आंबेडकरवाद्यांना एकत्र यावेच लागेल ..मल्लिका नामदेव ढसाळ (व्हिडीओ)दलित पँथर चा ४५ वा वर्धापन दिन संपन्न

Date:

पुणे-परिस्थितीचा रेटा एवढा वाढला आहे कि, आंबेडकरवादी सर्व शक्तींना संकटाशी मुकाबला करण्यासाठी एकत्र येण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही असे  प्रतिपादन दलित पँथरच्या सर्वेसर्वा मल्लिका नामदेव ढसाळ यांनी येथे केले  . गंज पेठमधील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित दलित पँथरच्या ४५ व्या वर्धापन दिन सोहळ्यास त्या अध्यक्षस्थानीउपस्थित होत्या . यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले .आणि आंबेडकरवाद्यांना अहंकार सोडण्याचेही आवाहन केले . (पहा नेमके ढसाळ काय म्हणाल्या व्हिडीओ)

यावेळी कार्यक्रमाचे उदघाटन महापौर मुक्ता टिळक यांच्याहस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे , उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे , दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम , कार्याध्यक्ष अल्ताफ सय्यद , पुणे शहर अध्यक्ष गणेश रेड्डी , कवी बादशहा सय्यद ,अल्पसंख्यांक अध्यक्ष इलियास शेख , नगरसेवक  सुनिल कांबळे , बाळासाहेब पडवळ , सुरेश केदारे , अनिल हातागळे ,राहुल डंबाळे ,  शंकर तडाखे , महाराष्ट्र राज्याचे वनप्रमुख जीतसिंग आदी मान्यवर उपस्थित होते .

. दलित पँथरच्या सर्वेसर्वा मल्लिका नामदेव ढसाळ यांनीसांगितले कि ,  दलित पँथरच्या नावातच वजन आहे . पँथर म्हणल्यानंतर भले भले वचकतात पँथरच्या अनेक शाखा तयार झाल्या मात्र खोड एकच आहे . पूर्ण भारतात प्रत्येक राज्यात दलित पँथर असावी . जेणेकरून दलितांवर  अन्याय करणाऱ्याना वचक बसेल . दलित पँथरचे ध्येय दलित शोषितांना त्यांचे न्याय हक्क मिळवून देणे आहे . अन्यायाच्या प्रतिकारासाठी तुमच्यातून नामदेव ढसाळ निर्माण होतील . यावेळी महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले कि , पदमश्री नामदेव ढसाळांनी आपल्या चळवळीच्या तसेच लेखणीच्या माध्यमातून दलित पँथरमुळे जनतेला  दलित शोषितांना न्याय मिळवून दिला आहे . अन्याय विरुध्द काम करण्याचा आत्मविश्वास दलित पँथरमुळे निर्माण झाला आहे . स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही वर्षातच पँथरने चळवळीद्वारे संविधानाच्या कायद्याचे हक्क नागरिकांना मिळवून दिले . पुणे शहराच्या ऐतिहासिक भूमीतून पँथर चळवळ उभी राहिली . यावेळी उपमहापौर डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी सांगितले कि , अन्याय होणाऱ्याविरुद्ध पँथरचे कार्यकर्ते जाब विचारायचे , गोरगरीब वंचित घटकासाठी दलित पँथरने कार्यरत राहिली . गायला मारायचे नाही माणसाला मारायचे या प्रवृत्तीविरुध्द लढण्याची ताकद एक पँथरच आणू शकतो . लाठयाकाठ्याची चळवळ सामाजिक माध्यमामध्येच चाललेली आहे . त्यासाठी हि चळवळ एका व्यासपीठावर आणणे गरजेचे आहे . या कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे स्वागत  दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यशवंत नडगम यांनी केले .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुणे नवरात्रौ महोत्सवाचे जल्लोषात उद्घाटन; दुष्काळ निधीसाठी सामंत यांच्याकडून १० लाखांची घोषणा

पुणे-राज्यात यंदा दुष्काळाचे मोठे संकट असून, संकटग्रस्त बांधवांना मदत...

दोन आठवडे झाले पार, अहवाल द्या सरकार! ध्वनीप्रदूषणाच्या कारवाईचा हिशोब मागत बालगंधर्व चौकात आंदोलन

पुणे : गणेशोत्सव संपून दोन आठवडे उलटूनही ध्वनीप्रदूषणाच्या तक्रारी,...

राहुल गांधींचे आवाहन : “सर्व पक्षांनी एकत्र सर्वोच्च न्यायालयापुढे जाऊ ”

मोदी, शहा, डोवाल आणि मोहन भागवत यांना पायउतार...

सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पारंपरिक पद्धतीने घटस्थापना 

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबागतर्फे आयोजित ‘सार्वजनिक नवरात्रोत्सव’ ; धार्मिक...