Home Blog Page 3321

तिसर्‍या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त योग प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

0

पुणे : संयुक्त राष्ट्र संघाच्या निर्णयानुसार २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. डॉ.विश्‍वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणेतर्फे तिसर्‍या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून बुधवार, दि. २१ जून २०१७ रोजी सकाळी ७.०० वाजता कोथरूड येथील माईर्स एमआयटीच्या प्रांगणात योग प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराच्या निमित्ताने माईर्स एमआयटी शिक्षणसंस्था समूहातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सुमारे १० ते ११ हजार विद्यार्थी या योग प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार आहेत. तसेच पतंजली योग समितीचे २०० लोक या शिबिरात सहभागी होणार आहेत.
योगाचार्य श्री. मारुती पाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे योग प्रशिक्षण शिबिर संपन्न होणार आहे. जपान येथील इंडियन रिजन ऑफ शार्प कॉर्पोरेशनचे मुख्य अधिकारी व कार्यकारी संचालक श्री. टोमिओ इसोगाई, जापनीज कॅलिग्राफर कझुको बारिसिक, नोबेल पारितोषिक विजेते डॉ. राजेंद्र शेंडे, पतंजली योग समिती (महाराष्ट्र पश्‍चिम विभाग) चे प्रमुख श्री.बापू पाडळकर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे भारततर्फे १९९६ सालापासून दरवर्षी २४ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या दरम्यान शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्याकरिता योग प्रशिक्षण कार्यशाळा घेतली जाते. १९८३ सालापासून एमआयटी संस्थेच्या प्रांगणात धूम्रपान करण्यास बंदी आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व चारित्र्य संवर्धन व्हावे, यासाठी योगाला नेहमीच प्रोत्साहन दिले जात आहे.
माईर्स एमआयटीच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या योग प्रशिक्षण शिबिरात जास्तित जास्त लोकांनी व विशेषतः विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी केले आहे.

आयएसएल स्पर्धेला फिफाच्या नियमांचे पालन करावे लागणार-गौरव

0
पुणे: आयलीग स्पर्धेतील सहभागाबद्दल या गोष्टीचा संबंध नसला तरी इंडियन सुपर लीग स्पर्धेतील संघांना फिफाच्या परदेशी खेळाडूसंबंधी विशिष्ट खेळाच्या नियमाचे पालन करावे लागणार आहे. या नियमाप्रमाणे त्यांना जास्तीत जास्त चार परदेशी खेळाडूंना खेळविण्याची परवानगी असल्याचे एफसी पुणे सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गौरव मोडवेल यांनी सांगितले.
राजेश वाधवान समूह आणि ह्रितिक रोशन यांच्या सहमालकीच्या इंडियन सुपर लीग टीम असलेल्या एफसी पुणे सिटी यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कॉर्पोरेट सुपर कप स्पर्धेतील विजेत्या संघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
गौरव मोडवेल पुढे म्हणाले कि, भारतातील अग्रगण्य आयलीग फुटबॉल स्पर्धेतील संघ आणि अखिल भारतीय फुटबॉल महासंघ यांच्यात आशियाई फुटबॉल कॉन्फिडरेशनच्या उपक्रमांमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी सुरु असलेला वाद संपण्यासाठी अद्याप काही कालावधी लागणार आहे. यांसंबंधी आम्हांला लेखी सूचना अद्याप मिळालेल्या नसल्या तरी एशियन फुटबॉल कॉन्फिडरेशन(एएफसी)कडून आयएसएलला  मान्यता मिळाली आहे आणि जर आयएसएलमधील संघ एएफसीच्या स्पर्धांमध्ये खेळणार असतील तर आम्हांला परदेशी खेळाडूसंबंधी एएफसीचा नियम मान्य करावा लागेन.
आशियाई फुटबॉल फेडरेशनने आयएसएलला नुकतीच अधिकृत मान्यता दिली असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आयलीग स्पर्धांमधील दोनच संघ एएफसी स्पर्धेसाठी पात्र ठरत असल्यामुळे त्यांचा आता या नियमासंबंधी एएफसीशी संघर्ष होऊ घातला आहे. सध्याची आयएसएल स्पर्धेतील परदेशी खेळाडूंसंबंधी नियम आणि धोरण हे एएफसी आणि फिफा नियमांपेक्षा वेगळे आहे. परंतु फिफा आणि एएफसीच्या नियमांप्रमाणे आता आम्हाला परदेशी खेळाडूंची संख्या चारवरच आणावी लागणार असल्याचे मोडवेल यांनी नमूद केले.
 आयएसएल आणि आयलीग स्पर्धा  एकाच वेळी खेळविल्या जाणार असल्यामुळे यासंबंधी कोणताही वाद निर्माण करण्याऐवजी अधिकाधिक खेळाडूंना दर्जेदार फुटबॉल खेळण्याची संधी मिळणे महत्वाचे आहे. दोन्ही लीग स्पर्धा एकाच वेळी होत असल्यामुळे त्यात सहभागी होणाऱ्या संघातील दर्जेदार खेळाडूंना देशातील सर्वोत्तम दर्जाची स्पर्धा खेळण्याची संधी मिळणार आहे. पूर्वी आयएसएल स्पर्धा खेळण्यासाठी आयलीग संघाच्या खेळाडूंनी क्लबला परवानगी देणे आवश्यक होते. परंतु आता दोन्ही स्पर्धा एकाच वेळी होत असल्यामुळे दोन स्पर्धांमध्ये कोणते वेगळे खेळाडू हे संघांना निश्चित करावे लागणार आहे. तसेच, एकाच वेळी स्पर्धा होत असल्यामुळे व्यावसायिक फुटबॉल खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या १०० ते १२० वरून आता थेट ३०० वर पोहोचणार आहे. त्यामुळे अधिकाधिक खेळाडूंना क्लबशी व्यावसायिक करार करण्याची  संधी मिळेल आणि राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी मोठ्या संख्येने गुणवान खेळाडू निर्माण होतील. भविष्यामध्ये राष्ट्रीय फुटबॉल संघाला मोठ्या प्रमाणात गुणवान खेळाडू उपलब्ध करून देण्यासाठी हि योजना लाभदायक असल्याचे मोडवेल यांनी सांगितले.

स्मार्ट सिटी कंपनीला कोटय़वधी रुपयांचा कर भरावा लागणार..नितीन करीर

0

पुणे -स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) या कंपनीला शासकीय दर्जा देण्यास कॅगने आक्षेप नोंदविल्यामुळे या कंपनीला कोटय़वधी रुपयांचा कर भरावा लागणार असल्याच्या राष्ट्रवादीच्या चेतन तुपे यांच्या वक्तव्यानंतर या वृत्तास कंपनीचे अध्यक्ष आणि राज्याच्या नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांनीही त्याला दुजोरा दिला आहे. कंपनी कायद्यानुसार पीएससीडीसीएलची स्थापना झाली आहे. त्यामुळे नियमाप्रमाणे करही भरावा लागेल. मात्र कंपनी फायदा मिळविणारी नसल्यामुळे तिला विशेष दर्जा देऊन करामध्ये सवलत द्यावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात येणार असल्याचेही डॉ. करीर यांनी स्पष्ट केले.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत ‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ या कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीस शासकीय दर्जा देण्यास कॅगने आक्षेप नोंदविला आहे. कंपनीमध्ये ५१ टक्के भागभांडवल हे राज्य शासनाचे नाही. त्यामुळे कंपनी शासकीय ठरत नाही. त्यामुळे या कंपनीला उलाढालीवर कर भरावा लागणार असल्याचे कॅगकडून स्पष्ट करण्यात आले होते.

त्यामुळे कंपनीला तीन हजार कोटी रुपयांच्या उलाढालीवर तब्बल नऊशे कोटी रुपये कर भरावा लागण्याची शक्यता आहे. ही बाब पुढे आल्यानंतर कंपनीला शासकीय दर्जा देण्याची मागणी महापालिकेकडून करण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर कंपनीला कर भरावा लागणार असल्याचे डॉ. नितीन करीर यांनी स्पष्ट केले आहे. स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालकांची बैठक नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. पीएससीडीसीएल ही शासकीय कंपनी नाही. त्यामुळे कंपनीला कर भरावा लागणार आहे. मात्र कंपनीला विशेष दर्जा देऊन करामध्ये सवलत द्यावी, असे पत्र केंद्र सरकारला पाठविण्यात येईल, असे आश्वासन करीर यांनी या बैठकीत दिले.

सँनफ्रान्सिसकोमध्ये रंगणार इंडियन अँकेडमी अँवाँर्ड सोहळा,शाहरूख खान या सोहळ्याचा ब्रँड अॅम्बेसेडर -मराठी सिनेमांचाही होणार गौरव

0

पणजी-: भारतीय सिनेमा आता जगातील कानाकोपऱ्यात जाऊन पोहचला आहे. इतर देशात भारतीय सिनेमा कोटीच्या कोटी उड्डाणं करत आहे. या भारतीय सिनेमाचं जागतिक पातळीवर कौतुक होण्यासाठी इंडियन अॅकँडमी अँवाँर्डस सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील सँनफ्रान्सिसको शहरात हा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा रंगणार आहे. गोव्यात सध्या सुरू असलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्याभारतीय सिनेमा आता जगातील कानाकोपऱ्यात जाऊन पोहचला आहे. इतर देशात भारतीय सिनेमा कोटीच्या कोटी उड्डाणं करत आहे. या भारतीय सिनेमाचं जागतिक पातळीवर कौतुक होण्यासाठी इंडियन अॅकँडमी अँवाँर्डस सोहळ्याची घोषणा करण्यात आली आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये अमेरिकेतील सँनफ्रान्सिसको शहरात हा भव्यदिव्य पुरस्कार सोहळा रंगणार आहे. गोव्यात सध्या सुरू असलेल्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये या भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्याची घोषणा पत्रकार परिषदेत करण्यात आली.  शाहरुख खान या पुरस्कार सोहळ्याचा ब्रँड अँबेसेडर आहे.

या आगळ्या वेगळ्या पुरस्कार सोहळ्याचं वैशिष्ट्यं म्हणजे या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडसोबत मराठी आणि टॉलिवूडच्या सिनेमांचाही गौरव करण्यात येणार आहे.  तसेच मराठी सिनेमातील कलाकार, तंत्रज्ञांनाही गौरवण्यात येणार आहे. हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने भारताची शान उंच करणाऱ्या भारतीय कलाकारांनासुद्धा यावेळी गौरविण्यात येणार आहे. सौरभ पांडे, वंदना कृष्णा हे या पुरस्कार सोहळ्याचे प्रायोजक असून प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर, अभिनेता सुशांत शेलार  तसेच विन्सन वर्ल्डचे संजय शेटये हे सहप्रायोजक आहेत.

‘अंड्या चा फंडा’ सिनेमाला लाभला लता दीदींचा शुभार्शिवाद

0
‘कुछ तो गडबड हे दया…’, ‘तोड दो दरवाजा…’ हे सी आय डी चे डायलाॅग्ज लोकं आजही आवडीने बोलतात. सामान्य प्रेक्षकांच्या मनात गेली कित्येक वर्ष अधिराज्य गाजवलेल्या या मालिकेची भारताची गानकोकिळा ‘लता मंगेशकर’ देखील भरपूर मोठी फॅन आहे. विशेष म्हणजे या मालिकेचे लेखक आणि दिग्दर्शक संतोष शेट्टी यांचा आगामी मराठी सिनेमा ‘अंड्या चा फंडा’ देखील याच धाटणीचा असल्यामुळे, लता मंगेशकर यांनी या सिनेमाला विशेष पसंती दिली आहे. नुकतेच या सिनेमाचे ‘गोष्ट आता थांबली’ हे गाणे लता मंगेशकर यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आले. विशेष म्हणजे लता दिदींच्या हस्ते एका मराठी चित्रपटाचे गाणे सादर करण्याची ही पहिलीच वेळ असून, हे भाग्य ‘अंड्या चा फंडा’ या सिनेमाच्या टीमला लाभलं आहे. आदर्श शिंदेच्या अवजातले हे गाणे क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून, याला अमित राज यांनी ताल दिला आहे.
रहस्य आणि शोध कथा लिहिण्यास विशेष हातखंडा असणाऱ्या संतोष शेट्टी यांनीच या सिनेमाचे लेखन केले असल्यामुळे, हा सिनेमा नक्कीच रोमांचक असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे, खुद्द लतादीदींना गूढ आणि शोधकथेवर आधारित असलेल्या मालिका तसेच सिनेमे बघायला भरपूर आवडतात, आणि त्यामुळेच त्यांनी ‘अंड्या चा फंडा’ या सिनेमातील गाण्याच्या प्रसिद्धीसाठी आपला अनमोल वेळ देऊ केला. याप्रसंगी सिनेमाचे दिग्दर्शक तसेच निर्मात्यांसोबतच अथर्व बेडेकर, शुभम परब, मृणाल जाधव हे बालकलाकार आणि दीपा परब व सुशांत शेलार या कलाकारांनी लतादीदींच्या निवासस्थानी हजेरी लावली होती. लाता दिदींनी या सर्वांना शुभार्शिवाद देत, सिनेमाच्या भरघोस यशासाठी शुभेच्छादेखील दिल्या. बालपणाच्या मैत्रीवर आधारित असलेला हा सिनेमा अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टी यांची निर्मिती असून प्रशांत पुजारी आणि इंदिरा विश्वनाथ शेट्टी यांनी त्याची सहनिर्मिती केली आहे. तसेच  पटकथा आणि संवाद अंबर हडप, गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिली असून जूनच्या अखेरीस ३० तारखेला हा सिनेमा लोकांना आपल्या नजीकच्या सिनेमागृहात पाहता येणार आहे.

 

‘लपाछपी’च्या अंगाईला लाभला रेखा भारद्वाज यांचा आवाज

0

मराठी सिने संगीताच्या आकर्षणाने हिंदीतील सुप्रसिद्ध गायक-गायिका मराठीत गाताना दिसून येत आहे, ‘ईश्कीया’ फेम हिंदीच्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका रेखा भारद्वाज या देखील त्याला अपवाद नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेल्या ‘लपाछपी’ या सिनेमातील अंगाईला त्यांचा आवाज लाभला आहे. ‘एक खेळ लापाछपीचा…’ असे बोल असलेल्या या अंगाई गीताचे भारद्वाज स्टुडियोमध्ये, नुकतेच रेखाजीच्या आवाजात रेकॉर्डींग करण्यात आले.

मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील आणि वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स  प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट आणि सुर्यवीरसिंग भुल्लर यांची निर्मिती असलेला हा हॉंरर सिनेमा असून, याचे दिग्दर्शन लेखन विशाल फुरिया यांनी केले आहे. तसेच दिग्दर्शक विशाल फुरिया आणि विशाल कपूर या जोडीने सिनेमाचे लेखन केले आहे. ‘लपाछपी’ सिनेमातल्या या अंगाई गाण्याच्या मूळ गायिका नंदिनी बोरकर जरी असल्या तरी रेखाजींच्या आवाजातील जादू या गीताला लाभली असल्यामुळे, ही अंगाई श्रोत्यांसाठी वेगळीच अनुभूती देणार आहे. स्वयेश्री शसीन वर्धावे यांनी ही अंगाई लिहिली असून, रंजन पटनाईक, टॉनी बसुमातरी आणि उत्कर्ष धोटेकर या तिघांनी त्याला ताल दिला आहे. ‘लपाछपी’ या हॉरर चित्रपटातील हे अंगाई गीत असल्यामुळे यात भय दाखवण्याचा प्रयत्न या तिघांनी केला आहे. पूजा सावंतची मध्यावर्ती भूमिका असलेल्या या सिनेमात उषा नाईक, अनिल गावस आणि विक्रम गायकवाड या कलाकरांचीदेखील भूमिका असून, येत्या  १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.

वारकऱ्यांसाठी अनोखी सेवा

0
संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांची पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले सारी पुण्यनगरी हरी नामाच्या गजराने न्हाऊन निघाली या निमित्त गेली २१ वर्ष वारकऱ्यांची अखंड सेवा पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या वतीने पुण्यनगरीचे मा. उपमहापौर आबा बागुल यांच्या कडून केली जाते १५०० हुन अधिक वारकरी इथे मुक्कामी असतात. वारकरी संप्रदायासाठी सकाळी चहा , नाश्ता,दुपारी स्वादिष्ट भोजन सायंकाळी चहा व रात्री रुचकर भोजनाची सोय करण्यात आली असून त्यांची केश कर्तनाची सोय , बॅग व चप्पल शिवण्याची व भजन कीर्तनाची उत्तम सोय करण्यात आली आहे .  तसेच वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. हिंदू -मुस्लिमामध्ये एकोप्याची भावना निर्माण व्हावी. एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी झाल्याने इतर धर्मा विषयी आदर निर्माण होतो या भावनेने गेली दोन वर्ष मुस्लिम बांधव मोठ्या हिरिरीने या उपक्रमात सहभागी होतात. स्वतःच्या हाताने पवित्र रमजान महिन्यात वारकऱ्यांच्या पायाला तेलाने मसाज करून वारकऱ्यांना पुढचा प्रवास सुखकर होण्यास प्रार्थना करतात जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेने मुस्लिम बांधव या वारकरी सोहळ्यात मोठ्या उत्साहात सहभाग घेतात.   
 यावेळी पुण्यनगरीचे माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल,मुस्लिम यंग सर्कलचे अध्यक्ष अल्ताफ सौदागर,अयाज सौदागर,मुनीर शेख,जावेद शेख, फारुख शेख,महेबूब नदाफ,डॉ.कल्पेश पाटील, सागर आरोळे, हेमंत बागुल,महेश ढवळे , अभिजित निकाळजे,धनंजय कांबळे,विजय बिबवे,बाबासाहेब पोळके,संतोष पवार  आदी उपस्थित होते. 

राष्ट्रपतीपदाचा उमेदवार निवडताना आम्हाला विश्वासात घेतलेले नाही, काँग्रेसचे स्पष्टीकरण

0

नवी दिल्ली- भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी पत्रकार परिषदेत धडधडीतपणे एन डीए ने राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवताना कॉंग्रेस शी चर्चा करून निर्णय घेतल्याचे म्हटले असताना , या नंतर लगेचच एनडीएचा हा निर्णय एकतर्फी असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. भाजपने आम्हाला हा निर्णय घेताना विश्वासात घेतले नाही, अशी टीकाही आझाद यांनी केली आहे. आजच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी पत्रकार परिषद घेऊन, रामनाथ कोविंद यांचे नाव जाहीर केले.

भाजपने राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी, कोअर कमिटी स्थापन केली होती. या कमिटीच्या तिन्ही सदस्यांनी, माझ्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. आमच्यासोबत झालेल्या बैठकीत कोणतेही नाव कोअर कमिटीने आम्हाला सांगितले नाही. मग राष्ट्रपतीपद उमेदवाराबाबत चर्चा झाली असे कसे म्हणता येईल. त्यामुळे या सगळ्याला राष्ट्रपतीपद निवडणुकीच्या नावाची चर्चा कसे काय म्हणायचे? असाही प्रश्न, आझाद यांनी विचारला आहे. सरकारने सर्वसहमतीने निर्णय घेतलेला नाही, असेही आझाद यांनी म्हटले आहे.

काँग्रेसतर्फे राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून माजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार या प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. मात्र आम्ही आमच्यासोबत असलेल्या पक्षांना सोबत घेऊन सर्वसहमतीने निर्णय करू, तसेच विरोधी पक्षातर्फे कोण उमेदवार असेल याचा निर्णय काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी २२ जून रोजी जाहीर करतील अशी माहितीही गुलाम नबी आझाद यांनी पत्रकारांना दिली . मीरा कुमार या पाचवेळा खासदार झाल्या आहेत. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबू जगजीव राम यांच्या त्या कन्या आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला काँग्रेस पसंती मिळू शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारीच भाजपने रामनाथ विंद यांचे नाव राष्ट्रपतीपदासाठी निश्चित केले आहे. मात्र हा निर्णय घेताना आम्हाला सरकारने गृहीत धरले अशीही टीका, गुलाम नबी आझाद यांनी केली आहे.

 

पालखी सोहळयात गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचा सामाजिक उपक्रम

0

पुणे :- गोयल गंगा फाऊंडेशनतर्फे  पंढरपूरला जाणाऱ्या पालखी सोहळ्यात गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल मधील १००हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांशी बोलून स्वच्छता आणि आरोग्याचे  महत्व समजून सांगितले. शिवाय विद्यार्थ्यांनी पोस्टर्स आणि पथनाट्यातून स्वच्छता कशी ठेवावी ,कचरा कुंडीत टाकला जावा,पाण्याचे संवर्धन कसे करावे याची देखील माहिती  दिली. विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांच्या दुकानाजवळ उभे राहून कचरा गोळा करत वारकऱ्यांना स्वच्छतेविषयी माहिती दिली.

 

विद्यार्थ्यांनी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांना गुलमोहर,नीम,आंबा,चिंच अशा वेगवेगळ्या प्रकारचे बीजगोळे दिले. वारकरी पालखी मार्गावर ‘ज्ञानोबा, तुकोबांच्या’ जयघोषात बीजगोळे टाकतील. बीजगोळ्यावर जेव्हा पावसाचा शिडकावा होईल आणि ते जमिनीत रुजून वृक्षसंवर्धनाचा हेतू साध्य होईल.

 

मोठया उत्साहाने भक्तीमय वातावरणात विद्यार्थ्यांनी जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळयात सहभागी झाले यावेळी शाळेच्या विश्वस्त सोनू गुप्ता ,मुख्याध्यापिका भारती भागवानी, तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

रामनाथ कोविंद ‘एनडीए’चे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार.. अमित शहांची घोषणा

0

नवी दिल्ली: बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद हे भाजप प्रणित एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार आहेत. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी आज पत्रकार परिषद घेऊन याबाबतची अधीकृत घोषणा केली .सध्या बिहारचे राज्यपाल असलेले रामनाथ कोविंद हे उत्तर प्रदेशातील कानपूरचे रहिवाशी आहेत.

रामनाथ कोविंद हे दलित नेते म्हणून परिचीत आहेत. त्यांनी सामाजिक कार्य मोठं आहे. त्यामुळे त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीवर एनडीएचं एकमात झाल्याचं अमित शाह यांनी यावेळी सांगितले ..कोविंद यांच्या उमेदवारीबाबत आम्ही सर्वपक्षीयांशी संपर्क साधून कळवलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: सोनिया गांधी यांना फोन करुन याबाबतची माहिती दिली आहे. तसंच माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनाही याबाबत सांगितल्याचं अमित शाह म्हणाले.मूळचे कानपूरचे असलेले कोविंद हे १९९४ ते २००६ दरम्यान राज्यसभेतील खासदार होते. याशिवाय ते भाजपच्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या मोर्च्याचे अध्यक्षही होते. ते व्यवसायाने वकील आहेत. त्यांना उत्तर प्रदेशातील भाजपचा दलित चेहरा म्हणून ओळखले जाते.

वैष्णवांचा मेळा पुण्यात दाखल..(photo)

0

 

पुणे-  विठुरायाचा  अखंड जयघोष करीत लाखोच्या संख्येने वैष्णवांचा मेळा शहरात दाखलझाला . यावेळी  संपूर्ण वातावरण भक्तीमय बनले. फुलांच्या वर्षावात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे स्वागत करण्यात आले. महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, यांनी संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत केले. पाटील इस्टेट येथील उड्डाणपुलाखालच्या चौकात पालख्यांच्या स्वागतासाठी महापालिकेकडून विशेष कक्ष उभारण्यात आला होता. याचबरोबर इतर राजकीय पक्ष, संस्था, बँका यांनीही स्वागतासाठी कक्ष उभारले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास संत तुकारामम हाराजांच्या पालखीचे तर पावणेसातच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे पाटील इस्टेट इथे आगमन झाले.

पालख्यांच्या आगमनानंतर नंतर दर्शनासाठी भाविकांची मोठी झुंबड उडाली. चौकात दोरीने फुलांच्या करंड्या बांधण्यात आल्या होत्या, पालख्या चौकात येताच या करंड्यांमधील फुलांचा वर्षाव करण्यात आला. ‘बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव-तुकाराम, ज्ञानोबा माऊली.. माऊली’ असा एकच जयघोष यावेळी झाला. स्वागताचे अत्यंत मनोहारी दृश्य यावेळी पाहायला मिळाले.

पालख्यांचे स्वागत करताना मुक्ता टिळक म्हणाल्या की, पुणेकर कित्येक दिवसांपासून वाट पाहत असलेल्या पालख्यांचे आज आगमन झाले आहे. वारकऱ्यांच्या सेवेसाठी पुणेकर आसुसलेले आहेत. दोन दिवस त्यांचा मुक्काम पुण्यात असेल. या काळात पुणेकर वारकऱ्यांच्या सेवेत कुठेही कमी पडणार नाहीत. त्यांच्या आगमनाने पावसाचा वर्षाव व्हावा, असे पांडुरंगाला साकडे आहे.

पाटील इस्टेट येथे महापालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या कक्षामध्ये वीणाधारी वारकऱ्यांना श्रीफल देऊन त्यांचे स्वागत केले जात होते. कक्षातील स्पीकरवर भक्तीगीते लावण्यात आली होती.

दगडूशेठ गणपती मंदिरासमोर पुष्पवृष्टी

माउली…माउलीच्या जयघोषात पुण्यामध्ये लाखो वारक-यांसोबत आलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली व जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी रथावर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी माउली…माउली, तुकोबा… तुकोबाच्या जयघोषासोबतच गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. दोन्ही संस्थानच्या विश्वस्तांनी गणरायाचरणी नतमस्तक होत आरोग्यदायी, निर्मल आणि हरित महाराष्ट्रासाठी साकडे घातले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातर्फे तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळयाचे स्वागत मोठया उत्साहात करण्यात आले. यावेळी दगडूशेठ गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुनील रासने यांसह वारकरी मंडळी मोठया संख्येने उपस्थित होती.

ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे म्हणाले, वारीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. दरवर्षी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरासमोर पालखीचे उत्साहात स्वागत केले जाते. यंदा ट्रस्टच्या 125 व्या वर्षानिमित्त वारी सोहळ्यातील राबविण्यात येणा-या उपक्रमांची सुरुवात झाली असून हरित वारी, स्वच्छता आणि वारक-यांकरिता अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नुकतेच जय गणेश हरित वारी या 50 लक्ष वृक्षारोपण कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. वारक-यांनी यामध्ये सहभाग घेत वृक्षलागवड व संवर्धन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

संभाजी भिडे गुरुजी संघटना मध्येच घुसल्याने संत ज्ञानेश्वरांची पालखी अर्धा तास खोळंबली

0

पुणे-विठुरायाच्या जयघोषात ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्यांच्या आगमनानंतर पालख्या क्रमाने मुक्कामी स्थळावर मार्गस्त होताना, शिस्तबद्ध जाणा-या ज्ञानोबांच्या पालखीला गुडलक चौकात मध्येच थांबवे लागले. यामुळे मोठा गोंधळ निर्माण होऊन ज्ञानोबांच्या पालखीला अर्ध्यातासाचा विलंब झाला .दरम्यान संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे यांनी पोलीस व वारकरी यांच्यात वाद निर्माण व्हायला कारीभूत ठरलेल्या ,आणि नंग्या तलवारी घेवून पालखीत घुसलेल्या व्यक्तींवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे .

याबाबतची हकीकत अशी की, संगमपुल येथून फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावर पालख्या क्रमाने मुक्कामी स्थळावर मार्गस्थ होतात. प्रथम संत तुकाराम, त्यानंतर संत गब्बर शेख, संताजी महाराज जागणारे आणि संत ज्ञानेश्वर पालखी असतात. मात्र, हिंदुत्ववादी संभाजी भिडे गुरुजी संघटना मोठ-मोठ्याने घोषणा देत मध्येच घुसते. त्यामुळे ज्ञानेश्वर पालखी प्रमुखांनी पालखी गुडलक चौकातच थांबवली. यामुळे एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ येथे येऊन मध्यस्थी केली. दरम्यान, भिडे गुरुजी संघटनामधील काही व्यक्तींच्या हातामध्ये तलवारी व डोक्याला फेटे घातलेले असतात. तीन ते चार वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याचे भालदार चोपदार यांनी सांगितले.

संत ज्ञानेश्वर पालखी प्रमुखांकडून यापूर्वी पोलिसांना याबाबत सांगण्यात आले होते. तसेच, तुम्हाला हे बंद करता येत नसेल, तर आम्ही आमचा मार्ग बदलू असेही सांगण्यात आले होते. मात्र, पोलिसांकडून याबाबत काहीच निर्णय घेण्यात न आल्याने यंदाही गुडलक चौकात पालखी आल्यानंतर भिडे गुरुजी संघटचे लोक पालखी त सहभागी झाले . त्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रमुखांनी पालखी जागेवरच थांबवत पुढे न जाण्याचा निर्णय घेतला.

त्यानंतर याठिकाणी मोठा गोंधळ उडाला. वरिष्ठ अधिकार्‍यांनी तात्काळ धाव घेऊन मध्यस्थी केली. त्यामुळे वातारवण शांत झाले. तसेच ज्ञानेश्वर पालखी प्रमुखांना यापुढे असे होऊ न देण्याची हमी परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिली. त्यानंतर पालखी येथून मार्गस्थ झाली. या गोंधळात तब्बल अर्धातास पालखी गुडलक चौकात थांबवण्यात आली.

राधाकृष्ण विखे पाटलांची मोठ्या भावाशी दबंगगिरी ?

0

पुणे- राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात त्यांचेच सख्खे मोठे भाऊ अशोक विखे पाटील यांनी आरोप केल्याने ..विखे पाटलांच्या घरात भावा भाव मध्ये दबंगगीरी सुरु असल्याचे वृत्त पसरते आहे . मात्र राधाकृष्ण यांनी याचा स्पष्ट शब्दात इन्कार केला आहे .
पुण्यातील विखे पाटील फौन्डेशन ची लोणी (जिल्हा अहमदनगर ) येथे लिटील फ्लावर स्कूल म्हणू ज्युनिअर केजी पासून १० वी पर्यंत ची सीबीएसई पॅटर्ण ची शाळा आहे . या शाळेला जाणारा आणि येणारा रस्ता रात्रीतून नांगर लावून उखडून टाकल्याची तक्रार शाळेच्या मुख्याध्यापिकेने लोणी पोलिसांकडे केली होती मात्र पोलिसांनी ती तक्रार घेतली नाही म्हणून आता हि तक्रार घेवून आता आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे  पाठवीत आहे अशी माहिती विखे पाटील फौन्डेशनचे अशोक विखे पाटील यांनी दुरध्वनीवरून मायमराठी शी बोलताना दिली .
यावेळी त्यांनी आपले बंधू राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर या प्रकरणी आरोप केले आहेत . याविषयी माय मराठी ने राधाकृष्ण विखे पाटील यांना  हि संपर्क साधला .. त्यांनी  हे सारे आरोप फेटाळून लावत आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले … या दोघांनी दूरध्वनीवरून नेमके काय सांगितले हे त्यांच्याच शब्दात ऐका…

जैकलीन, वरुण और तापसी “जुड़वा 2” के गाने के अभ्यास में जुटे!

0

जूडावा 2 टीम फिलहाल फिल्म के लिए एक गाने की शूटिंग कर रही है और अभिनेता वरुण धवन, जैकलिन फर्नांडीज और तापसी पनू को इसी का अभ्यास करते हुए देखा गया।

वरुण, जैकलिन और तापसी जाहिरा तौर पर 1997 के ब्लॉकबस्टर जूडावा से निर्मित एक डांस नंबर टन टना टन के लिए तैयारी कर रहे है।

टन टना टन सबसे प्रसिद्ध पार्टी गीतों में से एक है। बॉलीवुड के पसंदीदा डांस नंबरों में से एक बहुत ही प्रिय पार्टी गीत है ये।

वरुण धवन जो स्वयं एक बेहतरीन डांसर है, वह असाधारण शानदार नर्तक जैकलिन के साथ ताल मिलाते हुए नज़र आएंगे। जैकलिन उन चुनिंदा अभिनेत्रियों में से एक है जिन्होंने प्रमुख चार्ट बस्टर पार्टी संगीत दिए हैं। इस गीत में सरप्राइज़ पैकेज तापसी पन्नू होगी, जो इन दोनों के साथ कदम से कदम मिलाते हुए नज़र आएगी।

जुड़वा 2 के गीत टन टना टन के साथ कलाकार तहलका मचाने के लिए तैयार है। इस गीत को गणेश आचार्य द्वारा कोरियोग्राफ किया गया है।

तीनों ने पहले से ही फिल्म के लिए “ऊंची है बिल्डिंग” गाने की शूटिंग कर ली है, जो उनके लिए एक बहुत मज़ेदार अनुभव था।

कलाकार इस गीत के लिए एक साथ आये थे जिसे देख कर यह तो साफ हो गया था शूटिंग के दौरान सभी ने इसका भरपूर लुत्फ उठाया था।

जैकलीन ने इंस्टाग्राम पर अभिनेताओं की एक तस्वीर साझा की जहाँ सभी गीत के रिहर्सल के बाद पोज़ करते हुए नज़र आये। साथ ही कैप्शन दिया कि,”क्या आप अनुमान लगा सकते हैं कि हम किस गीत का अभ्यास कर रहे हैं?

ऊंची है बिल्डिंग और टन टना टन, जूडावा से दो क्लासिस नंबर, जिन्हें जुड़वा 2 के लिए एक फिर से दोहराया जा रहा है।

फिलहाल कलाकार मुम्बई में है और गीत की शूटिंग के बाद सभी पुर्तगाल कार्यक्रम के लिए रवाना होंगे।

साजिद नाडियादवाला द्वारा निर्मित, डेविड धवन द्वारा निर्देशित, फ़िल्म जुड़वा 2 को फॉक्स स्टार स्टूडियोज और नडियादवाला ग्रैंडसन एंटरटेनमेंट द्वारा प्रस्तुत किया जाएगा। फ़िल्म 29 सिंतबर को नज़दीकी सिनेमाघरों में दस्तक देगी।

‘किप मूव्हिंग मुव्हमेंट ‘ ची ८५ शाळांत प्रेरणात्मक व्याख्यान सत्रे

0

पुणे :

विद्यार्थ्यांना त्यांचे भवितव्य घडवून समाजाला योगदान देण्यासाठी  प्रवृत्त करणाऱ्या ‘किप मूव्हिंग मुव्हमेंट ‘ या संस्थेच्या वतीने २५ जून पासून पुणे जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रेरणादायक व्याख्यानांची सत्रे होणार आहेत .

‘ ‘किप मूव्हिंग मुव्हमेंट ‘ या संस्थेच्या  ‘लाईफ स्कुल ‘च्या संचालक ज्योती गोसावी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .

पुणे ,औरंगाबाद ,उदयपूर येथे ८५ शाळांत ४०० तुकड्यांमध्ये ,५६० स्वयंसेवकाच्या मदतीने हा उपक्रम चालणार आहे .

‘किप मूव्हिंग मुव्हमेंट ‘ हा उपक्रम २०१० पासून भारत ,श्रीलंका ,नेपाळ या देशातील ३० हजार शिक्षक ,लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोचला आहे .

विद्यार्थ्यांमधील नकारात्मक भावना काढून त्यांना सकारात्मक जीवनाची प्रेरणा देणे ,हा या उपक्रमाचा उद्देश आहे . व्याख्याने ,रोल प्ले ,चर्चासत्रे ,यशकथा यातून विद्यार्थ्यांना ,पालकांनाही मार्गदर्शन केले जाते . नरेंद्र गोयदानी हे या चळवळीचे संस्थापक आहेत