Home Blog Page 3241

आई-लेकीमधील हळव्या संवादाला लाभले अमृतस्वर

0

इंदू सरकार चित्रपटातील ;यह पल; गाण्याने सत्तरीच्या गाण्यांची जादू रसिकमनांवर केल्यानंतर आता
अमृता फडणवीस यांच्या आवाजाने सजलेला आई-लेकीतील हळवा संवाद प्रेक्षकांना मोहिनी घालणार आहे.

&परी हूँ मैं; या चित्रपटासाठी ;चांदणं बिलोरी कळ्या; हे गाणं गाण्यासाठी अमृता फडणवीस आता सज्ज
झाल्या आहेत. आई-मुलीतील नातं दर्शवणाऱ्या या गाण्यातून अमृता आणि त्यांची लेक दिविजा यांच्यातील
गोडवा डोकावेल यात शंका नाही. या हळव्या नात्यातील गोडवा अभिषेक खानकर यांनी शब्दबध्द केला असून
त्याला संगीत समीर साप्तिसकर यांनी दिलं आहे.

जय गंगाजल; चित्रपटातीलसब धन माटी; गाण्यातून सिनेविश्वात पदार्पण करणाऱ्या अमृता फडणवीस
यांनी संघर्षयात्रा चित्रपटाच्या गाण्यातून सगळ्यांनाच प्रेरणा दिली तर हल्लीच आलेल्या ;फिर से; या गाण्याच्या
विडिओतून रसिकांना स्वत्वावर विश्वास ठेवण्यासाठीचा संदेश दिला. आपल्या आयुष्यात वेगवेगळी पात्र
सक्षमतेने निभावणाऱ्या अमृता यांचा आणखी एक पैलू डॉ. राजेंद्र प्रताप सिंग निर्मित आणि रोहित शिलवंत
दिग्दर्शित परी हूँ मैं चित्रपटाच्या चांदणं बिलोरी कळ्या या गाण्याच्या निमित्ताने समोर येणार आहे. या
गाण्यातून अमृता फडणवीस यांच्यातील आई प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

शेतीसाठी प्रमाणात खते, पाणी व्यवस्थापनाच्या संशोधन प्रकल्पाची केंद्र सरकारकडून निवड

0
पुण्याच्या युवा संशोधकांचे यश 
पुणे :
शेतीला योग्य प्रमाणात आधुनिक सिंचनपद्धतीद्वारे पाण्यात विरघळणारी खते, क्षार द्रव्ये आणि पाणी पुरविण्याचा ‘सेन्स इट आऊट’ या कंपनीच्या माध्यमातून इलेकट्रोनिक इरिगेशन च्या संशोधन प्रकल्पाची केंद्र सरकारच्या कौशल्य प्रशिक्षण विभागाच्या ‘निधी प्रयास’ अनुदानासाठी निवड झाली आहे. डॉ. अभय हाके, जसविंदर सिंग या पुण्यातील युवा संशोधकांच्या संशोधनाला त्यामुळे पाठबळ मिळाले आहे.
ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्नीकल एज्युकेशन यांनी सर्व इंजिनिअरिंग महाविद्यालयांना भविष्यात स्वतःचे ‘इन्क्युबेशन सेंटर’ असावे व त्यातून नवीन उद्योजक निर्माण व्हावेत या करीता प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या आहेत. अशा प्रकारचे ‘इन्क्युबेशन’ हे आयआयटी मध्ये अस्तित्वात आहे.
विद्यार्थ्यांच्या तंत्रज्ञान विषयक नाविन्यपूर्ण संकल्पनांना व्यावसायिक रूप देण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘निधी प्रयास’ हे अनुदान दिले जाते. त्यातून संशोधन पूर्ण करून त्याचे व्यवसायिक मॉडेल पूर्ण करून दाखवायचे असते.
डॉ. अभय हाके आणि जसविंदर सिंग यांनी शेतीला योग्य प्रमाणात आधुनिक सिंचन पद्धतीद्वारे खते आणि पाणी पुरविण्यासाठी ‘सेन्स इट आऊट’ या कंपनीच्या माध्यमातून हे संशोधन सुरु केले होते. हा आधुनिक प्रणालीचा ‘वॉटर मॅनेजमेंट इरिगेशन प्रोजेक्ट’ आहे.
आत्तापर्यंत इस्त्रायली संशोधक अशा प्रकारच्या प्रणालीवर संशोधन करीत होते. मात्र ‘सेन्स इट आऊट’ कंपनी माध्यमातून केलेले संशोधन पद्धती ही पूर्णपणे भारतीय प्रणाली आहे. ही सर्व आर्थिक स्तरातील शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल.
भारतासारख्या कृषीप्रधान देशातील पाणी व्यवस्थपनासाठी अभियंते, संस्था पुढे येणे गरजेचे आहे, म्हणून ‘मॉडर्न एज्युकेशन सोसायटी’च्या ‘कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ ने या प्रकल्पाला बळ दिले, तर डॉ. अभय हाके आणि जसविंदर सिंग यांना राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे संचालक

​डॉ. रोशन येन्द्री आणि डॉ.  मनिषा प्रेमनाथ

यांच्या हस्ते ‘निधी प्रयास’ ग्रँट चा प्रस्ताव हस्तांतरीत करण्यात आला.

​यावेळी

व्हेंचर ‘इन्क्युबेशन सेंटर’

​चे ​

डॉ.पीयूष जोशी उपस्थित होते​

​. ​
हे संशोधन आता ६ महिन्यात पूर्णत्वास जाईल, असे डॉ. अभय हाके यांनी सांगितले. राष्ट्रीय रासायनिक शाळेच्या

​ ​

(एनसीएल)

​​

व्हेंचर ‘इन्क्युबेशन सेंटर’ मध्ये हा कार्यक्रम अलिकडेच झाला.

केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत युकी भांब्रीचा उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश v साकेत मायनेनीचा मानांकीत खेळाडूवर विजय

0

पुणे, दि.15 नोव्हेंबर 2017- एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी  केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या साकेत मायनेनी, युकी भांब्री, रामकुमार रामनाथन या भारतीय खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत जागतीक क्रमवारीत 140व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या युकी भांब्री याने पावकीकचा 6-4, 7-6(7-4)असा पराभव करून स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. हा सामना1तास 26मिनिटे चालला. 35मिनिटे चाललेल्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये युकीने सुरेख सुरुवात करत तिसऱ्या गेममध्ये पावकीकची सर्व्हिस रोखली व त्यानंतर आपली आघाडी कायम ठेवत 10व्या गेममध्ये स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-4असा जिंकून सामन्यात आघाडी मिळवली. दुसऱ्या सेटमध्ये पावकीकने अधिक भक्कम सुरुवात दुसऱ्या गेममध्ये युकीची सर्व्हिस रोखली व सामन्यात 3-0आघडी घेतली. पण युकीने जबरदस्त कमबॅक करत पाचव्या गेममध्ये पावकीकची सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत 3-3अशी बरोबरी साधली. 12व्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सामना टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये युकीने आपला अनुभव व कौशल्याचा वापर करत सहाव्या, नवव्या गेममध्ये पावकीकची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-6(7-4)असा जिंकून उप-उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

भारताच्या साकेत मायनेनीने सर्बियाच्या जागतीक क्रमवारीत 216वा असणा-या आठव्या मानांकीत पेदजा क्रिस्टीन याचा 4-6, 6-2, 6-0 असा पराभवाचा धक्का देत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला. भारताच्या रामकुमार रामनाथन याने आपली विजयी मालिका कायम ठेवत ग्रेट ब्रिटनच्या ब्रीडन क्लेन याचा टायब्रेकमध्ये 7-6(9-7), 6-3 असा पराभव करून दिमाखात उपांत्यपुर्व गाठली. हा सामना 1तास 35मिनिटे चालला. सामन्यात सुरुवातीला बी. क्लेन याने वर्चस्व राखत रामकुमारची पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व 3-2अशी आघाडी घेतली. पिछाडीवर असलेल्या रामकुमार याने वेगवान खेळ करत क्लेनची 10व्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व 5-5अशी बरोबरी साधली. 12व्या गेमपर्यंत दोघांनी आपापल्या सर्व्हिस राखल्यामुळे हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्ये 15व्या गेममध्ये क्लेन याने डबल फॉल्ट केला व याचाच फायदा घेत पुढील एक गेम जिंकून हा सेट 7-6(9-7)अशा फरकाने जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये रामकुमार याने वरचढ खेळ करत क्लेनची पहिल्या, तिसऱ्या, नवव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-3 जिंकून विजय मिळवला.

जागतीक क्रमवारीत 130वा असणा-या स्पेनच्या दुस-या मानांकीत ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास याने भारताच्या सुमित नागलचा 6-3, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला, तर कझाकस्तानच्या नवव्या मानांकीत अलेक्झांडर नेदोव्हेसेव याने भारताच्या एन.श्रीराम बालाजी याचा 5-7, 6-4, 7-5 असा तीन संटमध्ये पराभव करत उपांत्यपुर्व फेरीत प्रवेश केला.

दुहेरी गटात ग्रेट ब्रिटनच्या स्कॉट क्लायटोन व जॉनी ओमार या जोडीने क्रोटायाच्या इवान साबानोव व मतेजा साबानोव यांचा 6-2, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल-एकेरी गट-दुसरी फेरी

साकेत मायनेनी(भारत) वि.वि  पेदजा क्रिस्टीन(सर्बिया,8) 4-6, 6-2, 6-0

निकोला मिलाजेविक(सर्बिया,5) वि.वि हुगो ग्रेनिअर(फ्रांस)7-5, 6-3

जे क्लार्क(ग्रेट ब्रिटन) वि.वि इवान किंग(अमेरीका,7) 6-3, 6-4

ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास(स्पेन,2) वि.वि सुमित नागल(भारत) 6-3, 6-4

अलेक्झांडर नेदोव्हेसेव(कझाकस्तान,9) वि.वि एन.श्रीराम बालाजी(भारत) 5-7, 6-4, 7-5

युकी भांब्री(भारत,3) वि.वि अॅन्ट पावीक(क्रोटाया) 6-4, 7-6

रामकुमार रामनाथन(भारत)वि.वि.ब्रीडन क्लेन(ग्रेट ब्रिटन)7-6(9-7), 6-3;

दुहेरी गट- पहिली फेरी

स्कॉट क्लायटोन(ग्रेट ब्रिटन)/जॉनी ओमार(4) (ग्रेट ब्रिटन) वि.वि तिमुर खाबिबुलीन(कझाकस्तान)/ अलेक्झांडर नेदोव्हेसेव(कझाकस्तान) 6-3, 4-6, 10-8

पेद्रो मार्टिनेझ(स्पेन)/ ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास (स्पेन)वि.वि जॉफ्रि ब्लॅंकान्यूक्स(फ्रांस)/ जे क्लार्क(ग्रेट ब्रिटन) 6-7, 6-3, 10-8

इवान साबानोव(क्रोटाया)/मतेजा साबानोव(क्रोटाया) वि.वि अर्जुन कढे(भारत)/ एन.विजय सुंदर प्रशांत(भारत) 6-3, 7-5

दुहेरी गट-उपांत्यपुर्व फेरी-

स्कॉट क्लायटोन(ग्रेट ब्रिटन)/जॉनी ओमार(4)(ग्रेट ब्रिटन) वि.वि इवान साबानोव(क्रोटाया)/मतेजा साबानोव(क्रोटाया) 6-2, 6-4

पंडित नेहरू आणि लहूजी वस्तादांचा भाजपला विसर (व्हिडीओ)

0

पुणे- भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि आद्य क्रांतिकारक लहूजी वस्ताद यांचा भाजपा सरकारला विसर पडल्याचा आरोप करीत याबद्दल सरकारचा निषेध करणारा ठराव आज पुणे शहर कॉंग्रेस ने संमत केला .
पंडित नेहरू आणि क्रांतिकारक लहूजी वस्ताद जयंतीनिमित्त शहर कॉंग्रेसच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या दोघांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे, उल्हास पवार,कमल व्यवहारे , अभय छाजेड, अविनाश बागवे, संगीता तिवारी ,सदानंद शेट्टी, सतीश पवार, गोपाळ तिवारी ,बंडू नलावडे ,जयसिंग भोसले ,संदीप मोकाटे आदी मान्यवर कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी या दोन्ही नेत्यांच्या विचाराची धुरा खांद्यावर घेवून मार्गस्थ होणे गरजेचे आहे ..आणि त्यांच्या विचारानुसार पक्षाची देखील वाटचाल सुरु ठेवावी असे सांगत वक्त्यांनी त्यांच्या कार्याची उजळणी करत त्यांचा गौरव केला . आणि रोज माध्यमांना स्वतःचे फोटो असलेल्या प्रचंड जाहिराती देणाऱ्या भाजपा सरकारने या दोन्ही नेत्यांच्या जयंती निमित्त त्यांचे स्मरण करणारी जाहिरात मात्र केली नाही. त्याना या महान विभूतींचा विसर पडला असा आरोप करत यावेळी भाजप सरकारचा निषेध करण्यात आला .

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू आणि क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

0
पुणे :
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
हिराबाग येथील पक्ष कार्यालयात माजी संघटक सचिव सुरेश पवार यांच्या हस्ते माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या प्रतिमेला शहर कार्यकारिणी सदस्य संजय गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.  यावेळी शंकर शिंदे,विक्रम मोरे, वैभव जाधव, सलमान सय्यद, तुषार मोरे, सुरेश खाटपे, वैभव जाधव, संजय गाडे, बाळासाहेब ढमाले, अविनाश वेल्हाळ, योगेश वराडे, राकेश कामठे हे उपस्थित होते.

महावितरण : ‘चॅम्पियन ऑफ चेंज’ भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाकडून गौरव

0

मुंबई भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाकडून जाहीर करण्यात येत असलेल्याचॅम्पियन ऑफ चेंजया पुरस्कारासाठी महावितरण कंपनीची निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून भारत सरकारचे वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे नुकताच देण्यात आला.  विविध राज्यांतील केंद्र राज्य सरकारच्या अखत्यारितील कंपन्या, संस्था, राज्ये यांच्या सहभाग आणि मानांकन लक्षात घेऊन ही निवडचॅम्पियन ऑफ चेंजया पुरस्कारासाठी करण्यात येत असते. महावितरणच्या प्रशिक्षण कौशल्य विकास क्षेत्रातील सन 2016-17 ची कामगिरी लक्षात घेऊन मानांकन श्रेणीतून महावितरणची निवड झालेली आहे.सार्वजनिक उपक्रमातील संस्थांनी जास्तीत जास्त शिकाऊ उमेदवारांना दिलेली नियुक्ती, प्रशिक्षण गुणवत्तेची कामगिरी लक्षात घेऊनचॅम्पियन ऑफ चेंजया पुरस्कारासाठी निवड करण्यात येते. सन 2016-17 ची महावितरणची कामगिरी लक्षात घेऊन मानांकन मिळाल्यावरचॅम्पियन ऑफ चेंजपुरस्कारासाठी महावितरणची निवड करण्यात आली. महावितरण कंपनीचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2016-17 मध्ये महावितरणने सुमारे 3,562 शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षित केलेले आहे. चॅम्पियन ऑफ चेंजपुरस्कार प्रदान कार्यक्रम नवी दिल्ली येथे अरुण जेटली, वित्तमंत्री, भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडला. या कार्यक्रमास पेट्रोलियम कौशल्य विकास राज्यमंत्री . धर्मेद्र प्रधान आणि जपानी राजदूत श्री. हेनजी हिरामातसु इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. महावितरणच्या नाशिक एकलहरे येथील प्रशिक्षण सुरक्षा केंद्राच्या मुख्य महाव्यवस्थापक, श्रीमती रंजना पगारे, यांनीचॅम्पीयन ऑफ चेंजहा पुरस्कार नवी दिल्ली येथील भारत सरकारच्या कौशल्य विकास मंत्रालयाच्या तिसऱ्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात स्वीकारला.

साहसी खेळांमुळे मधुमेही रुग्णांना फायदा : डॉ. मिलिंद वाटवे​

0
पुणे : माणूस जंगलात राहत असताना शिकारीसारखी साहसी जीवनशैली होती, ती गमावल्याने मधूमेह माणसाच्या जीवनात आला. शहरी जीवनशैलीतील मधूमेह दुरुस्त करायचा असेल तर परत शिकारीकडे वळता येणार नाही, मात्र साहसी खेळ हा मधूमेहावर उपाय आहे, असे प्रतिपादन
डॉ. मिलिंद वाटवे (‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’,

​ आयसर,​ संस्थेतील जीवशास्त्रज्ञ)​ यांनी केले.
ते जागतिक मधुमेह दिनानिमित्त ‘चेजिंग पॅराडाईमस् इन डायबेटीस’ (डायबेटिसच्या बदलत्या व्याख्या)या परिषदेत प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
 ही परिषद ‘इंडियन डायटेटीक असोसिएशन’, पुणे चॅप्टर (भारतीय आहारसंस्था पुणे शाखा) आणि ‘डॉ. शिरोडकर्स हेल्थ सोल्युशन्स प्रा. लि.’ यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती.
ही परिषद मंगळवारी दुपारी ‘हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग इन्स्टिट्यूट’ ( मॉडेल कॉलनी )येथे संपन्न झाली.
आहार तज्ज्ञांच्या ​या ​परिषदेला चांगला प्रतिसाद मिळाला. ​
डॉ. मिलिंद वाटवे म्हणाले, ‘रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे म्हणजे मधूमेहावर उपचार अशी अजूनही वैद्यकीय व्यवसायाची श्रद्धा आहे. त्याला अजिबात पुरावे नाहीत. आपले
शरीर जंगलात घड​ले​ आहे. ते आता शहरात राहत आहे, त्यामुळे जीवनशैलीतील बदलाने मधुमेहासारखे त्रास होत आहेत. साहसी खेळातून ​’​न्यूरो एंडो क्राईम पाथ ‘वापरले जातात आणि इन्शुलिन निर्मितीला मदत होते.
‘एंडो क्रॉनिक ग्रोथ फॅक्टर्स निर्माण होणे याने मधुमेहाला दूर ठेवण्यास मदत होते. जंगलातील जीवनशैलीत जी आव्हाने स्वीकारायची मानवाला सवय होती, ती आव्हाने साहसी खेळातून मानवाने पुन्हा स्वीकारण्याची सवय लावली पाहिजे
या संशोधनावर आधारित ‘ बिहेव्हीअरल इंटरव्हेंन्शन फॉर लाईफस्टाईल डिसऑर्डर ‘ क्लिनिक ( बिल्ड  क्लिनिक ) पुण्यात उभारले जात आहे, अशी माहितीही डॉ. वाटवे यांनी दिली
‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अ‍ॅण्ड रिसर्च’ (आयसर) संस्थेतील जीवशास्त्रज्ञ डॉ. मिलिंद वाटवे, डॉ. ज्योती शिरोडकर (’डायबेटीससाठी आयुर्वेद’ या भारत सरकारच्या प्रोटोकोल कमिटीच्या तज्ज्ञ सदस्य) आणि ‘डायटेटीक असोसिएशन’च्या शारदा अडसूळ या तज्ज्ञांनी परिषदेत मार्गदर्शन केले. पुण्यातील साधारण 100 डॉक्टर, आहारतज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले होते.
यावेळी अजय शिरोडकर (व्यवस्थापकीय संचालक, ‘डॉ. शिरोडकर्स हेल्थ सोल्युशन्स प्रा. लि.’), प्रा. अनुजा किणीकर (‘इंडियन डायटेटीक असोसिएशन’ पुणे चॅप्टर, भारतीय आहारसंस्था, पुणे शाखेच्या अध्यक्ष), आहारतज्ञ मेधा पटवर्धन उपस्थित होते.
मधुमेहाकडे पाहण्याचा दृष्टिकोण सर्वंकष असावा असे, मत प्रा. अनुजा किणीकर यांनी व्यक्त केले.
मधुमेही रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या पेटंट मिळालेल्या आहार उत्पादनांचे सादरीकरण या परिषदेत करण्यात आले. त्यात हेल्थ आटा, स्नॅकमिक्स, हेल्थ ड्रिंक यांचा समावेश होता.
आयुर्वेद आणि डायबेटीस’ या विषयावर डॉ. ज्योती शिरोडकर यांनी मार्गदर्शन केले.
त्या म्हणाल्या, ‘ नेहमीपेक्षा अधिक घाम येणे हे जसे मधुमेहाचे लक्षण आहे, तसेच सतत वातावरणात पंखा , गार हवा, थंड पाणी हवेसे वाटणे, हेही मधुमेहाचे लक्षण आहे​.मधूमेह व इतर नॉनकम्युनिकेबल रोगांच्या भारतातील पसरणार्‍या महालाटेविरुद्ध काम करण्यासाठी, डायबेटीसच्या बदलत्या व्याख्या समजून घेण्याची नितांत गरज आहे.
आयुर्वेदात मधुमेहाला प्रमेह म्हटले आहे.लठ्ठ असलेल्या रुग्णाला पंचकर्माचा फायदा होतो मात्र, सडपातळ रुग्णाला  योग्य आहाराचा उपयोग होतो.
मधुमेह बरा करण्यासाठी आहार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे, आहारतज्ज्ञांची भूमिका यासंदर्भात महत्वाची ठरते.
आधुनिक आहारतज्ज्ञ आणि आयुर्वेदिय आहारतज्ज्ञ यांची भूमिका डायबेटीसची महालाट परतविण्यात निर्णायक आणि महत्त्वाची ठरणार आहे. याकरिता जनजागृतीची आवश्यकता आहे
अमेरिकन डायबेटीस असोसिएशन’ने 2011 पासून क्लिनिकल प्रॅक्टिस, गाईडलाइन (CPG 2011) मध्ये समाविष्ट केलेल्या ‘मेडिकल न्यूट्रीशन थेरपी’ या विषयी आधुनिक आहारतज्ज्ञ श्रद्धा अडसूळ यांनी माहिती दिली.
याविषयी बोलताना त्या म्हणाल्या मधुमेही रुग्णाला न्यूट्रीशनल थेरपीचाही उपयोग होतो त्यासाठी रुग्णाच्या आहाराच्या,पोषणाच्या गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.रुग्णांना आहाराच्या सवयी बदलण्यासाठी प्रेरीत करणे आणि अनेक पर्याय देणे महत्वाचे असते.
‘डॉ. ज्योती शिरोडकर यांच्या दीर्घ संशोधनातून तयार झालेली, इंटरनॅशनल पेटंट मिळालेली हेल्थ फूड आयुर्वेद व आधुनिक आहारशास्त्र यांची सांगड घालून तयार केलेले, प्रयोगशालेय तपासण्या, प्रत्यक्ष रुग्ण/ निरोगी व्यक्ती यावर चाचण्या करून सिद्ध झालेले आहे. विशिष्ट कडधान्ये व तृणधान्ये यावर ग्रंथोक्त संस्कार करून बनविलेली व आरोग्यदक्ष पुणेकर ग्राहकांच्या पंसतीस उतरत आहे,’ अशी माहिती आयआयटी मुंबईचे पदवीधर व ’डॉ. शिरोडकर्स हेल्थ सोल्युशन्स’ या स्टार्टअप कंपनीचे संचालक अजय शिरोडकर यांनी दिली.
या परिषदेच्या निमित्ताने मधुमेहाची महालाट परतविण्यासाठी एकात्मिक दृष्टीकोन विकसित करण्याच्या दिशेने आणि तशी कृती योजना आखण्याच्या दिशेने पाऊल उचलण्य विषयी सर्व तज्ञांनी चर्चा केली.

केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत सुमित नागल, युकी भांब्री, एन.विजय सुंदर प्रशांत यांचा दुस-या फेरीत प्रवेश

0

पुणे- एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी  केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या सुमित नागल, युकी भांब्री व एन.विजय सुंदर प्रशांत यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या मुख्य फेरीत भारताच्या सुमित नागलने ऑस्ट्रिलियाच्या लुकास मिडलर याचा 7-6(1),6-0 असा टायब्रेकरमध्ये पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. एक तास 55 मिनिट चाललेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केला. सुरूवातीला दोन्ही खेळाडूंनी सर्व्हिस राखल्या त्यामुळे बाराव्या गेममध्ये 6-6 अशी बोरबरी झाली. त्यामुळे सामना टायब्रेकमध्ये गेला. सुमितने नेटजवळून आक्रमक खेळी करत हा सेट 7-6(1) असा जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुस-या सेटमध्ये सुमितने आपले वर्चस्व कायम राखत मिडलरची दुस-या व चौथ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-0 असा जिंकत दुस-या फेरीत प्रवेश केला.

भारताच्या तिस-या मानांकीत युकी भांब्री याने  जपानच्या  काईची  उचिडा याचा 6-2, 7-5 असा पराभव करून दिमाखात दुसरी फेरी गाठली. सामन्यात पहिल्या सेटमध्ये युकी याने आक्रमक व चतुराईने खेळ करत उचिडाची तिसऱ्या व पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-2 असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये उचिडाने  युकीची दुसऱ्या व चौथ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सामन्यात 4-1 अशी आघाडी घेतली. पण पिछाडीवर असलेल्या युकीने वरचढ खेळ करत उचिडाची सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सामन्यात 4-4 अशी बरोबरी निर्माण झाली. युकीने उचिडाची 11व्या गेममध्ये पुन्हा सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-5 अशा फरकाने जिंकून विजय मिळवला.

भारताच्या एन.विजय सुंदर प्रशांत याने आर्यन गोवीसचा 6-3, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करत दुसरी फेरी गाठली.

अव्वल मानांकीत स्लोव्हेनियाच्या कावकीक ब्लाज याने फ्रांसच्या जॉफ्रि ब्लॅंकान्यूक्स याचा 6-4, 6-4 असा तर दुस-या मानांकीत स्पेनच्या ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास याने क्रोटायाच्या बोर्ना गोजो याचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल-एकेरी गट-पहिली फेरी

कावकीक ब्लाज(स्लोव्हेनिया,1) वि.वि जॉफ्रि ब्लॅंकान्यूक्स(फ्रांस) 6-4, 6-4

ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास (स्पेन,2) वि.वि बोर्ना गोजो (क्रोटाया) 6-2, 6-3

युकी भांब्री(भारत,3) वि.वि काईची उचीडा(जपान) 6-2, 7-5

निकोला मिलोजेविक(सर्बिया,5) वि.वि  इवान नेडेल्को(रशिया)- 6-4, 6-1

सुमित नागल(भारत) वि.वि लुकास मिडलर(ऑस्टिलिया) 7-6(1),6-0

एन.विजय सुंदर प्रशांत(भारत) वि.वि आर्यन गोवीस(भारत) 6-3, 6-4

ब्रायडन क्लीन(ग्रेट ब्रिटन) वि.वि पेद्रो मार्टिनेझ(स्पेन) 6-2, 6-3

हुगो ग्रेनिअर(फ्रांस) वि.वि स्तुंग-ह्यु-यांग(तैपेई) 6-7, 6-0,6-0

शांतिलाल मुथ्था यांचा राजीव गांधी मानव सेवा पुरस्काराने सन्मान

0

पुणे-शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील बहुमूल्य योगदानाबद्दल शांतिलाल मुथ्था फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. शांतिलाल मुथ्था यांना, यंदाचा राजीव गांधी मानव सेवा पुरस्कार, महामहीम राष्ट्रपती रामनाथजी कोविंद यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आला. बालदिनाचे औचित्य साधून दिनांक १४ नोव्हेंबर २०१७ रोजी केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्रालयातर्फे नवी दिल्लीत आयोजित खास सोहळ्यात श्री. मुथ्था यांना सन्मानित करण्यात आले.

१९९३ च्या लातूर भूकंपात मोठ्या प्रमाणावर राहत कार्य करीत असताना तेथील मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी १२०० भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुनर्वसन करण्यासाठी पुणे येथे आणले व वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प उभा राहिला. या प्रकल्पातून लातूरची मुलं गेल्यानंतर मेळघाट व ठाणे परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना या ठिकाणी सातत्याने आणले गेले. जमू-काश्मीर भूकंपातील ५०० विद्यार्थांना शिक्षणासाठी पुण्यात आणले. गेल्या तीन वर्षांपासून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ६०० मुला-मुलींचे शैक्षणिक पुनर्वसन यशस्वीपणे सुरु आहे. या विद्यार्थ्यांसाठी या प्रकल्पामध्ये ‘मेंटल हेल्थ’ विभागाची स्थापना करण्यात आली आहे.

गुजरात भूकंपामध्ये त्या ठिकाणी चार महिने राहून ३६८ शाळा बांधून तत्कालीन पंतप्रधान आदरणीय श्री. अटलबिहारी वाजपयी यांच्या हस्ते गुजरात सरकारला सुपूर्द करण्यात आल्या. या माध्यमाने १ लाख २० हजार विद्यार्थांची तीन महिन्यात शाळेत बसण्याची व्यवस्था करण्यात आली.

सन २००३ मध्ये भारतातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचा दर्जा उंचाविण्यासाठी व मूल्य शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला. बीड जिल्हा परिषदेच्या ५०० शाळांतील ३५ हजार विद्यार्थ्यांबरोबर या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरु झाली. सात वर्षात या कार्यक्रमाचे Impact Assessment, NCERT, Cambridge University व Oregon University यांच्या माध्यमाने करण्यात आले. यावरून विद्यार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर सकारात्मक बदल घडत असल्याचे निष्पन्न झाले. २०१७ मध्ये राज्य सरकारने मूल्यवर्धन कार्यक्रमाची व्याप्ती १०७ तालुक्यातील २० हजार शाळांमधून १० लाख विद्यार्थ्यांपर्यंत वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आला. या कामी शांतिलाल मुथ्था फाउंडेशन शासनाला विनामूल्य  सहकार्य करीत आहे. महाराष्ट्रा बरोबरच गोवा राज्याच्या सर्व शासकीय व खाजगी शाळांमध्ये मूल्यवर्धन दोन वर्षांपासून सुरु आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर देशातील जिल्हा परिषदेच्या शाळांतून यशस्वी झालेला हा सर्वात मोठा कार्यक्रम आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट गर्ल्स या उपक्रमांतर्गत ७३ हजार ६२५ मुलींचे सक्षमीकरण आत्तापर्यंत करण्यात आले आहे.

रेणुका शहाणे पुन्हा मालिकेतून रसिकांच्या भेटीस …

0

पुणे-सालस आणि घरंदाज भूमिकांना रुपेरी पडद्यावर जिवंत करणारी अभिनेत्री रेणुका शहाणे पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.आपल्या कुटुंबात आणि विशेषतः मुलांमध्ये रमलेली रेणुका मध्यंतरी काही रिअलिटी शो मध्ये दिसली होती पण चित्रपट आणि मालिका या फार वेळ घेतील कुटुंबापासून बराच अवधी दूर ठेवतील या भीतीने रेणुकाने आपले काम कमी केले होते .पण आता  रेणुका ‘खिचडी’ या लोकप्रिय मालिकेच्या नव्या पर्वात दिसणार आहेत. बऱ्याच काळानंतर रेणुका पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर परतणार असल्यामुळे चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

तब्बल दहा वर्षांनंतर ‘खिचडी’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत रेणुका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसेल. तिची भूमिका छोटेखानी असली तरी महत्त्वाची असणार आहे. ‘खिचडी’ या मालिकेच्या नव्या पर्वातून निर्माता-अभिनेता जमनादास मजीठिया आणि लेखक- अभिनेता आतिश कपाडिया यांची मुलंसुद्धा टेलिव्हिजन विश्वात पदार्पण करणार आहेत.

दुसर्‍याच्या आनंदात आनंद मानणारा महात्मा प्रा.गणेशराव

0
पुणे-:“एमआयटीची स्थापना केल्यानंतर प्रा.एच.एम.गणेशराव हे पाच वर्षे संस्थेचे अध्यक्ष होते. सरकारकडून आलेल्या एखाद्या धोरणात्मक पत्रापासून ते अगदी छोट्या छोट्या गोष्टीपर्यंत त्यांना आनंद होत असे. इतकेच नव्हे तर त्यांच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहत असत. संस्थेच्या प्रगतीमधील अनेक निर्णयांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. अगदी पूर्वी मी सीओईपीमध्ये प्राध्यापक असताना प्रा.गणेशराव हे आमचे विभाग प्रमुख होते. त्यावेळी मी वृत्तपत्रात लिहिलेला लेख त्यांनी वाचला. माझे कौतुक केले. इतकेच नव्हे तर, आमच्या विभागाच्या प्राध्यापक वर्गालाही बोलावून जाहीरपणे माझे अभिनंदन केले.”अशी भावना माईर्स एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ.विश्‍वनाथ दा .कराड यांनी काढले. माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहा तर्फेे माईर्स एमआयटीचे माजी अध्यक्ष व सीओईपीचे माजी प्राचार्य प्रा. एच.एम.गणेशराव यांची श्रध्दांजली सभा आयोजित करण्यात आली होती. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी संस्कृतचे गाढे अभ्यासक पं.वसंतराव गाडगीळ, एमआयटीचे अधिष्ठाता                प्रा. एस.एस.दराडे पाटील, संस्थापक विश्‍वस्त प्रा.प्रकाश जोशी, कुलसचिव श्री.एस.व्ही. उर्फ नाना कुलकर्णी, उपकुलसचिव श्री. अभय बिरारी, प्राचार्य डॉ.ललित क्षीरसागर, न्या.आर.एम.खान,                 प्रा. डी.पी.आपटे, प्रा.श्रीमती मृदुला कुलकर्णी, प्रा.डॉ.सायली गणकर, श्री.कोतुळकर,श्री. गिरीष दाते, श्री.चंद्रकांत भोसले हे उपस्थित होत. तसेच,  एमआयटीचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रा. एस.एस.दराडे पाटील म्हणाले,“माझ्या सारख्या अगदी छोट्या प्राध्यापकालासुद्धा ते नेहमी मनापासून प्रोत्साहन देत असत. त्यामुळे आम्हाला मोठी उमेद वाटत असे. ”
प्रा.प्रकाश जोशी म्हणाले,“एमआयटीची स्थापना झाल्यानंतर अनेक तांत्रिक समस्या येत असत. परंतू केवळ प्रा.गणेशराव सरांच्यामुळे आम्ही त्यावर मात करू शकलो.”
श्री.एस.व्ही. उर्फ नाना कुलकर्णी म्हणाले,“ संस्थेच्या कोणत्याही बैठकीमध्ये प्रा.गणेशराव आले म्हणजे सर्व वातावरण प्रफुल्लित होत असे. त्यामुळे आमच्या सर्वांच्या मनावरील ताण हलका होत असे.”
प्रा.श्रीमती मृदुला कुलकर्णी म्हणाल्या,“ गणेशराव सर हे महराष्ट्र रोईंग असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष होते. आम्ही रोईंगचे काम करीत असताना ते अतिशय बारकाईने चौकशी करीत असत.”
श्री.कोतुळकर , म्हणाले,“देवाच्या दयाने मला त्यांचा बराच सहवास घडला. ते आमची ओळख लक्षात ठेवून सदैव माणुसकीने वागत असत.”
श्री.चंद्रकांत भोसले,म्हणाले,“मला असे वाटते की प्रा.गणेशराव हे अजून आपल्यामध्येच आहेत. त्यांच्यासारखी माणसे कायमच आपल्याला स्फूर्ती देत असतात.”
प्रा.डी.पी.आपटे यांनी प्रास्ताविक केले. एमआयटीचे प्राचार्य प्रा.डॉ.ललित क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. त्यानंतर माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहातील सर्व उपस्थितांनी प्रा.एच.एम.गणेशराव यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

रवाईन रन माउंटन मॅरेथॉन 3डिसेंबर रोजी रंगणार

0

पुणे-: पाचगणी येथे रवाई रन माउंटन मॅरेथॉनचे दुसरे सत्र 3 डिसेंबर रोजी रंगणार आहे.

पाचगणी येथे होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेला माला यांचा पाठिंबा लाभला आहे. तसेच, याचबरोबर माला रेनबो 5किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले आहे.

रवाईन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत यावर्षी एकूण 7लाख रुपयांची पारितोषिक रक्कम देण्यात येणार आहे. या स्पर्धेत 18वर्षावरील स्पर्धकांसाठी 21किलोमीटर, 16वर्षांवरील स्पर्धकांसाठी 10किलोमीटर, 10वर्षावरील स्पर्धकांसाठी माला 5किलोमीटर रन अशा तीन प्रकाराचा समावेश आहे.

यंदाची शर्यत हि पाचगणी येथील संजीवन हायस्कुल येथून सुरु होणार असून संपूर्ण शहरातून तसेच ऐतिहासिक सेंट पिटर्स स्कुल येथून आणि ऐतिहासिक अशा भव्य वृक्ष राजीतून आणि पाचगणी व महाबळेश्वरच्या निसर्गरम्य अशा पर्वतरांगामधून, तसेच राजपुरी केव्स मार्गे जाऊन परत फिरणार आहे व संजीवन मैदान येथेच या शर्यती चा समारोप होणार आहे.

रवाईन रन माउंटन मॅरेथॉन हि शर्यत अस्सल धावपटू साठी खास आकर्षण ठरणार आहे. तसेच, ज्यांचे धावण्यावर अतिशय प्रेम आहे, अशा हौशी धावपटू साठी  हि शर्यत विशेष आकर्षण ठरणार आहे. या शर्यतीला सातारा हिल मॅरेथॉन शर्यतीचा एक भाग असेही म्हटले जाते. यंदाच्या वर्षी हि शर्यत सातारा हाफ हिल मॅरेथॉन आणि मुंबई रोड रनर्स यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीतील विजेत्यांबरोबरच सर्व सहभागी धावपटूना पारितोषिक रक्कम देण्यात येणार आहे, तसेच, शर्यत पूर्ण करणाऱ्या धावपटूना स्ट्रॉबेरी विथ क्रीम अशी खास ट्रीट देण्यात येणार आहे. तसेच, पाचगणीतील अनेक हॉटेल्स मध्ये सवलतीच्या दरात मुक्काम करण्याची संधी त्याचप्रमाणे टीशर्ट व पाचगणीतील अनेक खास वस्तूंचा समावेश असलेली गुडी बॅग्स, पदके व टाईम बीब देण्यात येणार आहे. नावनोंदणीसाठी www.ravinehotel.com या वेबसाइटवर भेट देण्याचे आव्हाहन करण्यात आले आहे.

अरविंद एज्युकेशन सोसायटीत विविध उपक्रमांनी बालदिन साजरा

0
पिंपरी / प्रतिनिधी
अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर स्कूल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालयात बालदिनाचे औचित्य साधून बालोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रेट लीडर्स, फँसी ड्रेस स्पर्धा, कागदापासून मुखवट, टाकावू पासून टिकावू वस्तु बनविने अशा विविध उपक्रमांनी बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना खाऊवाटपही करण्यात आले.  यावेळी सोसायटीच्या सचिव आरती राव, उपाध्यक्ष प्रणव राव, मुख्याध्यापिका गीता येरुणकर, हर्षा बाठिया, तेजल कोळसे पाटील, भटू शिंदे आदी उपस्थित होते.
 यावेळी बालचमुंनी आम्हीही चाचा नेहरुंचा आदर्श समोर ठेऊन देशासाठी चांगले काम करु, अशी प्रतिज्ञा केली. चिमुकल्यानी विविध प्रकारची वेशभूषा करीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी, स्वातंत्रवीर सावरकर, राधा-कृष्ण, चाचा नेहरू यांच्या भूमिका साकारल्या. तर कुणी पोलीस, पोस्टमन काका, डॉक्टरची वेशभूषा साकारली होती. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत कुणी टोमॅटो, कुणी मिरची, तर कुणी वांगे,कुणी द्राक्षे, भोपळा, तर कुणी मोर बनले होते.
 विद्यार्थ्यांनी बनविलेल्या टाकाऊ पासून टिकावू वस्तूंचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. या वस्तूंचे सर्वानीच कौतुक केले. एकंदरीत रंगीबेरंगी वेषभूषांनी शाळेचा परिसरही नटला होता. बालचमूंच्या या आनंदात शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारीही मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

शिवगंगादेवी विद्यालयात बालदिन साजरा

0
पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती ( बाल दिन ) व श्री. सुनील रुकारी यांच्या ६०वा वाढदिवस निमित्त श्री. काशी विश्वनाथ शिक्षण संस्था व श्री. संत शिवगंगादेवी विद्यालय पुणे येथे साजरा करण्यात आले. या प्रसंगी ज्यो किड्स क्लब संस्थेतील अंध व ग्रस्त मुले मुली उपस्थित होते.अंध व ग्रस्त मुले मुली यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मुला मुलींनी नेहरू यांच्या जीवनाचे अनेक प्रसंग सादर केले.
श्री. सुनी रुकारी (  संचालक द विश्वेश्वर सहकारी बँक लिमिटेड ) यांचे श्री. संत शिवगंगादेवी बार्शीकर ट्रस्ट व श्री. काशी विश्वनाथ शिक्षण संस्था तर्फे साल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन स्वागत केले.
श्री. सुनील रुकारीआपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले माझ्या आविश्यातला हा मोठा दिवस आहे कि मी आज या अंध व एड्सग्रस्त मुले मुली बरोबर साजरा करीत आहे. या बालचमूंचे स्वागत करतो व या पुढे कायम स्वरूपी या दिवशी त्यांना माझ्या तर्फे या संस्थेतील सर्व अंध व एड्सग्रस्त मुले मुली सर्वाना जेवण देईन व   आज रोजी या संस्थेला रुपय ६०,००० धनादेश जाहीर करीत आहे.
काशी  विश्वनाथ शिक्षण संस्थे तर्फे ११,००० तर श्री. संत माई याच्या जन्मशताब्दी निमित्त ११,००१ चा धनादेश जाहीर करण्यात आले.
या प्रसंगी उल्हास पवार,अभय छाजेड, नरेंद्र व्यवहारे, श्रीकांत तोडकर, डॉ. महादेव सगरे, रामेश्वर कुरंजखेडे, आशिष व्यवहारे इत्यादी उपस्थित हॊते.
कार्यक्रमाची प्रस्तावना नरेंद्र व्यवहारे यांनी केली तर रामेश्वर कुरंजखेडे यांनी आभार मानले.

पाणीकपातीचे पत्र म्हणजे प्रशासनातील समन्वयाचा अभाव -मोहोळ (व्हिडीओ)

0

पुणे- जलसंपदा विभागाने पुणे महापालिकेला पाणीकपातीबाबत चे दिलेले पत्र म्हणजे जलसंपदा विभाग आणि महापालिकेचे प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव आहे . अशी टीका करत अशी पाणी कपात आम्ही होऊ देणार नाही अशी ठाम भूमिका महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली आहे तर महापौर मुक्ता टिळक यांनी पाणीकपातीबाबत च्या पत्रामुळे आपण शासनाशी पत्रव्यवहार करतो आहे असे सांगितले तर पुण्याच्या पाणीपुरवत्यात कोणतीही कपात होऊ देणार नाही , कोणालाही पाणी प्रश्न भेडसावणार नाही याची जबाबदारी आमची आहे असे प्रतिपादन महापालिकेतील सभागृह  नेते श्रीनाथ भिमाले यांनी केले आहे .
पहा हे महापालिकेतील पदाधिकारी पाणीकपाती बाबतच्या वृत्ताबाबत काय म्हणतात ते त्यांच्याच शब्दात ऐका ..पहा …