पुणे :
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक वाहनांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी आणि संशोधन करण्यासाठी ‘ई -रिक्षा ‘ आणण्यात आली आहे . अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना विविध प्रयोग आणि संशोधन करण्यासाठी ई -रिक्षा वापरण्यात येणार आहे . बॅटरी ,सुपरकॅपॅसिटर .मोटर्स आणि मेकॅनिकल सिस्टिम्स चे संशोधन करण्यात येणार आहे .
भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आनंद भालेराव यांनी ही माहिती दिली .
‘संशोधनातून इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी या ई -रिक्षाचा उपयोग होईल . प्राद्यापक आणि विद्यार्थ्यांना त्यावर अनेक प्रयोग करता येतील . विद्यार्थ्यांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबत जागृती निर्माण करणे यामुळे शक्य होईल ‘ असे डॉ . आनंद भालेराव यांनी सांगितले .
‘इलेक्ट्रिक वाहनांचे निर्मिती खर्च कमी करणे आणि बॅटरी चे आयुष्य वाढविणे यावर संशोधन करण्याला प्राधान्य दिले जाईल ‘असे इलेक्ट्रिकल विभागप्रमुख डॉ डी एस बनकर ,प्रा . आर . एम . होलमुखे यांनी सांगितले .