Home Blog Page 3187

पुणे परिमंडलातील 60 हजार थकबाकीदारांची वीज खंडित

0

पुणे परिमंडलातील 60 हजार थकबाकीदारांची वीज खंडित

पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागात वीजबिलांचे थकबाकीदार असलेल्या 60 हजार 241 घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांचा वीजपुरवठा गेल्या पंधरवड्यापासून सुरु असलेल्या ‘शून्य थकबाकी’ मोहिमेत खंडित करण्यात आला.

दरम्यान, ही मोहीम सुटीच्या दिवशीही सुरु राहणार असल्याने दि. 24 व 25 फेब्रुवारीला महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरु ठेवण्यात येणार आहेत.

पुणे परिमंडलात वीजबिलांची थकबाकी वसुल करण्यासाठी ‘शून्य थकबाकी’ची विशेष मोहिम सुरु झाली आहे. बुधवार (दि. 21) पर्यंत पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील 29 कोटी 45 लाख रुपयांची थकबाकी असलेल्या 60 हजार 241 वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक अशा 45 हजार 693 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 18 कोटी 90 लाख रुपयांच्या थकबाकीपोटी खंडित करण्यात आला आहे. तसेच मुळशी, जुन्नर, आंबेगाव, मावळ, खेड तालुक्यातील 14 हजार 548 थकबाकीदारांचा वीजपुरवठा 10 कोटी 56 लाखांच्या थकीत वीजबिलांमुळे खंडित करण्यात आला आहे.

या मोहिमेमुळे थकबाकी व चालू वीजबिलांचा वीजग्राहकांना भरणा करता यावा म्हणून पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र दि. 24 व 25 फेब्रुवारीला सुटीच्या दिवशी सुरु राहणार आहेत. वीजग्राहकांकडे किती रक्कम थकीत आहे हे न पाहता वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केद्रांसह व घरबसल्या ‘ऑनलाईन’ पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.

– शनिवारी व रविवारी पर्यवेक्षणासाठी प्रादेशिक कार्यालयाचे विशेष पथके

पुणे, पिंपरी चिंचवड शहरांसह ग्रामीण भागात थकबाकीदार ग्राहकांच्या वीजजोडण्या खंडित करण्याचे व सुटीच्या दिवशीसुद्धा ही कारवाई आक्रमकपणे सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याचे पर्यवेक्षण करण्यासाठी प्रादेशिक कार्यालयातील अधिकार्‍यांचे विशेष पथक शनिवारी व रविवारी पुणे परिमंडलात विविध ठिकाणी भेटी देऊन थकबाकीदारांविरुद्ध सुरु असलेल्या कारवाईबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे सोपविणार आहे.

केवळ फसव्या घोषणांची भाजपची वर्षपूर्ती ! – खासदार वंदना चव्हाण

0

पुणे : 

भारतीय जनता पक्षाचा महानगरपालिकेतील एक वर्षांचा कारभार बघितला तर केवळ फसव्या घोषणांची वर्षपूर्ती झाली असेच म्हणावे लागेल. कारण पीएमपीची बस खरेदी, महिला, कामगार, आर्थिक दुर्बल घटक वर्ग यांच्यासाठी 50 मार्गांवर मोफत बस प्रवास, दोन बीआरटी मार्गांवर पुणेकरांना मोफत प्रवास, बस खरेदीसाठी केंद्र आणि राज्य सरकारचा निधी आणणार, विकास आराखड्यीाच अंमलबजावणी करणार, शहरात सर्वत्र पुरेसे आणि पुरेशा दाबाने 24 तास पाणी पुरवठा करणार, रिंग रोडचे काम पूर्ण करणार, स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना गती देणार, नदी सुधारणेच्या प्रकल्पात लोकसहभाग घेणार, प्रत्येक प्रभागात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारणार आदी अनेक घोषणा भाजपने केल्या होत्या. परंतु, वर्षभरात यातील काहीही झालेले नाही.

पीएमपीच्या १३०० बसची खरेदी अजूनही निविदेच्या प्रक्रियेतच अडकली आहे, बीआरटीचे मार्ग एक किलोमीटरनेही वाढलेले नाही, विकास आराखड्याची अंमलबजावणी अजूनही सुरू झालेली नाही, झोपडपट्टीधारकांसाठी एक वर्षांत १० हजार घरे “अमृत आवास’ योजनेतून बांधण्यात येतील, तेही अजूनही झालेले नाही. २४ तास समान पाणी पुरवठा योजनेची निविदा तब्बल एक हजार कोटी रुपयांनी फुगविण्यात आली होती. परंतु, राष्ट्रवादी कॉंग्रेसने केलेल्या विरोधामुळे पुणेकरांचे एक हजार कोटी रुपये वाचले आहेत.

पुणेकर गेली दोन वर्षे वाढीव दराने पाणीपट्टी देत असतानाही शहराच्या मध्यभागात आणि उपनगरांत पाणी पुरवठ्याची समस्या कायम आहे. विकेंद्रीत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचे नियोजन अजूनही झालेले नाही. प्रत्येक प्रभागात 1 प्रकल्प उभारण्याची घोषणा कशी फसवी होती, हेच दिसून येत आहे. पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेत असताना विधवा महिला,जेष्ठ नागरिक,अपंग व गरजु विद्यार्थी यांच्यासाठी ‘माता रमाई आंबेडकर योजना’ ,’माता जिजाऊ योजना’, ‘शरद स्वावलंबी योजना’ व ‘डाॅ बाबा आमटे योजना’ या योजना सुरू केल्या होत्या. या सर्व योजनांचा लाभ समाजातील विविध घटकांना मिळत होता. पण महापालिकेत सत्तेत आल्यानंतर या भाजप सत्ताधारयांनी या सर्व कल्याणकारी योजना बंद करत सामान्य व गरजू नागरिकांचा हक्कच हिरावुन घेतला आहे.

ऍमिनिटी स्पेसच्या जागा वापरांचा आराखडा तयार करून त्याचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करण्याची घोषणाही हवेतच विरली आहे. नदी सुधारणेच्या प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य सरकारचा निधी आणण्याची घोषणाही पोकळ ठरली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस- कॉंग्रेसने पुण्यासाठी “जायका’ प्रकल्प मंजूर केला. परंतु, त्याच्या अंमलबजावणीचीही प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही. बीडीपी जाहीर करून दोन वर्षे झाली असली तरी त्याचा मोबदला देण्याचे धोरण अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे टेकड्यांवर अनधिकृत बांधकामे वाढू लागली आहेत. अन त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे.

स्मार्ट सिटीतंर्गत ५१ प्रकल्पांची घोषणा करण्यात आली होती. त्यातील १४ प्रकल्पांचे भूमिपूजन -उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. परंतु, त्यातील मोफत वाय-फाय, प्लेसमेकींग, डिजिटल डिस्प्ले बोर्ड, सायकल शेअरींग, लाईट हाऊस आदी पाच प्रकल्पच सुरू आहेत. संपूर्ण शहरासाठी ई- बस, एटीएमएस, ओपन डेटा, स्मार्ट एलिमेंट, रोड ऍसेट मॅनेजमेंट, स्ट्रीट लाईटनिंग, ट्रान्झिट हब, आयटी सेन्सर्स, स्मार्ट पार्किंग, इनोव्हेशन हब, ई- रिक्षा, स्मार्ट ग्रीड आदी अनेक प्रकल्प रखडले आहेत. स्मार्ट सिटीच्या १६ पैकी १४ सल्लागार फिरकत नसल्यामुळे त्यांचे पैसे थांबविण्याची वेळ स्मार्ट सिटी कंपनीवर आली होती, असे संचालक मंडळाच्या बैठकीत उघड झाले आहे. भाजपचेच पालकमंत्री, आमदार स्मार्ट सिटीच्या कामावर नाराज असल्याचे वारंवार उघड झाले आहे.

कात्रज- कोंढवा रस्ता, एटीएमएस, समान पाणी पुरवठा या प्रकल्पांतील गैरव्यवहारांमुळे त्यांच्या फेरनिविदा मागवाव्या लागल्या. मित्रमंडळ चौकातील महापालिकेचा भूखंड भाजपशी संबंधित घटक गिळंकृत करू पाहत आहेत. पक्षाच्या महापालिकेतील तक्रारींमुळे तुकाराम मुंढे, प्रेरणा देशभ्रतार यांच्यासारख्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. भाजपमधील अस्वस्थ घटकांनी दोन निनावी पत्रांद्वारे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचे वाभाडे काढले आहे. त्यामुळे पुणेकरांनी एकहाती सत्ता देऊनही भाजप महापालिकेत सपशेल अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत पुणेकर भाजपला मतपेटीद्वारे जाब विचारल्या शिवाय राहणार नाही. त्यामुळे भाजपची महापालिकेत वर्षपूर्ती ही केवळ फसव्या घोषणांची वर्षपूर्ती ठरली आहे !!

 

१६९२ एकर जागा निवासी झोन मध्ये आणणार …. २६१९ कोटीच्या मुळा मुठा नदी संवर्धन प्रकल्पासाठी एसपीव्हीला मान्यता

0

पुणे – एसपीव्ही या खाजगी कंपनीमार्फत २६१९ कोटी रुपयांच्या नदी सुधारणा व संवर्धन प्रकल्पाला आज पालिकेतील मुख्य सभेत भाजपने बहुमताच्या जोरावर मान्यता मिळविली . या प्रकल्पांतर्गत सुमारे १६९२ एकर जागा निवासी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने हा प्रकल्प नेमका पुणेकरांच्या हितासाठी आहे कि बिल्डरांच्या हितासाठी ? असा प्रश्न यावेळी विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील , तसेच कॉंग्रेसचे अविनाश बागवे आणि शिवसेनेचे संजय भोसले यांनी केला .
आज दुपारी 3 वाजता सुरु झालेली मुख्य सभा रात्री ९ वाजले तरी सुरूच होती .या मुख्य सभेत भाजपने बहुमताच्या जोरावर अनेक महत्वाचे विषय मंजूर करवून घेतले. विशेष म्हणजे या सभेस सभागृहातील तोफ समजले जाणारे कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे गैर हजर होते .
पुणे महापालिका , पिंपरी महापालिका , खडकी कँटोंमेंट बोर्ड यांच्या हद्दीतून वाहणाऱ्या मुळा आणि मुठा नदी चा काठ आणि नदी सुधार संवर्धन प्रकल्प राबविण्यासाठी स्पेशल पर्पज व्हेईकल (spv) स्थापित करण्याचा प्रस्ताव या सभेत उशिरा मान्यतेसाठी आणण्यात आला .spv साठी महापौर ,उपमहापौर ,स्थायी समिती अध्यक्ष,सभागृह नेता, विरोधी पक्षनेता,दोन्ही महापालिकांचे आयुक्त ,विभागीय आयुक्त,शहर अभियंता नदीविकासन क्षेत्रातील तज्ञ यांचे संचालक मंडळ असणार आहे . spv ला जागा हस्तांतरित करण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविणे ,तसेच spv ला विविध माध्यमातून निधी उपलब्ध करणे व प्रकलपाची देखभाल दुरुस्ती करणे याबाबत अधिकार देणे असा हा प्रस्ताव होता .
यावेळी चेतन तुपे, अविनाश बागवे , संजय भोसले यांच्यासह भाजपच्या हि अन्य सदस्यांनी विविध मुद्दे उपस्थित केले . त्यांना उत्तरे देताना पहा आणि ऐका नेमके आयुक्त कुणालकुमार यांनी
कसे येणार २६१९ कोटी …?
का हवी एस पी व्ही …?
साबरमती चे कन्सल्टंट तेच इथे कन्सल्टंट असतील …
एसपीव्ही कंपनी होणार असल्याने टॅक्सबाबत काळजी घेवू ..
सर्व बाबी कायदेशीर परवानग्या घेऊनच करणार …
१० वर्षाचा प्रकल्प असला तरी तो 5 वर्षात पूर्ण करण्याचा प्रयत्न ..
६८५ हेक्टर जागा विकसनासाठी उपलब्ध होईल ….
याबाबत स्पष्टीकरण दिले आहे … ते पहा आणि ऐका नेमके कुणाल कुमार यांनी काय म्हटले आहे ….

23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत ओएनजीसी, बीपीसीएल यांच्यात विजेतेपदासाठी लढत

0

पुणे: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित 23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत एकतर्फी झालेल्या लढतीत ओएनजीसी संघाने ईआयएल संघाचा 33-17 असा तर एमआरपीएल संघाचा 34-19 असा पराभव करत 6 गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश केला.

पीवायसी हिंदू जिमखाना बास्केटबॉल कोर्ट येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत राऊंड रॉबिन फेरीत ओएनजीसी संघाने ईआयएल संघाचा एकतर्फी लढतीत 33-17 असा पराभव केला. अमित हूडाने याने केलेल्या खोल चढायांच्या बळावर मध्यंतरापुर्वी ओएनजीसी संघाने 15-6 अशी भक्कम आघाडी घेतली. अमितने 10 चढायांमध्ये 9 गुण मिळवले तर ईआयएल संघाच्या अरविंद व जे.पी यादव याच्या चढायांना निश्प्रभ करत राजेश नरवालने आपल्या लौकीकाला साजेल अशी कामगिरी करत उत्कृष्ट पकडी केल्या व संघाला मोठा विजय मिळवून दिला.

दुस-या लढतीही ओएनजीसी संघाने एमआरपीएल संघाला धुळ चारत 34-19 असा विजय संपादन करून स्पर्धेत 6 गुणांसह अंतिम फेरीत प्रवेश केला. दुस-या सामन्यातही अमित हुडा चमकला व त्याने 11 चढायांमध्ये 10 गुण मिळवत संघाला दुस-याही लढतीत मोठा विजय मिळवून दिला. नवनित गौतमने चलाखीने पकडी करत एमआरपीएल संघाचे मनोबल खच्ची केले व संघाला विजय मिळवून दिला.

ओएनजीसी व बीपीसीएल संघांनी 6 गुणांसह अंतिम फेरी गाठली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- राऊंट रॉबिन फेरी
ओएनजीसी वि.वि ईआयएल 33-17 (15-6 मध्यांतरापुर्वी)
ओएनजीसी वि.वि एमआरपीएल 34-19(19-10 मध्यांतरापुर्वी)

इन्फोसिस पुणेचा ‘महाउद्योगरत्न सन्मान रजनी’ पुरस्काराने गौरव

0

औद्योगिक उत्कृष्टतेसाठी महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार

पुणे-: द इन्फोसिस पुणे डेव्हलपमेंट सेंटर (डीसी) यांना मॅग्नेटिक महाराष्ट्र कन्व्हर्जन्स २०१८  या जागतिक गुंतवणूकदार परिषदेत मानाच्यामहाउद्योगरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. इन्फोसिसला महाराष्ट्रातील बेस्ट आयटी सॉफ्टवेअर कंपनी(इन्फोसिस लिमिटेड) आणि बेस्ट आयटी एनेबल्ड कंपनी(इन्फोसिस बीपीएम) हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

व्यवसायवृद्धी आणि राज्याच्या महसुलातील वाढीसाठी सातत्याने केले जाणारे प्रयत्न आणि त्यातील सहभाग तसेच कुशल आणि अकुशल क्षेत्रात सर्वाधिक संख्येने रोजगारनिर्मिती यासाठी इन्फोसिसला हे पुरस्कार देण्यात आले आहेत. कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमांतील इन्फोसिसच्या सहभागाबद्दलही त्यांचे कौतुक करण्यात आले.

राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई, पर्यटनमंत्री श्री. जयकुमार रावळ आणि गृहराज्यमंत्री श्री. प्रविण पोटे पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कंपनीच्या समभागधारकांना योग्य मूल्य मिळावे यासाठी कंपनीकडून केल्या जाणाऱ्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल या पुरस्कारामुळे घेतली गेली आहे.

बुध्दिबळ स्पर्धेत नायक, झगडे, पिंगळे, शेर्ला विजेते

0

पुणे- डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बृहनमहाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय (बीएमसीसी) आणि व्ही. पी. पेस ऍकॅडमी आणि पुणे जिल्हा व अखिल भारतीय मराठी बुध्दिबळ संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्य खुल्या जलद बुध्दिबळ स्पर्धेत विश्‍वजित नायक, गौरव झगडे, शिवराज पिंगळे, प्रथमेश शेर्ला यांनी विविध वयोगटांमध्ये विजेतेपद पटकाविले.
बीएमसीसीच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित या स्पर्धेत ५ ते ७२ वयोगटातील २६२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. ८, १२, १६ व खुला अशा चार गटात या स्पर्धा झाल्या. प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. ज्येष्ठ बुध्दिबळ मार्गदर्शक जोसेफ डिसूझा, व्ही. पी. चेस असोसिएशनचे सचिव वंदन पोतदार, ऍकॅडमीचे अध्यक्ष उदयचंद्र कवडी, पुणे जिल्हा चेस असोसिएशनचे सचिव राजेंद्र कोंडे, स्पर्धेचे प्रायोजक जयप्रकाश सुराणा, अनिल पवार यावेळी उपस्थित होते. राजेंद्र कोंडे यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचे निकाल पुढीलप्रमाणे
८ वर्षांखालील गट ः प्रथमेश शेर्ला, वरद नांदुर्डीकर, ध्रुपद पठारी
१२ वर्षांखालील गट ः शिवराज पिंगळे, अनुज दांडेकर, श्रीपाद नाईक
१६ वर्षांखालील गट ः गौरव झगडे, अमित धुमाळ, ओ लांबमाने
खुला गट ः विश्‍वजित नायक, केवल निर्गुण, गौरव हगवणे

फर्ग्युसनमधील सावरकरांची खोली सोमवारी दर्शनासाठी खुली

0

पुणे- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या वास्तव्याने पावन झालेली फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहातील खोली त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सोमवारी (ता. २६) सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत दर्शनासाठी खुली ठेवण्यात येणार आहे.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या परिषद व नियामक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता सावरकरांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. उपाध्यक्ष विकास काकतकर, वसतिगृह व्यवस्थत्तपन समितीचे अध्यक्ष राम निंबाळकर, कार्यवाह प्रा. आनंद भिडे, प्राचार्य डॉ. रविंद्रसिंग परदेशी, वसतिगृह प्रमुख प्रा. श्रीधर व्हनकटे, प्रा, स्वाती जोगळेकर, डॉ. किशोर सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सावरकर फर्ग्युसन महाविद्यालयाचे विद्यार्थी असताना सन १९०२ ते १९०५ या कालावधीत महाविद्यालयाच्या वसतिगृह क‘मांक एक मधील खोली क्रमांक १७ मध्ये राहात होते. या ऐतिहासिक खोलीमध्ये सावरकरांच्या अर्धपुतळ्याची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सावरकर वापर असलेला पलंग, त्यांचे साहित्य, वकीली करत असताना परिधान केलेले गाऊन या खोलीमध्ये जतन करण्यात आला आहे.

देशाच्या विकासात संविधानाचे योगदान महत्वाचे-कुलगुरु पद्मश्री डॉ. उपेंद्र बक्षी

0

पुणे- संविधान हा देशाच्या विकासाचा पाया असून देश प्रगती पथावर जाण्यासाठी संविधानाचे योगदान महत्वाचे असल्याचे मत दिल्ली विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. उपेंद्र बक्षी यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालयात ‘सर्वोच्च न्यायालयाचे संविधानिक राजकारण ः निरर्थकता आणि आशावाद’ या विषयावर आयोजित केलेल्या विशेष व्या‘यानात डॉ. बक्षी बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘संविधान हा स्वतंत्र भारताच्या प्रगतीचा पाया असून त्यात कालसुसंगत बदल होणे हे संविधान निर्मितीइतकेच स्वाभाविक आहे. सर्वसामान्यांच्या आशाआकांक्षांचे प्रतिबिंब संविधानाच्या तरतुदींमध्ये पडल्यामुळे त्याचा सुयोग्य अन्वयार्थ लावण्याचे महत्वाचे कार्य न्यायालय पार पाडत असतात.’
न्यायालयीन दिरंगाईबद्दल विनाकारण गैरसमज पसरविले जात असून न्यायालयीन पदे व न्यायाधीशांची पदे रिक्त असण्याचा परिणाम म्हणून न्यायालयीन दिरंगाईकडे पाहिजे पाहिजे. सर्वसामान्यांचा न्यायालयीन व्यवस्थेवरील विश्‍वास अबाधित असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
अशिक्षित, दुर्बल, अभावग्रस्त समाजाच्या हितरक्षणासाठी जनहित याचिका या सामाजिक चळवळींइतक्याच महत्वाच्या आहेत. न्यायालयीन कामकाजाच्या केवळ तीन टक्के वाटा असणार्‍या जनहित याचिका न्यायालयीन साहसवाद असल्याचा कांगावा हेतूपुरस्पर केला जात असल्याचा दावा त्यांनी केला.
फौजदारी प्रकरणांमध्ये प्रलंबित प्रकरणांची संख्या अधिक असली तरी त्यासाठीची प्रक्रीया न्यायतत्वे आदी बाबींचे पालन करण्याच्या बंधनामुळे खटले निकाली निघण्यासाठी विलंब होत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
प्राचार्या डॉ. रोहिणी होनप यांनी स्वागत केले. राधा नाईक यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रताप साळुंखे यांनी परिचय करुन दिला. सौरभ उबाळे यांनी आभार मानले.

वर्षपूर्ती निमित्त “नगरसेविका आपल्या भेटीला” उपक्रमास प्रारंभ….

0

पुणे-

महिलांनी स्वच्छते विषयी जागरूक असणे गरजेचे असून त्यांनी आपले घर स्वच्छ ठेवतानाच आपल्या भोवतीचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे आणि ओला व सुका कचरा वेगळा करून देतानाच  सँनेटरीन नँपकिन पँक करुनच वेगळे द्यावे असे आवाहन नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी केले.नगरसेविका पदी निवडून आल्याच्या वर्षपूर्ती निमित्त विविध सोसायटी व वस्ती विभागातील नागरिकांची भेट घेणे,कचरा बकेट वाटप करणे व महिलांनीच स्वच्छता मोहीम राबवीण्यात कसा हातभार लावता येईल याबाबत जनजागृती मोहिमेचा प्रारंभ एरंडवण्यातील दहा चाळ येथे करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी संगीताताई आधवडे, जया काळे,संगीता सातपुते,पार्वती पवार, जया बारमुख,मोनीका पायगुडे,मंजु जाधव,कवीता सुपेकर,उषा सुपेकर,अनिता काळे,ममता भारती, लता सस्ते,सुनिता घवाने,अनीता जय काळे,इ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.ह्या महीलांनी आपल्या समस्या सांगीतल्या व त्याबाबत मंजुश्रीताईंनी लगेचच कार्यवाही केल्याबद्दल त्यांचे आभार ही मानले.त्याच बरोबर गौरव सोसायटी व संगमश्री सोसायटी येथेही ही मोहीम राबविण्यात आली.यावेळी संगमश्री सोसायटीचे अध्यक्ष श्री शिवाजीराव ढेकणे,सचिव आनंद पारगावकर,सुरेश कुलकर्णी,राजेंद्र घैसास,सुहास बल्लाळ,वासंती नगरकर,सौ घैसास,गौरव सोसायटीचे अध्यक्ष श्री व सौ दीपक आशर इ मान्यवर उपस्थित होते.
सौ मंजुश्री खर्डेकर म्हणाल्या “२३ फेब्रुवारी २०१७….पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक १३ (क) मधुन माझा विजय झाला त्याला एक वर्ष पूर्ण झाले….माझ्यावर प्रभागातील नागरिकांनी विश्वास दाखवला आणि मी ही माझ्या परीने ही जबाबदारी पार पाडत आहे….प्रभागातील नागरिकांना अपेक्षित असणारे कार्य माझ्या हातून घडावे यासाठी मी प्रयत्नरत आहे.विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपण सातत्याने संपर्कात आहोतच पण वर्षपूर्ती होत असताना *नगरसेविका आपल्या भेटीला* हा उपक्रम राबवित आहे,*वर्षपूर्ती होत असताना “मनपाच्या सर्वसाधारण सभेस १००% उपस्थिती + विकास निधीचा वापर हा नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार + बजेट तरतूदीतील ९०% कामे सुरु व बहुतांश पूर्णत्वास + सभागृहात भटक्या कुत्र्यांच्या विषयासह,डी पी रोड वरील अनधिकृत बांधकामांचा विषय व इतर विषयांच्या मांडणीत सक्रिय + ५० पेक्षा जास्त उपक्रम/कार्यक्रम + Whatsapp वर नागरिकांचे ग्रूप तयार करुन त्याद्वारे दैनंदिन प्रश्न सोडविण्याचा यशस्वी प्रयोग + पक्षाच्या ही सर्व कार्यक्रमात सहभाग* याद्वारे मी माझ्यावर सोपविलेली जबाबदारी पार पडण्याचा प्रयत्न करत आहे. येणाऱ्या वर्षात अधिक वेगाने काम करुन प्रभागाच्या विकासासाठी कटिबद्ध/वचनबद्ध, असल्याचे ही त्या म्हणाल्या.

राजकारण शरद पवारांचे !

0
शरद पवार हे महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील धुरंधर राजकारण्यांपैकी एक आहेत. ते एका दगडात अनेक पक्षी मारतात असे म्हणतात. परंतु परवा पुण्यातील मुलाखतीत त्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. काही विधान पवारांनी जाणूनबुजून केल्याचे जाणवले.
त्यापैकी त्यांचे एक महत्वाचे विधान म्हणजे ” आरक्षण हे जाती पातीवर न देता आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्यांना द्यावे,तसेच हे करीत असताना मूळ दलित व आदिवासी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू नये”.
मला असे वाटतं हे विधान पवारांच्या अंगलट येण्यासारखे आहे. पवार उद्या त्यातून निसटतीलही. कारण मुलाखतकार राज ठाकरे त्यांना म्हणाले की आपण कधीच कोणाच्या हाताला लागत नाही.
देश स्वातंत्र्य झाल्यापासून आरक्षण हे जातीनिहाय न देता आर्थिक निकषांवर द्यावे असे मानणारा एक मोठा वर्ग या देशात आहे. आज पवार असं बोलत असेल तर मराठ्यांना आरक्षण द्यावे या मागणीचे समर्थन त्यांनी का केले ? त्यांनी व त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने त्याला पाठिंबा का दिला ? मराठ्यांचे महामोर्चे निघत असताना त्यामध्ये अजित पवार , सुप्रिया सुळे आदी राष्ट्रवादीचे बडे नेते त्यात सामील का झाले?
एकीकडे आरक्षण आर्थिक निकषांवर द्या व दलित मागासवर्गीयांच्या आरक्षणाला धक्का लागू देऊ नका असे म्हणायचे आणि नेमके त्याउलट वागायचे अशी पवारांची भूमिका आहे का ?
आरक्षणाचे हे भूत व्ही. पी. सिंग पंतप्रधान असतांना त्यांनी मंडल आयोग लागू केला तेव्हापासून देशाच्या मानगुटीवर बसले आहे.आयोगाला विरोध करून भाजप सत्तेबाहेर पडला होता. आजही मराठा आरक्षण न्यायालयात टिकेल की नाही याविषयी शंका आहे.
मराठा आरक्षणाला विरोध असण्याचे कारण नाही. कारण गुजरातमध्येही पटेल (पाटीदार) समाज आरक्षण मागत आहे.तसेच हरियाणा,पंजाबमध्येही जाट व अगदी राजस्थानमध्येही राजपूत समाज आरक्षण मागत आहे.महाराष्ट्रातही धनगर व इतर काही जाती आरक्षण मागत आहे.मग पवारांना आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याचे आजच का आठवले?
आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे असे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यासह अनेक नेत्यांचे पूर्वीपासून मतं होते. परंतु त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले.आजही महाराष्ट्रातील अनेक तरुणांना आर्थिक निकषांवरच आरक्षण हवे आहे.सोशल मीडियातून वेळोवेळी अशी भूमिका सातत्याने पुढे येत आहे.त्यात जात पात आणू नये,किंबहुना जात ही कायमची नाहीशी झाली पाहिजे, शाळेतील दाखल्यावरूनही जात काढली पाहिजे अशीच आजच्या तरुण पिढीचे स्पष्ट म्हणणे आहे.परंतु आजच्या राजकारण्यांनी त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष चालविले असून केवळ मतपेटीवर लक्ष ठेवूनच हे केले जात आहे. पवार देखील याच माळेतील असल्याचे स्पष्ट आहे.
आज पवार यांना महाराष्ट्रात जाती-जाती मध्ये वाढत चाललेल्या द्वेषाबाबत चिंता वाटत आहे. आणि ते खरं देखील आहे.मराठा विरुद्ध दलित , बहुजन विरुद्ध ब्राम्हण ,हिंदू विरुद्ध मुस्लिम आणि मुस्लिम विरुद्ध ख्रिश्चन असा जाती-जातीमध्ये मोठा द्वेष वाढत आहे. कोणती ठिणगी कधी पडेल याची भीती वाटत आहे.पण याला जबाबदार कोण? पवार याबाबत बोलत नाहीत.दिल्लीत “स्ट्रॉंग मराठा लीडर” असे त्यांना म्हटले जाते.परंतु महाराष्ट्र हा फुले ,शाहू,आंबेडकरांच्या धर्मनिरपेक्ष विचारांचामहाराष्ट्र व्हावा असं पवारांना वाटत नाही का ?
आज धर्मनिरपेक्ष विचारांची चेष्टा केली जात आहे. आक्रमक संघटना तर अशा विचारांच्या लोकांना गोळ्या घालत आहे. दाभोळकर , पानसरे,कलबुर्गी व गौरी लंकेश त्याचे बळी ठरलेत.अशावेळी राज्यात,देशात जातीय सलोखा जोपासणाऱ्या राज्यकर्त्यांनी पुढे आले पाहिजे. याउलट जाती जातीचा झेंडा हातात घेऊन,तरुणांची माथी भडकविणारे राज्यकर्ते सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत फोफावले आहेत.देशात सर्वात जातीय सलोखा नांदायला हवा.जातीय द्वेष भावना वाढीस लागता कामा नये.शरद पवार आणि राज ठाकरे या दोघांच्या मनात जर खरेच आरक्षण हे आर्थिक निकषांवरच हवे असे असेल तर त्यांनी आता याविषयावर सुरुवातीला राज्य पातळीवर हा प्रयोग राबवावा.त्यासाठी वेळपडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन हाती घेण्याची गरज आहे.

मूळ खोडावरच घाव घालणारी महापालिका ….

0

पुणे- पीएमटी आणि पीसीएमटी ची पीएमपीएमएल करून आपल्या हातातील अधिकार आणि  सूत्रे महापालिकेने घालविली ..स्मार्ट सिटी नावाची  कंपनी करून या कंपनी मार्फत काही भागात विकासाची कामे सुरु केली .पैसा महापालिकेचा पण त्यावर नियंत्रण ठराविक महाभागांचे … असाच कारभार पुढे चालू ठेणारा आणखी एक प्रस्ताव आज महापालिकेच्या मुख्य सभेपुढे येतो आहे. तो म्हणजे नदी विकास आणि संवर्धनाच्या कामासाठी आता एसपीव्ही स्पेशल  पर्पज व्हेईकल स्थापित करण्याचा …
वाहतूक ,सुशोभीकरण,नदी संवर्धन अशी कामे आता कंपन्या स्थापन करून केली जाणार आहेत .मेट्रो चे ही तसेच आहे . हळू हळू महापालिकेचा कारभार परावलंबी होत असल्याची हि चन्हे मानली जात आहे . इस्ट इंडिया कंपनी आली होती देशात ..तसाच काहीसा हा प्रकार होतो आहे . संगनमत करणारे ठराविक पदाधिकारी आधीकारी म्हणजे मुठभर लोकांकडे सर्वाधिकार जात आहेत . आणि लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले सामान्य प्रतिनिधी ताटाखालचे मांजर बनून वावरत आहेत अशी परिस्थिती कालांतराने दिस्लीतर नवल वाटणार नाही असाही दावा समीक्षकांकडून केला जातो आहे .
लोकशाहीच्या मूल्याला ठेच पोहोचविणारा हा कारभार लोकशाहीच्याच सावलीतून मार्गस्थ झालेला आहे हे विशेष .

राज्यस्तरीय भजन स्पर्धेत आराधना भजनी मंडळ प्रथम क्रमांकाने विजेता

0

पुणे-चर्च ऑफ ख्राईस्टच्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय भजन स्पर्धा संपन्न झाल्या .वडगाव शेरीमधील  स्फूर्ती प्रेरणा भजनी मंडळ व चर्च ऑफ ख्राईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय भजन स्पर्धा

चर्च ऑफ ख्राईस्टच्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय भजन स्पर्धा संपन्न झाल्या .वडगाव शेरीमधील  स्फूर्ती प्रेरणा भजनी मंडळ व चर्च ऑफ ख्राईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय भजन स्पर्धा पार पडल्या . या स्पर्धेत १७ भजनी मंडळांनी सहभाग घेतला . या स्पर्धेमध्ये प्रथम राहुरी येथील आराधना भजनी मंडळास स्मृती चिन्ह व पंधरा हजार रुपये रोख  , व्दितीय बारामती येथील चर्च ऑफ ख्राईस्ट स्मृती चिन्ह व दहा हजार रुपये रोख तर तृतीय मध्ये विभागून पुणे मधील  पंचहौद मिशन येथील सुरेश कला मंच  व वानवडी येथील चर्च ऑफ नाझरीन स्मृती चिन्ह व  विभागून दोघाना साडेतीन हजार रुपयांची बक्षिस तर चौथे अहमदनगर येथील लालटाकी येथील ख्रिस्त सेवा भजनी मंडळास स्मृतिचिन्ह व  पाच हजार रुपये तर उत्तेजनार्थ बक्षीस दौड येथील ख्रिस्त सेवा मंडळास देण्यात आले .

यावेळी रेव्ह. नाना दार , रवींद्र जाधव , किरण पवार ,प्रभुदास दुप्ते , लिलीमेरी जॉर्ज , किशोर पाटोळे , उल्हास पगी , प्रमोद पारधे , महेश बेंजामिन , डॉ. पी. बी. पवार , प्रशांत काकडे , इमान्युअल जॉर्ज , पदमा जॉर्ज , देविदास श्रीसुंदर , डॉ. स्वप्नील पाटील , डॉ. संगीता गायकवाड , डॉ. रजनीकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाची सुरुवात चर्च ऑफ ख्राईस्टचे धर्मगुरू पास्टर बेंजामिन तिवारी यांनी प्रार्थना व पवित्र शास्त्र वाचून केली .

या स्पर्धेचे आयोजन रेव्ह. पीटर जॉर्ज , जॉन जॉर्ज , रूबेन जॉर्ज , अनिल राठोड चर्च ऑफ ख्राईस्ट तरुण संघ व चर्च ऑफ ख्राईस्ट कार्यकारिणी मंडळ व जॉर्ज परिवार  यांनी केले होते . या स्पर्धेचे परिक्षक विजय पवार , संगीता घोडे व  समीर गायकवाड   यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टीव्हन गोडे यांनी केले . तर आभार रेव्ह. पीटर जॉर्ज यांनी मानले .

पीएसपीबी आंतर युनिट बिलियर्ड्स अँड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत ओएनजीसी संघाला दुहेरी मुकुट

0
पुणे: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे  14व्या पीएसपीबी आंतर युनिट बिलियर्ड्स अँड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम फेरीत ओएनजीसी संघाने इंडियन ऑईल संघाचा 4-2असा पराभव करून सांघिक बिलियर्ड्स व स्नूकर या दोन्ही गटात विजेतेपद पटकावत दुहेरी मुकुट संपादन केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे बिलियर्ड्स अँड स्नूकर हॉलमध्ये सुरु असलेल्या या बिलियर्ड्स स्पर्धेत सांघिक गटात अंतिम फेरीत ओएनजीसी संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत इंडियन ऑईलचा 4-2असा पराभव केला. पहिल्या सामन्यात पंकज अडवाणीने आपले कौशल्य पणाला लावत लक्ष्मण रावतचा  2-0(59-7, 55-43)असा सहज पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात सौरव कोठारीने पहिल्या फ्रेममध्ये ब्रिजेश दमानीचा 89(69)-10 असा तर दुसऱ्या फ्रेममध्ये ब्रिजेश दमानीने सौरव कोठारी 58-11असा पराभव केला. याआधी या स्पर्धेत ओएनजीसी संघाला बिलियर्ड्स सांघिक गटाचे विजेतेपद सहज प्राप्त झाले होते. पण सांघिक स्नूकर गटाच्या स्पर्धेसाठी ओएनजीसीला चांगलेच झगडावे लागले. इंडियन ऑईलच्या आदित्य मेहताने तिसऱ्या सामन्यात कसोशीने प्रयत्न केले व पहिली फ्रेम आलोक कुमारविरुद्ध 72-62 अशी जिंकली.  पण अनुभवी आलोक कुमारने वरचढ खेळ करत आदित्य मेहताविरुद्ध हि फ्रेम  49-38अशी जिंकून संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेत तिसऱ्या व चौथ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत बीपीसीएल संघाने जीएआयएलचा 4-2असा पराभव करून तिसरा क्रमांक पटकावला.
हौशी बिलियर्ड्स गटात अंतिम फेरीत आरिफ अख्तरने अम्रिशचा 145-100अशा फरकाने पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: सांघिक गट: स्नूकर: अंतिम फेरी:
ओएनजीसी वि.वि.इंडियन ऑईल 4-2(पंकज अडवाणी वि.लक्ष्मण रावत 2-0(59-7, 55-43); सौरव कोठारी वि.ब्रिजेश दमानी 1-1(89(69)-10, 11-58); आलोक कुमार वि.आदित्य मेहता 1-1(62-72, 49-38);
3 व 4थ्या क्रमांकासाठी लढत:
बीपीसीएल वि.वि.जीएआयएल 4-2(इशप्रित चड्डा वि.मनन चंद्रा 1-1(13-93, 63-39); आशुतोष पाधी वि.शाहबाज खान 1-1(64-37, 39-65); एस श्रीकृष्णा वि.अशोक कुमार 2-0(80-04, 66-02);
हौशी बिलियर्ड्स गट: उपांत्यपूर्व फेरी:
अम्रिश वि.वि.जे फुकन 123-61;
आतिश कुमार वि.वि.स्वप्नव डी 145-105;
एस बरुआ वि.वि.प्रदीप शेट्टी 112-49;
आरिफ अख्तर वि.वि.तोलन बरुआ 172-56;
उपांत्य फेरी:
आरिफ अख्तर वि.वि.एस बरुआ 161-72;
अम्रिश वि.वि.आतिश कुमार 133-64;
अंतिम फेरी:
आरिफ अख्तर वि.वि.अम्रिश 145-100;

23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत बीपीसीएल संघाची विजयी घोडदौड

0

पुणे: भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या तर्फे आयोजित 23व्या पीएसपीबी आंतर युनिट कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेत बीपीसीएल संघाने  ईआयएल  संघाचा 34-21 असा सहज पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम राखली तर ओएनजीसी संघाने सीपीसीएल संघाचा 29-13 असा दणदणीत पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.

पीवायसी हिंदू जिमखाना बास्केटबॉल कोर्ट येथे आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत राऊंड रॉबिन फेरीत महेंद्र राऊतच्या बिनचूक चढायांच्या बळावर बीपीसीएल संघाने  ईआयएल  संघाचा 34-21 असा सहज पराभव पराभव करत स्पर्धेत सलग तिसरा सामना जिंकून हॉट्रीक केली. सूरूवातीपासूनच आक्रमक चढाया करून महेंद्रने ईआयएल संघावर दबाव निर्माण केला. मध्यंतरापुर्वी 17-9 अशी भक्कम आघाडी घेतली. नितिन मोरेने अरविंद व आर.एस राणा यांच्या कौशल्यपुर्ण पकडी करून ईआयएल संघाचा खेळ निश्प्रभ केला. सामन्याच्या सुरूवातीला घेतलेली आघाडी सामन्याच्या शेवटपर्यंत कायम राखत बीपीसीएल संघाने स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला.

दुस-या लढतीत ओएनजीसी संघाने सीपीसीएल संघाचा 29-13 असे पछाडत दणदणीत विजय मिळवला. मध्यंतरापुर्वी 13-3 असे गुण असताना ओएनजीसी संघाने सीपीसीएल संघावर लोन चढवून दबाव निर्माण केला. ओएनजीसी संघाकडून सोमवीरने 10 चढायांमध्ये 9 गुण मिळवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. मनप्रीतने सर्वाधीक पकडी करून संघाला 29-13 असा मोठा विजय मिळवून दिला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल- राऊंट रॉबिन फेरी
बीपीसीएल वि.वि ईआयएल 34-21 (17-9 मध्यांतरापुर्वी)
ओएनजीसी वि.वि सीपीसीएल 29-13 (19-6 मध्यांतरापुर्वी)

‘मौलाना आझाद यांच्या योगदानाचा वेळेत सन्मान झाला नाही’ : कुटुंबीय

0
पुणे :मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यात मोठा सहभाग दिला आणि स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणक्षेत्राचा पाया रचला. तरीही त्यांना मरणोत्तर भारतरत्न मिळायला 30 वर्षे लागली, आणि हा सन्मान यथोचित न देता घरी पाठवला गेला, अशी खंत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या भावाचे नातू, पत्रकार फिरोज बख्त अहमद यांनी आज व्यक्त केली. 
 
मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या स्मृती दिनानिमित्त ‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’ आयोजित भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद व्याख्यानात ते बोलत होते. हे व्याख्यान आझम कॅम्पसच्या डॉ. ए.आर.शेख असेंब्ली हॉलमध्ये गुरूवारी सकाळी झाले.
 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एम.सी.ई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार होते. व्यासपीठावर आबेदा इनामदार, लतिफ  मगदूम उपस्थित होते. 
यावेळी बख्त यांचा सन्मान डॉ. इनामदार यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन करण्यात आला
 
फिरोज बख्त म्हणाले, ‘मौलाना आझाद यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले. स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रीय एकात्मता, शिक्षण क्षेत्रात योगदान दिले. भारतरत्न  आझाद यांनी च भारतरत्न निवड समितीवर असल्याने त्याचा स्वीकार करणे अनुचित समजून  नाकारला होता. मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर 30 वर्षांनी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला आणि कलकत्त्याला त्यांच्या घरी पाठवून देण्यात आला. मौलाना आझाद यांचा यथोचित सन्मान झाला नाही’, याची खंत वाटते. 
 
‘मौलाना अबुल कलाम आझाद यांचे पूर्ण  नाव आणि उच्चार नीट लक्षात ठेवले जात नाही. त्यांच्यावरील लिखाण, त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देण्याची व्यवस्था जनतेला माहिती करण्यात हेळसांड झाली’, अशी उदाहरणेही त्यांनी दिली. 
 
‘इस्लामला स्वत:ची वेगळी संस्कृती नाही, तर ज्या मातीत इस्लाम जातो तिथली संस्कृती आपलेसे करतो, इस्लाम  खर्‍या अर्थाने ‘कॉस्मॉपॉलिटन’ आहे’, असे मौलाना अबुल कलाम आझाद  म्हणत, याची आठवण फिरोज बख्त अहमद यांनी करून दिली.
 
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ.पी.ए.इनामदार म्हणाले, ‘द्वीराष्ट्र वादाच्या  संकल्पनेमुळे देशाचे, विशेषत: मुस्लीमांचे अधिक नुकसान झाले. फाळणीची चूक दुरूस्त करून आपल्याला ‘अखंड भारत’ हे उद्दीष्ट डोळ्यासमोर ठेवावे लागेल.’ 
 
‘5 हजार वर्षात भारताची जेवढी प्रगती झाली नाही,त्यापेक्षा जास्त प्रगती स्वातंत्र्योत्तर काळाच्या 70 वर्षात झाली. त्यात शिक्षणक्षेत्रात मौलाना अबुल कलाम आझाद यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले. केंद्रीय विद्यापीठ आयोगासारख्या संस्था ही त्यांनी दिलेली देणगी म्हणावी लागेल.’ असे डॉ. इनामदार यांनी सांगीतले
 
अभ्यासक सलीम चिश्ती,अनीता बेलापूरकर, मुमताझ सय्यद, रिझवाना शेख इत्यादी उपस्थित होते.​