पुणे —
‘एकीकडे बाहेर पडणारा खरा पाऊस आणि त्याचवेळी दुसरीकडे मसापच्या पटवर्धन सभागृहात पडत असलेला आशयघन कवितांचा पाऊस यामुळे रसिक श्रोते आनंदरसात भिजून चिंब झाले होते. निमित्त होते ‘सेतू’ तर्फे गुंफण्यात आलेल्या ‘कविता माझी – मी कवितेचा’ या दुसऱ्या पुष्पाचे. सेतू अभिवाचन मंचातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या काव्य मैफिलीत प्रसिद्ध कवी ‘जिना बिलोरी’ कार रमेश गोविंद वैद्य यांनी आपल्या काही निवडक कविता तसेच ‘रुबाया’ सादर केल्या.
” चराचरावर कसे अचानक जंतर मंतर होते, पाऊस आला म्हणजे सगळे क्षणात सुंदर होते
”तान्ह्या बाळाच्या गालावरील तीट म्हणजे कविता, पांडुरंगाच्या चरणतळीची वीट म्हणजे कविता” तसेच ”पाहुनि मज हासला तो शेर रे गालातुनि, नेम धरणे विसरलो मी पडली बंदूक हातूनि
वाघ म्हणतो मजसी कैसा, ‘हात तुम्हा जोडतो, बहु प्रसिद्धी दिधली ‘शेरा’ म्हणूनी प्रेमे सोडतो’ आदी विविध आशयाच्या कविता रमेश गोविंद वैद्य यांनी आपल्या खास शैलीत सादर केल्या आणि रसिक श्रोत्यांनी त्याला वेळोवेळी उत्स्फूर्त दाद दिली.
प्रारंभी ‘सेतू’ च्या गीतांजली जोशी यांनी प्रास्ताविक केले. याचवेळी कवी रमेश गोविंद वैद्य यांचा त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त सुरेशचंद्र सुरतवाला यांच्या हस्ते ह्रदय सत्कार करण्यात आला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सुरेशचंद्र सुरतवाला यांनी रमेश वैद्य यांचा ‘जगावेगळा कवी’ या शब्दात वर्णन केले. याच कार्यक्रमात नीता तोरगट्टी आणि सत्यश्री मांडके या कलावतींनी वैद्य यांनी सादर केलेल्या निवडक कविता तसेच रुबायांना जलरंगाच्या माध्यमातून चित्ररूपही देण्यात आले होते.
शेवटी दीपाली दातार यांनी आभार मानले.