Home Blog Page 3223

डोळ्यांत धग सळसळत्या तेजाची त्रिलोकी किर्ती शोभे शंभूराजाची

0

जगाच्या इतिहासात पराक्रमी योद्धा, राजकारणी, साहित्यिक, रसिक असं मिश्रण ज्या एकाच राजाच्या नशिबी आलं ते म्हणजे …छत्रपती श्री संभाजीराजे भोसले. संभाजीरांच्या पराक्रमाचे आणि बुद्धीचातुर्याचे अनेक दाखले   झी
मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजीमधून दर्शकांपर्यंत पोहोचविण्याचा यत्न झाला . स्वत: शिवरायांच्या आणि जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली
शंभूराजांची जडणघडण घडताना यातून पाहिलं. पण आता स्वराज्य रक्षणासाठी शिवबांचा हा छावा मोठ्या रुपात
आपल्यासमोर येण्यासाठी सज्ज आहे. तरुण
तडफदार शंभूराजे प्रेक्षकांसमोर येण्याचा अखेर मुहूर्त ठरला. येत्या रविवारी, १७ डिसेंबर संध्या. ७ वा, दोन तासांच्याविशेष भागात या मालिकेत तरुण संभाजीराजांच्या भूमिकेत डॉ. अमोल कोल्हे दिसणार आहे.
दोन तासांचा हा विशेष भाग मालिकेत नव्या घडामोडी घेऊन येत आहे. डॉ. अमोल कोल्हे यांच्या मालिकेतल्याएण्ट्रीसोबतच या विशेष भागात आगऱ्याहून सुटेकनंतरच्या घडामोडींचा आढावा घेतला जाणार आहे. ब्राह्मण मुलाच्या
वेशातील बालसंभाजी अखेर राजगडावर पोहोचतात. त्यानंतर दोन वर्षे त्यांना औरंगाबादला पाठविण्यात येतं.
राजगडावर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक होतो. सोयराबाईंच्या पोटी युवराज राजाराम महाराजांचाजन्म होतो. या सर्व शुभ घटनांना गालबोट लावून जातं जिजाऊंचं इहलोकी जाणं. रायगडावर सर्वाचं आगमन
झाल्यानंतर भूतकाळातील घटनांना उजळा मिळतो आणि यातून शंभूराजांचा भूतकाळ उलगडत जातो. त्यांची
नितिमत्ता, हळवेपणा, मातृ – पितृभक्ती आणि स्वराज्यभक्ती दिसून येते. अशातच संभाजीराजांचा फडशा पाडायचा
असा चंग बांधून कयुमखान चालून येतो. शूर आबांचे शूर छावे आता या आव्हानासाठी सज्ज आहेत. दोन तासांचा
विशेष भागात स्वराज्य बांधणीतल्या आणि शंभूराजांच्या जीवनप्रवासातल्या या आणि अशा अनेक महत्त्वाच्या
घडामोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत.
डॉ. अमोल कोल्हेने निर्मितीसोबत या भूमिकेचं आव्हानही पेललंय.
या विशेष भागात रायगडावर मोठ्या येसूबाईंचंही आगमन होतं. मोठ्या येसूबाईंची भूमिका प्राजक्ता गायकवाड
साकारत आहे. लहान येसू म्हणजे आभा बोडस आणि बालसंभाजी – दिवेश मेदगे यांनी आजवर या भूमिकांचं
शिवधनुष्य पेललं आणि त्यांच्या बाललीलांमध्ये आपणही हरवलो. पण आता त्यांना निरोप देण्याची वेळ आली. या
दोघांनीही या भूमिकेचं अक्षरशः सोनं केलं.
संभाजीराजांसारख्या हिऱ्याला पैलू पाडले जिजाऊंच्या संस्कारांनी. जिजाऊंचा करारी बाणा जपणारी, महाराष्ट्राची
माऊली साकारणाऱ्या प्रतीक्षा लोणकर यांनीही आजवरचा हा प्रवास कायम लक्षात राहिल असं सांगितलं.
येत्या रविवारी स्वराज्यरक्षक संभाजीचा हा दोन तासांचा विशेष भाग संध्या. ७ ते ९ या वेळेत दाखविण्यात येणार
आहे. शिवबाचा छावा स्वराज्यरक्षक संभाजी यांच्या शौर्यगाथेतलं आणखी एक महत्त्वाचं पान उलगडल जातंय

चंदनगर येथील युवती छेडछाड़ प्रकरणातील आरोपींवर कडक शासन करण्यात यावे

0
 राष्ट्रवादी युवती काॅंग्रेस ची मागणी 
पुणे :
गुरुवार दिनांक १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री चंदनगर परिसरात काही मद्यपान केलेल्या युवकांनी एका युवतीची छेड काढली व पुढे तिला मारहाण देखील केली. संबंधित दोन तरूणांना अटक झाली आहे. एक युवकाचा तपास चालू आहे तरी त्वरीत या तरुणाला अटक व्हावी व कडक शासन करण्यात यावे, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसच्या वतीने करण्यात आली.
युवती शहराध्यक्ष मनाली भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगावशेरी मतदारसंघ अध्यक्ष अश्विनी परेरा यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक (चंदननगर पोलीस स्टेशन) यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली.
यावेळी युवती पदाधिकारी गितांजली सारगे, पौर्णिमा आढाक, सायली हेंद्रे आदी उपस्थित होत्या.
पुणे शहरात अश्या स्वरुपांच्या घटना वाढत आहे. लहान मुले, महिला, युवती यांना असुरक्षितेच्या वातावरणात रहावे लागत आहे. पोलिस प्रशासनाचा धाक न राहिल्याने वारंवार अश्या घटना घडत आहेत. आपण आपल्या हद्दीत पेट्रोलिंगचे प्रमाण वाढवावे विशेष करून रात्रीच्या वेळी तसेच काॅलेज, महाविद्याल,कोचिंग क्लासेस, निर्मनुष्य भाग या ठिकाणी पेट्रोलिंगचे प्रमाण वाढवावे अशी विनंती देखील निवेदनाद्वारे करण्यात आली.

इंटर कॉर्पोरेट स्पर्धेचे आयोजन

0

पुणे: सेक्यूएर गिविंग या ना नफा तत्वावर चालविण्यात येणाऱ्या स्वयंसेवी संस्थे तर्फे शनिवार दि 16 डिसेंबर पासून आपल्या वार्षिक इंटर कॉर्पोरेट क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंढवा येथील हॉट फूट मैदानावर सकाळी 10 ते  5 या वेळेत या स्पर्धा पार पडणार आहे. कन्सर्न इंडिया फाऊंडेशन या संस्थेसाठी मदत निधी उभारण्याकरिता प्ले फॉर कॉज असे या स्पर्धेचे स्वरूप आहे हि संस्था शिक्षण आरोग्य आणि सामाजिक कार्य अशा विविध क्षेत्रामध्ये कार्य करीत असते.

तसेच, 5व्या इंटर कॉर्पोरेट फुटसाल स्पर्धेत 5-अ-साईड फुटबॉल स्पर्धेसह क्रिकेट स्पर्धा देखील भरविण्यात येणार आहे. कॉर्पोरेट संघामध्ये इंडस सॉफ्टवेअर, बीएनव्हाय मेलन, कॅडेन्स, डिलॉइट इंडिया, क्वीक हिल आणि सिस्को हे या संघांचा समावेश आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
7276099836/ 7770006252

संदीपभाऊ लांडगे युवामंच क्लबने पटकावला ‘पर्वती चषक’ करंडक २०१७

0
पुणे – शहर कॉंग्रेस कमिटीच्यावतीने अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या  पर्वती चषक फुल पीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संदीपभाऊ लांडगे युवामंच क्रिकेट क्लबने पटकावला.
 स्पर्धेचे  पारितोषिक वितरण पुणे शहर काँग्रेस कमितीचे अध्यक्ष रमेश बागवे , सुनील केसरी उपायुक्त पुणे मनपा  व नितिन खानीवाले माजी रणजी खेळाडू  महाराष्ट्र राज्य  यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी  संजय कुलकर्णी रोटरी क्लब, चंद्रशेखर पिंगले रोटरी क्लब,विनय जोशी, सतीश पवार ब्लॉक अध्यक्ष पर्वती, स्पर्धेचे संयोजक पुणे  शहर कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस अमित बागुल , पर्वती कॉंग्रेसचे प्रकाश आरणे , नंदकुमार बानगुडे ,विक्रांत खन्ना , सागर आरोळे,महेश ढवळे ,धनंजय कांबळे  ,अभिजीत निकलजे ,इम्तियाज़ ताम्बोलि,सागर बागुल ,अभिषेक बागुल ,तेजस बागुल, सुरेश कांबले ,राकेश नामेकर,विनय ढेरे सुयोग धाडवे,अशोक शिंदे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संदीपभाऊ लांडगे  क्रिकेट क्लबला ५५ हजार ५५५ रुपयांचे रोख बक्षीस आणि करंडक प्रदान करण्यात आले तर द्वितीय क्रमांकाचे ३३हजार ३३३ रुपयांचे रोख पारितोषिक  आणि करंडक राहुल माने प्रतिष्ठान  क्रिकेट क्लबने तसेच तृतीय क्रमांकाचे २२हजार २२२ रुपयांचे रोख बक्षीस व करंडक जय गणेश क्रिकेट क्लबने पटकावला.चतुर्थ क्रमांकचे ११ हजार १११ रुपयांचे रोख बक्षीस कृष्णराज इलेवन क्रिकेट क्लबने पटकावला. विजेत्या संघाचे आणि सहभागी संघाचे मा. उपमहापौर आबा बागुल यांनी अभिनंदन केले.
याप्रसंगी संयोजक अमित बागुल म्हणाले , आधुनिक युगात तरुण पिढी मोबाइल मधे जास्त गुंतली  आहे मैदानी खेळा कडे ओढ कमी झाली आहे त्यामुळे  त्यांना खेळाकडे आकर्षित करण्याचा आमचा या स्पर्धेद्वारे हा प्रयत्न आहे.

पुण्याचा सर्वात मोठा ग्रामीण महोत्सव- भीमथडी जत्रेचे १२ व्या वर्षात पदार्पण

0

पुणे -ग्रामीण संस्कृतीचा शहरांशी साधलेला एक संवाद सोहळा म्हणून भीमथडी जत्रा नावारूपास आली. महाराष्ट्राची संस्कृतीत ‘जत्रा’ म्हणजे आनंदाचा, उत्साहाचा, खरेदीचा, भेटीगाठीचा, सांस्कृतिक आदान-प्रदानतेचा एक सणच असतो. भीमथडी जत्रा गेल्या १२ वर्षापासून पुण्यात अॅग्रीकल्चरल डेवलपमेन्ट ट्रस्ट, बारामती या संस्थेच्या वतीने भरवली जाते. ही जत्रा २२ ते २५ डिसेंबर पर्यंत अॉग्रीकल्चरल ग्राऊंड, सिंचननगर, पुणे येथे होणार आहे.

अॅग्रीकल्चरल डेवपलपमेन्ट ट्रस्ट, बारमतीच्या सौ. सुनंदा पवार यांच्या उपस्थितीत आणि ६ अन्य मान्यवरच्यां हस्ते भीमथडी चे उद्घाटन होईल. यात पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक, पोलिस उपमुख्य अधिकारी ज्योती प्रिया सिंग, येरवडा जेलच्या प्रभारी स्वाती साठे, अनाथांसाठी काम करणा-या सामाजिक कार्यकर्ता माननीय सिंधुताई सपकाळ, अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रेमळ परोपकारी अश्या सुमाताई किर्लोस्कर, आदरणीय वेदांती राजे भोसले, वर्षा चोरडिया – अध्यक्ष, फिक्की फ्लो पुणे चाप्टर, ह्या सर्व महिलांच्या हस्ते २२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता भिमथडीचे उद्घाटण होईल.


महिला बचत गटांचे दर्जेदार उत्पादन, हस्तकला वस्तू , महाराष्ट्राचे अस्सल खाद्य पदार्थ आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन या सर्व गोष्टींचा एकाच छताखाली पुणेकरांना आनंद घेता येतो. म्हणून भीमथडी जत्रेला गेल्या अकरा वर्षात पुणेकरांनी प्रचंड प्रेम दिलं. ग्रामीण महिलांच्या मेहनतीला आणि ग्रामीँण कलाकरांच्या कलागुणांना दाद दिली. यातून महिला बचत गटांची आर्थिक उन्नती झाली. अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या झाल्या.

अॅग्रीकल्चरल डेवपलपमेन्ट ट्रस्ट, बारमतीच्या सौ. सुनंदा पवार यांच्या कल्पक आणि नाविन्यपूर्ण कृतीशील मार्गदर्शातून, मेहनतीतून ‘भीमथडी जत्रा’ हा अभिनव उपक्रम नावरूपाला आला. यंदा भीमथडी जत्रा आपल्या १२ व्या वर्षात पदार्पण करते आहे. या वर्षीच्या भीमथडी जत्रेला पुणेकर भरघोस प्रतिसाद देतील, असा विश्वास त्यांना आहे.

मागिल वर्षी देखील भीमथडीस प्रचंड मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद मिळाला, १ लाखांहूनही अधिक लोकांनी भीमथडीची विविधतेने नटलेली संस्कती अनुभवली. ह्या वर्षी देखील३०२ हून अधिक ग्रामिण संस्कृतीचे स्टॉल भीमथ़डी मध्ये पहावयास मिळतील.या वर्षीच्या भीमथडी जत्रेचं वेगळेपण/ आकर्षण म्हणजे भीमथडी जत्रा दरवर्षी वेगवेगळी थीम घेऊन प्रदर्शन भरवते. यंदाच्या जत्रेचं खास आकर्षण असणार आहे ते म्हणजे रात्रीचा ‘भिमथडी सिलेक्ट फॅशन शो ‘ आणि लहाण मुलांसाठी खास ख्रिसमस विशेष “पेटिंग झू “.

पल्लवी दत्ता यांच्या संकल्पनेतुन साकारलेली भिमथाडी सिलेक्ट थिम ह्यावर्षी पहावयास मिळेत ज्यात फॉशन चे अनोके 20 स्टॉलचा एक विशेष विभाग आहे. येथे भारतातील पारंपारिक हातमाग, हस्तकला आणि इतर हस्तशिल्प पुनरुज्जीवन व कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. सौ.पल्लवी दत्तांनी सध्याच्या काळात भारतातील फॅशनच्या असंख्य रूचकीय पैलूंना शोधले आहे .लॅक्मे फॅशन वीक समर / रिसॉर्ट 2017 मध्ये सस्टेनेबल फॅशन आणि इंडियन टेक्सटाइलसाठी फॅशन डॉक्युमेण्ट्रीयनच्या त्या सर्वेसर्वा होत्या.

सांगतिक कार्यक्रम / कॉन्सर्टस देखील ह्या वर्षी असतील .ज्यात रघू दिक्षित प्रोजेक्ट आणि रेसोनन्स आपली संगीत कला भीमथडी जत्रेत सादर करणार आहे. २३ डिसेंबर रोजी रात्री ७ वाजता रघू दिक्षित आणि २२ डिसेंबर रोजी रात्री ७.३० वाजता रेसोनन्स चे वैभव जोशी आणि अंजली मराठे आपली कला प्रस्तृत करतील . ह्या कॉन्सर्ट द्वारे महाराष्ट्रीय संस्कृती समझुन घेणे अानखी सोपे होईल. यंदाचा ह्या १२ व्या महोत्सवास देखील दरवर्षी प्रमाणेच पुणेकरांचा भरघोस प्रतिसाद मिळेत.

भाजपची मते 98 ऐवजी 66…../ महापौरांच्या अधिकाराला दिले आव्हान ; नगरसचिवांना घेरावो (व्हिडीओ)

0

पुणे

आज मुख्य सभेत घनकचरा उपविधी आणि प्रामुख्याने ३२० कोटीची सायकल योजना संमत करून घेताना सभा कामकाज नियमावली गुंडाळून बेकायदा कामकाज करण्यात आल्याचा आरोप सर्व विरोधी पक्षांनी केला . सभा संपताच विरोधी नगरसेवकांनी प्रभारी नगरसचिव शेवाळे यांना कार्यालयात घेरावो घालत भाजपच्या दबावाखाली काम केल्याचा त्यांच्यावर ठपका ठेवला .उपसूचना मंजूर करणे ,स्वीकारणे ,सभा तहकुबी स्वीकारणे ,फेटाळणे,त्यावर मतदान घेणे , प्रस्तावावर मतदान घेणे अशा विविध बाबींसाठी त्यांनी प्रभारी नगर सचिवांना फैलावर घेतले .एकीकडे अशा पद्धतीने बेकायदा कामाचा ठपका त्यांच्यावर ठेवत असताना सायकल प्रस्तावाच्या बाजूने झालेले मतदान  पाहता ते केवळ ६६ एवढेच झाल्याचे निष्पन्न झाले .भाजपने या प्रस्तावासाठी व्हीप काढला होता . ९८ नगरसेवक भाजपचे असताना ६६ च मते कशी मिळाली हा देखील राजकीय चर्चेचा विषय ठरला . दरम्यान एकूण १४४ नगरसेवक या सभेला हजर होते त्यापैकी ६६ जणांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले . विरोधात कोणीही केले नाही असे हि नगरसचिव यांनी स्पष्ट केले ..

पहा हा व्हिडीओ….

आळंदी देवाची येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन

0

पुणे: खाजगी क्षेत्रातील कंपन्यांना मनुष्यबळ त्वरीत मिळवुन देण्यासाठी तसेच उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रास्ता पेठ, पुणे  व श्री. केशवराज पतसंस्था मर्यादित, मरकळ, ता.खेड आणि ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, चाकण चौक, आळंदी देवाची, ता.खेड यांच्या  संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक-17 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 10-00 वाजता श्री. ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, चाकण चौक, आळंदी देवाची, ता.खेड येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

         या रोजगार मेळाव्यासाठी  पुणे शहरातील चाकण ,सणसवाडी, कोरेगाव भिमा एम.आय.डी.सी. औद्योगिक परिसरातील एकूण 35  उद्योजक  सहभागी  होणार असून  एकूण  1 हजार 715 रिक्तपदे  कळविली आहेत. पुणे जिल्हयातील उमेदवारांसाठी किमान  एस.एस.सी./ एस.एस.सी ./ आय.टी.आय./ तांत्रिक पदविकाधारक,  पदवीधारक तसेच उच्च्‍ पदवीधार उमेदवारांनी  दि.17 डिसेंबर 2017 रोजी प्रत्यक्ष मुलाखतीस उपस्थित रहावे. यामध्ये सहभाग घेऊ इच्छिणा-या  उमेदवारांनी ( www.mahaswayam.in)  या वेबसाईटवर  उद्योजकांची मागणी पाहून आपली संमती नोंदवावी, असे आवाहन सहायक संचालक    अ. उ. पवार, तसेच  केशवराज पतसंस्थेचे संस्थापक / अध्यक्ष  अनिलशेठ   लोखंडे  यांनी केले आहे.

सैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे ध्वज दिन निधी संकलन- जिल्हाधिकारी सौरभ राव

0

पुणे- आपले सैनिक सीमेवर खडा पहारा देत असल्यामुळे आपण सुखी जीवन जगत असतो, या सर्व सैनिकांविषयी  कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी म्हणजे ध्वज दिन निधी संकलन होय, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. गतवर्षी ध्वजदिन संकलनाची उद्दिष्टपूर्ती  केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले. तसेच यंदाही ध्वजदिन संकलनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

            कार्यक्रमास मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चरचे महासंचालक डॉ. अनंत सरदेशमुख, अपर जिल्हाधिकारी रमेश काळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी मेजर मिलिंद दे. तुंगार,जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, शिक्षणाधिकारी डॉ. गणपत मोरे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राव म्हणाले, माजी सैनिक, शहीद जवान अधिकारी यांचे कुटुंबिय यांच्या कल्याणाच्या योजना राबवण्यासाठी ध्वज दिन निधीचे संकलन केले जाते. लष्करी अधिकारी,  जवान आपल्या कुटुंबियांची पर्वा न करता देश आणि आपल्या सर्वांच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असतात. देशाच्या रक्षणाची भूमिका बजावत असताना सैनिक सण, समारंभ, कार्यक्रम यांचा काहीही विचार न करता ते देशाच्या सेवेत कार्यरत असतात. अशा लष्करी अधिकारी-जवानांची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. सैनिकांचे आपल्यावर ऋण आहे, या ऋणातून आपण मुक्त होऊ शकत नाही, त्यामुळे जबाबदारीच्या भावनेतून ध्वज निधी संकलन करण्याच्या सत्कार्याला मदत करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. जिल्हाधिकारी राव यांनी सर्व सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी माजी मेजर मिलिंद दे. तुंगार यांनी केले. ते म्हणाले, पुणे जिल्ह्याला गतवर्षी 2 कोटी 22 लाख रुपयांचे उद्दिष्ट होते, ते 2 कोटी 80 लाख इतके साध्य करण्यात आले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते ध्वजदिन निधीचे संकलन करण्यास सुरूवात करण्यात आली. दीपप्रज्वलनानंतर शहीदांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांचा सन्मानचिन्ह देऊन  सत्कार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी  माजी मेजर मिलिंद दे. तुंगार यांनी केला.

कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. विशेष कामगिरी करणा-या सैनिक, माजी सैनिकांच्या पाल्यांचाही गौरव करण्यात आला. यामध्ये राजीव रमेश सांगळे, शैलेश हनुमंत गरड, तुषार शिंदे, तेजश्री सुनिल काळे, शुभदा सतीश जगदाळे, सोनाली सर्जेराव भोसले, प्रणय रामदास तिरखुंडे, शिवम सुधाकर बुनगे, सायली जालिंदर खांदवे, विवेक विश्वास वागज, अंकित मोहन सारुक  आदींचा समावेश होता. सूत्रसंचालन प्रियंका कुटे यांनी केले.  कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, त्यांचे कुटुंबिय, माजी सैनिक संघटनांचे पदाधिकारी, सैनिकी मुला-मुलींच्या वस्तीगृहातील विद्यार्थी यांच्यासह डॉ. शशी कांबळे, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विलासराव सावंत, कृष्णा वाघमारे, दीपक मोरे आदी उपस्थित होते.

 

आयएनएस कलवरी हे मेक इन इंडियाचे उत्कृष्ट उदाहरण आयएनएस कलवरी पाणबुडीमुळे भारतीय नौदल अधिक सक्षम – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

0

मुंबई:   भारतीय नौदलाच्या सेवेत आजपासून दाखल झालेली आयएनएस कलवरी ही पाणबुडी मेक इन इंडियाचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे गौरवोद‌गार काढून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आयएनएस कलवरी पाणबुडीमुळे भारतीय नौदल अधिक सक्षम झाल्याचे सांगितले.

 प्रधानमंत्री यांनी आज आयएनएस कलवरीचे मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रार्पण केले. या कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर रावमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससंरक्षण मंत्री निर्मला सीतारामणसंरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरेनौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा आणि नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथ्राआदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले कीआजचा दिवस सव्वाशे कोटी भारतीयांसाठी गौरवाचा दिवस असून या ऐतिहासिक क्षणांसाठी सर्व देशबांधवांचे अभिनंदन करतो. आयएनएस कलवरी म्हणजे मेक इन इंडियाचे  उत्तम उदाहरण आहे. आयएनएस कलवरी पाणबुडी म्हणजे भारत आणि फ्रान्स यांच्यातल्या वेगाने वाढणाऱ्या धोरणात्मक भागिदारीचे उत्तम उदाहरण आहे. आयएनएस कलवरीमुळे भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी भर पडली आहे.

21 वे शतक हे आशियाई देशांचे शतक मानले जाते. या शतकातविकासाचा मार्ग हिंदी महासागराद्वारेच होणार हे निश्चित असून त्यामुळेच राष्ट्रीय धोरणांमध्ये हिंदी महासागराला विशेष स्थान आहे. हिंदी महासागरात जागतिक धोरणात्मक आणि आर्थिक हिताबाबत भारत पूर्णत:  सजग असून  त्यामुळेच आधुनिक आणि बहुआयामी भारतीय नौदलया प्रदेशात शांतता आणि स्थैर्याला प्रोत्साहन देण्यात महत्वाची भूमिका  बजावत असल्याचे प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले.

प्रधानमंत्री पुढे म्हणाले कीसागराच्या अंगभूत क्षमतेमुळे आपल्या राष्ट्राच्या विकासाला आर्थिक ताकदीची जोड मिळाली आहे. समुद्रामार्गे होणारा दहशतवादतस्करीअंमली पदार्थांची वाहतूक या देशाला तसेच  इतर राष्ट्रांनाही  भेडसावणाऱ्या समस्यांविषयी  भारताला  जाणीव आहे. या आव्हानांचा मुकाबला करण्यात भारत महत्वाची भूमिका बजावत आहे.

वसुधैव कुटुंबकम्‌” अर्थात संपूर्ण जग हे एक कुटुंबच आहे ही भारताची धारणा असून त्याला अनुसरुनच भारत आपल्या जागतिक जबाबदाऱ्या निभावत आहे. आपल्या सहकारी राष्ट्रांनासंकटाच्या काळात पहिल्यांदा मदतीचा हात देण्यात भारत तत्पर आहे. भारतीय राजनैतिक आणि सुरक्षा आस्थापनातला मानवी चेहरा हे आपले वैशिष्ट्य आहे. सामर्थ्यवान भारत मानवतेसाठी महत्वाची भूमिका बजावत आहे. शांतता आणि स्थैर्याच्या मार्गावर भारताच्या बरोबरीने वाटचाल करण्याची जगातल्या इतर अनेक देशांची इच्छा असल्याचेही श्री. मोदी यावेळी म्हणाले.

गेल्या तीन वर्षात संरक्षणविषयक संपूर्ण परिसंस्थेत बदल होण्यास सुरुवात झाली आहे. वन रँक वन पेन्शन या दीर्घकाळ प्रलंबित मुद्दयाचे निराकरण  करुन केंद्र सरकारने या क्षेत्राप्रतीची कटिबध्दता दर्शवली आहे. सरकारची धोरणे आणि सैन्यदलांचे शौर्य यामुळे जम्मु-काश्मिरमध्ये छुपे युध्द म्हणून दहशतवादाचा वापर करण्याची चाल अयशस्वी ठरत असल्याचेही प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितले तसेच  देशाच्या सुरक्षेसाठी प्राणांची आहुती देणांऱ्याप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

जागतीक शांततेच्या दृष्टीने कलवरीचे महत्व अधिक-निर्मला सीतारामण

आधुनिक काळात युध्द नीतीमध्येशक्तीशाली आणि आधुनिक तंत्रज्ञानयुक्त पाणबुडया आपल्या राष्ट्राच्या शांततेसाठी आणि जरब ठेवण्यासाठी अतिशय आवश्यक आहेत. जागतिक  शांततेच्या दृष्टिकोनातून  आयएनएस कलवरीचे  महत्व असल्याचे  संरक्षणमंत्री निर्मला सीतारामण यांनी यावेळी बोलताना सांगितले.

भारतीय नौदल आणि फ्रान्सच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या प्रोजेक्ट 75 अंतर्गंत आयएनएस कलवरी मुंबईतल्या माझगाव बंदरात बांधण्यात आली आहे. फ्रान्सचे नौदल संरक्षण आणि ऊर्जा कंपनी डीसीएनएस यांनी या पाणबुडीचे आरेखन केले आहे. स्कॉर्पेन वर्गातल्या भारतीय नौदलात समाविष्ट होणाऱ्या सहा पाणबुडयांपैकी ही पहिली पाणबुडी आहे. हिंदी महासागरात आढळणाऱ्या विक्राळ शार्कच्या नावावरुन कलवरी हे नाव देण्यात आले आहे.नौदलात समाविष्ट करण्याच्या या कार्यक्रमात कमिशनिंग वॉरंटचे वाचन आणि राष्ट्रगीतही झाले.

मुख्यमंत्र्यांच्या नावाने पुण्यात टेंडर बाजार- कॉंग्रेसचा आरोप (व्हिडीओ)

0

पुणे- महापालिकेतील बहुतेक कामाची टेंडर्स -योजना मुख्यमंत्र्यांच्या नावाने रेटून मंजूर केल्या जात असल्याचा आरोप करीत आज मुख्य सभेत झालेल्या सायकल योजनेवर आठ दिवसात चर्चा न घेतल्यास या योजनेचा फेरविचार करण्याचा प्रस्ताव आपण देणार असल्याचे कॉंग्रेस चे महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांनी सांगितले .
आजच्या मुख्य सभेत भाजपने बेकायदेशीर कामकाज करून कायदा मोडून सायकल योजना आणि घनकचरा उपविधी चा विषय मंजूर केल्याचा आरोप त्यांनी केला .विशिष्ट ठेकेदारांना मदत करण्यचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या नावाने होत असल्याचे ते म्हणाले .. नेमके शिंदे यांनी काय म्हटले आहे ते पहा आणि ऐका ….

महापौर बंगल्यावरील बैठकीचे राजकारण करून विरोधकांनी चर्चा टाळली – महापौर टिळक (व्हिडीओ)

0

पुणे- महापौर बंगल्यावर भाजपा नगरसेवकांच्या बैठकीचे राजकारण करून विरोधकांनी आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी मुख्य सभेत गोंधळ घालून चर्चा टाळल्याचा आरोप महापौर मुक्त टिळक ,तसेच सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आणि स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पत्रकारांशी बोलताना केला .
महापौर टिळक म्हणाल्या सायकल योजनेवर आम्हाला चर्चा घडवून आणून नगरसेवकांचे मत जाणून घेण्याची इच्छा होती . पण विरोधकांनी महापौर बंगल्यावरील बैठकीचे राजकारण केले आणि गोंधळ घालून चर्चा होऊ दिली नाही . वास्तविक पाहता त्यांनी कालच्या बैठकीचे जे राजकारण चालविले आहे तशा बैठका अजित पवार यांनी हि पालकमंत्री असताना घेतलेल्या आहेत आणि आपण सभागृहात सायकल योजनेचे प्रेझेन्टेशन करण्यास तयार होतो तसेच आबा बागुल यांचे हि नाव चर्चेसाठी पुकारले होते . पण अंतर्गत राजकारणामुळे हि चर्चा उधळून लावण्यात आली .

विरोधकांवर मात करून सायकल योजना लादण्यात भाजपा ला यश (व्हिडीओ)

0

पुणे-कॉंग्रेसचे अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे चेतन तुपे यांची शाब्दिक वादळे धुड्कारून ,शिवसेनेचे संजय भोसले यांनी मोठ्या हिकमतीने पळविलेला मानदंड बळाच्या जोरावर परत मिळवून पुण्यावर ३२० कोटीची सायकल योजना लादण्यात भाजपला यश मिळाले .
सायकल योजना व सार्वजनिक स्वच्छता उपविधीवरून पुणे महापालिकेच्या आज झालेल्या सभेत अखेर या दोन्ही योजना गोंधळामध्ये मंजूर करून घेण्यात आल्या. या साऱ्या भानगडी बेकायदेशीर पद्धतीने केल्याचा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला मात्र  या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या विश्‍वास आणखी वाढला असून सत्तेच्या जोरावर यापुढील काळात विरोधकांना याच भाषेत उत्तर देण्याचा निर्धार  करण्यात आला.
पहा ३२० कोटीच्या सायकल योजनेसाठी महापालिका सभागृहात काय आणि कसे घडले .. सायकल योजना मुख्य सभा भाग 2 (समाप्त )

उष्टं खायची सवय नाही आम्हाला …आयुक्तांच्या कृतीवर मुख्यसभेत संताप (व्हिडीओ)

0

पुणे- काल महापौर बंगल्यावर संध्याकाळी 3 तासाच्या  इनकॅमेरा बैठकीत आयुक्तांनी केलं तरी काय ? या प्रश्नाला अधिकृत उत्तर महापालिकेच्या मुख्य सभेत मिळाले … महापालिका आयुक्त यांनी काल महापौर बंगल्यात जावून भाजपच्या नगरसेवकांना सायकल योजना काय असते … कशी असेल .. किती खर्चाची असेल ? आणि फायद्याची कशी असेल ? याबाबत प्रेझेन्टेशन दिले .. जर पर्दार्षाक्च कारभार असेल तर तिथे हे प्रेझेन्टेशन पाहायला कॉंग्रेस ,राष्ट्रवादी , शिवसेना आणि मनसे नगरसेवकांना आयुक्तांनी ,महापौरांनी का बोलाविले नाही ? या वरून आजच्या ३२० कोटीच्या सायकल योजनेसाठी बोलाविलेल्या मुख्यसभेत विरोधकांनी हंगामा केला …  याच मुख्य सभेचा पुढील व्हिडीओ .. पुढील बातमीत
इथे पहा

 हा महापौर बंगल्यात घडलं तरी काय ? यावरून झालेला हंगामा  व्हिडीओ..

३२० कोटीच्या सायकल प्रस्तावाच्या समर्थनासाठी नगरसेवकांची सायकलवरून रपेट(व्हिडीओ)

0

पुणे- काल महापौर बंगल्यावर संध्याकाळी 3 तासाच्या  इनकॅमेरा बैठकीस हजेरी लावलेल्या काही नगरसेवकांनी ३२० कोटीचा सायकल प्रस्तावाचे समर्थन करण्यासाठी थेट महापालिकेत सायकलवरून येण्याचे धाडस केले. आता खरा प्रश्न आहे . हे फक्त प्रसिद्धीपुरते होणार कि .. रोजच हे सारे सायकल वरून येणार …
येताना या साऱ्यांनी सायकल चालवा प्रदूषण टाळा.. अशा घोषणाही दिल्या आहेत .. प्रत्यक्षात हेच नगरसेवक आपल्या आजच्या या कृतीचे आचरण दैनंदिन जिवनात रोज करणार काय ? या प्रश्नाचे उत्तर नागरिकांना त्यांच्या आचरणातून दिसून येईलच … सभेत या प्रस्तावाला मंजुरी घेण्यापूर्वी .. गोंधळ होण्यापूर्वीचा हा व्हिडीओ..

शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शाळा व कॉलेजला पुस्तक भेट

0
पुणे : पुणे शहर युवती राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या ७७ व्या वाढदिवसानिमित्त शाळा, महाविद्यालयांमध्ये ‘लोक माझे सांगाती’ पुस्तक शाळा व  महाविद्यालयांला भेट देण्यात आले, अशी माहिती पुणे शहर युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष मनाली भिलारे यांनी दिली.
अप्पासाहेब जेधे काॅलेज (शुक्रवार पेठ ), चिंतामणी प्राईड (आंबेगाव पठार), चिंतामणी विद्यामंदीर (आंबेगाव पठार), प्रियदर्शनी विद्यामंदिर (धनकवडी ), प्रियदर्शनी इंग्रजी विद्यालय (धनकवडी ), कै. चंद्रकांत दांगट महाविद्यालय (वडगाव बु. ), शाहू काॅलेज(पर्वती पायथा ), जिजामाता हायस्कूल (शुक्रवार पेठ ) या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये पुस्तके वाटप करण्यात आले.
या वेळी पुणे शहर युवती राष्ट्रवादी काँग्रेस च्या अध्यक्ष मनाली भिलारे, युवती पदाधिकारी अक्षता राजगुरू, सोनाली गाडे, गीतांजली सारघे, मेघा पंडित, कृतिका चिवटे, अबोली घुले, पौर्णिमा आढाक या युवती उपक्रमात सक्रिय सहभागी झाल्या होत्या.
शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथा सांगणारे हे ४०० पानी पुस्तक असून, शरद पवारांनी आपला राजकीय प्रवास पुस्तकाद्वारे उलगडला आहे.  त्यांचे कार्यकर्ते, देशीविदेशी स्नेही, मोठ्या व्यक्तींबाबतची त्यांची मते, भावना या पुस्तकातून त्यांनी व्यक्त केल्या आहेत. शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शरद पवार यांच्या बारामती ते मुंबई व मुंबई ते दिल्ली असा दीर्घ राजकीय प्रवासकार्याची माहिती व्हावी या उद्देशाने आणि शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त हे पुस्तक वाटप करण्यात आले, असे मनाली भिलारे यांनी सांगितले
यावेळी प्राचार्य पोळ (अप्पासाहेब जेधे काॅलेज), शर्मिली पांडे (चिंतामणी प्राईड ),  मुख्यध्यापिका सायली गोवेकर( चिंतामणी विद्यामंदीर ), मुख्यध्यापिका मांडवकर (प्रियदर्शनी इंग्रजी विद्यालय), उपमुख्यध्यापिका नंदा शिरवळकर (प्रियदर्शनी इंग्रजी विद्यालय), मुख्याधापक पाटील (कै. चंद्रकांत दांगट महाविद्यालय), प्राचार्य शोभा इंगवले (शाहू काॅलेज), प्राचार्य सुमन सातव (जिजामाता हायस्कूल) उपस्थित होते.