राजकीय हस्तक्षेपामुळे विद्यापीठे ही राजकारणाचे रणांगण- प्रा.श्रीरंजन आवटे

Date:

विद्यापीठे आणि विद्यमान सरकार याविषयावरील व्याख्यान
सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह
पुणे : देशातील प्रत्येक क्षेत्रासह शिक्षणक्षेत्र आणि विद्यापीठांमध्ये देखील वरवरची लोकशाहीपूर्ण आणि व्यक्तीस्वातंत्र्य असल्याचा आभास निर्माण केला जात आहे. प्रत्यक्षात याविरोधी परिस्थिती असून आपल्याला विरोध होऊ नये, अशा प्रकारचे वातावरण सताधारी पक्ष तयार करीत आहे. केवळ पक्ष, विचारधारा आणि संघपरिवाराशी संबंधित म्हणून शिक्षणक्षेत्रात गेल्या ३ वर्षांमध्ये पुरेशी गुणवत्ता नसलेल्यांना पदे दिली गेली आहेत. भाजपच्या अशा राजकीय हस्तक्षेपामुळे विद्यापीठे ही राजकारणाचे रणांगण बनत चालले असून ही परिस्थिती बदलण्याकरीता विद्यार्थ्यांनी आवाज उठवायला हवा, असे मत शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक प्रा.श्रीरंजन आवटे यांने व्यक्त केले.
कॉंग्रेस अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित  सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात पत्रकार भवन येथे विद्यापीठे आणि विद्यमान सरकार – शैक्षणिक स्वायत्ततेला धोक्यात आणणारी निती याविषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, चंद्रशेखर कपोते, आयुब पठाण, किशोर मारणे, अ‍ॅड.शाबीर खान आदी उपस्थित होते.
प्रा.श्रीरंजन आवटे म्हणाले, जेव्हा शिक्षणाचा दर्जा खालावतो, शिक्षक व विद्यार्थी कोलमडतात, तेव्हा राष्ट्र संपते. गेल्या ३ वर्षात भाजप-सेनेचे सरकार आल्यानंतर अनेकांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याच्या घटना घडल्या आहेत. गुणवत्तेची कदर नसलेला सत्ताधारी पक्ष असून उच्चशिक्षणाची व्यवस्था कोलमडण्यास केवळ सरकारच कारणीभूत आहे. कॉंग्रेसच्या काळातील लोक गुणवत्तापूर्ण तरी होते. आता मात्र, विद्यापीठांतील वातावरण भितीचे, संतापाचे करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. जेएनयु सारखी अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. त्यामुळे शिक्षणाचे भगवीकरण थांबविण्यास विद्यार्थी संघटना पुढे यायला हव्या.
मोहन जोशी म्हणाले, भाजप-सेना सत्तेत आल्यानंतर युती शासनाने शिक्षण क्षेत्रात अनेक बदल केले. या बदलांमध्ये नियोजनाची कमतरता आणि परिणामांची पूर्वकल्पना केलेली नव्हती. त्यामुळे शिक्षण पद्धतीचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. मुंबई विद्यापीठातील परीक्षा निकालात झालेला गोंधळ ही राज्यातील शिक्षण परंपरेची बदनामी करणारी घटना आहे, असेही त्यांनी सांगितले. यशराज पारखी यांनी सूत्रसंचालन केले. प्रशांत वेलणकर यांनी आभार मानले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राहुल गांधींसह सर्व नेत्यांना सोडण्यात आले.

पोलीस ठाण्यातून बाहेर पडल्यावर प्रियंका गांधी म्हणाल्या- धर्मेंद्र प्रधान...

महिंद्रा फायनान्सचा तिमाहीतील करोत्तर नफा ₹८९९ कोटी; वार्षिक आधारावर ७०% वाढ

मुंबई, २१ जुलै २०२६: भारतासाठी विश्वासार्ह वित्तीय सेवा पुरवठादार असलेल्या महिंद्रा फायनान्सने ३० जून २०२६ रोजी संपलेल्या तिमाहीचे अलेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले. कंपनीने स्वतंत्र आधारावर ₹८९९ कोटींचा करोत्तर नफा  नोंदवला असून, तो वार्षिक आधारावर ७०% वाढला आहे. याच काळात एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १२% वाढून ₹४,९७४ कोटींवर पोहोचले. व्यवस्थापनाखालील मालमत्ता वार्षिक आधारावर १३% वाढून ₹१,३७,४४९ कोटी झाली, ज्याला ₹१५,५६४ कोटींच्या विक्रमी पहिल्या तिमाही वितरणाचा आधार मिळाला — हे वितरण वार्षिक आधारावर २२% अधिक आहे. एकत्रित  आधारावर एकूण उत्पन्न वार्षिक आधारावर १४% वाढून ₹५,७२५ कोटी झाले, तर करोत्तर नफा ७५% वाढून ₹९२७ कोटींवर पोहोचला. निकालांवर भाष्य करताना महिंद्रा फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राऊल रेबेलो म्हणाले, "या तिमाहीतील आमची कामगिरी आमच्या फ्रँचायझीची ताकद अधोरेखित करते — नफाक्षमतेतील सातत्यपूर्ण विस्तार, लवचिक मालमत्ता गुणवत्ता आणि आमच्या वृद्धीकेंद्रित धोरणांच्या दिशेने केलेली प्रगती यातून हे स्पष्ट होते. आमच्या मूळ वाहन फ्रँचायझी, नवीन वृद्धी इंजिने आणि तंत्रज्ञानातील केंद्रित गुंतवणुका नफादायी व शिस्तबद्ध वाढीला पाठबळ देत आहेत." कंपनीने नफादायी व शिस्तबद्ध वाढ कायम राखली असून, निव्वळ व्याज मार्जिन ७.३% पर्यंत विस्तारले, पत खर्च सुधारून १.५% झाला, तर मालमत्तेवरील परतावा मजबूत होऊन २.४% झाला. मालमत्तेची गुणवत्ता सुदृढ राहिली असून, स्टेज ३ मालमत्ता गतवर्षीच्या ३.८% वरून सुधारून ३.५% झाल्या. त्याचबरोबर डिजिटल व एआय (AI) क्षमतांमुळे ग्राहक संपादन, कार्यचालनातील लवचिकता आणि वसुली कार्यक्षमता अधिक बळकट होत राहिली. महिंद्रा फायनान्सने आपल्या वाहनेतर वित्त व्यवसायातही (non-vehicle finance) जोरदार गती अनुभवली असून, MHRFL वगळता या विभागातील वितरण वार्षिक आधारावर ७९% वाढले.