पुणे-आपापल्या प्रभागातच तमाम पुणेकरांचे ,महापालिकेचे कोट्यावधी रुपये जिरवीण्याच्या पालिकेतील भाजपच्या राजकारणामुळे शिवसेना संतप्त झाली असून यापुढील काळात त्याचे परिणाम भाजपला भोगावे लागतील असा इशारा शिवसेनेच्या नगरसेवकांकडून देण्यात येतो आहे .
का झाली शिवसेना संतप्त ..याबाबत विचारणा केली असता ..
प्रत्येक नगरसेवकाच्या प्रभागात विकास कामांसाठी केलेली तरतूद पुढे करण्यात येत आहे .
काय आहे हि तरतूद पहा ..
मनसे वसंत मोरे – साडेसहा कोटी रुपये
कॉंग्रेस -अरविंद शिंदे- ९ कोटी रुपये
शिवसेना संजय भोसले -८ कोटी रुपये
राष्ट्रवादी -विपक्ष नेते – चेतन तुपे पाटील – १० कोटी रुपये …
अशी विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रभागात विकास कामांसाठी तरतूद केली गेली आहे . तर
भाजपचे
सभागृहनेते श्रीनाथ भिमाले – २० कोटी रुपये
विद्यमान स्थायी अध्यक्ष मुरलीधर मोहोळ – ३५ कोटी रुपये
या बड्या नेत्यांच्या वार्डातील तरतुदीला कोणाचाही आक्षेप नाही ..मात्र नगरसेवकांच्या वार्डात विकास कामांसाठी तरतूद करताना केवळ दुजाभाव च नाही तर वैमनस्याचे राजकारण करण्यात आल्याचा दावा करण्यात येतो आहे .
भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या वार्डात साडेपाच कोटी हून अधिक रकमेची तरतूद विकास कामांसाठी करण्यात आली आहे .मात्र शिवसेनेच्या एकूण ८ नगरसेवकांच्या वार्डात अवघ्या 2 कोटी ते २ कोटी २० लाखापर्यंत तरतूद करण्यात आली आहे .
यामुळे भाजपा ज्या वार्डात शिवेसेनेचे नगरसेवक आहेत त्या वार्डात जाणूनबुजून कमी तरतूद करून शिवसेनेची पीछेहाट कशी होईल याची व्यूहरचना करत आहे असा आरोप करण्यात येतो आहे .