वाद्य वादनातून लता मंगेशकर-आशा भोसले यांना ‘स्वरांजली’

Date:

गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे दि. ६ ते दि. ८ मे कालावधीत आयोजन

पुणे : गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे भारतरत्न स्व. लता मंगेशकर आणि पद्मविभूषण स्व. आशा भोसले यांना विविध वाद्यांवर गीते सादर करून स्वरांजली वाहिली जाणार आहे. १५ पेक्षा जास्त वाद्यांद्वारे २५ कलाकार वादनातून स्वरांजली अर्पण करणार आहेत. मराठी-हिंदी चित्रपट गीतांबरोबरच अभंग, ठुमरी, नाट्यसंगीत, गझल ऐकावयास मिळणार आहे. सुगम संगीत क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल रमाकांत परांजपे, शामकांत परांजपे, आणि विवेक परांजपे यांचा विशेष पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.

बुधवार, दि. ६ ते शुक्रवार, दि. ८ मे २०२६ या कालावधीत गांधर्व महाविद्यालय, पुणेच्या विष्णू विनायक स्वरमंदिरात सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळात ‘स्वरांजली’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून कार्यक्रमाचे उद्‌घाटन दि. ६ रोजी सायंकाळी ६ वाजता इन्कम टॅक्सच्या अतिरिक्त आयुक्त मुग्धा सरदेशपांडे यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती गांधर्व महाविद्यालय, पुणेचे प्राचार्य प्रमोद मराठे यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. गांधर्व महाविद्यालयातर्फे केवळ वाद्य वादनातून स्वरांजली अर्पण करण्यात येणारा हा पहिलाच कार्यक्रम असून सर्वांसाठी खुला आहे.

गांधर्व महाविद्यालयाचा ९४वा वर्धापन दिन, आद्य गांधर्व महाविद्यालयाचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सव तसेच पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या आज्ञेनुसार १९३२ मध्ये गांधर्व महाविद्यालय, पुणेची स्थापना आणि गांधर्व महाविद्यालय, स्वत:च्या वास्तूत सुरू होऊन झालेली २० वर्षे याचे निमित्त साधून वर्धापनदिन संगीत सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

‘स्वरांजली’ कार्यक्रमाची सुरुवात दि. ६ रोजी डॉ. प्रमोद गायकवाड यांच्या सनई वादनाने होणार आहे. त्यानंतर संजय भावे (सॅक्सोफोन), संजय गोगटे (ऑर्गन), सौरभ वर्तक (बासरी), सचिन जांभेकर (संवादिनी), अनिल गोडे (एकॉर्डियन), शंतनू गोखले (संतूर), अंजली सिंगडे-राव (व्हायोलिन), साक्षी शेवलीकर (मोहनवीणा), अनिल पेंडसे (मेंडोलिन), दि. ७ रोजी मिलिंद तुळणकर (जलतरंग), स्वप्ना दातार (व्हायोलिन), शामकांत सुतार (माउथ ऑर्गन), प्रभंजन पाठक (व्हायोलिन), विजय तुळसकर (सिंथेसायझर/संवादिनी), अमर ओक (बासरी), कल्याणी देशपांडे (सतार), दिप्ती कुलकर्णी (पियानिका), पंडित प्रमोद मराठे (संवादिनी) यांचे सादरीकरण होणार आहे. सचिन जांभेकर यांना या वेळी पंडित तुळशीदास बोरकर स्मृती संगतकार पुरस्कार मुग्धा सरदेशपांडे यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे.

दि. ८ रोजी रमाकांत परांजपे (व्हायोलिन), शामकांत परांजपे (विविध वाद्ये) आणि विवेक परांजपे (सिंथेसायझर) यांचे सादरीकरण आणि संवादात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यांच्याशी संगीतकार पराग माटेगावकर संवाद साधणार आहेत. गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे यावेळी रमाकांत परांजपे, शामकांत परांजपे, आणि विवेक परांजपे यांना पंडित विनायकराव पटवर्धन स्मृती संगीत जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्काराचे वितरण रामकृष्ण मठाचे मठाधीपती स्वामी श्रीकांतानंद यांच्या हस्ते होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

संवादभूषण” प्रकाशित

पुणे - निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ लिखित "संवादभूषण" पुस्तकाचे...

दिवसाच्या वीजवापरात ७० लाख ग्राहकांना २२३५ कोटी रुपयांचा लाभ

मुंबई, दि. ०३ मे २०२६: राज्यातील वीज ग्राहकांना सकाळी ९...

नसरापूर प्रकरणी बाल हक्क संरक्षण आयोगाची गंभीर दखल

आरोपीला कठोर शिक्षा देण्यासाठी विशेष सरकारी वकिलाची शिफारस करण्यात...