पुणे :- गोयल गंगा फाऊंडेशनतर्फे पंढरपूरला जाणाऱ्या पालखी सोहळ्यात गोयल गंगा इंटरनॅशनल स्कूल मधील १००हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दरवर्षीप्रमाणे विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांशी बोलून स्वच्छता आणि आरोग्याचे महत्व समजून सांगितले. शिवाय विद्यार्थ्यांनी पोस्टर्स आणि पथनाट्यातून स्वच्छता कशी ठेवावी ,कचरा कुंडीत टाकला जावा,पाण्याचे संवर्धन कसे करावे याची देखील माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांच्या दुकानाजवळ उभे राहून कचरा गोळा करत वारकऱ्यांना स्वच्छतेविषयी माहिती दिली.
विद्यार्थ्यांनी पंढरीच्या दिशेने प्रस्थान करणाऱ्या वारकऱ्यांना गुलमोहर,नीम,आंबा,चिंच अशा वेगवेगळ्या प्रकारचे बीजगोळे दिले. वारकरी पालखी मार्गावर ‘ज्ञानोबा, तुकोबांच्या’ जयघोषात बीजगोळे टाकतील. बीजगोळ्यावर जेव्हा पावसाचा शिडकावा होईल आणि ते जमिनीत रुजून वृक्षसंवर्धनाचा हेतू साध्य होईल.
मोठया उत्साहाने भक्तीमय वातावरणात विद्यार्थ्यांनी जगतगुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळयात सहभागी झाले यावेळी शाळेच्या विश्वस्त सोनू गुप्ता ,मुख्याध्यापिका भारती भागवानी, तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.