Home Blog Page 3218

राज्यघटना बदलणारच असे वक्तव्य करणारे केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांचा निषेध

0

पुणे- राज्यघटना बदलणारच असे वक्तव्य करणारे केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांचा निषेध पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले . या आंदोलनात विविध पक्ष , संघटना व संस्थाचे पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते . या आंदोलनात आमदार ऍड जयदेवराव गायकवाड , एल. डी. भोसले , डॉ. संजय दाभाडे , विजय जाधव , अशोक राठी ,पंडित कांबळे , नगरसेवक प्रदीप गायकवाड , गोविंद पवार , राहुल तायडे , मयूर गायकवाड , मनाली भिलारे , शिवाजी गायकवाड , मोहन कांबळे , तुकाराम शिंदे , नितीन रोकडे , गणेश आल्हाट , प्रतीक कांबळे , जनार्दन जगताप , अक्षता राजगुरू , गितांजली हेंद्रे , सुरेश चेंडके , किरण शिंदे , सिध्दार्थ गायकवाड , कुमोद गायकवाड , केतन गायकवाड , मन्नू कागडा , अतिश वाघमारे , आनंद हिरवे , विकी कांबळे , प्रवीण डाळिंबे , अभिषेक बोके , रविकांत वर्पे , गंगाराम आल्हाट ,भोलासिंग अरोरा , रंगाशेठ , सुजित यादव , गणेश लांडगे , संग्राम होनराव पाटील , संतोष गायकवाड मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते .
‘स्वतःला सेक्युलर, धर्मनिरपेक्ष म्हणवणाऱ्यांना त्यांचे आई-बाप कोण हे देखील ठाऊक नस’ असे वादग्रस्त वक्तव्य करतानाच;आम्ही संविधान बदलायलाच सत्तेत आलोय,असं विधानही केंद्रीय रोजगार आणि कौशल्यविकास राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी केल्याचा आरोप करीत  त्यांच्या या विधानाचा आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड यांनी संताप व्यक्त करून या वक्तव्याचा निषेध नोंदविला.
कोप्पल जिल्ह्यातील यलबुर्गा येथे झालेल्या ब्राह्मण युवा परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले. राज्यघटनेविरुद घटना निर्मितीपासूनच हिंदुत्ववादी पक्ष संघटनाचा विरोध होता . या देशाची संस्कृती व हिंदू धर्माला या घटनेत काहीच स्थान नाही म्हणून आम्ही एक दिवस हि घटना बदल्याशिवाय राहणार नाही , अशी त्यावेळी हिंदू महासभा , राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका होती व तशी अनेकदा त्यांची वक्तव्ये केली होती . दोन वर्षांपूर्वी सर संघ चालक मोहन भागवत यांनी देखील राज्यघटनेच्या बदलण्याची गरज आहे . अशा अर्थाचे वक्तव्य भाजपा एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राज्य घटनेबाबत उदो उदो करतात प्रत्यक्षात घटना बदल हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे . म्हणूनच हेगडे प्रवृत्ती अशी वक्तव्य करीत आहेत त्यांचा आम्ही निषेध करतो . असे ऍड जयदेवराव गायकवाड यांनी सांगितले .

हेगडे यांनी राजीनामा द्यावा . ‘ : खा . वंदना चव्हाण

0
पुणे :
‘घटना बदलण्यात येईल ,आणि घटना बदलण्यासाठी आम्ही आलो आहोत’, ‘धर्मनिरपेक्ष आणि विचारवंत व्यक्तींनी स्वतःचे रक्त कुठले असे  माहित नसते ‘अशा निरर्गल वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस च्या खासदार एड . वंदना चव्हाण यांनी निषेध केला आहे .
हे वक्तव्य करताना हेगडे यांनी  संविधानाचा,मानवतेचा  अपमान केला आहे . हे वक्तव्य सत्तेचा उन्माद दाखविणारे आहे ,रक्त -वर्ण -जाती यावरून मानवतेचा अपमान करणारे आहे . भाजप परिवाराच्या पोटातील विचार ओठावर आले आहेत ,पण जनता हे देशविरोधी विचार खपवून घेणार नाही. त्यांनी आपली सार्वजनिक जीवनातील मर्यादा ओलांडली असून तातडीने राजीनामा द्यावा .  ‘,अशी मागणी खा . वंदना चव्हाण यांनी केली  आहे .

‘ख्रिसमस संध्या’ अनुभवले आनंदाचे क्षण (व्हिडीओ)

0
पुणे- दरवर्षी प्रमाणे पुणे नवरात्रौ महोत्सवातर्फे ख्रिसमस संध्या या कार्यक्रमाचे आयोजन बागुल उद्यान शिवदर्शन येथे करण्यात आले.यंदा उपक्रमाचे 19 वे वर्ष असून आज या उपक्रमाचे उद्घाटन सनदी अधिकारी  सुशील खोडवेकर तसेच   दत्तवाडी पोलिस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटिल, अध्यक्ष आबा बागुल, सौ जयश्री बागुल, नंदकुमार बानगुडे यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी  रंगेबिरंगी फुगे व एकतेचा संदेश देणारा फलक झळकावून हे उद्घाटना   करण्यात आले.
      ख्रिसमस निमित्त सर्वधर्म समभाव हा संदेश देणारा व लहान मुलांसाठी विशेष आकर्षण असणाऱ्या या ख्रिसमस संध्या या आनंद मेळाव्यात लहान मुलांना विनामूल्य बग्गी राईड,उंट  सवारी , जंपिंग बलून, मिक्की माऊस, मिमिक्री शो फायर शो, जादूचे प्रयोग या बरोबरच रंगबिरंगी गॅस चे फुगे आणि खाऊचे वाटप देखील करण्यात आले. या कार्यक्रमाला 10 हजाराहुन अधिक मुले आणि काही पालक ही उपस्थित होते.
       या प्रसंगी बोलताना आबा बागुल म्हणाले की, मी गेली 19 वर्ष या कार्यक्रमाचे आयोजन करीत आहे. जगामधे खुप वेगवेगळ्या स्वभावाच्या व्यक्ति आहेत. या कार्यक्रमांद्वारे मी व माझे सहकारी त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा व त्यांच्यामधे एकतेची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न दरवर्षी करत असतो. यावेळी त्यांनी  सर्व नागरिकांना नातळाच्या व नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमासाठी वसंतराव बागुल उद्यान सजविण्यात आले होते. सगळीकडे विद्युत रोषणाई तसेच रंगबिरंगी माळा व पताका लावून हा परिसर सुशोभित केला गेला होता. या ख्रिसमस संध्या कार्यक्रमाचे संयोजन अमित बागुल व सहकाऱ्यांनी केले . कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी  अभिषेक बागुल, महेश ढवळे सागर बागुल पप्पु देवकर , धनंजय कांबळे, इम्तियाज़ ताम्बोळी, राम रणपिसे , संतोष पवार , सुयोग धाडवे ,अमर ससाने, गणेश खांडरे ,राहुल शिंदे , विक्रांत  गायकवाड ,आदींनी परिश्रम घेतले.अमित बागुल यांनी सूत्र संचालन केले व सागर बागुल यांनी आभार मानले

येसूबाई करणार शंभूराजांचं स्वागत

0

शूर आबांचे शूर छावे शंभूराजे मोठ्या रुपात पडद्यावर अवरतले आणि प्रेक्षकांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपली. मोठ्या रुपातील शंभूराजांचा पराक्रम आणि बुद्धीचातुर्याचे अनेक दाखले आपण स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत पाहाणार आहोतच. शंभूराजांच्या आगमनाची जितकी प्रतीक्षा प्रेक्षकांना होती तितकीच किंबहुना त्याहून अधिक हुरहुर निर्माता – अभिनेता डॉ. अमोल कोल्हेला होती. निर्माता आणि अभिनेता अशी दुहेरी कसरत डॉ. अमोल कोल्हे मोठ्या शिताफीने आणि प्रगल्भतेने हाताळतोय. ही भूमिका साकारण्याचा योग येणं म्हणजे श्रींची इच्छा हाच भाव त्याच्या डोळ्यांत आणि बोलण्यात जाणवतो. डॉ. अमोल कोल्हे यांनी यापूर्वीही महाराष्ट्राचं दैवत श्री छत्रपती शिवाजीमहाराजांची भूमिका साकारली त्याचप्रमाणे नाटकाच्या माध्यमातून त्याने शंभूराजेही रंगभूमीवर सादर केले पण त्याहून या मालिकेचं आव्हान अधिक मोठं आहे. या भूमिकेसाठी वजन कमी करण्यापासून शंभूराजांच्या व्यक्तिमत्त्वातले बारकावे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. शंभूराजांचे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीशी असणारे बंध उलगडून दाखवताना त्यांच्या खाजगी आयुष्यातील नातेसंबंधावरही या मालिकेतून प्रकाश टाकाला जातोय. कय्युमखानावर विजय मिळवून आलेल्या शंभूराजांचं स्वागत येसूबाई कसं करणार याचीही एक निराळी उत्सुकता आहे. शंभूराजांनी लिहिलेला बुधभूषण ग्रंथ येसूबाईंच्या हाती लागतो. त्याच्या उत्सुकतेपोटी त्या दरबारात या ग्रंथाचं वाचन ठेवतात. याच दरम्यान अणाजी आणि शंभूराजेंमध्ये मतभेदाची ठिणगी पडते आणि नव्या राजकारणाची सुरुवात होते. येसूबाई आणि शंभूराजांची पहिली भेट आणि स्वराज्यातल्या नव्या राजकीय गणितांची सुरुवात अशा अनेक घडामोडी येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत.

येसूबाई आणि शंभूराजे या पती पत्नीच्या प्रगल्भ नात्याचे वेगळे पदर या मालिकेच्या निमित्ताने उलगडले जाणार आहेत. पराक्रम आणि बुद्धीचातुर्याचं  देणं शंभूराजांना जन्मत:च मिळालं होतं. पण व्यक्ती केवळ त्याच्या पराक्रमाने श्रेष्ठ ठरत नसते तर त्याच्यातल्या माणूसपणाने त्याचं श्रेष्ठत्व अमर होतं. शंभूराजांची ही गाथा केवळ त्यांच्या पराक्रमाचा इतिहास नव्हे तर त्यांच्यातल्या सद्सद्विवेकी, कुटुंबवत्सल माणसाची आणि न्यायी राजाची ही कथा आहे. इतिहास रचतानाही माणूसपण जपणाऱ्या शंभूराजच्या गाथेचे अनेक पदर येत्या भागांत या मालिकेतून उलगडले जाणार आहेत.

मराठी व्यंगचित्रकार संमेलनासाठी व्‍यंगचित्रे पाठविण्‍याचे आवाहन

0

पुणेठाणे येथे 20 आणि 21 जानेवारी 2018 या कालावधीत मराठी व्यंगचित्रकार संमेलन होणार आहे. यानिमित्‍ताने आयोजित प्रदर्शनासाठी व्यावसायिक व्यंगचित्रकार, व्यंगचित्रकारांना मराठी व्यंगचित्रे-अर्कचित्रे पाठविण्‍याचे आवाहन करण्‍यात आले आहे.  

या व्यंगचित्र प्रदर्शनाला विषयाचे बंधन नसून पुढील पत्त्यावर अथवा ई-मेल पत्त्यावर खालील नियमांस अनुसरून आपली केवळ तीन मराठी व्यंगचित्रे पाठवावी, असे आवाहन व्यंगचित्रकार संमेलन समिती तर्फे करण्यात आले आहे.  व्यंगचित्रे-अर्कचित्रे स्वरचितच असावी. फक्त तीन व्यंगचित्रे-अर्कचित्रे पाठवावीत. आकार ए-फोर किंवा ए थ्री आणि फॉरमॅट जेपीजीअथवा टीप्‍फ फाईल स्‍वरुपात असावी. एखादे चित्र प्रदर्शित न करण्याचा अधिकार निवड समितीने राखून ठेवलेला आहे.

ई-मेल ऐवजी मूळ व्यंगचित्रे पोस्टाने पाठविताना पाकिटावर व्यंगचित्र प्रदर्शनअसा स्पष्ट उल्लेख असावा. व्यंगचित्रे-अर्कचित्रे स्वीकारण्याची अंतिम तारीख 2 जानेवारी 2018 आहे. त्यानंतर प्राप्त झालेली व्यंगचित्रे स्वीकारली जाणार नाहीत. व्यंगचित्रे-अर्कचित्रे फक्त पोस्‍टाने अथवा मेलवर पाठवावी. व्‍हॉट्सएप्पवर पाठवलेली व्यंगचित्रे ग्राह्य धरली जाणार नाही. प्रस्थापित व्यंगचित्रकारांनाच या प्रदर्शनासाठी भाग घेता येईल. त्यासाठी कार्टूनिस्‍ट्स कंबाईनची सदस्य वर्गणीची अट आहे. वार्षिक वर्गणी 300 रुपये असून प्रदर्शनाच्या ठिकाणी अरविंद गाडेकर यांच्याकडे जमा करावी. व्यंगचित्रे पोस्‍टाने पाठवण्यासाठी पत्ता: कार्टूनिस्‍ट्स कंबाईन, बी-4, कल्‍पतरु, रश्‍मी कॉम्‍प्‍लेक्‍स, मेंटल हॉस्‍पीटल रोड, ठाणे (पश्चिम) 400604 (भ्रमणभाष9821739327) ई-मेल पत्ता: cc18thane@gmail.com अधिक माहितीसाठी महेंद्र भावसार  7021967587  किंवा रवींद्र बाळापुरे 7507329721  यांच्याशी संपर्क साधावा.

टेनिस स्पर्धेत अश्विन नरसिंघानीचा मानांकीत खेळाडूवर विजय

0

पुणे – प्रविण मसालेवाले प्रायोजित व हिलसाईड जिमखाना बिबवेवाडी यांच्या तर्फे आयोजित ३१व्या प्रविण करंडक राष्ट्रीय मानांकन टेनिस स्पर्धेत अश्विन नरसिंघानीने आठव्या मानांकीत जय पवारचा पराभव करत धक्कादायक निकालाची नोंद केली. मानस धामने, अंशूल सातव, अनिरूध्द नल्लापाराजू, राधेय शहाणे यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली.

बिबवेवाडी येथील हिलसाईड जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत मुलांच्या गटात बिगर मानांकीत अश्विन नरसिंघानीने आठव्या मानांकीत जय पवारचा 2-6, 6-3, 6-3 असा तीन सेटमध्ये पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. अव्वल मानांकीत मानस धामनेने वेद ठाकूरचा 6-2, 6-1 असा पराभव केला. चौथ्या मानांकीत अंशूल सातवने अर्णव कोकणेचा 6-3, 3-6, 7-5 असा पराभव करत पुढची फेरी गाठली. सहाव्या मानांकीत अनिरूध्द नल्लापाराजूने समर्थ सहिताचा 6-3, 6-0 असा तर सातव्या मानांकीत राधेय शहाणेने पार्थ देवरूखकरचा 6-2, 6-0 असा सहज पराभव करत आगेकूच केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: मुले: 

मानस धामणे(1) वि.वि वेद ठाकूर 6-2, 6-1

अंशूल सातव(4) वि.वि अर्णव कोकणे 6-3, 3-6, 7-5

अनिरूध्द नल्लापाराजू(6) वि.वि समर्थ सहिता 6-3, 6-0

राधेय शहाणे(7) वि.वि पार्थ देवरूखकर  6-2, 6-0

अश्विन नरसिंघानी वि.वि जय पवार(8) 2-6, 6-3, 6-3

शौर्य राडे वि.वि केयूर म्हेत्रे 6-2, 3-6, 6-1

अझमिर शेख वि.वि अर्णव बिशोयी 7-6(4), 3-6, 6-4

नील जोगळेकर वि.वि आदित्य भाटेवरा 6-1, 6-4

ईशान देगमवार वि.वि सुधांशू सावंत 6-1, 6-2

प्रथमेश पाटील वि.वि सौवेद देशमाने 6-2, 6-4

न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोड येथे गणित जत्रा

0

पुणे – विद्यार्थ्यांमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी व हसतखेळत गणित शिकता यावे या उद्देशाने डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड भारतीय गणिती श्रीनिवासन रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त गणती जत्रा आयोजित करण्यात आली होती.
वर्ग, घन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, जादूचे चौकोन, त्रिकोणमिती, मोजमाचे, उंची मोजणे, पायथॅगोरसचे प्रमेय आदी गणिताच्या संकल्पना मजेशीर खेळांच्या माध्यमातून शिकविण्यात आल्या. एकूण ८४ खेळांचे आयोजन करण्यात आले होते.
पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी ३४ व आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ५० खेळ मांडण्यात आले होते. बाराशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पन्नास स्टॉलवर १२० विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले. ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांनी भेट दिली.
शाला समितीचे अध्यक्ष डॉ. सुनील भंडगे व मु‘याध्यापक नागेश मोने यांच्या मार्गदर्शनाखाली दिलीप रावडे, देविदास झोडगे, ठकसेन कनोजे, स्वाती जज्जल या गणिताच्या शिक्षकांनी संयोजन केले.

डिजिटल क्लासरूमचे बीएमसीसीत उद्घाटन

0

पुणे-डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयात बीएमसीसी डिजिटल क्लासरूमचे उद्घाटन उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. सोसायटीच्या नियामक मंडळ व परिषदेचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे अध्यक्षस्थानी होते.
सतत हसत राहावे, चांगल्या कामाचे कौतुक करावे, कोणाचाही अवमान करु नये, अहंकार टाळावा आणि जे काही कराल ते उत्तम करावे असा संदेश श्री. नाईक यांनी यावेळी बोलताना दिला.
डिजिटल क्लासरूमच्या बोर्डवर प्राध्यापकांना बोटाने लिहिता येणार आहे. लिहिलेल्या गोष्टी आपोआप ङ्गाईलममध्ये सेव्ह होणार आहेत. विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासण्यासाठी त्याचा उपयोग करता येईल. या ङ्गाईल शेअरही करता येतील. विविध विषयांवरील यू ट्यूबवरील व्या‘याने विद्यार्थ्यांना वर्गात पाहाता येणार आहेत. त्यासाठी आवश्यक व्हिडिओ, स्पिकर, इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात १३ क्लासरूम डिजिटल करण्यात आल्या असून या वर्षअखेर ४२ वर्गखोल्या डिजिटल केल्या जातील अशी माहिती प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी दिली.
प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, उपप्राचार्य डॉ. जगदीश लांजेकर, डॉ. आशीष पुराणीक यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या निवडणुकीत डॉ . पी. ए .इनामदार यांच्या नेतृत्वाखाली ‘अवामी महाज ‘पॅनल विजयी

0

पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या नियामक मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत डॉ . पी. ए .इनामदार यांच्या नेतृत्वाखाली ‘अवामी महाज ‘पॅनल विजयी झाले .

२०१७-२०२० या कालावधीसाठी नियामक मंडळाची ही निवडणूक झाली . या निवडणुकीत ६७ जणांनी अर्ज भरले होते . त्यातील ३६ वैध ठरले . २२ जणांनी माघार घेतली . १३ जागांसाठी निवडणूक रिंगणात १४ उमेदवार उभे होते .

एकूण मतांपैकी ८५ टक्के मते डॉ पी ए इनामदार यांच्या नेतृत्वाखालील अवामी महाज पॅनल ला मिळाली . २४ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ पर्यंत मतदान झाले . मतमोजणीनंतर निकाल जाहीर करण्यात आला . एडव्होकेट जे. एफ. शेरकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले .

१३ विजयी उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे :डॉ . पी ए इनामदार ,आबेदा इनामदार ,लतीफ मगदूम ,एस . ए . इनामदार ,मुझफ्फर पीर महंमद शेख ,अब्दुल कादिर कुरेशी ,मजीद उस्मान दाऊद ,मशकूर अहमद शेख ,बदरुद्दीन शेख ,इरफान जान महंमद शेख ,खालिद रेहमतुल्ला अन्सारी ,महंमद हनीफ नूर शेख ,अब्बास इस्माईल शेख

‘आम्ही ३७ वर्षे संस्थेच्या प्रगतीचे काम करीत आलो आहोत . त्यामुळे सुरुवातीला फक्त २ शाळा असताना आज संस्थेने ३० शैक्षणिक आस्थापना ,३० हजार विद्यार्थी अशी प्रगती केली आहे . पूर्वी फक्त प्राथमिक -माध्यमिक शिक्षण देणारी संस्था आज पदव्युत्तर ,पी एचडी पर्यंत शिक्षण देत आहे . हे मतदान व्यक्तीला झाले नसून कामाच्या योगदानाला झाले आहे ‘अशी प्रतिक्रिया डॉ . पी ए इनामदार यांनी विजयानंतर दिली.

गुरुगोविंद सिंग यांची ३५१ वी जयंतीनिमित्त गुरुद्वारा गुरुनानक दरबारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन

0

पुणे-गुरुगोविंद सिंग यांची ३५१ वी जयंतीनिमित्त पुणे कॅम्पमधील गुरुद्वारा गुरुनानक दरबारामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी गुरुद्वारास विद्युत रोषणाई व फुलांची भव्य सजावट करण्यात आली होती . यावेळी  गुरुद्वारा गुरुनानक दरबारचे अध्यक्ष चरणजितसिंग सहानी ,  हरमिंदरसिंग घई  , संतसिंग मोखा , संजय नहार , संदीप खर्डेकर  आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी दुर्ग येथील सरदार सरबजीतसिंग रंगीला , अमृतसर येथील जोजार सिंग दिल्ली येथील चरणजितसिंग यांचा कीर्तनाचा पाठ झाला . सकाळी अखंड पाठ झाला . दुपारी लंगरचा लाभ सर्वानी घेतला .

यावेळी संजय नहार लिखित गुरु गोविंद सिंग यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन जेष्ठ पत्रकार नंदकुमार सुतार यांचे हस्ते करण्यात आले .

चंद्रकांत दळवी, मुकेश माचकर, सुवर्णा गोखले आणि ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’ ठरले मानकरी

0
पुणे :‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘प्रबोधन माध्यम’ यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारे ‘डॉ.पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’ जाहीर झाले आहेत. 
गतीमान प्रशासनाचे प्रयोग करणारे चंद्रकांत दळवी (महसूल  विभागीय ​आयुक्त, पुणे), मुकेश माचकर (महाराष्ट्राचे पहिले मतपोर्टल ‘बिगुल’ चे संपादक), सुवर्णा गोखले (ज्ञान प्रबोधिनी, स्त्री शक्ती प्रबोधन प्रमुख, ग्रामीण विभाग) आणि ‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’, कुरूंजी, ता. भोर,(ग्रामीण भागात पर्यावरणपूरक गृह बांधणी, पर्यटन प्रकल्पासाठी) यांची निवड या वर्षीच्या ‘डॉ. पी.ए. इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान’साठी करण्यात आली आहे.

​ ​संयोजन समितीचे अध्यक्ष दीपक बीडकर यांनी ही माहिती दिली.‘सिनर्जी हॉलिडे व्हिलेज’, कुरुंजी (ता.भोर) च्या वतीने संचालक राजेंद्र आवटे, मंदार देवगावकर आणि अमृता देवगावकर सन्मान स्विकारतील.
‘डॉ. पी. ए. इनामदार कार्यक्षमता व गुणवत्ता सन्मान’ साठी व्ही. एन. जगताप (प्राचार्य,

 एम.सी.ई.सोसायटी ची​’​इन्स्टिट्युट ऑफ फार्मसीडिप्लोमा’​) आणि खतीब अजाझ हुसेन (​’​हाजी गुलाम महंमद आझम एज्युकेशन ट्रस्ट‘​चे कर्मचारी) यांची निवड करण्यात आली आहे.‘डॉ.पी.ए.इनामदार सामाजिक कृतज्ञता सन्मान 2017’ चे वितरण ‘भारती विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटीचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ (आझम कॅम्पस)च्या असेंब्ली हॉलमध्ये गुरूवार, दिनांक 28 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 
‘महाराष्ट्र कॉस्मापॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हे सन्मान दिले जातात. यावर्षी पी.ए.इनामदार यांचा 73 वा वाढदिवस असून, सन्मानाचे नववे वर्ष आहे. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व शाल असे या सन्मानाचे स्वरूप आहे.

आमदार माधुरी मिसाळ यांनी नागपूर अधिवेशनात केले तरी काय ?

0

पुणे- आमदार माधुरी मिसाळ यांनी नागपूर अधिवेशनात केले तरी काय ? असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा हि यादी पाठविण्यात आली . ..वाचा …

आमदार माधुरी मिसाळ यांचा नागपूर अधिवेशनातील सहभाग
१.    सिंहगड रस्त्त्यावर पोलीस स्टेशन व पोलीस चौकी उभारण्याकरिता आवश्यक जागा महापालिकेकडून तातडीने ताब्यात घेण्याबाबत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा झाली. या ठिकाणी पोलीस स्टेशन व चौकी बांधण्यासाठी चार कोटी रुपयांची मागणी केली.
२.    स्वारगेट येथे वाहतुकीच्या नियोजनासाठी इंटिग्रेटेड ट्रॅफिक हब उभारण्यासाठी विविध खात्यांच्या अधिकार्‍यांची एकत्रित बैठक तातडीने आयोजित करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले
३.    बिबवेवाडीतील ईएसआय रुग्णालयाचे केवळ विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. याठिकाणी कामगार रुग्णांबरोबरच ससूनच्या धर्तीवर सर्वसामान्य रुग्णांवर उपचार करण्यासाठी १०० खाटांचे रुग्णालय उभारण्यासाठी केंद्रीय कामगारमंत्री बंडारू दत्तात्रय यांच्यासमवेत बैठक घेण्याचे आश्‍वासन कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिले
४.    सॅलिसबरी पार्क येथे मुस्लिम बांधवांसाठी दफनभूमीमध्ये विविध प्रकारची विकासकामे करण्याकरिता अल्पसंख्यांक मंत्रालयाकडून पन्नास लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्याबाबत  अल्पसंख्याकमंत्री विनोद तावडे यांनी मंजूरी दिली.
५.    पर्वती व विठ्ठलवाडी देवस्थानांना तीर्थक्षेत्राचा दर्जा देऊन विविध विकासकामे करण्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली
६.    पाचगाव पर्वती वन क्षेत्रात विविध प्रकारची विकासकामे करण्यासाठी १ कोटी १३ लाख रुपयांच्या विशेष निधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपलब्ध करून दिला
७.    ज्येष्ठ नागरिकांचे धोरण जाहीर करावे, केंद्राच्या धर्तीवर ज्येष्ठ नागरिकांच्या पात्रतेसाठी वयोमर्यादा ६५ वरुन ६० वषे करावी यासाठी सभागृहात मागणी केली
८.    शहर व जिल्ह्यात वाळूचे वितरण व पुरवठा यावर जिल्हा प्रशासनाचे नियंत्रण नल्याने महसुली उत्पन्न कमी होत असल्याचे औचित्याच्या मुद्द्या द्वारे सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले
९.    राज्यातील उत्पादन शुल्क विभागातील स वर्गातील पदे रिक्त असल्याबाबत तसेच पुणे महापालिकेतील विधी सल्लागार विभागातील अधिकारी व कर्मचारी संगनमताने गैरव्यवहार करीत असल्याबाबत आदी तारांकित प्रश्‍नांद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले.

ख्रिसमसनिमित्त सालोम ख्रिश्चन असोसिएशनतर्फे कॅरोल सिंगिंग फेस्टिवल

0

पुणे-ख्रिसमसनिमित्त सालोम ख्रिश्चन असोसिएशनतर्फे कॅरोल सिंगिंग  फेस्टिवल घेण्यात आला . वानवडीमधील महात्मा फुले सांस्कृतिक भवनमध्ये झालेल्या या कार्यक्रमाचे आयोजन सालोम ख्रिश्चन असोसिएशनचे अध्यक्ष ख्रिस्तोफर राजमनी यांनी केले होते . या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे पुणे बिशप प्रमुख थॉमस डाबरे , पीटर डिक्रूज , अँजलिस अँथोनी , सायमन अँथोनी , रिबेलो जेकब , मुनावर सिंग , संदीप मंजुळकर , जेरी राजमनी आदी मान्यवर उपस्थित होते .

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पीटर डिक्रूज यांनी केले .

या  कॅरोल सिंगिंग  फेस्टिवलमध्ये परीक्षकाचे काम पास्टर अण्णासाहेब पवार , जीनिफेर लोबो , साहिल शेकटकर , ब्रदर अखिल यांनी केले . या फेस्टिवलमध्ये घोरपडी गावमधील सेंट जोसेफ चर्च , कोंढवा खुर्दमधील न्यू लाईफ वर्शीप चर्च , शिवनेरीनगरमधील आ लेडी ऑफ लुडस चर्च विजेते ठरले . तर स्पेशल पदकाचे मानकरी डेनला लोबो , साहिल शेकटकर व बेनी वूड्स तर सिल्वर बेल्टचे मानकरी ट्रेव्हर मार्टिन विजेते ठरले . ता फेस्टिवलमध्ये सात चर्चमधील १५० मुलांनी सहभाग घेतला . 

नेहरु-गांधी घराण्यापेक्षा मोदी ठरले श्रेष्ठ – खा. संजय काकडे यांचे गुजरात निवडणूक निकालापूर्वी वर्तविलेले भाकीत प्रॅक्टीकली खरेच ..(पहा व्हायरल व्हिडीओ)

0
 पुणे : गुजरात निवडणुकीच्या निकालाला एक दिवस बाकी असताना भाजपाचे सहयोगी सदस्य व राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केेलेल्या अंदाजाने संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच देशातही राळ उठवून दिली. खासदार काकडे यांनी गुजरातमध्ये सरकारविरोधी वातावरण आणि प्रमुख समाज काँग्रेससोबत असताना भाजपाची सत्ता फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळेच येऊ शकते असे भाकीत केले होते. त्यांचे हे भाकीत खरे ठरले असून पंतप्रधान मोदी नेहरु-गांधी घराण्यापेक्षा सर्वश्रेष्ठ नेता सिद्ध झाले आहेत. यासंदर्भातील झी न्यूज ने खासदार संजय काकडे यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा ‘ओरिजनल’ व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याची चर्चा सर्वत्र रंगलीय.

खासदार संजय काकडे यांनी पुणे महापालिका निवडणुकीवेळी व्यक्त केलेला अंदाज तंतोतंत खरा ठरला होता. त्यामुळे गुजरात निवडणुकीच्या निकालाअगोदर खासदार यांनी वर्तविलेल्या भाकीताने सर्वत्रच आश्चर्य व्यक्त केले गेले. त्यांनी वर्तविलेला अंदाज यावेळीही खरा ठरला. सरकारविरोधी वातावरणात भाजपाची सत्ता आली तर, पंतप्रधान मोदी हे नेहरु-गांधी घराण्यापेक्षा सर्वश्रेष्ठ नेता ठरतील असे खासदार काकडे यामध्ये म्हटले आहेत. गुजरातचा निकालही तसाच लागला आणि त्याचे श्रेय पंतप्रधान मोदी यांनाच जाते.

खासदार काकडे यांनी झी न्यूज ला दिलेल्या मुलाखतीमध्ये स्पष्टपणे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या करिश्म्यामुळेच गुजरातमध्ये भाजपाची सत्ता येऊ शकते. परंतु, गेल्या 22 वर्षांपासून सलग भाजपाचे सरकार गुजरातमध्ये असल्याने प्रस्थापितांविरोधात म्हणजे सरकारविरोधात जनतेमध्ये रोष आहे. पाटीदार, दलित, मुस्लिम, ठाकूर आदी प्रमुख समाज काँग्रेससोबत गेल्याने भाजपाला सत्ता बनविणे अवघड असल्याचे चित्र सर्वेक्षणात समोर आल्याचे खासदार काकडे यांनी म्हटले आहे. अशा विरोधी वातावरणात भाजपाचे सरकार फक्त ‘मोदी मॅजिक’वरच येऊ शकते. तसे झाल्यास गुजरातमध्ये भाजपाचे सलग 27 वर्षे सरकार बनेल. मोदींची ही कामगिरी इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली जाईल आणि त्यांचा प्रसिद्धीचा आलेख सर्वाधिक मोठा होईल.

भाजपा आई, मोदी वडिलांसारखे तर, फडणवीस लहान भाऊ!
खासदार संजय काकडे यांचे गुजरात निवडणूक निकालासंदर्भात भाकीत करणे पक्ष विरोधी मानले जात असल्याबाबत विचारल्यावर खासदार काकडे यांनी मात्र हा आरोप खोडून काढला. खासदार काकडे म्हणाले की, भाजपाचा मी सहयोगी सदस्य आहे. भाजपा आपल्यासाठी आई असून पंतप्रधान मोदी आपल्याला वडिलांच्या जागी आहेत. तर, मुख्यमंत्री फडणवीस छोट्या भावाप्रमाणे आहे. आईशी कोणी गद्दारी करीत नाही. त्यामुळे पक्ष विरोधात ही कृती नसून निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आपण हा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे हे पक्षविरोधी कृत्य होऊ शकत नाही. तसेच, महापालिका निवडणुकीत सर्व विरोधी पक्षाला अंगावर घेत भाजपाची एकहाती सत्ता येण्यासाठी आपण काम केले. पक्षाचे एकाचवेळी दीड लाख सदस्य नोंदणी केली. नोटबंदी समर्थनार्थ देशातील एकमेव भव्य रॅली काढली. पक्षाच्या विरोधात आपण असतो तर, ही कामे केलीच नसती, असेही खासदार काकडे यांनी म्हटले आहे.

गुजरातमध्ये सत्ता बनविणे भाजपाला अवघड असल्याचा अंदाज सर्वेक्षणाच्या आधारे दिला असल्याची माहिती खासदार काकडे यांनी दिली आहे. ते म्हणाले आहेत की, सहा जणांनी हे सर्वेक्षण ग्रामीण व शहरी भागात केले आहे. 70 टक्के सर्वेक्षण खेड्यांमध्ये झाले आहे. शेतकरी, कामगार, मजूर, रिक्षावाला, वेटर, हॉटेल चालक, बस चालक आदी घटकांशी संवाद साधून हे सर्वेक्षण केले आहे. आपले सर्वेक्षण खोटे ठरावे आणि भाजपाची सत्ता गुजरातमध्ये यावी आणि तसे झाल्यास आपल्याला प्रचंड आनंद होईल, असेही खासदार काकडे यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

३६ लाख पुणेकरांची गळचेपी करण्यास महापालिका सरसावली …(व्हिडीओ)

0

पुणे-पुण्यात एकूण ३६ लाख वाहने आहेत . हि संख्या मोठी वाटेल पण हे सत्य आहे . या सर्व खाजगी वाहनचालकांची आणि मालकांची गळचेपी करून हाणून मारून त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्वीकारायला भाग पाडणे किंवा नॉनमोटराईझ वाहन वापरण्यासाठी भाग पाडणे अशा उद्देशाने त्यांच्यावर अन्याय करणारा कारभार पुणे महापालिकेकडून होतो आहे .
पूर्वी तो बीआरटी च्या माध्यमातून झाला . पण आज बीआरटी च्या बट्ट्याबोळ झालेला आहे . सर्व बीआरटी मार्ग वारंवार उध्वस्त होत गेले .याच बीआरटी साठी खाजगी वाहनांसाठी असलेल्या रस्त्यावर अतिक्रमण करून बीआरटी ला स्वतंत्र हक्काचा रस्ता देण्यात आला . ज्यामुळे खाजगी वाहनांनी  कोंडमारा सहन केला . त्यानंतर
नॉनमोटराईझ वाहनम्हणून सायकली वापर असा संदेश देत जिथे पदपथ नाहीत , जिथे अगोदरच अरुंद रस्ते आहेत , जिथे दैनंदिन जिवनात सायकल हा पर्याय होऊ शकत नाही तिथे सायकलींसाठी सायकल मार्ग करून आहे त्या रस्त्यांवर आणखी आक्रमण करीत खाजगी वाहनाची आणखी कोंडी करण्याचा प्रयत्न करण्यात आला . खरे तर हे सारे प्रयत्न पूर्णतः अपयशी ठरले त्याला .. व्यवहारी दैनंदिन जिवनात दुचाकी वापरण्याशिवाय पुणेकरांना पर्याय च उरलेला नाही असे स्पष्ट कारण आहे . केवळ यामुळे ३४ लाख लोकसंख्येच्या शहरात २५ लाख दुचाक्या नोंदविल्या गेल्या आहेत तर 11 लाख चारचाकी नोंदविल्या गेल्या आहेत . घराघरात वाहन लागतेच असे नाही तर प्रत्येक प्रौढ व्यक्तीला वाहन लागतेच अशी स्थिती पुण्यावर काही वर्षांपूर्वीच लादली गेली आणि पुणेकरांनी ती जगण्यासाठी म्हणून पत्करली .
आता पुन्हा या सर्व खाजगी वाहनांची कोंडी करून त्यांच्याकडून भरमसाठ पैसा कसा काढता येईल यासाठी महापालिका राबायला तयार झाली आहे . पुन्हा ३५० कोटीचे सायकल मार्ग करून लोकांना सायकली वापर असा संदेश देणार आहे . भाड्याने सायकली उपलब्ध करून देणार आहे . पण आता गतिमान जिवनात वेळ महत्वाची आहे. पुणेकर बागेत जाताना ,व्यायामासाठी , सुटीच्या दिवशी सायकल वापरतील ही.. पण रोज ,आपली मोटार सायकल घरी ठेवून या सायकलींच्या जीवावर उदरनिर्वाहासाठी बाहेर पडू शकणार आहेत काय ? हा खरा प्रश्न आहे . किती पुणेकर आपल्या गाड्या घरी ठेवून सायकलींचा महापालिका देवू पाहत असलेला मार्ग पत्करतील या प्रश्नाचे उत्तर हवे आहे . ते जर नकारार्थी असेल तर हे ३५० कोटी कोणा कोणाच्या घशात जातील एवढे सुद्धा पाहण्याची आवश्यक्यता उरणार नाही .
एकीकडे अशा पद्धतीने सायकलींचे जाळे टाकणाऱ्या महापालिकेने दुसरीकडे खाजगी वाहनांना रस्त्यावर पार्किंग द्यायचे नाही , त्यांची कोंडी कशी करायची याचा आणखी एक उपाय शोधला आहे तो म्हणजे पे अँड पार्किंग ….
रस्त्यांवर पार्किंग साठी ३० रुपये प्रती तास असे शुल्क उभारण्याचा प्रस्ताव या महापलिकेत आला आहे . खरे तर औरंगजेबानेही एवढा आर्थिक अत्याचार केला नसेल .. असा मार्ग महापलिका का पत्करते आहे ? या प्रश्नाचे उत्तर सरळ सोपे असेच आहे . पीएमपीएमएल ची बस वापरावी म्हणून ३६ लाख वाहने ज्यांच्याकडे आहेत त्या पुणेकरांची अशा पद्धतीने गळचेपी करून त्यांना जबरदस्तीने पीएमपीएमएल च्या बस कडे वळविण्याचा हा प्रयत्न हि अयशस्वी ठरेल हे सांगायला कुणा ज्योतिष्याची गरज भासणार नाही . कारण असे

पे अँड पार्किंग …. चे उपद्व्याप महापालिकावारंवार करीत आली आहे . आता त्याची तीव्रता वाढली आहे त्यामुळे साहजिकच लोकंच्या तीव्र असंतोषाचा सामना पुण्यानेच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना करावा लागणार आहे . शहरातील रस्त्यांची  अ , ब ,क ,ड अशी वर्गवारी करून अ वर्गवारीतील रस्त्यांवर दुचाकी पार्किंगसाठी प्रतितास ३० उपाये आणि ड वर्गवारीतील रस्त्य्नावर प्रतितास १० रुपये असे शुल्क आकारू पाहणारा प्रस्ताव महापलिकेत ठेवण्यात आला आहे . अर्थात यावर नेमके हि ३६ लाख वाहने वापरणाऱ्यांचे काय मत आहे ते आम्ही जाणून घेणार आहोत .. अशाच प्रयत्नातून आम्ही आज कोथरूडला भेट दिली .. आणि तेथील वाहनचालकांच्या घेतलेल्या या प्रातिनिधिक प्रतिक्रिया येथे देत आहोत .. पहा या प्रतिक्रिया ….