पुणे :“ विश्वात शांतता हवी असेल तर भेदाभेदा बंद होणे गरजेचे आहे. हीच शिकवण कबीरांनी आपल्या दोह्यांमध्ये सांगितली आहे. त्यांनी मानवतेनुसार हिंदू मुस्लिमतेचा विरोध कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. कबीर यांच्या विचारांमध्ये जाती, पंथ, देशच नाही, तर संपूर्ण विश्वाचा विचार केला गेला आहे.,”असे प्रतिपादन लोकसभेचे माजी सभापती व माजी केंद्रीय गृहमंत्री श्री. शिवराज पाटील चाकूरकर यांनी केले.
डॉ विश्वनाथ कराड एमआयटी विश्वशांती विद्यापीठ, पुणे व आचार्य आर. के. सोनग्रा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा. रतनलाल सोनग्रा अनुवादित ‘कबीरवाणी’ या ग्रंथाचे प्रकाशन शिवराज पाटील यांच्या हस्ते एमआयटीत झाले. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी विश्व शांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे होते.
यावेळी ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ.कुमार सप्तर्षी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, श्री. शैलेश पाटील, कबीरवाणी ग्रंथाचे अनुवादक प्रा. रतनलाल सोनग्रा, डॉ. सुधीर गव्हाणे व आरती सोनग्रा हे उपस्थित होते.
शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले,“ज्ञान व प्रेम कितीही दिले तर ते शिल्लकच उरते, ही शिकवण कबीरांनी दिली. त्यांच्या रचनेमधूनही हीच शिकवण मिळते. भाषा, प्रांत, धर्म, देश, इतकेच नव्हे, तर मानव व प्राणी यांचाही अडथळा नसणारे व जीवनमूल्यांचे विचार कबीरांनी आपल्या तत्त्वज्ञानामध्ये मांडले आहेत. संतांची शिकवण ही मानव उत्थानासाठी आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, गुरूनानक, एवढेच नव्हें, तर येशूख्रिस्त यांनी सत्याचे विवरण केले. गुरू ग्रंथ साहिबामध्ये कबीर,नामदेव व सुफी यांचे दोहे आहेत.”
वर्तमान स्थिति वर भाष्य करतांना शिवराज पाटील म्हणाले, युरोपमध्ये छोट्या-छोट्या देशांची वाटणी झाली त्यामुळे सर्वात अधिक युद्धे तेथेच झाली. जेथे वाटणी कराल तेथे संकुचित व्हाल. त्यामुळेच सर्वांना बरोबरच घेऊन चला. म्हणजे मोठे व्हाल.
सरदार जाफरी यांच्या ग्रंथाचे कबीरवाणी या नावने अनुवाद करणारे प्रा. रतनलाल सोनग्रा म्हणाले,“ कबीर यांनी आपल्या दोह्यांमधून जीवनाला एका सूत्रात बांधले आहे. त्यांनी समाजातील विसंगतीवर बोट ठेऊन जीवन सुखमय बनण्याचे सूत्र सांगितले. कबीरांनी लिहिलेल्या दोह्यांवर सर्व जगभर मोठ्या प्रमाणात अध्ययन सुरू आहे.”
प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ कबीरवाणीचा प्रत्येक सिद्धांत जीवनात सुख-शांती कशी मिळेल हे दाखवितो. भारतीय संस्कृती ही मानवता दर्शविणारी आहे. ज्ञानेश्वर-तुकाराम यांच्या प्रमाणेच सर्व भारतभर जे महान संत होऊन गेले, त्यामध्ये संत कबीरांचे स्थान फार वरचे आहे. कबीराचा संदेश हा 21व्या शतकात भारतातून विश्वाला सुख, समाधान व शांतीचा मार्ग दाखवील.”
मधुकर भावे म्हणाले,“ बुद्ध, कबीर आणि महात्मा गांधी यांच्यासारख्या मोठ्या व्यक्ती या जगात सुद्धा नाहीत. कबीर याला संत असे संबोधून आपण त्यांना दूर लोटतो. कबीर हा सामान्यांचा तत्वज्ञानी आहे.”
डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले,“ भाषा, वेष, संगीत, कला इ. बाबतीत श्रमिकांना अधुनमधूनच संधी मिळते. अशी संधी कबीराच्या रूपाने मिळाली. कबीरपंथीयांनी ही परंपरा चालू ठेवली आहे .”े
प्रा. सुधीर गव्हाणे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. प्रीती जोशी व समृद्धी पाठक यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी आभार मानले.
कबीरांच्या विचारांमध्ये वैश्विक दृष्टीकोनाचा समावेश-शिवराज पाटील
स्मार्ट सिटी साठी मगरपट्टा सिटीतील नियोजन मार्गदर्शनपर – खा. अनिल शिरोळे
पुणे -शहरासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावित “स्मार्ट सिटी” प्रकल्पांतर्गत बाणेर बालेवडी भागात प्राथमिक कामास सुरवात करण्यात आली आहे. शहरातील “मगरपट्टा सिटी” ह्या मोठ्या प्रकल्पात सुनियोजित पद्धतीने नागरी सुविधांच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील बारकावे जाणून घेण्यासाठी म्हणून खासदार अनिल शिरोळे ह्यांनी आमदार मेधा कुलकर्णी नगरसेवक ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, अमोल बालवडकर, सिद्धार्थ शिरोळे, महानगर पालिकेतील अधिकारी राजेंद्र राऊत, विशाल हरिभक्त, अभय शिंदे, संतोष कदम ह्यांच्या समवेत मगरपट्टा सिटी ला भेट देऊन तेथील कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. ह्या प्रसंगी क्रेडाई चे अध्यक्ष सतीश मगर ह्यांनी मगरपट्टा सिटी मधील नागरी सुविधा जसे की अंतर्गत रस्ते, पदपथ, गॅस लाइन, मल निस्सारण व्यवस्थापन आदींवर एका पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.मगरपट्टा सिटीतील कामांचे नियोजन हे नक्कीच स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी मार्गदर्शनपर राहिले आहे आणि ह्या पाहणीचा उपयोग बाणेर बालेवडी भागातील स्मार्ट सिटी च्या कामात नकीच होईल असा विश्वास खासदार अनिल शिरोळे ह्यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेला टाटा समूह प्रायोजित करणार
मुंबई: महाराष्ट्र ओपन टेनिस स्पर्धेच्या पहिल्या सत्राला टाटा समूहाचे प्रायोजकत्व मिळणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत केली. नव्या मौसमाच्या प्रारंभिच होणारी एटीपी वर्ल्ड टूर मालिकेतील ही पहिलीच स्पर्धा असून पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात 1 ते 6 जानेवारी 2018 दरम्यान पार पडणार आहे. या स्पर्धेची पात्रता फेरी 30 व 31 डिसेंबर 2017 रोजी होणार असून मुख्य फेरी 1 जानेवारी 2018 पासून होणार आहे.
यावेळी बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, या स्पर्धेची घोषणा करतानाच टाटा समूहाचा सहभाग जाहीर करताना मला अधिक आनंद व अभिमान वाटत आहे. टाटा समूहाने क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी नेहमीच बहुमोल योगदान दिले आहे आणि या स्पर्धेला त्यांचा पाठिंबा हि आमच्यासाठी अधिक अभिमानाची बाब आहे. तसेच, सहप्रायोजक म्हणून संयोजन समितीत सहभाग घेण्यास आणि त्यांच्या क्लीन सिटी मोहिमेचा प्रचार करण्यासाठी या स्पर्धेचा उपयोग करण्यास संमती दिल्याबद्दल मी आदर पूनावाला यांचे खास आभार मानतो.
यावेळी टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या अधिकृत लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी संयोजन समिती अध्यक्ष प्रवीण सिंग परदेशी(आयएएस), टाटा संन्सच्या पायाभूत सुविधा व एरोस्पेस विभागाचे अध्यक्ष बनमाळी अग्रवाला, संयोजन सचिव प्रवीण दराडे, स्पर्धा संचालक प्रशांत सुतार, संजय खंधारे आणि एमएसएलटीचे मानद सचिव सुंदर अय्यर आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र हे वेगाने देशातील क्रीडा क्षेत्राचे मुख्य केंद्र बनत चालल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, याआधी महाराष्ट्राने डेव्हिस कप(पुणे), एटीपी चॅलेंजर(पुणे), डब्लूटीए मुंबई ओपन, या स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले आहे. खेळ हा प्रत्येक नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असला पाहिजे आणि अशाच स्पर्धांमुळे त्यांना यासाठी प्रेरणा मिळणार आहे.
या स्पर्धेच्या सहभागाविषयी बोलताना टाटा संन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन म्हणाले कि, टाटा समूहाने नेहमीच क्रीडा क्षेत्राचा विकास व प्रासाराठी प्रयत्न केले आहेत. तसेच, तंदरुस्त, निरोगी समाजासाठी क्रीडा क्षेत्र महत्वाची भूमिका बजावत असल्यावर आमचा विश्वास आहे. देशभरातील विविध क्रीडा प्रकार आणि क्रीडा पटूंच्या विकासासाठी टाटा समूहाने गेल्या शतकापेक्षा अधिक काळ महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच आता राज्य शासन आणि एमएसएलटीए यांच्या सहयोगातून टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेला प्रायोजित करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. या स्पर्धेमुळे नवनव्या हजारो प्रेक्षकांपर्यंत टेनिसमधील गुणवत्ता पोहोचेल आणि टेनिसची लोकप्रियता अधिकाधिक वाढेल, असा आमचा विश्वास आहे.
या स्पर्धेला प्रायोजित केल्याबद्दल टाटा समूह व सर्व प्रायोजकांचे मी आभार मानतो असे सांगून संयोजन समिती अध्यक्ष प्रवीण सिंग परदेशी म्हणाले कि, अशा प्रतिष्ठित स्पर्धेसाठी समविचारी व क्रीडा क्षेत्रावर प्रेम करणारी मंडळी एकत्र आल्यामुळे हि स्पर्धा अभूतपूर्व यशस्वी होईल आणि महाराष्ट्राला जागतिक नकाशावर पोहोचवेल, असा माझा विश्वास आहे.
महाराष्ट्राला टेनिस हब बनविण्याचे आमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी टाटा समूहाने दिलेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करून प्रवीण दराडे म्हणाले कि, अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन करून देशभरातील खास करून महाराष्ट्रातील टेनिस चाहत्यांपर्यत अधिकाधिक हा खेळ पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्न करू.
प्रथम 1996 मध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेत राफेल नदाल, स्टॅनिस्लास वावरिंका, कार्लोस मोया, पॅट्रिक राफ्टर, मिलोस रावनीच, मेरीन सीलीच अशा दर्जदार खेळाडूंनी यापूर्वी भाग घेतला आहे. महाराष्ट्रात पदार्पणात प्रथमच पुण्यात होणारी हि स्पर्धा महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए), क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र सरकार यांनी आयोजित केले असून त्यांना आयएमजी रिलायन्स यांचा पुरस्कार मिळाला आहे.
स्पर्धा संचालक प्रशांत सुतार म्हणाले कि, टाटा आणि आदर पुनावाला क्लीन सिटी हे पुरस्कर्ते या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेला लाभले आहेत हि खरंच आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. टाटा आणि अदर पुनावाला क्लीन सिटी, अन्य पुरस्कर्त्यांमुळे आम्हांला हि स्पर्धा संस्मरणीय व यशस्वी ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
टाटा समूहासारख्या जागतिक ब्रँडशी सहयोग झाल्यामुळे स्पर्धेची प्रतिष्ठा उंचावली असून या स्पर्धेत गुंतवणूक करणाऱ्या सर्वांना हि स्पर्धा सर्वोत्तम पद्धतीने पार पडण्याची ग्वाही मिळाली आहे. पुण्यातील पदार्पणातच टाटा ओपन महाराष्ट्र स्पर्धेत जगातील काही दर्जदार खेळाडू सहभागी होणार असून त्यामुळे आमच्या चाहत्यावर्गात प्रचंड भर पडणार असल्याचे स्पर्धेचे सहसंचालक टॉम अन्युअर यांनी सांगितले
आयोजन समितीचे कोषाध्यक्ष संजय खंदारे म्हणाले की, आम्हाला घोषणा करताना आनंद होतो की, स्पर्धेत 550,000 युएस डॉलर रकमेची पारितोषिके देण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्या खेळाडूला 80,000 युएस डॉलर रकमेचे पारितोषिक देण्यात येणार आहे.
या स्पर्धेत जागतिक मानांकन यादीतील अव्वल 50 खेळाडूंमधील सहाव्या क्रमांकाचा मेरीन सिलिच(क्रोशिया), जागतिक क्र. 14 खेळाडू केविन अँड्रेसेन(दक्षिण अफ्रिका), जागतिक क्र.20 रॉबेर्टो बॉटिस्टा ऑगट(स्पेन) आणि जागतिक क्र. 42 रॉबिन ह्यासे यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी टेनिसप्रेमींना मिळणार आहे.
एलआयसी ऑफ इंडियाच्या एकूण संपत्तीने ओलांडला 27.26 लाख कोटी रुपयांचा टप्पा
मुंबई: लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एलआयसी ऑफ इंडिया) या भारतातील सर्वात मोठ्या आयुर्विमा कंपनीने सप्टेंबर 2017 अखेरीपर्यंतच्या सहा महिन्यांतील ऑडिटेड आकडेवारी जाहीर केली आहे.कॉर्पोरेशनने सप्टेंबर 2017च्या अखेरीपर्यंत 1,48,037 कोटी रुपयांचा एकूण प्रीमिअम मिळवला. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील 1,32,257 कोटी रुपयांच्या तुलनेत त्यात 11.95% वाढ झाली.कॉर्पोरेशनचे ढोबळ एकूण उत्पन्न गेल्या वर्षी याच कालावधीतील 2,22,350 कोटी रुपयांवरून 2,50,267 कोटी रुपयांपर्यंत, म्हणजे अंदाजे 12.56% वाढले कॉर्पोरेशनची एकूण मालमत्ता 27,25,808 कोटी रुपये होती, या तुलनेत गेल्या वर्षी याच काळात ती 23,90,056 कोटी रुपये होती. यंदा त्यात 14.04% वाढ झाली.
30.09.2017 पर्यंतच्या कालावधीत एकूण पॉलिसी पेआउटचे प्रमाण 76,126 कोटी रुपये होते, तर गेल्या वर्षी ते 73,546 कोटी रुपये होते. त्यात 3.51% वाढ झाली. त्यामध्ये 30.9.2017 पर्यंतच्या अर्ध्या वर्षात 79,74,383 दाव्यांसाठी दिलेल्या 35482.07 कोटी रुपयांच्या रकमेचा समावेश असून, गेल्या वर्षी हे प्रमाण 73,22,250 दावेदारांसाठी 35643.75 कोटी रुपये होते.सप्टेंबर 2017 पर्यंतच्या सहा महिन्यांत कॉर्पोरेशनच्या नव्या व्यवसायाने 23.68% वाढ साध्य करून 68224.29 कोटी रुपयांची नोंद केली.पेन्शन व ग्रुप सुपरअन्युएशन बिझनेसने नव्या व्यवसायाच्या प्रीमिअममधून मिळालेल्या उत्पन्नापोटी 47078 कोटी रुपये नोंदवले, तर गेल्या वर्षी हे प्रमाण 37136 कोटी रुपये होते, त्यात यंदा 27% वाढ झाली.या विभागाने सामाजिक सुरक्षा योजनेंतर्गत 5.81 कोटी जणांना संरक्षण दिले आहे.
निकालांविषयी बोलताना एलआयसी ऑफ इंडियाचे अध्यक्ष व्ही. के. शर्मा म्हणाले, “आमची कामगिरी आमच्या अपेक्षेप्रमाणे झाली आहे. कॉर्पोरेशनने सक्षम पाया व मूलभूत मूल्ये यांच्या मदतीने उत्तम निकाल नोंदवले आहेत. आमच्यावर विश्वास असलेल्या देशभरातील आमच्या ग्राहकांनी आम्हाला पाठिंबा दिला व उत्तम आर्थिक कामगिरी करण्याची क्षमता दिली.ग्राहकांचे समाधान व नफा हे दोन्ही साध्य करण्याचा आमचा प्रयत्न असतो आणि ग्राहकांना मिळणारा अनुभव व कंपनीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आम्ही सातत्याने तंत्रज्ञानावर भर देतो.”
लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाविषयी:
मुंबई येथे मुख्यालय असलेल्या एलआयसीची 8 झोनल कार्यालये, 113 विभागीय कार्यालये, 2048 शाखा, 1408 सॅटेलाइट कार्यालये व 1238 मिनी कार्यालये देशाला सेवा देत आहेत. एआयसीने सक्षम वित्तीय संस्था म्हणून नाव कमावले असून, प्रशासन व पारदर्शकता ही ठळक वैशिष्ट्ये आहेत.भारतीय विमा क्षेत्रात तीव्र स्पर्धा असूनही एलआआयसी ही अजूनही प्रमुख विमा कंपनी असून 30.09.2017 पर्यंत तिचा बाजारहिस्सा योजनांमध्ये 74.75% आहे व पहिल्या वर्षातील प्रीमिअममध्ये 74.10 % आहे (लाइफ काउन्सिल अहवालानुसार).
सुरुवातीला 5 कोटी रुपयांच्या भांडवलाने सुरू झालेल्या कॉर्पोरेशनने हळूहळू 100 कोटी रुपयांपर्यंत वाढ केली आणि 27.26 लाख कोटी रुपयांची मालमत्ता असलेली सक्षम संस्था म्हणून स्थान निर्माण केले आहे. आज एलआयसी अंदाजे 29 कोटी योजनांची सेवा देत आहे. एलआयसी तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून विविध सुविधांच्या माध्यमातून व दावे वेगाने पूर्ण करण्याच्या माध्यमातून आपल्या योजनाधारकांना उत्तम अनुभव देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.अप्रतिम कामगिरी व योजनाधारकांच्या अपेक्षेनुसार सेवा देण्याची क्षमता यमुळे एलआयसी या क्षेत्रातील सर्वात विश्वासार्ह ब्रँड आहे. गेली 61 वर्षे एलआयसी पाय रोवून उभी आहे आणि आज ती विश्वास, आत्मविश्वास व विश्वासार्हता यासाठीचा ‘आयकॉन’ ठरली आहे. एलआयसी विविध योजनांमार्फत लाखो जणांना जीवनकवच देत आहेच, शिवाय पायाभूत सुविधा व सामाजिक क्षेत्रात गुंतवणूक करून राष्ट्रनिर्मितीसाठी विविध प्रकल्पही राबवून जीवनकवचाच्या पलीकडे जाऊन मोठी भूमिका निभावत आहे. य प्रकल्पांमध्ये वीजनिर्मिती व ट्रान्समिशनचे प्रकल्प/योजना, गृह क्षेत्र, पाणीपुरवठा व सांडपाणी प्रकल्प, रस्ते, पूल व रस्ते वाहतूक विकास यांचा समावेश आहे.
रेमंड कस्टम टेलरिंग-तुमच्या दारी येऊन अनुकूल सुविधा देणारी संकल्पना
पुणे : सूटचे कापड आणि तयार वस्त्रे ह्यांच्या क्षेत्रातील अग्रणी निर्माता, वितरक आणि किरकोळ विक्रेता असलेल्या रेमंडने, आज पुण्यात अग्रणी पुढाकार घेऊन ग्राहकांना ऑनलाईन कस्टमाइज्ड टेलरिंगची म्हणजेच सानुकूल शिवणकामाची सेवा पुरविण्यास सुरुवात केली. ग्राहक आता घरबसल्या www.raymondcustomtailoring.com ह्या संकेतस्थळावरून ऑनलाईन भेटीची वेळ ठरवून चपखल शिवणीसोबतच वैयक्तिक आवडीची पूर्तता आणि निर्दोष कारागिरी अनुभवू शकतात.
आजच्या गतिमान जगात, दुकानातून एखादा कपडा उचलून घेताना तो चपखल बसणारा आणि एखाद्याची वैयक्तिक स्टाईल दर्शविणारा असेलच ह्याची काही खात्री देता येत नाही. पण रेमंडच्या कस्टमाइज्ड टेलरिंगच्या निमित्ताने पुरुषांना आता त्यांच्या सोयीच्या वेळ आणि स्थळानुसार ऑनलाईन भेटीची वेळ ठरवून शर्टस आणि ट्राउझर्समधील स्वत:ची विशिष्ट शैली तयार करणे सहज शक्य होणार आहे. स्टायलिस्टने कपड्याचे नानाविध नमुने घेऊन ग्राहकाच्या घरी भेट देण्यापासून ह्या प्रक्रियेची सुरुवात होते. चपखल मापे घेतल्यानंतर, ग्राहक आपल्या पसंतीनुसार वैयक्तिक आवडीनुसार कॉलर, कफ्स आणि इतर लहान-सहान तपशील सांगू शकतात; खेरीज आपली आद्याक्षरेही बनवून घेऊ शकतात.
कस्टमाइज्ड टेलरिंगच्या संकल्पनेबद्दल बोलताना सुटिंग व्यवसायाचे अध्यक्ष सुधांशू पोख्रीयाल म्हणाले की, “पुरुषांच्या कपड्यांतील उत्क्रांती आणि भारतीय पुरुषाचा आंतरराष्ट्रीय फॅशनकडे झुकणारा सूक्ष्मदर्शी कल पाहता, त्याचा अस्सलपणा दर्शविणारी सेवा देण्याची वेळ येऊन ठेपली होती. रेमंडची कस्टमाइज्ड टेलरिंग् सेवा तंत्रज्ञानाच्या मदतीने सक्षम करण्यात आलेली आणि स्वस्त किमतीत मिळणारी एक अनन्यसाधारण ग्राहक सेवा आहे. वेळेचे अत्यंत महत्त्व असलेल्या आजच्या जगात, रेमंड कस्टमाइज्ड टेलरिंग निर्भयपणे शिवलेले, स्टाईलिश कपडे तयार करून देण्याची सहजता दर्शविते जे तुमची स्टाईल दर्शवितात. ह्या सेवेस मुंबईतून भरघोस प्रतिसाद मिळाल्याने आता ही सुविधा पुण्यात देखील सुरू करण्यात आली आहे.”
रेमंडची कस्टमाइज्ड टेलरिंग सेवा अखंड खरेदीचा अनुभव देते आणि त्याचसोबत ग्राहकांना कपडे बनण्याच्या पूर्ण प्रक्रियेची वेळोवेळी माहिती मिळण्याची सोय करून देते. शिवून तयार झालेले कपडे आकर्षक पॅकिंगसह सात दिवसांच्या आत ग्राहकाच्या घरी पोहोचवण्यात येतात. पूर्वी केवळ हौसेची गोष्ट म्हणून ओळखले जाणारे कपडे आता रेमंडच्या ऑनलाईन कस्टमाइज्ड टेलरिंग सेवेमुळे स्वस्त आणि परवडणाऱ्या किमतीत म्हणजेच रु. ७४९ मध्ये शर्ट आणि रु. ८९९ मध्ये ट्राउझर असे मिळतात. ज्या ग्राहकांकडे आधीच घेतलेले कापड आहे ते देखील ह्या ऑनलाईन कस्टमाइज्ड टेलरिंग सेवेचा लाभ घेऊ शकतात. १ जानेवारी २०१८ पर्यंत मुंबई आणि पुण्यात ग्राहक प्रास्ताविक सूट मिळवून पहिली मोफत चाचणी घेऊ शकतात; तसेच सोमवार ते शुक्रवार ह्या दिवसांत शिवण कामावर ५०% सूट मिळवू शकतात.
‘अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूल’चे वार्षिक पारितोषिक वितरण संपन्न
पुणे-अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलचा वार्षिक सांस्कृतिक आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम नुकताच पार पडला. नगरसेविका फरझाना आयुब इलाही यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या माजी प्राचार्य आणि ‘पै आय.सी.टी.अॅकॅडमी’ च्या संचालक मुमताज सय्यद होत्या.
सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी यामध्ये नृत्य, नाटिका सादर केली.
शैक्षणिक वर्षातील विविध खेळांतील आणि विविध विषयांमधील अव्वल विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुणे नगरसेविका फरझाना आयुब इलाही आणि अँग्लो उर्दू गर्ल्स हायस्कूलच्या प्राचार्य आएशा शेख यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक आणि पारितोषिके देण्यात आली. यावेळी पर्यवेक्षक कर्मचारी शबनम खान, झैनाब उसमान सय्यद आणि शाहिन इरफान शेख उपस्थित होते.
प्राचार्य आएशा शेख यांनी राष्ट्रीय स्तरातील शाळेच्या यशाबद्दल, शाळेचे राष्ट्रीय खेळाडू आणि शैक्षणिक वर्ष 2017-18 मधील सर्वोत्कृष्ट शिक्षक याबद्दल माहिती दिली.
राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना दोन वर्षात सौर ऊर्जेवर आणा ऊर्जामंत्री बावनकुळे यांचे निर्देश
मुंबई –
राज्यात सध्या सुरु असलेल्या सर्व उपसा जलसिंचन योजना येत्या दोन वर्षात सौर ऊर्जेवर आणण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण, महाऊर्जाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
मंत्रालयात या संदर्भात एक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत ऊर्जामंत्र्यांनी हे निर्देश दिलेत. या बैठकीत ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंग, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार, महाऊर्जाचे महासंचालक राजाराम माने, अति. महसंचालक, पुरुषोत्तम जाधव, सिंचन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सर्व उपसा सिंचन योजनांना 1500 मे.वॅ.वीज लागणार आहे. या योजनेच्या यशस्वी नियोजनासाठी महाऊर्जाचे महासंचालक राजाराम माने यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित होणार असून या समितीत महावितरण, महाऊर्जा, सिंचन विभागांच्या अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी राहणार आहे. या समितीने महिनाभरात आपला अहवाल सादर करावा. या प्रकल्पासाठी शासकीय, खाजगी किंवा सिंचन विभागाची जमीन लागणार आहे. यापैकी जी जमीन उपलब्ध होईल तेथील जमिनीवर हा प्रकल्प होईल.
राज्याच्या कॅबिनेटने उपसा सिंचन योजना सोलरवर घेण्यास मंजुरी दिली आहे. नेट मीटरिंग माध्यमातून या योजना चालतील. या प्रकल्पासाठी जमिनीचे संपादन सिंचन विभागाने करून घ्यावे व उर्वरित प्रक्रिया महावितरणने उभी करावी. येत्या दोन वर्षात सर्व उपसासिंचन योजना सौर ऊर्जेवर आणण्याचा पुनरूच्चार उर्जामंत्र्यांनी बैठकीत केले.
राजकीय हस्तक्षेपामुळे विद्यापीठे ही राजकारणाचे रणांगण- प्रा.श्रीरंजन आवटे
नारायण नव्हे ‘बारायण’ नावाचा सिनेमा येतोय …
वर्षाखेरीस सई ताम्हणकरचं एक आगळंवेगळं समाजकार्य!
शनाया वागणार शान्यासारखं!
‘गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं’ असं म्हणत जवळपास वर्षभरापूर्वी सुरु झालेली’;माझ्या नवऱ्याची बायको’ ही
मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले
आहेत.आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, ‘;स्वावलंबी’राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर
नाचवणारी’नखरेल’ शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला’;बिचारा’ गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे. दिवसेंदिवस रंगत जाणाऱ्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनाचा ताबा घेतला आहे. नवनवीन ट्विस्ट आणि टर्न यामुळे दिवसेंदिवस रोमांचक आणि रंजक बनत चाललेल्या या मालिकेने आता घेतलंय एक
धमाल वळण!
गुरुनाथला राधिकापासून सुटका हवी आहे आणि राधिकाला कोणत्याही परिस्थितीत गुरुनाथला शनायापासून सोडवायचं
आहे. गुरुनाथला मात्र या दोघींचं कोडं सोडवायचं आहे. मागे शनायाने थेट गुरुनाथकडे लग्न करण्याचा हट्ट धरला. त्यामुळे
इकडे आड आणि तिकडे विहीर अशा परिस्थितीत वारंवार अडकणाऱ्या गुरुनाथच्या अडचणींमध्ये आणखीन वाढ झाली.
मसाल्यांचा गृहउद्योग स्थापन करून व्यावसायिक जगात आपली अशी वेगळी ओळख निर्माण करू इच्छिणाऱ्या राधिकाने
आता कात टाकली आहे. इतके दिवस साधी सरळ गृहिणी म्हणून वावरणारी राधिका आता स्वतःच व्यक्तिमत्व खुलवण्याचा
प्रयत्न करणार आहे. सहावारी साडीसोबतच आता आकर्षक पंजाबी ड्रेसमध्ये राधिका आपल्याला दिसणार आहे. तर तिकडे,
गुरुनाथला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी शनायाने चक्क राधिकाचं सोंग घेतलं आहे. एरव्ही मॉर्डन कपड्यात वावरणारी
शनाया आता आपल्याला चक्क साडीमध्ये दिसणार आहे. राधिकासारखं नम्र, प्रेमळ, आज्ञाधारक होण्याचं शनायाने ठरवलं
आहे.’पती परमेश्वर’; मानून गुरुनाथच्या सेवेत स्वतःला वाहून घेण्याचं तिने ठरवलं आहे. दोघींमध्ये झालेल्या आमूलाग्र
बदलाचं कौतुक करण्याऐवजी गुरुनाथ मात्र धास्तावला आहे.
प्रेमळ राधिकाची हुशारी, अलबेली शनायाचा खोडसाळपणा आणि दोघींमध्ये अडकलेल्या गुरुनाथची हतबलता या
त्रयीच्या स्वभाव वैशिष्टयांनी महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. नुकताच या मालिकेने ४०० भागांचा टप्पा पार
केला.’माझ्या नवऱ्याची बायको’च्या सेटवर संपूर्ण टीमने केक कापून हा आनंद व्यक्त केला. दिवसेंदिवस रंजक होत
जाणाऱ्या या मालिकेमध्ये आता प्रेक्षक चांगलेच गुंतले आहेत. आता दोघींमध्ये होणारा हा बदल गुरुनाथसाठी कोणत्या
नव्या संकटाची नांदी ठरेल? शनायाला राधिकासारखं वागणं जमेल का? राधिकाचं खुललेलं व्यक्तिमत्व तिच्या गृहउद्योगात कसं उपयोगास येईल? या सगळ्या इंटरेस्टिंग प्रश्नांची उत्तरं मिळतील मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये…
सामाजिक भानाची जागृती करणारे संमेलन
पुणे – संवेदनशीलता, स्वच्छ भारत, बालकामगार, महिला सक्षमीकरण, जलसाक्षरता, पर्यावरण, शांतता, एकात्मता, शहीदांप्रती कृतज्ञता, अंधश्रध्दा निर्मूलन अशा विविध सामाजिक भानांची संगीत, नृत्य, नाट्य, अभिनय आणि मूकाभिनयाद्वारे जाणीव करून देत मनोरंजन करणारे स्नेह-संमेलन डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या डीईएस प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केले.
गणेश वंदना, शेतकरी नृत्य, मोवन नृत्य, गुजरातचा गरबा, पंजाबचा भांगडा, राजस्थानचा घुमर, बंगालचे चाऊ नृत्य आणि भरतनाट्यम अशा विविध प्रदेशांच्या लोकधारा चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केल्या. गे‘सी डिसूझा यांना उत्कृष्ट शिक्षकांसाठीचा अलका आपटे पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. श्रीकांत बोर्हाडे, प्रा. धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. मु‘याध्यापिका स्मिता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली अंजली शेवाळे, अंजली भडभडे, सिमरन गुजर, न्यानसी गवारे, शितल बेलोटी, हर्षदा कारेकर, नेत्रा वेदपाठक, अर्चना ननावरे, ज्योती जाधव, ज्योती क्षिरसागर या शिक्षकांनी संयोजन केले.
‘नाही म्हणायला शिका’ने पटकाविले विजेतेपद
पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) आणि इंडियन रेड क्रोस सोसायटीच्या वतीने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन पथनाट्य स्पर्धेत एडसविषयक जनजागृती करणार्या ‘नाही म्हणायला शिका’ या नेस वाडिया कॉमर्स कॉलेजच्या पथनाट्याने विजेतेपद पटकाविले. मॉडर्न कॉलेज, गणेशखिंडच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘मोबाईलने केला घात’ या मोबाईलच्या अतिरेकी वापराच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकणार्या पथनाट्याला उपविजेतेपद मिळाले.
शालेय गटात रेणुका स्वरूपच्या विद्यार्थिनीनींने सादर केलेल्या बेटी बचाओ बेटी पढाओ, सुंदराबाई मराठे विद्यालयाच्या अवयवदान आणि भावे प्राथमिक शाळेच्या पाणी वाचवा या पथनाट्यांनी अनुक‘मे पहिले तीन क‘मांक मिळविले. आर. व्ही. कुलकर्णी यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ व उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर यांच्या मार्गदर्शनाखाली विजय साळुंके, जसप्रितकौर बलजित, अंजली जाधव, मुभाशिरा शेख, शुभम परखड, अंजली जाधव यांनी संयोजन केले.
225 वर्षपूर्तीनिमित्त सिटी चर्च खास सोहळा होणार
पेशव्यांच्या वारसांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार होणार
पुणे-नाना पेठ क्वार्टरगेट येथील ‘ऑरनेलाज स्कूल’ हायस्कूलजवळ असणाऱ्या सिटी चर्चला 8
डिसेंबर 2017 रोजी तब्बल 225 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त शोभयात्रा, धर्मगुरुंचे आशीर्वाद व
प्रवचन, कोनशिला अनावरण, सत्कार व धार्मिक विधी व प्रसाद आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात आले आहे. तसेच हे सिटी चर्च व परिसराची सुमारे 4 एकर जमीन माधवराव पेशवे यांनी
दिली. नाना फडणवीस यांनी पेशव्यांचे कारभारी या नात्याने पेशव्यांच्या वतीने आर्थिक मदत चर्च
बांधण्यासाठी दिली. या भव्य चर्चची पायाभरणी व शेडची उभारणी 8 डिसेंबर 1792 रोजी झाली व
टप्प्याटप्प्याने हे चर्च पूर्ण करण्यात आले. श्रीमंत पेशव्यांनी दाखविलेल्या या औदार्याबद्दल कृतज्ञता
म्हणून पेशव्यांच्या वंशजांचा सहकुटुंब गौरव या प्रसंगी करण्यात येणार आहे. पुणेरी पगडी, शाल,
श्रीफळ व सन्मान चिन्ह असे या गौरवाचे स्वरूप असेल. हा सत्कार स्वीकारण्यासाठी श्री.विनायकराव
पेशवे, त्यांचे पुतणे श्री.महेंद्र पेशवे हे पेशव्यांचे वंशज उपस्थित राहणार आहेत.
सिटी चर्चच्या प्रांगणात सायं. 6 वाजता संपन्न होणाऱ्या या भव्य कार्यक्रमात गोव्याचे
आर्चबिशप फिलिप नेरी फेरावो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी पुणे
धर्मप्रांताचे बिशप थॉमस डाबरे, बिशप व्हेलेरियन डिसूझा, फादर अँड्र्यू फर्नांडिस (S. J.), फादर
माल्कम सिल्व्हेरा, विकर जनरल ऑफ पुणे आणि सिटी चर्चचे प्रमुख धर्मगुरु फादर सॅल्व्हेडॉर पिंटो,
तसेच पेशव्यांचे वारस मंचावर उपस्थित असतील. या भव्य मंचावर आकर्षक बॅकड्रॉप उभारण्यात आला
आहे.
या कार्यक्रमात स्वागत फादर सॅल्व्हेडॉर पिंटो करणार असून त्यानंतर स्वागत व पेशव्यांच्या
वारसांचा सत्कार केला जाईल. या प्रसंगी विविध रंगी 225 फुगे लहान मुलांच्या हस्ते आकाशात सोडले
जातील. बिशप थॉमस डाबरे व प्रमुख पाहुणे गोवा प्रांताचे आर्चबिशप फिलिप नेरी फेरावो यांचे आशीर्वाद
व प्रवचन होईल व मंचावरच धार्मिक विधी संपन्न होतील व सर्वांना प्रसाद दिला जाईल.
यानंतर चर्चमध्ये आतापर्यंतच्या सर्व बिशपांचा नामनिर्देश असणाऱ्या संगमरवरी कोनशिलेच उद्घाटन केले जाईल व त्यानंतर भव्य शोभायात्रेस सुरूवात होईल.
ही शोभायात्रा सिटी चर्च येथून निघून क्वार्टरगेट चौक दस्तूर मेहर मार्ग, कॅम्प मार्गे पुन्हा सिटी
चर्चकडे येईल. या शोभायात्रेत अग्रभागी मुंबईचा प्रख्यात सेंट फ्रान्सीस बँड असणार असून सिटी चर्चचे
प्रमुख फादर सॅल्व्हेडॉर पिंटो व अन्य धर्मगुरु व नन्ससह सुमारे 2000 ख्रिश्चन बांधव व भगिनी हातात
प्लॅकार्ड, झेंडे व बॅनर घेऊन प्रार्थना व गीत म्हणत शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. या मार्गावर
ठिकठिकाणी ख्रिश्चन बांधवांबरोबरच अन्यधर्मीय बांधव व विविध सार्वजनिक मंडळे चौकाचौकात
डेकोरेशन करून शोभायात्रेवर फुलांचा वर्षाव करत स्वागत करतील. या शोभायात्रेत अग्रभागी मदर
मेरीचा पुतळा घेऊन विशिष्ट वेशभूषा परिधान केलेले युवक असतील. ही शोभायात्रा सिटी चर्चमध्ये
परतल्यानंतर चर्चचे प्रमुख धर्मगुरु फादर पिंटो या आनंद सोहळ्यानिमित्त उभारण्यात आलेला झेंडा
खाली उतरवतील आणि मेरीचा पुतळा चर्चमध्ये नेण्यात येईल आणि या भव्य सोहळ्याची सांगता
होईल.


