चंदनगर येथील युवती छेडछाड़ प्रकरणातील आरोपींवर कडक शासन करण्यात यावे
: राष्ट्रवादी युवती काॅंग्रेस ची मागणी
पुणे :
गुरुवार दिनांक १४ डिसेंबर रोजी मध्यरात्री चंदनगर परिसरात काही मद्यपान केलेल्या युवकांनी एका युवतीची छेड काढली व पुढे तिला मारहाण देखील केली. संबंधित दोन तरूणांना अटक झाली आहे. एक युवकाचा तपास चालू आहे तरी त्वरीत या तरुणाला अटक व्हावी व कडक शासन करण्यात यावे, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी युवती काॅंग्रेसच्या वतीने करण्यात आली.
युवती शहराध्यक्ष मनाली भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगावशेरी मतदारसंघ अध्यक्ष अश्विनी परेरा यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुळीक (चंदननगर पोलीस स्टेशन) यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली.
यावेळी युवती पदाधिकारी गितांजली सारगे, पौर्णिमा आढाक, सायली हेंद्रे आदी उपस्थित होत्या.
पुणे शहरात अश्या स्वरुपांच्या घटना वाढत आहे. लहान मुले, महिला, युवती यांना असुरक्षितेच्या वातावरणात रहावे लागत आहे. पोलिस प्रशासनाचा धाक न राहिल्याने वारंवार अश्या घटना घडत आहेत. आपण आपल्या हद्दीत पेट्रोलिंगचे प्रमाण वाढवावे विशेष करून रात्रीच्या वेळी तसेच काॅलेज, महाविद्याल,कोचिंग क्लासेस, निर्मनुष्य भाग या ठिकाणी पेट्रोलिंगचे प्रमाण वाढवावे अशी विनंती देखील निवेदनाद्वारे करण्यात आली.