जीवनातील काळोखाला कोलटकर यांनी टिपले : भास्करराव हंडे यांची भावना
झी स्टुडिओज् निर्मित ‘न्यूड’ येत्या २७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला
गेल्या काही महिन्यांपासून ‘न्यूड (चित्रा)’ या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. चित्रपटाच्या नावावरूनही अनेकांच्या मनात कुतूहलाची भावना जागी झाली होती. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झाला असून, झी स्टुडिओज् येत्या २७ एप्रिलला तो महाराष्ट्रासोबतच इतर राज्यांतील प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. ह्या पत्रकार परिषदेला दिग्दर्शक रवी जाधव, निर्माते झी स्टुडिओज् चे मंगेश कुलकर्णी आणि अथांश कम्युनिकेशनच्या मेघना जाधव, लेखक सचिन कुंडलकर, चित्रपटातील कलाकार कल्याणी मुळे, छाया कदम, ओम भुतकर आणि मदन देवधर तसेच तंत्रज्ञ यांची उपस्थिती होती.
,चित्रपटात मुलाच्या शिक्षणसाठी धडपड करताना एका कला महाविद्यालयात ‘न्यूड मॉडेल’ म्हणून काम करणाऱ्या यमुनेनी (कल्याणी मूळेंनी), खऱ्या आयुष्यात सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टस् महाविद्यालयात गेली ३० वर्ष ज्ञानदानाचे हेच काम करणाऱ्या लक्ष्मी यांना बोलते केले. लक्ष्मी यांनी त्यांना या प्रवासात आलेले अनुभव कथन केले. त्या म्हणाल्या,मला माझ्या कामाचा सार्थ अभिमान आहे. मला विद्यार्थ्यांनी इथे देवाचा दर्जा दिला आणि आता या विषयावर सिनेमा येऊ घातलाय. प्रेक्षकांसमोर आमची कथा मांडली जाणार आहे यासारखा दुसरा आनंद नाही.
न्यूड मॉडेल हे कला क्षेत्रातील वास्तव असल्यामुळे या संज्ञेकडे साशंकतेने पाहणे हे त्या कलाकृतीवर अन्याय करणारे आहे. घराप्रमाणेच चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांच्या मनातही एक उंबरठा असतो. त्यामुळे ‘न्यूड (चित्रा)’ चित्रपटाविषयीचे धुके लवकरच निवळेल, असा विश्वास प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. मी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सचा विद्यार्थी आहे. त्यामुळे मी निर्माण करीत असलेल्या कलाकृतींमध्ये अश्लीलता नाही, तर कलात्मकताच असेल, याची खात्री बाळगावी, असेही त्यांनी सांगितले.
अथांश कम्युनिकेशन्स आणि झी स्टुडिओज यांनी ‘न्यूड (चित्रा)’ चित्रपटाची निर्मिती केलेली आहे . या चित्रपटाची कथा रवी जाधव यांची असून, पटकथा आणि संवाद सचिन कुंडलकर यांनी लिहिले आहेत. रवी जाधव दिग्दर्शित या सिनेमाचे अप्रतिम छायाचित्रण केले आहे अमलेंदू चौधरी यांनी तर संकलन केले आहे अभिजीत देशपांडे यांनी. कथेला अनुसरुन कला दिग्दर्शन करण्याची जबाबदारी संतोष फुटाणे आणि महेश साळगावकर यांनी पेलली आहे आणि वेशभूषा साकारली आहे मेघना जाधव यांनी. सौरभ भालेराव यांचं पार्श्वसंगीत चित्रपटात असून सायली खरे आणि विद्या राव यांनी वैयक्तिकरित्या या चित्रपटात दोन गाणी लिहिली आहेत आणि स्वरबद्धही केलेली आहेत.
बाविसाव्या शतकासाठी सज्ज व्हा :डॉ .अरुण निगवेकर
4थ्या सुहाना लक्ष्य कॉर्पोरेट महिला व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत इन्फोसिस, टेक महिंद्रा, कॅपजेमिनि, टीसीएस संघांची आगेकुच
पुणे: सुहाना प्रवीण मसालेवाले आणि लक्ष्य यांच्या संलग्नतेने आयोजित सुहाना लक्ष्य कॉर्पोरेट महिला व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धेत इन्फोसिस, टेक महिंद्रा, कॅपजेमिनि, टीसीएस या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
सिम्बायोसिस स्कुल, प्रभात रोड येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत भारती रोकडेच्या अषटपैलू कामगिरीच्या बळावर टेक महिंद्रा संघाने कॅग्निझंट संघाचा 2-0(25-9, 25-6) असा सहज एकतर्फी पराभव केला. इन्फोसीस संघाने आपल्या विजयी मालिकेत सातत्य राखत असेंचर संघाचा 2-0(25-11, 25-15) असा पराभव केला. या सामन्यात इनफोसीस संघाची सफलता शर्मा सामनावीर ठरली.
अन्या लढतीत कॅपजेमिनि संघाने अॅमडॉक्स संघाचा 2-0(25-12, 25-21) असा तर टीसीएस संघाने सिंटेल संघाचा 2-0(25-6, 25-6) असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
टेक महिंद्रा वि.वि कॅग्निझंट 2-0(25-9, 25-6) सामनावीर- भारती रोकडे
इन्फोसीस वि.वि असेंचर 2-0(25-11, 25-15) सामनावीर- सफलता शर्मा
कॅपजेमिनि वि.वि अॅमडॉक्स 2-0(25-12, 25-21) सामनावीर- अखिला के. आर
टीसीएस वि.वि सिंटेल 2-0(25-6, 25-6) सामनावीर- रुपाली महाकाले
लीला पुनावाला फाउंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा
सावित्रीबाई फुले पुण्यतिथीनिमित्त अभिवादन
पुणे -पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
हिराबाग येथील पक्ष कार्यालयात पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्ष, खासदार, अॅड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी चेतन तुपे, शशिकला कुंभार, अशोक राठी, शंकर शिंदे, रुपाली चाकणकर, विपुल म्हैसुरकर, राकेश कामठे, स्वप्निल खडके, योगेश जगताप, जनार्दन जगताप, भानुदास शिंदे, सुकेश पासलकर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्यावतीने सारसबाग समोरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या अध्यक्षा शारदा लडकत यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .यावेळी माजी आमदार कमल ढोलेपाटील ,उपाध्यक्षा शशिकला ढोलेपाटील , उषा भगत , मंगल जगताप , अनुप्रिता कलावंत , सचिव निलिमा कलावंत , सहसचिव प्रतिभा काटे , नूतन बनकर , नगरसेविका मनिषा लडकत , अनिता डोमाळे आदी मान्यवर उपस्थित होते .
महात्मा फुले मंडळाच्यावतीने सारसबाग समोरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास मंडळाचे अध्यक्ष मधुकरराव राऊत यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि उपस्थितांचे स्वागत चांगदेव पिंगळे यांनी केले तर सूत्रसंचालन हनुमंत टिळेकर यांनी केले तर आभार कमलाकर डोके यांनी मानले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष मधुकर राऊत , उपाध्यक्ष हनुमंत टिळेकर , सचिव कैलास ताठे , सहसचिव कमलाकर डोके , दिलीप भुजबळ आणि भगवान डोके यांनी केले .
युवा माळी संघटनेतर्फे सारसबाग समोरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास युवा माळी संघटनेच्या अध्यक्ष सुनीता भगत यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .
यावेळी युवा माळी संघटनेच्या सचिव वृषाली शिंदे, समता परिषदेच्या महिला अध्यक्षा मंजिरी धाडगे, समता परिषद सदस्य अनिल नाळे, समता परिषदेचे अध्यक्ष प्रीतेश गवळी, सचिन कचरे, हनुमंत टिळेकर, अरुणकुमार कोद्रे, शशिकांत राऊत, नीलम गोरे, तेजस्वी शेलवंटे, सुनीता शेलवंटे, अविंदा बोराटे आदी मान्यवर उपस्थित होते .
माळी आवाज संस्थेच्यावतीने सारसबाग समोरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास माळी आवाज संस्थेचे संचालक विजयकुमार लडकत यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .
यावेळी माळी आवाज संस्थेचे संचालक हनुमंत टिळेकर , पांडुरंग गाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते .
या कार्यक्रमामध्ये उपस्थितांचे स्वागत व प्रास्तविक माळी आवाज संस्थेचे संचालक विजयकुमार लडकत यांनी केले तर सूत्रसंचालन पांडुरंग गाडेकर यांनी केले तर आभार ऍड. के. टी. आरु यांनी मानले .
भिडे वाडा येथे त्यांच्या प्रतिमेस भिडे वाडा बचाव मोहीमचे प्रमुख प्रशांत फुले यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी साहेबराव जांभुळकर , बाबू सत्ताजी जडेजा , अश्विन गडा , हंसराज पटेल , राजेश सेंजर, अरविंद गडा , सागर जगड , धीरज गाला आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी भिडे वाडा बचाव मोहीमचे माहितीपत्रक वाटप केली . सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या स्त्री शिक्षणाविषयी कार्याचे महत्व पटवून दिले .
दलित पँथर पुणे शहरच्यावतीने सारसबाग समोरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुखदेव सोनवणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले .
यावेळी दलित पँथर पुणे शहराध्यक्ष प्रकाश साळवे , विशाल खिलारे , राहुल सोनवणे , शुभम सोनवणे , रुपेश सोनवणे , शबनम शेख , रुबिना शेख , विठ्ठल केदारी आदी मान्यवर उपस्थित होते .
रमाबाई महिला विकास संस्थेच्यावतीने सारसबाग समोरील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास संस्थेच्या अध्यक्षा मायावती चित्रे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी झाकीर शेख , रेखा वाघमारे , निर्मला त्रिभुवन , श्रध्दा खरात , मीरा प्रभू , यास्मिन कुरेशी , आयेशा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते . महाराष्ट्र जोशी समाज संघटनेच्यावतीने सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास संघटनेचे अध्यक्ष कैल्लास हेंद्रे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी पुणे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब भोसले , महिला अध्यक्षा सुरेखा हेंद्रे , रामदास सर्वे , तानाजी सुर्वे , अण्णा माळी आदी मान्यवर उपस्थित होते .
ताडीवाला रोड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंद सवाणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी अनिल पाटील , महेंद्र कांबळे , हनुमंत मनोहरे , हर्षद शेख , सचिन पारधे , जितेंद्र कांबळे आदी उपस्थित होते .
सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास मिशन ऑफ आंबेडकर सामाजिक संघटनेच्या वतीने संघटनाचे संस्थापक अध्यक्ष अरुण भालेराव यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी अनिल पाटील , महेंद्र कांबळे , हनुमंत मनोहरे , हर्षद शेख , सचिन पारधे , जितेंद्र कांबळे आदी उपस्थित होते .
सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास समता सामाजिक संस्थेच्यावतीने समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी समता सामाजिक संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले , ग्रंथपाल दिलीप भिकुले , विकास भांबुरे , अक्रम शेख , भगवान वायाळ, संजय गायकवाड , आयुब खान , अभिषेक भोसले , अनिकेत भोसले आदी मान्यवर उपस्थित होते .
सारसबाग येथील त्यांच्या पुतळ्यास लोहियानगर येथील अजिंक्य मित्र मंडळाच्यावतीने मंडळाचे अध्यक्ष मधुकर चांदणे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले . यावेळी रमेश चांदणे , विलास कसबे , बाळू कसबे , पप्पू माने , अनिल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते .
वारंवार भुजबळांना जामीन नाकरण्यात आला – शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई– राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी छगन भुजबळांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ दोन वर्षांपासून कोठडीत आहेत. या काळात त्यांच्या शारीरिक आरोग्यवर परिणाम होतो आहे. त्यामुळे वयाच्या 71 व्या वर्षी तुरुंगात राहण्याची वेळ आलेल्या छगन भुजबळ यांना योग्य वैद्यकीय उपचार मिळावेत, अशी मागणी पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. भुजबळांना योग्य उपचार न मिळाल्याने प्रकृतीला धोका निर्माण झाला तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकारची असेल, असा इशाराही शरद पवारांनी पत्रातून दिला आहे.
- शरद पवार यांनी पत्रात म्हंटलं आहे की,
काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या सतत बिघडत जाणाऱ्या प्रकृतीविषयी मला फार चिंता वाटते आहे. त्यांचं वय 71 वर्ष असून ते 14 मार्च 2016 पासून (2 वर्ष) तुरुंगात आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालील आहे.
भुजबळांचं प्रकरण पूर्णपणे कायदेशीर आहे. माननीय कोर्टाने छगन भुजबळ यांच्याविषयी अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. जोपर्यंत कोर्ट अंतिम निर्णय देत नाही, तोपर्यंत भुजबळांना निर्दोष मानलं जाईल. “जामीन हा नियम आहे, तुरुंग हा अपवाद आहे.” हाच नियम छगन भुजबळ यांनाही लागू होतो. पण दुर्दैवाने भुजबळांना वारंवार जामीन नाकारण्यात आला आहे. तरीही मला या विषयावर भाष्य करायचं नाही.
छगन भुजबळ हे ओेबीसी नेते असून 50 वर्ष त्यांनी सार्वजनिक जीवनासाठी खर्च केली आहेत. मुंबईचे महापौर, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन मंत्री अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत. शिवाय महाराष्ट्राच्या जनतेच्या कल्याणासाठी त्यांचं योगदान विसरता येणार नाही. माझी फार अपेक्षा नाही. पण छगन भुजबळांना योग्य वैद्यकीय उपचार मिळायला हवेत. तो त्यांचा घटनात्मक अधिकारही आहे.
छगन भुजबळ यांची प्रकृती आणि वाढतं वय पाहता, आवश्यक ती पावलं उचलून त्यांना योग्य वैद्यकीय सेवा पुरवल्या जातील, याची मला खात्री आहे. मला हे लिहिताना दु:ख होतं आहे, पण तरीही जर येत्या काही दिवसात योग्य उपचारांअभावी छगन भुजबळांची प्रकृती खालावली, तर त्यासाठी तुमचं सरकार जबाबदार असेल.
पुणे – लोणावळा दरम्यान मध्य रेल्वेकडून रविवारी मेगा ब्लॉक
पुणे-तांत्रिक दुरुस्तीसाठी उद्या पुणे ते लोणावळा स्टेशन दरम्यान सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 या काळात मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे कर्जत पुणे कर्जत पैसेंजर, सिंहगड एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस यांसह पुणे लोणावळा लोकलही रद्द करण्यात आल्या आहे.
सिग्नल यंत्रणेतील सुधारणांसह इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेकडून रविवारी पुणे ते लोणावळा दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे यादिवशी प्रगती व सिंहगड एक्सप्रेससह काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच काही गाड्या उशिराने धावणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, हा ब्लॉक सकाळी ११.४० ते दुपारी ४.१० यावेळेत राहणार आहे. सिग्नल यंत्रणेतील सुधारणेमुळे या मार्गावरील रेल्वे गाड्यांची ये-जा अधिक सुलभपणे होणार आहे. त्यासाठी कामशेत ते तळेगाव दरम्यान असलेल्या आॅटोमॅटिक सिग्नल यंत्रणेत सुधारणा केल्या जाणार आहेत. तसेच ब्लॉकच्या कालावधीत कामशेत व वडगाव दरम्यान असलेल्या पुलाच्या बांधणीसाठीचे आवश्यक काम केले जाईल. त्यामुळे या वेळेत रेल्वेगाड्यांवर परिणाम होणार आहे, असे मध्य रेल्वेच्या वतीने कळविण्यात आले आहे.
मेगा ब्लॉकमुळे मुंबई -पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेस, मुंबई-पुणे-मुंबई प्रगती एक्सप्रेस आणि कर्जत-पुणे-कर्जत पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस-काकीनाडा पोर्ट एक्सप्रेस, मुंबई-नागरकोईल एक्सप्रेस या गाड्या लोणावळा व कामशेत स्थानकादरम्यान १ तास २५ मिनिटांसाठी थांबविल्या जातील. तर मुंबई-हैद्राबाद एक्सप्रेस ही गाडी १ तास आणि हुबळी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेसला तब्बल ३ तास २५ मिनिटे थांबविले जाईल. मुंबई-पुणे डेक्कन एक्सप्रेसही पुणे ते देहूरोज दरम्यान २० मिनिटे थांबेल. पुणे स्थानकातून सकाळी ११.४५ वाजता सुटणारी भुसावळ एक्सप्रेस रविवारी दौंड-मनमाड यामार्गे सोडण्यात येणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
पुण्याहून सुटणाऱ्या रद्द लोकलच्या वेळा – सकाळी ६.३०, ६.५०, ८.५७, ९.५५, ११.२० (शिवाजीनगर), दुपारी १२.१५, १, ३, व ३.४०.
लोणावळ्याहून सुटणाऱ्या रद्द लोकलच्या वेळा – सकाळी ६.३०, ७.५०, ८.२०, ९.५७ (तळेगाव), १०.१०, ११.३०, दुपारी २, २.५०, ३.४०, ४.३८ (तळेगाव).
पुण्यातील लाचखोर उपजिल्हाधिकाऱ्याकडे आढळली कोट्यवधींची माया
पुणे-अवघ्या १५ हजाराच्या लाच प्रकरणात पकडलेल्या उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरेकडे लाखो रुपयांची रोकड, सोने, पेट्रोल पंप आणि पुणे, सोलापूर या शहरांमध्ये फ्लॅट असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे. एसीबीने गुरुवारी संध्याकाळी मोरेच्या कार्यालयात लाच प्रकरणी रंगेहाथ पकडण्याची ही कारवाई केली.
त्यानंतर, मोरेच्या पुण्यातील घरात एसीबीने झडती घेतली. त्यात 38 लाख 33 हजार रुपयांची रोकड आढळून आली आहे. त्याचबरोबर, सोनं, पेट्रोल पंप आणि पुणे-सोलापूरमध्ये फ्लॅट असल्याची माहिती एसीबीच्या तपासात पुढे आली आहे. नातेवाईकांच्या नावे मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती जमा केल्याचेही मोरेने एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या बेनामी मालमत्तांचा शोध एसीबी घेत आह.मोरेची खुली चौकशी करण्यात येणार आहे. श्रीपती मोरे पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक अकरा या पदावर कार्यरत होता. जमिनीच्या वादाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी मोरेने 25 हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यातील पंधरा हजार रुपये स्वीकारताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली.
पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे–माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या पार्थिवावर कदम यांच्या पार्थिवावर सांगलीतील वांगीमध्ये असलेल्या सोनहिरा साखर कारखाना परिसरात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
एक निष्ठावंत शिल्पकार गमविला:रमेश बागवे
डॉ.पतंगराव कदम यांनी अनेक कठीण समस्यांना तोंड देऊन आपले शिक्षण पूर्ण केले आणि संपूर्ण देशात भारती विद्यापीठ संस्थचे नाव उंचावले. आपल्या कर्तृत्वाने त्यांनी शैक्षणिक सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात भरीव कामगिरी करून दाखवली. काँग्रेस पक्षाने त्यांना दिलेल्या अनेक मोठमोठ्या जबाबदा-या त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडल्या. त्यांच्या निधनाने काँग्रेस पक्षाने एक निष्ठावंत शिल्पकार गमविला. अशा शब्दात पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
मोठे साम्राज्य उभे करणारा साधा नेता हरपला : अॅड. वंदना चव्हाण
पतंगराव कदम यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आहे. अतिशय गरिबीतून त्यांनी भारती विद्यापीठाच्या माध्यमातून शैक्षणिक साम्राज्य उभे केले. त्यामागे त्यांची कामावरील अविचल निष्ठा दिसून येते. इतके मोठे साम्राज्य उभे करून ते अत्यंत साधे होते. सर्वांशी प्रेमाने वागायचे. अत्यंत मिनमिळावू असलेल्या या नेत्याच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
माजी खासदार सुरेश कलमाडी –
ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्रातून एक लोकनेता हरपला. ते माझे चांगले मित्र होते. सांगली आणि पुणे या शहरांच्या विकासात त्यांनी भरीव योगदान दिले. राजकीय क्षेत्रासोबतच शैक्षणिक, सामाजिक, सहकार अशा विविध क्षेत्रात त्यांनी आपल्या कर्तबगारीने मोठा ठसा उमटवला. हजारो कार्यकर्त्यांना घडवत असताना त्यांनी लाखो तरुण-तरुणींना शिक्षणाची मोठी संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र दुरदृष्टीच्या आणि खंबीर नेतृत्वास मुक
पुण्यात साश्रुनयनांनी पतंगराव कदम यांच्या पार्थिवाचे घेतले अंत्यदर्शन
पुणे-ज्येष्ठ काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे मुंबईतील लीलावती रूग्णालयात निधन झाले. त्यानंतर त्यांचे पार्थिव आज सकाळी पुण्यातील सिंहगड बंगला या ठिकाणी ठेवण्यात आले. पतंगराव कदम यांचे पार्थिव आता भारती विद्यापीठ धनकवडी येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले . साधारण एक ते दीड तासासाठी या ठिकाणी पतंगराव कदम यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यातआले.. त्यानंतर सांगली जिल्ह्यातील वांगी येथे असलेल्या सोनहिरा साखर कारखना येथे दुपारी ४ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
पतंगराव कदम यांचे पार्थिव सकाळी सात वाजेच्या दरम्यान पुण्यात पोहोचले. त्यांच्या सिंहगड बंगल्यावर पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले .येथे माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सकाळीच पतंगराव कदम यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्याशिवाय काँग्रेसच्या आमदार आणि सुशिलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे यांनीही पतंगराव यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. पुण्यातील माजी खासदार सुरेश कलमाडी यांनीही सकाळीच कदम यांच्या सिंहगड बंगला येथील निवासस्थानी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.कॉंग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे,अविनाश बागवे,सामाजिक कार्यकर्ते कुमार सप्तर्षी , खासदार श्रीरंग बारणे यांनी या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. आमदार प्रणिती शिंदे, डॉ. के. एच. संचेती, डॉ. विश्वनाथ कराड, बुधाजीराव मुळीक, विद्या येरवडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, उल्हास पवार, विठ्ठलशेठ मणियार, आमदार जगदीश मुळीक, अभय छाजेड, अरविंद शिंदे, यांच्यासह राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी पतंगराव कदम यांच्या अंत्यसंस्कारासाठी गर्दी केली होती. तसेच अनेक कार्यकर्त्यांचीही या ठिकाणी गर्दी जमली होती .
कदम यांच्या पार्थिवावर सांगलीतील वांगीमध्ये असलेल्या सोनहिरा साखर कारखाना परिसरात अंत्यसंस्कार होणार आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ परिसरातून दुपारी पार्थिव सांगलीकडे रवाना होत आहे . येथे वांगीतील साखर कारखान्यात काही वेळ अंत्यदर्शन आणि 4 वाजेत्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळाली आहे.
तंत्रज्ञाना शोधताना मुलांचा शिक्षणाचा संघर्षही लक्षात ठेवा – डॉ. अरूण निगवेकर
पुणे – कोणत्याही क्षेत्रात संघर्ष अटळ असतो. आज मुंबई – पुण्यासारख्या महानगरातील तंत्रज्ञ नवनविन तंत्रज्ञाना शोधण्यासाठी, आत्मसात करण्यासाठी संघर्ष करत आहेत. त्याचवेळी पुणसारख्या शहरापासून पन्नास किलोमीटरवरील गावातील लहान मुलगी शिक्षणासाठी संघर्ष करत आहे. आपल्या देशाच्या या दोन्ही सीमा असून तंत्रज्ञ, संशोधकांनी नविन तंत्रज्ञानासाठी संघर्ष करताना लहान मुलं, मुलींचाही सुरू असलेला संघर्ष न विसरता लक्षात ठेवावा असे आवाहन सायन्स अण्ड टेक्नॉलॉजी पार्कचे विश्वस्त आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ अरूण निगवेकर यांनी आज येथे केले.
मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अण्ड ऍग्रीकल्चरच्या आसीसी टॉवरमधील सुमंत मूळगावकर हॉलमध्ये टेलिकॉम सेक्टर स्कील कौन्सील आणि बिस्की टेक्नॉलॉजि इंडिया यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या दूरसंचार क्षेत्रातील तंत्रज्ञानाविषयी चर्चासत्रात बीजभाषण देताना डॉ. निगवेकर बोलत होते. यावेळी टेलिकॉम सेक्टर स्कील कौन्सीलच्या पश्चिम विभागाचे प्रमुख निवृत्त कर्नल प्रदीप जसवानी, बिस्की इंडियाचे अध्यक्ष निनाद देसाई, सल्लागार बालचंद्रन आदी मान्यवर उपस्थित होते. या चर्चासत्राला दूरसंचार क्षेत्रात कार्यरत असणा-या अनेक कंपन्यांचे प्रतिनिधी, तंत्रज्ञ तसेच शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या चर्चासत्राच्या संयोजनासाठी टेलिकॉम सेक्टर स्कील कौन्सीलचे लोकल पार्टनर ऍस्पायर क्नॉलेज ऍण्ड स्कील्स इंडिया प्रा. लि.चे संजय गांधी यांनीही बहुमोल सहकार्य केले.
डॉ. निगवेकर म्हणाले, देशातील पहिला संगणक कोणा कंपनीने तयार केलेला नाही, तो पुणे विद्यापीठाने तयार केलेला आहे. त्यावेळी त्यासाठी काही लाख रूपयांचा निधी लागणार असल्याने पुणे विद्यापीठाने सीएसआयआर आणि हवामान विभागाची मदत घेतली. त्यासाठी संगणक तयार करताना मलाही बराच संघर्ष करावा लागला होता. अखेर पहिला संगणक तयार झाला आणि त्यामुळे आता त्यापुढे तुम्ही जागतिक पातळीवर तंत्रज्ञानासाठी संघर्ष करत आहात. लहान मुलांसाठी शिक्षणाचा मूलभूत अधिकाराचा कायदा करण्यासंबंधी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि शिक्षण मंत्री डॉ. मुरली मनोहर जोशी यांना एक अहवाल पाठवला होता. त्यावर शिक्षणाचा अधिकार कायद्याला वाजपेयींच्या मंत्रीमंडळाने मान्यता दिली पण पुढे त्यांचे सरकार गेले. त्या जागी आलेल्या सरकारलाही या कायद्यासाठी जाग यायला 2013-14 साल उजाडले, त्यांनी तो कायदा केला आणि विद्यमान केंद्र सरकारने त्याला गती दिली आहे.
यावेळी पुणे – सोलापूर रेल्वे प्रवासात घेतलेला लहान मुलीचा अनुभव सांगून डॉ. निगवेकर म्हणाले, आज देशातील लहान मुलांच्या हातात मोबाइल म्हणा, संगणक म्हणा किंवा डाटा म्हणा काहीही म्हणा पण तो आहे. त्यांच्या तोंडात मोबाईल, नेट, डाटा यासारखे शब्द आहेत हे तंत्रज्ञ व संशोधकांनी लक्षात घेतले पाहिजे. कारण जे काही नविन संशोधन केले जाईल त्याचा उपभोग घेणारी ही पिढी आहे. शेवटी हे संशोधन, तंत्रज्ञान जे आहे ते मानवासाठी मानवी कल्याणासाठी आहे हे लक्षात ठेवा असे त्यांनी स्पष्ट केले.
टेलिकॉम सेक्टर स्कील्स कौन्सीलचे प्रदीप जसवानी यांनी प्रास्ताविकात सांगितले की, कोणत्याही शिक्षणाच्या सुरूवातीपासून कौशल्य विकासाचे महत्व विद्यार्थ्यांपुढे मांडण्याचे काम शिक्षण तज्ञ आणि विशेषत:विद्याशाखेच्या लोकांनी केले पाहिजे. पदवीधर तरूणांना चांगले रोजगार सहजपणे मिळण्यासाठी ही कौशल्य विकासाची दरी भरून काढण्यासाठी या कौन्सीलने केलेल्या विविध उपाय योजनांची महिती दिली. उद्योग आणि शिक्षण क्षेत्रातील दरी भरून काढून दोघांनी संयुक्तपणे कौशल्य विकासासाठी काम करून टेलिकॉम जगतात निर्माण होणा-या संधी पदवीधर विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी काम करावे हा या चर्चासत्राचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही भेदभावाशिवाय महिलांना प्रगती करण्याची संधी आवश्यक
मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांचे प्रतिपादन
पुणे : स्त्री सक्षम झाल्यास कुटुंबच नव्हेतर समाज व देशही बलशाली होतो. त्यामुळे कोणत्याही भेदभावाशिवाय महिलांना प्रगती करण्याची किंवा सक्षम होण्याची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे असे मत मुख्य अभियंता श्री. एम. जी. शिंदे यांनी व्यक्त केले.
रास्तापेठ येथील प्रशासकीय इमारतीमध्ये आयोजित जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. सुंदर लटपटे, श्री. राजेंद्र पवार, श्री. वादिराज जहागिरदार, सौ. शिल्पा कुंभार, सहाय्यक महाव्यवस्थापक (एचआर) श्री. राजेंद्र म्हंकाळे, सहाय्यक महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) सौ. माधुरी राऊत व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुण्यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमात स्त्रीरोग तज्ञ डॉ. रूची ठाकूर व डॉ. मानसी कोठावदे यांनी महावितरण व महापारेषणच्या महिला कर्मचाऱ्यांना स्त्री आरोग्यावर मार्गदर्शन केले. तसेच आरोग्यविषयक विविध प्रश्नांना उत्तरे दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. भक्ती जोशी यांनी केले तर सौ. अपर्णा मानकीकर यांनी सूत्रसंचालन केले व आभार मानले. यावेळी महिला अभियंता, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आयोजनासाठी धनश्री कुबेर, जयश्री शेलोकार, वैशाली खरात आदींनी सहकार्य केले.
प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प- गिरीश बापट
विकासाला चालना देणारा आणि उभ्या महाराष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाणारा अर्थसंकल्प .अशी प्रतिक्रिया अन्न नागरीपुरवठा व संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केली. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शेती, स्मार्टसिटी, नागरी आरोग्य, रस्ते व गृहखाते या विभागासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली आहे. शिक्षणशुल्काची मर्यादा वाढवून त्यांनी विद्यावेतनातही वाढ केली आहे. न्यायालय, जलवाहतुक, कृषिपंप, हस्तकला उद्योग यासह कुपोषण, मल्टीस्पेशॅलिटी रूग्णालये, शेतकरी सन्मान योजना, सूक्ष्म सिंचन अशा सर्व विषयांना आर्थिक बळ देण्याचे फार मोठे काम मनगुंटीवार यांनी केले आहे.या अर्थसंकल्पातील एक लाख लोकांना रोजगार, वनशेती, सेन्द्रीय शेती, बाजार समित्यांसाठी ई ट्रेडिंग, मातीकला मंडळ, दिव्यांगांना अर्थसहाय्य इत्यादी योजनांचे जनतेकडून स्वागत होईल. याची मला खात्री आहे. नागरी आरोग्य अभियान. शेतमाल प्रक्रिया. एस टी स्टॅण्डची डागडुजी, नवे औष्णिक प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन,गर्भवती महिलांना मदत, तेरा कोटी वृक्षलागवड, पर्यटन विकास ही
या अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये जनसामान्यांना सामाजिक न्याय मिळवून देणारी आहेत. मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ४ हजार ७९७ कोटी रुपयांची केलेलीू तरतूद स्वागतार्ह आहे. लहुजी वस्ताद यांचे पुणे येथे स्मारक उभे करणार असल्याचे या अर्थसंकल्पातून घोषित केले आहे. याबद्दल पुण्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांचा आभारी आहे.
महाराष्ट्राच्या विकासाला नेमकी दिशा देणारा आणि भारतीय जनता पक्षाला वचनपूर्तीकडे घेऊन जाणारा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मनगुंटीवार यांचे अभिनंदन.
सुरक्षितता अधिक महत्वाची -गोयल
गोयल गंगा फौंडेशनकडून कामगारांसाठी सुरक्षा सप्ताह
पुणे – गोयल गंगा फौंडेशनकडून कामगारांसाठी सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होत. बावधन मधील गंगालेजंड येथे हे करण्यात आले होते. राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह ४ मार्च ते १० मार्च या दरम्यान साजरा केला जातो. कामगार हा कुठल्याही बांधकाम प्रकल्पाचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्य प्राधान्य दिले पाहिजे असे मत गोयल गंगा डेव्हलपर्सचे संचालक अमित गोयल यांनी व्यक्त केले.
कामगारांमुळेच बांधकाम व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. अनेक वेळेला त्याला उंचावर काम करावे लागते. पुरेशी काळजी न घेतल्याने काही वेळेला अपघात होतात, प्रसंगी यामुळे कामगारांना जीव ही गमवावा लागतो. हे व्यावसायिकांना निश्चितच भूषणावह नाही. यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी कामगारांची सुरक्षितता जपणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कामगारांनी ही काळजी घेऊन काम केले पाहिजे. यासाठी अनेक सुरक्षा उपकरणे उपलब्ध आहेत. याचा वापर केला पाहिजे तसेच ही उपकरणे वापरण्यासंदर्भात कामगारांना प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. यासाठी हा सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. गोयल गंगा इंडिया प्रा.लि ने ही नेहमी कामगारांच्या सुरक्षिततेला नेहमी प्राधान्य दिल आहे. कामगारांच्या सुरक्षिततेबद्दल गोयल गंगा इंडिया प्रा.लि नेहमी सजग असतो. त्यामुळे कामगारांनी काम करताना कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे सुरक्षा घेतली पाहिजे याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने बावधन मधील गंगा लेजंड येथे याबद्दल माहिती देण्यात आली. यावेळी मजुरांना या सुरक्षेसंदर्भातील बारकावेही सांगण्यात आले. उंचावर काम करताना हेल्मेट व सेफ्टी बेल्टचा वापराचे महत्वही पटवून दिले. बऱ्याच वेळा निष्काळजीपणामुळे किंवा अन्य कारणांमुळे अपघात होतात मौल्यवान जीवनाचे नुकसान होते. त्यामुळे स्वत: सुरक्षा उपकरणांचा वापर करावा व इतरांनाही अशा सुरक्षा उपायांचा वापर करण्यास प्रेरित करावे असे यावेळी कामगारांना सांगण्यात आले. कामगारांनी सर्व सुरक्षा उपाययोजनांचे पालन करण्याची शपथ यावेळी घेतली.कंत्राटदार, सुपरवायझर आणि मजुरांनी सुरक्षेच्या आठवड्यात भाग घेतला.
मुख्य अभियंता कुमार बर्डे व प्रोजेक्ट मैनेजर वीरेन कुसुरकर याप्रसंगी उपस्थित होते















