Home Blog Page 3199

थकबाकीदारांना अभय नको -प्रामाणीकांवर करवाढ नको -करवाढ स्थायी ने फेटाळली -प्रशासनाला स्थायी ची चपराक

0

पुणे –

अगोदर २४०० कोटी ची थकबाकी वसुलीसाठी मनापासून प्रयत्न करा ..नंतर प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या लोकांकडे पहा ..असा स्पष इशारा देत आणि प्रशासनाला चपराक देत स्थायी सामितीने आज प्रशासनाने सुचविलेली मिळकत करतील १५ टक्के करवाढ फेटाळून लावली . स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पुढील कालावधीत थकबाकी वसुलीसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण करावा असा आदेश प्रशासनाला दिला आहे.

महापालिकेच्या उत्पन्नात घट झाली असल्यामुळे २०१८-१९ या आर्थिक वर्षात मिळकत करात आणि पाणीपट्टीत प्रत्येकी १५ टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त कुणालकुमार यांनी स्थायी समितीपुढे ठेवला होता. तो आज झालेल्या स्थायी समितीच्या खास सभेत फेटाळण्यात आला आहे.

महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करण्यापूर्वी दरवर्षीच्या कर निश्चितीला २० फेब्रुरवारीच्या आत मान्यता घेणे बंधनकारक आहे. त्यानुसार आयुक्त कुणाल कुमार यांनी हा करवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. चालू आर्थिक वर्षात पालिकेचे उत्पन्न घटले आहे. त्यामुळे उत्पन्न आणि खर्चाची सांगड घालण्यासाठी २०१८-१९ या वर्षात मिळकत करात वाढ करणे आवश्यक आहे. मिळकत करात एकूण १५ टक्के वाढ सूचविली आहे. त्यात सर्वसाधारण करात चार टक्के, सफाई करात साडेचार टक्के, अग्निशामक करात अर्धा टक्के, जललाभ करात सव्वा टक्के, जलनिस्सारण लाभ करात अडीच टक्के आणि मनपा शिक्षण करात सव्वादोन टक्क्यांचा समावेश आहे.

विनोद दोशी नाट्य महोत्सव आता दहाव्या वर्षात

0

मोबाइल फोनच्या स्क्रीनवर घुटमळणाऱ्या आजच्या जगात, खरे अनुभव अभावानेच मिळतात. अशा वातावरणात विनोद दोशी नाट्यमहोत्सव नाटकाची संस्कृती जिवंत ठेवत आहे. प्रख्यात उद्योगपती आणि कलाप्रेमी विनोद दोशी यांच्या स्मृत्यर्थ सुरुवातीला या महोत्सवाची सुरुवात झाली. ह्या महोत्सवात एक दशक भारतातील उत्तमोत्तम नाटकं माचीत केली गेली. पुण्यात आयोजित होत असलेला हा महोत्सव आता दहाव्या वर्षात आहे आणि आजही तो सर्वोत्तम आहे.

गेल्या दशकात, महोत्सवात मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, पंजाबी भाषेतील आणि काही गैर-भाषिक नाटकं सादर केली गेली. विजय तेंडुलकर, मोहन राकेश, इस्मत चुगताई, गिरीश कार्नाड, सई परांजपे, नसीरुद्दीन शाह, रत्ना पाठक शाह, कुमुद मिश्रा, रघुबीर यादव, पल्लवी अरुण, सुनील शानबाग आणि इरावती कर्वे यांसारख्या महान कलावंतांना येथे स्थान मिळालं आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे भारतातील सर्वोत्कृष्ट नाटकं गजब कहाणी, उणे पुरे शहर एक, सिंधू सुधाकर रम आणि इतर, विनोद दोशी नाट्यमहोत्सवात सादर झाली. हे ऐतिहासिक वर्ष साजरं करण्यासाठी, यावर्षी उत्सव जुन्याची आठवण आणि भविष्याबाबतची आश्वासनं घेऊन येत आहे.

या वर्षी महोत्सवाची सुरुवात सतीश आळेकर लिखित व दिग्दर्शित ‘महानिर्वाण’ ह्या नाटकाने  होणार असून हे नाटक महोत्सवासाठी खास निर्मिती आहे. ह्यापूर्वी हे नाटक १० वर्षापूर्वी थियेटर अकादमी ने सादर केले होते तर ह्या वर्षी (२०१८) मध्ये नाटक कंपनी ते सदर करीत आहे. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी तमाशा थियेटर प्रस्तुत व सुनील शानबाग दिग्दर्शित ‘Words have been uttered’ हे वेगळ्या धाटणीचे नाटक सादर होत आहे.  हे नाटक सांस्कृतिक अभिव्यक्तीचा उपयोग करून साम्राज्याचा किंवा राजवटीचा निषेध ह्यापूर्वी  कसा केलाय ह्याचा आढावा घेते. तिसऱ्या दिवशी पूर्वा नरेश ह्याचं लिखित दिग्दर्शित हिंदी संगीतिका – बंदिश २०-२०,००० हर्ट्झ हे सादर होणार आहे.

२२ तारखेला नवी दिल्लीच्या कठकता ह्या  संस्थेचे ‘महाभारत’ एका वेगळ्या दृष्टीकोनातून सादर होईल. हे नाटक अनुरूपा रॉय दिग्दर्शित असून त्यात त्यांनी बुनराकू ह्या जपानी कठपुतळी कलेचा उपयोग केला आहे. १० व्या महोत्सवात शेवटी गिरीश कर्नाड लिखित ‘ययाती’ हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे. हे नाटक बेंगळूरू मधील जाग्रीती थियेटर च्या अरुंधती राजा ह्यांनी दिग्दर्शित केले आहे व ययाती ह्या नाटकाचा इंग्रजी प्रयोग प्रथमच पुण्यात सादर होणार आहे.

हा महोत्सव १९ फेब्रुवारी २०१८ पासून २३ फेब्रुवारी २०१८ पर्यंत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड येथे संपन्न होईल. यापूर्वी पुणे, मुंबई, बंगळुरू, नवी दिल्ली, कोलकाता, जयपूर, कणकवली आणि इम्फाळ यासारख्या ठिकाणांहून आलेल्या विविध भाषिक नाटकांमुळे हा महोत्सव महाराष्ट्रातील सर्वसमावेशक नाट्यमहोत्सव ठरतो.
विनोद अँड सरयू दोशी फाउंडेशनच्या सरयू दोशी म्हणाल्या,विनोद दोशी नाट्य महोत्सवाचा १०वा वर्धापन दिन साजरा करताना मला अत्यंत आनंद होत आहे. फाउंडेशनमध्ये हे सर्व आमच्यासाठी अतिशय जवळचे आहे. गेल्या दशकात, आम्ही या महोत्सवाप्रती वाढता उत्साह पाहिला आहे जो केवळ नाटकांच्या गुणवत्तेमुळेच नव्हे तर कलाक्षेत्रातल्या तरुणांच्या वाढत्या सहभागामुळेही आहे. अभिव्यक्ती आणि कार्यक्षमतेसाठी हे एक व्यासपीठ आहे ज्यासाठी आम्ही अथक काम केलं आहे. खूप प्रेमाने, आम्ही पुण्यातील लोकांसाठी ५ दिवसांचा केवळ नाटकांचा नव्हे तर जीवनाचाच उत्सव आयोजित करत आहोत !

महोत्सवाचे संचालक श्री. अशोक कुलकर्णी पुढे म्हणाले, हे एक अगदी विशेष दशक आहे. खास दशकपूर्तीसाठी ह्या वर्षी नाट्यमहोत्सवात आम्ही दोन अभिजात नाटकं पुनरुज्जीवित करत आहोत – एक मराठी आणि एक कन्नड, पूर्णत: नवीन प्रेक्षकांसाठी. ययाति‘ – १९६० च्या दशकात गिरीश कार्नाडांचं हे अभिजात नाटक, प्रथमच पुण्यात उभं राहील. ज्यांनी आम्हाला खूप वर्षांपासून खूप प्रेम दिलं त्या आमच्या प्रेक्षकांसाठी ही आमची खास भेट आहे. या उत्सवातला माझा आवडता भाग म्हणजे नाट्यप्रयोगानंतर कलाकार आणि प्रेक्षकांमधील अनौपचारिक संवाद. खुला संवाद चालू ठेवणं ही विनोद दोशी नाट्य महोत्सव करण्यामागची एक भावना आहे.

हा नाट्यमहोत्सव संपूर्ण महाराष्ट्रातील नाट्यरसिकांसाठी एक पर्वणीच आहे. इतर शहरातूनही लोक पुण्याला ह्यासाठी येतील. जर तुम्हाला जुन्या आणि नव्या जगात सैर करून यायची असेल आणि जर इतर नाट्यरसिकांना भेटून तुम्ही उत्साहित होत असाल, तर सरळ विनोद दोशी नाट्य महोत्सवाला या. प्रत्येकासाठी इथे काहीतरी आहे!

वेळापत्रक

दिवस तारीख आणि वेळ नाटक भाषा संस्था दिग्दर्शक
सोम १९ फेब्रुवारी | रात्रौ ७:३० वा. महानिर्वाण मराठी नाटक कंपनी, पुणे सतीश आळेकर
मंगळ २० फेब्रुवारी | रात्रौ ७:३० वा. वर्ड्स हॅव बीन अटर्ड उर्दू / हिंदी / इंग्रजी / पंजाबी तमाशा थिएटर, मुंबई सुनील शानबाग
बुध २१ फेब्रुवारी | रात्रौ ७:३० वा. बंदिश २० हर्ट्झ – २०००० हर्ट्झ हिंदी आरंभ, मुंबई पूर्वा नरेश
गुरु २२ फेब्रुवारी | रात्रौ ७:३० वा. महाभारत हिंदी / इंग्रजी कटकथा पपेट आर्टस्, नवी दिल्ली अनुरूपा रॉय
शुक्र २३ फेब्रुवारी | रात्रौ ७:३० वा. ययाती इंग्रजी जागृती थिएटर, बंगळुरू अरुंधती राजा

देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी-कीर्तनाचा सोहळा

0

जे जे आपणासी ठावे ते ते लोकांशी सांगावेया उक्तीने आजवर असंख्य कीर्तनकारांनी निरुपणाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप समाजमनात लावण्याचा प्रयत्न केला आहे. काव्य, संगीत, अभिनय व नृत्य यातून साकारणाऱ्या भक्तिरसपूर्ण कीर्तनाची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. ही परंपरा जोपासली जावी, भविष्याच्या दृष्टीनेही तिचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने फक्त मराठी वाहिनीने पुढाकार घेत देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी हा कीर्तनावर आधारित कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. लोकरंजनाने दिवसाची मंगलमय सुरुवात करणारा देवाचिया द्वारी कीर्तनाची वारी प्रेक्षकांना घरबसल्या पहाता येणार आहे. फेब्रुवारीपासून दररोज सोमवार ते रविवार सकाळी ७.३० ते ८.३० तसेच संध्याकाळी ६.०० ते ७.०० या वेळेत देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाणार आहे. या कार्यक्रमातून विविध विषयांवर अनेक कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून निरुपण करणार आहेत.

देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी या कार्यक्रमाबाबत बोलताना फक्त मराठीचे बिझनेस हेड श्याम मळेकर सांगतात की, फक्त मराठी वाहिनीने प्रत्येक वयोगटाच्या प्रेक्षकपसंतीचा विचार केला आहे. धकाधकीच्या दिनचर्येमुळे प्रत्येकवेळी बाहेर जाऊन कार्यक्रमांचा आस्वाद घेणं प्रत्येकाला शक्य होत नाही. अशा प्रेक्षकांचा विचार करून कीर्तनाचा आस्वाद प्रेक्षकांना घरातच घेता यावा या उद्देशाने या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. हा कार्यक्रम सकाळच्या प्रहरी प्रेक्षकांना मन:शांतीचा अनुभव देणारा ठरेल.

पालिका शाळेतील वर्ग बेकायदा बळकावून अर्थार्जनासाठी अभ्यासिका चालविल्याचा महापौर टिळकांवर आरोप

0
पुणे- महापालिकेच्या सदाशिव पेठेतील गोगटे प्रशालेतील वर्ग बेकायदा बळकावून तिथे वीज अन्य सुविधा मोफत पदरात पाडून घेवून महापौर मुक्ता टिळक यांच्या पतीने आर्थिक कमाई साठी अभ्यासिका चालवून भ्रष्टाचार चालविल्याचा आरोप करीत आज संभाजी ब्रिगेड ने या प्रकरणी तातडीने महापौरांवर कायदेशीर कारवाई करावी या मागणी साठी महाप्लीकेसमोर धरणे आंदोलन केले.
महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख सतीश कुलकर्णी हे याबाबत टिळकांना भ्रष्ट कारभारासाठी सहाय्य करत असल्याचा आरोप यावेळी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आला . ब्रिगेड चे पुणे अध्यक्ष संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले .

भाजपचे हे अंदाजपत्रक अखेरचेच – रमेश बागवे

0

पुणे-सत्तेत आल्यापासून भाजप सरकारने फक्त मुठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी धोरणे राबविल्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष अजुनही फिल गुड मुडमध्ये आहेत, हे देशाचे दुर्दैव आहे. हे अंदाजपत्रक गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या अपेक्षांना पुर्णत: तडा देणारे आहे. नोटाबंदी आणि घाईने अंमलबजावणी केलेल्या जीएसटीचे दुष्परिणाम अद्यापही जनता भोगतच आहे. त्यामुळे भाजपचे हे अंदाजपत्रक अखेरचेच ठरावे, हीच भावना सर्वसामान्य नागरिकांच्या पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.

भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचे हे यंदाचे अंदाजपत्रक जनतेची अपेक्षाभंग करणारे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना न देणारे आहे. शेतीची दुरवस्था, युवकांची बेरोजगारी, आरोग्य आणि शिक्षण या पायाभूत सुविधांबाबत आतापर्यंत दाखवलेली अनास्था यासारखे अनेक प्रश्न मागील चार वर्षात वाढले असून याला सरकारची धोरणेच कारणीभूत आहेत. हे जाणवल्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देशाची अर्थव्यवस्था सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न या अंदाजपत्रकातून दिसून येतो.

अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा- देसाई

0

अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजक परिषद संपन्न

पुणे ता. १ : अनुसूचित जाती जमातीच्या उद्योजकांची क्षमता उंचावण्यासाठी तसेच त्यांच्यातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी भारत सरकारच्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (एनएसआयसी)आणि दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (डिक्की) यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन केले होते. या परिषदेचे उदघाटन उद्योग आणि खाणकाम मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. पी. जी. एस. राव, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, उद्योजक आर. व्ही. गुप्ते, मनोज लाल, संदिप बेडसाळे, आमदार सुर्यकांत चाबुकस्वार आदी मान्यवर उपस्थित होते. अल्पबचत सांस्कृतिक भवन येथे. झालेल्या कार्यक्रमास दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, महिला विंग प्रमुख स्नेहल लोंढे, डिक्कीचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख देवानंद लोंढे, डिक्की महाराष्ट्र चे अविनाश जगताप, डिक्की (पश्चिम) चे निश्चय शेळके, एनएसआयसीचे पुणे विभाग प्रमुख विकास कुमार नायक उपस्थित होते.

डॉ. राव यांनी राष्ट्रीय अनुसुचित जाती जमाती हबच्या माध्यमातून उद्योजकांसाठी सरकारने काय काय सुविधा देवू केल्या आहेत याची तपशीलवार माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनुसुचित जाती जमाती हब (एनएसएसएच) सुरु करण्यात आले. याचा उद्देश अनुसुचित जाती जमातीच्या उद्योजकांना सक्षम करणे हा आहे. उद्योग सुरु करणे, वाढवणे यातील अडचणी दूर करणे, त्यांना अनुकुल परिस्थिती निर्माण करुन समृध्द बनविणे हा मुख्य उद्देश आहे. त्यांच उद्योजकांच्या मालकीच्या सूक्ष्म लघु, मध्यम उद्योग क्षेत्रासाठी सर्वोत्तम कार्यपध्दतीचा अवलंब करण्याचा आमचा प्रयत्न आहे. दलित आदीवासी उद्योजकांच्या आर्थिक सक्षणीकरणाचे मोठे कार्य यातून घडणार असून सब का साथ, सब का विकास या पंतप्रधांन मोदींनी दिलेल्या दिशेला अनुसरुन उचललेले महत्वपूर्ण पाऊल आहे.

देसाई म्हणाले की, शासनाच्या सर्व योजना लोकसहभागाशिवाय पूर्ण होणार नाही. मागासवर्गीय घटकांसाठी ज्या ज्या योजना आणल्या आहेत त्याचा लाभ सर्व घटकांनी घेतला तरच त्या योजना पूर्ण होतील. सरकार एखादी योजना जाहीर करते, त्या घोषणांची योजनांची अंमलबजावणी कोणी तरी करण्याची गरज असते.जनता आणि शासन यातील अंतर मिटविण्याचे काम डिक्कीने केले. देशाच्या औद्योगिक प्रगतीत महाराष्ट्राचा वाटा नेहमीच अग्रणी राहिला आहे. निर्यातीत तो ३५ टक्के इतका आहे. परदेशी गुंतवणुकीतही महाराष्ट्रालाच प्रथम पसंती दिली जात असल्याचे सिध्द झालेले आहे.

मिलिंद कांबळे म्हणाले की, अमेरिकेतील ब्लॅक कॅपीटलच्या धर्तीवर दलित कॅपीटल या देशात निर्माण केले पाहिजे. सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून अनुसूचित जाती आणि जमातींच्या उद्योजकांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत तसेच अनेक उपक्रमही राबविले जात आहेत. गेली काही वर्षे दलित उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही ‘डिक्की’ संस्थेच्या माध्यमातून सातत्याने विविध उपक्रम राबवित आहोत. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये एससी-एसटी हब साठी आर्थिक तरतूद करण्यात आली हा मोठा रोड मॅप ठरला आहे. आता केंद्राबरोबरच राज्य सरकारनेही पुढाकार घेतल्याने आमच्या कार्यास पाठबळ मिळेल.

या परिषदेस राज्याच्या विविध भागातून आठशे उद्योजकांनी सहभाग नोंदवला.. सध्याच्या एससी / एसटी आणि तळागाळातल्या उद्योजकांना एकत्र आणून यशस्वी व्यवसायासाठी त्यांना मार्गदर्शन करणे हा या परिषदेमागील मुख्य उद्देश होता. उद्योजकांची क्षमता वाढवून त्यांना आवश्यक ते सर्व सहाय्य करून सक्षम उद्योजक घडविणे, हे ध्येय आहे. उद्योग विश्वातील चालू घडामोडींविषयी उद्योजकांना जागृत करण्याबरोबरच भविष्यात राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाची माहिती, औद्योगिक क्षेत्रातील मान्यवर व तज्ज्ञांचे मार्गदर्शन सहभागी उद्योजकांना या परिषदेच्या माध्यमातून मिळाले.

महासत्ता बनण्याच्या दृष्टीकोनातून अर्थसंकल्पात सर्व घटकांना न्याय-खासदार संजय काकडे

0

पुणे, दि. 1 फेब्रुवारी : कृषी व ग्रामीण क्षेत्राला मोठा न्याय देणारा, शहरी व ग्रामीण विकासाचा समतोल साधतानाच गरीब कुटुंबांच्या आरोग्यासाठी ठोस पावले उचलणारा हा अर्थसंकल्प आहे. शेतीसह उद्योग व व्यापाराच्या दृष्टीकोनातून भारताला जगातील आर्थिक महासत्ता बनविण्याच्या दृष्टीकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा हा अत्यंत महत्वपूर्ण असा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केला, अशी प्रतिक्रिया भाजपाचे सहयोगी सदस्य व खासदार संजय काकडे यांनी दिली.

खासदार काकडे म्हणाले की, शेती व ग्रामीण विकास, गरीब व्यक्ती, रेल्वे, विमान, रस्ते, ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक अशा सर्वांसाठीच या अर्थसंकल्पात तरतुदी केल्याचे दिसते. सिंचन प्रकल्पांसाठी भरीव तरतूद, शेतीमालाला हमीभाव, कृषी उत्पादनांवरील प्रक्रिया उद्योग व शेती संलग्न व्यवसायासाठी तरतुदी या कृषी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा न्याय देणाऱ्या आहेत. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात चांगल्या सुविधा देता याव्यात यासाठी केंद्र सरकारचा चांगला प्रयत्न आहे. रेल्वे सेवा अत्याधुनिक करण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पावले टाकली आहेत. देशात येत्या वर्षभरात 70 लाख नवीन रोजगार निर्माण करण्यात येणार असल्याचे ठोस अभिवचन देण्यात आले आहे.

करांच्या स्लॅबमध्ये कोणतीही वाढ न करता एक प्रकारे केंद्र सरकारने नोकरदार वर्गाला दिलासाच दिला आहे. जेष्ठ नागरिकांना 50 हजारांच्या व्याजावरील करात सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गरीब कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या उपचारांची सोय करण्यात आली आहे. याचा फायदा तब्बल 10 कोटी गरीब कुटुंबांना होणार आहे.

कृषी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी तरतूद केल्याने यावर आधारीत असलेल्या लघु उद्योगांना त्याचा चांगला फायदा होईल. रस्ते, रेल्वे व विमानसेवा यासाठी चांगली तरतूद केली आहे. टेक्स्टाईल उद्योगासाठी मोठी तरतूद केली आहे. मुद्रा योजनेअंतर्गत 3 लाख कोटी रुपये कर्ज देण्याचं उद्दीष्ट ठेवले आहे.

नोटबंदी व जीएसटीचा मोठा फायदा झाल्याचे समोर येत आहे. करदात्यांची संख्या 12.5 टक्क्यांनी वाढली असून 90 हजार कोटींनी आयकरात वाढ झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय देशहिताचेच होते. हेच यावरून स्पष्ट होत आहे. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे कुटीर, लघू आणि मध्यम उद्योगांमध्ये वाढ झाली आहे. जीएसटी प्रक्रिया आणखी सोपी करण्याचे सूतोवाच करण्यात आले आहे.

डिजिटल इंडिया व स्किल इंडियासाठी केंद्र सरकारचे विशेष प्रयत्न आहेत. त्यासाठी तरतूदही केली आहे, असेही खासदार संजय काकडे यांनी म्हटले आहे.

खराडीतील जलतरण तलाव एक महिन्यात सुरू होणार

0

पुणे-खराडी भागामध्ये सर्व्हे नं. 4/1 मधील अनेक महिन्यापासून तयार असलेल्या जलतरण तलाव नागरिकांसाठी सुरू करण्यात यावा यासाठी आमदार जगदीश मुळीक यांनी मनपा आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेतली.

नागरिकांना मूलभूत सुविधा प्रमाणे इतर सुविधा देखील देण्यात याव्यात. तसेच परिसरातील अनेक नागरिकांना, तसेच तरुणांना खाजगी जलतरण तलावांमध्ये जावे लागत आहे. यामुळे त्यांना जास्त पैसे दयावे लागतात. तसेच भविष्यात खेळाडूंना देखील या जलतरण तलावाचा फायदा होणार आहे अशी माहिती आयुक्तांना देण्यात आली. यावर आयुक्त कुणाल कुमार यांनी जलतरण तलाव सुरू करण्यासाठी असलेल्या अडचणी दूर करून एक महिन्यात हा जलतरण तलाव सर्वांसाठी खुला करणार असल्याचे सांगितले.

करदात्या कुटुंबप्रमुखासाठी 85 रुपयात 5 लाखाचा विमा

0
मुरलीधर मोहोळ
अध्यक्ष स्थायी समिती ,पुणे मनपा

पुणे- महापालिकेच्या वतीने शहरातील करदात्या कुटुंबप्रमुखांचा अवघ्या 85 रुपयांमध्ये 5 लाख रुपयांचा विमा ‘दीनदयाळ उपाध्याय विमा योजने अंतर्गत उतरवण्यात येणार आहे. पालिकेच्या करदाता कुटुंबप्रमुख दुर्दैैवाने एखाद्या अपघातात सापडला तर त्याच्या कुटुंबाला या विमा योजनेचा फायदा होणार आहे.आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत योजनेला मंजुरी देण्यात आली.

‘दीनदयाळ उपाध्याय विमा योजनेसाठी महापालिकेच्या स्थायी समितीच्या 2017-18 च्या अंदाजपत्रकात ही योजना प्रस्तावित करण्यात अली असून त्यासाठी 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्या नुसार निविदा मागवण्यात आल्या होत्या.  त्यातील दि युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीला 85 रुपये प्रति दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिका यामध्ये प्रत्येक करदात्या कुटुंबाचा 85 रुपयांमध्ये 5 लाख रुपयांचा  उतरवणार आहे. त्याचे प्रमाणपत्र त्याला दिले जाईल. कराप्रमाणेच हा विमाही वार्षिक असेल. त्या वर्षात त्याला दुर्दैैवाने अपघात झाला तर त्याला विम्याचे पैसे तत्काळ मिळतील. याचीही रचना करण्यात आली आहे. थोडा जखमी असेल तर 25 हजार, गंभीर जखमी असेल तर 50 हजार, एखादा अवयव निकामी झाला असेल तर 1 लाख, त्यापेक्षा जास्त काही झाले असेल तर 2 ते 4 लाख व दुर्दैैवाने मुत्युमुखी पडल्यास 5 लाख रुपये दिले जातील.

डेक्कन कॉलेजच्या संवर्धनासाठी महापालिका खर्च करणार 50 लाख

0

पुणे- शहरातील एक महत्त्वाची हेरीटेज वास्तू असलेल्या डेक्कन कॉलेज व संशोधन संस्थेचे पुरातत्वशास्त्र, संस्कृत, मराठी इतिहास आणि प्रचीन भाषाशास्त्र या विषयांमध्ये मोठे योगदान आहे. या संस्थेने अनेक महापुरुष घडविले आहेत. या संस्थेचे ऐतिहासिक महत्त्व विचारात घेऊन या संस्थेचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. या कामासाठी महापौर निधीतून 50 लाख रुपये खर्च करण्यास मान्यता मागणारा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला होता त्याला मंजुरी देण्यात आली आहे.

महापालिका हद्दीत ग्रेड 1, ग्रेड 2, ग्रेड 3 प्रमाणे हेरिटेड वास्तुंची यादी तयार करण्यात आली आहे. शहरात एकूण 245 हेरिटेज वास्तू आहेत. पालिकेच्या हद्दीत असलेल्या हेरिटेज वास्तूंचे जतन आणि संवर्धन पालिकेतर्फे केले जाते. पुरातत्व विभाग, केंद्र शासन आणि राज्य शासन त्यांच्या अखत्यारित असलेल्या हेरिटेज वास्तूंचे जतन व संवर्धन करते. मात्र अनेक महत्त्वपूर्ण शैक्षणिक संस्था, ट्रस्ट, मिळकती निधी अभावी दुर्लक्षित राहतात. अशा महत्त्वपूर्ण वास्तुंपैकी डेक्कन कॉलेज संशोधन संस्था पालिकेच्या ग्रेड 1 यादीत समाविष्ट आहे.

ही संस्था 1834 साली बांधण्यात आलेली ही संस्था स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. या संस्थेत लोकमान्य टिळक, भांडारकर प्राच्य विद्या संस्थेचे संस्थापक आर.जी. भांडारकर, इतिहास तज्ज्ञ व्ही. के. राजवाडे, गोपाळ गणेश आगरकर, गुरुदेव रानडे, व्दारकानाथ कोटणीस यांच्यासारखे नामवंत विद्यार्थी घडले आहेत. या संस्थेत पुरातत्वशास्त्र, संस्कृत, मराठी इतिहास आणि प्रचीन भाषाशास्त्र या विषयांचे संशोधनाचे काम केले जाते. तसेच पुरातत्त्वशास्त्र आणि भाषाशास्त्र या विषयांमध्ये एम.ए., पी.एच.डीचे अध्यापन केले जाते. हे शिक्षण देणारी ही देशातील एकमेव संस्था आहे. या संस्थेत देशासह विदेशातील विद्यार्थी शिक्षणासाठी प्रवेश घेतात.

अशा या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या संस्थेच्या हेरिटेज इमारतीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. इमारतीवरील पत्रे खराब झाल्याने इमारतीमध्ये पावसाचे पाणी साचते. छताची लाकडे सडली आहेत. दगडी रेव्हींग खचले आहेत. ब्रिटीशकालीन कलाकृतीच्या खिडक्या फुटलेल्या आहेत. दगडी बांधकाम उखडले आहे, यासह विविध कामे करण्यासाठी महापौर निधीतून 50 लाख रुपये खर्च करण्याची सहमती स्थायी समितीने दिली आहे.

रणरागिणी महिला बहुद्देशीय संस्थेचा’ वर्धापनदिन उत्साहात

0
पुणे-घोरपडी येथील  ‘रणरागिणी महिला बहुद्देशीय संस्थेचा’ प्रथम वर्धापनदिन  उत्साहात व  मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी संस्थेमार्फत गेल्या वर्षभर राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. संस्थेने गेल्या एक वर्षात भरीव कामगिरी केली. संस्थेतील महिलांमार्फत स्वयंप्रेरणेने व स्वखर्चाने अंधशाळेत मुलांना खाऊवाटप व गरजू विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला धान्यवाटप, अहोरात्र जनसेवेसाठी कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस बांधवांसोबत भाऊबीज राखीपोर्णिमा साजरी केली,गरजू कुटुंबाला व्यवसायासाठी आर्थिक मदत, रागाने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीस पोलिसांमार्फत सुखरूप आई-वडिलांकडे सोपवले तसेच कडाक्याच्या थंडीत सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मेळघाट येथील आपल्या बंधु – भगिनींना व गरीब व गरजू विद्यार्थ्यांना उबदार व रोजचे घालण्याचे कपडे पाठवण्यात आले. या कामी मायभुमी  फाऊंडेशन चे श्री विजय दरेकर सर व तुबा फाउंडेशन च्या परी हमदुले यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी बोलताना “रणरागिणीच्या” अध्यक्षा अल्पना देशमुख म्हणाल्या की समाजात अनेक वाईट प्रवृत्ती आहेत पण सकारात्मक दृष्टिकोन व समाजाच्या उत्कर्षासाठी स्वतःचा स्वार्थ न पाहता उत्कर्ष पाहणारे जास्त आहेत.आपण सगळेजण एकत्र आलो तर दुष्प्रवृत्ती कमी होण्यास मदत होईल. याप्रसंगी आपापल्या क्षेत्रात उत्तम नावलौकिक असलेले व आपल्या गुणांचा, कलेचा व संपत्तीचा उपयोग वैयक्तिक स्वार्थासाठी न करता समाजाच्या भल्यासाठी करण्याऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुणे श्री अॅड.राजशेखर गायकवाडश, माजी नगरसेवक राजेंद्र वागसकर, नगरसेविका सौ. लता धायरकर, सुप्रसिद्ध डॉ. सौ वंदना डुबेपाटील, श्री. डॉ. विश्वराज हरनाळे, मा. श्री शशिकांतजी कवडे, श्री. दादा कोद्रे(जि. प), श्री अशोक पठारे,(भाजपा अध्यक्ष हडपसर वि. स) श्री. सागर बारदेसकर (चिटणीस. भाजपा युवा मोर्चा हडपसर वि. सभा मं. सं), श्री. बाळासाहेब जाधव (संचालक जाधव आदर्श विद्यालय), पत्रकार नितीनजी वाबळेश, सामाजिक कार्यकर्त्या निर्मला नायकर यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली व संस्थेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून मदत करण्याचे आश्वासन दिले.हा कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला, याप्रसंगी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. रणरागिणीच्या कार्यकारिणी सदस्या- सचिव मनिषा देशमुख,सल्लागार- करलीन अॅनथोनी, शांता चितारे,सारिका साळवी, सुरेखा चितारे, ज्योती स्वामीनारायण, अलका स्वामीनारायण, लक्ष्मी पुजारी, लता पुजारी, निर्मला नायकर, आशा पाटील, अर्चना जगताप, रेखा नायर, छाया वल्लमपलली, ग्रेसी डॅनियल, लिली फ्रांसीस व महिला वर्ग उपस्थित होता.
आभार प्रदर्शन सौ. ज्योती स्वामीनारायण यांनी केले.

दावोस से शाहरुख खान की कुछ अनदेखी तस्वीरें!

0

सुपरस्टार शाहरुख खान को भारत में बच्चों और महिलाओं के अधिकार के हित में उनके नेतृत्व के लिए एक पुरस्कार से सम्मानित किया गया।

दावोस में विश्व आर्थिक मंच पर यह 24 वां वार्षिक क्रिस्टल पुरस्कार था जहाँ शाहरुख खान को कैट ब्लैंचेट और गायक एल्टन जॉन के साथ पुरस्कार से नवाज़ा गया।

अभिनेता ने अपने सामाजिक पहल मीर फाउंडेशन के बारे में बड़े पैमाने पर बात की, जिसे अभिनेता ने अपने पिता के नाम पर नामित किया।

इस बारे में बात करते हुए शाहरुख खान ने कहा,”एक महिला को उसके चेहरे पर एसिड फेंकने से विचलित करने के लिए, मेरे लिए, पराजय के सबसे कमजोर, कुटिल कृत्यों में से एक है। इसके स्रोत पर यह धारणा है कि एक महिला को अपनी पसंद का दावा करने का अधिकार नहीं है, किसी व्यक्ति या लोगों के समूह की अग्रिमों को ना कहने का हक नही है।”

उन्होंने आगे कहा कि पीड़ितों ने उन्हें सिखाया कि कैसे साहस, उत्पीड़न में वीरता की हिम्मत कर सकते हैं, कैसे दान की जगह एकजुटता मानव को सक्ष्म बनाने के मददगार साबित होता है। कैसे समानता एक अवधारणा नहीं है लेकिन एक सच है जिसमे सभी प्राणि शामिल है। कैसे दुसरो की सेवा अब हम सब के लिए एक विकल्प नहीं है लेकिन यह एक कर्तव्य है कि हम सभी को मानव जाति के नाम पर पूरा करना होगा।”

अभिनेता ने अपनी गैर-लाभदायक मीर फाउंडेशन के माध्यम से मानव गरिमा को बनाए रखने के लिए एक अनुकरणीय प्रतिबद्धता दिखाने के लिए पुरस्कार प्राप्त किया।

महिलाओं और बाल अधिकारों के बारे में उनका भाषण सुनकर दुनिया के टॉप नीति निर्माता और अधिकारि उनकी हर बात के मुरीद हो गए।

सुपरस्टार ने अपनी स्वर्गीय मां, पत्नी और बेटी को प्रेरणा देने के लिए भी तह दिल से धन्यवाद किया।

सॅमसंग विकास कार्यासाठी 1000 अभियंता नेमणार

0

पुणेसॅमसंग इंडिया आपल्या संशोधन आणि विकास केंद्रांसाठी 2018 साली आयआयटी, आयआयएम, आयआयआयटी सारख्या सर्वोत्तम महाविद्यालयातून 1,000 अभियंता निवडणार आहे. निवडलेल्या अभियंतांपैकी बहुतांश उमेदवार आधुनिक अद्ययावत तंत्रज्ञानावर काम करतील, जसे आर्टिफिश्यल इंटेलिजेंस, इंटरनेट ऑफ थिंग्झ (आयओटी), मशीन लर्निंग, बायोमेट्रिक, नॅच्युरल लॅंगवेज प्रोसेसिंग, ऑग्मेन्टेड रियालिटी आणि 5जी सारखे नेटवर्क इत्यादी.आयआयटी आणि एनआयटी व्यतिरिक्त दिल्ली कॉलेज ऑफ इंजीनीरिंग, बिट्स पिलानी, मनिपाल इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी आणि आयआयआयटी सारख्या इतर प्रमुख महाविद्यालयातून सुद्धा सॅमसंग गुणवंत आणि प्रतिभावंत उमेदवार निवडणार आहे.

मागच्या वर्षी सॅमसंगने आपल्या संशोधन आणि विकास केंद्रासाठी 800 अभियंता निवडले होते, आणि त्यापैकी 300 उमेदवार आयआयटी मधील विद्यार्थी होते.

ह्या वर्षीसुद्धा सॅमसंग आयआयटी मधून 300 अभियंता निवडून त्यांना विविध क्षेत्रात काम देणार आहे, जसे आर्टिफिश्यल इंटेलिजेंस, इंटरनेट ऑफ थिंग्झ (आयओटी), मशीन लर्निंग, बायोमेट्रिक, नॅच्युरल लॅंगवेज प्रोसेसिंग, ऑग्मेन्टेड रियालिटी आणि 5जी सारखे नेटवर्क इत्यादी.जगभरात सॅमसंगची 32 संशोधन आणि विकास केंद्रे आहेत.भारतात सॅमसंगची 3 संशोधन आणि विकास केंद्रे आणि 2 निर्मिती केंद्रे आहेत.संशोधन आणि विकास केंद्रे बेंगळुरू, नोयडा आणि दिल्ली इथे आहेत.दक्षिण कोरिया वगळता सॅमसंगचे सगळ्यात मोठे संशोधन आणि विकास केंद्र बेंगळुरुमध्ये आहे.संगणक विज्ञान सारख्या पारंपारिक शाखेव्यतिरिक्त इतर शाखांमधून पण विद्यार्थी निवडले गेले आहेत, जसे इलेक्ट्रिकल इंजीनीरिंग, गणित आणि संगणकशास्त्र, अप्लाइड मेकॅनिक्स, संख्याशास्त्र इत्यादी.

दक्षिण कोरिया वगळता सॅमसंगच्या बेंगळुरूमधील सगळ्यात मोठ्या संशोधन आणि विकास केंद्रात आर्टिफिश्यल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग, नॅच्युरल लॅंगवेज प्रोसेसिंग, इंटरनेट ऑफ थिंग्झ (आयओटी), ऑग्मेन्टेड रियालिटी आणि ५जी नेटवर्क इत्यादी विषयात कौशल्य उपलब्ध आहे.नोयडा केंद्राची बायोमेट्रिक्स, मोबाइल सॉफ्टवेअर, मल्टीमीडिया, डेटा संरक्षण इत्यादी क्षेत्रात प्रमुख भूमिका आहे.उच्च दर्जाचे टीव्ही, इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि टायझेन ऑपरेटिंग सिस्टम ह्यासंबंधी संशोधन प्रामुख्याने दिल्लीत केले जाते.सन 1996 पासून सॅमसंग भारतात निर्मिती व संशोधन आणि विकास कार्य करीत आहे.बेंगळुरूमधील संशोधन आणि विकास केंद्र आणि नोयडामधील निर्मिती केंद्र हे 1996 साली स्थापित केले गेले.

भारतातील संशोधन आणि विकास केंद्रात जगभरातील उत्पादनांसाठी संशोधन केले जाते आणि त्याच बरोबर भारतातील स्थानिक बाजारासाठी पण विशिष्ट संशोधन केले जाते.

कंपनीच्या संशोधन केंद्रांमध्ये विकसित झालेल्या अनेक “मेड इन इंडिया” कल्पना, जसे एस-बाइक मोड, अल्ट्रा डेटा सेव्हिंग मोड, वॉशिंग मशीनसाठी अॅक्टिववॉश+ इत्यादी, आज भारतात आणि इतर काही विकसनशील देशात विकल्या जाणार्‍या सॅमसंग उत्पादनांचा एक भाग आहेत. ह्यापैकी काही नवीन शोध सॅमसंगच्या जागतिक उत्पादनांचा पण भाग झाले आहेत.

–   सॅमसंगने अनेक कल्पक उत्पादने, आणि अद्ययावत तंत्रज्ञान असलेली विशेष वैशिष्ठ्ये भारतात निर्माण केली आहेत आणि भारतासाठी निर्माण केली आहेत.-   आमच्या कामाचे नवीनतम उदाहरण म्हणजे भारतासाठी निर्माण केलेली बिक्स्बी वॉइस क्षमता जी गॅलक्सी नोट 8 स्मार्टफोन बरोबर लॉन्च केली गेली. भारतातील ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून नवीन कल्पना आणण्याच्या सॅमसंगच्या इतिहासाला अनुसरून बिक्स्बी हे इंटेलिजेंट इंटरफेस आता भारतीय उच्चारण पद्धतीतील इंग्रजी समजू शकते.

–   भारतात सॅमसंग पे लॉन्च करताना अॅपमध्ये डेबिट कार्ड, मोबाइल वॉलेट पेटीएम, आणि सरकारचे युनिफाईड पेमेंट इंटरफेस पण समाविष्ट केले आहे.

–   गॅलक्सी एस8 मधील कॅमेराची नवीन वैशिष्ठ्ये जसे हळू/जलद मोशन, पॅनोरामा इत्यादी आणि गॅलक्सी नोट8 मधील सेल्फी घेताना असलेला बोकेह मोड हे पण एसआरआय-बी मध्ये विकसित झाले आहेत.

–   एसआरआय ने नुकताच सोशल कॅमेरा विकसित केला आहे. हा कॅमेरा गॅलक्सी जे7 मॅक्स आणि जे7 प्रो मध्ये समाविष्ट केला गेला आहे. सॅमसंगच्या सोशल कॅमेरामुळे वापरणार्‍या व्यक्तिला फोटो आणि व्हिडिओ त्वरित शेअर करता येतात, संपादित करता येतात आणि शोधता येतात. सोशल कॅमेरा विकसित करण्यासाठी भारतातील विविध टीम्सना मोठ्या प्रमाणात सहकार्य करावे लागले. एसआरआय-बेंगळुरूने स्मार्टफोनमधील कॅमेरासाठी सोशल शेअर, लाइव्ह फिल्टर, लाइव्ह स्टिकर विकसित केले, आणि एसआरआय-नोयडाने जियो-लाइक आणि ऑग्मेन्टेड रियालिटी डिफरेन्सिएशन विकसित केले.

नवीनतम तंत्रज्ञानाची माहिती असावी म्हणून सॅमसंगमधील अभियंतांची सतत शिकण्याची प्रक्रिया सुरू असते. आयआयआयटी-बेंगळुरू बरोबर आम्ही एम-टेक अभ्यासक्रम सुरू केला आहे ज्याचा एक भाग म्हणून शनिवारी आणि रविवारी महाविद्यालयातील प्राध्यापक सॅमसंगच्या संशोधन आणि विकास केंद्रात येऊन कठीण निवड प्रक्रियेतून निवडलेल्या विद्यार्थ्यांना शिकवतात.

आयआयटी बरोबरचा आमचा संबंध फक्त उमेदवार निवडणे एवढाच नाही, तर वर्षभरात आम्ही आयआयटी आणि इतर संस्थांबरोबर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करतो.

उदाहरण:

सॅमसंग डिजिटल अकॅडेमी उपक्रमांतर्गत सॅमसंगने इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलजी, दिल्ली मध्ये सॅमसंग आयओटी इनोवेशन लॅब सुरू केले आहे.

2017 साल हे पुरस्कार देण्याचे सातवे वर्ष असेल. उद्योजकता सेलच्या मदतीने हे पुरस्कार प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या आयआयटी मध्ये आयोजित केले जातात. ज्या विद्यार्थ्यांनी/ गुणवंत व्यवसायिकांनी कल्पक दृष्टीकोन वापरुन विविध प्रणाली आणि प्रक्रिया सुधारण्याचा प्रयत्न केला आहे व स्थानिक उत्पादने आणि सेवा विकसित केल्या आहेत त्यांना हे पुरस्कार आधार देण्याचे काम करतात आणि प्रोत्साहित करतात.

दर वर्षी इंडियन रिसर्च नेटवर्क नावाचा 1 दिवसाचा परिसंवाद आयोजित केला जातो. ह्यामध्ये एक विषय निवडून त्या विषयातील संशोधक आणि एसआरआय-बी मधील वरिष्ठ व्यवस्थापक ह्यांच्या बरोबर सत्र आयोजित केले जाते. असे केल्याने सर्वोत्तम प्रशिक्षकांशी संबंध येतो आणि भविष्यात सहकार्य करण्याची संधी निर्माण होऊ शकते.

एसआरआय-बी आणि आयआयआयटी-बेंगळुरू ह्यांच्यामधील करारानुसार सॅमसंगच्या कर्मचार्‍यांना संगणक विज्ञानात एम-टेक पदवी दिली जाते. कर्मचारयांना कठीण प्रवेश परीक्षा द्यावी लागते आणि त्यानंतर एक आंतरिक निवड प्रक्रियेतून जावे लागते आणि मगच त्यांना एमटेक अभ्यासक्रमात प्रवेश मिळतो. आयआयआयटीबी मधील प्राध्यापक शनिवारी आणि रविवारी बेंगळुरूमधील सॅमसंग कंपनीत येऊन शिकवतात.

एसआरआय-बी मध्ये संशोधन कौशल्य वाढवण्यासाठी आम्ही आयआयटी सारख्या सर्वोत्तम महाविद्यालयांबरोबर सहकार्य करून आमच्या कर्मचार्‍यांना पीएचडी अभ्यासक्रमासाठी प्रायोजित करतो. आमच्या गुणवंत कर्मचार्‍यांना नवीन कौशल्य/ संशोधन विषय शिकायची संधी मिळावी म्हणून हा उपक्रम आम्ही सुरू केला आहे.

हा कार्यक्रम 2014 साली सुरू झाला. आज पर्यन्त आम्ही आयआयटी/आयआयएससी मध्ये बाह्य संशोधन प्रायोजक कार्यक्रमांतर्गत 5 कर्मचार्‍यांना प्रायोजित केले आहे. सॅमसंगमधील वरिष्ठ सल्लागार/ संशोधक अशा कर्मचार्‍यांना सतत मदत करतात, आधार देतात आणि प्रोत्साहित करतात.

सॅमसंगच्या वरिष्ठ अधिकार्‍यांचे मत

श्री दिपेश शाह, व्यवस्थापकीय संचालक, सॅमसंग भारतीय आर&डी संस्था, बेंगळुरू आणि जागतिक वरिष्ठ उपाध्यक्ष, सॅमसंग म्हणतात, “भारतात होणार्‍या संशोधन आणि विकासाकडून सॅमसंगच्या मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहे. आम्ही 22 वर्षांपासून भारतात आहोत. भारतातील तीन संशोधन आणि विकास केंद्रात अद्ययावत संशोधन केले जाते. “मेक इन इंडिया” उपक्रमांतर्गत, भारतातील संशोधन आणि विकास केंद्रात भारतीय ग्राहकाला केंद्रस्थानी ठेवून नवीन कल्पनांचा विचार केला जात आहे आणि त्याचा उपयोग जगभरातील सॅमसंग उत्पादनात पण केला जातो”.

ते पुढे म्हणाले, “ह्या वर्षी सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयातून आमच्या 3 संशोधन आणि विकास केंद्रांसाठी आम्ही 1,000 अभियंता निवडणार आहोत, ज्या पैकी 300 आयआयटी मधील असतील. बहुतांश अभियंता आर्टिफिश्यल इंटेलिजेंस, मशीन लर्निंग, सिग्नल प्रोसेसिंग, कम्प्युटर विझन, मोबाइल सुरक्षा, बायोमेट्रिक्स इत्यादी सारख्या क्षेत्रात काम करतील. तिथे प्रतिभा आणि कौशल्याची खूप आवश्यकता आहे.”

फक्त मराठीची ‘व्हॅलेंटाइन भेट’

0

१४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाइन डे प्रेमिकांसाठी महत्त्वाचा दिवस. प्रेमवीर हा सोहळा उत्साहात साजरा करतात. प्रेमाचा हा दिवस साजरा करण्याची प्रत्येकाची रीत मात्र न्यारी असते. कुणी समुद्र किनारी, कुणी कट्ट्यावर, हॉटेलमध्ये तर कुणी कँडल लाइट डीनर घेत, आपलं प्रेम व्यक्त करत, ‘व्हॅलेंटाइन डे साजरा करतात. या व्हॅलेंटाइन डे चे औचित्य साधत प्रेमाची खास गोष्ट शेअर करण्यासाठी फक्त मराठी वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.

प्रेक्षकांना आपल्या ‘प्रेमाची गोष्ट’ एका व्हिडीओद्वारे शेअर करायची आहे. हा व्हिडीओ १ मिनिटांचा असणे आवश्यक आहे. आपल्या प्रेमळ आठवणींना उजाळा देणारे व्हिडीओ प्रेक्षकांना शनिवार १० फेब्रुवारी पर्यंत ७७१००८८४४५ या व्हॉट्सअप नंबरवर पाठवायचे आहेत. व्हॅलेंटाइन डे ला म्हणजे १४ फेब्रुवारीला हे खास व्हिडीओ फक्त मराठी वाहिनीवर दाखवण्यात येणार आहेत. विजेत्या प्रेक्षकांना खास भेटवस्तू देण्यात येणार आहे. त्यामुळे हा व्हॅलेंटाइन डे फक्त मराठी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी अविस्मरणीय ठरेल हे नक्की.

बँक ऑफ महाराष्ट्र तर्फे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन

0

पुणे: प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बँक ऑफ महाराष्ट्रनी आपल्या देशभरातील महत्वाच्या शाखां आणि प्रशासकीय कार्यालयाद्वारे स्वच्छतेची मोहीम आयोजित केली. बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ श्री रविंद्र मराठे, कार्यकारी संचालक श्री आर के गुप्ता आणि श्री ए सी राऊत यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन केले होते.

बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रविंद्र मराठे म्हणाले “आम्हास विश्वास वाटतो की, आमच्या बँकेचे राज्यामध्ये सर्वाधिक शाखांचे जाळे आहेत आणि त्या माध्यमातून स्वच्छता आणि दीर्घकालीन आरोग्यदायी पर्यावरण संदर्भात जागरूकता आणणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही हाती घेत असलेल्या पुढाकाराने सामान्यजनांवर दीर्घ आणि चिरस्थायी ठसा उमटेल.”

लोकांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जागरूकता आणण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्राच्या देशभरातील शाखांद्वारे विविध उपक्रम राबवण्यात आले. बँकेनी दिल्ली येथे ‘स्वच्छता रॅली’, पनवेल येथील ओरियन मॉलमध्ये हिन्दी आणि मराठी भाषेतील पथनाट्य तर रायपूरमध्ये उद्यान स्वच्छतेचे कार्य हाती घेण्यात आले. याशिवाय बँकेनी एका लघु चित्रफितीची निर्मिती केली असून ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये या चित्रफितीचे प्रदर्शन होणार असून स्वच्छतेविषयी ‘स्वच्छता पंधरवड्यादरम्यान नागरिकांमध्ये संवेदनशीलता आणण्याचा प्रयत्न केला जाईल. स्वच्छता मोहिमेस अधिक व्यापकता येण्याच्या जनजागृतीच्या दृष्टीने बँकेतर्फे ऑटोरिक्षांवर पोस्टर्स लावली आहेत.

श्री मराठे पुढे म्हणाले की, “शारीरिक स्वच्छता ही पुरेशी नसून स्वच्छता ही मनापासून आली पाहिजे. दृश्य स्वरूपाद्वारे पोहोचवलेला संदेश लोकांवर दीर्घकालीन परिणाम करणारा असतो. दैनंदिन स्वच्छंता राखण्याच्या आणि स्वच्छ राहण्याच्या सवयींमुळे व्यवसायाच्या ठिकाणी आणि जनसमूहाच्या ठिकाणी आरोग्यदायी पर्यावरण राहू शकेल. आम्ही आमच्या पूर्ण संसाधनांसहित ‘स्वच्छता पंधरवडा’ साजरा करण्याचे ठरवले आहे.