पुणे- पीएमटी आणि पीसीएमटी ची पीएमपीएमएल करून आपल्या हातातील अधिकार आणि सूत्रे महापालिकेने घालविली ..स्मार्ट सिटी नावाची कंपनी करून या कंपनी मार्फत काही भागात विकासाची कामे सुरु केली .पैसा महापालिकेचा पण त्यावर नियंत्रण ठराविक महाभागांचे … असाच कारभार पुढे चालू ठेणारा आणखी एक प्रस्ताव आज महापालिकेच्या मुख्य सभेपुढे येतो आहे. तो म्हणजे नदी विकास आणि संवर्धनाच्या कामासाठी आता एसपीव्ही स्पेशल पर्पज व्हेईकल स्थापित करण्याचा …
वाहतूक ,सुशोभीकरण,नदी संवर्धन अशी कामे आता कंपन्या स्थापन करून केली जाणार आहेत .मेट्रो चे ही तसेच आहे . हळू हळू महापालिकेचा कारभार परावलंबी होत असल्याची हि चन्हे मानली जात आहे . इस्ट इंडिया कंपनी आली होती देशात ..तसाच काहीसा हा प्रकार होतो आहे . संगनमत करणारे ठराविक पदाधिकारी आधीकारी म्हणजे मुठभर लोकांकडे सर्वाधिकार जात आहेत . आणि लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले सामान्य प्रतिनिधी ताटाखालचे मांजर बनून वावरत आहेत अशी परिस्थिती कालांतराने दिस्लीतर नवल वाटणार नाही असाही दावा समीक्षकांकडून केला जातो आहे .
लोकशाहीच्या मूल्याला ठेच पोहोचविणारा हा कारभार लोकशाहीच्याच सावलीतून मार्गस्थ झालेला आहे हे विशेष .
मूळ खोडावरच घाव घालणारी महापालिका ….
Date: