सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात दहशतवाद्यांकडून झालेल्या अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेचा राष्ट्रवा
पर्यटनस्थळी पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने उपाय योजना करणे आवश्यक : खा. वंदना चव्हाण यांची मागणी
ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्याहस्ते महापारेषणच्या उपकेंद्राचे लोकार्पण
पुणे, दि. 12 : आंबेगाव तालुक्यातील महापारेषणच्या पिंपळगाव 132/33 केव्ही अतिउच्चदाब उपकेंद्राचे लोकार्पण दि. 21 जुलैला राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा व राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते होणार आहे.
आंबेगाव तालुक्यातील महापारेषणचे पिंपळगाव (खडकी) 132/33 केव्ही उपकेंद्राची व पारेषण वाहिन्यांची सुमारे 27 कोटींच्या खर्चातून उभारणी पूर्ण झाली आहे. या उपकेंद्राला काठापूर 220 केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा होणार आहे. आंबेगाव तालुका व परिसराला सध्या 33/11 केव्ही उपकेंद्रातून वीजपुरवठा होत आहे. त्यामुळे वीजपुरवठ्यात काही तांत्रिक अडचणी उद्भवत होत्या. परंतु महापारेषणच्या या नवीन 132/33 केव्ही उपकेंद्रामुळे या सर्व परिसरातील उद्योजक, कृषीपंपधारकांसह सर्व वीजग्राहकांना यापुढे सुरळीत व योग्य दाबाचा वीजपुरवठा होणार आहे. दि. 21 जुलै रोजी सकाळी 11 वाजता राज्याचे ऊर्जामंत्री ना. श्री. चंद्गशेखर बावनकुळे यांच्याहस्ते या 132 केव्ही उपकेंद्राचे लोकार्पण होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. गिरीश बापट राहतील तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्री. शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार श्री. दिलीप वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री. विश्वासराव देवकते, उपाध्यक्ष श्री. विवेक वळसे पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.
तसेच दि. 21 जुलैला ना. श्री. चंद्गशेखर बावनकुळे हे लोकप्रतिनिधींसमवेत ऊर्जाविषयक समस्यांबाबत बैठक घेणार आहेत. सकाळी 9 वाजता शिरुर तालुक्यासाठी शिरुर येथे तर दुपारी अडीच वाजता आंबेगाव तालुक्यासाठी पंचायत समिती कार्यालय, घोडेगाव येथे बैठक होणार आहे.
आता ….बागुल- मुंडे वादंग
पुणे -महानगरपालिकेने महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीतून मोफत प्रवास योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी गेलेले काँग्रेस नगरसेवक आबा बागूल आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष तुकाराम मुंढे यांच्यात सोमवारी शाब्दिक वाद झाला ,या वेळी बागूल यांनी कर्मचाऱ्यांना धमकावून, मुंढे यांनाही दमबाजी केल्याचे पीएमपी प्रशासनाचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाच्या तक्रारीवरून बागूल यांच्या विरोधात स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.आबा बागुल यांना १५ मिनिटे आपल्या कार्यालयाबाहेर बसवून नंतर त्यांना मुंडे यांनी आत बोलाविल्याचा प्रकार हि यामुळे उघडकीस आला आहे .या पूर्वी महापौर मुक्ता टिळक ,स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्याशी खटके उडाल्यानंतर वाद वाढू नये म्हणून सत्ताधारी असलेल्या भाजपाने त्यावर पडदा टाकला होता.तेव्हा खुद्द मुख्यमंत्री च मुंडेंच्या पाठीशी असल्याचे बोलले जात होते . आता मुंडे यांचा कॉंग्रेस पक्षातील ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुलांशी वाद झाला आहे . अर्थात बागुलांना पक्षांतर्गत विरोध आहेच . पण अशा घटनेने सर्वच नगरसेवक हबकून गेले आहेत . बस बाबत कोणतीही मागणी मुंडे यांच्याकडे घेवून जायला आता कोणी धजावेल असे चित्र नाही .
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी बागूल हे पीएमपीच्या स्वारगेट येथील कार्यालयात गेले होते. पीएमपीच्या प्रवाशांना एक दिवसीय मोफत पास देण्याची योजना चर्चेत होती. त्या योजनेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यासाठी बागूल गेले होते. त्यावेळी मुंढे आणि बागुल यांच्यातील चर्चेच रुपांरत वादात झाले. त्या वेळी बागूल यांनी मुंढे यांना कार्यकर्त्यांसह उपोषण करण्याची धमकी दिली. या पार्श्वभूमीवर पीएमपी प्रशासनाने स्वारगेट पोलिस स्टेशनमध्ये सुरक्षा रक्षकामार्फत तक्रारीचे पत्र पाठविले.
या बाबत बागुल म्हणाले शहराची सार्वजनिक वाहतूक सेवा असलेल्या पीएमपीकडे नागरिक आकर्षित व्हावेत आणि खासगी वाहने न वापरता सार्वजनिक वाहतूक सेवेचा अधिकाधिक वापर वाढावा यासाठी पुणे महानगरपालिकेने महिन्याच्या शेवटच्या सोमवारी पीएमपीतून मोफत प्रवासासाठी पालिकेच्या मुख्यसभेने मान्य केलेल्या ठरावाची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही.
विशेष म्हणजे पीएमपीला तोट्यातून वाचविण्यासाठी तसेच या योजनेचा आर्थिक भार पडू नये यासाठी सुमारे पावणे दोन कोटी रुपयेही महापालिका पीएमपीएमएलला अदा करणार आहे. त्यासाठीच महिन्यातून शेवटच्या सोमवारी पीएमपीतुन मोफत प्रवास हा सार्वजनिक वाहतुकीला चालना देणारा ठरणार आहे असे असताना पीएमपी प्रशासनाची भूमिकाच नकारात्मक असल्याचे वेळोवेळी दिलेल्या निवेदनाला कोणतीही दखल न दिल्याने स्पष्ट होत आहे.
त्यामुळे करदात्या पुणेकरांच्या रकमेची लूट होऊ नये आणि पीएमपीचे तूट कमी करण्यासाठी वेळ पडली तर रस्त्यावर उतरण्यास मागे पुढे पाहणार नाही, पुणेकरांच्या हितासाठी अगदी पीएमपीसेवा रोखून आंदोलन होईल असा इशाराही आबा बागुल यांनी दिला आहे.
आरती चित्रपटाचे पोस्टर लॉन्च
मराठी सिनेमे ओळखले जातात ते त्यांच्या वास्तवदर्शी कथेसाठी. वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी स्वीकारल्यामुळे मराठी चित्रपटांचा कॅनव्हास निश्चितच मोठा झाला आहे. सत्यघटनेवर आधारित असलेल्या ‘आरती – अननोन लव्हस्टोरी’ या सिनेमातूनही प्रेमाच्या बंधाचे अनोखे पैलू उलगडणार आहेत. प्रेमकथेसोबत समर्पणाची एक अत्यंत ह्दयस्पर्शी अशी किनार या सिनेमाला लाभली आहे. सारा क्रिएशन आणि मिनीम फाऊंडेशनची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन सारिका मेणे यांनी केलं आहे. नुकतेच या सिनेमाचे पोस्टर लाँच मा. श्री. मनोहर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी मनोहर जोशी यांनी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या. त्यांच्या मते, ‘आरती – अननोन लव्हस्टोरी’चा विषय हा ‘जिद्द’ आहे. परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरीही त्यावर आपल्याला मात करता आली पाहिजे. तरुणांनी ध्येयवादी असावं, आयुष्यात आपल्याला काय करायचंय, आपली उद्दिष्ट्य काय आहेत? यावर ठाम असणं गरजेचं आहे.
प्रेमाच्या बदलत्या संकल्पनांना छेद देत एकमेकांसाठी आयुष्य पणास लावणारी ‘आरती – अननोन लव्हस्टोरी’ या चित्रपटाची कथा हृदय हेलावून टाकते. वास्तवात घडलेली ही अनोखी प्रेमकहाणी जगासमोर आणण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान या चित्रपटामागे उभ्या राहिल्या आहेत. कलेवर भरभरून प्रेम करणाऱ्या वहिदाजींनी चित्रपटाच्या सहकार्याकरिता हात दिला असून मानवी मूल्यं जपणारी ही गोष्ट सर्वांपुढे यायला हवी असं त्यांना मनापासून वाटतं. वहिदाजींना विश्वास आहे की ‘आरती – अन्नोन लव्हस्टोरी’ हा चित्रपट नात्यांची वीण अधिक घट्ट करेल.
रोशन विचारे आणि अंकिता भोईर यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून या दोघांसोबत सपना कारंडे, उमेश दामले, सुजित यादव, तेजस बने, मेघाली जुवेकर, प्रांजली वर्मा, कांचन पगारे तसेच बालकलाकार सारा मेणे आणि अनुष्का पाटील आदिंच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे सहनिर्माते शेफाली साथी आणि बानुमती सुजित आहेत. संवाद प्रभाकर भोसले यांचे आहेत. छायांकन व संकलन जोतीरंजन दास यांचं आहे. गीते सुजित यादव, तेजस बने यांची असून संगीत प्रशांत सातोसे आणि सुजित-तेजस यांचं आहे. गीते हरिहरन, आदर्श शिंदे, दिपाली साठे आणि सारा मेणे यांनी गायली आहेत. कलादिग्दर्शक महेश मेणे आहेत. कार्यकारी निर्माते सिद्धेश शेट्ये आहेत.
‘ती आणि इतर’ साठी सचिन पिळगावकर बनले गजलकार ‘शफक’
प्रबोधनाची भूमिका घेऊन रस्त्यावर उतरणाऱ्या मंगेश तेंडुलकर यांना विसरता येणार नाही :खा . वंदना चव्हाण
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे निधन
पुणे ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे रात्री उशिरा निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ७८ वर्षे वयाचे होते .व्यंगचित्राबरोबरच ललित लेख व विविध विषयांवर ते नियतकालिके व वर्तमानपत्रात लिहित. आज (मंगळवार) दुपारी एक वाजता वैकुंठ स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
मंगेश तेंडुलकर अखेरच्या क्षणापर्यंत कार्यरत होते. मागील महिन्यातच त्यांच्या व्यंगचित्रांचे प्रदर्शन पुण्यात भरले होते. त्यांच्या प्रत्येक प्रदर्शनाला उत्तम प्रतिसाद मिळत असत. प्रत्येक विषयावर ते परखडपणे भाष्य करत. व्यंगचित्राबरोबरच पुण्यातील सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातही ते हिरिरीने भाग घेत. पुण्यातील वाहतूक समस्येसाठी ते 1996 पासून कार्यरत होते .सविता चारुदत्त गोखले यांच्या ; पुणे दर्शन नावाच्या भारतातील पहिल्या खाजगी व्हिडीओ न्यूज बुलेटीन ला त्यांची व्यंगचित्रे प्रदर्शित करण्याचे काम तत्कालीन पुणे दर्शन चे संपादक आणि मुख्य वार्ताहर लोणकर बंधू यांनी केले होते . तेव्हा पासून पुण्याच्या वाहतूक विषयावर ते वेळोवेळी रस्त्यावर उतरत आले . . ते नियमितपणे कर्वे रस्त्यावर उभे राहून वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी जनजागृती करत. त्यांचा हा शिरस्ता सुरूच होता
अनेक व्यंगचित्रकारांचे प्रेरणास्त्रोत असलेले मंगेश तेंडुलकर हे समाजातील प्रत्येक घटनेकडे तटस्थपणे पाहत. वयाच्या सत्तरीनंतर त्यांनी कॅरिकेचर्स काढण्यास सुरूवात केली. या वयातही त्यांनी नवीन शिकायची उर्मी बाळगत त्यात हातखंडा मिळवला होता. त्यांनी स्वत:च्या मृत्यूवरही व्यंगचित्र काढले होते. त्यांच्यावर आज दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहे.
मंगेश तेंडुलकरांची लेखनसंपदा:
भुईचक्र
संडे मूड : (५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असलेले पुस्तक)
अतिक्रमण
कुणी पंपतो अजून काळोख
’बित्तेशां?’ ‘दांकेशां!’
त्यांना मिळालेले पुरस्कार
संडे मूड’ पुस्तकासाठी सावानाचा वि.मा.दी. पटवर्धन पुरस्कार
मसापचा चिं.वि. जोशी पुरस्कार
विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समिती बैठक संपन्न
पुणे – विभागीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक आज विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पार पडली. या बैठकीस पोलीसमहानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील, महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, तहसीलदार डी.एस.कुंभार उपस्थित होते.
या बैठकीत भ्रष्टाचाराच्या संदर्भात तीन तक्रारींवर सुनावणी झाली. महानगरपालिका, पोलीस विभागाकडील भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश यावेळी विभागीय आयुक्त दळवी यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. त्याचप्रमाणे भ्रष्टाचारासंबधी प्रलंबीत असलेल्या तक्रारींवरील कार्यवाहीचा आढावा विभागीय आयुक्त यांनी घेतला.
बैठकीला समितीचे सदस्य, पोलीस, महानगरपालिका विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
देशातील ‘ यंग अचिव्हर्स’ चा आझम कॅम्पस मध्ये सन्मान !
जोनिता गांधी, अॅश किंगचं मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण !! – ‘ड्राय डे’ चित्रपटासाठी गायलं ड्युएट गाणं
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ई -रिक्षा ‘
लीला पूनावाला फाऊंडेशनचा शालेय शिष्यवृत्ती कार्यक्रम उत्साहात संप्पन
आंबेडकरवाद्यांना एकत्र यावेच लागेल ..मल्लिका नामदेव ढसाळ (व्हिडीओ)दलित पँथर चा ४५ वा वर्धापन दिन संपन्न
पुणे-परिस्थितीचा रेटा एवढा वाढला आहे कि, आंबेडकरवादी सर्व शक्तींना संकटाशी मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही असे प्रतिपादन दलित पँथरच्या सर्वेसर्वा मल्लिका नामदेव ढसाळ यांनी येथे केले . गंज पेठमधील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित दलित पँथरच्या ४५ व्या वर्धापन दिन सोहळ्यास त्या अध्यक्षस्थानीउपस्थित होत्या . यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले .आणि आंबेडकरवाद्यांना अहंकार सोडण्याचेही आवाहन केले . (पहा नेमके ढसाळ काय म्हणाल्या व्हिडीओ)
यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन महापौर मुक्ता टिळक यांच्याहस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे , दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम , कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद , पुणे शहर अध्यक्ष गणेश रेड्डी , कवी बादशहा सय्यद ,अल्पसंख्यांक अध्यक्ष इलियास शेख , नगरसेवक सुनिल कांबळे , बाळासाहेब पडवळ , सुरेश केदारे , अनिल हातागळे ,राहुल डंबाळे , शंकर तडाखे , महाराष्ट्र राज्याचे वनप्रमुख जीतसिंग आदी मान्यवर उपस्थित होते .
. दलित पँथरच्या सर्वेसर्वा मल्लिका नामदेव ढसाळ यांनीसांगितले कि , दलित पँथरच्या नावातच वजन आहे . पँथर म्हणल्यानंतर भले भले वचकतात पँथरच्या अनेक शाखा तयार झाल्या मात्र खोड एकच आहे . पूर्ण भारतात प्रत्येक राज्यात दलित पँथर असावी . जेणेकरून दलितांवर अन्याय करणाऱ्याना वचक बसेल . दलित पँथरचे ध्येय दलित शोषितांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देणे आहे . अन्यायाच्या प्रतिकारासाठी तुमच्यातून नामदेव ढसाळ निर्माण होतील . यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले कि , पदमश्री नामदेव ढसाळांनी आपल्या चळवळीच्या तसेच लेखणीच्या माध्यमातून दलित पँथरमुळे जनतेला दलित शोषितांना न्याय मिळवून दिला आहे . अन्याय विरुध्द काम करण्याचा आत्मविश्वास दलित पँथरमुळे निर्माण झाला आहे . स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षातच पँथरने चळवळीद्वारे संविधानाच्या कायद्याचे हक्क नागरिकांना मिळवून दिले . पुणे शहराच्या ऐतिहासिक भूमीतून पँथर चळवळ उभी राहिली . यावेळी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी सांगितले कि , अन्याय होणाऱ्याविरुद्ध पँथरचे कार्यकर्ते जाब विचारायचे , गोरगरीब वंचित घटकासाठी दलित पँथरने कार्यरत राहिली . गायला मारायचे नाही माणसाला मारायचे या प्रवृत्तीविरुध्द लढण्याची ताकद एक पँथरच आणू शकतो . लाठयाकाठ्याची चळवळ सामाजिक माध्यमामध्येच चाललेली आहे . त्यासाठी हि चळवळ एका व्यासपीठावर आणणे गरजेचे आहे . या कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे स्वागत दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम यांनी केले .
अहमदाबाद चा ‘ड्रोन बॉय ‘,चेन्नईचा ‘सॅटेलाइट बॉय ‘,आणि आय सी एस इ ,जे इ इ ,एन इ इ टी .एल एल एम टॉपर्स चा होणार सन्मान
” पोटभर जेवण ” फक्त ३० रुपयात …
पुणे -कॅम्प भागातील युवकांनी एकत्रित येऊन सुरु केले ” पोटभर जेवण ” चा व्यवसाय महात्मा गांधी रोडवरील अरोरा टॉवर्स चौक येथे सुरु केला . यामध्ये अरविंद अशोकी तेजी , सोनू केमुसकर या युवकांनी आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी या युवकांनी एकत्रित येऊन लोकांना ना नफा ना तोटा तत्वावर अवघ्या ३० रुपयांमध्ये पोटभर जेवण देण्याचा व्यवसाय केला .
हे युवक स्वतः किराणा माल व भाजी खरेदी करतात . प्युअर रिफाईंड तेलामध्ये सर्व जेवण तयार केले जाते . दुपारी लष्कर भागातील विविध ऑफिसेस तसेच व्यवसायिक या पोटभर जेवणाचा आस्वाद घेतात . जसजशी दुपार होते तशी खवय्यांची गर्दी होते . अशी माहिती सोनू केमुस्कर यांनी दिली . त्यांना मदतीसाठी या युवकांची आजी सुनीता तेजी आणि मीरा चव्हाण हे मसाला बनवून देण्याचे काम करतात . गरमागरम जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी तुम्हाला पुणे कॅम्पातील एम जी रोडवरील अरोरा टॉवर्स चौकात यावे लागेल .


