फाऊंडेशनच्या ७ व्या बॅचला शिष्यवृत्ती प्रदान
पुणे:दर वर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील लीला पुनावाला फाउंडेशनच्या ७ व्या बॅचला शालेय शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. हा शिष्यवृत्ती प्रदान समारंभ एमएफएच हॉल कमिन्स, बालेवाडी मध्ये नुकताच संप्पन झाला. ह्यावेळी प्रमुख पाहुण्यांंच्या आणि पालकांच्या उपस्थितीत लीला ज्यूनियर्सच्या नवीन बॅचला हे शिष्यवृत्ती वितरण करण्यात आले.
ह्यावेळी १० वर्षाच्या अॉटो स्कॉलरशिपसाठी निवडल्या गेलेल्या मुलींना सन्मानित करण्यात आले. ह्यामध्ये सातवीपासुन ते पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली गेली. टुमारो टुगेदर ह्या शालेय प्रकल्पाअंतर्गत २०११ मध्ये जेंव्हा ह्या उपक्रमाची सुरवात झाली तेंव्हा ह्यामध्ये फक्त ५ शाळांचा समावेश होता आता १९ शाळांना शिष्यवृत्ती दिली जाते.
ह्या कार्यक्रमामध्ये आपला आनंद व्यक्त करतना पद्मश्री लीला पुनावाला अभिमानाने म्हणाल्या की मुलींच्या शिक्षणात जरी फाउंडेशनचे अहम योगदान असले तरी ही मुलींच्या पालकांचा दृष्टीकोण जास्त महत्वाचा ठरतो. योग्य शिक्षणाद्वारे मुली आर्थिकरित्या स्वावलंबी बनतील आणि देश व अनुषंगाने देशाच्या समाजिक आणि आर्थिक विकासात बहुमूल्य योगदान देतील.
ह्या प्रसंगी मुख्य अतिथी शर्मिला जैन (सामाजिक कार्यकर्ता आणि उद्यमी) अापले अनुभव व्यक्त करताना म्हणाल्या की फांउडेशनने अापल्या विभिन्न प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रमांच्या माध्यमातुन मुलींसाठी बहुमुल्य योगदान दिले आहे ज्यामुळे ह्या शिष्यवृत्ती मिळवणार्या मुलींच्या जीवनास संपुर्ण नवीन रूप मिळाले आहे.
आपले मनोगत व्यक्त करत प्रसिद्ध अॅक्टर व मॉडेल विराफ फिरोज पटेल म्हणाले की इंडस्ट्रीमध्ये केवळ महिलांच्या सुंदरतेलाच त्यांच्या सफलतेचे प्रमाण मानले जाते अशी संकुचित विचारधारणा आज बदलली आहे आता त्यांच्या कलागुणांमुळे त्यांना सन्मानित करण्यात येते.
समारंभाच्या अंतिम आणि प्रमुख पहुण्या (९७ वी लीला फेलो) डॉ. नीलु नावानी जुन्या आठवणींना उजाळा देत म्हणाल्या की मुलींनी एलपीएफ परिवारचा हिस्सा बनून राहीले पाहीजे आणि येथे मिळणार्या संधीचे सोने केले पाहीजे.