Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

“रेरा व जीएसटीनंतर बांधकाम उद्योगाला उज्ज्वल भवितव्य”

Date:

लोणावळ्यात क्रेडाईच्या राज्यस्तरीय ‘महाकॉन’ परिषदेचे समापन

पुणे– क्रेडाई सदस्यांनी रेरा आणि जीएसटीच्या नियमांचा अभ्यास करावा. बांधकाम उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल आहे, विशेषतः परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रात अशा प्रकारचा विश्वास ‘महाकॉन’ या दोन दिवसीय परिषदेत व्यक्त करण्यात आला. क्रेडाई महाराष्ट्रने या परिषदेचे आयोजन केले होते आणि १६ व १७ जून रोजी ती लोणावळा येथे पार पडली. ही पाचवी वार्षिक परिषद असून या कार्यक्रमाला ३७ शहरांतील ३६५ पेक्षा जास्त बांधकाम व्यावसायिक उपस्थित होते.

या दोन दिवसीय परिषदेत  विविध विषयांवर चर्चा झाली. यात रेरानंतरच्या काळातील व्यवसायाचा दृष्टिकोन, व्यापक परवडणाऱ्या गृहनिर्माणाची अंमलबजावणी, जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर बांधकाम उद्योगातील आव्हानांचा सामना इत्यादी विषयांचा समावेश होता.

महाकॉनचे उद्घाटन १६ जून रोजी स्टेट बँक ऑफ इंडियाचे कर्ज विभागाचे राष्ट्रीय प्रमुख वैजनाथ एम. जी. यांच्या हस्ते झाले. क्रेडाई –नॅशनलचे निर्वाचित अध्यक्ष सतीश मगर, क्रेडाई – महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया  हे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. क्रेडाई नॅशनलचे सचिव रोहीत राज मोदी, क्रेडाई  महाराष्ट्रचे उपाध्यक्ष राजीव पारेख, महाकॉनचे निमंत्रक गिरीश रायबागे यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये समावेश होता.

या प्रसंगी बोलताना वैजनाथ यांनी ग्वाही दिली, की एसबीआय खासकरून दुसऱ्या व तिसऱ्या स्तरातील शहरांतील बांधकाम उद्योगासोबत काम करत असून परवडणाऱ्या घरांच्या बांधणीसाठी मदत पुरवत आहे.  कमीत कमी व्याजदरांवर आकर्षक कर्ज पुरवून विकसकांना तसेच वैयक्तिक ग्राहकांनाही ही मदत देण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

आपल्या उद्घाटनाच्या भाषणात सतीश मगर म्हणाले, की सदस्यांनी सक्रिय होऊन स्वतःमध्ये बदल घडवून आणावा  आणि  रेरामुळे येत असलेल्या सुधारणा घडवून आणाव्यात.

या परिषदेचा हेतू स्पष्ट करताना क्रेडाई  महाराष्ट्रचे अध्यक्ष शंतिलाल कटारिया म्हणाले, “उद्योगातील नवीनतम ज्ञान इतरांना देण्यासाठी आणि बांधकाम उद्योगात येत असलेल्या नियम व नियमनांची माहिती देण्यासाठी ही परिषद आयोजित केली आहे. जेणेकरून सर्व प्रकारच्या शंका दूर व्हाव्यात. रेरा आणि जीएसटीमुळे आलेल्या या संक्रमणाच्या काळात सदस्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, याचे स्पष्टीकरण त्यांनी केले. रेरा व जीएसटीच्या नियमांचे पालन करण्याचे त्यांनी सदस्यांना आवाहन केले आणि शिस्तबद्ध व संघटीत विकसकांसाठी भविष्य उज्ज्वल असल्याची ग्वाही दिली.

समारोप समारंभात महाराष्ट्राच्या नगर नियोजन विभागाचे संचालक विजय शेंडे यांनी समान विकास व बांधकाम नियमावलीवर भाष्य केले तसेच महाराष्ट्रातील नगर नियोजनातील येऊ घातलेल्या सुधारणांची माहितीही दिली.  महारेराचे अध्यक्ष गौतम चटर्जी यांच्याशी सदस्यांच्या थेट संवादाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. यात  चटर्जी यांनी रेरा कायद्याचे विवेचन करून उपस्थितांच्या शंकांना उत्तरे दिली.  चटर्जी म्हणाले, की ३१ जुलै २०१७ पर्यंत ताबा प्रमाणपत्र मिळणाऱ्या प्रकल्पांसाठी नोंदणी करण्याची गरज नाही. त्यांनी सदस्यांना नोंदणीचे फायदेही स्पष्ट करून सांगितले.

भारतातील आघाडीच्या शोभा ग्रुपचे उपाध्यक्ष जी. सी. शर्मा यांनी भारतात बांधकाम उद्योगाचे भवितव्य उज्ज्वल असल्याचे स्पष्ट केले आणि या क्षेत्रातील वित्तीय शिस्तीच्या टीप्स दिल्या. प्रसिद्ध आर्किटेक्ट हाफीस काँट्रॅक्टर यांनी परवडणाऱ्या घरांबाबत दृष्टिकोन मांडला.

या दोन दिवसांच्या कार्यक्रमात परवडणारी घरे, कागदपत्रे बनवतानाची (ग्राहक/सोसायटी/अपार्टमेंट) मुख्य कलमे, व्यवसायवाढीची रणनीती, व्यापक परवडणाऱ्या घरांची बांधणी, बांधकाम व्यवसायातील आव्हाने, जीएसटीची अंमलबजावणी, गृहकर्ज आणि पंतप्रधान आवास योजना इ. विषयांवर सादरीकरणे झाली. रेरावरील एक खुली चर्चाही यावेळी झाली.

या परिषदेच्या निमित्ताने जीएसटीची सांगोपांग माहिती देणारे पुस्तक श्री. कटारिया यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. पुढील महाकॉन डिसेंबरमध्ये नाशिकमध्ये घेण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून ना. पाटील यांचे अभिष्टचिंतन ना. चंद्रकांतदादा पाटील...

वारकरी संप्रदायाच्या गुणात्मक वृद्धीसाठी अभ्यासक्रमाची गरज

वारकरी संप्रदाय तत्वज्ञानावर आधारित वर्धिष्णु संप्रदाय ह. भ. प. योगीराज...

श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनच्या पर्यटन विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

श्री हरिहरेश्वर, मारळ, श्रीवर्धनचे प्रस्ताव केंद्र सरकारच्या ‘प्रसाद’ योजनेसाठी...