प्राचीन शिल्पांचे जतन होणे आवश्यक – गिरीश बापट ‘सोल इन स्टोन ‘ चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन
फक्त मराठीवर थरारपटांची मेजवानी
मराठीत रहस्यमय वा थरारपटांची मोठी परंपरा नाही. तरी काही दर्जेदार थरारपटांनी प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन केले आहे. अशाच काही निवडक थरारपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता यावा यासाठी फक्त मराठी चित्रपट वाहिनीने हे चित्रपट बघण्याची संधी ‘रसिकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. शनिवार २ डिसेंबर ते शुक्रवार ८ डिसेंबर दरम्यान दररोज रात्री ९.३० वा. वैविध्यपूर्ण थरारपटांची पर्वणी रसिकांना फक्त मराठी चित्रपट वाहिनीवर घेता येणार आहे.
‘द शॅडो’, ‘७०२ दीक्षित’, ‘काळशेकर आहेत का?’, ‘गोंद्या मारतंय तंगडं’, ‘आभास’ या चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येईल. गूढ, रहस्य आणि चित्तथरारक चित्रपट बघण्याची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही मेजवानी देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे फक्त मराठीचे बिझनेस हेड श्याम मळेकर यांनी सांगितले.
अविवाहित आहे म्हणून गर्भवतीवर उपचारास नकार -आयुक्त करणार कारवाई ?
पुणे- महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयातील डॉक्टरांनी एका अविवाहित गरोदर महिलेस दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यावरून महिलांमध्ये रोष निर्माण झाला असून संबधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.काँग्रेसच्या शहर सरचिटणीस संगीता तिवारी यांनी या प्रकरणाला वाचा फोडली आहे .
अविवाहित महिलेल्या प्रसुतीस नकार देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याचे आश्वासन महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी दिले आहे . काँग्रेसच्या शहर सरचिटणीस संगीता तिवारी यांनीही यासंदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाला पत्र पाठवून पुन्हा असे होणार नाही याची दक्षता घेण्याची मागणी केली.
महापालिकेच्या एका रुग्णालयात गरोदर महिलेला प्रसुतीसाठी दाखल करून घेताना ती विवाहित आहे का याची विचारणा करण्यात आली. तसे नसल्याने तिला दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे त्या महिलेला खासगी रुग्णालयात प्रसुती करून घ्यावी लागली.
संगीता तिवारी यांनी प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली साबणे यांना पत्र पाठवून महापालिकेने फक्त विवाहित महिलांनांच दाखल करून घेतले जाईल असा नियम कधी केला अशी विचारणा केली. एखाद्या महिलेच्या संदर्भात डॉक्टरांनी असे वागावे हे निषेधार्ह असल्याचे तिवारी यांनी म्हटले आहे. संबधित महिलेला त्रास होता, त्वरीत दाखल करून घेणे गरजेचे होते. अशा वेळी यंत्रणा त्यांच्याकडे नाही ती चौकशी करीत बसली व अत्यंत निर्दयपणे विवाहित नाही तर दाखल करून घेतले जाणार नाही असे उत्तर दिले. या प्रकरणाची दखल घ्यावी व संबंधित डॉक्टरांवर त्वरीत कारवाई करावी, अशी मागणी तिवारी यांनी केली आहे.
राणे पुत्राकडून काँग्रेस कार्यालय तोडफोडीचे समर्थन; म्हणाले, मनसेचे काय चुकले?
मुंबई : मनसेच्या सैनिकांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर मनसे आणि काॅग्रेस मध्ये संघर्ष निर्माण झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटी) भागातील आझाद मैदानाजवळ असलेल्या मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयात घुसून मनसे कार्यकर्त्यांनी आज (शुक्रवार) तोडफोड केली. कार्यालयातील काचा, फर्निचर, खुर्च्या, टेबलाची नासधूस केली. तसेच तेथील काही कर्मचार्यांनाही मारहाण केली.
आज घडलेल्या प्रकारावरून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर आरोप ,प्रत्यारोप करीत असतानाच काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मनसेची बाजू घेत काॅग्रेसला घरचा आहेर दिला आहे.मुंबई काँग्रेस महात्मा गांधींचा अहिंसेचा विचार विसरल्याचे दिसत असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे. मुंबई काॅग्रेस कार्यालयाची तोडफोड केल्यानंतर आ. नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे काँग्रेसने घेतलेल्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘मनसेने नक्कीच चुकीचे केलेले आहे. पण महात्मा गांधींच्या मार्गाचा अवलंब करणा-या काँग्रेसने याला उत्तर देताना अनीतीचा उपयोग केला आहे ? असा सवाल उपस्थित करत, मनसेविरोधात निषेध करताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी बांगड्या दाखवणे कितपत योग्य आहे ? हा महिलांचा अपमान नाही का , हीच का नैतिकता आणि विचारप्रणाली ? असे आ. नितेश राणेंनी ट्विट केले आहे.
दरम्यान, हल्लानंतर मनसेने याची चार तासांनी जबाबदारी स्विकारली. ‘होय, हा हल्ला आम्ही केला आहे. मनसेने काँग्रेसवर केलेला हा ‘सर्जिकल स्ट्राईक’ आहे. ‘ईट का जवाब पत्थर से देंगे’ असे ट्वीट करत मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केले.दरम्यान, याप्रकरणी संदीप देशपांडे यांच्यासह 7 ते 8 मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
सरकारच्या मुक पाठिंब्यामुळेच मनसेचा दहशत माजवण्याचा प्रयत्न – अशोक चव्हाण
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकीय विरोधासाठी हिंसेचा वापर करित आहे हे चुकीचे असून’ सरकारच्या मुक पाठिंब्यामुळेच मनसे कार्यकर्ते मुंबई शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करित आहेत असा आरोप करीत या हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करुन कार्यालयाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांच्याकडून वसूल करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर केलेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करून हल्लेखोरांना तात्काळ अटक करावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. मनसेची संस्कृती गुंडगिरीची आहे. लोकशाहीत कायदे व नियमांचे पालन करीत परस्परांच्या मतांचा आदर केला पाहिजे, परंतु मनसेचे कार्यकर्ते ज्या पध्दतीने कायदा हातात घेऊन मुंबईत दहशत माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत ते निषेधार्ह आहे. गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी विविध ठिकाणी तोडफोड करून अनेक लोकांना मारहाण केली. काँग्रेस पक्षाने मनसेच्या या दादागिरीचा विरोध केला होता. त्यामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यावेळी त्याच्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना पाठीशी घातल्याने त्यांचे मनोबल वाढले असून राजकीय विरोधकांच्या कार्यालयावर हल्ले करण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे.
राजकारणात वैचारिक मतभेद असतात पण त्यांचा मुकाबला विचाराने करायचा असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजकीय विरोधासाठी हिंसेचा वापर करित आहे हे चुकीचे आहे. सरकारच्या मुक पाठिंब्यामुळेच मनसे कार्यकर्ते मुंबई शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करित आहेत. हल्लेखोरांवर तात्काळ कारवाई करुन कार्यालयाच्या झालेल्या नुकसानीची भरपाई त्यांच्याकडून वसूल करण्याची मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली.
सत्ताधाऱ्यांचाच आक्षेप,मग कुणाच्या दबावाखाली टेंडरसाठी घाई :माजी उपमहापौर आबा बागुल यांचा सवाल
स्वतंत्रपणे विचार करणार्याची प्रगती लवकर होते साधू विवेक जीवनदास यांचे प्रतिपादन.
पुणे :“ज्याला नवे जग घडवावयाचे असेल, त्याने स्वतंत्रपणे विचार करावयास शिकले पाहिजे. विचारांचे सामर्थ्य फार मोठे असते. पण सर्वसामान्यपणे आपण रूळलेल्या वाटेनेच जातो. आपल्यावर पूर्वग्रहांचा पगडा असतो. असे म्हटले जाते की, विचारांनीच माणूस घडतो. सकारात्मक विचार करणार्यांची प्रगती लवकर होताना दिसते. त्याउलट नकारात्मक विचार करणार्यांना खूप अडचणींना सामोरे जावे लागते.,”असे प्रतिपादन गुजरात येथील बीएपीएस-अक्षरधाम येथील परमपूज्य साधू विवेक जीवनदास यांनी प्रतिपादन केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनांतर्गत माईर्स एमआयटीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या २२व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेतील सहावें पुष्प गुंफताना ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. (ग्रुप कॅप्टन) दीपक आपटे हे होते. एमआयटी स्कूल ऑफ टेलिकॉमचे प्रकल्प संचालक डॉ. मिलिंद पांडे व एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर इ. उपस्थित होते.
परमपूज्य साधू विवेक जीवनदास म्हणाले,“सामान्यपणे आपले आपल्याच विचारांकडे लक्ष नसते, किंबहुना विचारांच्या बाबातीत जेवढी सजगता असावयास हवी, तेवढी आपल्यामध्ये नसते. एखादी चांगली गोष्ट करताना मनात येणार पहिला सृजनशील विचार पकडून ठेवता आला पाहिजे. कारण तो खर्या अर्थाने ताजा असतो. त्यानुसारच आपली वाटचाल असावी. तरच तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हाल. तणावमुक्त जीवन जगण्यासाठी स्वतःबद्दल वेगळे विचार करण्याची क्षमता अंगी बाणविली पाहिजे, खरे म्हणजे ती क्षमता आपणात असतेच. पण आपण तिला प्रोत्साहन देत नाही. यासाठी स्वतःमध्ये शिस्त बाणवावी, जागतिक मूल्यांचे अनुकरण करून ते आपल्या जीवनात उतरवावे. या सर्वासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम असणे गरजेचे आहे. यासाठी गरज आहे ती ज्ञानयोग, भक्तीयोग आणि कर्मयोगाची. आपल्याला जीवनात उन्नती करावयाची असेल तर, त्यासाठी गुरू असणे हे अत्यंत महत्वाचे आहे. त्याशिवाय आपले पाऊल योग्य दिशेने पडत नाही व आपला विकास होत नाही.”
सकाळच्या सत्रात याप्रसंगी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुभाष आवळे, व प्रा. दीपक आपटे यांची व्याख्याने झाली.
डॉ.सुभाष आवळे म्हणाले,“शिक्षक हे पद किंवा व्यवसाय नाही तर ही एक शुद्ध विचारांची संकल्पना आहे. ज्यात सामर्थ्य,ऊर्जा व विश्व सामावलेले असते. म्हणजेच शिक्षक हा एका अर्थांने गुरू असतो. नवी पिढी व देशाचे भविष्य घडविण्याचे सामर्थ्य फक्त शिक्षकांमध्येच असते. पण त्यासाठीसुद्धा उत्तम शिक्षक तयार करण्याची जवाबदारीही त्यांचीच असते. त्यामुळेच शिक्षकाजवळ शब्दसामर्थ असावे. तो उत्तम गायक, चित्रकार, अभिनेता व प्रवचनकारही असावयास हवा. या सृष्टीवरील सर्वप्रथम शिक्षक ही आईच असते. त्यामुळे तिची शिक्षवण व्यक्तीला आयुष्यभर मार्ग दाखवीत राहते.”
प्रा. दीपक आपटे म्हणाले,“ सुखी जीवन जगावयाचे असेल, तर आपल्या संपर्कातील सर्व गोष्टींचा आनंदाने स्वीकार करा. यात आपले वरिष्ठ, सहकारी, कुटुंबीय, शेजारी हे सर्व तर येतातच. पण आपले वाहन, आपले घर, आपला दूरदर्शंन संच, आपले जेवणाचे टेबल यांचेही स्वागत करा. तुम्हाला असे आढळून येईल, की आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती, इतकेच नव्हे तर निर्जीव वस्तू सुद्धा आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देतात. आपल्या आजूबाजूला घडणार्या घटना जर अटळ असतील, तर त्यांचेही स्वागत करा. मग त्या अनुकूल असोत की प्रतिकूल.”
डॉ. सुरेंद्र हेळेकर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एल. के. क्षीरसागर यांनी आभार मानले.
भाजपमधील गटबाजीमुळे मुख्य सभा तहकूब
पुणे- २४ तास पाणी पुरवठा , सायकल शेअरिंग योजना ,कात्रज कोंढवा रस्ता ,चांदणी चौक ओव्हर ब्रिज ,अशा विविध बड्या बड्या विषयावरून १०० लोकांचे बहुमत असलेल्या भाजपमध्ये गटबाजी उफाळून आल्याने आज महापालिकेची मुख्य सभा गुंडाळून ठेवण्यात आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे .
राष्ट्रवादीने ‘सुन्दर यादव ‘( दमदाटीने ठेके मिळविणे, कामे करवून घेणे )प्रवृत्ती विरोधात केलेल्या आंदोलनामुळे महापालिकेची मुख्य सभा भाजपने तहकूब केली असा समज अनेकांचा झाला . परंतु सभा तहकुबीचे कारण मात्र वेगळेच असल्याचे समजते आहे . भाजपमधील ऐका नेत्याने तब्बल ५१ नगरसेवकांची एकजूट केली असून महापालिकेतील मोठ मोठ्या विषयावर सर्वसमावेशक धोरण असले पाहिजे अशी भूमिका घेतली आहे .
दरम्यान आज मुख्य सभा सुरु होण्यापूर्वीच तहकुबीचे पत्र तयार होते . 3 वाजता सभा सुरु होवून ‘वंदेमातरम ‘पूर्ण होते ना होते तोच सभा तहकुबीचे पत्र सभागृहनेते यांनी दिले . आणि त्यानंतर राष्ट्रवादीचे योगेश ससाणे आणि भैयासाहेब जाधव गुंडाच्या वेशात सभागृहात आले . त्यांना पाहताच पहा आता चालवा सभा .. असेही एका पदाधिकाऱ्याने महापौरांना म्हटले . तहकुबीला विरोध असताना , तह कुबीवर बोलायचे आहे असे विरोधकांनी सांगितले असताना अखेर कोणत्याही कारणाशिवाय सभा तहकूब करण्यात आली .
या सभेनंतर मायमराठी शी बोलताना .. राष्ट्रवादीचे माजी महापौर प्रशांत जगताप ….
‘गंगाजल’ मधल्या ‘सुंदर यादव ‘ चा महापालिकेत स्वैराचार ?
पुणे- महापालिकेच्या जागा , विविध क्रीडा संकुले, टेंडर ,नगरसेवक आणि त्यांची नातेवाईक घेत असल्याचा आरोप आता सर्रास होतो आहे , परवा तर मुख्य सभेत एका नगरसेविकेने आपल्या नातेवाईकाला पे अँड पार्क चा ठेका मिळावा असे चक्क उघडपणे भाषणात सांगितले … या सर्व पार्श्वभूमीवर आता काल सायंकाळी महापालिकेच्या मुख्य भवनात , बांधकाम विभागातील एक अभियंता ऐकत नाहीच हे पाहून, तो बसलेला असलेल्या, खुर्चीवर लाथ मारून , एका नगरसेविकेच्या पतीने त्याला दमदाटी केल्याच्या घटनेचे आज थेट मुख्य सभेत पडसाद उमटले .
एकीकडे बोगस कर्मचाऱ्याच्या सूत्रधाराला पाठीशी घालायचे आणि दुसरीकडे मुख्य भवनात येताना जाताना सामान्य नागरिकांना अडविणे , त्यांची चौकशी करणे असे प्रकार सुरु आहेत , मुख्य भवनातील असे दमदाटीचे प्रकार उघड होऊ नये म्हणून सीसी टीव्ही यंत्रणा हि निष्प्रभ ठरविली जाते आहे .
आज पुणे महापालिकेच्या मुख्य सभेत राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे आणि भैयासाहेब जाधव यांनी गुंडाच्या वेशभूषेत प्रवेश करीतच ‘ सुंदर यादव’ प्रवृत्तीचा निषेध केला . ठेकेदारांना धमकाविणे ,अधिकाऱ्यांना धमकाविणे असे प्रकार चालू असल्याचा आरोप या वेळी राष्ट्रवादीने केला .. अशा ‘सुंदर यादव’ प्रवृत्ती पासून अधिकाऱ्यांचे संरक्षण करणार कोण ? असा सवाल यावेळी राष्ट्रवादी कडून करण्यात आला .
लव्ह लग्न लोचा मधील राजा म्हणजेच रोहनच्या लग्नाला फक्त १५ वऱ्हाडी!!!
रोहनच्या लग्नाला फक्त १५ वऱ्हाडी किंवा चि.रोहन चिसौका स्नेहल आणि फक्त १५ वऱ्हाडी किंवा रोहनचे अनोखे शुभमंगल म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर लग्न कसं हजारभर निमंत्रितांच्या उपस्थितीत दणक्यात व्हायला हवं…त्यात वेडिंग डेस्टिनेशन किंवा विमानात नाहीतर थेट स्कूबा डायव्हिंगच्या थाटात केलं तर भन्नाटच. डिझायनर ड्रेस आणि थीम मॅरेज असेल क्या बात है. तीन चार प्रादेशिक मेन्यूची लज्जतही हवीच. सध्या लग्न म्हटलं असे संवाद हमखास कानावर पडतात. त्यात नवरानवरी सेलिब्रीटी असतील लग्न हा इव्हेंटच असतो. पण लव्ह लग्न लोचा मालिकेत राजाच्या भूमिकेतून आपल्या सर्वांना माहिती असलेला रोहन गुजर आणि त्याची मैत्रीण स्नेहल देशमुख यांनी मात्र हटके लग्न केलं आहे. साईबाबांचं मंदिर, भटजीबुवा, दोघांचे आईबाबा, सख्खी भावंडं अशा फक्त १५ वऱ्हाडींच्या साक्षीने रोहन आणि स्नेहल यांनी सहजीवनाच्या प्रवासाला सुरूवात केली. होणार सून मी या घरची, बन मस्का आणि आता लव्ह लग्न लोचा या मालिकेत रोहन गुजर याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. पण याच रोहनने १५ वर्षापूर्वी मैत्रीण स्नेहल हिचे मन जिंकले. दीड दशकाच्या खास मैत्रीनंतर दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला. पण रोहनला डामडौल करत लग्न करायचं नव्हतं. रोहन सांगतो, मी हा निर्णय स्नेहलला सांगितला आणि तिलाही तो पटला. मग आमच्या कुटुंबीयांना या निर्णयाबाबत सांगितले. सुरूवातीला त्यांच्याकडून नाराजीचा सूर उमटला, पण आमच्या निर्णयाला त्यांनी अखेर पाठिंबा दिला. लग्नातला खर्च टाळण्यासाठी नव्हे तर लग्नासारखा आपल्या आयुष्यातील खास सोहळा कुटुंबीयांच्या सानिध्यात व्हावा यासाठी हा निर्णय घेतल्याचेही रोहन सांगतो. शिवाय लग्नात खूप मंडळी आली तरी त्यांना आपल्याला नीट वेळही देता येत नाही. अर्थात अभिनेता रोहन आणि झी वाहिनीसाठी डिजिटल हेड म्हणून काम करणाऱ्या स्नेहलचा मित्रपरिवार खूप मोठा आहे. त्यामुळे लग्नाला न बोलवल्याबद्दल मित्रमैत्रीणींकडून ओरडूनही घ्यावे लागले. पण रोहनचा फंडा ऐकून आता त्याच्या काही मित्रांनी अशाच प्रकारे लग्न करण्याचा मानस बोलून दाखवला आहे. सकाळी मंदिरात लग्न झाल्यानंतर गुजर आणि देशमुख फॅमिलीने एका हॉटेलमध्ये मस्त एकत्र जेवण केलं आणि दुपारी ही मंडळी रोहनच्या घरीही आली. इतकेच नव्हे तर लग्नानंतर तीनचार दिवसात रोहन लव्हलग्नलोचा मालिकेच्या शूटसाठी हजरही होता.
महाराष्ट्राचा फेवरेट कोण? मध्ये सईने पटकावली तीन नामांकन
मराठी चित्रपट सृष्टीला ग्लॅमर देणारी तसेच वेगवेगळ्या दर्जाच्या आव्हानात्मक भूमिका स्वीकारणारी अभिनेत्री सई ताम्हणकर अनेकदा चर्चेचा विषय ठरली आहे. तिच्या प्रत्येक चित्रपटात ती वेगळेपणा आणण्याचा प्रयत्न करीत असते. त्यासोबत नुकतेच मराठी चित्रपटांना इफि सारख्या प्रतिष्टित फिल्म फेस्टिवल मध्ये दर्शवण्याचा मान सईला मिळाला.
२०१७ मध्ये ही तिने छोट्या छोट्या भूमिकांमधून आपल्या अभिनयाचे वेगळेपण लोकांपर्यंत पोहचवले. जाऊंद्या बाळासाहेब मधली करिष्माची भूमिका असो, किंवा फॅमिली कट्टा मधली मंजू असो. सई ह्या भूमिकांसाठी लोकांच्या लक्षात राहिली. २०१७ च्या ‘महाराष्ट्राचा फेवरेट कोण?’ ह्या पुरस्कार सोहळ्यात सईला तीन नामांकन जाहीर झाली आहेत. फेवरेट अभिनेत्री (जाऊंद्याना बाळासाहेब) तर सहायक अभिनेत्री (फॅमिली कट्टा) इतकंच न्हवे तर ‘फेवरेट पॉप्युलर फेस ऑफ द इअर’ साठी देखील सईला नामांकन मिळाले आहे. तीन नामांकने मिळ्याल्याबद्दल सईला विशेष आनंद आहे. ह्या नामांकांतून हे सिद्ध होते, कि भूमिकेची लांबी महत्त्वाची नसते तर भूमिकेला योग्य न्याय देणे महत्त्वाचे असते. ही ३ नामांकने त्याचीच पोचपावती आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही.
योगाच्या माध्यमातून विश्वशांती साकारेल- डॉ.ए.सी.शुक्ला
पुणे:“योग आणि आत्मज्ञानाने प्रेरित होऊनच आपण विश्वशांती स्थापित करू शकतो. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयातून निर्माण होणारे ज्ञान-विज्ञान हे विश्व शांतीसाठी सर्वात प्रेरक असेल. भारतीय परंपरांमध्ये योगाचा पहिला प्रयोग ऋग्वेदात झाला. त्यानंतर या माध्यमातूनच मानव परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे,”असे प्रतिपादन भारत सरकारच्या आयकर विभागाचे प्रधान मुख्य आयुक्त डॉ.ए.सी.शुक्ला यांनी केले.
विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि संतश्री ज्ञानेश्वर-संतश्री तुकाराम महाराज स्मृती व्याख्यानमाला न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने युनेस्को अध्यासनांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या 22व्या तत्त्वज्ञ संतश्री ज्ञानेश्वर-तुकाराम स्मृती व्याख्यानमालेच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रख्यात संगणकतज्ज्ञ आणि नालंदा विद्यापीठाचे कुलपति पद्मभूषण डॉ. विजय भटकर हे होते. नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू व हिंदू विश्वकोशाच्या दुसर्या खंडाचे प्रमुख संपादक डॉ.कपील कपूर हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी विश्वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, व्याख्यानमालेचे समन्वयक आणि मिटसॉटचे प्रकल्प संचालक प्रा.डॉ. मिलिंद पांडे, एमआयटी डब्ल्यूपीयू चे कुलसचिव (ग्रुप कॅप्टन) डी.पी. आपटे व एमआयटीचे प्राचार्य डॉ. एल. के. क्षीरसागर हे उपस्थित होतेे.
डॉ.ए.सी.शुक्ला म्हणाले,“विश्वशांती बद्दल विचार केल्यावर हे कळते की मनामध्ये अशांती असेल, तर आमचा विश्व आणि पर्यावरणाचा काय संबंध जुळू शकणार नाही. सृष्टीमधील उर्जेचा योग्य वापर न करणे व मानवामध्ये वाढत चाललेली स्वार्थी भावना यामुळेच अशांती वाढत आहे. योग आणि समाधी हे अध्यात्म आहे. त्या माध्यमातूनच आपण विश्वात परिवर्तन घडवून आणू शकतो. आपल्याला परंपरेने दोन गोष्टी दिल्या आहेत. त्या म्हणजे तपस्या आणि ध्यान. तसेच, जीवनामध्ये धर्म हा वैराग्य निर्माण करून विश्वाला जोडतो. त्यातून आत्मशांती निर्माण होते. यातूनच विश्व शांती निर्माण होईल.”
डॉ.कपिल कपूर म्हणाले,“ सुरूवातीपासून हा देश ज्ञान देणारा देश आहे. भारताने जगाला अध्यात्म दिले. पंजाब ने नाथपंथ व भक्ती दिली व तमिळनाडूने ज्ञान दिले. ज्ञानेश्वरांनी दोघांचा संगम घडवून आणला. पण वर्तमानकाळत जी संस्कृती आली आहे, ती म्हणजे पोटाची संस्कृती, विज्ञानात जेवढ्या गोष्टी होतात त्या फक्त सुख, सुविधा यावरच असतात. त्यामुळेच व्यक्ती हा शांती पासून दूर होत आहे. महाभारतीय युद्धावरून लोकांचा तत्त्वज्ञानावरून विश्वास उडाला. त्यानंतर भगवान महात्मा बुद्ध यांनी कर्म सिद्धांत मांडला. भागवतधर्माने फक्त कर्मसिद्धांत मांडला नाही, तर संत ज्ञानेश्वरांनी भक्ती परंपरा सुरू करून आत्मशांतीचा संदेश दिला. विज्ञान इंद्रियजन्य तर ज्ञान आंतरिक आहे.”
डॉ.विजय भटकर म्हणाले,“या देशातील तक्षशीला, नालंदा व काशी विद्यापीठ ही विश्वज्ञानाची भांडारे होती. भारताला जर 21व्या शतकात विश्वगुरू व्हावयाचे असेल, तर आपण या विद्यापीठांसारखी केंद्रे निर्माण केली पाहिजेत. सर्व सामान्य माणसाला सुद्धा समझेल, अशा तर्हेने येथील अध्यापनाची पद्धत असली पाहिजे. भाषा हा त्यातील मुख्य घटक आहे. त्यातूनच विश्वशांती साध्य होईल.”
प्रा. डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ 1897 मध्ये स्वामी विवेकानंदांनी सांगितल्यानुसार भारत हा 21 व्या शतकात ज्ञानाचे दालन म्हणून उदयास येईल. आजची परिस्थिती पाहता आपण योग्य त्या दिशेने प्रयत्न केल्यास हे भाकीत निश्चितपणे साध्य होईल.”
डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डी.पी. आपटे यांनी आभार मानले.
यशस्वी उद्योजक बना- देआसराची एकदिवसीय कार्याशाळा संपन्न
पुणे-
देआसरा फाऊंडेशनने एस एम जोशी सभागृह, पुणे येथे लघुउद्योजकांसाठी ‘आर्थिक व्यवस्थापन’ या विषयावर एक दिवसाची कार्यशाळाआयोजित केली होती. या कार्यशाळेत व्यावसायिकांना लघु उद्योग वाढीसाठी आथिर्क व्यवस्थापन व त्याचे महत्त्व या बाबतीतमार्गदर्शन करण्यात आले.
देआसरा आगामी व्यवसायांमध्ये संपूर्ण प्रक्रियेद्वारे त्यांना मार्गदर्शन करण्याकरता व्यवसायात अडथळा-मुक्त दृष्टिकोन देण्यासाठीप्रसिध्द आहे.
४० वर्षांपेक्षा जास्त अनुभव असणारे बँक ऑफ इंडियाचे माजी उपमहा व्यवस्थापक अधिकारी वरिष्ठ अधिकारी श्री. सुधीर गिजरे जेदेआसरामध्ये मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी उद्धृत केले की “नवउद्योजकांनी ग्राहकांच्यासेवा आणि समाधानावर परिणाम होऊ न देताही आपल्या वैयक्तित खर्चाचा ताळेबंद ठेवणे आवश्यक आहे. देआसरा फाऊंडेशनच्या श्री.प्रकाश आगाशे म्हणाले की, “एखाद्या व्यवसायाच्या शाश्वत विकासासाठी यशस्वी उद्योजकाने कठोर आर्थिक साक्षरता आणिव्यवस्थापन ही प्रमुख कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे.”
कार्यशाळेमुळे आर्थिक व्यवस्थापनासाठी मदत झाली आणि विकास, आर्थिक नियोजन, रोख प्रवाह व्यवस्थापन, जोखीम व्यवस्थापनआणि संसाधन व्यवस्थापन यासाठी आर्थिक धोरणांकडे वाटचाल कशी करावी याबाबत मार्गदर्शन मिळाले.
कार्यशाळेत सहभागी होणा-या व्यवसायात नियोजन, निर्णय घेण्याचे मूल्य आणि मूल्य निर्माण करण्याच्या महत्वाच्याव्यवस्थापनात्मक बाबींचे समर्थन करण्यासाठी आणि जोखीम आणि संधींचे मूल्यांकन करण्यासाठी या वित्तीय माहितीची मदतमिळाली.
या कार्यशाळेत बँक ऑफ महाराष्ट्रचे श्री आर.आर.शांताप्पा , श्री ओंकार कुमार,श्री.शशिकांत एम चौधरी, श्री.अनिल सावंत, श्रीमंत आनंद, श्री. नितीन भार्गवे मुख्य प्रबंधक श्री. लवाळे , श्री. राजेश कुमार बैठा , आणि श्री. उमेश जोशीयांची उपस्थिती होती तसच शंभरहून अधिक उद्योजकांनी या कार्यशाळेद्वारे तज्ञांचे मार्गदर्शन प्राप्त केले. भविष्यात अनेक यशस्वीनवउद्योजक या कार्यशाळेद्वारे घडतील असा आशावाद कार्यशाळेला उपस्थित असलेल्या उद्योजकांनी व्यक्त केला आहे.
घोरपडी गावठाणातील वेशीवरच्या मारुती मंदिराचा जीर्णोद्वार व कळशारोहन सोहळा उत्साहात संपन्न
पुणे-घोरपडी गावठाणातील तालीम चौकातील वेशीवरच्या मारुती मंदिराचा जीर्णोद्वार व कळशारोहन सोहळा पार पडला . आळंदीचे श्री. श्री. श्री. शंकर महाराज यांच्याहस्ते कळस बसविण्यात आला . यानिमित्ताने मंदिरात चार दिवस धार्मिक कार्यक्रम सुरु होते . कळस व मारुतीच्या प्रतिमेची पारंपरिक वाद्यांच्या गजरात गावातून मिरवणूक काढण्यात आली . होमहवन व घोरपडी गाव व नवजीवन महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला . शेवटच्या दिवशी आरती व महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला . देवस्थान पंच मंडळाचे अध्यक्ष निवृत्ती कवडे यांनी आळंदीचे श्री. श्री. श्री. शंकर महाराज यांचा सत्कार केला .
कै. विठ्ठलराव गुलाबराव कवडे पाटील यांच्या स्मरणार्थ मंदिराचे नूतनीकरण करण्यात आले . या मंदिराची पूजा पिढ्यान पिढ्या कवडे पाटील परिवाराकडे आहे . या कार्यक्रमासाठी गौरव कवडे पाटील , सुनील कवडे पाटील , संजय कवडे पाटील व घोरपडी गाव देवस्थान पंच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले .
मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत १०००हुन अधिक धावपटू सहभागी
पुणे: रवाईन हॉटेल यांच्या तर्फे व मालाज पुरस्कृत पाचगणी येथे होणाऱ्या दुसऱ्या मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत भारतासह केनिया, आफ्रिकामधून १०००हुन अधिक धावपटूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. हि शर्यत पाचगणी येथे 3 डिसेंबर रोजी रंगणार आहे.
पाचगणी येथे होणाऱ्या या मॅरेथॉन स्पर्धेला माला यांचा पाठिंबा लाभला आहे. तसेच, याचबरोबर माला रेनबो 5किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत भारतातील हाफ मॅरेथॉन शर्यतीतील जलद धावपटू मांढरदेवी येथील कालिदास हिरवे सहभागी होत आहेत. रवाईन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत यावर्षी एकूण 7लाख रुपयांची पारितोषिक रक्कम देण्यात येणार आहे. या स्पर्धेत 18वर्षावरील स्पर्धकांसाठी 21किलोमीटर, 16वर्षांवरील स्पर्धकांसाठी 10किलोमीटर, 10वर्षावरील स्पर्धकांसाठी माला 5किलोमीटर रन अशा तीन प्रकाराचा समावेश आहे.
स्पर्धेचे फ्लॅग ऑफ अमिन हाजी(पाचगणी स्वच्छ सर्वेक्षण २०१८चे ब्रँड अँबॅसिडर) यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, ६०००हुन अधिक धावपटू सहभागी झालेल्या सातारा हिल मॅरेथॉनचे आयोजक डॉ.संदीप काटे हे या शर्यतीचे संचालक आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना साताराच्या जिल्हाधि
रवाईन रन माउंटन मॅरेथॉन हि शर्यत अस्सल धावपटू साठी खास आकर्षण ठरणार आहे. तसेच, ज्यांचे धावण्यावर अतिशय प्रेम आहे, अशा हौशी धावपटू साठी हि शर्यत विशेष आकर्षण ठरणार आहे. या शर्यतीला सातारा हिल मॅरेथॉन शर्यतीचा एक भाग असेही म्हटले जाते. यंदाच्या वर्षी हि शर्यत सातारा हाफ हिल मॅरेथॉन आणि मुंबई रोड रनर्स यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. या शर्यतीतील विजेत्यांबरोबरच सर्व सहभागी धावपटूना पारितोषिक रक्कम देण्यात येणार आहे, तसेच, शर्यत पूर्ण करणाऱ्या धावपटूना स्ट्रॉबेरी विथ क्रीम अशी खास ट्रीट देण्यात येणार आहे. तसेच, पाचगणीतील अनेक हॉटेल्स मध्ये सवलतीच्या दरात मुक्काम करण्याची संधी त्याचप्रमाणे टीशर्ट व पाचगणीतील अनेक खास वस्तूंचा समावेश असलेली गुडी बॅग्स, पदके व टाईम बीब देण्यात येणार आहे.
