महिंद्रातर्फे नवीन ताकदवान स्कॉर्पिओ सादर

Date:

पुणे – भारतातील आघाडीची एसयूव्ही उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने (एम अँड एम लि.) आज स्कॉर्पिओ या आपल्या प्रसिद्ध एसयूव्हीचा नवा, अधिक सामर्थ्यवान अवतार लाँच केला. नव्या सामर्थ्यवान स्कॉर्पिओला जास्त ताकद आणि टॉर्क, नवा ६ स्पीड ट्रान्समिशन, सुधारित कामगिरी, खास स्टायलिंग आणि आलिशान आरामदायीपणा बहाल करण्यात आला आहे. या गाडीची किंमत रु. 9 .6 9 लाख (एक्स शोरुम पुणे, एस 3 प्रकार करीता) आहे. ही गाडी
भारतभरातील महिंद्राच्या वितरकांकडे लगेचच उपलब्ध करण्यात आली आहे. नवी, ताकदवान स्कॉर्पिओ एस थ्री, एस फाइव्ह, एससेव्हन (१२० बीएचबी), एससेव्हन (१४० बीएचपी), एस११ (१४०बीएचपी) आणि एस११ (१४० बीएचपी ४ डब्ल्यूडीसह) अशा सहा प्रकारांत उपलब्ध करण्यात आली आहे.

लाँचप्रसंगी राजन वधेरा, अध्यक्ष, वाहन विभाग, महिंद्रा अँड महिंद्रा म्हणाले, ‘२००२ मध्ये लाँच झआल्यापासून स्कॉर्पिओने महिंद्रासाठी जुन्या सीमारेषा पुसून टाकत नवे मापदंड तयार केले. सहा लाख ग्राहकांसाठी स्कॉर्पिओ अभिमानाचा विषय बनताना पाहाणं विलक्षण आहे. आज आम्ही नवी, ताकदवान स्कॉर्पिओ लाँच करत असून तिच्याद्वारे गाडीची मूळ साहसी
संरचना कायम ठेवत आम्हाला रस्त्यावरील तिची कामगिरी आणखी उंचवायची आहे. ग्राहकांना ही नवी ताकदवान स्कॉर्पिओ थरारक व साहसपूर्ण प्रवासासाठी योग्य समीकरण वाटेल असे मला ठामपणे वाटते.’
नव्या स्कॉर्पिओअंतर्गत एमहॉक इंजिन बसवण्यात आले आहे, जे १४० बीएचपीची जास्त ताकद आणि ३२० एनएमचा जास्त टॉर्क देण्यासाठी बनवण्यात आले आहे. याचा सुधारित लो- एंड टॉर्क गाडी शहरात चालवण्याचा आनंद देतो आणि मुबलक मिड- रेंज टॉर्क महामार्गावर चालवण्याचा आनंद देतो. गाडीमध्ये बसवण्यात आलेला सहाव्या पिढीचा बॉर्ग वॉर्नर टर्बो चार्जर संपूर्ण ड्राइव्ह मजेदार आणि संवादी बनवतो. संपूर्णपणे नवे, सोपे, ६ स्पीड ट्रान्समिशन कामगिरी सुधारते व त्यामुळे महामार्गावर जास्त सहज गाडी चालवून इंधनाची बचत करणे शक्य होते.
एनव्हीएचमध्ये सुधारणा करण्यात आल्यामुळे केबिन अधिक शांत राहाते. गाडीचे नवे आणि जास्त आकर्षक बाह्य रूप तिला वेगळा आयाम बहाल करते, तर फॉक्स लेदरमुळे अंतर्गत सजालट जास्त स्टायलिश व उच्चभ्रू दिसते. याची ९.१ बॉश एबीएस यंत्रणेसह सुधारित ब्रेकिंग यंत्रणा, जास्त वेगवान ब्रेकिंग आणि सुधारित ब्रेक फील देते.
२००२ मध्ये लाँच झाल्यापासून एसयूव्ही क्षेत्रात वर्चस्व गाजवणारी स्कॉर्पिओ कायमच स्टाइल स्टेटमेंट आणि साहसीपणा, ताकद व थराराचे प्रतीक ठरली असून आता नवी, ताकदवान स्कॉर्पिओ तिची ही प्रतिमा आणखी उंचावर नेईल.
नव्या स्कॉर्पिओमध्ये सुधारित तंत्रज्ञान वैशिष्ट्ये उदा. सहाय्य करणारा नवा रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, नवा १ टच लेन चेंज इंडिकेटर, नवी ऑटो विंडो रोल- अप समाविष्ट करम्यात आली आहे. गाडीमध्ये आणखीही आधुनिक तंत्रज्ञान वैशिष्ट्ये उदा. स्टॅटिक बेंडिंग तंत्रज्ञान असलेले प्रोजेक्टर हेडलॅम्प्स, जीपेससह सहा इंची टच- स्क्रीन इन्फोटेनमेंट, गाडीतील
हवामानावर नियंत्रण करण्यासाठी पूर्णपणे स्वयंचलित यंत्रणा इत्यादी बसवण्यात आली आहेत.
स्कॉर्पिओची कठीण चासिसवर आधारित एसयूव्ही बांधणी तिला कारपेक्षा जास्त सुरक्षित बनवते आणि त्यामुळे ती खराब रस्ते तसेच ऑफलोडिंगसाठी केव्हाही जास्त चांगली ठरते. यामध्ये उच्च प्रतीची सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली
असून त्यात ड्युएल एयरबॅग्ज, अँटी- लॉकिंग यंत्रणा (एबीएस), कोलॅप्सिबल स्टिअरिंग कॉलम आणि साइड इन्ट्रुजन बीम्स, पॅनिक ब्रेक्स इंडिकेशन, इंजिन मोबिलायजर्स इत्यादींचा समावेश आहे.
ही गाडी विविध प्रकारच्या आसनक्षमतांमध्ये उपलब्ध करण्यात येणार असून ग्राहकाला ७,८,९ आसनक्षमतांमधून आपल्या गरजेप्रमाणे निवड करता येईल. गाडी सर्व महिंद्र वितरकांकडे १४ नोव्हेंबर २०१७ पासून पाच आकर्षक रंगांत उपलब्ध होईल. त्यात नवा पर्ल व्हाइट (फक्त एस ११ मध्ये) डायमंड व्हाइट (एस ११ खेरीज), नेपोली ब्लऍक, डी सॅट सिल्व्हर,
मोल्टेन रेड आणि ६ प्रकार – एसथ्री, एसफआइव्ह, एससेव्हन (१२० बीएचबी), एससेव्हन (१४० बीएचपी), एस११ (१४०बीएचपी) आणि एस११ (१४० बीएचपी ४ डब्ल्यूडीसह) यांचा समावेश आहे.
नव्या, ताकदवान स्कॉर्पिओची नवी वैशिष्ट्ये आणि महत्त्वाच्या सुधारणा
 स्कॉर्पिओची वैशिष्ट्यपूर्ण थरारक ड्राइव्ह, ताकदवान एमहॉक इंजिनसह
o आता १०३ केडब्ल्यू (१४० बीएचपी) ताकदीची डिलीव्हरी
o नवीन सुधारित ३२० एनएम
 याचा सुधारित लो- एंड टॉर्क शहरातील ड्राइव्ह आनंददायी बनवतो
 मुबलक मिड- रेंज टॉर्कमुळे मिळतो महामार्गावर ड्राइव्ह करण्याचा आनंद

 सहाव्या पिढीचा बॉर्ग वॉर्नर टर्बो चार्जर संपूर्ण ड्राइव्ह मजेदार आणि संवादी बनवतो. संपूर्णपणे नवे, सोपे, ६
स्पीड ट्रान्समिशन कामगिरी सुधारते. महामार्गावर जास्त सहज गाडी चालवून इंधनाची बचत करणे शक्य
 एनव्हीएचमध्ये सुधारणा करण्यात आल्यामुळे केबिन अधिक शांत
 ९.१ बॉश एबीएस यंत्रणेसह सुधारित ब्रेकिंग यंत्रणा आणि सुधारित ब्रेकिंग व सुधारित ब्रेक फील
भव्य, नवे स्टायलिंग

 नवे, भव्य फ्रंट ग्रिल, क्रोम इनसर्टसह
 नवे मस्क्युलर अलॉय व्हील्स
 नवे ओआरव्हीएम साइड टर्न इंडिटेकरसह
 क्रोम बेझेलसह नवे स्टायलिश फॉग लॅम्प्स
 नवे टेलगेट, क्रोम अप्लिक आणि एयरोब्लेड वायपरसह
 नवे आकर्षक रेड लेन्स एलईडी टेल लॅम्प्स
 मागील बंपरवर नव्याने डिझाइन करण्यात आलेले फुटस्टेप
 नवे क्लियर लेन्स टर्न इंडिकेटर्स आणि हेडलॅम्प्समध्ये बोल्ड क्रोम हायलाइट्स
 नवी स्किड प्ले
 नवे अप्पर आणि लोअर ग्रिल मेश डिझाइन
 नव्या लूकचे एयर एक्स्ट्रॅक्टर
 उच्चभ्रू इंटेरियर्स, उपयुक्त वैशिष्ट्यांसह

 नव्या फॉक्स लेदर सीट्स, फॉक्स लेदर लावलेले स्टिअरिंग व्हील आणि गियर लिव्हर
 नवे रूफ माउंटेड सनग्लास होल्डर
 नवा मोबाइल होल्डर स्लॉट आणि मोठे कबीहोल्स
अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त वैशिष्ट्ये
 असिस्टसह नवा रिव्हर्स पार्किंग कॅमेरा
 नवा १ टच लेन चेंज इंडिकेट्र
 नवा ऑटो विंडो रोल अप
 स्टॅटिक बेंडिंग तंत्रज्ञान आणि एलईडी आयब्रोज
 १५ सेमी (सहा इंची) टच स्क्रीन इन्फोटेनमेंट, ब्लुटुथ/सीडी/डीव्हीडी/यूएसबी/ऑक्ससह
 दहा भाषांमध्ये जीपीएस नॅव्हिगेशन
 चालक माहिती यंत्रणा
 स्टिअरिंग माउंटेड ऑडिओ आणि क्रुझ कंट्रोल्स
 कुशन सस्पेंशन आणि अँटी- रोल तंत्रज्ञान
 शिफ्ट-ऑन- द-फ्लाय फोरडब्ल्यूडी यंत्रणा
 इंटेलिपार्क
 इलेक्ट्रिकदृष्ट्या अडजस्ट करता येणारे ओआरव्हीएम
 टायर- ट्रोनिक्स
 मायक्रो हायब्रीड तंत्रज्ञान
 पाऊस आणि उजेडाचे सेन्सर्स
 गियर शिफ्ट इंडिकेटर
 व्हॉइस असिस्ट सिस्टीम

सुरक्षा वैशिष्ट्ये
 ड्युएल एयरबॅग्ज (पॅसेंजर आणि चालक)
 एबीएस
 पॅनिक ब्रेक इंडिकेशन
 कोलॅप्सिबल स्टिअरिंग कॉलम आणि साइड इन्ट्रुजन बीम्स
 इंजिन इममोबिलायझर
 अँटी- थेफ्ट वॉर्निंग
 सीट बेल्ट रिमाइंडर लॅम्प
 स्पीड अलर्ट
 वाहन चालवताना ऑटो डोअर लॉक

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

… अन्यथा शिंदेंच्या शिवसेनेवर राज्यभर बहिष्कार:पुणे श्रमिक पत्रकार संघाचा इशारा

पुणे: पत्रकारांना धमक्या दिलेले खासदार संजय दिना पाटील यांना...

पत्रकारांचा अपमान करणाऱ्या खासदारावर कडक कारवाई करावी – राजा माने

डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना सर्व जिल्ह्यात करणार आंदोलन मुंबई...

पुण्यात 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या पहिल्या केंद्राच्या उद्घाटनासह कॉस्मो कन्झ्युमरने ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रात आपले स्थान केले आणखी मजबूत

पुणे, 25 जून 2026: कॉस्मो फर्स्ट लिमिटेडच्या ग्राहकाभिमुख व्यवसाय विभाग असलेल्या कॉस्मो कन्झ्युमरने आज पुण्यात आपल्या पहिल्या 4C कॉस्मो कार केअर सेंटरच्या उद्घाटनाची घोषणा केली. या माध्यमातून कंपनीने संघटित वाहन संरक्षण आणि कार केअर सेवा क्षेत्रात धोरणात्मक विस्तार केला आहे. मजबूत ऑटोमोटिव्ह परिसंस्था, वाढता प्रीमियम वाहनांचा ग्राहकवर्ग आणि वाहन संरक्षण उपायांचा वाढता ग्राहक स्वीकार या कारणांमुळे पुण्याची पहिल्या केंद्रासाठी निवड करण्यात आली. कंपनीच्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट पोर्टफोलिओमधील कॉस्मो पीपीएफ पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कॉस्मो सनशील्ड विंडो फिल्म्स आणि कॉस्मो गार्ड कोटिंग्ज व कंपाऊंड्स यांना मिळालेल्या मजबूत प्रतिसादाच्या पार्श्वभूमीवर हे उद्घाटन करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष 26 मध्ये या व्यवसायाने 23 कोटी रु. चा महसूल नोंदवला असून, विंडो फिल्म्ससाठी 75 हून अधिक वितरक आणि पेंट प्रोटेक्शन फिल्म्ससाठी 40 वितरक अशा देशव्यापी वितरण जाळ्याच्या बळावर ही वाढ साध्य झाली आहे. नवीन 4C केंद्र हे उत्पादनातील नवकल्पना, वितरण विस्तार, सेवा क्षमता आणि ग्राहक सहभाग यांच्या एकत्रित माध्यमातून ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट मूल्यसाखळीत आपले स्थान अधिक बळकट करण्याच्या कॉस्मो कन्झ्युमरच्या व्यापक धोरणाचे प्रतिक आहे. वाहनांचे सौंदर्य जपणे, अधिक आरामदायी अनुभव देणे आणि वाहनाचे दीर्घकालीन मूल्य टिकवून ठेवणे यासाठी ग्राहकांकडून वाढत्या प्रमाणात उपाययोजनांची मागणी होत असल्याने वेगाने विकसित होत असलेल्या कार केअर आणि वाहन संरक्षण बाजारपेठेत कंपनीला मोठ्या संधी दिसत आहेत. या घडामोडीबाबत बोलताना कॉस्मो फर्स्टचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज पोद्दार म्हणाले, “कॉस्मो फर्स्टमध्ये आम्ही सातत्याने उच्च वाढीची क्षमता असलेली क्षेत्रे ओळखून त्यामध्ये व्यवसाय उभारले आहेत. ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट हे असेच एक भरपूर व्यवसाय संधी असलेले क्षेत्र आहे. भारतातील विंडो फिल्म बाजारपेठेचा आकार सुमारे 1,000 कोटी रु. असल्याचा अंदाज आहे तर पेंट प्रोटेक्शन फिल्म विभागात दरवर्षी जवळपास 30% वाढ होत आहे. त्यामुळे दर्जेदार उत्पादने आणि विश्वासार्ह सेवा देणाऱ्या संघटित कंपन्यांसाठी मोठी संधी उपलब्ध आहे. आमच्या पहिल्या 4C केंद्राचे उद्घाटन हे त्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. 4C नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी आणि कॉस्मो पीपीएफ तसेच कॉस्मो सनशील्ड या आमच्या ब्रँड्सना अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही सुमारे 20 कोटी रु. ची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे. येत्या काही वर्षांत वाहन संरक्षण आणि कार केअर क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी म्हणून कॉस्मो कन्झ्युमरची ओळख निर्माण करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.” नवीन कॉस्मो कार केअर सेंटरमध्ये ग्राहकांना एकाच छताखाली वाहन संरक्षण आणि वाहन सौंदर्यवर्धनाशी संबंधित सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. यामध्ये ऑटोमोटिव्ह विंडो फिल्म्स, पेंट प्रोटेक्शन फिल्म्स, कोटिंग्ज, डिटेलिंग सोल्यूशन्स तसेच वैशिष्ट्यपूर्ण कार केअर सेवांचा समावेश असेल. प्रीमियम उत्पादनांमध्ये व्यावसायिक दर्जाची जोडणी आणि कुशल सेवा यांचा संगम घडवून विना अडथळा, अखंड आणि समाधानकारक ग्राहक अनुभव देण्यासाठी या केंद्राची रचना करण्यात आली आहे. उद्घाटनाबाबत बोलताना कॉस्मो कन्झ्युमरचे व्यवसाय प्रमुख अभिनीश दास म्हणाले, “आमच्या पहिल्या कॉस्मो कार केअर सेंटरचे उद्घाटन हा ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट क्षेत्रातील आमच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात आम्ही आमची उत्पादने, वितरण जाळे आणि इंस्टॉलर भागीदारी यांच्या माध्यमातून मजबूत पाया निर्माण केला आहे. 4C च्या माध्यमातून आम्ही या सर्व क्षमतांना एकत्र आणत ग्राहकांना एकाच छताखाली संपूर्ण वाहन संरक्षण आणि कार केअरचा अनुभव उपलब्ध करून देत आहोत. भविष्याचा विचार करता आर्थिक वर्ष 26-27 दरम्यान भारतभरात सुमारे 35 कॉस्मो कार केअर सेंटर स्थापन करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. यामुळे देशव्यापी प्रीमियम कार केअर केंद्रांचे जाळे उभारण्याच्या आमच्या बांधिलकीला अधिक बळ मिळेल.” गेल्या वर्षभरात कॉस्मो कन्झ्युमरने कॉस्मो सनशील्ड अंतर्गत कार्बन पिगमेंट सिरीज सादर करून तसेच कॉस्मो पीपीएफ अंतर्गत चार नवीन प्रकार बाजारात आणून आपला उत्पादन पोर्टफोलिओ अधिक मजबूत केला आहे. तसेच, बाजारपेठेतील पोहोच वाढवण्यासाठी आणि ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी कंपनीने भारतभरातील विविध डिटेलिंग स्टुडिओंसोबत भागीदारी केली आहे. पुढील काळात कॉस्मो कन्झ्युमर भारतातील प्रमुख ऑटोमोटिव्ह बाजारपेठांमध्ये 4C मॉडेलचा विस्तार करण्याची योजना आखत आहे. यासोबतच विपणन उपक्रमांमध्ये आक्रमक गुंतवणूक, वितरण व भागीदार जाळ्याचा विस्तार आणि सातत्यपूर्ण नवनवीन कल्पना तसेच नवीन ऑटोमोटिव्ह केअर सोल्यूशन्सच्या माध्यमातून उत्पादन पोर्टफोलिओ अधिक सक्षम करण्यावर कंपनी भर देणार आहे. यामुळे देशातील वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोटिव्ह आफ्टरमार्केट उद्योगातील तिचे स्थान आणखी मजबूत होईल.

पीएमपीएमएलसाठी महापालिकेची खास सभा-श्रीनाथ भिमाले

पुणे, दि. २५ जून : शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा...