पुणे: पुण्यात कार्यरत असलेली आणि ना नफा तत्वावर काम करणाऱ्या सेक्यूअर गिव्हिंग या संस्थेच्या वतीने येत्या शनिवार, दि. ९ डिसेंबर २०१७ रोजी इंटर एनजीओ स्पोर्टस् मिटचे आयोजन करण्यात आले आहे. कन्सर्न इंडिया फाउंडेशन संस्थेचा हा उपक्रम असुन या क्रीडा दिनी वंचित मुलांच्या विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात येणार आहेत. पुण्यातील विविध 14 एनजीओ संस्थांमधील 8 ते 14 वर्षे वयोगटात सुमारे 400 मुले व मुली या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. हा क्रीडा महोत्सव सणस मैदानावर पार पडणार असून या उपक्रमाचे हे आठवे वर्ष आहे.
पुण्यातील वंचित मुलांना व्यासपीठ मिळावे हा या उपक्रमाचा मूळ उद्देश आहे. सहभागी स्पर्धकांना क्रीडा साहित्य(टीशर्ट, मोजे, शूज, टोपी इत्यादी), पदक, भेटवस्तू देण्यात येणार आहेत. या स्पर्धेत १००मीटर, ४००मीटर शर्यत, लांबउडी, गोळाफेक, रिले या क्रीडा प्रकारांचा समावेश आहे.
आंतर एनजीओ क्रीडा दिनासाठी क्रेडिट सुस यांचा पाठिंबा लाभला असून क्रीडा साहित्यासाठी आयओसीएलचे सहकार्य लाभले आहे. सर्व स्पर्धक व स्वयंसेवक यांना सिजन्स हॉटेल तर्फे जेवण उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच, पंचशीलतर्फे नाश्ता, स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे प्रथमोपचार आणि कोहलर तर्फे करंडक, पदक व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहेत. स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्टेट बँक ऑफ इंडिया पुणे विभागाचे एजीएम अजय जोशी, आयओसीएल पुणे विभागाचे सिद्धार्थ स्वरूप यांच्या हस्ते दि. ९ डिसेंबर रोजी होणार आहे.
