पुणे-सत्तेत आल्यापासून भाजप सरकारने फक्त मुठभर उद्योगपतींच्या फायद्यासाठी धोरणे राबविल्यामुळेच देशाची अर्थव्यवस्था संकटात आली आहे. असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचा पक्ष अजुनही फिल गुड मुडमध्ये आहेत, हे देशाचे दुर्दैव आहे. हे अंदाजपत्रक गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या अपेक्षांना पुर्णत: तडा देणारे आहे. नोटाबंदी आणि घाईने अंमलबजावणी केलेल्या जीएसटीचे दुष्परिणाम अद्यापही जनता भोगतच आहे. त्यामुळे भाजपचे हे अंदाजपत्रक अखेरचेच ठरावे, हीच भावना सर्वसामान्य नागरिकांच्या पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.
भाजपच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारचे हे यंदाचे अंदाजपत्रक जनतेची अपेक्षाभंग करणारे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना न देणारे आहे. शेतीची दुरवस्था, युवकांची बेरोजगारी, आरोग्य आणि शिक्षण या पायाभूत सुविधांबाबत आतापर्यंत दाखवलेली अनास्था यासारखे अनेक प्रश्न मागील चार वर्षात वाढले असून याला सरकारची धोरणेच कारणीभूत आहेत. हे जाणवल्यामुळेच आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून देशाची अर्थव्यवस्था सावरण्याचा केविलवाणा प्रयत्न या अंदाजपत्रकातून दिसून येतो.