केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत सुमित नागल, युकी भांब्री, एन.विजय सुंदर प्रशांत यांचा दुस-या फेरीत प्रवेश

Date:

पुणे- एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी  केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत भारताच्या सुमित नागल, युकी भांब्री व एन.विजय सुंदर प्रशांत यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या मुख्य फेरीत भारताच्या सुमित नागलने ऑस्ट्रिलियाच्या लुकास मिडलर याचा 7-6(1),6-0 असा टायब्रेकरमध्ये पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला. एक तास 55 मिनिट चाललेल्या या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केला. सुरूवातीला दोन्ही खेळाडूंनी सर्व्हिस राखल्या त्यामुळे बाराव्या गेममध्ये 6-6 अशी बोरबरी झाली. त्यामुळे सामना टायब्रेकमध्ये गेला. सुमितने नेटजवळून आक्रमक खेळी करत हा सेट 7-6(1) असा जिंकत सामन्यात आघाडी घेतली. दुस-या सेटमध्ये सुमितने आपले वर्चस्व कायम राखत मिडलरची दुस-या व चौथ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व हा सेट 6-0 असा जिंकत दुस-या फेरीत प्रवेश केला.

भारताच्या तिस-या मानांकीत युकी भांब्री याने  जपानच्या  काईची  उचिडा याचा 6-2, 7-5 असा पराभव करून दिमाखात दुसरी फेरी गाठली. सामन्यात पहिल्या सेटमध्ये युकी याने आक्रमक व चतुराईने खेळ करत उचिडाची तिसऱ्या व पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-2 असा सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये उचिडाने  युकीची दुसऱ्या व चौथ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सामन्यात 4-1 अशी आघाडी घेतली. पण पिछाडीवर असलेल्या युकीने वरचढ खेळ करत उचिडाची सातव्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व सामन्यात 4-4 अशी बरोबरी निर्माण झाली. युकीने उचिडाची 11व्या गेममध्ये पुन्हा सर्व्हिस ब्रेक केली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 7-5 अशा फरकाने जिंकून विजय मिळवला.

भारताच्या एन.विजय सुंदर प्रशांत याने आर्यन गोवीसचा 6-3, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करत दुसरी फेरी गाठली.

अव्वल मानांकीत स्लोव्हेनियाच्या कावकीक ब्लाज याने फ्रांसच्या जॉफ्रि ब्लॅंकान्यूक्स याचा 6-4, 6-4 असा तर दुस-या मानांकीत स्पेनच्या ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास याने क्रोटायाच्या बोर्ना गोजो याचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव करत दुस-या फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल-एकेरी गट-पहिली फेरी

कावकीक ब्लाज(स्लोव्हेनिया,1) वि.वि जॉफ्रि ब्लॅंकान्यूक्स(फ्रांस) 6-4, 6-4

ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास (स्पेन,2) वि.वि बोर्ना गोजो (क्रोटाया) 6-2, 6-3

युकी भांब्री(भारत,3) वि.वि काईची उचीडा(जपान) 6-2, 7-5

निकोला मिलोजेविक(सर्बिया,5) वि.वि  इवान नेडेल्को(रशिया)- 6-4, 6-1

सुमित नागल(भारत) वि.वि लुकास मिडलर(ऑस्टिलिया) 7-6(1),6-0

एन.विजय सुंदर प्रशांत(भारत) वि.वि आर्यन गोवीस(भारत) 6-3, 6-4

ब्रायडन क्लीन(ग्रेट ब्रिटन) वि.वि पेद्रो मार्टिनेझ(स्पेन) 6-2, 6-3

हुगो ग्रेनिअर(फ्रांस) वि.वि स्तुंग-ह्यु-यांग(तैपेई) 6-7, 6-0,6-0

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पाश्चात्य संगीतापेक्षा शास्त्रीय संगीत आणि नृत्यातून वेगळा आनंद मिळतो

नामदार चंद्रकांतदादा पाटील यांची भावना पंडिता रोहिणी भाटे नृत्य महोत्सवाचे...

सोशल मीडियावर औरंगजेबाचं समर्थन: पुण्यात दोघांवर कारवाई

पुणे-राज्यभरात औरंगजेबच्या कबरवरुन राजकीय वाद सुरु असतानाच त्याचे गंभीर...