पुणे :
विद्यार्थ्यांना त्यांचे भवितव्य घडवून समाजाला योगदान देण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या ‘किप मूव्हिंग मुव्हमेंट ‘ या संस्थेच्या वतीने २५ जून पासून पुणे जिल्ह्यातील शाळांमध्ये प्रेरणादायक व्याख्यानांची सत्रे होणार आहेत .
‘ ‘किप मूव्हिंग मुव्हमेंट ‘ या संस्थेच्या ‘लाईफ स्कुल ‘च्या संचालक ज्योती गोसावी यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली .
पुणे ,औरंगाबाद ,उदयपूर येथे ८५ शाळांत ४०० तुकड्यांमध्ये ,५६० स्वयंसेवकाच्या मदतीने हा उपक्रम चालणार आहे .
‘किप मूव्हिंग मुव्हमेंट ‘ हा उपक्रम २०१० पासून भारत ,श्रीलंका ,नेपाळ या देशातील ३० हजार शिक्षक ,लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोचला आहे .
विद्यार्थ्यांमधील नकारात्मक भावना काढून त्यांना सकारात्मक जीवनाची प्रेरणा देणे ,हा या उपक्रमाचा उद्देश आहे . व्याख्याने ,रोल प्ले ,चर्चासत्रे ,यशकथा यातून विद्यार्थ्यांना ,पालकांनाही मार्गदर्शन केले जाते . नरेंद्र गोयदानी हे या चळवळीचे संस्थापक आहेत