पुणे – ‘गुरुतत्व’ मासिकातर्ङ्गे नोव्हेंबर २०१७ चा श्री सद्गुरू शंकरमहाराज यांच्या जीवनावरील विशेषांकाचे प्रकाशन आज समाधी मठात पार पडले.
‘गुरुतत्व’ मासिक हे मे २०१७ पासून प्रकाशित होत आहे. पहिल्या अंकापासून श्री दत्तात्रय, श्रीपाद श्रीव‘भ, नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, वासुदेवानंद सरस्वती, श्री साईबाबा आणि या अंकात श्री शंकर महाराज यांच्या जीवन कार्याचा परिचय करून देण्यात आला आहे.
दर महिन्याच्या अंकामध्ये एक अवतारी संताची माहिती व इतर मान्यवरांचे लेख असतात. गुरुतत्व हे एक मार्गदर्शक तत्व आहे. जे पृथ्वीच्या उत्पत्तीला होते आज स्थितीला आहे व पुढे पृथ्वीच्या लयापर्यंत राहणार आहे. मार्गदर्शक बदलत राहतात मात्र तत्व एकच असते याच तत्वाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी ‘गुरुतत्व’ मासिकाची निर्मिती झाली आहे.
श्री शंकर महाराजांचा या अंकातून भक्तांना त्यांच्या जन्मापासून त्यांनी घेतलेल्या संजीवन समाधीपर्यंतच्या कार्याची माहिती मिळू शकेल. जी भाविकांना उपयोगी पडेल अशी आशा आहे.
सदर प्रकाशन समारंभ शंकर महाराज समाधी मठाचे अध्यक्ष प्रभाकर मोगल, विश्वस्त सुरेंद्र वाईकर, व्यवस्थापक विलास पानसरे, सरव्यवस्थापक सुर्यकांत केळकर, निनाद पतसंस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत सणस, संचालक किरण वाईकर, रामलिंग शिवनगे आणि प्रकाशक संतोष जोशी, मुद्रक सुरेंद्र पैठणकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या कार्यक‘माचे सूत्रसंचालन निनाद पतसंस्थेचे अध्यक्ष उदय जोशी यांनी केले.
सद्गुरु शंकर महाराज विशेषांकाचे प्रकाशन
बातमीची विश्वासार्हता माध्यमांसमोरील सर्वात मोठे आव्हान – संतोष अजमेरा
पुणे: माहिती तंत्रज्ञानाच्या युगात सोशल मिडीयाचा प्रभाव जनसामान्यांवर वाढत आहे. या परिस्थितीत बातमीची विश्वासार्हता माध्यमांसमोरील मोठे आव्हान असून पत्रकारांनी त्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनचे विशेष कार्य अधिकारी संतोष अजमेरा यांनी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे विभागीय माहिती कार्यालय, पुणे व जिल्हा माहिती कार्यालय, पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त ‘माध्यमांसमोरील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते श्री. अजमेरा बोलत होते. कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार सदा डुंबरे, विभागीय उपसंचालक मोहन राठोड, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शैलेश काळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे प्रमुख संजय तांबट, प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी वृषाली पाटील उपस्थित होत्या.
श्री. अजमेरा म्हणाले, पत्रकार दिन दररोज साजरा करायला पाहिजे कारण रोजच्या घडामोडींची माहिती घेतल्या शिवाय आपल्या दिवसाची सुरुवात होत नाही. वृत्तपत्र जीवनाचा अविभाज्य भाग आहे. माध्यमे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे लोकशाहीमध्ये माध्यमांचे महत्व मोठे आहे. आज सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती रिपोर्टर झाला आहे. काही व्यक्ती बातमीची विश्वासार्हता न तपासता बातमी देतात त्यामुळे चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहचत आहे. पत्रकारितेच्या क्षेत्रात टिकण्यासाठी निर्भिड, नि:पक्षपाती असण्याबरोबरच वाचन व लिखाणाची आवड असणे आवश्क आहे.
श्री. राठोड म्हणाले, दिवसेंदिवस मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच वेब माध्यमांचा प्रभावीपणे वापर होत आहे. पत्रकारिता क्षेत्रात सध्या नवनवी आव्हाने समोर येत असून यापुढील काळातही ती येतच राहणार आहेत. पत्रकारांनी व पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांनी या आव्हानांवर मात करुन पुढे जाण्याची गरज आहे.
श्री. काळे म्हणाले, पत्रकारिता क्षेत्रात सुरुवातीपासून वेगवेगळया आव्हानांना सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या स्पर्धात्मक परिस्थितीमध्ये माध्यमांत टिकून राहून काम करणे हे देखील आव्हान आहे. या क्षेत्रात अभ्यासू, प्रामाणिक, जिज्ञासू व कष्टाळू व्यक्तींची गरज आहे. समाजाच्या बदलत्या परिस्थितीनुसार वृत्तसंस्थांमध्ये व पत्रकारांमध्ये बदल होणे आवश्यक आहे. पत्रकारितेतील विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास, वाचन व लेखन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय समारोपात श्री. डुंबरे म्हणाले, सध्या सोशल मिडीया वेगवान व प्रभावी माध्यम बनले आहे. त्यामुळे सध्या या क्षेत्रामध्ये मोठया प्रमाणात स्पर्धा निर्माण झाली आहे. लोकशाही मजबूत करण्यासाठी माध्यमे व पत्रकार महत्वाचा भाग आहे. माध्यमांमध्ये मालकी रचना बदलल्यामुळे या क्षेत्रात चांगली विचारधारा असणाऱ्या माणसांची गरज आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय तांबट यांनी केले. तर आभार वृषाली पाटील यांनी मानले. यावेळी पत्रकार, माहिती सहाय्यक जयंत कर्पे, रोहित साबळे, मिलिंद भिंगारे, ज्ञानेश्वर कोकणे, विशाल कार्लेकर, विलास कुंजीर, मोहन मोटे, पंढरीनाथ शेलार, सुनील झुंजार व विशाल तामचीकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भिडे वाडा येथे राष्ट्रीय स्मारक करणार : पालकमंत्री गिरीश बापट
डिजिटालयझेशनच्या युगातील ऑनलाइन फसवणुकीपासून सुरक्षा
टी.व्ही. रामनमूर्थी, महाव्यवस्थापक, माहिती तंत्रज्ञान विभाग, बँक ऑफ महाराष्ट्र
बँकेचे ग्राहकांबरोबरील संवादाचे स्वरूप डिजिटल तंत्रज्ञानामुळे बदलून गेले आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये बँकसेवा क्षेत्रांमध्ये अमूलाग्र बदल झाला असून डिजिटल स्वीकृतीमुळे भारतातील व्यवसाय करण्याच्या पद्धतीचा मार्गच बदलला आहे. ऑनलाइन देयके देणे, मोबाइल बँक सेवा आणि सोशल अॅप्लिकेशन बँकसेवा या नव्या मार्गाचा अवलंब व्यवसायक्षेत्रात झाला आहे. चलन निश्चलीकरणाच्या निर्णयाला आता वर्षपूर्ती झाली आणि या निर्णयापासूनच डिजिटल व्यवहारांना यापूर्वी कधीही लाभली नाही अशी गती लाभली आहे. भारतात तब्बल 50 टक्क्यांनी वाढ झालेले डिजिटल व्यवहार 2017-18 सालामध्ये 25 अब्ज इतक्या व्यवहारांच्या दिशेने वाटचाल करीत आहेत.
सीआयआय अहवालानुसार, भारतातील बँक क्षेत्र सध्या 81 ट्रिलियन रुपये इतक्या मूल्यप्रमाणात आहे आणि 2020 सालापर्यंत जगातील पाचव्या क्रमांकावर सर्वात मोठे क्षेत्र बनेल, अशी अपेक्षा आहे. भारत सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि वित्तीय तंत्रज्ञान कंपन्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांमुळे वित्तीय साक्षरता वाढण्यास मदत झाली आहे. यामुळेच गेल्या दशकभरात बँक क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे वित्तीय यंत्रणेतील लोकांचा सहभाग स्वातंत्र्योत्तर काळात प्रथमत:च इतक्या मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डिजिटल देयके देण्याच्या पायाभूत सुविधांमुळे तब्बल 35 कोटींपेक्षा जास्त आधार कार्डाशी संलग्नित खात्यांमध्ये वार्षिक अनुदान थेट हस्तांतरीत करणे किंवा इतर निधी जमा करणे शक्य झाले आहे – ज्याचा लाभ JAM (जन-धन आधार मोबाइल) घेत आहेत.
क्रेडिट आणि डेबिट कार्डांच्या साहाय्याने दिली जाणारी डिजिटल देयके किंवा इतर व्यवहार; अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्व्हिस डेटा (यूएसएसडी), मोबाइल फोन आणि अॅप्लिकेशन प्रोग्रॅम यांच्यातील दुहेरी संवाद; ई-वॉलेट्स; इंटरनेट किंवा ऑनलाइन बँक सेवा आणि भिम अॅप (भारत इंटरफेस फॉर मनी), युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (यूपीआय) यासारखी प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स (पीपीआय) आदी व्यवहारांमार्फत दोन बँक खात्यांमध्ये मोबाइलच्या साहाय्याने तातडीने निधी हस्तांतरीत करता येतात.
परंतु नाण्याला दोन बाजू असतात :
एकीकडे अनेक लोक पारंपरिक बँक सेवांऐवजी डिजिटल बँक सेवांचा अंगिकार करत आहेत, याच तर दुसरीकडे दिवसेंदिवस गोपनीय माहिती चोरणे, सायबर हल्ले आणि सुरक्षिततेचा भंग असे धोकेही निर्माण होत आहेत. आपली प्रत्यक्ष मालमत्ता सुरक्षित ठेवण्याबरोबरच, डिजिटल संपत्तीही सुरक्षित ठेवणे हे आजच्या आधुनिक काळाची गरज बनली आहे.
जवळपास प्रत्येक दिवशी रँनसमवेअरची एखादी घटना तरी घडतेच – यासारख्या धोकादायक सॉफ्टवेअरमुळे वैयक्तिक गोपनीय माहिती चोरली जाते शिवाय रँनसममध्ये पैसे दिल्याशिवाय आपलीच खाती वापरता येत नाहीत किंवा एखादा फोन किंवा एसएमएस आल्याबरोबर व्यक्तीच्या खात्यातील लाखो रुपयांची रक्कम तातडीने गायब होते.
सायबर हल्ल्यांविरोधात लढण्यासाठी जी काही काळजी घेणे आवश्यक आहे, ती बँका आणि फिनटेक्स घेतच आहेत, परंतु प्रत्येकाने वैयक्तिक पातळीवर काय गोष्टी कराव्यात आणि काय गोष्टी टाळाव्यात हेही जाणून घेतले पाहिजे.
व्यवहारांचा हा नवा मार्ग स्वीकारताना प्रत्येकाने पुढील गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत :
पासवर्ड
- तुमच्या खात्याची माहिती कधीही सेव्ह करू नका, यात खाते क्रमांक, क्रेडिट आणि डेबिट कार्डांचे पिन क्रमांक कधीही मोबाइल, लॅपटॉप किंवा आय-पॅडवर अथवा कार्डाच्या क्व्हरवर सेव्ह करू नका.
- अनधिकृत वापर टाळण्यासाठी तुमचा फोन नेहमी लॉक असू द्या.
- तुमचा पासवर्ड सहज ओळखता येणार नाही असा असावा, यात मुळाक्षरे आणि क्रमांक यांचे समीकरण हवे आणि विविध खात्यांना विविध पासवर्ड वापरा. ते लिहून ठेवू नका.
- तुमच्या ब्राउजरमधून `ऑटो कम्प्लिट’ प्रक्रिया काढून टाका.
- तुमचा कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईलसाठी नेहमी पॉवर ऑन / अॅक्सेस पासवर्ड वापरा तसेच स्क्रीनसेव्हर पासवर्ड वापरा, यामुळे तुमची यंत्रणा तुमच्या परवानगी शिवाय कुणीही वापरू शकणार नाही.
सुरक्षितता
- मोबाईल बँकिंग अॅप नियमितपणे नवे व्हर्जन आल्यास / अपग्रेड झाल्यास अपडेट करा. नेहमी अधिकृत अॅप्लिकेशन वापरा, कधीही रन-डाउन व्हर्जन वापरू नका.
- फायरवॉल आणि अँटी व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करा आणि तो नेहमी अपटेड करत राहा, यामुळे धोकादायक सॉफ्टवेअर डिलिट करणे किंवा नाहीसे करण्यासाठी मदत होते. सुरक्षिततेचा प्रोग्रॅम किंवा अँटीव्हायरस नियमितपणे अपटेड करत राहा.
- आपल्या खात्यावरून नेहमी लॉग ऑफ करा आणि काम पूर्ण झाल्यावर ब्राउजर बंद करा.
- व्यववहारांचे एसएमएस आणि ईमेल आणि ओटीपी नेहमी तपासत राहा आणि तुम्ही न केलेल्या व्यवहाराचे अलर्ट आल्यास बँकेला तातडीने कळवा.
अनोळखी ठिकाणाहून आलेली लिंक टाळा (थर्ड पार्टी लिंक)
- इतरांचे कॉम्प्युटरवर आणि रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट आणि सायबर कॅफे अशा सार्वजनिक ठिकाणी इंटरनेट बँकिंग वापरणे टाळा.
- अनोळखी ठिकाणाहून (थर्ड पार्टी) आलेली लिंक किंवा ईमेल उघडणे टाळा.
- अनोळखी स्रोतांकडून आलेली अॅप कधीही डाउनलोड करू नका.
- टेलिमेकर्स किंवा कॉलर्सना आपल्या खात्याची कुठलीही माहिती देऊ नका, अगदी त्यांनी तुमच्या खात्याची पडताळणी करायची आहे असे सांगितले तरीही.
तुमच्या बँकेशी वेळोवेळी संपर्कात राहा
- तुमच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार झाल्याचा संशय आल्यास बँकेला तातडीने माहिती द्या किंवा किमान कामाच्या तीन दिवसांमध्ये तरी कळवाच, ज्यामुळे तुमच्या तक्रारीची योग्य नोंद घेतली जाईल.
- तुमच्या मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी किंवा पत्ता यामध्ये काही बदल झाल्यास तातडीने बँकेला कळवा.
- डेबिट किंवा क्रेडिट कार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास बँकेला तातडीने माहिती द्या किंवा तुमच्या खात्यातून अनधिकृत व्यवहार होऊ नयेत म्हणून ते हॉटलिस्ट करून घ्या.
- तुमचा मोबाईल चोरीला गेल्यास बँकेला ताबडतोब कळवा.
नियमित तपासणी
- आपल्या खात्यातील बाकीवर आणि भूतकाळात केलेल्या व्यवहारांची पूर्ण माहिती ठेवा.
आताच्या आधुनिक युगात जुन्या पद्धतीच्या बँक व्यवहारांचे दिवस संपलेत. बँक क्षेत्र जितक्या जास्त प्रमाणात डिजिटल तंत्राने पुढे जाईल, आपली अत्याधुनिक उत्पादने ग्राहकांना 24×7 तांत्रिकदृष्ट्या पुरवेल आणि विविध श्रेणीतील सेवा आपल्या ग्राहकांना उपलब्ध करून देईल, तितक्याच वाढत्या प्रमाणात डिजिटल आणि नेट बँकिंग फसवणुकीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
भारत सध्या रोकड-रहित अर्थयंत्रणेकडे वाटचाल करत आहे, यामध्ये ग्राहकांनी वैयक्तिक पातळीवर आपल्या देयकांच्या यंत्रणांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली पाहिजे – यामुळे डिजिटल बँक सेवांचा अधिक चांगल्या प्रकारे आणि सुलभतेने आनंद घेता येणार आहे.
खेळात जिंकणेही तितकेच महत्वाचे -संजीव कुमार
नाशिक:कोणत्याही खेळात केवळ सहभाग नोंदविणे पुरेशे नाही. तर या क्रीडा स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन त्यात जिंकणे हे अधिक महत्वाचे आहे. कारण जिंकण्याच्या इर्षेतून आपण स्वतःशीच स्पर्धा करून स्वतःलाच सिद्ध करीत असतो, असे प्रतिपादन महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांनी केले.
नाशिक येथील स्व. मातोश्री मीनाताई ठाकरे क्रीडा संकुलात आयोजित महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकण प्रादेशिक विभागाचे प्रादेशिक संचालक श्री. सतीश करपे होते. यावेळी औरंगाबाद प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक श्री. ओमप्रकाश बकोरिया, कार्यकारी संचालक (मानव संसाधन) श्री. सचिन ढोले प्रामुख्याने उपस्थित होते. श्री. संजीव कुमार पुढे म्हणाले, मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी खेळाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यामुळेच सन २००९ पासून खंड पडलेल्या महावितरणच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा सुरु करण्याच्या प्रस्तावाला लगेच होकार दिला. खेळामधील सहभागासोबतच जिंकण्यालाही तितकेच महत्व आहे. स्पर्धेत जिंकताना योग्य पद्धतीचा अवलंब व मधला मार्ग (शर्टकट) न वापरणे या बाबीही महत्वाच्या ठरतात, असे ते म्हणाले. कौटुंबिक वातावरण तयार करून स्पर्धेचा आनंद घेण्याचे आवाहन करतानाच त्यांनी चांगल्या आयोजनाबद्दल नाशिक परिमंडलाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. संजीव कुमार यांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली. त्यानंतर राज्यभरातून आलेल्या संघांनी पोलीस बँड पथकाच्या सुमधुर सुरात शानदार संचलन करीत व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना मानवंदना दिली. कार्यक्रमाच्या शेवटी महिला व पुरुष संघाची १०० मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. यात पुरुषांमध्ये गुलाबसिंग वसावे (पुणे परिमंडल) प्रथम, संभाजी जाधव (कोल्हापूर परिमंडल) द्वितीय, महिलांमध्ये प्रिया पाटील (भांडुप परिमंडल) प्रथम तर सरिता सराटे (नागपूर) हिने द्वितीय क्रमांक पटकावला. श्री. संजीव कुमार यांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिक वितरित करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता सर्वश्री दीपक कुमठेकर, रंजना पगारे, बी. के. जनवीर, एम. जी. शिंदे, रामराव मुंढे, प्रभाकर पेठकर, प्रभारी मुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. संजय ढोके, सहमुख्य जनसंपर्क अधिकारी श्री. पी. एस. पाटील, श्री. अनिल कांबळे, यांच्यासह राज्यभरातून आलेले ६०० खेळाडू, प्रशिक्षक, पंच, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते. या क्रीडा स्पर्धांचा रविवारी (१९ नोव्हेंबर) समारोप होणार आहे.
अध्यक्षच उतरले मैदानात
खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार स्वतः मैदानात उतरले. त्यांच्यासोबत सहव्यवस्थापकीय संचालक श्री. ओमप्रकाश बकोरिया, कार्यकारी संचालक श्री. सचिन ढोले, प्रादेशिक संचालक श्री. सतीश करपे यांनीही बॅडमिंटन, टेबल टेनिस, कॅरम, व्हालीबॉल या खेळाचा आनंद घेतला. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे खेळाडूंमध्येही उत्साह संचारण्यास मदत झाली.
लठ्ठपणाशी लढा’ या मोहिमेचे मुख्यमंत्र्यांनी केले उद्घाटन …
पुणे : आपल्या जीवनशैलीत परिवर्तन झाले आहे. तसेच सुखासीनपणा आल्याने लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण वाढत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी चिंता व्यक्त केली. लठ्ठपणाचे मी स्वतः एक उदाहरण असल्याचे सांगत त्यांनी ‘हे चित्र बदलण्यासाठी लहानवयातच मुलांमध्ये संस्कार रुजविण्याबरोबच लठ्ठपणाविषयी प्रबोधन करणे आवश्यक आहे. त्यांच्या जीवनशैलीत बदल करायला हवा’, असा कानमंत्रही दिला.
रोटरी क्लब आॅफ कोरेगाव पार्क आणि जेटी फाऊंडेशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘लहान मुलांमधील लठ्ठपणाशी लढा’ या मोहिमेचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गुरूवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. पद्मावती येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला खासदार अनिल शिरोळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, मोहिमेच्या निमंत्रक आणि तोडकर क्लिनिक व जेटी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ. जयश्री तोडकर, रोटरीचे जिल्हा प्रांतपाल अभय गाडगीळ, क्लबचे अध्यक्ष संदेश गुप्ता, नवनीत गाला आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोहिमेचा लोगो व बीएमआय डायलरचे अनावरण करण्यात आले.
पुढील काळात देश घडविण्याची जबाबदारी असलेली पिढी नकळतपणे अक्षमतेकडे जात असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. लठ्ठपणाबरोबरच त्यानंतर येणारे रोगही वाढत आहेत. जीवनशैली व जेवणशैली बदलली असून आता सुखासीनपणा आला आहे. मागील ४० वर्षांमध्ये आपल्या पारंपरिक शैलीत खुप बदल झाला आहे. शरीरासाठी आवश्यक पोषण आहाराचा समतोल बिघडला असून लहान मुले त्याला बळी पडत आहेत. लहान मुलांमधील मैदानी खेळाचे प्रमाण कमी झाले आहे. संगणकावरही मैदानी खेळ आल्याने तेच खेळले जात आहेत, ही शोकांतिका आहे.
लठ्ठपणाचे मी एक उदाहरण आहे. त्यावेळी लठ्ठपणाविषयी अशा कोणत्याही मोहिमा नव्हत्या. आहारविषयी फारशी जागृती नव्हती. आता हे सगळे उपलब्ध होत आहे. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना त्यांच्यासाठी काय चांगले आणि काय वाईट, हे सांगण्याची गरज आहे. शाळांनी मुलांमध्ये संस्कार रुजविण्याबरोबरच त्यांना लठ्ठपणाविषयी सांगणेही आवश्यक आहे. लठ्ठपणा हा सर्व रोगांची जननी आहे. त्यासाठी राज्यात कृती दलही स्थापन करण्यात आले आहे. आज पुण्यात सुरू झालेली मोहीम राज्यभर राबविण्यासाठी शासन सर्व सहकार्य करेल, असे मुख्यमंत्र्यांनी नमुद केले. मोहिमेची सुरूवात पुण्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांपासून केली जाणार असल्याची माहिती डॉ. तोडकर यांनी यावेळी दिली.
कृषीपंपाचे थकित वीजबिल भरण्यास 15 दिवसांची मुदतवाढ
महिंद्रातर्फे नवीन ताकदवान स्कॉर्पिओ सादर
पुणे – भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने (एम अँड एम लि.) आज स्कॉर्पिओ या आपल्या प्रसिद्ध एसयूव्हीचा नवा, अधिक सामर्थ्यवान अवतार लाँच केला. नव्या सामर्थ्यवान स्कॉर्पिओला जास्त ताकद आणि टॉर्क, नवा ६ स्पीड ट्रान्समिशन, सुधारित कामगिरी, खास स्टायलिंग आणि आलिशान आरामदायीपणा बहाल करण्यात आला आहे. या गाडीची किंमत रु. 9 .6 9 लाख (एक्स शोरुम पुणे, एस 3 प्रकार करीता) आहे. ही गाडी
भारतभरातील महिंद्राच्या वितरकांकडे लगेचच उपलब्ध करण्यात आली आहे. नवी, ताकदवान स्कॉर्पिओ एस थ्री, एस फाइव्ह, एससेव्हन (१२० बीएचबी), एससेव्हन (१४० बीएचपी), एस११ (१४०बीएचपी) आणि एस११ (१४० बीएचपी ४ डब्ल्यूडीसह) अशा सहा प्रकारांत उपलब्ध करण्यात आली आहे.
लाँचप्रसंगी राजन वधेरा, अध्यक्ष, वाहन विभाग, महिंद्रा अँड महिंद्रा म्हणाले, ‘२००२ मध्ये लाँच झआल्यापासून स्कॉर्पिओने महिंद्रासाठी जुन्या सीमारेषा पुसून टाकत नवे मापदंड तयार केले. सहा लाख ग्राहकांसाठी स्कॉर्पिओ अभिमानाचा विषय बनताना पाहाणं विलक्षण आहे. आज आम्ही नवी, ताकदवान स्कॉर्पिओ लाँच करत असून तिच्याद्वारे गाडीची मूळ साहसी
संरचना कायम ठेवत आम्हाला रस्त्यावरील तिची कामगिरी आणखी उंचवायची आहे. ग्राहकांना ही नवी ताकदवान स्कॉर्पिओ थरारक व साहसपूर्ण प्रवासासाठी योग्य समीकरण वाटेल असे मला ठामपणे वाटते.’
नव्या स्कॉर्पिओअंतर्गत एमहॉक इंजिन बसवण्यात आले आहे, जे १४० बीएचपीची जास्त ताकद आणि ३२० एनएमचा जास्त टॉर्क देण्यासाठी बनवण्यात आले आहे. याचा सुधारित लो- एंड टॉर्क गाडी शहरात चालवण्याचा आनंद देतो आणि मुबलक मिड- रेंज टॉर्क महामार्गावर चालवण्याचा आनंद देतो. गाडीमध्ये बसवण्यात आलेला सहाव्या पिढीचा बॉर्ग वॉर्नर टर्बो चार्जर संपूर्ण ड्राइव्ह मजेदार आणि संवादी बनवतो. संपूर्णपणे नवे, सोपे, ६ स्पीड ट्रान्समिशन कामगिरी सुधारते व त्यामुळे महामार्गावर जास्त सहज गाडी चालवून इंधनाची बचत करणे शक्य होते.
एनव्हीएचमध्ये सुधारणा करण्यात आल्यामुळे केबिन अधिक शांत राहाते. गाडीचे नवे आणि जास्त आकर्षक बाह्य रूप तिला वेगळा आयाम बहाल करते, तर फॉक्स लेदरमुळे अंतर्गत सजालट जास्त स्टायलिश व उच्चभ्रू दिसते. याची ९.१ बॉश एबीएस यंत्रणेसह सुधारित ब्रेकिंग यंत्रणा, जास्त वेगवान ब्रेकिंग आणि सुधारित ब्रेक फील देते.
२००२ मध्ये लाँच झाल्यापासून एसयूव्ही क्षेत्रात वर्चस्व गाजवणारी स्कॉर्पिओ कायमच स्टाइल स्टेटमेंट आणि साहसीपणा, ताकद व थराराचे प्रतीक ठरली असून आता नवी, ताकदवान स्कॉर्पिओ तिची ही प्रतिमा आणखी उंचावर नेईल.
नव्या स्कॉर्पिओमध्ये सुधारित तंत्रज्ञान वैशिष्ट्ये उदा. सहाय्य करणारा नवा रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, नवा १ टच लेन चेंज इंडिकेटर, नवी ऑटो विंडो रोल- अप समाविष्ट करम्यात आली आहे. गाडीमध्ये आणखीही आधुनिक तंत्रज्ञान वैशिष्ट्ये उदा. स्टॅटिक बेंडिंग तंत्रज्ञान असलेले प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, जीपेससह सहा इंची टच- स्क्रीन इन्फोटेनमेंट, गाडीतील
हवामानावर नियंत्रण करण्यासाठी पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणा इत्यादी बसवण्यात आली आहेत.
स्कॉर्पिओची कठीण चासिसवर आधारित एसयूव्ही बांधणी तिला कारपेक्षा जास्त सुरक्षित बनवते आणि त्यामुळे ती खराब रस्ते तसेच ऑफलोडिंगसाठी केव्हाही जास्त चांगली ठरते. यामध्ये उच्च प्रतीची सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली
असून त्यात ड्युएल एयरबॅग्ज, अँटी- लॉकिंग यंत्रणा (एबीएस), कोलॅप्सिबल स्टिअरिंग कॉलम आणि साइड इन्ट्रुजन बीम्स, पॅनिक ब्रेक्स इंडिकेशन, इंजिन मोबिलायजर्स इत्यादींचा समावेश आहे.
ही गाडी विविध प्रकारच्या आसनक्षमतांमध्ये उपलब्ध करण्यात येणार असून ग्राहकाला ७,८,९ आसनक्षमतांमधून आपल्या गरजेप्रमाणे निवड करता येईल. गाडी सर्व महिंद्र वितरकांकडे १४ नोव्हेंबर २०१७ पासून पाच आकर्षक रंगांत उपलब्ध होईल. त्यात नवा पर्ल व्हाइट (फक्त एस ११ मध्ये) डायमंड व्हाइट (एस ११ खेरीज), नेपोली ब्लऍक, डी सॅट सिल्व्हर,
मोल्टेन रेड आणि ६ प्रकार – एसथ्री, एसफआइव्ह, एससेव्हन (१२० बीएचबी), एससेव्हन (१४० बीएचपी), एस११ (१४०बीएचपी) आणि एस११ (१४० बीएचपी ४ डब्ल्यूडीसह) यांचा समावेश आहे.
नव्या, ताकदवान स्कॉर्पिओची नवी वैशिष्ट्ये आणि महत्त्वाच्या सुधारणा
स्कॉर्पिओची वैशिष्ट्यपूर्ण थरारक ड्राइव्ह, ताकदवान एमहॉक इंजिनसह
o आता १०३ केडब्ल्यू (१४० बीएचपी) ताकदीची डिलीव्हरी
o नवीन सुधारित ३२० एनएम
याचा सुधारित लो- एंड टॉर्क शहरातील ड्राइव्ह आनंददायी बनवतो
मुबलक मिड- रेंज टॉर्कमुळे मिळतो महामार्गावर ड्राइव्ह करण्याचा आनंद
सहाव्या पिढीचा बॉर्ग वॉर्नर टर्बो चार्जर संपूर्ण ड्राइव्ह मजेदार आणि संवादी बनवतो. संपूर्णपणे नवे, सोपे, ६
स्पीड ट्रान्समिशन कामगिरी सुधारते. महामार्गावर जास्त सहज गाडी चालवून इंधनाची बचत करणे शक्य
एनव्हीएचमध्ये सुधारणा करण्यात आल्यामुळे केबिन अधिक शांत
९.१ बॉश एबीएस यंत्रणेसह सुधारित ब्रेकिंग यंत्रणा आणि सुधारित ब्रेकिंग व सुधारित ब्रेक फील
भव्य, नवे स्टायलिंग
नवे, भव्य फ्रंट ग्रिल, क्रोम इनसर्टसह
नवे मस्क्युलर अलॉय व्हील्स
नवे ओआरव्हीएम साइड टर्न इंडिटेकरसह
क्रोम बेझेलसह नवे स्टायलिश फॉग लॅम्प्स
नवे टेलगेट, क्रोम अप्लिक आणि एयरोब्लेड वायपरसह
नवे आकर्षक रेड लेन्स एलईडी टेल लॅम्प्स
मागील बंपरवर नव्याने डिझाइन करण्यात आलेले फुटस्टेप
नवे क्लियर लेन्स टर्न इंडिकेटर्स आणि हेडलॅम्प्समध्ये बोल्ड क्रोम हायलाइट्स
नवी स्किड प्ले
नवे अप्पर आणि लोअर ग्रिल मेश डिझाइन
नव्या लूकचे एयर एक्स्ट्रॅक्टर
उच्चभ्रू इंटेरियर्स, उपयुक्त वैशिष्ट्यांसह
नव्या फॉक्स लेदर सीट्स, फॉक्स लेदर लावलेले स्टिअरिंग व्हील आणि गियर लिव्हर
नवे रूफ माउंटेड सनग्लास होल्डर
नवा मोबाइल होल्डर स्लॉट आणि मोठे कबीहोल्स
अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त वैशिष्ट्ये
असिस्टसह नवा रिव्हर्स पार्किंग कॅमेरा
नवा १ टच लेन चेंज इंडिकेट्र
नवा ऑटो विंडो रोल अप
स्टॅटिक बेंडिंग तंत्रज्ञान आणि एलईडी आयब्रोज
१५ सेमी (सहा इंची) टच स्क्रीन इन्फोटेनमेंट, ब्लुटुथ/सीडी/डीव्हीडी/यूएसबी/ऑक्ससह
दहा भाषांमध्ये जीपीएस नॅव्हिगेशन
चालक माहिती यंत्रणा
स्टिअरिंग माउंटेड ऑडिओ आणि क्रुझ कंट्रोल्स
कुशन सस्पेंशन आणि अँटी- रोल तंत्रज्ञान
शिफ्ट-ऑन- द-फ्लाय फोरडब्ल्यूडी यंत्रणा
इंटेलिपार्क
इलेक्ट्रिकदृष्ट्या अडजस्ट करता येणारे ओआरव्हीएम
टायर- ट्रोनिक्स
मायक्रो हायब्रीड तंत्रज्ञान
पाऊस आणि उजेडाचे सेन्सर्स
गियर शिफ्ट इंडिकेटर
व्हॉइस असिस्ट सिस्टीम
सुरक्षा वैशिष्ट्ये
ड्युएल एयरबॅग्ज (पॅसेंजर आणि चालक)
एबीएस
पॅनिक ब्रेक इंडिकेशन
कोलॅप्सिबल स्टिअरिंग कॉलम आणि साइड इन्ट्रुजन बीम्स
इंजिन इममोबिलायझर
अँटी- थेफ्ट वॉर्निंग
सीट बेल्ट रिमाइंडर लॅम्प
स्पीड अलर्ट
वाहन चालवताना ऑटो डोअर लॉक
`हायर पार्क`पार्कच्या माध्यमातून भारत-चीन औद्योगिक संबंध अधिक दृढ होतील- मुख्यमंत्री
पुणे : देशात महाराष्ट्राला उद्योजकांची गुंतवणुकीसाठी सर्वाधिक पसंती आहे. पुणे हे राज्याचे स्टार्ट अप हब असून जर्मनीपाठोपाठ चीनच्या अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. हायर इंडिया इंडस्ट्रीअल पार्कच्या माध्यमातून या परिसरात रोजगार निर्मितीबरोबरच विविध करांच्या रूपाने महसुलातही मोठी वाढ होणार आहे. या पार्कच्या माध्यमातून भारत आणि चीनचे औद्योगिक संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
रांजणगाव एमआयडीसीतील हायर इंडस्ट्रीअल पार्कच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी हायर ग्रुपचे कार्यकारी अध्यक्ष लियांग हॅशन, हायर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक साँग युजून, हायर इंडियाचे अध्यक्ष इरिक ब्रगॅन्झा, आमदार बाबुराव पाचर्णे उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, २०१५ साली चीन दौऱ्यावेळी हायर कंपनीच्या अधिकाऱ्यांशी गुंतवणुकीबाबत चर्चा झाली होती. त्यानुसार या पार्कची उभारणी करण्यात आली आहे. मेक इन महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्य शासनाने उचललेल्या सकारात्मक पावलामुळे हे शक्य झाले. हायर इंडिया इंडस्ट्रीअल पार्क हा देशातील पहिला औद्योगिक पार्क आहे. या पार्कमुळे राज्यातील उद्योग जगतात सकारात्मक बदल होणार आहे. या पार्कमुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार असून विविध करांच्या रुपाने महसुलातही मोठी वाढ होणार आहे. त्याचबरोबर या परिसरातील पायाभूत सुविधांमध्येही आमुलाग्र बदल होईल. मेक इन महाराष्ट्र अभियानामुळे गेल्या तीन वर्षात महाराष्ट्राला गुंतवणुकदारांची सर्वाधिक पसंती मिळाली आहे. याला अनुकूल उद्योजक धोरण, कुशल मनुष्यबळ कारणीभूत आहे. राज्यात इंग्लंड, जपान, अमेरिका, जर्मनी, नेदरलॅण्ड या देशातील उद्योजकांची मोठी गुंतवणूक आहे. पुणे हे देशातील आठवे मोठे महानगर असून प्रतिमाणसी उत्पादनात पुण्याचा सहावा क्रमांक लागतो. पुणे हे देशाचे स्टार्ट अप हब आहे. गुंतवणुकदारांची पुण्याला सर्वाधिक पसंती आहे.
पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर ॲटोमोबाईल कंपन्यांनी आपले उत्पादन सुरू केले आहे. त्याचबरोबर जागतिक बँकेच्या सहकार्याने फुड क्लस्टर म्हणूनही पुणे विकसित होत आहे. भाजीपाला व फळांवर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग यानिमित्ताने येथे उभे राहणार आहेत. राजीव गांधी आयटी पार्कच्या माध्यमातून अनेक सॉफ्टवेअर, हार्डवेअर कंपन्याही पुणे परिसरात कार्यरत आहेत. इंडो-जर्मनी करारामुळे पुणे परिसरात दोन हजाराहून अधिक जर्मन कंपन्या कार्यरत आहेत. आता चीनच्याही अनेक कंपन्या या परिसरात येत आहेत. या पार्कच्या माध्यमातून रोजगाराला चालना मिळेल.
यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी हायर इंडिया प्रकल्पाची पाहणी करून माहिती घेतली. यावेळी लियांग हॅशन, साँग युजून, इरिक ब्रगॅन्झा यांची भाषणे झाली.
हायर इंडिया इंडस्ट्रीयल पार्कचे ठळक वैशिष्ट्ये
- मेक इन इंडियाच्या धर्तीवरील मेक इन महाराष्ट्र अभियानातील गुंतवणूक.
- पार्कच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक.
- हायर इंडियाच्या माध्यमातून थेट २००० नवीन रोजगाराची निर्मिती तर अप्रत्यक्ष दहा हजार जणांना रोजगार उपलब्ध.
- सन २०१५ साली महाराष्ट्र शासनाचा हायर इंडिया कंपनीशी गुंतवणुकीचा करार.
- सन २०१६ साली प्रकल्पाचे भूमिपूजन.
- या प्रकल्पाच्या माध्यमातून हायर इंडिया कंपनीच्या उत्पादन क्षमतेत दुपटीने वाढ होऊन रेफ्रिजरेटरचे उत्पादन १.८ मिलियन होणार.
- या प्रकल्पात एलईडी टेलिव्हिजन, वॉशिंग मशीन, वाटर हिटर आणि एअर कंडिशनरचे उत्पादनही होणार.
- सन २०१५ साली हायर इंडिया कंपनीने ‘मेक इन इंडिया अवार्ड फॉर एक्सलन्स’ हा पुरस्कार मिळविला होता.
- रांजणगावमधील हा प्रकल्प ४० एकर क्षेत्रावर.
24 तास पाणी योजनेच्या अनुषंगाने,जलसंपदा चे महापालिकेला 2 दणके ? भाजपा सेनेंतर्गतचा वाद कि आणखी कुठे मुरतंय पाणी …?
पुणे -एकीकडे जलसंपदा विभाग महापालिकेकडे पुरविलेल्या पाण्या पोटी ३५४ कोटी ची थकीत रकमेची मागणी करत असताना दुसरीकडे महापालिका प्रशासनाने मात्र आम्ही दर 2 महिन्याला जलसंपदा विभागाचे बिल अदा करतो , थकीत रक्कम काहीच नाही असा दावा केल्याने , ३५४ कोटीचे पाणी मुरतंय कुठे ? असा प्रश्न निर्माण झाला असून यामागे २४ बाय 7 पाणी योजनेतील भाजपा सेने अंतर्गत राजकारण आहे कि काय ? अशी हि शंका उपस्थित झाली आहे . दरम्यान पाणीपुरवठा प्रमुख व्ही .जी कुलकर्णी यांनी या प्रकरणी मुंबईत शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत महापालिका प्रशासन आपली भूमिका मांडेल असे स्पष्ट केले आहे .
अगोदर जलसंपदा विभागाने महापालिकेच्या पाणी पुरवठ्यात ८.३० टीएमसी पाण्याची कपात का करू नये ?अशा प्रकरचे पत्र पाठवून पहिला दणका दिल्यानंतर आता ३५४ कोटीची मागणी करणारे पत्र देवून दुसरा दणका दिल्याने पालिका आणि जलसंपदा या दोघांमधील दुरावा दिसून येवू लागला आहे . मात्र याबाबत कोणत्याही प्रकारे पाण्याची कपात करू देणार नाही असे कालपर्यंत सांगणाऱ्या पालिकेतील भाजपा च्या सत्ताधारी प्रशासनाने ३५४ कोटीच्या थकबाकीबाबत मात्र आज तरी चुप्पी चे धोरण ठेवले आहे . याबरोबर राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षानेही आज याबाबत अधिकृतपणे बोलणे टाळले आहे.
महापालिका जास्त पाणी वापरते असे सांगून जलसंपदा विभागाने पाणीकपातीबाबत दिलेले पत्र म्हणजे पहिला दणका नव्हता तर तो दुसरा दणका होता. पण पहिल्यांदा कपातीचे पत्र उघड झाले आणि काल ३५४ कोटी ७० लाखाची मागणी करणारे जे पत्र उघड झाले , ते वास्तविक पाहता १९ ऑगस्ट २०१७ रोजीच महापालिका आयक्त कार्यालयास प्राप्त झालेले आहे . तरीही सप्टेंबर आणि ऑक्टोबर अशी 2 महिने हे पत्र पालिका प्रशासनाने गुलदस्त्यात का ठेवले ? असा प्रश्न निर्माण झाला आहे .
महापालिकेने 2012 पासून राज्यशासनाने मंजूर केलेल्या कोटयापेक्षा साडेअकरा टीएमसीपेक्षा अधिक पाणी वापरले असून या पाण्यासाठी औद्योगिकदराने शुल्क आकारून या शुल्कावरील दंडाच्या रकमेपोटी जलसंपदा विभागाने 354 कोटी रुपयांची थकबाकी द्यावी, अशी मागणी जलसंपदा विभागाने ऑगस्ट ला दिलेल्या पत्राद्वारे महापालिकेकडे केली आहे.
शहरात पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेला साडेअकरा टीएमसी पाणी मंजूर झालेले आहे. परंतु महापालिका त्यापेक्षा अधिक पाण्याचा वापर 2012 पासून करीत आहे. याबाबतचे रिव्हाईस बिल म्हणून हे पत्र धाडण्यात आले आहे .
पाटबंधारे विभागाकडून व्यावसायिक वापरापोटी पाण्याचा दर एक हजार लिटरसाठी 33 रुपये, तर पिण्याच्या पाण्यासाठी हा दर दोन रुपये 20 पैसे आकारण्यात येतो. त्यानुसार जादा पाण्याचा दर व्यावसायिक स्वरूपाने जलसंपदा विभागाने आकारला आहे.
पुण्यात चोवीस तास पाणीपुरवठा करण्याच्या योजनेसाठी राबविण्यात आलेली निविदा प्रक्रिया, कंत्राटदारांनी संगनमत केल्याच्या आरोपावरून आणि त्यात सीबीआय ने दिलेल्या पत्रावरून राज्य शासनाच्या आदेशान्वये गुरुवार दिनांक 3 ऑगस्ट २०१७ रोजी रद्द करण्यात आली होती . या प्रकल्पामध्ये संबंधित कंत्राटदारांनी संगनमत करून कामापेक्षा २६ टक्के जास्त दराने निविदा भरल्याने महापालिकेच्या तिजोरीवर किमान पाचशे कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडणार होता. यावेळी निविदा रद्द करीत असल्याची घोषणा पालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी पत्रकार परिषदेत केली होती .
या पाणीपुरवठा योजनेतील १७१८ कोटी रुपयांच्या पाइपलाइनची निविदा २४ ते २६ टक्के वाढीव दराने आली होती. त्यामुळे पालिकेचा ४०० कोटी रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागणार होता. या कामात ठेकेदार कंपन्यांनी संगनमत केल्याचा आरोप झाल्याने या योजनेच्या निविदा रद्द करून फेरनिविदा मागविण्याचा निर्णय घेतला होता. राज्य सरकारने वस्तू व सेवा कर (जीएसटी) लागू केल्याने फेरनिविदा काढल्याचे कुमार यांनी सांगितले होते. पाइपलाइनच्या कामाची निविदा रद्द करताना आयुक्तांनी पाणी मीटरच्या निविदाही रद्द केल्या होत्या. पाइपलाइन, पाणीमीटर, फायबर ऑप्टिकल डक्ट आणि मेंटेनन्सच्या कामाची निविदा एकत्रित काढण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले होते .२४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्यासाठी बॉँडद्वारे निधी उभारण्यास प्रारंभ करण्यात आला होता . २०० कोटीचे बॉंड घेण्यात आले होते .मात्र निविदा प्रक्रिया रद्द झाल्यानंतर बॉंड ची प्रक्रिया थांबविण्यात आली . या घटनेस 3 महिने उलटले आहेत आता फेर निविदा काढण्यात येत आहे .
या सर्व बाबींचा जलसंपदा विभागाने २९ ऑगस्ट रोजीच दिलेल्या ३५४ कोटीच्या मागणी बाबतच्या पत्राचा संदर्भ आहे किंवा कसे ,पाणी कपातीबाबत च्या पत्रामागील नेमका हेतू काय होता ? या सर्व बाबी आता २४ तास पाणीपुरवठा योजनेशी जोडल्या जावू शकतात काय ? यावर काही चिकित्सक आपापली मते अजमावीत आहेत . शिवसेनेचे विजय शिवतारे जलसंपदा मंत्री आहेत . आज त्यांच्याशी संपर्क साधुनही त्यांच्याशी या विषयावर बोलणे होऊ शकले नाही . तर भाजपचे एक पदाधिकारी यांनी याबाबत पालकमंत्री गिरीश बापट हेच आपली भूमिका मांडतील असे सांगितले. तर दुसरे पदाधिकारी यांनी आपण उद्या यावर बोलू असे सांगितले. दरम्यान आयुक्त कुणालकुमार ,महापौर मुक्ता टिळक हे आज स्मार्ट सिटी च्या बैठकीबाबत मुंबईत होते .त्यामुळे त्यांचेही म्हणणे समजू शकले नाही .
खासदार शिरोळेंच्या आवाहनाला महापौरांचा प्रतिसाद
पुणे -शहरात थंडीला सुरुवात झाली असून या वातावरणात तयार होणार्या धुक्यामध्ये धूलिकण आणि धूर मिसळून हवा प्रदूषित होते. अशावेळी प्रदूषण कमी करण्यासाठी पुणेकरांनी पुढाकार घ्यावा, आणि कचरा, पाला पाचोळा, टायर जाळणे बंद करावे, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी नागरिकांना केले आहे.
दिल्लीतील प्रदूषणाच्या भीषण समस्येच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील प्रदूषणाची सध्याची पातळी व त्यातील संभाव्य वाढ लक्षात घेता उघडयावर जाळला जाणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन करणे आणि रस्ते बांधणीत कमीत कमी कचरा निर्माण होणे हे दोन उपाय प्रामुख्याने करणे गरजेचे असल्याचे खासदार अनिल शिरोळे ह्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा समवेत घेतलेल्या बैठकीत सांगितले होते .आणि महापौरांना त्यानुसार कळविले होते .त्यानंतर महापौरांनी याबाबत पत्रक प्रसिद्धीस दिले आहे .
हेमा मालिनी ने दीपिका पादुकोण के लिए लिखा एक स्नेहभरा संदेश!
हेमा मालिनी ने दीपिका को अपनी जीवनी की पहली किताब के रूप में बेशकीमती तोहफ़ा दिया। इस किताब में हेमा मालिनी ने दीपिका के लिए अपने हाथों से एक संदेश लिखा है जिसने इसे ओर भी खास बना दिया।
दीपिका ने हाल ही में एक समारोह में उनकी जीवनी को दर्शको के सामने पेश किया था जहाँ हेमा जी ने अभिनेत्री के बारे में कई अद्भुत बाते भी साझा की थी।
एक सरहाना के रूप में, हेमा जी ने अपनी जीवनी की पहली किताब दीपिका को भेंट दी जिसमे उन्होंने दीपिका के लिए एक स्नेहभरा संदेश साझा करते हुए लिखा,”जो किताब आज तुमने लॉन्च की है उसका काफी महत्व है और इस कलात्मक उत्कृष्टता के प्रति शानदार योगदान के रूप में मैं तुम्हें यह पुस्तक भेंट करती हूँ।
हेमा जी के प्रति आभार व्यक्त करते हुए दीपिका ने सोशल मीडिया पर उस जीवनी के कवर पेज को साझा किया जहाँ हेमा जी ने अपने हाथों से उस संदेश को लिखा था।
हेमा मालिनी ने इससे पहले दीपिका को आज के युग की ड्रीम गर्ल का ख़िताब दिया था। दिलचस्प बात ये है कि, हाल ही में ओम शांति ओम से बॉलीवुड में अपनी शुरुवात करने वाली दीपिका ने फ़िल्म में शांति प्रिया नामक “ड्रीमी गर्ल” की भूमिका निभाई थी जो हेमा मालिनी से प्रेरित थी।
दोनो ही अभिनेत्री अपने ज़माने की दिग्गज अभिनेत्रियों में से एक है जिन्होंने बड़े बजट की फिल्मों में अपना दमखम दिखाया है।
जहाँ एक तरफ संजय लीला भंसाली की सबसे बड़ी परियोजना और वर्तमान की सबसे महंगी फ़िल्म पद्मावती में नज़र आने वाली दीपिका है, वही बीते दिनों में वो हेमा मालिनी थी जिन्होंने 1983 में रजिया सुल्तान की भूमिका निभाई थी जो एक नाममात्र भूमिका में महिलाओं को समर्थित एक उच्च पैमाने की फिल्म थी।
दीपिका पादुकोण वर्तमान में पद्मावती की कहानी, पोस्टर, ट्रेलर और गीत को मिल रही आपार प्रशंसा और प्रेम का लुत्फ उठा रही है।
फ़िल्म के पोस्टर में नज़र आ रहा अभिनेत्री के प्रभावशाली किरदार के लिए उन्हें खूब सरहाया जा रहा है। दीपिका ने शानदार आवभावः से हर किसी को मंत्रमुक्त कर देती है और फ़िल्म के पोस्टर में भी इसी तरीके से दीपिका ने दर्शको को अपनी तरफ आकर्षित कर लिया है।
वही दीपिका का घूमर गीत दर्शकों को इस कदर पसंद आ रहा है कि एक बार फिर हर कोई दीपिका की उस खूबसूरती का दीवाना हो गया है।
मन्या-पप्याच्या ‘दोस्तीचा घाट’
बालदिन साजरा होताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, खरंच आजच्या मुलांचे ‘बालपण’ जपले जाते का? लहान मुलांच्या भावविश्वाची कल्पना अनेकदा येत नाही. सभोवतालच्या असंख्य गोष्टींचा परिणाम त्यांच्या मनावर होत असतो. परिस्थिती अभावी बालपण हरवलेल्या अशाच दोन लहान मुलांची गोष्ट ‘घाट’ या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. जरे एंटरटेन्मेंटची प्रस्तुती असलेल्या ‘घाट’ चित्रपटाची निर्मीती सचिन जरे यांनी केली असून दिग्दर्शन राज गोरडे यांनी केलं आहे. येत्या १५ डिसेंबरला ‘घाट’ प्रदर्शित होणार आहे.
निरागसतेचं प्रतिनिधीत्व करणारी ही कथा मन्या व पप्या या दोन जिवलग मित्रांची आहे. ‘अवताराची गोष्ट’, ‘रांजण’ यासारख्या चित्रपटांमधून नावारूपाला आलेल्या यश कुलकर्णीने मन्या ही व्यक्तिरेखा साकारली असून त्याच्या मित्राची म्हणजे पप्याची भूमिका दत्तात्रय धर्मे याने साकारली आहे. अडचणीत असलेल्या आपल्या कुटुंबासाठी संघर्ष करीत स्वत:ला घडवू पाहणाऱ्या मुलांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या व्यक्तिरेखा साकारायला मिळाल्याचा आनंद या दोघांनी व्यक्त केला. तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबांच्या जगण्यातील वास्तव ‘घाट’ च्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे.
मन्या या व्यक्तिरेखेसाठी यशसारखा कलाकार अपेक्षित असल्याने त्याची निवड केल्याचे दिग्दर्शक राज गोरडे सांगतात तर मन्याच्या मित्राची म्हणजेच पप्प्याची भूमिका साकारण्यासाठी हवा असलेला मुलगा मिळत नव्हता. एके दिवशी इंद्रायणीच्या घाटावर फिरत असताना एक माऊली आपल्या मुलाला घेऊन राज गोरडे यांच्याकडे आली. “काहीही करा पण माझ्या मुलाला चित्रपटात घ्या”, अशा आर्त स्वरात हात जोडून ती राजकडे विनवणी करू लागली. विनवणी करता करता त्या माऊलीचे डोळे अश्रूंनी पाणावले. हे राज यांना पाहावलं नाही आणि त्यांनी पप्प्याच्या भूमिकेसाठी दत्तात्रयला घेण्याचं निश्चित केलं. तो ही भूमिका करू शकेल का? याबाबत साशंकता होती पण दत्तात्रयने या भूमिकेला चांगला न्याय दिल्याचं राज गोरडे मान्य करतात.
मिताली जगताप, उमेश जगताप, रिया गवळी यांच्याही ‘घाट’ मध्ये भूमिका आहेत. अमोल गोळे यांनी या चित्रपटाचं छायांकन केलं आहे. रोहित नागभिडे यांनी या चित्रपटाला संगीत दिलं असून, राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या महावीर साबन्नवार यांनी साऊंड डिझाइनिंगचं काम पाहिलं आहे. प्रकाश बल्लाळ या चित्रपटाचे कला दिग्दर्शक आहेत, तर सागर वंजारी संकलक आहेत. रंगभूषा आणि केशभूषा रसिका रावडे यांनी केली असून, शीतल पावसकर यांनी कॅास्च्युम डिझाइन केले आहेत. विठ्ठल गोरडे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत, तर विनायक पाटील प्रोडक्श्न मॅनेजर आहेत.
१५ डिसेंबरला ‘घाट’ चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
दिव्यदृष्टीचा दैदिप्यमान ज्ञानदीप हा ग्रंथ वारकरी संप्रदायाला भूषणास्पद डॉ. तुकाराम महाराज दैठणेकर यांचे मत
मातीत रमणाऱ्या हातांनी लुटला बालदिनाचा आनंद
गोयल गंगा फौंडेशनचा पुढाकार
पुणे- मातीत रंगलेले हात आज वेगळ्याच विश्वात रमताना दिसले. निमित्त होते गोयल गंगा फाऊंडेशनने आयोजित केलेल्या बाल दिनाचे. आज बावधन मधील ‘गंगा लेजंड’ येथे बांधकाम मजुरांच्या मुलांसमवेत गोयल गंगा फाऊंडेशनने बाल दिन साजरा केला.
७० हुन अधिक मुलांनी रुचकर जेवणाबरोबरच मॅजिक शो ,पपेट शो, गप्पागोष्टी, नाचगाणी अशा विविध कार्यक्रमांचा या चिमुकल्यांनी आस्वाद घेतला. मॅजिक शो बघतानाचे त्यांचे अचंबित झालेले आणि पपेट शो पाहून खदखदून हसू फुलवणारे चेहेरे कायम आठवणीत राहतील अशी भावना जयप्रकाश गोयल यांनी व्यक्त केली.
त्यांच्या आवडीचा ‘द जंगल बुक’ हा चित्रपट देखील दाखविला गेला.
व्यावसायिक नृत्यांगनांनी या मुलांना नृत्य दिग्दर्शन केले त्याला प्रतिसाद देत मुलांनी देखील त्यांच्यासोबत बिंदास्तपणे नृत्य केले.
गोयल गंगा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या मुलांशी संवाद साधत त्यांना शिक्षणाचे महत्व ज्याचा उपयोग त्यांना आपल्या उज्ज्वल भविष्यात कसा करता येईल, याबद्दल मार्गदर्शन केले.
गोयल गंगा फाऊंडेशनचे विश्वस्त अतुल गोयल म्हणाले कि, ही मुले उद्याच्या भविष्याचे शिल्पकार आहेत, त्यांच्यासाठी मूलभत गरजांपासून ते शिक्षणापर्यंत जे काही करता येणे शक्य आहे ते करण्यासाठी अधिकाधिक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.
आठवीत शिकणारी बांधकाम मजुराची मुलगी आकांक्षा हिने शिक्षक होण्याचे स्वप्न बोलून दाखवले याचे कारण विचारताच ती म्हणाली कि आजच्या फेसबुक, व्हाटस अॅप, ट्विटर, चित्रपट, संगणक, मोबाइलच्या जमान्यात विद्यार्थी शिक्षकांच्या आधीच प्रचंड माहिती मिळवतो. त्यामुळेच शिक्षकाचे कार्य आज खरोखरच कठीण बनत चालले आहे. विद्यार्थ्याला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणे म्हणजे शिक्षण नव्हे तर त्यांच्याजवळील माहितीचा कसा उपयोग करून घ्यायचा याचे मार्गदर्शन करून,त्याचे आचरण करायला लावणे म्हणजे शिक्षण आणि तेच मला शिक्षक म्हणून विद्यार्थांना ते पटवून द्यायचे आहे.




