संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराजांची पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले सारी पुण्यनगरी हरी नामाच्या गजराने न्हाऊन निघाली या निमित्त गेली २१ वर्ष वारकऱ्यांची अखंड सेवा पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या वतीने पुण्यनगरीचे मा. उपमहापौर आबा बागुल यांच्या कडून केली जाते १५०० हुन अधिक वारकरी इथे मुक्कामी असतात. वारकरी संप्रदायासाठी सकाळी चहा , नाश्ता,दुपारी स्वादिष्ट भोजन सायंकाळी चहा व रात्री रुचकर भोजनाची सोय करण्यात आली असून त्यांची केश कर्तनाची सोय , बॅग व चप्पल शिवण्याची व भजन कीर्तनाची उत्तम सोय करण्यात आली आहे . तसेच वारकऱ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी डॉक्टरांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. हिंदू -मुस्लिमामध्ये एकोप्याची भावना निर्माण व्हावी. एकमेकांच्या सण-उत्सवात सहभागी झाल्याने इतर धर्मा विषयी आदर निर्माण होतो या भावनेने गेली दोन वर्ष मुस्लिम बांधव मोठ्या हिरिरीने या उपक्रमात सहभागी होतात. स्वतःच्या हाताने पवित्र रमजान महिन्यात वारकऱ्यांच्या पायाला तेलाने मसाज करून वारकऱ्यांना पुढचा प्रवास सुखकर होण्यास प्रार्थना करतात जनसेवा हीच ईश्वर सेवा या भावनेने मुस्लिम बांधव या वारकरी सोहळ्यात मोठ्या उत्साहात सहभाग घेतात.
यावेळी पुण्यनगरीचे माजी उपमहापौर आबा बागुल, पुणे शहर काँग्रेसचे सरचिटणीस अमित बागुल,मुस्लिम यंग सर्कलचे अध्यक्ष अल्ताफ सौदागर,अयाज सौदागर,मुनीर शेख,जावेद शेख, फारुख शेख,महेबूब नदाफ,डॉ.कल्पेश पाटील, सागर आरोळे, हेमंत बागुल,महेश ढवळे , अभिजित निकाळजे,धनंजय कांबळे,विजय बिबवे,बाबासाहेब पोळके,संतोष पवार आदी उपस्थित होते.