पुणे :
देशभरातील टॉपर्सवर झालेली सुवर्णपदकांची लयलूट ,आझम कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी दिलेली भरभरून दाद आणि टॉपर्सची प्रेरणादायक भाषणे अशा वातावरणात सोमवारी दुपारी ‘पी ए इनामदार यंग अचिव्हर्स ‘ सन्मान सोहळा रंगला !
महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या पै आय सी टी अॅकॅडमी च्या वतीने डॉ. पी.ए.इनामदार यंग अचिव्हर्स पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते . हा पुरस्कार सोहळा सोमवार, दिनांक 10 जुलै 2017 रोजी सकाळी 11 वाजता डॉ.ए.आर.शेख असेंब्ली हॉल, आझम कॅम्पस येथे झाला , आणि तो दुपारपर्यंत रंगत गेला
भूसुरुंग शोधून निकामी करण्याचे तंत्र असलेला ड्रोन बनविणारा अहमदाबाद चा ‘ड्रोन बॉय ‘ हर्षवर्धन जाला आणि त्याचे सहकारी ,पालक , छोट्या आकाराचे ‘ डॉ . कलाम ‘ सॅटेलाईट बनविणारा चेन्नईचा ‘सॅटेलाइट बॉय ‘ रिफत शाहरुख ‘,त्याचे सहकारी ,पालक यांना सुवर्णपदक ,सन्मानचिन्ह ,पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले .’
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी ‘चे अध्यक्ष डॉ . पी . ए . इनामदार,डॉ . एन वाय . काझी ,मुनव्वर पीरभॉय यांच्या हस्ते सुवर्णपदके देण्यात आली .
देशातील विविध परीक्षांमधील टॉपर्सचा सन्मान करण्यात आला . त्यात मुस्कान पठाण ,अश्विन राव (आय सी एस इ) ,जुनेद शिकीलकर ,शुभंकर आयरे (जे इ इ ),ईपली अफीफा ,राफ् मुझमैल ,मुजावर राज ,(एन इ इ टी ),सुमेर शेख (एल एल एम ) या टॉपर्स चा समावेश होता .
कार्यक्रमाचे संयोजक आणि ‘अॅकॅडमी’च्या संचालक प्रा. मुमताझ सय्यद, ऋषी आचार्य (पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स, डिझाइन अॅण्ड आर्ट अॅण्ड स्कूल ऑफ आर्ट चे प्राचार्य) आदी मान्यवर उपस्थित होते . प्रा . रुमाना शेख यांनी सूत्रसंचालन केले .
‘ कॅम्पसच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी देशातील आय टी मधील गुणवंत, विविध परीक्षांतील यशवंत तरूण विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . देशातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीशी सर्वानी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे ’ असे प्रतिपादन डॉ. पी.ए.इनामदार यांनी केले . सत्काराला उत्तर देताना हर्षवर्धन जाला आणि रिफत शाहरुख यांनी ड्रोन आणि सॅटेलाईट निर्मितीचे अनुभव सांगितले