Home Blog Page 3317

रमजान ईद उत्साहात साजरी

0

पुणे- रमजान ईद  येथे उत्साहात साजरी झाली  . यावेळी सकाळी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवानी सामूहिक नमाज पठण केले .  पहिली नमाज मौलाना निजामुद्दीन फकरुद्दीन हे सामूहिक नमाज पठण केले  . त्यानंतर गर्दीवाढल्याने दुसरी नमाज पठण करण्यात आले .यावेळी नमाज पठण करण्यासाठी   ईदगाह मैदानाचे विश्वस्त  निझाम काझी , जैन्नुल काझी , रफिक शेख , अब्दुला काझी , बदर काझी , झकी शेख आदींनी ईदगाहच्या साफसफाई परिश्रम घेत घेतले .

यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट शांतता समिती , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड , पुणे महानगरपालिका , पुणे शहर पोलिस आयुक्त कार्यालयाच्यावतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट , महापौर मुक्ता टिळक  राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे , पुणे शहर पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला , सह पोलिस आयुक्त रवींद्र कदम , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड , नगरसेवक विनोद मथुरावाला ,आमदार जयदेवराव गायकवाड , माजी आमदार मोहन शिंदे , माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे , नगरसेविका मनिषा संदीप लडकत , क्रीडा समिती अध्यक्ष सम्राट थोरात , ताहेर आसीइकबाल अन्सारी ,मुस्ताक पटेल , अमानत शेख पुणे कॅन्टोन्मेंट शांतता समितीचे सदस्य बापूसाहेब गानला , इसहाक जाफर ,प्रविण गाडे  नगरसेवक अजय खेडेकर , नगरसेवक रफिक शेख आदी , छत्रपती शिवाजी मार्केटचे सदस्य युसूफ बागवान मान्यवर उपस्थित होते .

यावेळी लष्कर भागात मुस्लिम बांधवानी मस्जिद बाहेर नमाजनंतर गळा भेट करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या . त्यानंतर घरोघरी शीरखुर्माचा आस्वाद घेउन रमजान ईद साजरी झाली . यावेळी मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान केले होते . तर एकमेकांना अत्तरे लावण्यात आली . त्यामुळे वातावरणात एकमेकांविषयी बंधुभाव निर्माण करण्याचा संदेश रमजान  ईदद्वारे देण्यात आला . ठिकठिकाणी विविध सामाजिक संस्थांनी गुलाब पुष्पे देउन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या . भारतीय जनता पक्षाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विभागाच्यावतीने बाबाजान नगर येथे रमजान ईदनिमित्त बशीर शेख यांच्याहस्ते शीरखुर्मा देण्यात आला . यावेळी माजी नगरसेवक मनिष साळुंके , दिनेश नायकू , किरण क्षीरसागर , उमेश शिंदे आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .

सायंकाळी पुणे लष्कर भागातील महत्मा गांधी रोड , ईस्ट स्ट्रीट , सेंटर स्ट्रीट , कुरेश नगर , भीमपुरा गल्ली , साचापीर स्ट्रीट या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती . तर हॉटेल्समध्ये खवैय्यांनी गर्दी केली होती .

बालगंधर्वांच्या गायकीत भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचे दर्शन घडते

0

पुणे, – बालगंधर्वांच्या गायकीचे वैशिष्ट्य खुप वेगळे होते असे आपण नेहमी म्हणतो पंरतू ते वेगळेपण शब्दात मांडायचे झाल्यास बालगंधर्वांच्या गायकीत भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचे दर्शन घडते, अशा शब्दात प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांनी बालगंधर्वांच्या गायीकेचे वर्णन केले.
अनुबंध प्रकाशन आणि संवाद संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बालगंधर्वांच्या 130 व्या जंयतीनिमित्त आणि बालगंधर्व नाट्यगृहाच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त व्यंकटेश श्रीपाद राजहंस लिखित ‘असा हा राजहंस’ या पुस्तकाच्या प्रकाशन संमारंभ प्रसंगी आनंद भाटे बोलत होते. डॉ. माधवी वैद्य यांनी या आत्मकथनपर पुस्तकाचे संपादन केले आहे. यावेळी ज्येष्ठ किर्तनकार चारुदत्त आफळे, सुमती दसनूरकर, व्यकंटेश राजहंस यांची कन्या नीलांबरी बोरकर, किर्ती शिलेदार, मेघराज राजेभोसले, निकिता मोघे, लता शिलेदार, सुनिल महाजन, अनिल कुलकर्णी आदी उपस्थित होते.
भाटे म्हणाले की, माझे पणजोबा बालगंधर्वांचे समकालीन होते. त्यामुळे लहानपणापासूनच मी आमच्या घरात बालगंधर्वांची गायकी, शैली आदी चर्चा ऐकत आलो आहे. बालगंधर्व हे माझ्यासाठी कुठल्या दैवतापेक्षा कमी नाहीत. यावेळी भाटे यांनी ‘एकच प्याला’ या नाटकातील ‘प्रभो जी गमला मनी तोषिला’ ही भैरवी सादर केली.
डॉ. वैद्य म्हणाल्या की, बालगंधर्व परिवाराशी आमचे फार जुणे ऋणानुबंध असून या पुस्तकाच्या संपादनाच्या कामामुळे मी थोडे तरी त्या कुटुंबाच्या ऋणातून मुक्त होईल असे वाटते. या पुस्तकाचे हस्तलिखीत बालगंधर्वांच्या सख्या भावाने लिहिले आहे आणि त्या हस्तलिखीताचे संपादन करुन पुस्तकरुपाने बालगधर्वांच्या चाहत्यांसमोर मांडत आहे. हे केवळ पुस्तक नसून हा एक ऐतिहासीक दस्तावेज आहे, हे पुस्तक वाचकांसमोर आणतांना कथात्मक स्वरुप अवलंबण्यात आले असून त्या काळातील भाषा वापरून तो भूतकाळ भविष्यकाळाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. बालगंधर्वांच्या कुटुंबियांनी त्यांच्याकडील दस्तावेज जपून ठेवल्यामुळेच हा दस्तावेज आपल्या हाती पडला आहे. या निमित्ताने अशा दिग्गज पंरपरेशी जोडलेल्या कुटुंबियांनी त्यांच्याकडील दस्तावेज जपावे आणि योग्य व्यक्तीच्या हाती योग्य त्या वेळी सुपूर्त करुन पुढील पिढीला अभ्यासाला उपलब्ध करुन द्यावे.
कार्यक्रमाच्या पूर्वार्धात पूर्वाश्रमीचे रमणबागेचे शिक्षक ज्येष्ठ किर्तनकार चारुदत्त आफळे यांचा ‘मम आत्मा गमला’ हा नाट्यसंगीताचा कार्यक्रम रंगला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिल महाजन यांनी केले.

कविता आणि रुबायांनी रंगलेली ‘जिना बिलोरी’ काव्यमैफल

0
पुणे —
              ‘एकीकडे बाहेर पडणारा खरा पाऊस आणि त्याचवेळी दुसरीकडे मसापच्या पटवर्धन सभागृहात पडत असलेला आशयघन कवितांचा पाऊस यामुळे रसिक श्रोते आनंदरसात भिजून चिंब झाले होते. निमित्त होते ‘सेतू’ तर्फे गुंफण्यात आलेल्या ‘कविता माझी – मी कवितेचा’ या दुसऱ्या पुष्पाचे. सेतू अभिवाचन मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या काव्य मैफिलीत प्रसिद्ध कवी ‘जिना बिलोरी’ कार रमेश गोविंद वैद्य यांनी आपल्या काही निवडक कविता तसेच ‘रुबाया’ सादर केल्या.
  ” चराचरावर कसे अचानक जंतर मंतर होते, पाऊस आला म्हणजे सगळे क्षणात सुंदर होते
 ”तान्ह्या बाळाच्या गालावरील तीट म्हणजे कविता, पांडुरंगाच्या चरणतळीची वीट म्हणजे कविता” तसेच ”पाहुनि मज हासला तो शेर रे गालातुनि, नेम धरणे विसरलो मी पडली बंदूक हातूनि
वाघ म्हणतो मजसी कैसा, ‘हात तुम्हा जोडतो, बहु प्रसिद्धी दिधली ‘शेरा’ म्हणूनी प्रेमे सोडतो’ आदी विविध आशयाच्या कविता रमेश गोविंद वैद्य यांनी आपल्या खास शैलीत सादर केल्या आणि रसिक श्रोत्यांनी त्याला वेळोवेळी उत्स्फूर्त दाद दिली.     
           प्रारंभी ‘सेतू’ च्या गीतांजली जोशी यांनी प्रास्ताविक केले. याचवेळी कवी रमेश गोविंद वैद्य यांचा त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सुरेशचंद्र सुरतवाला यांच्या हस्ते ह्रदय सत्कार करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सुरेशचंद्र सुरतवाला यांनी रमेश वैद्य यांचा ‘जगावेगळा कवी’ या शब्दात वर्णन केले. याच कार्यक्रमात नीता तोरगट्टी आणि सत्यश्री मांडके या कलावतींनी वैद्य यांनी सादर केलेल्या निवडक कविता तसेच रुबायांना जलरंगाच्या माध्यमातून चित्ररूपही देण्यात आले होते.
शेवटी दीपाली दातार यांनी आभार मानले.

‘मेघदूता’चे शनिवारी नाट्यस्वरुपात सादरीकरण

0

‘मेघदूत’…कविश्रेष्ठ कालिदासरचित एक अभिजात खंडकाव्य! देशातील बहुतेक भाषांमध्ये संगीत, नृत्य आणि श्‍लोकांवर आधारित ‘मेघदूता’चे कार्यक्रम झाले आहेत. ‘प्रवेश’ या संस्थेने ते पहिल्यांदाच मराठी रंगभूमीवर नाट्यस्वरुपात सादर केले आहे. आमदार मेधा कुलकर्णी यांच्या संयोजनातून येत्या शनिवारी (ता. १ जुलै) सकाळी ९ वाजता कोथरुडच्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग सादर केला जाणार आहे.
पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, रा. स्व. संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, राज्याच्या सांस्कृतिक विभागाचे सचिव संजय पाटील, राजकीय विश्‍लेषक अभिनंदन थोरात, संस्कार भारतीचे सचिव सारंग कुलकर्णी, नाट्यविद्या विभागाचे प्रमुख योगेश सोमण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
इ. स. चौथ्या ते सहाव्या शतकादरम्यान ‘मेघदूता’ची निर्मिती झाली असावी असे मानले जाते. सुमारे १११ कडव्यांच्या या रचनेचे ‘पूर्वमेघ’ आणि ‘उत्तरमेघ’ असे दोन भाग आहेत. रामगिरीतील विरह व्याकुळ यक्षाने अलकापुरीला जाऊन आपल्या प्रेयसीला आपले क्षेमकुशल सांगणारा संदेश घेऊन जाण्याची वर्षा ऋतूतील मेघाला केली आहे. या मार्गातील डोंगरदर्‍या, नद्या, तिथला निसर्ग, रम्य परिसर याचे वर्णन पूर्वमेघात करण्यात आले आहे. उत्तरमेघात यक्षाने विरहवण्यात होरपळणार्‍या आपल्या पत्नीला द्यावयाचा उत्कट संदेश कथन केला आहे.
भरत नाट्यम व कथक अशी मिश्र नृत्य शैली आणि सारंगी, सतार, सरोद, तबला, पखवाज अशा केवळ पारंपरिक वाद्यांचा वापर हे या नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. प्रथम पटवारी यांनी लेखन केले असून, निखिल शेटे निर्माता व दिग्दर्शक आहे. जयदीप वैद्य आणि शमिका भिडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त अभिवादन

0

पुणे :

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. माजी महापौर दत्ता एकबोटे यांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला.

या वेळी ऍड. औदुंबर खुने -पाटील, शंकर शिंदे, किरण रानडे, सुरेश पवार, योगेश वराडे, मिलिंद वालवडकर, रणजीत निंबाळकर, सुकेश पासलकर, बाळासाहेब ढमाले, संजय गाडे आदी उपस्थित होते.

34 व्या ग्लेनमार्क सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धा 28 जूनपासून

0
  • भारतीय जलतरण महासंघा तर्फे 44व्या कुमार राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचेही आयोजन

 

पुणे: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र स्टेट अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅक्वेटिक असोसिएशन तर्फे  येत्या 28 जून ते 6 जुलै 2017 या कालावधीत 34व्या ग्लेनमार्क सब-ज्युनिअर आणि 44व्या कुमार राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचे शहरांत आयोजन करण्यात आले आहे. श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे होणार्‍या या स्पर्धेच्या निमित्ताने 2015 नंतर जलतरण स्पर्धेचे पुण्यात पुनरागमन होत आहे. प्रामुख्याने जलतरण,डायव्हिंग आणि वॉटरपोलो या क्रीडा प्रकारांमध्ये होणार्‍या या स्पर्धेत देशभरातील 1400 हुन अधिक जलतरणपटू सहभागी होणार आहेत,अशी माहिती पत्रकार परिषदेत महाराष्ट्र स्टेट अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅक्वेटिक असोसिएशनचे सचिव जुबिम अमेरिया,आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू व आयआयएफएसचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश कुलकर्णी, ग्लेनमार्क अ‍ॅक्वेटिक फाऊंडेशनचे तांत्रिक संचालक पीटर गारट्रेल,स्वीमिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव कमलेश नानावटी आणि महाराष्ट्र स्टेट अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅक्वेटिक असोसिएशनचे अध्यक्ष अभय दाढे यांनी दिली.

 

टोकियो 2020 ऑलिंपिक मध्ये जलतरण क्रीडा प्रकारात तीन पदकांची अधिक भर पडणार असल्यामुळे एकूण ऑलिंपिक सुवर्णपदकांच्या संख्येत जलतरणाने अ‍ॅथलेटिक्स ला मागे टाकले आहे.आता अ‍ॅथलेटिक्समध्ये 48 पदके तर, जलतरण प्रकारात 49 ऑलिंपिक पदके असतील.

 

पुण्यातील सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धा 28 ते 30 जून 2017 दरम्यान पार पडणार आहे. तर, कुमार राष्ट्रीय जलतरण स्पर्धा 3 ते 6 जुलै 2017 या कालावधीत होणार आहे. यांतील सर्व क्रीडाप्रकारांच्या स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे होणार आहे. तसेच, यातील सर्व प्राथमिक फेर्‍या सकाळच्या सत्रात सकाळी 8 वाजल्यापासून होणार असून अंतिम फेर्‍या सायंकाळी 5 पासून घेण्यात येणार आहेत.डायव्हिंग राष्ट्रीय स्पर्धा सब-ज्युनिअर स्पर्धेदरम्यान होणार असून राष्ट्रीय वॉटरपोलो स्पर्धा कुमारांच्या स्पर्धेदरम्यान होणार आहे. सर्व स्पर्धांचे थेट प्रक्षेपणwww.glenmarkaquatic.org या संकेत स्थळावरून केले जाणार आहे. दररोजचे निकाल व स्पर्धांची सविस्तर माहितीwww.swimmingfederation.in या संकेत स्थळावर उपलब्ध असणार आहे. तसेच, @nacindia या ट्विटर हँडलवर स्पर्धेचे लाईव्ह अपडेटस उपलब्ध असणार आहेत.

 

स्पर्धेत महाराष्ट्रातील नील रॉय,मिहिर आंब्रे,त्रिशा कारखानीस,आर्यन भोसले,केनिषा गुप्ता,अंशुमन जिंग्रन,पलक धमी,वेदिका अमीन,संजिती शहा,अपेक्षा फर्नांडिस यांसह श्रीहरी नटराज,प्रसिदा कृष्णा,तनिष जॉर्ज,नयन विघ्नेश,उत्कर्ष पाटील,क्रीश सुकुमार,मयुरी लिंगराज,खुशी दिनेश,रिध्दी बोरा,नीना वेंकटेश,रिधिमा कुमार हे मानांकित खेळाडू आपले कौशल्यपणाला लावणार आहेत.

 

ग्लेनमार्क अ‍ॅक्वेटिक फाऊंडेशन हा ग्लेनमार्क फार्मास्युटीकल्स लिमिटेड या उदयोगसमूहाचा औद्योगिक सामाजिक उपक्रम आहे. या उपक्रमाच्या आणि स्पर्धेच्या माध्यमातून ग्लेनमार्कने देशांतील जलतरण क्षेत्रासाठी आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे. याशिवाय ग्लेनमार्क फाऊंडेशनच्या वतीने मुंबई येथे हाय परफॉर्मन्स अ‍ॅक्वेटिक सेंटर आणि दिल्ली येथे भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या माध्यमातून डॉ.एस.पी.मुखर्जी जलतरण प्रशिक्षण संकुल उभारण्यासाठी आपले योगदान दिले आहे. ग्लेनमार्कच्या वतीने संपूर्ण वर्षभर प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जातात. जीएएफ शिवाय  भारतीय क्रीडा प्राधिकरण, स्पीडो आणि निर्थापुल्स यांचेही या राष्ट्रीय जलतरण स्पर्धला साहाय्य प्राप्त झाले आहे.

 

ग्लेनमार्क सब-ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेचा उदघाटन समारंभ बुधवार, 28 जून 2017 रोजी होणार आहे. तसेच, फिना डे (जागतिक जलतरण दिन) समारंभ स्पर्धेच्या ठिकाणीच 2 जुलै 2017 रोजी साजरा करण्यात येणार असून त्याअंतर्गत खालील उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

* पाणी बचत या संकल्पनेवर आधारित मुलांसाठी खास चित्रकला स्पर्धा

* ग्लेनमार्क अ‍ॅक्वेटिक फाऊंडेशनचे तांत्रिक संचालक पीटर गारट्रेल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष जलतरण प्रशिक्षण सत्राचे आयोजन

* खास मुलांसाठी पोहायला शिका या उपक्रमाचे आयोजन

* जीव रक्षणासाठी जलतरणाचा उपयोग या प्रशिक्षण सत्राचे आयोजन

 

 

S.No Date Event
1 28/06/2017 Sub Junior Day 1  -Opening Ceremony at 4:30 pm. Chief guest Mrs. MuktaTilak, HW of Pune.
2 29/06/2017 Sub Junior Day 2
3 30/06/2017 Sub Junior Day 3 – Closing Ceremony 6 pm onwards
4 01/07/2017 Trials for the 9th Asian Age Group Championships
5 02/07/2017 World Aquatic Day celebrations
6 03/07/2017 Junior Day 1 Opening Ceremony at 4:30 pm. Chief guest Shri.SudhirMungantiwar, Minister of Finance Government of Maharashtra.
7 04/07/2017 Junior Day 2
8 05/07/2017 Junior Day 3
9 06/07/2017 Junior Day 4 Closing Ceremony at 6 pm.

 

Event No of States Total No of Athletes
34TH SUB-JUNIOR NATIONAL AQUATIC CHAMPIONSHIP 31 487
44TH GLENMARK JUNIOR   NATIONAL AQUATIC CHAMPIONSHIP.

 

31 807

कामे करू द्या , नाही तर बाहेरचाच रस्ता दाखवू .. भिमालेंची तंबी

0

पुणे- महापालिका मुख्यासाभेचा राजकीय आखाडा करून विकास कामात अडथळे निर्माण करू नका अन्यथा तुमचे निलंबन निश्चित आहे अशा स्वरूपाची तंबी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी दिली आहे ..पहा आणि ऐका नेमके त्यांनी काय म्हटले आहे ….

‘हृदयांतर’च्या कलाकारांनी पूण्यामध्ये केले चित्रपटाचे प्रमोशन!

0

‘हृदयांतर’ चित्रपटाव्दारे विक्रम फडणीस दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रात पहिले पाऊल ठेवत आहेत. कौटुंबिक भावनिक नाट्य असलेल्या ‘हृदयांतर’ चित्रपटाची सध्या आतुरतेने वाट पाहिली जात आहे. हृदयांतर चित्रपटाचे कलाकार नुकतेच ह्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पुण्यात आले होते.

पुण्यातल्या कोरेगांव पार्कमधील मेरियट सूट येथे  २४ जुनला रात्री झालेल्या बहारदार  पत्रकार परिषदेमध्ये, निर्माता-दिग्दर्शक विक्रम फडणीस आणि निर्माता पुर्वेश सरनाईक ह्यांच्यासह ह्या चित्रपटाचे कलाकार मुक्ता बर्वे, सुबोध भावे, सोनाली खरे, अमित खेडेकर, तृष्णिका शिंदे, आणि निष्ठा वैद्य उपस्थित होते.

ह्या महिन्याच्या सुरूवातीला पुण्यात झालेल्या श्यामक दावर ह्यांच्या ‘समर फंक अवॉर्डस नाईट’मध्ये विक्रम फडणीस, ह्यांच्यासह हृदयांतर चित्रपटातल्या नित्या (तृष्णिका शिंदे) आणि नायशा (निष्ठा वैद्य) ह्या दोन्ही मुलींनी आपल्या कौटुंबिक भावनिक नाट्य असलेल्या ‘हृदयांतर’ चित्रपटाचे प्रमोशन केले होते.

विक्रम फडणीस म्हणतात, “पूणे माझ्यासाठी हृदयाच्या अगदी जवळचे शहर आहे. अनेक यशस्वी फॅशन शो केल्याच्या सुंदर आठवणी मला ह्या शहराने दिल्या आहेत. आणि मला पूर्ण विश्वास आहे, की फॅशन शो प्रमाणेच आता माझा हृदयांतर चित्रपट ही इथे यशस्वी होईल.”

निर्माता पुर्वेश सरनाईक म्हणतात, “हृदयांतर चित्रपट, कुटुंब आणि नातेसंबंधांवर आधारित आहे. हा चित्रपट माझ्या हृदयाच्या अतिशय जवळचा आहे. हा चित्रपट बनवण्याची आणि पोस्ट प्रॉडक्शनची प्रक्रिया आम्ही सर्वांनीच खूप एन्जॉय केली. अनेक लोकं मला सांगतायत, की ते सध्या ह्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.”

टोएब एन्टरटेन्मेटच्या सहयोगाने बनलेली, यंगबेरी एन्टरटेन्मेट, इम्तियाज खत्री आणि विक्रम फडणीस प्रॉडक्शन निर्मित ‘हृदयांतर’ चित्रपट ७ जुलै २०१७ रोजी प्रदर्शित होणाऱ आहे. या चित्रपटात  मुक्ता बर्वे, सुबोध भावे, सोनाली खरे, तृष्णिका शिंदे, निष्ठा वैद्य, अमित खेडेकर आणि मीना नाईक  मुख्य भूमिकेत आहेत.

गावरान तुपात भेसळ- रॅकेटचा पर्दाफाश

0

पुणे-शहरात दूध व दुग्धजन्य पदार्थात विशेषतः गावरान तुपात , तेल आणि डालड्याची भेसळ करून शहरातील नामांकित दूध डेअरींना विक्री करणा-या रॅकेटचा पर्दाफाशकरण्यात आला आहे. अन्न व औषध प्रशासन व गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी शनिवारी रात्री छापा टाकून कोंढव्यातून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी जवळपास 15 लाख रुपये किमतीचे भेसळ करण्यासाठी वापरलेले साहित्य व तूप जप्त करण्यात आले.शेरसिंह रणसिंह राजपूत (वय 28) केशरसिंह शुगसिंह राजपूत (वय 28) गंगासिंह राजपूत (वय 25), अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.

गुन्हे शाखेला कोंढवा येथील गोकुळनगर परिसरात गल्ली क्रमांक तीनमध्ये एका इमारतीत गावरान तुपात भेसळ करून शहरातील डेअरींमार्फत त्याची विक्री केली जात आहे, अशी माहिती खब-यांकडून समजली होती. त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिका-यांसमवेत गुन्हे शाखेच्या युनिट 1 च्या पथकाने गोकुळनगरमधील इमारतीवर शनिवारी रात्री नऊच्या सुमारास छापा टाकला.या कारवाईत 15 लाख रुपये किमतीचे तूप व भेसळीचे साहित्य जप्त करण्यात आले. तसेच तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत त्यांची पोलीस चौकशी सुरू होती. या ठिकाणाहून भेसळ केलेले तूप गावरान म्हणून शहरातील नामांकित डेअरींना विकले जात होते, अशी माहिती पोलिसांनी दिली

पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी शैलेश काळे

0

पुणे- श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी आज का आनंदचे वरिष्ठ पत्रकार शैलेश काळे यांची रविवारी निवड झाली.

पुणे श्रमिक पत्रकार संघ वार्षिक निवडणूक 2017-18 साठी आज मतदान झाले. अध्यक्षपदासाठी सार्वमतचे राजेंद्र पाटील, आज का आनंदचे शैलेश काळे, लोकमतच्या नम्रता फडणीस व महाराष्ट्र टाईम्सचे सुजित तांबडे यांच्यात चुरस होती. प्रत्यक्षात शैलेश काळे यांनी सुरुवातीपासून आघाडी घेत मोठा विजय प्राप्त केला.

दुसरीकडे सरचिटणीसपदी पुढारीचे दिगंबर दराडे निवडून आले. तर खजिनदारपदी सामनाच्या विठ्ठल देवकाते यांनी बाजी मारली. चिटणीसपदी तरुण भारत, बेळगावचे सुकृत मोकाशी, सामनाचे अभिजीत बारभाई यांनी सरशी साधली.

उपाध्यक्षपदाकरिता सी न्यूजचे हेमंत जाधव, सकाळचे सुभाष खुटवड निवडून आले. या निवडणूक प्रक्रियेत एकूण 498 मतदारापैकी 432 मतदारांनी मतदान करून आपला सहभाग नोंदवला.

शैलेश काळे – अध्यक्ष

हेमंत जाधव – उपाध्यक्ष

सुभाष खुटवड – उपाध्यक्ष

विठठल देवकाते – खजिनदार

दिगंबर दराडे –   सरचिटणीस

अभिजित बारभाई – चिटणीस

सुकृत मोकाशी – चिटणीस

कार्यकारिणी

हिरा सरवदे

अजय रासकर

अमोल मचाले

अमोल एलमार

प्रज्ञा केळकर

विनोद इंगोले

महेंद्र कांबळे

शाम सावंत

प्रमोद जाधव

विजय म्हस्के

समुद्राचे अवखळ रूप- आजची सुट्टी फुल्ल एन्जॉय (व्हिडीओ)

0

मुंबई-पावसाळ्यात समुद्राचे अवखळ रूप दिसले नाही तर नवल .. जशी भीती तसा आनंद हि मिळतो … रौद्र रुपा  पासून सावध राहत समुद्राच्या अवखेळते बरोबर सुट्टी एन्जॉय करण्यास आज अनेक मुंबईकरांनी पसंती दिली .

दरम्यान मुंबई सह ठाणे, पालघर या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कळवा स्थानकाजवळ पाणी साचल्याने मध्य रेल्वेच्या धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.मुंबई उपगनर, ठाणे, पालघर, मीरा-भाईंदर या शहरांमध्ये शनिवारी रात्रीपासून पावसाने जोर धरला . पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. कळवा स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने धीम्या मार्गावरील वाहतूक मंदावली होती. अप आणि डाऊन मार्गावरील लोकल ट्रेन मंदगतीने धावत होत्या. दरम्यान, रविवारी मध्य रेल्वेवर सहा तासांचा मेगाब्लॉक होता . तर अंबरनाथ- बदलापूरदरम्यानच्या पुलाची तांत्रिक दुरुस्ती कामासाठी सकाळी ९ ते २ वाजेपर्यंत रेल्वे सेवा बंद होती

रमजान ईदच्या खरेदीसाठी पुणे लष्कर परिसराची बाजारपेठ गर्दीने फुलली

0

पुणे – रमजान ईद जवळ येत आहे तशी पुणे लष्कर बाजारपेठ गर्दीने फुलली आहे . पुणे लष्कर भागात छत्रपती शिवाजी मार्केट परिसरात रमजान ईदसाठी प्रसिध्द असलेला शिरकुर्म्यासाठी शेवया , सुका मेवा खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे . त्यासाठी पूर्वतयारी करण्यासाठी शिरकुर्म्याचे सर्व साहित्य मुस्लिम बांधव खरेदी करतात . या शेवयांमध्ये बनारस , खिमाजी , गाठी , लच्चा , फेणी आदी शेवया ग्राहक खरेदी करण्यासाठी गर्दी करत आहेतअशी माहिती अन्वर बागवान यांनी दिली .

रमजान ईदसाठी खास अत्तरे देखील बाजारपेठेत दाखल झालेली आहेत . यामध्ये मोखलक मलादी , मालिका अल अरब , कशका , रकान, विसाल , नसीन आदी अरबी अत्तरे ग्राहक घेण्यासाठी पसंत करीत आहेत . त्यानंतर योगो बॉस , डिझायर , कुलवॉटर , पोलो ब्लॅक , वन मॅन शॉप आदी फ्रेंच अत्तरे देखील ग्राहकी पसंत करीत आहेत . अशी माहिती नफीज फ़रफ्युमसचे सुजा कुरेशी यांनी दिली .

 मेहंदी आणि बांगड्या , पर्सेस , कपडे घेण्यासाठी महिलां गर्दी करीत आहेत . यामध्ये मेहंदी कोन , नखांची मेहंदी , केसांची मेहंदी , डिलक्स मेहंदी महिला या मेहंदी खरेदी करण्यासाठी  पसंती देतात . तसेच सुरमा देखील मागणी असते .

महिला बांगड्या खरेदीसाठी वेलवेट , हैदराबादी सेट , जम्बो सेट , जरीच्या , मोती सेट बांगड्या खरेदी करण्यासाठी जास्त पसंती देत आहेत . यावर्षी ट्यूबलाईट बांगड्याना जास्ती पसंती आहे .  अशी माहिती सलमान बॅंगल्सचे संचालक सलमान शेख यांनी दिली न. तसेच पुरुषांनी पठाणी कपडे घेण्यासाठी कपड्यांच्या दुकानात गर्दी करीत आहेत . तसेच अरबी रुमाल व टोपी घेण्यास गर्दी करीत आहेत .

सर्वात गजबजलेला परिसर म्हणजे ईस्ट स्ट्रीटवरील तरुणाईची पसंत असलेली बाजारपेठ म्हणजे ” फॅशन स्ट्रीट ” याठिकाणी कपडे, बूट , चप्पल , बांगड्या , नेकलेस , घड्याळ , टोपी , गॉगल्स , पर्सेस खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे .अशी माहिती फॅशन स्ट्रीटमधील व्यापारी युसूफ शेख यांनी दिली .  रमजान ईदपर्यंत पुणे लष्कर भागातील एम. जी. रोड , सेंटर स्ट्रीट , साचापीर स्ट्रीट , ताबूत स्ट्रीट , ईस्ट स्ट्रीट , डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड , जान मोहम्मद स्ट्रीट आदी परिसर गर्दीने फुलून गेला आहे .

नामवंत कलाकारांची वाहवा मिळवतोय ‘भिकारी’ चा नवा पोस्टर

0
बहुचर्चित ‘स्वामी तिन्ही जगाचा…भिकारी’ ह्या आगामी मराठी सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकतीच सिद्धिविनायक मंदिरात एका नव्या पोस्टरद्वारे जाहीर करण्यात आली. हिंदीचे प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य दिग्दर्शित हा सिनेमा ४ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. गणपतीचे छायचित्र असलेल्या या सिनेमाच्या पोस्टरने सोशल नेट्र्वर्किंग साईटवर अल्पावधीतच मोठी प्रसिद्धी मिळवली आहे. विशेष म्हणजे टायगर श्रॉफ, वरून धवन आणि जॅकलीन फर्नाडिस यासारख्या बी-टाऊनच्या सुपरस्टार्सनी या पोस्टरची दखल आपल्या ट्विटरद्वारे घेतली असून मास्टर गणेश आचार्य यांना सिनेमाबाबत शुभेच्छादेखील दिल्या. यापूर्वी रणवीर सिंगनेदेखील आपल्या ट्वीटरद्वारे ‘भिकारी’ सिनेमाच्या पहिल्या पोस्टरचे अनावरण केले होते. तसेच मराठीतील नामवंत कलाकारांकडूनदेखील या पोस्टरला सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे.
हिंदीचे सुप्रसिद्ध कॉरीयोग्राफर गणेश आचार्य दिग्दर्शित ‘भिकारी’ सिनेमाचा हा नवा पोस्टर, अनेक गोष्टींचा खुलासा करतो. यापूर्वी छत्रीच्या आत दडलेल्या पहिल्या पोस्टरमधील व्यक्ती, मराठीचा हँडसम हंक अभिनेता स्वप्नील जोशी असल्याचे या पोस्टरद्वारे दिसून येते. एका श्रीमंत घराण्यातील युवक रस्त्यावर दयनीय अवस्थेत झोपला असल्याचे पोस्टरवर पाहायला मिळते, आपल्याकडील सारे काही हिरावून घेणाऱ्या नियतीपुढे हतबल झालेल्या तरुणाची केविलवाणी अवस्था यात दिसत असून, त्याने रेखाटलेले गणपतीचे चित्रदेखील पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेते. या चित्रावर लोकांनी टाकलेले पैसेदेखील यात पाहायला मिळत असल्यामुळे, हा पोस्टर आयुष्यातील एका बिकट परिस्थितीचा मर्म शिकवून जातो.
आतापर्यंत चॉकलेट बॉयच्या भूमिकेत दिसणा-या स्वप्नीलचा हा नवा अंदाज त्याच्या चाहत्यांना नक्कीच संभ्रमात टाकणारा आहे. मी मराठा एंटरटेंटमेंटचे शरद देवराम शेलार आणि गणेश आचार्य यांची निर्मिती असलेला हा पहिला सिनेमा असून, मराठी चित्रपटसृष्टीतील दर्जेदार सिनेमाच्या यादीत ‘भिकारी’ सिनेमाचा समवेश होण्याची दाट शक्यतादेखील वर्तवली जात आहे.

व्हीआयआयटी आता ‘सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी’शी (एसएसपीयू) संलग्न

0

पुणे: ब्रॅक्ट्स विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे (व्हीआयआयटी) सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीशी (एसएसपीयू) संलग्न स्वायत्त संस्था म्हणून कुलगुरु प्रा. (डॉ.) नितीन करमळकर यांच्या हस्ते नुकतेच औपचारिक उद्घाटन झाले.

 व्हीआयआयटीच्या प्राचार्य डॉ. (सौ.) बिलावरी करकरे यांनी कुलगुरु व अन्य मान्यवरांचे स्वागत करुन त्यांना संस्थेचा आणि तिच्या कौतुकास्पद प्रगतीचा संक्षिप्त परिचय करुन दिला. पंख फुटलेल्या अवस्थेपासून या संस्थेने स्वायत्त संस्था बनण्यापर्यंत मजल मारली असून आयएसओ प्रमाणन, एनबीए व एनएसीसी मान्यता, विविध सर्वेक्षणांत आघाडीचे मानांकन प्राप्त करत ती झपाट्याने प्रगतिपथावर वाटचाल करत आहे. यासंदर्भात डॉ. करकरे म्हणाल्या, व्हीआयआयटीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग असून विद्यार्थी, कर्मचारी, शिक्षक, माजी विद्यार्थी, उद्योग भागीदार आणि संशोधन सहयोगी आदी घटकांच्या योगदानामुळेच हे स्वप्न साकार झाले आहे. आता आमची संस्था फलिताधारित शिक्षणाच्या तत्त्वज्ञानाशी आणि उद्योगाच्या गरजांशी सुसंगत असा स्वतःचा अभ्यासक्रम आखण्यास सक्षम झाली आहे.

 ‘व्हीआयआयटी’चे उद्घाटन करताना कुलगुरु डॉ. करमळकर म्हणाले, “शैक्षणिक स्वायत्ततेबरोबरच मोठी जबाबदारी आणि आव्हानेही पेलावी लागतात. व्हीआयआयटीने अध्ययन संस्कृती आणि संशोधनाच्या जोरावर स्वतःचा ठसा उमटवला आहे. या संस्थेत स्वायत्तता यशस्वी करुन दाखवण्याचे सुप्त सामर्थ्य असून अशाच प्रकारे स्वायत्ततेची आकांक्षा असणाऱ्या इतर संस्थांसाठी ती आदर्श ठरेल. अध्यापन व अध्ययनातील सर्वोत्तम प्रथांची देवाण-घेवाण व आविष्कार घडवण्याचे ध्येय ठेवल्याने ‘व्हीआयआयटी’ ही देशभरातील शिक्षणाचा दर्जा अद्ययावत करण्यासाठी मोलाचा ठेवा बनली आहे.” उद्योगांच्या व विद्यार्थ्यांच्या गरजांशी सुसंगत असा आंतरशाखीय अभ्यासक्रम बनवण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. ‘व्हीआयआयटी’ झपाट्याने झेपावत आपले ध्येय भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ व ‘डिजीटल इंडिया’ पुढाकारांशी जुळवून घेईल, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

 संस्थेचे बी.टेक व एम.टेक शिक्षणक्रम जागतिक गरजांशी सुसंगत अभ्यासक्रमावर आधारित असून शैक्षणिक उत्कृष्टता, नेतृत्व कौशल्य आणि सामाजिक जबाबदारीला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने त्यांची रचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांत त्यामुळे जागतिक व स्थानिक अशा दोन्ही प्रश्नांबाबत जाणीव निर्माण होते आणि समस्यांवर अभिनव उत्तरे शोधून काढण्यासाठी महत्त्वपूर्ण विचार कौशल्ये वापरण्यासही त्यामुळे उत्तेजन मिळते. हा अभ्यासक्रम भावी पिढीतील नेते घडवण्यासाठी उद्योग आणि नामवंत संस्थांतील तज्ज्ञांच्या सहयोगाने विद्यार्थ्यांसाठी खास विकसित केलेल्या अभ्यासाच्या अन्य पैलूंनी मजबूत आहे. असा मजबूत सह-अभ्यासात्मक शिक्षणक्रम नेतृत्व कौशल्य वापरण्यासाठी संधी पुरवतो आणि शैक्षणिक मागण्यांचे क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, उद्योजकीय कौशल्ये व समाज सेवा यांच्याशी संतुलन साधत सर्वांगीण विकास घडवतो.

 कुलगुरु डॉ. करमळकर यांनी यावेळी ‘व्हीआयआयटी’च्या प्रगतीत सहयोग देणाऱ्या व्यक्तींचा प्रातिनिधीक सत्कार केला व त्यात उद्योग भागीदार अभियंते नीलकंठ जोशी, संशोधन सहयोगी व ‘टीआयएफआर’चे शास्त्रज्ञ डॉ. शशिकांत दुग्गड, ‘व्हीआयआयटी’चे माजी विद्यार्थी रघुनाथ शुक्ल, हेमंत दुसाने व आदर्श केदारी यांना गौरवले.

 ‘ब्रॅक्ट’च्या विश्वस्त सौ. अमिता आगरवाल यांनी एसपीपीयूचे कुलसचिव डॉ. ए. डी. शाळिग्राम, परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. अशोक चव्हाण, तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. ए. एस. अभ्यंकर व उप कुलसचिव सौ. एस. एस. अत्रे यांचा सत्कार केला.

 ‘एसपीपीयू’, ‘इस्रो’, ‘इन्कॉइस’ आदी संस्थांकडून मिळालेल्या अर्थसाह्याने ‘व्हीआयआयटी’ने हाती घेतलेल्या संशोधन मोहिमेबाबत उद्घाटनाआधी कुलगुरुंना माहिती देण्यात आली. या पुढाकारामुळे उद्योगाभिमुख, बहूशाखीय प्रकल्पांची संख्या वाढली असून त्यातूनच उद्योगांना आवश्यक असणाऱ्या तंत्रकौशल्यांनी संस्थेतील विद्यार्थी सुसज्ज झाले आहेत.

 विश्वकर्मा इन्स्टिट्यूटचे कार्यकारी संचालक भरत आगरवाल उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी अभिनंदनाचा संदेश पाठवला. त्यात ते म्हणतात, “तंत्रशिक्षणातील उत्कृष्टतेचे ध्येय बाळगून व्हीआयआयटीची स्थापना करण्यात आली आहे. व्यावसायिकता व जबाबदार नागरिकत्वाच्या चैतन्याने परिपूर्ण असे सक्षम अभियंते विकसित करावेत, ज्यांच्यात उद्योग, उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रांच्या सध्याच्या व भविष्यातील गरजांना प्रतिसाद देण्याचे कौशल्य असेल आणि देशाच्या भवितव्यात योगदानासाठी सक्षम बनण्यासाठी त्यांच्यात नैतिकता व व्यावसायिक जबाबदारीची तीव्र जाणीव असावी, हे संस्थेचे उद्दिष्ट्य आहे. व्हीआयआयटी आपल्या स्वायत्त अभ्यासक्रमात राबवू पाहात असलेल्या अनुभवात्मक शिक्षण (एक्स्पिरियन्शियल लर्निंग) या संकल्पनेनेच येथील शैक्षणिक प्रयत्नांचे अद्वितीयत्व व वेगळेपण स्पष्ट झाले आहे. संस्थेचे व्यवस्थापन तिच्या ध्येयधोरणांशी उत्तम समरस असून हे ध्येयधोरण आपल्या कॅम्पसबाहेरही ज्ञात व्हावे, यासाठी मदत करत आहे.”

 स्वायत्त संस्था बनणे हा ‘व्हीआयआयटी’च्या मुकूटातील आणखी एक मानाचा तुरा असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करुन ‘ब्रॅक्ट’चे मुख्य कामकाज अधिकारी डॉ. बिपीन सुळे म्हणाले, “यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या उत्कृष्टता प्राप्त करण्याबाबत शिकवले जाईलच, परंतु अभ्यासक्रमेतर व सह-अभ्यासक्रमात्मक उपक्रमांत सहभागी करुन त्यांचा सर्वांगीण व्यक्तीमत्त्व विकास घडवण्यावरही भर दिला जाईल. हीच जीवन कौशल्ये विद्यार्थ्यांना जागतिक आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी खऱ्या अर्थाने सज्ज बनवतील.”

देशाच्या प्रगती साठी दुवा मागावी : पालकमंत्री गिरीश बापट पालकमंत्री गिरीश बापट यांच्या तर्फे रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन

0

पुणे : रमजानच्या पवित्र महिन्यात मागितलेली दुवा कबुल होत असल्याने देशाच्या प्रगतीसाठी दुवा मागावी अशी भावना पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली. मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यातील उपवासाच्या निमित्ताने मंत्री बापट यांच्याकडून सर्वधर्मीय रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. अल्पबचत भवन मध्ये हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी आमदार माधुरी मिसाळ, माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, बाळासाहेब शिवरकर उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे,पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी,जिल्हाधिकारी सौरभ राव, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पोलीस उपायुक्त डॉ. प्रवीण मुंडें, सीआयडीचे डीआयजी सुनिल रामानंद, मौलाना निजामुद्दीन,मौलाना मुफ्ती शाहिद, मौलाना अक्रम मदारी, शिक्षण तज्ञ पी.ए.इनामदार,जेष्ठ पत्रकार विजय बाविस्कर, नंदकुमार सुतार, निवृत्त पोलीस अधिकारी अशोक धिवरे, शिवसेनेचे अजय भोसले, माजी नगरसेवक रशीद शेख, उद्योजक विठ्ठल मणियार, समाजसेवक दत्ता गायकवाड, कलाकार अन्वर कुरेशी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमात आयसीएसईच्या बोर्डात बारावीला ९३  टक्के गुण मिळवणाऱ्या फरदिन खान तसेच दहावीला ९१ टक्के गुण मिळवणाऱ्या अलिना शेख यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. फर्दीन हा मूळचा काश्मीरचा असून शिक्षणासाठी तो पुण्यात आला आहे. मंत्री बापट यांनी या दोघांना खजूर भरवून रोजा इफ्तार सोडला. या नंतर मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केला.

यावेळी बोलताना श्री बापट म्हणाले,रमजान हा पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात मागितलेली दुवा मान्य होते. या पवित्र महिन्यात उपवास करून आल्लाचा आशीर्वाद प्राप्त होत असल्याने देशाच्या प्रगती साठी तसेच सर्वांच्या कल्याणासाठी आशीर्वाद मागावा अशी भावना व्यक्त केली .आपल्या सर्वांनी केलेली दुवा कबूल होऊन देशाची उत्तमोत्तम प्रगती होत राहील असेही ते म्हणाले.

सर्वाना सोबत घेवून सर्वांचा विकास करण्याचा पालकमंत्री बापट यांचा नेहमी प्रयत्न असतो. त्यामुळेच पुण्यात त्यांच्याविषयी एक आदर आहे. त्यांच्यावर असलेल्या प्रेमामुळेच इतक्या मोठ्या प्रमाणात जनसमुदाय या कार्यक्रमाला उपस्थित आहे. असे मौलाना निजामुद्दीन यावेळी म्हणाले.