पुणे- रमजान ईद येथे उत्साहात साजरी झाली . यावेळी सकाळी ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवानी सामूहिक नमाज पठण केले . पहिली नमाज मौलाना निजामुद्दीन फकरुद्दीन हे सामूहिक नमाज पठण केले . त्यानंतर गर्दीवाढल्याने दुसरी नमाज पठण करण्यात आले .यावेळी नमाज पठण करण्यासाठी ईदगाह मैदानाचे विश्वस्त निझाम काझी , जैन्नुल काझी , रफिक शेख , अब्दुला काझी , बदर काझी , झकी शेख आदींनी ईदगाहच्या साफसफाई परिश्रम घेत घेतले .
यावेळी पुणे कॅन्टोन्मेंट शांतता समिती , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड , पुणे महानगरपालिका , पुणे शहर पोलिस आयुक्त कार्यालयाच्यावतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष बापट , महापौर मुक्ता टिळक राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , , उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे , पुणे शहर पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला , सह पोलिस आयुक्त रवींद्र कदम , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. डी. एन. यादव , पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष अतुल गायकवाड , नगरसेवक विनोद मथुरावाला ,आमदार जयदेवराव गायकवाड , माजी आमदार मोहन शिंदे , माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर , विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे , नगरसेविका मनिषा संदीप लडकत , क्रीडा समिती अध्यक्ष सम्राट थोरात , ताहेर आसी, इकबाल अन्सारी ,मुस्ताक पटेल , अमानत शेख , पुणे कॅन्टोन्मेंट शांतता समितीचे सदस्य बापूसाहेब गानला , इसहाक जाफर ,प्रविण गाडे नगरसेवक अजय खेडेकर , नगरसेवक रफिक शेख आदी , छत्रपती शिवाजी मार्केटचे सदस्य युसूफ बागवान मान्यवर उपस्थित होते .
यावेळी लष्कर भागात मुस्लिम बांधवानी मस्जिद बाहेर नमाजनंतर गळा भेट करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या . त्यानंतर घरोघरी शीरखुर्माचा आस्वाद घेउन रमजान ईद साजरी झाली . यावेळी मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान केले होते . तर एकमेकांना अत्तरे लावण्यात आली . त्यामुळे वातावरणात एकमेकांविषयी बंधुभाव निर्माण करण्याचा संदेश रमजान ईदद्वारे देण्यात आला . ठिकठिकाणी विविध सामाजिक संस्थांनी गुलाब पुष्पे देउन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या . भारतीय जनता पक्षाच्या पुणे कॅन्टोन्मेंट विभागाच्यावतीने बाबाजान नगर येथे रमजान ईदनिमित्त बशीर शेख यांच्याहस्ते शीरखुर्मा देण्यात आला . यावेळी माजी नगरसेवक मनिष साळुंके , दिनेश नायकू , किरण क्षीरसागर , उमेश शिंदे आदी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते .
सायंकाळी पुणे लष्कर भागातील महत्मा गांधी रोड , ईस्ट स्ट्रीट , सेंटर स्ट्रीट , कुरेश नगर , भीमपुरा गल्ली , साचापीर स्ट्रीट या मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती . तर हॉटेल्समध्ये खवैय्यांनी गर्दी केली होती .