Home Blog Page 3228

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरु करावी : पालकमंत्री गिरीश बापट

0

पुणे : महात्मा फुले आणि  सावित्रीबाई  फुले यांनी पुण्यातील भिडे वाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरु केली. त्यामुळे भिडेवाड्याचे राष्ट्रीय स्मारक म्हणून जतन व्हावे यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी मंत्रालयात आज विशेष बैठक घेतली. भिडे वाडा राष्ट्रीय स्मारक होण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरु करावी अशी सूचना विधी व न्यायविभाग व  पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिल्या.

 या बैठकीत राज्य सरकारच्या वतीने विधी व न्याय विभागाचे उपसचिव श्री पाटील,नगरविकास विभागाचे संजय गोखले, महसूल व वनविभागाचे सहसचिव श्री गावडे, महापालिका उपायुक्त सतीश कुलकर्णी, तसेच स्मारक समितीच्या वतीने नगरसेवक महेश लडकत यांच्यासह सबंधित अधिकारी उपस्थित होते.

२०११ मध्ये तत्कालीन सरकारी वकिलांनी भूमिसंपादन अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रामुळे भिडेवाडा राष्ट्रीय स्मारक करण्यासाठी लागणाऱ्या जागेचा ताबा देण्याची प्रक्रिया रखडली आहे असे बापट यांच्याशी झालेल्या या चर्चेतून निर्देशनास आले. त्यामुळे या प्रकारातून तातडीने मार्ग काढाण्याच्या  सूचना पालकमंत्र्यांनी  विधी व न्याय खात्याला दिली. संबंधित पत्रावर विधी व  न्याय खात्याचे मत लवकरात लवकर कळवावे अशी सूचना ही बापट यांनी यावेळी केली. सरकारी वकिलांशी चर्चा करून याबाबत माहिती देण्याचे विधी व न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांनी श्री बापट यांना सांगितले. 

भिडेवाडा हे राष्ट्रीय स्मारक आहे. हा विषय सर्वांसाठी  महत्वाचा आहे. या आधी या संदर्भात काय -काय कामे झाली याची माहिती एकत्र करून मला द्यावी असा आदेश बापट यांनी या बैठकीत दिला. या विषयाची कायदेशीर प्रक्रिया आणि त्या अनुषंगाने जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया यापुढील काळात कमीत कमी वेळेत होईल याबाबत नियोजन करा असे बापट यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी भिडेवाड्या संदर्भात २०११ नंतरच्या काळात झालेली दिरंगाई समजून घेऊन त्याबाबत श्री बापट यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली. अशी दिरंगाई यापुळे खपवून घेणार नाही असेही बापट यांनी यावेळी सांगितले.

मेट्रोच्या कामांना गती देण्यासाठी मंत्रालयात पालकमंत्र्यांची विशेष बैठक

0

पुणे : मेट्रोच्या कामांना अधिक गती देण्यासाठी मंत्रालयात आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत शिवाजी नगर येथील गोदामांची जागा मेट्रोसाठी उपलब्ध करून द्यावी अशी सूचना जिल्हाधिकारी सौरव राव यांना पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.

 या बैठकीला सौरव राव यांच्या सह फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे अधिकारी, मेट्रोचे अधिकारी, अन्न पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.  

शिवाजीनगर येथील गोदामाच्या जागेत मेट्रोचे मुख्य स्थानक उभारण्यात येणार आहे. यासाठी येथे  असणारी धान्य गोदामे, सेतू सेवा केंद्र , पुरवठा विभागाची कार्यालये तसेच निवडणूक विभागाची गोदामे अन्यत्र हलवावी लागणार आहेत. ही गोदामे जिल्हा परिषदेची जुनी इमारत, पुणे स्टेशन एसटी स्थानक आणि भोसरी क्षेत्रिय कार्यालय येथे हलवण्यात येणार आहेत. ही कार्यालये स्थलांतरित करून या जागेचा ताबा दोन महिन्याच्या आत मेट्रोला देण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम तयार करा. असे आदेश पालकमंत्री गिरीश बापट यांनी या बैठकीत दिले. त्यासाठी संबंधित यंत्रणांचे करारनामे करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

समान पाणी पुरवठा योजना टेंडरप्रकरण आयुक्त कुणालकुमार यांचा कारभार संशयास्पद ?

0

टेंडरमधील दर व प्रत्यक्षातील दरात मोठी तफावत असल्यानेच आयुक्तांची माहिती देण्यास टाळाटाळ

मुख्यमंत्री व प्रधान सचिवांना खासदार संजय काकडे यांचे पत्र

पुणे : समान पाणी पुरवठा योजनेंतर्गत वापरण्यात येणारे पाण्याचे मीटर व ऑप्टिकल फाइबर डक्टचे टेंडरमध्ये दिलेले दर व प्रत्यक्षातील दर यामध्ये मोठी तफावत असल्याचे प्रथम दर्शनी माझ्या लक्षात आले आहे. त्यामुळेच या योजनेची मागविलेली माहिती महापालिका आयुक्तांकडून अद्याप मला मिळालेली नाही, असा स्पष्ट आरोप भाजपचे सहयोगी सदस्य खासदार संजय काकडे यांनी केला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नगरविकास खात्याचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांना खासदार काकडे उद्या पत्र देणार आहेत. पत्रामध्ये या योजनेच्या संपूर्ण निविदा प्रक्रियेची शहानिशा करावी म्हणून त्यांनी मुख्यमंत्र्यांना विनंतीही केली आहे.

सल्लागार कंपनी अनेक विषयावर दिशाभूल करीत असल्याचे विभागाचे मत आहे. याविषयी माध्यमांमध्ये बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. असे असतानादेखील सल्लागार कंपनीची चौकशी न करताच नवीन निविदा प्रक्रिया तयार करण्यासाठी त्यांच्यावरच मेहेरनजर दाखविण्यात आली आहे. पाणी मीटरचे कोटेशन कोणत्या कंपनीकडून किती दराने मागविले? असा प्रश्न व संभ्रम याबाबत झाला आहे. मागच्यावेळी निविदा रद्द करताना पुढच्या वेळी अधिक स्पर्धा व्हावी व अधिक कंपन्या यामध्ये सहभागी व्हाव्यात अशी इच्छा महापालिका आयुक्तांनी व्यक्त केली होती. वास्तवात मात्र पूर्वीच्याच तीन कंपन्यांना नवीन निविदा प्रक्रियेत सहभागी होता यावे अशा अनुकूल अटी तयार करण्यात आल्याचे दिसते, अशा बाबी खासदार काकडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस व डॉ. करीर यांना पाठविण्यात येणाऱ्या पत्रात नमूद केल्या आहेत. तसेच, महापालिका आयुक्त कुणाल कुमार व पाणी पुरवठा विभागाचे व्ही जी कुलकर्णी यांनाही याविषयीची विचारणा करणारे पत्र खासदार काकडे यांनी पाठविले आहे.

याबरोबरच पाण्याचे मीटर व ऑप्टिकल फाइबर डक्टचे टेंडरचे काम स्मार्ट सिटी करणार असून त्यात महापालिकेला पैसे मिळणार आहेत. असे असताना महापालिका 193 कोटी रुपये यावर का खर्च करीत आहे? या योजनेसाठी भागिदारी कंपन्या का नाहीत? मीटरचे दर संबंधीत कंपन्यांकडून मागविलेत का? किंवा ते दर सल्लागार कंपनीच्या म्हणण्यानुसार ठरविलेत? 27 नोव्हेंबर 2017 रोजी झालेल्या प्रीबिड बैठकीत किती कंपन्या होत्या? आणि त्यांनी कोणत्या सूचना केल्या? याबाबतची शहानिशाही करावी, असेही खासदार काकडे यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

रेनॉ एमटीव्ही रोडीज एक्स्ट्रीम च्या सर्वाधिक एक्स्ट्रीम अशा पर्वासाठी पुण्यातील ऑडिशन्सची सुरूवात

0
नॉ एमटीव्ही रोडीज एक्स्ट्रीम च्या सर्वाधिक एक्स्ट्रीम अशा पर्वासाठी पुण्यातील ऑडिशन्सची सुरूवात 
ओरिजिनल रोडी असलेल्या रणविजय सिंघा बरोबर नेहा धुपिया, प्रिंन्स नरूला, निखिल चिन्नप्पा हे चार गॅंग लीडर्स कडून रोडीज ऑडिशन्सची सुरूवात-
पुणे  –  एमटीव्ही या तरूणाईच्या आयकॉनिक ब्रॅन्ड तर्फे आता देशांतील सर्वांत अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या शो ची म्हणजेच रोडीजच्या सर्वांत एक्स्ट्रीम अशा  पंधराव्या पर्वाची रोडीज एक्स्ट्रीम ची आज घोषणा केली.  साहस आणि आश्चर्याने युक्त अशा या कार्यक्रमात पहिला रोडी असलेला रणविजय सिंघा यावेळी एक अनपेक्षित अशी गोष्ट करणार आहे.  रोडीज ची मॅडनेस सुरू ठेवत अॅडव्हेंचर गर्ल बॉस नेहा धुपियाही असेलच, त्याचबरोबर टेलिव्हिजन हार्टथ्रॉब प्रिन्स नरूला व रोडीज जज निखिल चिन्नप्पाही असणार आहे.  हे सर्व गॅंग लीडर्स आणि रणविजय सिंघा हे पुणे शहरांत आयोजित करण्यात आलेल्या ऑडिशन्स साठी सहभागी झाले होते व यावेळी पुण्यातील अतिशय आकर्षक आणि साहसी असे रोडीज सहभागी झाले होते.
रोडीज साठी पुन्हा एकदा देशभरांतील अतिशय स्पर्धात्मक असे स्पर्धक पुणे शहरांतून मिळाले आणि हा शोध अधिक चांगल्या प्रकारे पार पडावा यासाठी या ए‍क्स्ट्रीम सिझन च्या या गॅंग लीडर्स नी पुणे शहरापर्यंतचा प्रवास केला.  नेहमीप्रमाणेच पुण्यातूनही अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि या ऑडिशनला मोठ्या प्रमाणावर स्पर्धकांनी हजेरी लावली होती.  पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून प्रसिध्द असलेले पुणे हे शहर आपल्या बुध्दीसाठी प्रसिध्द असून यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले धैर्य आजमावले.
 भारतातील या सर्वाधिक एक्स्ट्रीम अशा रिअॅलिटी शो विषयी माहिती देतांना व्हायकॉम १८ च्या युथ, म्युझिक आणि इंग्लिश एन्टरटेन्मेंट चे प्रमुख फरझाद पालिया यांनी सांगितले ” हे पंधरावे पर्व असूनही अगदी कालच सुरू झालेला असा हा शो वाटत आहे.  फॅन्स मधील उत्साहामुळे प्रसिध्द झाल्याने आमच्या सर्व पर्वांना उदंड प्रतिसाद मिळत आहे.  या वर्षी सुध्दा हा शो सर्वच प्रकारे एक्स्ट्रीम असणार आहे यांतून रोडीजचे फॅन्स हीच अपेक्षा करू शकतील की काहीतरी अनपेक्षित असेल.  या पर्वाची सुरूवात पुण्यातून करतांना आंम्हाला खूप आनंद होत आहे, आणि आंम्हाला खात्री आहे की पुणे शहर सुध्दा रोडीजचे स्पिरिट जगेल.  त्याचबरोबर आंम्हाला आशा आहे की या वर्षी सुध्दा आंम्हाला पुणे शहरातून चांगले स्पर्धक मिळू शकतील.”
या नवीन पर्वा विषयी माहिती देतांना ओरिजिनल रोडी रणविजय सिंग म्हणतो ” नावाप्रमाणेच या वेळीही रोडीज ना खूप काही एक्स्ट्रीम मिळणार आहेआणि प्रेक्षकांना नक्कीच काही आश्चर्ये पहायला मिळणार आहेत.  माझे काम केवळ गॅंग लीडरचेच नसेल तर त्याचबरोबर प्रत्येक क्षणाला बदल करण्यावर भर असेल.  या शो शी मी गेली १५ वर्ष निगडीत आहे आणि मला रोडीतून काय साध्य करायचे आहे ते माहित आहे.  ऑडिशन्स पासून ते संपूर्ण प्रवासापर्यंत मी हे सुनिश्चित करेन की स्पर्धक आणि गॅंग लीडर्स दोघांनाही आव्हानांचा मुकाबला करावा लागेल व ते अधिक सक्षम होऊ शकतील.”
या शो मध्ये तिसऱ्यांदा प्रवेश करणारी नेहा धुपिया या शो विषयी म्हणते ”रोडीज हा एक आकर्षक असा शो असून देशातील तरूणाईच्या जीवनाचा एक भाग बनला आहे.  वैयक्तिक दृष्ट्या मला या शोची संकल्पना आवडली आणि स्पर्धकांचा उत्साह पाहता रोडी बनण्याचे त्यांचे स्वप्न व ते पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याचा उत्साह आवडला.  त्यांचा उत्साह खूपच चांगला आहे.  दरवर्षी रोडीजच्या माध्यमातून मिळणारा प्रतिसाद पाहता आंम्हाला अशी आशा आहे की याया वर्षीचा प्रवास सुध्दा आव्हानात्मक असेल.  कष्टांबरोबरच मी माझे लिमिट्स ताणण्यावर भर देणार अरून या सिझनच्या एक्स्ट्रीम नावानुसार काम करण्यावर जोर देणार आहे. ”
रोडीज मधूनच पुढे आलेला प्रिन्स नरूला म्हणतो ” रोडीज माझे सर्वस्व आहे.  माझ्यासाठी ही एक चांगली सुरूवात होती आणि हे सर्व रोडीज मुळेच शक्य झाले.  ज्यावेळी पहिल्यांदा मला गॅंग लीडर व्हावे म्हणून संपर्क साधण्यात आला त्यावेळ हे सर्व पूर्ण झाले असे मला वाटले. माझे मुख्य लक्ष्य हा शो जिंकणे असेल आणि यावेळी मी अधिक चांगल योजना बनवू शकेन आणि अधिक शक्तीनिशी प्रवेश करू शकेन.  माझी गॅंग यावर्षी रोडीज एक्स्ट्रीम जिंकेल यासाठी मी प्रयत्न करेन.”
 या नवीन सिझन विषयी आपले मत मांडतांना एमटीव्ही व्हीजे निखिल चिन्नप्पा म्हणतो ” रोडीजचा एक गॅंग लीडर नेहमीच शांत, विचार करणारा आणि प्रोत्साहन देणारा असावा लागतो.  नवीन पर्वा विषयी मी खूपच उत्सुक असून मी माझे गॅंग मेंबर्स निवडणार तर आहेच पण त्याचबरोबर शो जिंकण्यासाठी मी त्यांना प्रोत्साहनही देणार आहे.  गेल्या सिझन मध्ये आम्ही विजयाच्या खूपच जवळ आलो होतो आणि आता आंम्ही हे सुनिश्चित करणार आहोत की आमचा हा उत्साह टिकून राहील.  हा सिझन खूपच एक्स्ट्रीम असूनही मी या साठी नक्कीच तयार आहे.”
 रोडीज एक्स्ट्रीम चा प्रसार करण्यासाठी विविध मंचांवरून ३६० अंशांतील प्रसार मोहिम सुरू करण्यात येत आहे.  रोडीजच्या या पंधराव्या मोसमातून आपल्याला सर्वांत एक्स्ट्रीम असा हा मौसम मिळणार असून गॅंग लीडर्स ना त्यांच्या सदस्यांबरोबरच साहसाची परिक्षा द्यावी लागणार आहे.
 आजपासून चर्चेच्या फेरीतून पुण्यातील ऑडिशन्स सुरू होत असून त्यानंतर गॅंग लीडर्स बरोबरच्या मुलाखतीं चे आयोजन करण्यात आले आहे.  या ऑडिशन्स ला नेहमी प्रमाणेच उदंड प्रतिसाद आणि उत्साह आपल्याला दिसून येणार आहे.

संजय टकलेला खमेर रॅलीचे आमंत्रण

0
पुणे- पुण्याचा आंतरराष्ट्रीय रॅली ड्रायव्हर संजय टकले याला कंबोडियातील पहिल्या आंतरराष्ट्रीय रॅलीचे खास आमंत्रण देण्यात आले आहे. उद्यापासून तीन दिवसांची ही रॅली होईल. खमेर रॅली रेड असे नामकरण करण्यात आले असून ही पहिलीच रॅली आहे.
 
कंबोडियाच्या ईशान्येकडील मोंदुलकिरी प्रांतात कम्पुचिया ऑटोस्पोर्ट रेसिंग एजन्सीने (केएआरए-कारा) रॅलीचे आयोजन केले आहे. त्यात आसियान प्रांतातील सुमारे 50 ड्रायव्हर सहभागी होतील. संजय हा आशियाई क्रॉस कंट्री विजेता असल्यामुळे त्याला आमंत्रित करण्यात आले.
 
काराचे महासंचालक पिओयू टेचलेंग यांनी सांगितले की, कंबोडियात रेसिंगला चालना देण्याचा आमचा उद्देश आहे. याशिवा मोंदुलकिरी प्रांत नैसर्गिक वैविध्याने नटला आहे. त्यामुळे रॅलीच्या माध्यमातून पर्यटनाला सुद्धा चालना मिळेल.
 
मोंदुलकिरी हा प्रांत कंबोडियातील सर्वांत मोठा असून येथे सर्वाधिक लोकसंख्या आहे. येथे वनराजी मोठ्या प्रमाणावर आहे. याशिवाय मोठे धबधबे सुद्धा आहेत.
 
काराचे उपाध्यक्ष हो सेथ्यूकुन यांनी सांगितले की, या रॅलीमुळे कंबोडियाच्या स्पर्धकांना आपल्या क्षमता, तंत्र आणि दर्जाचा अंदाज येईल.
 
रॅलीच्या तांत्रिक समितीचे सदस्य डॅवन वुथ्था यांनी सांगितले की, हे रॅलीचे पहिले वर्ष असल्यामुळे केवळ दोन स्पेशल स्टेज ठेवल्या आहेत. एकूण अंतर 90 ते 100 किलोमीटरच्या घरात आहे. कंबोडियात पूर्वी ट्युलिप तसेच रॅली मीटरचा अवलंब करून कधीही रॅली झालेली नाही.
 
रॅलीपूर्वी रॅली
 
संजयला रॅलीसाठी जाणण्यापूर्वी रॅली करावी लागली. त्याने डेलो स्पोर्ट या थायलंडमधील संघाकडून कार घेतली आहे. त्यामुळे तो पुण्याहून मुंबई मार्गे बँकॉकला दाखल झाला.  तेथून दीडशे किलोमीटर प्रवास करून तो संघासह रायोंगला दाखल झाला. रात्री मुक्काम केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तेथून थायलंड-कंबोडिया सीमा गाठण्यासाठी त्याला 200 किलोमीटर प्रवास करावा लागला. कंबोडियात प्रवेश केल्यानंतर अडीचशे किलोमीटर प्रवास करीत तो न्हॉम पेन्ह या राजधानीत दाखल झाला. तेथे त्याने मुक्काम केला. त्यानंतर सातशे किलोमीटर प्रवास करून तो पश्चिम कंबोडियामधील कोह हाँग येथे दाखल झाला. रात्री त्याने तेथे मुक्काम केला. त्यानंतर त्याने आठशे किलोमीटर प्रवास करून मोंदुलकिरी प्रांतात प्रवेश केला.
 
संजयच्या संघाचे मालक सी. द्रीविचावत हे सुद्धा रॅलीत सहभागी झाले आहेत. आधीच्या इसुझु फुकेट संघातील नॅव्हीगेटर मिनील थान्याफात हा नॅव्हीगेटर संजयने कायम ठेवला आहे. 
 
संजयने सांगितले की, यंदा मी मलेशियातील राष्ट्रीय मालिकेत दोन फेऱ्यांमध्ये भाग घेतला. कारच्या तांत्रिक बिघाडामुळे मला एका फेरीत निराश व्हावे लागले. रॅली पूर्ण करणे हे माझे पहिले ध्येय असते. काही वेळा कार तुम्हाला साथ देत नाही, तर काही वेळा तुमच्या चुकीमुळे तांत्रिक बिघाड होतो. आता मी नव्या संघाकडून कार मिळविली आहे. त्यामुळे इसुझु डीमॅक्स युटीलिटी कारमधून ही रॅली पूर्ण करण्यास माझे प्राधान्य राहील.

युद्धात जखमी झालेल्या वीर सैनिकांना मानाची वंदना -सीएसआर कार्यक्रम

0
पुणे-कल्याणीनगर येथील हयाटतर्फे नुकताच एक सीएसआर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम हयाट आणि पॅराप्लेजिक रिहॅबिलीटेशन सेंटर पुणे या दोन्ही संस्थातर्फे संयुक्तपणे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये युद्धात दिव्यंगत्व आलेल्या सैनिकांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमात सैनिकांच्या अदम्य इच्छाशक्तीचे आणि क्षमतांचे दर्शन घडले. पॅराप्लेजिक पुनर्वसन केंद्रातर्फे सैनिकांसाठी बास्केटबॉलचा खेळ आयोजित करण्यात आला होता. ज्या सैनिकांनी युद्धात आपली चालण्याची शक्ती देखील गमावली होती, त्यांनी या खेळात अमर्यादित उत्साह आणि क्षमता दाखवत तेथे उपस्थित अन्य नागरिकांना प्रेरित केले. आदरातिथ्य करण्यात अग्रगण्य असलेल्या हयाटने नेहमीच हयाटशी जोडलेल्या लोकांसाठी काम करण्याचा प्रयत्न केला आहे.
 या कार्यक्रमाविषयी माहिती देताना कल्याणीनगर येथील हयाटचे महाप्रबंधक सुमित कुमार यांनी सांगितले की,  “कुणाकडून तरी प्रेरणा घेणे हे नक्कीच चांगले असते, मात्र कुणालातरी प्रेरित करण्याची भावना शब्दात मांडता येणार नाही. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही देशासाठी झटणाऱ्या, आपल्या प्राणांचीही काळजी न करणाऱ्या सैनिकांना परतफेड करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या प्रयत्नांनंतर त्यांच्या चेहऱ्यावर येणारे स्मितहास्य आमच्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे.
या कार्यक्रमात सैनिकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य आणण्यासाठी तसेच आनंदासाठी हयाततर्फे केक मिक्सिंग कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना क्रिसमसमध्ये नक्कीच मिळेल, ज्यावेळी त्यांनी मेहनतीने तयार केलेल्या केकच्या बॅटरचा स्वादिष्ट केक त्यांना पुनर्वसन केंद्रात खायला मिळेल, अशी माहिती हयाटच्या समूहातर्फे देण्यात आली.  कार्यक्रमाच्या शेवटी सर्व सैनिकांनी स्वादिष्ट बिर्यानी आणि डेझर्टचा आस्वाद घेतला.

मला संपविण्यासाठी दुष्टांचे डावपेच -कट-कारस्थानाला बळी पडू नका -मला साथ द्या -डीएसके

0

पुणे- स्वतः डीएसके यांनी आपल्या शब्दात आपल्या ठेवीदारांना केलेले आवाहन …
ठेवीदारांनो, मी सर्वांचे पैसे परत देणार आहे
माननीय कोर्टाच्या आदेशाने लवकरच मी सर्वांचे पैसे परत देण्यास सुरूवात करणार आहे. यामध्ये ज्यांनी माझ्या विरूध्द तक्रार केली व ज्यांनी तक्रार केली नाहीअशा सर्वच ठेवीदारांचे पैसे मी देणार आहे. परंतु तरीही काही दुष्ट माणसं, ठेवीदारांना भीती घालत आहेत. “पोलीसात तक्रार करणार्‍यांचेच पैसे मिळणार आहेत” असे सांगून ठेवीदारांना भयभीत करून, पोलीसात तक्रार करण्यास भाग पाडत आहेत. परंतु यात काही तथ्य नाही. यासाठीच या निवेदनाद्वारे मी सर्व ठेवीदारांना आवाहन करतो की तुम्ही कृपया घाबरून जाऊ नका. तुमचे सर्वांचे पैसे मा. कोर्टाच्या आदेशाप्रमाणे परत देण्यास लवकरच सुरूवात होईल. या दुष्ट लोकांचे उद्दिष्ट एकच आहे, ते म्हणजे डीएसके संपविणे. यासाठीच कधी ठेवीदार तर कधी फ्लॅटधारक तर कधी अन्य कोणी, यांना चिथावून ते मला अधिक अडचणीत आणत आहेत. तुमचे पैसे देण्यासाठी प्रॉपर्ट्या विकायला गेलो तर तिथेही हे लोक काड्या करतात. मीडियाच्या मदतीनं माझ्याबद्दल इतकं मत गढूळ करून ठेवलंय की पैसे देण्यासाठी पुढे आलेला फायनान्सरही घाबरून मागे सरतो. मग पैसे येणार तरी कसे? तरीही मित्रांनो, आजपर्यंतच्या प्रकरणांना मी खंबीरपणे तोंड देत आहे. पण निदान यापुढे तरी तुम्ही या दुष्टांच्या डावपेचांना बळी पडू नका. तुम्हीच सांगा, सारखं कोर्टकचेर्‍या, रोज नवीन अफवा, पोलीस चौकश्या या सगळ्यात मी गुंतून राहिलो तर पुढे काम करणार तरी कसं? परिस्थिती सुधारणार तरी कशी? आत्तापर्यंत या सर्व दुष्टांशी लढत, धडपडत मी लवकरच डीएसके समूह पूर्वपदावर आणत आहे. हे या दुष्टांच्या लक्षात आल्यामुळेच ते आता ही कुटील खेळी खेळत आहेत. परंतु आपण या कट-कारस्थानाला बळी पडलात तर या दुष्टांचा विजय होईल. तेव्हा माझं तुम्हा सर्वांना हात जोडून एकच सांगणं आहे की, यापुढे कृपया मला कोर्टकचेर्‍यांमध्ये गुंतवून ठेवू नका. कोणाही दुष्टाच्या बहकाव्यात येऊ नका. या लोकांना तुम्हां ठेवीदारांचे काय होईल याची किंचितही पर्वा नाही. त्यांना फक्त तुमचा वापर करून, मला आयुष्यातून उठवायचंय. पण हा डाव तुम्ही उधळून लावा. तुमच्यातलेच 3000 हजार ठेवीदार माझ्या पाठीशी उभे राहिलेत. “डीएसके, आम्हांला चालतील 12 हप्त्यात पैसे. पण तुम्ही यातून सुखरूप बाहेर पडा” असं म्हणत या लोकांनी अॉफिसला येऊन फॉर्मवर सह्या देखील केल्या आहेत. असा पाठिंबा देणार्‍या ठेवीदारांची संख्या रोज वाढत आहे. हे पाहून या दुष्ट लोकांचा पोटशूळ आणखीनच वाढला आहे. तेव्हा मी तुम्हांलाही हेच सांगेन की माझ्यावर असलेला विश्वास तुम्हीही कायम ठेवा. या लढाईत माझ्या विरूध्द नाही तर बाजूने उभे राहा हेच कळकळीचे सांगणे !
डीएसके

अभिषेक आसोरे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेत अव्वल -सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात आयोजित स्पर्धेचा सविस्तर निकाल पहा इथे …

0
पुणे : कॉंग्रेस अध्यक्षा  सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात महाराष्ट्र विद्यार्थी सहाय्यक मंडळ संचलित द.मि.कै.सि.धों.आबनावे कला महाविद्यालयातर्फे आयोजित भव्य चित्रकला स्पर्धेत अभिषेक आसोरे याने सर्व गटातून सर्वोकृष्ट पारितोषिक पटकाविले आहे. राज्यातील २७३ कला महाविद्यालये आणि पुण्यातील १६७ शाळांतील सुमारे १ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध विषयांवरील कल्पक चित्रे रेखाटली होती.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार, दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता घोले रस्त्यावरील राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे होणार आहे. यावेळी माजी आमदार मोहन जोशी, उल्हास पवार, माजी उपमहापौर आबा बागुल आदी उपस्थित राहणार आहेत. तब्बल ६० हजार रुपयांची रोख पारितोषिके विज्येत्यांना देण्यात येणार असून सामान्य मुलांसोबत दिव्यांग मुले आणि पालकांनीही मोठया संख्येने स्पर्धेत सहभाग घेतला होता.
* निकाल : 
ज्युनियर.के.जी. – १) झैंद नाईकवाडे, २) ऋचा यादव, ३) आभा मायनल, उत्तेजनार्थ : प्रणाली सुरवसे, आलीया शेख. 
सिनीयर के.जी. – १) अनुष्का तंगवडे, २) सिध्दी झगडे, ३) युविका ओसवाल, उत्तेजनार्थ : स्नेहा अगवणे, अर्चित काकडे. 
इयता १ली ते २री – १) कविता दिनेश सविता, २) किमय लोढा, ३) श्रेयस जाधव, उत्तेजनार्थ : आयुष मिश्रा, आलीया शेख. 
इयत्ता ३री ते ४थी – १) आरोही भाटे, २) गौरव म्हस्के, ३) तनिष्का भोसले, उत्तेजनार्थ : आर्यन खंडागळे, ऋतुजा तारु.  
इयत्ता ५वी ते ७वी – १) रुचिता ढवळे, २) कुँवर मीन, ३) चिन्मयी कुरवडे, उत्तेजनार्थ : अमृता गायकवाड.  
इयत्ता ८वी ते १०वी – १) पूर्वा गवळी, २) सुरक्षा शेट्टी, ३) रश्मी गोरे, उत्तेजनार्थ : कोमल कचरे, पायल गोलांडे. 
इयत्ता ११वी ते १२ वी – १) नितीन थोरात, २) तेजस्वी भोजी, ३) यश मुदीगोंडा, उत्तेजनार्थ : सृष्टी चिद्दारवार, पल्लवी सावंतफुले. विशेष गट – १) समीर कद्रे, २) तनिष्का जोशी, ३) श्वेता डाळवाले, उत्तेजनार्थ : श्रेया ओक. 
पालक गट – १) मिलींद नागपुरे, २) वृंदा तंगडपल्लीवार, ३) सावित्री पी, उत्तेजनार्थ : गिरीश चिद्दारवार, जयश्री थत्ते.
मूलभूत अभ्यासक्रम (फौंडेशन) – १) आयुषी चोपडा, २) शिल्पेक्ष दालोरकर, ३) वेदांत जोशी, उत्तेजनार्थ : अरुण खुळे
कला महाविद्यालय – १) अभिषेक आसोरे, २) केदार रोकडे, ३) अभिषेक उपासने, उत्तेजनार्थ : प्रतिक बनकर, अभिजय म्हस्के. 

आंतर महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धेत एम सी ई सोसायटीचे रात्र महाविद्यालय विजयी

0

पुणे :

पुणे शहर विभागातर्फे वरिष्ठ गट आंतर महाविद्यालयीन सॉफ्टबॉल स्पर्धेत एम सी ई सोसायटीच्या रात्र महाविद्यालयाने मुलांच्या गटात विजेतेपद मिळवले .

बी एम सी सी महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेमध्ये एम सी इ रात्र महाविद्यालयाने अंतिम सामन्यात मॉडर्न महाविद्यालय चा ७-५ होम रनने पराभव केला . विजयी संघाकडून जैद पटेल याने २,कर्णधार शुभम काटकर ,जैद अन्सारी ,आदिल अन्सारी ,ओसामा अन्सारी ,अब्दुल अहद यांनी प्रत्येकी १ होमरन केल्या . मॉडर्न संघाकडून अक्षय साठे ,मयूर गोखले ,आकाश कसबे ,ऋषिकेश देसाई ,ओंकार हुंडारे यांनी प्रत्येकी १ होमरन केल्या .

एम सी ई सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार ,उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,सचिव लतीफ मगदूम ,आझम स्पोर्ट्स अकादमीचे गुलझार शेख यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले .

इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या पुनर्वापराला प्रोत्साहन आवश्यक :अमृता फडणवीस

0
पुणे :
कॉम्प्युटर्स अँड मीडिया डीलर्स असोसिएशन ‘ने आयोजित ‘ आय . टी . एक्स्पो २०१७ ‘ मध्ये भेट देणाऱ्या नागरिकांसाठी ‘ इलेक्ट्रॉनिक वेस्ट ‘ ची माहिती देण्यासाठी माहिती  आणि संकलन केंद्र सुरु केल्याची माहिती ‘आनंद कॉम्प्युटर्स सिस्टिम्स ‘चे संचालक संजय भंडारी यांनी दिली . कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सुरु असलेल्या एक्स्पोच्या प्रवेशद्वारावरच हे संकलन केंद्र उभारण्यात  आले आहे .

एक्स्पो च्या उदघाटनानंतर अमृता  फडणवीस यांनी इ वेस्ट कलेक्शन सेंटर ला भेट दिली .’संगणक आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील  वस्तूंच्या पुनर्वापराला प्रोत्साहन दिल्यास  पर्यावरणाचे अनेक प्रश्न कमी होण्यास मदत होईल ,असे उद्गार त्यांनी यावेळी काढले .

महाराष्ट्र प्रदूषण नियामक मंडळाची मान्यताप्राप्त  ‘इ -वेस्ट ‘ एजेन्सी असलेल्या ‘आनंद कॉम्प्युटर्स सिस्टिम्स ‘ च्या या माहिती आणि संकलन केंद्रात इलेक्ट्रॉनिक कचरा ,पुनर्वापर याबद्दल माहिती दिली जात आहे . तसेच नागरिकांनी आणलेले  ‘इ -वेस्ट ‘ स्वीकारले जात आहे .
नागरिकांना,आस्थापना आणि माहिती -तंत्रज्ञान कंपन्यांना  इ -वेस्ट बद्दल असलेल्या शंकांचे समाधान करण्यासाठी ,संकलनासाठी हेल्पलाईन देखील सुरु करण्यात आली असून 9371015373
​ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
‘भारतात दरवर्षी ५० मेट्रिक टन इ -वेस्ट तयार होत असून पर्यावरण जपण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साहित्यातून पुनर्वापर करणे हा एक प्रभावी उपाय आहे ‘असे यावेळी सांगण्यात आले .
पुणे आय टी एक्स्पो २०१७ ‘ हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून 7 ते ११ डिसेंबर पर्यंत  सकाळी १० ते रात्री ८  यावेळेत इ -वेस्ट माहिती आणि संकलन केंद्राला नागरिकांना भेट देता येईल

लक्ष्मी रस्त्यावरील २७२ पथारीवाल्यांना मिळणार लक्ष्मी रस्त्यावरच अधिकृत जागा ..(व्हिडीओ)

0

पुणे- कोतवाल चावडी पाडली ,मिनर्व्हा सिनेमागृह पाडण्यात आले,शिवाजी रस्त्याचे रुंदीकरण झाले पण एकेकाळी लक्ष्मी रस्त्याचे रुंदीकरण स्थगित झाले , एकेकाळी लक्ष्मी रस्त्यावरील दुकानदारांच्या दुकानांमधील पोटमाळे दंड आकारून नियमित करण्यात आले . आता लक्ष्मी रस्त्यावरील पथारीवाल्यांना महापालिकेकडून अधिकृत जागा देण्याचा प्रयत्न होतो आहे . यानिर्णया मुळे कायम अनधिकृत म्हणून हिणविल्या गेलेल्या पथारीवाल्यांना अधिकृत पणे हक्काची जागा यापुढे व्यवसायासाठी मिळणार आहे .
शहरातील २७ हजार पथारीवाल्यांपैकी २१ हजार पथारीवाल्यांची अधिकृत नोंद महापालिकेने केली असून १९० ठिकाणी हॉकर्स झोन करून या ठिकाणी १० हजार पथारीवाल्यांचे पुनर्वसन करण्याचे काम महापालिकेने हाथी घेतले आहे . यापैकी शहराचा सर्वाधिक महत्वाचा आणि मध्यवस्तीतला रस्ता असलेल्या लक्ष्मी रस्त्यावर २७२ पथारीवाले अधिकृत ठरवून त्यांचे पुनर्वसन लक्ष्मी रस्त्यावरच करण्याचे प्रयत्न महापालिकेने सुरु केले आहे . मात्र यासाठी दुचाक्या लावण्यासाठी असलेली एक बाजू वापरण्यात येणार असल्याने सध्या असलेली लक्ष्मी रस्त्यावरील दुचाकी पार्किंग ची स्पेस मात्र  काही प्रमाणात कमी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे . यामुळे नागरिकांनी जवळच्या वाहनतळाचा उपयोग करावा अशी महापालिकेची सूचना असणार आहे .या संदर्भात महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी पहा आणि ऐका नेमके काय म्हटले आहे . ….

सरकारपर्यंत शहराचा आवाज पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम -‘रेडिओचे पुण्यातील सामाजिक प्रश्नांवर योगदान’ – चर्चासत्र

0
सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह
पुणे : गाणी, गप्पा, मनोरंजनासोबत सामाजिक प्रश्नांबाबत चर्चा करण्याचे काम रेडिओच्या माध्यमातून मोठया प्रमाणात होत आहे. तंत्रज्ञानाच्या युगात रेडिओ ऐकण्या-या तरुणाईचे प्रमाण वाढले असले, तरीही मनोरंजनासोबत श्रोत्यांचे मानसिक आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न रेडिओ करीत आहे. वाहतुकीच्या सद्यस्थितीबाबत माहिती देण्यासोबतच पाणी, खड्डे, कचरा यांसारख्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कामही रेडिओ करीत आहे. त्यामुळे वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी यांसोबतच आजच्या एकविसाव्या शतकात शहराचा आवाज सरकारपर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम म्हणून रेडिओचा उपयोग होत आहे, असा सूर रेडिओचे योगदान याविषयावरील चर्चासत्रामध्ये उमटला.
कॉंग्रेस अध्यक्षा आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित  सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहात स.प.महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉल येथे ‘रेडिओचे पुण्यातील सामाजिक प्रश्नांवर योगदान’ याविषयावरील चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. यावेळी सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, रेडिओ जॉकी शोनाली, अपूर्वा, टिया, संग्राम यांसह प्रशांत सुरसे, उमेश काची, स्वाती मोरे, चित्रा माळवे, सलिम शेख आदी उपस्थित होते.
चित्रपटांतील कलाकारांप्रमाणे रेडिओच्या माध्यमातून माध्यम प्रतिनिधी देखील विविध प्रश्नांविषयी जनजागृती करण्याचे काम करीत आहेत. श्रोत्यांना बोलते करण्याचा प्रयत्न होत असून तणावाखाली असणारे अनेक श्रोते देखील रेडिओच्या माध्यमातून काही मिनीटांमध्ये व्यक्त होतात. रेडिओ हे श्रोत्यांचे व्यक्त होण्याचे साधन असून याद्वारे श्रोते देखील उर्त्स्फूतपणे आपले मते मांडतात. केवळ शहरातील प्रश्न सोडविण्यापुरते रेडिओचे योगदान नसून तर त्यावर होणारी सकारात्मकतेची देवाणघेवाण महत्त्वाची आहे. कचरा, हेल्मेटसारख्या अनेक प्रश्नांच्याबाबत रेडिओचे प्रतिनिधी देखील अभियानात सहभागी झाल्याने श्रोत्यांनी मोठया संख्येने प्रतिसाद दिला असल्याचे अनुभव यावेळी माध्यमाच्या प्रतिनिधींनी सांगितले.
मोहन जोशी म्हणाले, गेल्या ३० ते ४० वर्षांमध्ये प्रसारमाध्यमांमध्ये मोठया प्रमाणात परिवर्तन झाले आहे. पूर्वी प्रसारमाध्यमे तंत्रज्ञानाने परिपूर्ण नव्हती. तेव्हा केवळ रेडिओच्या माध्यमातून बातम्यांपासून इतर गोष्टी लोक ऐकायचे. आता देखील रेडिओचा उपयोग लोकांच्या भावनांना हात घालून सामाजिक प्रश्न सोडविण्याकरीता पुढाकार घेण्यामध्ये होत आहे, असेही त्यांनी सांगितले. पूजा डोळस यांनी निवेदन केले.

काल ६२० कर्मचाऱ्यांच्या बदल्या तर आज पीएमपीएमएलच्या 2 बस पेटल्या ..

0

पुणे- आज दिवसभरात पीएमपीएमएलच्या दोन  बस आगीच्या भक्षस्थानी पडल्या . तर दुसरीकडे  व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी  विविध आगारातील तब्बल ६२० कर्मचा-यांच्या बदल्या करत कर्मचाऱ्यांवरील कारवाईचा बडगा सुरूच ठेवल्याचे वृत्त आहे . मात्र या बदल्या काल सायंकाळी करण्यात आल्या . या बदल्यांचा आणि 2 बसेसला लागलेल्या या आगीचा मात्र काहीही संबंध  नाही…   ..दरम्यान, पीएमपीएमपीएल बसला आग लागण्याच्या घटनात वाढ झाली असून मागील दहा दिवसातील ही चौथी घटना आहे. यापूर्वी दिवेघाटात आणि सिंहगडरोड येथे पीएमपीएमएल बसला आग लागली होती.
आरटीओ चौकात आज सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास प्रवाशांना घेऊन निघालेल्या बसने अचानक पेट घेतला. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच सर्व प्रवाशांना सतर्क केल्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान एकाच दिवसात दोन पीएमपीएमएल बसला आग लागल्या.

अग्निशामक दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे स्टेशनवरून आकुर्डीच्या दिशेने 21 प्रवाशांना निघालेली ही बस आरटीओ चौकात येताच बसच्या समोरील भागातून धूर येत असल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना खाली उतरवले आणि काही क्षणातच आगीने रौद्ररुप धारण केले. घटनेची माहिती अग्निशामक दलाला कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु तोपर्यंत बसचा काही भाग आगीत जळून नष्ट झाला होता.आज दुपारी पावणेदोनच्या सुमारास चिंचवडगांवातील बसस्थानकाबाहेर उभ्या असलेल्या बसने पेट घेतला होता. ही आग एवढी मोठी होती की धुराचे लोटच्या लोट बाहेर येत होते. त्यामुळे परिसरात काहीकाळ घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. संत तुकारामनगर येथील अग्निशामन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. परंतु यामध्ये पीएमपीएमएल बस जळून खाक झाली आहे. सुदैवाने बसमध्ये प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला.

इंटर एनजीओ स्पोर्टस् मिटचे पुण्यात आयोजन

0

पुणे: पुण्यात कार्यरत असलेली आणि ना नफा तत्वावर काम करणाऱ्या सेक्यूर गिव्हिंग या संस्थेच्या वतीने येत्या शनिवार, दि. ९ डिसेंबर २०१७ रोजी इंटर एनजीओ स्पोर्टस् मिटचे  आयोजन करण्यात आले आहे. कन्सर्न इंडिया फाउंडेशन संस्थेचा हा उपक्रम असुन या क्रीडा दिनी वंचित मुलांच्या विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. पुण्यातील विविध 14 एनजीओ संस्थांमधील 8 ते 14 वर्षे वयोगटात सुमारे 400 मुले व मुली या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. हा क्रीडा महोत्सव सणस मैदानावर पार पडणार असून या उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे.

पुण्यातील वंचित मुलांना व्यासपीठ मिळावे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे.  सहभागी स्पर्धकांना क्रीडा साहित्य(टीशर्ट, मोजे, शूज, टोपी इत्यादी), पदक, भेटवस्तू देण्यात येणार आहेत.  या स्पर्धेत १००मीटर, ४००मीटर शर्यत, लांबउडी, गोळाफेक, रिले या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.

 आंतर एनजीओ क्रीडा दिनासाठी क्रेडिट सुस यांचा पाठिंबा लाभला असून क्रीडा साहित्यासाठी आयओसीएलचे सहकार्य लाभले आहे. सर्व स्पर्धक व  स्वयंसेवक यांना सिजन्स हॉटेल तर्फे जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, पंचशीलतर्फे नाश्ता, स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे प्रथमोपचार आणि कोहलर तर्फे करंडक, पदक व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्टेट बँक ऑफ इंडिया पुणे विभागाचे एजीएम अजय जोशी, आयओसीएल पुणे विभागाचे सिद्धार्थ स्वरूप यांच्या हस्ते दि. ९ डिसेंबर रोजी होणार आहे.  

मालाज रवाईन रन माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत ज्ञानेश्वर मोर्घा, प्राजक्ता गोडबोले, अॅमानुएल आब्दू, शितल भगत यांना विजेतेपद

0

पुणे: रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित व मालाज पुरस्कृत पाचगणी येथे पार पडलेल्या दुसऱ्या मालाज रवाईन न माउंटन मॅरेथॉन स्पर्धेत 21कि.मी. पुरुष व महिला गटात ज्ञानेश्वर मोर्घा, प्राजक्ता गोडबोले यांनी, तर 10कि.मी. पुरुष व महिला गटात अॅमानुएल आब्दू, शितल भगत यांनी आपापल्या गटात अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले. 

रवाईन हॉटेल यांच्या तर्फे आयोजित रवाईन रन माउंटन मॅरेथॉन हि स्पर्धा 21किलोमीटर, 10किलोमीटर प्रकारात पार पडली. स्पर्धेत एकूण 1200धावपटूंनी आपला सहभाग नोंदविला होता. स्पर्धेला पाचगणी येथील संजीवन हायस्कुल येथून प्रारंभ झाला आणि  संपूर्ण शहरातून तसेच ऐतिहासिक सेंट पिटर्स स्कुल येथून आणि ऐतिहासिक अशा भव्य वृक्ष राजीतून आणि पाचगणी व महाबळेश्वरच्या निसर्गरम्य अशा पर्वतरांगामधून, तसेच राजपुरी केव्स मार्गे पुन्हा फिरून संजीवन मैदान असा मार्ग स्पर्धकांना पूर्ण करावयाचा होता. 

हाफ मॅरेथॉन(21कि.मी.)खुल्या पुरुष गटात ज्ञानेश्वर मोर्घाने 01:14:29सेकंद वेळ नोंदवत पहिला क्रमांक पटकावला. तर, प्रल्हाद सिंग व केनियाच्या मायकेल बीव्होत तिसरा क्रमांक पटकावला. याच महिला खुला गटात प्राजक्ता गोडबोले हिने 01:29:41सेकंद वेळ नोंदवून प्रथम क्रमांक पटकावला.  10कि.मी. खुल्या पुरुष गटात  केनियाच्या अॅमानुएल आब्दू याने 00:34:56सेकंद वेळ नोंदवत अव्वल क्रमांक पटकावला. तर, महिला गटात शितल भगतने 00:44:53सेकंद वेळ नोंदवत विजेतेपद मिळवले. 

स्पर्धेत एकूण 7लाख रुपयांची पारितोषिक रक्कम देण्यात आली. स्पर्धेचा फ्लॅग ऑफ अमिन हाजी(पाचगणी स्वच्छ सर्वेक्षण २०१८चे ब्रँड अँबॅसिडर) व आयएएस खैलाश शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.  

स्पर्धेचा सविस्तर निकाल: (प्रथम, व्दितीय व तृतीय या क्रमानुसार):

हाफ मॅरेथॉन 21कि.मी. पुरुष खुला गट: 1. ज्ञानेश्वर मोर्घा(01:14:29से), 2.प्रल्हाद सिंग(01:16:49से), 3.मायकेल बीव्होत(01:17:22से); 

हाफ मॅरेथॉन 21कि.मी. महिला खुला गट: 1. प्राजक्ता गोडबोले(01:29:41से), 2.जनाबाई हिरवे(01:29:42से),  3.नयन(01:49:48से);  

10कि.मी. पुरुष खुला गट: 1.अॅमानुएल आब्दू(00:34:56से), 2.आदिनाथ भोसले(00:35:44से), 3.सुशांत जेदे(00:38:05से); 

 10कि.मी.महिला खुला गट: 1.शितल भगत(00:44:53से), 2.आकांक्षा शेलार(00:46:53से), 3.कविता भोईर(00:47:57से).