पुणे-चर्च ऑफ ख्राईस्टच्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय भजन स्पर्धा संपन्न झाल्या .वडगाव शेरीमधील स्फूर्ती प्रेरणा भजनी मंडळ व चर्च ऑफ ख्राईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय भजन स्पर्धा
चर्च ऑफ ख्राईस्टच्या वर्धापनदिनानिमित्त राज्यस्तरीय भजन स्पर्धा संपन्न झाल्या .वडगाव शेरीमधील स्फूर्ती प्रेरणा भजनी मंडळ व चर्च ऑफ ख्राईस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या राज्यस्तरीय भजन स्पर्धा पार पडल्या . या स्पर्धेत १७ भजनी मंडळांनी सहभाग घेतला . या स्पर्धेमध्ये प्रथम राहुरी येथील आराधना भजनी मंडळास स्मृती चिन्ह व पंधरा हजार रुपये रोख , व्दितीय बारामती येथील चर्च ऑफ ख्राईस्ट स्मृती चिन्ह व दहा हजार रुपये रोख तर तृतीय मध्ये विभागून पुणे मधील पंचहौद मिशन येथील सुरेश कला मंच व वानवडी येथील चर्च ऑफ नाझरीन स्मृती चिन्ह व विभागून दोघाना साडेतीन हजार रुपयांची बक्षिस तर चौथे अहमदनगर येथील लालटाकी येथील ख्रिस्त सेवा भजनी मंडळास स्मृतिचिन्ह व पाच हजार रुपये तर उत्तेजनार्थ बक्षीस दौड येथील ख्रिस्त सेवा मंडळास देण्यात आले .
यावेळी रेव्ह. नाना दार , रवींद्र जाधव , किरण पवार ,प्रभुदास दुप्ते , लिलीमेरी जॉर्ज , किशोर पाटोळे , उल्हास पगी , प्रमोद पारधे , महेश बेंजामिन , डॉ. पी. बी. पवार , प्रशांत काकडे , इमान्युअल जॉर्ज , पदमा जॉर्ज , देविदास श्रीसुंदर , डॉ. स्वप्नील पाटील , डॉ. संगीता गायकवाड , डॉ. रजनीकांत गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते . या कार्यक्रमाची सुरुवात चर्च ऑफ ख्राईस्टचे धर्मगुरू पास्टर बेंजामिन तिवारी यांनी प्रार्थना व पवित्र शास्त्र वाचून केली .
या स्पर्धेचे आयोजन रेव्ह. पीटर जॉर्ज , जॉन जॉर्ज , रूबेन जॉर्ज , अनिल राठोड , चर्च ऑफ ख्राईस्ट तरुण संघ व चर्च ऑफ ख्राईस्ट कार्यकारिणी मंडळ व जॉर्ज परिवार यांनी केले होते . या स्पर्धेचे परिक्षक विजय पवार , संगीता घोडे व समीर गायकवाड यांनी केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्टीव्हन गोडे यांनी केले . तर आभार रेव्ह. पीटर जॉर्ज यांनी मानले .