कोण आहे व त्याचा भाजपाशी काय संबंध आहे?असे प्रश्न उपस्थित करून याप्रश्नी राज्य सरकार व महापालिकेने खुलासा करावा अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

क्रीडा विभागाकडून प्रोजेक्ट महादेवा अंतर्गत निवड चाचणी 31 ऑक्टोबरला पुण्यात

पुणे, दि. 27 ऑक्टोबर : महाराष्ट्र शासन क्रीडा विभाग, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र), सिडको आणि वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात फुटबॉल खेळाचा विकास, प्रचार आणि प्रसार करण्यासाठी “स्कॉलरशिप प्रोजेक्ट ऑफ महादेया” ही महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील 13 वर्षांखालील मुले व मुली (जन्मतारीख ०१.०१.२०१२ ते ३१.१२.२०१३) यांच्यासाठी फुटबॉल निवडचाचण्यांचे जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय आयोजन करण्यात येणार आहे.

पुणे जिल्हा निवड चाचणीसाठी 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर रोजी शिवछत्रपती क्रीडापीठ फुटबॉल ग्राउंड, म्हाळुंगे-बालेवाडी, पुणे येथे सकाळी 7.30 वा. निवडचाणीसाठी उपस्थित रहावे. निवडचाचणी: सकाळी ९.०० वा. प्रारंभ होईल. निवड झालेल्या खेळाडूंना किमान ५ वर्षांचे निवासी प्रशिक्षण मुंबई येथे दिले जाणार असून भारतीय फुटबॉल महासंघाद्वारे दत्तक योजनेअंतर्गत सर्व सुविधा पुरवल्या जातील. संपर्कासाठी धीरज मिश्रा, शासकीय क्रीडा मार्गदर्शक – ९२०९३३७७७०, अक्षय चौधरी, पुणे जिल्हा फुटबॉल संघटना प्रतिनिधी – ९४२१०७७५६१, शिरिल आर्शिवादम, संघटना प्रतिनिधी – ९८५०२३६७१७

राज्यस्तरीय होणाऱ्या अंतिम निवडचाचणीतून निवड होणाऱ्या 30 मुले आणि 30 मुलींना 14 डिसेंबर 2025 रोजी मुंबई येथे फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांच्यासोबत खेळण्याची अनोखी संधी मिळणार आहे. इच्छुक पात्र खेळाडूंनी https://forms.gle/1mwckj3XokoRQbb98 नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आणि पुणे जिल्हा फुटबॉल संघटनेचे सचिव प्रदीप परदेशी यांनी केले आहे.

हा भारताचा सागरी क्षण आहे, जो ‘गेटवे ऑफ इंडिया’ ला ‘गेटवे ऑफ वर्ल्ड’ मध्ये बदलत आहे

मोदी सरकारने सागरी क्षेत्रात केलेल्या सुधारणांमुळेच आज भारत जगातील सागरी नकाशावर एक उदयोन्मुख ताकद बनून उभा आहे

भारत सागरी स्थिती, लोकशाही स्थैर्य आणि नौदलाच्या क्षमतेच्या बळावर हिंद- प्रशांत आणि ग्लोबल साऊथ यांच्यातील सेतू बनून विकास, सुरक्षा आणि पर्यावरणाला गती देत आहे

2047 पर्यंत सागरी उद्योगात भारत अव्वल स्थानावर पोहोचण्याचे लक्ष्य साध्य करण्यात इंडिया मेरीटाईम वीक-2025 महत्त्वाचे योगदान देईल

भारताचे लक्ष्य एक असे हरित सागरी भवितव्य निर्माण करण्याचे आहे जे विकासाला गती देण्याबरोबरच निसर्गासोबत देखील संतुलन साधेल

समुद्रातून उपजीविका प्राप्त करणारे लहान द्वीप आणि ग्लोबल साऊथच्या देशांना विचारात घेऊन भारत एक हरित, समृद्ध आणि सामायिक महासागराच्या निर्मितीच्या दृष्टीकोनाने आगेकूच करत आहे

गेल्या 11 वर्षात मोदीजींनी भारताच्या सागरी क्षेत्राला राष्ट्रीय शक्ती, प्रादेशिक स्थैर्य आणि जागतिक समृद्धीच्या रुपात परिभाषित केले आहे

मोदी जींचे सागरी धोरण आता MAHASAGAR (Mutual And Holistic Advancement for Security And Growth Across Regions) च्या रुपात भारताच्या जागतिक स्तरावर पुढे पुढे पडणाऱ्या मोठ्या पावलांचे प्रतीक बनले आहे.

‘सागर से महासागर’ चा मोदी जींचा दृष्टीकोन भारताला सागरी क्षेत्रात जागतिक नेता बनवण्याच्या लक्ष्याच्या पूर्ततेच्या दिशेने पुढे नेईल

भारताच्या सागरी क्षेत्रात 23.7 लाख चौरस किलोमीटर Exclusive Economic Zone (EEZ) जगभरातील गुंतवणूकदार आणि उत्पादकांना आकर्षित करतो

मुंबई-, 27 ऑक्टोबर 2025

केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी आज महाराष्ट्रात मुंबईमध्ये इंडिया मेरीटाईम वीक-2025 चे उद्घाटन केले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार आणि केंद्रीय बंदरे, जहाज वाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुंबईमध्ये जगप्रसिद्ध गेट वे ऑफ इंडिया आहे, असे केंद्रीय गृह आणि सहकारमंत्र्यांनी आपल्या संबोधनात सांगितले. हा क्षण भारताचा सागरी क्षण आहे जो गेट वे ऑफ इंडियाला गेट वे ऑफ वर्ल्डमध्ये रुपांतरित करत आहे. गेल्या एका दशकात सागरी शिखर परिषदांनी हे सिद्ध केले आहे की सागरी अर्थव्यवस्थेत आम्ही ज्या सखोल संरचनात्मक सुधारणा केल्या आहेत, त्याच्या आधारे भारत आता एक उदयोन्मुख सशक्त ताकद बनून जगाच्या सागरी नकाशावर आपल्या संपूर्ण प्रभावासह उभा आहे, असे गृहमंत्री म्हणाले.

भारताचे सागरी सामर्थ्य  आणि धोरणात्मक स्थान आपल्या 11 हजार किलोमीटरहून अधिक लांबीच्या किनारपट्टीवरुन स्पष्ट होते असे अमित शाह म्हणाले. 13 किनारपट्टीलगतची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह जीडीपीमध्ये सुमारे  60 टक्के योगदान आपल्या किनारी राज्यांचे आहे. ते म्हणाले की 23.7 लाख चौरस किलोमीटरचे विशेष आर्थिक क्षेत्र  (EEZ) जगभरातील गुंतवणूकदार आणि उत्पादकांना आकर्षित करते आणि सुमारे  80 कोटी लोकसंख्या या किनारी राज्यांमध्ये राहते. शाह म्हणाले की  हिंद महासागर क्षेत्रातील  38 देश जागतिक निर्यातीमध्ये अंदाजे 12 टक्के योगदान देतात.  आम्ही ही संपूर्ण क्षमता या शिखर परिषदेच्या माध्यमातून जगभरातील गुंतवणूकदार आणि सागरी उद्योग क्षेत्रातील धुरिणांसमोर खुली करत  आहोत.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की भारत आपले सागरी स्थान, स्थिर लोकशाही आणि नौदल क्षमतेच्या बळावर, हिंद-प्रशांत आणि ग्लोबल साउथ दरम्यान एका सेतूची भूमिका बजावत आहे, ज्याद्वारे विकास, सुरक्षा आणि पर्यावरणाला गती देत  आहे. भारताचा सागरी इतिहास सुमारे  5000  वर्षे जुना आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत एक नवीन सागरी इतिहास घडविण्यासाठी  सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.  आज या परिषदेत  100 हून  अधिक देशांचे  प्रतिनिधी उपस्थित आहेत, ज्यावरून स्पष्ट होते की भारताची सागरी परंपरा आजही जागतिक भागीदारी आणि प्रादेशिक स्थैर्याच्या केंद्रस्थानी आहे.

अमित शाह म्हणाले की  इंडियन मेरीटाईम वीक हा हिंद-प्रशांत क्षेत्रातील  सर्वात प्रतिष्ठित सागरी संवाद मंच म्हणून उदयास आला आहे. 2025  ची ही शिखर परिषद 2047 पर्यंत सागरी उद्योगात भारताचे सर्वोच्च स्थान सुनिश्चित करण्याचे ध्येय साध्य करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल.ते म्हणाले या वर्षीच्या परिषदेत 100 हून अधिक देशांमधून  350  हून अधिक वक्ते,  500 हून अधिक कंपन्या आणि 1 लाखांहून अधिक प्रतिनिधींचा सहभाग अपेक्षित आहे. तसेच इथे  10 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या संधीही निर्माण होतील.  गृह मंत्री म्हणाले की  भारत स्पर्धेवर नाही तर परस्पर सहकार्यावर विश्वास ठेवतो. परस्पर सहकार्याद्वारे देशाच्या सागरी उद्योगाला जागतिक सागरी उद्योगाशी जोडण्यासाठी आम्ही एक व्यापक मार्गदर्शक आराखडा तयार केला आहे.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा  सागरी दृष्टिकोन सुरक्षा, स्थैर्य  आणि स्वावलंबन या तीन स्तंभांवर आधारित आहे. 2013  च्या भारत सागरी दृष्टिकोनासह, आम्ही सागरमाला, नील अर्थव्यवस्था  आणि हरित  सागरी दृष्टिकोन सारखे उपक्रम सुरू केले आहेत. त्याचबरोबर  जागतिक जहाजबांधणी उद्योगामध्‍ये  भारताला पहिल्या पाच देशांमध्ये स्थान मिळवून देण्याचे ध्येय निश्चित केले  आहे. आम्ही नवीन महाभव्य  आणि ‘डीप-ड्राफ्ट’ बंदरे देखील बांधत आहोत. अमित शाह यांनी  सांगितले की, बंदर हाताळणीचे लक्ष्य दरवर्षी 10,000 दशलक्ष मेट्रिक टन आहे आणि बंदर वाहतूक व्यवस्था  पूर्णपणे डिजिटल झाली आहे. याव्यतिरिक्त, भारत, भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर, पूर्व सागरी कॉरिडॉर आणि उत्तर-दक्षिण वाहतूक कॉरिडॉर सारख्या कनेक्टिव्हिटी  प्रकल्पांमध्ये देखील सहभागी  झाला आहे.

याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री  अमित शाह म्हणाले की, गेल्या 11 वर्षांत, पंतप्रधान मोदी यांनी भारताच्या सागरी क्षेत्राची व्याख्या , राष्ट्रीय ताकद, प्रादेशिक स्थिरता आणि जागतिक समृद्धी अशी केली आहे. आम्ही ही तीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. आज, जगातील दोन तृतीयांश व्यापार हिंद-प्रशांत  सागरी मार्गाने होतो आणि भारताचा 90 टक्के व्यापार समुद्रमार्गे होतो. ते म्हणाले की,  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांचे  सागरी धोरण आता ‘महासागर’  (म्हणजेच -म्युच्युअल अँड होलिस्टिक अॅडव्हान्समेंट फॉर सिक्युरिटी अँड ग्रोथ अ‍ॅक्रॉस रिजन्स) मध्ये विकसित झाले आहे.  हे धोरण   भारताच्या सागरी क्षेत्रातील वाढत्या जागतिक पदचिन्हाचे प्रतीक आहे. यावेळी  गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे  ‘सागर ते महासागर’  हा दृष्टीकोन  2047  पर्यंत भारताला या क्षेत्रात जागतिक नेता बनवण्याचे ध्येय साध्य करण्याच्या दिशेने  पुढे नेईल. यासाठी, मोदी सरकारने सागरी विषयक अंदाजपत्रकामध्‍ये  सहापट वाढ  करत 40 दशलक्ष डॉलर्सवरून 230 दशलक्ष डॉलर्स केले आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी सांगितले की, सागरमाला प्रकल्पांतर्गत, आम्ही मार्च 2025 पर्यंत 70  अब्ज डॉलर्सचे 839 प्रकल्प चिन्हित  केले  आहेत, त्यापैकी 17  अब्ज डॉलर्सचे 272 प्रकल्प पूर्ण झाले आहेत.यामध्ये 5 अब्ज डॉलर्सचा ग्रेट निकोबार प्रकल्प उभारला जात असून हा प्रकल्प भारताचा जागतिक सागरी व्यापार अनेक पटीने वाढवेल. आम्ही 200 दशलक्ष डॉलर्सच्या गुंतवणुकीसह कोचीन जहाजबांधणी केंद्रात भारतातील सर्वात मोठ्या गोदीची उभारणी करण्याच्या उद्देशाने काम करत आहोत.याशिवाय, गुजरातमध्ये सागरी वारसा संकुल देखील विकसित करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री शाह म्हणाले की, महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय कायद्यांशी मेळ साधण्यासाठी जुन्या भारतीय कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. आपल्या संसदेने 117 वर्ष जुन्या भारतीय बंदर विधेयकाला आजच्या काळाच्या संदर्भात तसेच जागतिक दृष्टीकोनासह 2025 मध्ये मंजुरी दिली.मुख्य बंदरे प्राधिकरण अधिनियम, 2021 च्या माध्यमातून आम्ही बंदरांना अधिक स्वायत्तता देण्याचा तसेच त्यांच्या संस्थात्मक आराखड्याच्या आधुनिकीकरणाचा मार्ग खुला केला आहे असे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय जलमार्ग अधिनियम, 2016 अंतर्गत नवे 106 जलमार्ग जाहीर करण्यात आले आहेत असे देखील ते म्हणाले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, मोदी सरकारने सुरक्षा , तटवर्ती सुरक्षितता आणि मच्छिमारांच्या सुरक्षिततेसाठी नील अर्थव्यवस्थेचा विकास सुनिश्चित केला आहे. गेल्या एका दशकभरात आपण तटवर्ती नौवहनात 118 टक्के तर कार्गो हाताळणीत 150 टक्के वाढ नोंदवली आहे. आपण टर्न-अराउंड-टाईम(टीएटी) देखील कमी करून जागतिक मानकांच्या जवळ पोहोचलो आहोत असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की, सागरी क्षेत्रात चक्रीय अर्थव्यवस्थेला प्रोत्साहन देण्यासाठी जहाजबांधणी क्षेत्राला चालना देण्याच्या दृष्टीने आम्ही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. विकासाला चालना देण्यासोबतच निसर्गाशी समतोल राखणारे हरित सागरी भविष्य उभारणे हे भारताचे उद्दिष्ट आहे असे केंद्रीय गृहमंत्र्यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले की लहान बेटरुपी देश तसेच ग्लोबल साउथमधील  अनेक देश समुद्रावरच   उपजीविका चालवतात याचे भारताला कधीच विस्मरण होत नाही. या देशांसाठी हवामान बदल हा त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न झाला आहे आणि हेच लक्षात घेऊन भारत एक हरित, समृध्द आणि सामायिक महासागर निर्मितीच्या संकल्पनेसह आगेकूच करत आहे असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी केले.