रेनॉ एमटीव्ही रोडीज एक्स्ट्रीम च्या सर्वाधिक एक्स्ट्रीम अशा पर्वासाठी पुण्यातील ऑडिशन्सची सुरूवात
नॉ एमटीव्ही रोडीज एक्स्ट्रीम च्या सर्वाधिक एक्स्ट्रीम अशा पर्वासाठी पुण्यातील ऑडिशन्सची सुरूवात
ओरिजिनल रोडी असलेल्या रणविजय सिंघा बरोबर नेहा धुपिया, प्रिंन्स नरूला, निखिल चिन्नप्पा हे चार गॅंग लीडर्स कडून रोडीज ऑडिशन्सची सुरूवात-
पुणे – एमटीव्ही या तरूणाईच्या आयकॉनिक ब्रॅन्ड तर्फे आता देशांतील सर्वांत अधिक कालावधीपासून सुरू असलेल्या शो ची म्हणजेच रोडीजच्या सर्वांत एक्स्ट्रीम अशा पंधराव्या पर्वाची रोडीज एक्स्ट्रीम ची आज घोषणा केली. साहस आणि आश्चर्याने युक्त अशा या कार्यक्रमात पहिला रोडी असलेला रणविजय सिंघा यावेळी एक अनपेक्षित अशी गोष्ट करणार आहे. रोडीज ची मॅडनेस सुरू ठेवत अॅडव्हेंचर गर्ल बॉस नेहा धुपियाही असेलच, त्याचबरोबर टेलिव्हिजन हार्टथ्रॉब प्रिन्स नरूला व रोडीज जज निखिल चिन्नप्पाही असणार आहे. हे सर्व गॅंग लीडर्स आणि रणविजय सिंघा हे पुणे शहरांत आयोजित करण्यात आलेल्या ऑडिशन्स साठी सहभागी झाले होते व यावेळी पुण्यातील अतिशय आकर्षक आणि साहसी असे रोडीज सहभागी झाले होते.
रोडीज साठी पुन्हा एकदा देशभरांतील अतिशय स्पर्धात्मक असे स्पर्धक पुणे शहरांतून मिळाले आणि हा शोध अधिक चांगल्या प्रकारे पार पडावा यासाठी या एक्स्ट्रीम सिझन च्या या गॅंग लीडर्स नी पुणे शहरापर्यंतचा प्रवास केला. नेहमीप्रमाणेच पुण्यातूनही अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आणि या ऑडिशनला मोठ्या प्रमाणावर स्पर्धकांनी हजेरी लावली होती. पूर्वेकडील ऑक्सफर्ड म्हणून प्रसिध्द असलेले पुणे हे शहर आपल्या बुध्दीसाठी प्रसिध्द असून यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी आपले धैर्य आजमावले.
भारतातील या सर्वाधिक एक्स्ट्रीम अशा रिअॅलिटी शो विषयी माहिती देतांना व्हायकॉम १८ च्या युथ, म्युझिक आणि इंग्लिश एन्टरटेन्मेंट चे प्रमुख फरझाद पालिया यांनी सांगितले ” हे पंधरावे पर्व असूनही अगदी कालच सुरू झालेला असा हा शो वाटत आहे. फॅन्स मधील उत्साहामुळे प्रसिध्द झाल्याने आमच्या सर्व पर्वांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. या वर्षी सुध्दा हा शो सर्वच प्रकारे एक्स्ट्रीम असणार आहे यांतून रोडीजचे फॅन्स हीच अपेक्षा करू शकतील की काहीतरी अनपेक्षित असेल. या पर्वाची सुरूवात पुण्यातून करतांना आंम्हाला खूप आनंद होत आहे, आणि आंम्हाला खात्री आहे की पुणे शहर सुध्दा रोडीजचे स्पिरिट जगेल. त्याचबरोबर आंम्हाला आशा आहे की या वर्षी सुध्दा आंम्हाला पुणे शहरातून चांगले स्पर्धक मिळू शकतील.”
या नवीन पर्वा विषयी माहिती देतांना ओरिजिनल रोडी रणविजय सिंग म्हणतो ” नावाप्रमाणेच या वेळीही रोडीज ना खूप काही एक्स्ट्रीम मिळणार आहेआणि प्रेक्षकांना नक्कीच काही आश्चर्ये पहायला मिळणार आहेत. माझे काम केवळ गॅंग लीडरचेच नसेल तर त्याचबरोबर प्रत्येक क्षणाला बदल करण्यावर भर असेल. या शो शी मी गेली १५ वर्ष निगडीत आहे आणि मला रोडीतून काय साध्य करायचे आहे ते माहित आहे. ऑडिशन्स पासून ते संपूर्ण प्रवासापर्यंत मी हे सुनिश्चित करेन की स्पर्धक आणि गॅंग लीडर्स दोघांनाही आव्हानांचा मुकाबला करावा लागेल व ते अधिक सक्षम होऊ शकतील.”
या शो मध्ये तिसऱ्यांदा प्रवेश करणारी नेहा धुपिया या शो विषयी म्हणते ”रोडीज हा एक आकर्षक असा शो असून देशातील तरूणाईच्या जीवनाचा एक भाग बनला आहे. वैयक्तिक दृष्ट्या मला या शोची संकल्पना आवडली आणि स्पर्धकांचा उत्साह पाहता रोडी बनण्याचे त्यांचे स्वप्न व ते पूर्ण करण्यासाठी काहीही करण्याचा उत्साह आवडला. त्यांचा उत्साह खूपच चांगला आहे. दरवर्षी रोडीजच्या माध्यमातून मिळणारा प्रतिसाद पाहता आंम्हाला अशी आशा आहे की याया वर्षीचा प्रवास सुध्दा आव्हानात्मक असेल. कष्टांबरोबरच मी माझे लिमिट्स ताणण्यावर भर देणार अरून या सिझनच्या एक्स्ट्रीम नावानुसार काम करण्यावर जोर देणार आहे. ”
रोडीज मधूनच पुढे आलेला प्रिन्स नरूला म्हणतो ” रोडीज माझे सर्वस्व आहे. माझ्यासाठी ही एक चांगली सुरूवात होती आणि हे सर्व रोडीज मुळेच शक्य झाले. ज्यावेळी पहिल्यांदा मला गॅंग लीडर व्हावे म्हणून संपर्क साधण्यात आला त्यावेळ हे सर्व पूर्ण झाले असे मला वाटले. माझे मुख्य लक्ष्य हा शो जिंकणे असेल आणि यावेळी मी अधिक चांगल योजना बनवू शकेन आणि अधिक शक्तीनिशी प्रवेश करू शकेन. माझी गॅंग यावर्षी रोडीज एक्स्ट्रीम जिंकेल यासाठी मी प्रयत्न करेन.”
या नवीन सिझन विषयी आपले मत मांडतांना एमटीव्ही व्हीजे निखिल चिन्नप्पा म्हणतो ” रोडीजचा एक गॅंग लीडर नेहमीच शांत, विचार करणारा आणि प्रोत्साहन देणारा असावा लागतो. नवीन पर्वा विषयी मी खूपच उत्सुक असून मी माझे गॅंग मेंबर्स निवडणार तर आहेच पण त्याचबरोबर शो जिंकण्यासाठी मी त्यांना प्रोत्साहनही देणार आहे. गेल्या सिझन मध्ये आम्ही विजयाच्या खूपच जवळ आलो होतो आणि आता आंम्ही हे सुनिश्चित करणार आहोत की आमचा हा उत्साह टिकून राहील. हा सिझन खूपच एक्स्ट्रीम असूनही मी या साठी नक्कीच तयार आहे.”
रोडीज एक्स्ट्रीम चा प्रसार करण्यासाठी विविध मंचांवरून ३६० अंशांतील प्रसार मोहिम सुरू करण्यात येत आहे. रोडीजच्या या पंधराव्या मोसमातून आपल्याला सर्वांत एक्स्ट्रीम असा हा मौसम मिळणार असून गॅंग लीडर्स ना त्यांच्या सदस्यांबरोबरच साहसाची परिक्षा द्यावी लागणार आहे.
आजपासून चर्चेच्या फेरीतून पुण्यातील ऑडिशन्स सुरू होत असून त्यानंतर गॅंग लीडर्स बरोबरच्या मुलाखतीं चे आयोजन करण्यात आले आहे. या ऑडिशन्स ला नेहमी प्रमाणेच उदंड प्रतिसाद आणि उत्साह आपल्याला दिसून येणार आहे.