पुणे :
देशातील ‘यंग अचिव्हर्स ‘ चा सोमवारी आझम कॅम्पस मध्ये सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असून ड्रोन बनविणारा अहमदाबाद चा ‘ड्रोन बॉय ‘ हर्षवर्धन झाला ,,’कलाम ‘ सॅटेलाईट बनविणारा चेन्नईचा ‘सॅटेलाइट बॉय ‘ रिफत शाहरुख ‘,आणि देशातील आय सी एस इ ,जे इ इ ,एन इ इ टी .एल एल एम टॉपर्स चा सन्मान होणार असल्याची माहिती महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ‘चे अध्यक्ष डॉ . पी . ए . इनामदार यांनी दिली .
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पै आय सी टी अॅकॅडमी च्या वतीने डॉ. पी.ए.इनामदार यंग अचिव्हर्स पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा सोमवार, दिनांक 10 जुलै 2017 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.ए.आर.शेख असेंब्ली हॉल, आझम कॅम्पस येथे होणार आहे, आणि तो दुपारपर्यंत चालणार आहे ,अशी माहिती कार्यक्रमाचे संयोजक आणि ‘अॅकॅडमी’च्या संचालक प्रा. मुमताझ सय्यद, ऋषी आचार्य (पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स, डिझाइन अॅण्ड आर्ट अॅण्ड स्कूल ऑफ आर्ट चे प्राचार्य) यांनी दिली.
डॉ. पी.ए.इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली होणार्या या कार्यक्रमाला डॉ. एन.वाय.काझी (महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन रिसर्च सेंटर चे अध्यक्ष), मुनव्वर पीरभॉय (हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट चे संस्थापक) यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. डॉ. पी.ए.इनामदार हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.
‘यावेळी कॅम्पसच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी देशातील आय टी मधील गुणवंत, विविध परीक्षांतील यशवंत तरूण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे’ अशी माहिती डॉ. पी.ए.इनामदार यांनी दिली.