पुणे -शहरासाठी केंद्र सरकारच्या प्रस्तावित “स्मार्ट सिटी” प्रकल्पांतर्गत बाणेर बालेवडी भागात प्राथमिक कामास सुरवात करण्यात आली आहे. शहरातील “मगरपट्टा सिटी” ह्या मोठ्या प्रकल्पात सुनियोजित पद्धतीने नागरी सुविधांच्या कामाचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील बारकावे जाणून घेण्यासाठी म्हणून खासदार अनिल शिरोळे ह्यांनी आमदार मेधा कुलकर्णी नगरसेवक ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, अमोल बालवडकर, सिद्धार्थ शिरोळे, महानगर पालिकेतील अधिकारी राजेंद्र राऊत, विशाल हरिभक्त, अभय शिंदे, संतोष कदम ह्यांच्या समवेत मगरपट्टा सिटी ला भेट देऊन तेथील कामांची प्रत्यक्ष पाहणी केली. ह्या प्रसंगी क्रेडाई चे अध्यक्ष सतीश मगर ह्यांनी मगरपट्टा सिटी मधील नागरी सुविधा जसे की अंतर्गत रस्ते, पदपथ, गॅस लाइन, मल निस्सारण व्यवस्थापन आदींवर एका पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन द्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले.मगरपट्टा सिटीतील कामांचे नियोजन हे नक्कीच स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी मार्गदर्शनपर राहिले आहे आणि ह्या पाहणीचा उपयोग बाणेर बालेवडी भागातील स्मार्ट सिटी च्या कामात नकीच होईल असा विश्वास खासदार अनिल शिरोळे ह्यांनी व्यक्त केला.
स्मार्ट सिटी साठी मगरपट्टा सिटीतील नियोजन मार्गदर्शनपर – खा. अनिल शिरोळे
Date: