लीला पुनावाला फाउंडेशनमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा
पुणे-लीला पुनावाला फाऊंडेशन (एलपीएफ)समाजातील गरजू व प्रतिभावान मुलींना शिक्षण घेण्यास मदत करते. आपल्या 22 वर्षांच्या कार्यकाळात फाऊंडेशनने आतापर्यंत अनेक मुलींना शिक्षणाला मदत केली आहे. फाउंडेशनने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने सर्व लिला ज्युनियरच्या मातांना स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित केले, कारण या मातांनी आपल्या मुलींना त्यांच्या पायावर उभे राहून शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. या मुली भविष्यात शिक्षण घेउन स्वावलंबी बनतील आणि स्वताबरोबरच आपल्या कुटुंबियांनाही हातभार लावतील .
प्राचीन काळापासून ते आजतगायत भारतातील स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. कित्येकदा त्या सामाजिक शोषणाचा बळी ठरतात, त्यांना केवळ घरातच नव्हे तर समाजातही गुलाम म्हणून समजले जाते. त्यासाठी स्त्रियांनी त्यांच्या पायावर उभे राहून आत्मनिर्भर व्हायला हवे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्यवर एलपीएफमध्ये पद्मश्री लीला पुनावला, नाझुरा सातार, (प्राचार्या-संचालक बेल -एअर कॉलेज नर्सींंग),लॉर्दु मेरी नागोतू( हॉस्पिटल सिस्टर) यांना सन्मानित करण्यात आले.
एलपीएफने ज्या शाळांच्या मुलींची मदत करते अश्या सर्व शाळांतील प्राचार्यांना ह्यावेळी स्मृतिचिन्ह देण्यात आले आणि त्यांनी मुलींना ज्याप्रकारे स्वताच्या पायावर उभे राहण्यास मदत केली त्याची प्रशंसा देखील केली.ह्याचबरोबर आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभ औचित्यावर त्यांनी आपल्या सर्व स्टाफ सदस्यांचा सत्कार केला. ह्याचबरोबर फाउंडेशनने महिला मदत दात्यांची आणि प्रशिक्षकांचीही प्रशंसा केली आहे ज्यांनी एलपीएफ फाउंडेशनमध्ये लिला ज्युनियर्स आणि लिला सिनियर्स यांच्या शिक्षणामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
या वेळी लिला पुनावाला यांच्या हस्ते पिस अॅम्बॅसिडर २०१६-१७ यांना देखील सन्मानित केले. या वेळी लिला पुनावाला यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हटले कि, संकटांचा सामना धीराने आणि संयमाने करावा. तसेच त्यांनी जीवनातील प्रत्येक मार्गावर विश्वासाने चालण्याचा सल्ला उपस्थितांस दिला. या प्रसंगी लीला ज्युनीर्सच्या मात्यांना आरोग्यसेवा, वैद्यकीय देखरेखीसाठी जागरुकता कार्यक्रम आयोजित केला गेला होता. याबरोबरच पिस अॅम्बॅसिडर 2017 च्या मुलींनी नाटक व गायन माध्यमांतून महिला समस्यांवर प्रकाश टाकला.