रणरागिणी महिला बहुद्देशीय संस्थेचा’ वर्धापनदिन उत्साहात
पुणे-घोरपडी येथील ‘रणरागिणी महिला बहुद्देशीय संस्थेचा’ प्रथम वर्धापनदिन उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी संस्थेमार्फत गेल्या वर्षभर राबविण्यात आलेल्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. संस्थेने गेल्या एक वर्षात भरीव कामगिरी केली. संस्थेतील महिलांमार्फत स्वयंप्रेरणेने व स्वखर्चाने अंधशाळेत मुलांना खाऊवाटप व गरजू विद्यार्थिनींच्या वसतिगृहाला धान्यवाटप, अहोरात्र जनसेवेसाठी कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस बांधवांसोबत भाऊबीज राखीपोर्णिमा साजरी केली,गरजू कुटुंबाला व्यवसायासाठी आर्थिक मदत, रागाने जाणाऱ्या अल्पवयीन मुलीस पोलिसांमार्फत सुखरूप आई-वडिलांकडे सोपवले तसेच कडाक्याच्या थंडीत सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून मेळघाट येथील आपल्या बंधु – भगिनींना व गरीब व गरजू विद्यार्थ्यांना उबदार व रोजचे घालण्याचे कपडे पाठवण्यात आले. या कामी मायभुमी फाऊंडेशन चे श्री विजय दरेकर सर व तुबा फाउंडेशन च्या परी हमदुले यांचे सहकार्य लाभले. याप्रसंगी बोलताना “रणरागिणीच्या” अध्यक्षा अल्पना देशमुख म्हणाल्या की समाजात अनेक वाईट प्रवृत्ती आहेत पण सकारात्मक दृष्टिकोन व समाजाच्या उत्कर्षासाठी स्वतःचा स्वार्थ न पाहता उत्कर्ष पाहणारे जास्त आहेत.आपण सगळेजण एकत्र आलो तर दुष्प्रवृत्ती कमी होण्यास मदत होईल. याप्रसंगी आपापल्या क्षेत्रात उत्तम नावलौकिक असलेले व आपल्या गुणांचा, कलेचा व संपत्तीचा उपयोग वैयक्तिक स्वार्थासाठी न करता समाजाच्या भल्यासाठी करण्याऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात आला. प्रमुख पाहुणे श्री अॅड.राजशेखर गायकवाडश, माजी नगरसेवक राजेंद्र वागसकर, नगरसेविका सौ. लता धायरकर, सुप्रसिद्ध डॉ. सौ वंदना डुबेपाटील, श्री. डॉ. विश्वराज हरनाळे, मा. श्री शशिकांतजी कवडे, श्री. दादा कोद्रे(जि. प), श्री अशोक पठारे,(भाजपा अध्यक्ष हडपसर वि. स) श्री. सागर बारदेसकर (चिटणीस. भाजपा युवा मोर्चा हडपसर वि. सभा मं. सं), श्री. बाळासाहेब जाधव (संचालक जाधव आदर्श विद्यालय), पत्रकार नितीनजी वाबळेश, सामाजिक कार्यकर्त्या निर्मला नायकर यांनी मार्गदर्शनपर भाषणे केली व संस्थेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करून मदत करण्याचे आश्वासन दिले.हा कार्यक्रम यशस्वी संपन्न झाला, याप्रसंगी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. रणरागिणीच्या कार्यकारिणी सदस्या- सचिव मनिषा देशमुख,सल्लागार- करलीन अॅनथोनी, शांता चितारे,सारिका साळवी, सुरेखा चितारे, ज्योती स्वामीनारायण, अलका स्वामीनारायण, लक्ष्मी पुजारी, लता पुजारी, निर्मला नायकर, आशा पाटील, अर्चना जगताप, रेखा नायर, छाया वल्लमपलली, ग्रेसी डॅनियल, लिली फ्रांसीस व महिला वर्ग उपस्थित होता.
आभार प्रदर्शन सौ. ज्योती स्वामीनारायण यांनी केले.