Home Blog Page 3183

दलित पँथरचा मेळावा उत्साहात संपन्न

0

पुणे-दलित पँथरचा प्रमुख कार्यकर्त्यांचा राज्यस्तरीय संकल्प मेळावा वडगाव शेरीमधील भैरवनाथ चौकात उत्साहात संपन्न झाला . या संकल्प मेळाव्याचे उदघाटन कामगार नेते विजय कांबळे यांच्याहस्ते छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले . या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे , ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे नेते दिलीप जगताप ,दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष मंगेश मोरे ,विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष  शुभम  सोनवणे ,वाल्मिक सरतापे विक्रम कांबळे , बाळासाहेब साळवे , नारायण गलांडे ,दलित पँथरचे पुणे शहर प्रकाश साळवे , अरुणा हरपळे , प्रविण रणदिवे , राजू गायकवाड , विकास भोसले , के. टी. जगताप आदी मान्यवर उपस्थित होते .

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे  यांनी सांगितले कि , भीमा कोरेगाव हल्ला मधील मिलिंद एकबोटे , व मनोहर भिडे याना सर्वोच्च न्यायालयाने अटक करण्याचे आदेश दिले असताना देखील केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे हो दोघे अटक झाले नाही . त्यासाठी सरकारची मक्तेदारी मोडून काढायला हवी . त्यामध्ये रामदास आठवले यांनी जातीय वाद्यांशी युती केली आहे . त्यामुळे आंबेडकरी समाज तुम्हाला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही .

यावेळी ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टीचे नेते दिलीप जगताप यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि , देशात जातीयवादी धर्माध सरकार काम करीत आहे . सर्वोच्च न्यायालयाचा अटक करण्याचा आदेश असताना देखील अटक होत नाही . हे संविधानाचे राज्य आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला . जाती जातीमध्ये भांडणे लावण्याचे काम चालू आहे . त्यासाठी आपल्याला यल्गार करावा लागणार आहे . पँथर हा लढायला नेहमी सज्ज असतो . त्यासाठी आपला सर्वाना संघटीत होऊन हे सर्व प्रश्न सोडवायचे आहेत . जिथे जिथे अन्याय अत्याचार होतो तिथे दलित पँथर न्याय देण्याचे काम करतो .

यावेळी  कामगार नेते विजय कांबळे  यांनी सांगितले कि , सगळ्याचे स्मारके झाली परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक नसल्याची खंत व्यक्त करून इंदू मिलच्या जागी स्मारक झालेच पाहिजे . अशी मागणी करून स्मारकाचे उभारणीचे भूमिपूजन झाले परंतु प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नाही . त्यासाठी आपल्याला डोळे उघडे ठेवून सामना करावा लागणार आहे . त्यासाठी तरुणांनी पुढे आले पाहिजे . यापुढे कामगार राहणार नाही कारण सध्याचे सरकार ट्रेंड युनियन कायदा रद्द करण्याचे काम करीत आहे .

या संकल्प मेळाव्यात उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रकाश साळवे यांनी केले तर सूत्रसंचालन वाल्मिक सरतापे यांनी केले तर आभार  विक्रम कांबळे यांनी मानले .

माळी समाजाचा राज्यस्तरिय वधूवर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

0

पुणे-माळी आवाज संस्थेच्यावतीने माळी समाजाचा राज्यस्तरिय वधूवर परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला . या मेळाव्याचे उदघाटन माजी आमदार कमल ढोलेपाटील यांच्याहस्ते संत शिरोमणी सावता महाराज , महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करून करण्यात आले . वानवडीमधील केदारी गार्डनमध्ये झालेल्या या मेळाव्यास प्रमुख पाहुणे साताराचे माजी नगराध्यक्ष राजू भोसले , कृषिभूषण पुरस्कार विजेते आनंदराव गाडेकर , सेवा निवृत्त न्यायाधीश माधानता झोडगे , विठ्ठलराव केदारी , दिनेशप्रसाद होले आदी मान्यवर उपस्थित होते .

या मेळाव्यामध्ये ३१२ वधू तर १८३ वर सहभागी झाले होते . यावेळी माजी आमदार कमल ढोलेपाटील यांनी सांगितले कि , भावी आयुष्य उज्वल घडविण्यासाठी एकमेकांची मने जुळविली पाहिजे . तसेच लग्न जमविताना तडजोड हि असलीच पाहिजे , मनपसंत जोडीदार मिळविण्यासाठी वधू वर मेळावे वधू वर यांना फायदेशीर ठरत आहे . नुसती नोकरी आणि उच्च पगार पाहू नका तर स्वभाव , आवडी निवडी सुध्दा पहा असे त्यांनी वधू वरांना आवाहन केले .

या मेळाव्याचे प्रास्तविक व उपस्थितांचे स्वागत विजयकुमार लडकत यांनी केले तर सूत्रसंचालन पांडुरंग गाडेकर यांनी केले तर आभार रोहिणी बनकर यांनी मानले .

संगीताच्या साधनेसाठी रियाझ आणि आजन्म शिष्यत्व आवश्यक : फैयाज हुसेन

0

पुणे-पंडित विनायक फाटक यांच्यासारख्या ज्येष्ठ गुरुने शेकडो शिष्य तयार केलेत ही मोठी संगीत सेवा आहे असे सांगत ज्येष्ठ व्हायोलीन वादक फैयाज हुसेन यांनी आज ज्येष्ठ तबलावादक विनायक फाटक यांच्या 71व्या वर्षात पदार्पणानिमित्त त्यांचा सत्कार केला. जंगली महाराज रस्त्यावरील स्वरमयी गुरूकुल येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात त्यांचे शिष्य व रसिकांनी मोठी गर्दी केली होती.

याप्रसंगी पुढे बोलताना ज्येष्ठ व्हायोलीन वादक फैयाज हुसेन म्हणाले की, गायन वादन नृत्य यांना एकत्रितपणे संगीत म्हटले जाते. विद्यार्थ्यांनी संगीत शिकायला लागल्या पासून 40 दिवस घराच्या बाहेर न पडता सतत रियाझ करून कला अजून वाढवावी. संगीताच्या साधनेसाठी रियाझ सातत्य आणि आजन्म शिष्य बनून संगीताची सेवा केली पाहिजे असे ते म्हणाले.

कलासागरतर्फे दिला जाणारा अखिल भारतीय राज्यनाट्य संमेलनात कलारत्न 2018 हा पुरस्कार पंडित विनायक फाटक यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा या मैफलीत करण्यात आली.

जेष्ठ तबला वादक पंडित विनायक फाटक यांच्या 71व्या वर्षातील पदार्पण सोहळ्या निमित्ताने संगीत मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. या मैफलीत प्रथम विनायक फाटक यांच्या कन्या आणि ख्यातनाम गायिका डॉ. रेवा नातू यांचे शास्त्रीय गायन सादर झाले. प्रथम राग यमन मधील ‘देहो दान मोहे’ या विलंबित झुमरा या बड्याख्यालाने मैफलीस सुरुवात झाली त्यानंतर नातू यांनी ‘ननदिके बचनवा सहेन जाये’ ही तीनतालात पारंपारिक बंदिश डॉ. नातू यांनी सादर केली. त्याला जोडून उदानी दानी तदानी हा द्रुत त्रितालात ताराना अत्यंत कसदारपणे सादर करून सर्वांना जागीच खिळवून ठेवले. त्यानंतर पंडित बलवंतराय भट्ट यांचा राग अडाणा मध्ये ‘होरी होरी खेलत नंदलाल’ हा चतरंग सादर करून सर्व उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. रेवा नातू यांना संवादिनी साथ लीलाधर चक्रदेव यांनी तर तबला साथ विवेक भालेराव यांनी आणि तांपुर्याची साथ प्रणाली पवार यांनी केली.

त्यानंतर जेष्ठ तबलावादक पंडित विनायक फाटक यांचे स्वतंत्र तबलावादन सादर झाले. त्यांना सह तबला वादनाची संगत त्यांचे सुपुत्र प्रशांत फाटक यांची लाभलेली होती. यामध्ये प्रथम पेशकार, कायदे, मुखडे तुकडे, रेला, परण  आणि विविध पारंपारिक उस्तादांच्या रचनांचा समावेश स्वतंत्र तबलावदनामध्ये करण्यात आला. अतिशय कसदार आणि दमदारपणे तबल्यातील बारकाई आणि रियाझ कसा गरजेचा आहे याचे मार्गदर्शन आपल्या वादनातून पंडित विनायक फाटक यांनी केले. फाटक यांना उदय शहापूरकर यांची नगमासाथ लाभलेली होती. या मैफलीला जेष्ठ व्हायोलीन वादक फैयाज हुसेन हे प्रमुख पाहुणेपदी लाभले. ध्वनी व्यवस्था रवी मेघावत यांची लाभली होती व सूत्रसंचालन पराग आगटे यांनी केले.

अखेर आमदार मुळीकांचे बंधू नगरसेवक योगेश मुळीकांना स्थायी अध्यक्षपदाची संधी .(व्हिडीओ)

पुणे : पुणे महापालिका स्थायी समितीच्या अध्यक्षपदी अखेर आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश मुळीक यांचे नाव   मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  निश्‍चित केल्यानंतर आज मुळीक यांनी आपले 2 उमेदवारी अर्ज नगरसचिव सुनील पारखी यांच्याकडे सादर केले .या वेळी आमदार मुळीक, महापौर मुक्ता टिळक ,सभागृहनेते श्रीनाथ भिमाले ,विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ ,उपमहापौर सिद्धार्थ धेंडे ,वर्षा  तापकीर,सुनील कांबळे,राजेंद्र शिळीमकर ,गोपाळ चिंतल,उमेश गायकवाड,  डॉ.भरत वैरागे आदी उपस्थित होते . येत्या सात मार्चला मुळीक यांच्या नावाची औपचारिक घोषणा होईल.त्यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून नीलिमा खाडे, उमेश गायकवाड तर अनुमोदक म्हणून रंजना टिळेकर ,मंजुषा नागपुरे यांच्या सह्याआहेत .कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी च्या वतीने नगरसेविका  लक्ष्मीताई दुधाने यांना उमेदवारी देण्यात आली आहे . त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला . मात्र निवडून येण्या पुरते संख्याबळ विरोधकांकडे नाही .यावेळी त्यांच्यासमवेत चेतन तुपे पाटील ,अरविंद शिंदे, बंडू गायकवाड आदी उपस्थित होते .  

भाजपातून सलग पाचवेळा नगरसेवकपदी निवडून आलेल्या सुनील कांबळे यांना स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी दुसऱ्यांदा डावलण्यात आले  आहे. गेल्यावेळी मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी तर यावेळी योगेश मुळीक यांच्यासाठी कांबळे यांना दूर ठेवण्यात आले.तर   आमदार योगेश टिळेकर यांच्या मातु:श्री रंजना टिळेकर यांचेही  नाव चर्चेत होते.सुनील कांबळे हे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू असले तरी नगरसेवकपदाची ही त्यांची पाचवी टर्म आहे. दिलीप कांबळे यांच्या आधीपासून ते महापालिकेच्या राजकारणात सक्रिय आहेत. दोन्ही आमदारांनी आपले बंधू व आईसाठी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा  केला होता .

वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून जगदीश मुळीक निवडून आले आहेत. या मतदारसंघावरील पकड मजबूत करण्यासाठी योगेश यांना स्थायी समितीवर संधी देण्यात आल्याचे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी संकेत दिले आहेत  .

वंदना चव्हाणांबद्दल सामान्य कार्यकर्ते नाराज ..

पुणे-दिल्ली आणि वरिष्ठ हाय फाय सोसायटीत रमणाऱ्या वंदना चव्हाण यांना खूप संधी दिली ,आता थेट सामान्य जनतेशी नाळ असणाऱ्या लोकनेत्यांना राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष पद द्या अशी मागणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे . सामान्य कार्यकर्ता आणि चव्हाण यांच्यात असलेला दुरावा आता त्यांना पुन्हा दुसऱ्यांदा पक्षनेतृत्वाने खासदारकीची संधी दिल्याने उफाळून आला आहे .विशिष्ट लोकांशीच संपर्क ठेवणे,सामान्य,मेहनती कार्यकर्त्यांना किंमत न देणे अशा आरोपांसह जनतेशी नाळ त्यांची राहिलेली नाही असा मुख्य आरोप चव्हाण यांच्यावर केला जातो आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार वंदना चव्हाण या आठ वर्षांपासून शहराध्यक्षपदांवर विराजमान आहेत. त्यांना पुन्हा राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे त्यामुळे शहराध्यक्षपदी नव्या चेहऱ्याला संधी देण्याची मागणी राष्ट्रवादीमध्ये जोर धरू लागली आहे.

पुण्याच्या शहराध्यक्षांमध्ये बदल केला जावा, अशी मागणी 2016 पासून केली जात आहे. या पदासाठी  पालिकेतील माजी उपमहापौर आणि नगरसेवक  दीपक मानकर, माजी सभागृहनेते आणि विद्यमान नगरसेवक सुभाष जगताप, माजी महापौर प्रशांत जगताप अशी अनेक नावे चर्चेत आहेत.मात्र या पैकी कोणीही कधीही स्वतः अशा रेस मध्ये येण्याचे टाळले आहे हे विशेष .

पूर्वीदेखील राष्ट्रवादीचा गड मानला जाणाऱ्या पुण्यातुन विधानसभा निवडणुकीत पक्षाचा दारूण पराभव झाल्यानंतर पालिका निवडणुकांपूर्वी शहराध्यक्ष बदलण्याच्या मागणीने जोर धरला होता. शहरातील इतर सर्वच पक्षांच्या अध्यक्षपदी नव्या चेहऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने राष्ट्रवादीमध्ये खांदेपालट होईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती.अखेरच्या टप्प्यात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी पालिका निवडणुकांपर्यंत शहराध्यक्षपद वंदना चव्हाण यांच्याकडे कायम राहील, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती . गेल्या वर्षी पालिका निवडणुकांनंतर त्यांनीच नैतिक जबाबदारी स्वीकारत चव्हाण यांनी राजीनामा दिला होता. पक्ष नेतृत्वाने तो स्वीकारला नाही आणि नव्याने कोणाची नियुक्ती करण्यासाठी पावले उचलली नाहीत. आता पुन्हा एकदा शहराध्यक्ष बदलाचे वारे वाहू लागले आहे.

“ आमदार चषक २०१८ “ जय माता दी संघाने जिंकला

0

पुणे-महामानव संघटना आयोजित आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आमदार चषक २०१८ ताडीवाला रोड येथील जय माता दी संघाने जिंकला . ताडीवाला रोड येथील रेल्वे पोलिस मैदानावर पुणे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा संपन्न झाल्या . या क्रिकेट स्पर्धेमध्ये ३२ संघानी भाग घेतला . या क्रिकेट स्पर्धेमधील अंतिम क्रिकेटचा सामना ताडीवाला रोड येथील जय माता दि संघ व कोथरूड येथील मृत्युंजय संघामध्ये झाला . यामध्ये जय माता दी संघ विजयी ठरला .

या क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण आमदार ऍड. जयदेवराव गायकवाड यांच्याहस्ते पार पडला . विजेत्या संघास ३३३३३ रोख रक्कम व स्मृतिचिन्ह देण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार , महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील , माजी आमदार कमल ढोलेपाटील ,  नगरसेवक प्रदीप गायकवाड ,  नगरसेवक प्रशांत जगताप ,नगरसेवक अशोक कांबळे , माजी नगरसेवक रविंद्र माळवदकर , आरिफ बागवान , प्रा. मयूर गायकवाड ,ऋषी परदेशी , अशोक राठी , पंडित कांबळे , भोलासिंग अरोरा , जनार्दन जगताप , ऍड. प्रविण डाळिंबे , संतोष गायकवाड , अतिश वाघमारे , मुनीर सय्यद , तुकाराम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते .

या क्रिकेट स्पर्धेसाठी महामानव संघटनेचे अध्यक्ष संतोष थरकार ,  भीमसेन जमादार ,  प्रीतम भोसले , धनंजय कांबळे , रमेश रामोशी , ऋतिक सुडगे , अजय कांबळे , भगवान नायकवडे , हर्षद कांबळे , सनी चव्हाण , मल्लेश बेलदरे , अर्जुन जमादार , निलेश भिंगारे , नागेश कांबळे , राजेश सुडगे व अमित काकडे आदींनी विशेष परिश्रम घेतले .

यावेळी बक्षीस वितरण कार्यक्रमात सर्वांचे स्वागत प्रा. मयूर गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन जर्नादन  जगताप व हरिष काकडे यांनी केले तर आभार आनंद सवाणे यांनी मानले .

प्रलोभनांना बळी न पडता स्वतःशी, महावितरणशी प्रामाणिक राहा

0

मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांचे भावनिक आवाहन

पुणे : महावितरणचे कर्मचारी म्हणून कोणतेही प्रलोभन समोर आल्यावर कंपनीसह सर्वप्रथम कुटुंबिय व सगेसोयऱ्यांचा विचार करून त्यास स्पष्ट नकार द्यावा. स्वतःशी व महावितरणशी प्रामाणिक राहून वीजसेवेचे आपले कर्तव्य, जबाबदाऱ्या पूर्ण कराव्यात असे भावनिक आवाहन पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी शनिवारी (दि. 03) केले.

येथील रास्तापेठ कार्यालयाच्या प्रांगणात पुणे शहरातील सर्व अभियंता, अधिकारी, जनमित्र व कार्यालयीन कर्मचारी यांच्याशी थेट हितगूज करताना मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. महेंद्र दिवाकर, श्री. सुंदर लटपटे, श्री. राजेंद्र पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे म्हणाले की, सार्वजनिक सेवा क्षेत्रातील महावितरणमध्ये काम करताना ग्राहकसेवा हेच आपले सर्वोच्च कर्तव्य आहे. ते पारदर्शकपणे व प्रामाणिक राहूनच बजावले पाहिजे. कुटुंबियांच्या गरजा पूर्ण होतील एवढे वेतन महावितरणकडून प्रत्येकाला मिळत आहे. पण त्यानंतरही प्रलोभनांना बळी पडल्यास सर्वप्रथम वाताहत संबंधीत कर्मचार्‍यांच्या कुटुंबियाची होते, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्याच्या कुटुंबियाचे भावविश्व उद्‌ध्वस्थ होते. घरातील हसणे खिदळणे संपुष्टात येते. मानसिक तणाव वाढतो व न्यूनगंडही निर्माण होतो. सोबतच समाजात अप्रतिष्ठा होते. सगेसोयरे अंतर ठेऊन राहतात. महावितरणचीही जनमानसात प्रतिमा मलीन होते. या सर्व गोष्टी टाळण्यासाठी प्रामाणिकपणे काम करून ग्राहकांमध्ये स्वतः व कंपनीबद्दलचा चांगुलपणा निर्माण करावा असेही त्यांनी सांगितले. लोभ असला तर तो आपले आईवडील, कुटुंबिय, सगेसोयऱ्यांबद्दल ठेवावा. वाईट मार्गावर नेणारे प्रलोभन किंवा लोभ हे क्षणिक असले तरी त्याचे परिणाम स्वतःसह कुटुंबियांनाही आयुष्यभर भोगावे लागतात. त्यामुळे प्रलोभनांना थारा न देता ग्राहकसेवा किंवा कार्यालयीन कामकाज हे नियमाधीन राहून प्रामाणिकपणे व पारदर्शकपणे करावे, असे आवाहन त्यांनी केले.

संपूर्ण राज्यात पुणे परिमंडल हे थकबाकीमुक्तीचे, उत्कृष्ट व जलद ग्राहकसेवेचे तसेच अखंडित वीजपुरवठ्याचे एक मॉडेल ठरावे या उद्दिष्टपूर्तीसाठी सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता प्रामाणिकपणे व एकजुटीने काम करावे, अशी साद मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी दिली. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या सादाला एकदिलाने व निर्धारापूर्वक प्रतिसाद दिला.

कार्यक्रमात अधीक्षक अभियंता सर्वश्री महेंद्र दिवाकर, सुंदर लटपटे, राजेंद्र पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. पुणे शहरातील थकबाकी शून्य करण्यासोबतच उत्कृष्ट व पारदर्शक ग्राहकसेवेचे त्यांनी उपस्थितांना आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्री. रामगोपाल अहिर यांनी केले व आभार मानले. यावेळी विविध कर्मचारी संघटनांचे पुणे शहरातील पदाधिकारी, सर्व कार्यकारी अभियंते, उपविभाग कार्यालयप्रमुखांसह अभियंते, अधिकारी, जनमित्र व कार्यालयीन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

९ मार्चला ‘फिरकी’ प्रेक्षकांच्या भेटीला

0

बालपणाला नव्याने उजाळा देणाराफिरकी

मनोरंजनाची चौकट न मोडता अधिक आशयपूर्ण आणि प्रत्यक्ष जीवनाशी जवळीक साधणारे चित्रपट देण्याचा प्रयत्न करणारे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताहेत. स्पॅाटलाईट प्रोडक्शनच्या ‘फिरकी या आगामी मराठी चित्रपटातून ‘पतंगा’ च्या चित्रचौकटीतून लहानग्याच्या भावविश्वाचा आणि त्याच्या आयुष्याचा प्रवास सुरेखरीत्या उलगडण्यात आला आहे. येत्या ९ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मौलिक देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून लेखन व दिग्दर्शन सुनिकेत गांधी यांचे आहे.

 

फिरकीच्या मदतीने पतंगाचा प्रवास कधी उंच भरारीचा तर कधी हेलकावण्याचा असतो. आयुष्याचे ही असेच असते. प्रत्येकालाच आयुष्यात काही ठोस असे ईप्सित साध्य करायचे असते त्यात अनेक अडथळे येतात, त्यावर मात करून पुढे जायचे असते. या चित्रपटातही हा संघर्ष आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या गोविंदला (पार्थ भालेराव) व त्यांच्या मित्रांना पतंग उडवण्याचा खूप नाद आहे, पण अचानक एका अडचणीत सापडलेला गोविंद कशा मार्ग शोधतो? त्याला त्याच्या मित्रांची कशी साथ मिळते? आणि गोविंद कसा वडिलांच्या मदतीने हा जिंकण्याचा प्रवास अनपेक्षितरित्या गाठतो हे पाहणं रंजक ठरणार आहे. लहानपणी पतंग उडवताना झालेली टशन, मस्ती, गंमत आणि मित्रांची साथ या सगळ्यां गोष्टींची आठवण करून देणारा चित्रपट म्हणजे फिरकी.

अनेक राष्ट्रीय व आतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरविण्यात आलेल्या फिरकी चित्रपटात पार्थ भालेराव, पुष्कर लोणारकर, अभिषेक भाराटे, अथर्व उपासनी, अथर्व शाळीग्राम या बालकलाकारांसोबत हृषिकेश जोशी, ज्योती सुभाष, अश्विनी गिरी, किशोर चौघुले या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. पटकथा व संवाद सुनिकेत गांधी, आदित्य अलंकार, विशाल काकडे यांनी लिहिले आहेत. छायांकन धवल गणबोटे तर संकलन नितेश राठोड यांचे आहे. अंबरीश देशपांडे, मैउद्दीन जमादार यांच्या लेखणीतून साकारलेल्या वेगवेगळ्या जॉंनरच्या तीन गीतांना भूषण चिटणीस, श्रीरंग धवले, सुनीत जाधव यांनी संगीत दिले आहे.

जगण्याची प्रेरणा देणारा आशय, सुंदर कथा, अभिनयाने मोहून टाकणारे निरागस चेहरे आणि त्याला सुश्राव्य संगीताची जोड ह्या सगळ्याचा अविस्मरणीय अनुभव म्हणजे फिरकी. आजवर मराठी चित्रपटांमधून नवनवीन विषय हाताळले गेले आहेत, परंतु पतंग या विषयाला धरून दिग्दर्शक सुनिकेत गांधी आणि निर्माते मौलिक देसाई यांनी केलेला पहिला प्रयत्न नक्कीच तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या आठवणीत घेऊन जाईल.

९ मार्चला फिरकी प्रदर्शित होणार आहे.

तंत्रज्ञानातील बदलापलिकडचे ज्ञान विद्यापीठांनी द्यावे : डॉ. गणेश नटराजन

0

पुणे :‘डॉ. डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एमसीए अ‍ॅण्ड एमबीए’ आयोजित ‘अ‍ॅडव्हान्सेस इन कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी अ‍ॅण्ड मॅनेजमेंट’ विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन आज शुक्रवारी डॉ. गणेश नटराजन (अध्यक्ष, 5 एफ वर्ल्ड) यांच्या हस्ते झाले.

जगभरातील अनेक संशोधक आणि तज्ञांनी परिषदेत सहभाग घेतला होता.डॉ.डी.वाय.पाटील एज्यूकेशनल कॉम्प्लेक्स आकूर्डी कॅम्पसमध्ये झालेल्या परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. मिडऑग्स कुर्मीस (क्लैपेडा युनिव्हर्सिटी, लिथुएनिया), विजोलेट सुलसाने (लिथुएनिया), यान डूक मान (साऊथ कोरीया), मिनवू सेओ (साऊथ कोरीया), सान्ग हॅक ली (साऊथ कोरीया), रॉजर टेलर (डेन्मार्क) उपस्थित होते.एस. के. जोशी, के. निर्मला (संचालक एमसीए विभाग), डॉ. शलाका पारकर (अधिष्ठाता, एमबीए विभाग), यु. आर. देशपांडे आदी मान्यवर उदघाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.300 प्रतिनिधी आणि संशोधक सहभागी झाले होते आणि 4 पेपर प्रेझेन्टेशन सत्रे आयोजित करण्यात आली.सतेज पाटील (माजी मंत्री आणि अध्यक्ष, डॉ. डी.वाय.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ एमसीए अ‍ॅण्ड एमबीए) यांच्या हस्ते गणेश नटराजन आणि डॉ. मिडऑग्स कुर्मीस यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना गणेश नटराजन म्हणाले, ‘सोशल मीडिया, मोबिलीटी, अॅनालिटीक्स, क्लाऊड म्हणजे ‘स्मॅक’चा जमाना आहे. सतत बदल होत आहेत, अनिश्चितता वाढत आहे. अशा परिस्थितीत बदल आत्मसात करुन त्यापालिकडचे अंतज्ञान विद्यार्थांना देण्याचा प्रयत्न विद्यापीठांनी केला पाहिजे.’सतेज पाटील म्हणाले, ‘जागतिक डिजिटल क्रांतीद्वारे प्रचंड क्रांतीकडे वाटचाल सुरू आहे, पण, यामध्ये ग्रामीण भारताला या नव्या संशोधनांची मदत होणे गरजेचे आहे.कविता सुर्यवंशी यांनी आभार मानले.

मंत्री महादेव जानकर विनाकारण महापालिकेत आले काय ?

पुणे- मी सहज महापालिकेत आलो , काही राजकीय वगैरे काम नव्हते,महापौरांचे कार्यालय हि पाहिले नव्हते , असे वक्तव्य जरी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी केले असले तरी त्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही .पुणे महापालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाचा भाजपचा उमेदवार जाहीर होणे, त्या उमेदवाराचा अर्ज दाखल करणे अशा प्रक्रिया आज दुपारी 3 वाजल्यानंतर सुरु होणार असताना दुपारी सव्वादोन नंतर अचानक मंत्री महादेव जानकर पुणे महापालिकेत पदाधिकाऱ्यांचे कार्यालय असलेल्या तिसऱ्या मजल्यावर दिसले आणि राजकीय तर्क वितर्क लढविले जावू लागले .
जानकर हे मंत्री आहेत ते कामाशिवाय महापालिकेत येतील कसे ? असा प्रश्न अनेकांना पडला . यावेळी व्हरांड्यात च ते पत्रकारांशी बोलू लागले तेव्हा त्यांना पत्रकार कक्षात काही पत्रकारांनी नेले . नगरसेवक गोपाल चिंतल त्यांच्या बरोबर होते,अनेक विविध पक्षांच्या नगरसेवकांनी त्यांच्या समवेत फोटो काढून घेतले .पण ते आले तेव्हा कोणीही पदाधिकारी त्यांच्या स्वागताला उपस्थित नव्हता. महापौर आणि सभागृहनेते त्यांना भेटल्याचे वृत्त नव्हते .मात्र ते सभागृह नेत्यांच्या अँटीचेंबर मध्ये अवघी 3 मिनिटे जावून आले …. यावेळी त्यांचा पत्रकारांशी झालेला संवाद .. पहा आणि ऐका …
(या शिवाय त्यांनी पत्रकार कक्षात काही स्थानिक वाहिन्यांशी केलेला संवाद
https://www.facebook.com/MyMarathiNews/ या पेजवर लाइव्ह केलेला जरूर पहा)

“नवउद्योग भारतात थक्क करणारी कामगिरी घडवताहेत” : मानसी किर्लोस्कर

पुणे-चैतन्यशील व तरुण बिझनेस आयकॉन, तसेच किर्लोस्कर सिस्टिम्स लिमिटेडच्या कार्यकारी संचालक मानसी किर्लोस्कर यांचे नुकतेच ‘बिट्स पिलानी अपोगी २०१८’ कार्यक्रमात प्रेरणादायी व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या विशेष पाहुण्या या नात्याने त्यांनी ‘नव्या युगातील नवउद्योग परिसंस्था’ (न्यू एज स्टार्टअप्स इकोसिस्टिम) या संकल्पनेवर बीजभाषण सत्रात आपले विचार व्यक्त केले. ‘बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स’च्या (बिट्स पिलानी) विद्यार्थ्यांबरोबरच भारत व जगभरातील अनेक बुद्धिमंत या कार्य़क्रमात सहभागी झाले होते.

मानसी किर्लोस्कर म्हणाल्या, “आज अनेक नवउद्योगांनी अजोड आणि अकल्पित असे यश मिळवून दाखवले आहे. नवउद्योग व त्यांचे तरुण संस्थापक दाखवत असलेली अभिनवता व नवनिर्मिती प्रत्येक उद्योगाला स्पर्धात्मक राहण्यासाठी सुसंगतच असते. भारताला प्रचंड बाजारपेठ, उद्योजकीय मानसिकता आणि नवउद्योग सुरु करणाऱ्यांत झपाट्याने होत असलेली वाढ या गोष्टींमुळे प्रचंड सुप्त सामर्थ्यवान नवउद्योग निर्माण करण्याचे लाभ आहेत. याचा परिणाम म्हणून भारत आज चीन व अमेरिकेपाठोपाठ जगाची तिसरी सर्वांत मोठी नवउद्योग परिसंस्था म्हणून उदयाला आला आहे.” मालमत्ता, सेवा व नैपुण्य या क्षेत्रांत नवनिर्मिती घडवून नवउद्योग भारतात थक्क करणारी कामगिरी करुन दाखवत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

 

या बीजभाषण सत्रानंतर मानसी किर्लोस्कर यांनी बिट्स पिलानी कॅम्पसमधील ‘इन्स्पायर्ड कार्टेर्स’ या संघाला भेट दिली. ‘इन्स्पायर्ड कार्टेर्स’ ही बिट्स पिलानीची फॉर्म्युला स्टुंडट टीम सध्या स्वतःच्या कल्पनेतील कारच्या पाचव्या आवृत्तीची रचना करत आहे. मानसी किर्लोस्कर यांनी या संघातील विद्यार्थ्यांनी विकसित व प्रदर्शित केलेल्या वाहनांची माहिती घेतली. मोटरस्पोर्ट्स क्रीडाप्रकारावरील निखळ प्रेमातून चालकाच्या गरजांचा अभ्यास करुन निश्चित नियमांच्या आधारे ओपन व्हील ओपन कॉकपिट फॉर्म्युला टाईप रेसकार विकसित करण्याच्या आपल्या संघांच्या मोहिमेबाबत विद्यार्थ्यांनी मानसी किर्लोस्कर यांना माहिती दिली. आकांक्षेतून उत्तम वाहन तयार करण्याचे विद्यार्थ्यांचे प्रयत्न त्यांच्याकडूनच जाणून घेणे अत्यंत रंजक असल्याचे मानसी किर्लोस्कर यांनी नमूद केले.

भाजपच्या पालिका राजकारणाबाबत शिवसेना संतप्त

पुणे-आपापल्या प्रभागातच तमाम पुणेकरांचे ,महापालिकेचे कोट्यावधी रुपये जिरवीण्याच्या पालिकेतील भाजपच्या राजकारणामुळे शिवसेना संतप्त झाली असून यापुढील काळात त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील असा इशारा शिवसेनेच्या नगरसेवकांकडून देण्यात येतो आहे .
का झाली शिवसेना संतप्त ..याबाबत विचारणा केली असता ..
प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात विकास कामांसाठी केलेली तरतूद पुढे करण्यात येत आहे .
काय आहे हि तरतूद पहा ..
मनसे वसंत मोरे – साडेसहा कोटी रुपये
कॉंग्रेस -अरविंद शिंदे- ९ कोटी रुपये
शिवसेना संजय भोसले -८ कोटी रुपये
राष्ट्रवादी -विपक्ष नेते – चेतन तुपे पाटील – १० कोटी रुपये …
अशी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रभागात विकास कामांसाठी तरतूद केली गेली आहे . तर
भाजपचे
सभागृहनेते श्रीनाथ भिमाले – २० कोटी रुपये
विद्यमान स्थायी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ – ३५ कोटी रुपये
या बड्या नेत्यांच्या  वार्डातील तरतुदीला कोणाचाही आक्षेप नाही ..मात्र नगरसेवकांच्या वार्डात विकास कामांसाठी तरतूद करताना केवळ दुजाभाव च नाही तर वैमनस्याचे  राजकारण करण्यात आल्याचा दावा करण्यात येतो आहे .
भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या वार्डात साडेपाच कोटी हून अधिक रकमेची तरतूद विकास कामांसाठी करण्यात आली आहे .मात्र शिवसेनेच्या एकूण ८ नगरसेवकांच्या वार्डात अवघ्या 2 कोटी ते २ कोटी २० लाखापर्यंत तरतूद करण्यात आली आहे .
यामुळे भाजपा ज्या वार्डात शिवेसेनेचे नगरसेवक आहेत त्या वार्डात जाणूनबुजून कमी तरतूद करून शिवसेनेची पीछेहाट कशी होईल याची व्यूहरचना करत आहे असा आरोप करण्यात येतो आहे .

दुपारी येणार मुख्यमंत्र्याचा फोन -चेअरमन ठरणार आजच


पुणे- महापालिकेतील स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपच्या वतीने एकाच उमेदवाराचा अधिकृत उमेदवारी  अर्ज आज दुपारी महापालिकेत भरण्यात येणार असून ,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चेअरमन पदाच्या उमेदवाराचे  नाव शहराध्यक्ष योगेश गोगावले यांना आणि गोगावले सभागृनेते श्रीनाथ भिमाले यांना कळवतील .गोगावले यावेळी येतील काय ? खासदार संजय काकडे उपस्थित असतील काय ? पक्षाचे कोण कोण नेते हा अर्ज भरताना असतील . याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे .तर विरोधी पक्षांच्या वतीने राष्ट्रवादीच्या लाक्ष्मिताई दुधाने या उमेदवारी अर्ज दाखल करतील .
स्थायी समिती अध्यक्ष पदासाठी आमदार योगेश टिळेकर यांच्या मातोश्री रंजना टिळेकर, आमदार जगदीश मुळीक यांचे भाऊ योगेश मुळीक, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे भाऊ सुनील कांबळे यांच्यात स्पर्धा निर्माण झाली आहे. मुख्यमंत्री यापैकीच कोणाच्या पारड्यात चेअरमन पद टाकतील कि अन्य कोणाला संधी देतील ते आज समजेल अशी आशा आहे .

सर्वांगीण विकासासाठी कंपनी व्यवस्थापन व मनुष्यबळ यांची सकारात्मक मानसिकता आवश्यक – डॉ.अनंत सरदेशमुख

0
पुणे :   सर्वांगीण विकासासाठी कंपनी व्यवस्थापन व मनुष्यबळ यांची सकारात्मक मानसिकता आवश्यक आहे, असे मत मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड ऍग्रीकल्चरचे महासंचालक  डॉ.अनंत  सरदेशमुख यांनी व्यक्त केले. ते बुधवारी एमसीसीआयएच्या सुमंत मुळगांवकर सभागृहात आयोजित ‘हंगामी मनुष्यबळ – फायदे आणि तोटे’ या विषयावरील  एमसीसीआयए,एनआयपीएम व आयएसटीडी एच.आर.फोरमच्या  परिसंवादात अध्यक्षीय भाषणात ते  बोलत होते.

यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, वस्त्र निर्मिती उद्योगात सुरवातीला बदली कामगार ही संकल्पना गिरणीकामगारांनी अनुभवली. आता सध्याच्या कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) व   इंटरनेट ऑफ थिंग्स (आयओटी) यासारख्या नवीन बदलांमुळे संपूर्ण उद्योगविश्वात मोठ्या प्रमाणात बदल पहावयास मिळतील असे असताना हंगामी मनुष्यबळाचा रोजगारावरही निश्चित परिणाम होईल.

या परिसंवादात सुरवातीला भारत फोर्ज कंपनीच्या  मनुष्यबळ व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. एस. व्ही. भावे यांनी आपल्या मनोगतात कामगार कायद्यांमधील कायम व हंगामी स्वरूपाच्या कामगारांसंबंधीच्या नियमांविषयी सविस्तर विवेचन केले.तसेच एकीकडे उद्योगजगताची व्यवसाय वृद्धी कायम असण्याची शक्यता नसताना दुसरीकडे कंपनी  व्यवस्थापन सर्वच कामगारांना  नोकरीवर कायम करण्याची भूमिका कशी काय घेऊ शकते असा सवाल केला.

तर नॅशनल इन्स्टिटूयट  ऑफ  पर्सोनेल  मॅनेजमेंट (एनआयपीएम) चे पुणे विभागाचे अध्यक्ष विश्वेश  कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात मनुष्यबळाविषयी कंपनी व्यवस्थापनानेही आपला दृष्टिकोन सकारात्मक करणे गरजेचे आहे असे सांगितले व केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेल्या ‘नीम’ योजनेद्वारे बेरोजगार युवकांना रोजगारक्षम बनण्याची संधी मिळत असल्याचे सांगितले. भारत फोर्ज, टाटा मोटर्स, महिंद्रा एन्ड महिंद्रा यासारख्या कंपन्यांमधून हंगामी कामगारांना मिळणारी वागणूक ही  अनेकांनी अनुकरण करण्यायोग्य असल्याचे सांगितले. शिका व कमवा  आणि  नीम सारख्या योजनांमुळे एकीकडे बेरोजगार युवकांना रोजगार संधी उपलब्ध होत असतानाच प्रत्यक्ष कामाच्या अनुभवासोबतच तांत्रिक शिक्षण मिळत असल्याने त्यांना  सुरक्षित भविष्याची हमी मिळते. मात्र संपूर्ण देशात युवावर्गात श्रम प्रतिष्ठेविषयी अनास्था असल्याने कामाच्या असंख्य संधी उपलब्ध असतानाही केवळ अमुक प्रकारचेच काम करेन या अट्टाहासापायी हजारो लाखो उच्च् शिक्षित तरुण आज बेरोजगार असल्याचे दिसत आहे अशी खंत व्यक्त केली.

या कार्यक्रमात व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यानी उद्योगजगताशी संबंधित  विषयावरील नाट्यछटांचे सादरीकरण केले. यामध्ये बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सच्या विद्यार्थ्यानी सादर केलेल्या   नाट्यछटेला प्रथम तर आयआयसीएमआर च्या विद्यार्थ्यानी सादर केलेल्या   नाट्यछटेला व्दितीय क्रमांकाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक किशोर पंप्स कंपनीच्या मनुष्यबळ व्यवस्थापक तृप्ती देसाई यांनी सूत्रसंचालन अनुजा देशपांडे यांनी तर आभार प्रदर्शन इंडियन सोसायटी ऑफ  ट्रेनिंग अँड डेव्हलपमेन्टच्या अध्यक्ष रश्मी हेबळकर यांनी  केले.
या कार्यक्रमाला पुणे जिल्ह्यातील विविध कंपन्यांचे  मनुष्यबळ व्यवस्थापक उपस्थित होते. 

सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराच्या वतीने चिपको आंदोलन

0
पुणे : पुण्यनगरीची शान असलेल्या व पर्यावरण, जैवविविधता यांनी नटलेल्या एम्प्रेस गार्डेनचे लचके तोडण्याचा आसुरी डाव आखणाऱ्या भाजपा सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराच्या वतीने, विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी दुपारी झाडांना मिठी मारून (चिपको) आंदोलन करण्यात आले.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांना विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांनी पक्षाच्या वतीने एम्प्रेस गार्डेन येथे करण्यात येणाऱ्या बांधकाम विरोधात जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन दिले.
यावेळी ॲग्री हाॅर्टिकल्चरल सोसायटी ओफ वेस्टर्न इंडिया संस्थेचे मानद सचिव सुरेश पिंगळे, माजी महापौर वैशाली बनकर, माजी महापौर प्रशांत जगताप, माजी आमदार बापू पठारे, माजी आमदार कमल ढोले- पाटील, नगरसेवक प्रदिप गायकवाड, नगरसेविका रत्नप्रभा जगताप, नगरसेवक भय्यासाहेब जाधव, भगवान वैराट, माजी नगरसेविका सुरेखा कवडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस कन्टोमेन्ट मतदारसंघचे अध्यक्ष भोलासिंग अरोरा, माजी स्थायी समिती अध्यक्ष निलेश निकम, पक्षाचे युवक अध्यक्ष राकेश कामठे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस च्या अध्यक्ष मनाली भिलारे, विद्यार्थी अध्यक्ष ऋषी परदेशी, सुनिल बनकर, चंद्रकांत कवडे, श्वेता होनराव, जनार्दन जगताप, युसुफ पठाण, फईम शेख, सागर भोसले, संग्राम होनराव, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.  
यावेळी  ‘निसर्गावर घाला घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, एम्प्रेस गार्डन काय म्हणते ,फडणवीस काका मला वाचवा म्हणते’, अशा घोषणा देत पक्षाच्या वतीने कार्यकर्त्यानी झाडाला मिठी मारून चिपको आंदोलन केले.
शासकीय अथवा निमशासकीय जागेत आपण बांधकाम करावे. एम्प्रेस गार्डन सारख्या पर्यावरणानी नटलेल्या जागेत हे बांधकाम होऊ देऊ नये, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराच्या वतीने करण्यात आली.
हिरवाईने नटलेले एम्प्रेस गार्डन तोडून काँक्रीटचे जंगल करण्याचा घाट सरकाने घातला आहे. एकीकडे सरकार झाडांची लागवड करण्याचा संकल्प करते, तर दुसरीकडे दुर्मिळ आणि जुन्या झाडांची कत्तल करून पर्यावरणाचा र्‍हास करण्यास हातभार लावत आहे. सरकारच्या दुटप्पी धोरणाचा निषेध आम्ही या आंदोलानाद्वारे करीत आहोत’, असे चेतन तुपे म्हणाले.
एम्प्रेस गार्डन या ठिकाणी देण्यात आलेल्या बांधकामाच्या परवानगी विरोधात हे आंदोलन केलं गेले, अशी माहिती आंदोलन नियोजक राष्ट्रवादी कॉंग्रेस कन्टोमेन्ट मतदारसंघ चे अध्यक्ष भोलासिंग अरोरा यांनी दिली.
या आंदोलना विषयी माहिती देताना भोलासिंग अरोरा म्हणाले, ‘एम्प्रेस गार्डन या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या शासकीय वसाहत बांधकाम विरोधात व १५० वर्ष जुनी असणारी वृक्ष तोड वाचविण्याकरिता भाजप सरकार विरोधात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले.’