Home Blog Page 3169

नादुरस्त मीटर एका महिन्यात बदलावे, कर्मचाऱ्यांनी वसुली वाढवावी-संजीव कुमार

0

मुंबई, वीज ग्राहकांना अतिउत्तम सेवा देण्यासाठी निधी कमी पडू देणार नाही तसेच शेतकऱ्यांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांनी नियमित वीजबील भरून महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या मुख्य अभियंत्यांसोबत व्हीडीओ कॉन्फरेन्सद्वारे संवाद साधताना महावितरणचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी केले आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी वसुली वाढवावी वीजहानी कमी करावी तसेच नादुरूस्त वीजमीटर एका महिन्यात बदलावे, असे आदेशही संजीव कुमार यांनी दिले आहेत.

महावितरणच्या विविध वर्गवारीतील ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे. त्यामुळे महावितरण आर्थिकदृष्ट्या संकटात आहे. परंतु ग्राहकांना अतिउत्तम सेवा मिळावी म्हणून वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. वीजहानी कमी करून वसुली वाढविली तर ग्राहकांना आणखी चांगली सेवा देता येईल, यादृष्टीने महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अधिक जोमाने काम करावे, असे आवाहन संजीव कुमार यांनी केले.

 एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांत ग्राहकांच्या वीजवापरात वाढ होतेया काळात अचूक बिलींग करून वसुली वाढवावी. तसेच ग्राहकांना जास्तीत जास्त सेवा ऑनलाईन देण्यासाठी महावितरणकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत, त्याला आणखी गती द्यावी. ग्रामपंचायत नगरपालिका / महानगरपालिकांकडील दिवाबत्तीची तसेच सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेतील थकबाकी वसुलीसाठी नियोजनबध्दपणे मोहीम राबवावी. तसेच नादुरुस्त वीजमीटर एका महिन्यात बदलावे. सध्या राज्यभर पुरेशा प्रमाणात मीटर उपलब्ध आहेत. यापुढे ग्राहकांना गरजेनुसार मीटर उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच येथून पुढे नादुरुस्त मीटर तातडीने बदलण्यात यावेत, असे निर्देश अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी बैठकीत दिले.  कर्मचाऱ्यांनी वीजहानी कमी करण्यासाठी जास्तीत जास्त खबरदारी घ्यावी. वसुली वाढवावी  असे सांगून शेतकऱ्यांना मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत पैसे भरण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहनही संजीव कुमार यांनी यावेळी केले.

रेडीरेकनरच्या दर कायम ठेवण्याचे क्रेडाई महाराष्ट्रकडून स्वागत

0

पुणे – रेडी रेकनरच्या दरात बदल न करण्यात आल्याबद्दल क्रेडाई महाराष्ट्रने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व महाराष्ट्र सरकारचे आभार मानले आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या परवडणाऱ्या घरांच्या योजनेसाठी हा निर्णय अनुकूल असल्याचेही क्रेडाईने म्हटले आहे.

बांधकाम व्यावसायातील सद्यस्थितीमुळे यंदा रेडी रेकनरचे दर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. गेल्या वर्षीचेच दर यंदाही कायम राहणार आहेत. राज्याच्या महसूल खात्याने यांनी या संबंधातील आदेश जारी केला आहे.

दरवर्षी या दरांमध्ये राज्य शासनाकडून वाढ होत असते. मात्र बांधकाम व्यवसायातील सद्यस्थितीमुळे या वर्षी दर जैसे थे ठेवण्यात आले. “सद्यस्थितीत बांधकाम व्यवसायामध्ये असलेली परिस्थिती लक्षात घेता, २०१८-१९  या आर्थिक वर्षासाठी रेडीरेकनरमध्ये कोणतीही वाढ न करता, २०१७-१८  या वर्षाचेच दर संपूर्ण राज्यासाठी कायम ठेवावेत.”, असे आदेश महसूल खात्याने दिले आहेत.

क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतिलाल कटारिया यांनी राज्य सरकारचे अभिनंदन करणारे निवेदन प्रसिद्ध केले असून त्यात सरकारचे आभार मानले आहेत. “गेल्या आठ वर्षांत प्रथमच महाराष्ट्र सरकारने  मालमत्ता व्यवहारांवर मुद्रांक शुल्क आकारण्यासाठी वापर केल्या जाणाऱ्या रेडीरेकनरमध्ये बदल केलेले नाहीत. हा वास्तववादी व व्यावहारिक निर्णय असून सर्वसामान्य जनता व रिअल इस्टेट उद्योगाच्या हिताचा आहेत,” असे या निवेदनात म्हटले आहे.

आता व्यवहारांसाठी  रेडीरेकनर दरांकरिता स्पष्ट, पारदर्शक, शास्त्रीय आणि सूक्ष्म प्रणाली तयार करण्याची विनंती आम्ही सरकारला करत आहोत. स्टँप अॅक्ट मध्ये केलेल्या सुधारणांमुळे आता नव्या तरतुदींतून सरकार रेडीरेकनर दर कमीसुद्धा करू शकते. वास्तविक व्यवहारांपेक्षा रेडीरेकनर अनावश्यकरीत्या अधिक आहेत असे व्यवहार सरकारने शोधावेत आणि कायद्यातील नवीन तरतुदी लागू करून ते कमी करावेत.  मालमत्तेच्या खरेदीदारांमध्ये विश्वास वाढवण्यासाठी आणि स्थिरता वाढवण्यासाठी रेडीरेकनर दर तीन वर्षांतून एकदा बदलण्याची विनंती आम्ही सरकारला करतो, असेही या निवेदनात म्हटले आहे.

परवडणाऱ्या घरांच्या दृष्टीने हा निर्णय अनुकूल असून ही घरे पुरविण्यासाठी क्रेडाई शक्य तेवढे प्रयत्न करेल, असे क्रेडाईने म्हटले आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेला अनुसरून महाराष्ट्र सरकारने परवडणाऱ्या घरांचा पुरवठा वाढविण्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले त्याला क्रेडाई महाराष्ट्रने सकारात्मक प्रतिसाद दिला. अशा घरांचे नियोजन व सुविधा पाहता क्रेडाईचे सभासद योग्य दरात घरे उपलब्ध करून देत आहेत. बऱ्याच ठिकाणी ते दर रेडी रेकनर दरांइतकेच किंवा त्यापेक्षा कमी आहेत. जर रेडीरेकनरचे दर वाढले असते तर विकसकांना कमी दरात घरे उपलब्ध करून देता आली नसती. विकसकांना आयकरातील तरतुदींमुळे घरे कमी दरात देता आली नसती. हि अडचण देखील बऱ्याच प्रमाणात दूर होणार आहे.

पुणे तिथे घर उणे .. पहा पुण्यातील घर घेण्यासाठी शासनाचे रेडीरेकनर

0

पुणे-राज्याच्या नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने वार्षिक बाजार मूल्य दरात (रेडी रेकनर) कोणताही बदल न केल्यामुळे  नागरिकांना दिलासा मिळाल्याचा दावा करण्यात येत असला तरी … पुण्यातील रेडीरेकनर म्हणजे शासन मान्य दर ,ज्यावर कर आकारणी होते ते दर पहा नेमके किती आहेत . म्हणजे एक घर घेण्यासाठी पर्त्येक चौरस फुटाला पुण्यात कुठे किती रुपये मोजावे लागतात त्याचा अंदाज येईल . आणि किती पगार असलेली व्यक्ती आपल्या घराचे स्वप्न साकार करू शकते हेही लक्षात येईल .

पुणे परिसरात घर घेण्यासाठी रेडीरेकनर ..दर चौरस फुटामध्ये. आकडे रुपयांमध्ये ..

कोरेगांव पार्क रोड रेल्वे ओव्हर ब्रीज ते बंडगार्डन पुलापर्यंत – १३७२३

प्रभात रस्त्यावरील ज्ञानकोशकार केतकर रस्ता (आयकर रस्ता) – १२९९२

भांडारकर रोड – १०९९१

लॉ कॉलेज रोड – १०९९१

डॉ केतकर रस्ता (कमला नेहरू पार्क समोरून भांडारकर रस्त्याला मिळणारा रस्ता) – १०९९१

के. पालकर पथ (प्रभात रोड गल्ली क्रमांक सातला मिळणारा रस्ता) – १०९९१

ज्ञानेश्वर पादुका चौक ते गणेशखिंड रस्त्याला जोडणारा रस्ता – १०९८२

बोट क्लब रोड – १०८५५

जंगली महाराज रोडवरील गरवारे पूल ते बालगंधर्व रंगमंदिर – १०६८४

कर्वेरोड – १०६४२

प्रमुख परिसर आणि रेडीरेकनरचे दर (दर चौरस फुटामध्ये)

फर्ग्युसन रोड- ज्ञानेश्वर पादुका चौक ते शेतकी कॉलेज – १०४६५

फर्ग्युसन रोड – गोखले चौक ते ज्ञानेश्वर पादुका चौक – १०४१६

लकडी पूल ते गोखले चौक – १०३४९

कॅनॉट रोडवरील बंडगार्डन पुलापर्यंत – १०१७२

फर्ग्युसन रोड ते युनिव्हर्सिटी रोड – १००६२

नार्थ मेन रोड ते भैरोबा पंपिग स्टेशनपर्यंत – १००८६

मंगलदास रोड – ९८०९

पौड रोड – ९६४१

मॉडेल कॉलनी, अशोकनगर, भोसलेनगर, आय. सी.एस. कॉलनी परिसर – ९४५९

पौड फाटा ते आयडीयल कॉलनी – ९४९२

ढोले पाटील रोड – ९४६५

लक्ष्मी रस्त्यावरील गोखले चौकापासून वैभव चौकापर्यंत – ९०६७

संगमवाडी – ९४५४

आपटे रोड – ९४११

घोले रोड – ९४११

गोखले चौकातून जंगली महाराज रस्त्यास मिळणारा रस्ता – ९४११

रँगलर परांजपे पथ, गुप्ते पथ व शिरोळे पथ – ९४१०

औंध गावठाण ते विद्यापीठ गेट – ९१८९

विमाननगर – ८५५०

स्टेशन रोडवरील जिजामाता चौक ते नागझरी नाला – ६२५८

शिवाजी रस्त्यावरील जिजामाता चौक ते नवा पूलपर्यंत – ६०२८

शंकरशेठ रोड – ५१६१

कोंढवा खुर्द ते पिसोळी रस्ता – ४३२८

पुणे-नगर रस्ता – ५७५६

लक्ष्मी नारायण चौक ते गुलटेकडी इंडस्ट्रीयल परिरसर – ७१४६

पुणे-सातारा रस्ता ते धनकवडी – ७६४०

पुणे-आळंदी रस्ता – ५०१२

सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द – ५५७३

वडगाव बुद्रुक – ६७३३

सावरकर पुतळा चौक ते मित्रमंडळ कॉलनी सभागृह रस्ता – ७७८४

मित्रमंडळ कॉलनी सभागृह ते लक्ष्मी नारायण टॉकीज रस्ता – ८७८४

पाषाण गावठाण – ४७२५

पुणे -बाणेर रोड – ७३३९

बालेवाडी – ५९७४

वानवडी गावठाण – ५०४५

एन. डी. ए. रस्ता – ५५२२

शिवणे – ३४६५

पुणे – सोलापूर रस्ता – ५६७५

हडपसर गाडीतळ – ५१०९

अलका टॉकिजपासून गोखले चौकापर्यत – ८४३१

टिळक रस्ता – ८४९६

लालबहादूर शास्त्री रस्ता – ८७०५

सद्गुरू श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवाची सांगता

0

पुणे ः‘श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट’ आयोजित सद्गुरू 128 व्यां श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सवाची सांगता नुकतीच झाली.गुढीपाडवा ते चैत्र पौर्णिमाअखेर पंधरा दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या पंधरवड्यात श्री सद्गुरू जंगली महाराज समाधीस अभ्यंग स्नान, पारायण, भजन, व्याख्याने, संगीत सभा, महाराजांच्या पादुकांची पालखीतून मिरवणूक आणि महाप्रसाद अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.सद्गुरू ‘श्री जंगली महाराज पुण्यतिथी उत्सव समिती’, ‘श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळ’, ‘श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट’ने संयोजन केले.ट्रस्टचे अध्यक्ष सी. एल. शिरोळे, श्री सद्गुरू जंगली महाराज भजनी मंडळाचे अध्यक्ष तेजस तापकीर यांनी आभार मानले.

पुणेकर जनतेचे हित डावलणार नाही :सर्वपक्षीय महाचर्चेतील सूर

0
पुणे ःपुणेकर जनतेचे हित डावलणार नाही असा सूर ‘पार्किंग पॉलिसी ‘ या विषयावरील सर्वपक्षीय महाचर्चेतउमटला .   ​
‘पुणे महानगर परिषद’ या संस्थेतर्फे ‘पार्किंग पॉलिसी’ या गाजत असलेल्या विषयावर सर्वपक्षीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले ​होते 
‘पुणे महानगर परिषद’चे निमंत्रक अ‍ॅड. गणेश सातपुते यांनी ​प्रास्ताविक केले .
या चर्चासत्राला पालिकेतील सर्वपक्षीय गटनेते, शहराध्यक्ष, प्रशासकीय अधिकारी व तज्ज्ञ यांना निमंत्रित करण्यात आले होते . माजी महापौर अंकुश काकडे ,योगेश गोगावले ,उपमहापौर सिद्धार्थ धेंडे ,माजी महापौर प्रशांत जगताप ,श्रीनाथ भिमाले ,चंद्रकांत मोकाटे ,अरविंद शिंदे ,वसंत मोरे ,संजय भोसले ,रुपाली ठोंबरे ,प्रांजली देशपांडे ,संतोष शिंदे हे सहभागी झाले . ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी यांनी सूत्रसंचालन केले . महेश महाले यांनी आभार मानले .
चर्चासत्राच्या संयोजन समितीमध्ये महेश महाले, संतोष पाटील, योगेश खैरे, किरण बराटे, संजय दिवेकर, अनिरुद्ध खांडेकर, दत्तात्रय जगताप, केदार कोडोलीकर, अ‍ॅड. राजेश तोंडे यांचा समावेश ​होता .
‘पुणे शहर आता विस्तारले आहे, त्यात ग्रामपंचायती, पीएमआरडीएमुळे जिल्हाही समाविष्ट झाला आहे. या विस्तारित भागाचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी, मांडण्यासाठी एकत्रित संवाद करता येणार्‍या व्यासपीठाची आवश्यकता होती, म्हणून पुणे महानगरपरिषद या व्यासपीठाची निर्मिती करण्यात येत आहे. हे व्यासपीठ अराजकीय आहे,’ असे अ‍ॅड. गणेश सातपुते यांनी सांगितले.
संस्थेच्या लोगोचे अनावरण या कार्यक्रमात ‘भारत विकास ग्रुप’ (बीव्हीजी इंडिया लिमिटेड) चे संस्थापक हणमंत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात ​आले .
सुरुवातीला आय . टी . डी . पी . संस्थेच्या  प्रांजली देशपांडे यांनी पार्किंग पॉलिसीची माहिती दिली . वाहने प्रचंड वाढत असल्याने पादचारी धोरण ,सायकल प्लॅन आणि पार्किंग पॉलिसी अमलात आणण्याची गरज आहे . पार्किंग साठी कमीत कमी मोबदला दिला जावा असा प्रयत्न आहे .
योगेश गोगावले म्हणाले ,’प्रशासनाने त्यांच्या अधिकारात मांडलेल्या प्रस्तावात पुणेकरांच्या हितासाठीच भाजपने उपसूचनेद्वारे बदल केला . आम्ही पुणेकरांना जाचक होणारे पार्किंग कर  ऐवजी सार्वजनिक वाहतूक धोरणावर लक्ष देत आहोत . विधानसभा क्षेत्रनिहाय नागरिकांच्या सूचना मागविण्याची आणि सर्वपक्षीय समितीत चर्चा करण्याची भाजपाची तयारी आहे .सीसीटीव्ही सारख्या माध्यमातून पार्किंग व्यवस्था पाहू ,माफियाराज ला पाठिंबा देणार नाही .
 ‘श्रीनाथ भीमाले म्हणाले ,’पार्किंग शुल्क आधुनिक तंत्रज्ञानाने पारदर्शक रित्या निश्चित होईल आणि अनुभवीना त्याचा ठेका दिला जाईल . तज्ज्ञ ,गटनेते ,महापौर आणि वाहतूक पोलिसांचा अभिप्राय पार्किंग पॉलिसी आणताना घेतला गेला ,जिथे पुणेकरांना त्रास होईल ,अडचण होईल ,त्याचे निराकरण केले जाईल
सिद्धार्थ धेंडे म्हणाले ,’२००९ पासून पार्किंग पॉलिसी चा विचार होत होता ,तो आता अमलात येत आहे ,कारण लोकसंख्येपेक्षा वाहने जास्त झाली आहेत . झोपडपट्टी तील गोरगरिबांना हे शुल्क परवडणार नाही म्हणून ते वगळले ‘
अंकुश काकडे म्हणाले ,’पार्किंग साठी शुल्क घेतले म्हणजे वाहने कमी होणार नाहीत . सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करणे हा उपाय आहे ‘
प्रशांत जगताप म्हणाले ,’पीएमपीएमएल साठी आम्ही ११०० बसेस दिल्या . अजून ३ हजार बसेस ची आवश्यकता आहे . आमचा पार्किंग पॉलिसीला विरोध आहे ‘
अरविंद शिंदे म्हणाले ,’रात्रीत पार्किंग पॉलिसी मंजूर करण्यात आली कारण अंधारात पाप केले जाते . पार्किंग ची भाजपला इतकी काळजी आहे ,तर मित्रमंडळ चौकातील पार्किंग लॉट रद्द का केला .
‘मागच्या सत्ताधाऱ्यांनी काय केले हे सांगू नका ,तर आताचे सत्ताधारी काय करताहेत हे सांगा. गटनेत्यांना डावलून पार्किंग पॉलिसीचा निर्णय झाला ‘असा आरोप वसंत मोरे यांनी केला .
जप्त गाड्यांची ,पार्किंग मधील गाड्यांची पालिका जबाबदारी घेणार का  ? असा प्रश्न चंद्रकांत मोकाटे यांनी विचारला . शिवसेनेचा या पॉलिसी ला विरोध असल्याचे गटनेते संजय भोसले यांनी सांगितले .
पार्किंग पॉलिसी हा तुघलकी निर्णय असल्याची टीका संतोष शिंदे यांनी केली

भोसरीतील चौकाचे ‘भगवान महावीर चौक’ नामकरण

0
आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी :
भगवान महावीर स्वामी 2614 वे जन्मकल्याणक महोत्सवानिमित्त आळंदी रोड, संत तुकारामनगर येथील चौकाचे ‘भगवान महावीर चौक’ असे नामकरण भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले. भोसरी गावठाण ते रामस्मृती लॉन्स दरम्यान अहिंसा रॅली काढण्यात आली. यावेळी महापौर नितीन काळजे, कामगार नेते सचिन लांडगे, शहर सुधारणा समितीचे सभापती सागर गवळी, नगरसेवक जालिंदर शिंदे, नगरसेविका सोनाली गव्हाणे, दत्ता गव्हाणे, राहुल गवळी, विजय लांडे, तुकाराम भोपते पाटील, अजित रमेश गव्हाणे, गवळी फार्मचे पंडितशेठ गवळी, योगेश गवळी,  भाजपचे शहर उपाध्यक्ष प्रदीप पवार, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा (जैन समाज)चे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष मुकेश ओसवाल, श्री वर्धमान जैन स्तानक संघाचे अध्यक्ष सुभाष चुत्तर, श्री. विमलनाथ जैन राजस्थानी श्‍वेतांबर मूर्तिपूजक तपागच्छ संघाचे अध्यक्ष सुमनलाल सोलंकी, राकेश जैन, मितेश दोशी, गणेश बागमार, बंटी ओसवाल, तसेच जैन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यानिमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीत सहभागी झालेल्या सर्वांना थंड पेय वाटप करण्यात आले. यावेळी बोलताना आमदार महेश लांडगे म्हणाले, भगवान महावीरांनी जगाला सत्य आणि अहिंसेची शिकवण दिली. त्यांनी अहिंसेला मानवाचा उच्चतम नैतिक गुण मानला. त्यांनी जैन धर्माची अहिंसा, सत्य, अपरिगृह, अस्तेय आणि ब्रम्हचर्य ही पंचशील तत्वे सांगितली. त्यांनी आपल्या जीवनात उपदेश आणि प्रवचनांच्या माध्यमातून जगाला मानव कल्याणाची योग्य दिशा दाखवली. त्यांनी दिलेला अहिंसेचा संदेश आचरणात आणण्याची आज खर्‍या अर्थाने गरज आहे.

हनुमान जन्मोत्सव सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न

0
पुणे-हनुमान जन्मोत्सवनिमित्त ढोलेपाटील रोडवरील तरुण विकास मंडळाच्यावतीने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात संपन्न झाला . यावेळी सकाळी रुद्राभिषेक , श्री हनुमान जन्मोत्सव झाले तर दुपारी वीस हजार भक्तानी महाप्रसादाचा लाभ घेतला . यावेळी मंडळाचे प्रमुख विश्वस्त उल्हास ढोलेपाटील , अध्यक्ष अनिल ढोलेपाटील , माजी आमदार कमल ढोलेपाटील , सागर ढोलेपाटील , राहुल ढोलेपाटील , बिंदू ढोलेपाटील , मृणाल ढोलेपाटील , अभिजित जैन व नितीन रोकडे आदींनी केले होते . 
यावेळी प्रमुख मान्यवरांनी मंडळास भेटी दिल्या . 
हनुमान जन्मोत्सवनिमित्त रास्ता पेठ येथील शिवरकर मळा येथील श्री सूर्यमुखी मारुती मंदिर येतेच विविध धार्मिक कार्यक्रमांनी जन्मोत्सव सोहळा पार पडला . यावेळी होमहवन , महाप्रसाद झाला . कार्यक्रमाचे आयोजन मनोज दळवी , मंजिरी धाडगे , किरण शिवरकर , संभाजी शिवरकर , नरेश शिवरकर , निलेश थोपटे , शारदा शिवरकर , सनी शिवरकर व प्रताप तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले . 
 
हनुमान जन्मोत्सवनिमित्त सदाशिव पेठमधील विजय कॉलनीमधील उत्तरमुखी विजय मारूती मंदिर मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमानी हनुमान जन्मोत्सव सोहळा पार पडला . यावेळी होमहवन , महाप्रसाद झाला . कार्यक्रमाचे आयोजन केले होते . यावेळी समीर धाडगे , सागर धाडगे , मंजिरी धाडगे , तुकाराम तोडकर ,दादा  पातणकर आदीनी केले .
हनुमान जन्मोत्सवनिमित्त पुणे लष्कर भागातील इस्ट स्ट्रीटवरील खाण्या मारुती मंदीरात हनुमान जन्मोत्सव सोहळा पार  पडला . यावेळी सकाळी होमहवन , मारुती जन्मोत्सव ,भजनी मंडळाचा  भजनाचा कार्यक्रम झाला . तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात आले . यावेळी प्रवीणकुमार शर्मा महाराज , बाळकृष्ण प्रभू महाराज , विद्याधर कानेटकर महाराज , सरिता सावंत आदींनी विशेष परिश्रम घेतले . 
हनुमान जन्मोत्सवनिमित्त मनजितसिंग विरदी फाऊंडेशनच्यावतीने पुणे लष्कर भागातील विविध हनुमान मंदिरात मनजितसिंग विरदी यांच्याहस्ते बाळगोपाळांना प्रसाद वाटप करण्यात आले . यावेळी पूजा करण्यात आली . यावेळी  यावेळी मनप्रित विरदी , सहेर विरदी , हरभजनकौर विरदी , मनमित विरदी , रिदीमाँविरदी , सायली रणधीर , सूरज आगरवाल  सलमान शेख , रफिक सय्यद  व विशाल रॉय आदी उपस्थित होते . 
 
हनुमान जन्मोत्सवनिमित्त नाना पेठ मधील भोर्डे आळीमधील गंजीचा मारुती मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले . यावेळी महाअभिषेक , होमहवन , महाप्रसाद , छबिना आदी धार्मिक कार्यक्रम झाले . यावेळी भास्कर जगताप , पंडित जगताप , विजय जगताप , जयेश जगताप , पृथ्वीराज जगताप , अरुण भुजबळ व चंद्रविलास कांबळे आदी उपस्थित होते . 
नवा मंगळवार येथील बोल्हाई खान येथील श्री हनुमान सेवा मंडळाच्यावतीने हनुमान जयंती उत्सव पार पडला . यावेळी अभिषेक , पूजा व महाप्रसाद आला . यावेळी ह. भ. प. सोनबा दळवी राजू महाडिक , भावेश राऊत , अमर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते . 

अयोध्या येथे विश्वधर्मी श्रीराम मानवता भवनाच्‍या उभारणीसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन

0
पुणे- अयोध्या येथील विवादित रामजन्‍मभूमी-बाबरी मस्‍जिदची 2.77 एकर जागा व केंद्र सरकारद्वारा अधिग्रहण केलेल्‍या 67 एकर जागेत म्‍हणजेच रामजन्‍मभूमीच्‍या मूळ जागेत प्रभू श्रीरामाचे भव्‍य आणि सुंदर मंदिर निर्माण करावे. त्‍याच बरोबर विश्व शांती केंद्र, आळंदीतर्फे प्रस्‍तावित  विश्वधर्मी श्रीराम मानवता भवनाच्‍या उभारणी संदर्भात  भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना निवेदन दिले जाणार आहे, अशी माहिती श्रीराम जन्‍म भूमीचे पक्षकार व अयोध्या येथील निर्मोही आखाडाचे प्रमुख महंत रामदास यांनी एमआयटीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
महंत रामदास यांनी सांगितले की, संपूर्ण भारताच्‍या हितासाठी, समाज आणि मानव कल्‍याणासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विनंती  केली आहे कि येथे विश्र्व शांती केंद्र, आळंदी व एमआयटी विश्व शांती विद्यापीठाद्वारे प्रस्‍तावित विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन ही संकल्‍पना साकार करावी.  विवादास्‍पद जागेशी सलग्‍नित 67 एकर जागेवर भारत सरकारद्वारे  येथे विशाल मंदिर निर्माण करावे. तसेच, भारतातील अन्‍य धर्मांची प्रार्थनास्‍थळे येथे उभारावीत.  त्‍याच प्रमाणे 15-20 एकर जागेवर  प्रभु श्रीरामचंद्र यांचे अतिभव्‍य मंदिराचे निर्माण करावे. तसेच, प्रत्‍येक धर्माच्‍या प्रार्थनास्‍थळासाठी कमीत कमी 5-6 एकर जमीन उपलब्‍ध करुन द्यावी. त्‍यामुळे संपूर्ण जगात भारताची नवी ओळख निर्माण होईल.  तसेच सांप्रदायिक सदभाव आणि विश्वबंधुत्‍वासाठी भारत विश्वगुरू म्‍हणून उदयास येईल.
हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित असल्‍यामुळे अयोध्या शहराचा योग्‍य विकास झालेला नाही. येथे चांगले रस्‍ते, पर्यटनाची सुविधा, आंतरराष्ट्रीय एयरपोर्टची सुविधा नाही. त्‍यामुळे वरील जागेत विश्वधर्मी श्रीराम मानवता भवन ही संकल्‍पना साकार झाल्‍यास  या शहराचा संपूर्ण विकास होईल.
विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआयटीचे संस्‍थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड यांनी सांगितले की,  देशाच्‍या विकासासाठी या समस्‍येचे निराकरण होणे महत्त्वाचे आहे .त्‍यासाठी  सर्वोच्‍च न्‍यायालयाने हे सूचित केले की, हा विषय न्‍यायालयाच्‍या बाहेर राहून, आपापसात  चर्चा करुन सर्वसहमतीने निकालात काढावा. असे करणे हे देशाच्‍या हितासाठी योग्‍य ठरेल . याच सूचनेचे पालन करुन आम्‍ही सर्व आणि एमआयटी विश्व शांती विद्यापीठाच्‍या माध्यमातून हे निवेदन केले आहे.
नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. एस.एन.पठाण यांनी सांगितले की, इस्‍लाम धर्मात असे सांगितले आहे की, विवादास्‍पद  भागात प्रार्थनास्‍थळाची उभारणी करु नये. त्‍यामुळे या जागेवर श्रीराम मानवता भवनाची निर्मिती व्‍हावी. तसेच, स्‍वामी विवेकांनद यांच्‍या शिकवणुकीला अनुसरुन सर्वांनी प्रेमाने एकत्रित आल्‍यास भारत हा विश्व गुरू म्‍हणून उदयास येईल.
या पत्रकार परिषदेत अयोध्या येथील श्रीराम जन्‍मभूमी विषयाचे पक्षकार व अखिल भारतीय श्रीपंच रामनंदीय निर्वाण अनी आखाडा हनुमानगढीचे प्रमुख महंत धर्मदास, स्‍वामी विद्याचलदास, योगीराज स्‍वामी व झुनझुनवाला शिक्षण संस्‍थेचे गिरीजेश त्रिपाठी उपस्‍थित होते.

दुचाकी वाहनांसाठी आकर्षक क्रमांक-अर्ज करण्याचे आवाहन

0

पुणे, दि. 31 :  दुचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकी तसेच दुचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत व लिलाव कार्यपद्धती वापरण्यात येणार आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

दुचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहीत तीनपट शुल्क भरुन चारचाकी वाहनांसाठी हवे असतील त्यांनी दिनांक 2 एप्रिल 2018 व दुचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्याकरिता  दिनांक 3 एप्रिल 2018 रोजी कार्यालयीन वेळेत सकाळी 11 ते दुपारी 2.30 या दरम्यान विहित नमुन्यात अर्ज करावा.

अर्ज प्रादेशिक कार्यालयाच्या नवीन नोंदणी विभागात डी.डी, पत्त्याचा पुरावा, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह जमा करावा. डी.डी. R.T.O Pune या नावाने राष्ट्रीयीकृत/शेड्युल्ड बँक, पुणे येथील असणे आवश्यक आहे. डीडी हा अर्जदाराने स्वत: च्या बँक खात्यातून काढल्याचे हमी पत्र जोडणे आवश्यक आहे.अर्जदाराने अर्जासोबत फोटो ओळखपत्र, उदा. आधार कार्ड किंवा निवडणूक आयोगाचे ओळखपत्र किंवा पासपोर्ट किंवा पॅन कार्ड आदीची साक्षांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे.

दुचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरुन चारचाकीसाठी राखून ठेवण्याकरीता एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी दिनांक 3 एप्रिल 2018  रोजी व दुचाकी वाहनांसाठी सूरु होणाऱ्या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक राखून ठेवण्याकरिता दिनांक 4 एप्रिल 2018 रोजी सकाळी 10.30 वा. कार्यालयाच्या सुचना फलकावर लावण्यात येणार आहे. लिलावाकरिता जर जास्त रकमेचा डीडी जमा करावयाचा असेल तर त्यांनी त्याच दिवशी दुपारी 3.30वाजेपर्यंत सीलबंद पाकीटात प्रादेशिक कार्यालयात जमा करावा. त्याच दिवशी दुपारी 4.30  वा. सहकार सभागृह, प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व सहा. प्रादेशिक अधिकारी यांच्या उपस्थित पात्र व्यक्तीसमोर (संबंधीत अर्जदार) लिफाफे उघडून अर्जदाराने विनिर्दीष्ट शुल्कापेक्षा जास्तीत जास्त रकमेचा डी.डी. सादर केला असेल त्यास नमूद पसंती क्रमांक वितरित केला जाईल. राखून ठेवलेला क्रमांक 30 दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला क्रमांक आपोआप रद्द होईल व शुल्क सरकारजमा होईल. शुल्क कोणत्याही परिस्थिती परत केले जाणार नाही अथवा समायोजन करता येणार नाही, असे प्रसिध्दी पत्रकाद्वामध्ये नमूद केले आहे.

एम ए रंगूनवाला हॉटेल मॅनेजमेंट चा ‘बॉलीवूड थीम’ माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

0
पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर चा माजी विद्यार्थी मेळावा चांगल्या प्रतिसादात पार पडला. या मेळाव्याची ‘बॉलीवूड’ थीम होती. मेळाव्याचे दुसरे वर्ष होते.
प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हा कार्यक्रम आझम कॅम्पस येथे झाला.

​ ​सहभागी विद्यार्थ्यांनी बॉलिवूड प्रकारचे पोषाख ​परिधान केले होते.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आणि अनेक पदवीधर विद्यार्थ्यांना एकमेकांशी, माजी विद्यार्थ्यांशी आणि इतर स्टाफ सदस्यांसह चर्चा करण्यासाठी म्हणून हा उपक्रम होता, असे महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी सांगितले.

महापौर चषक सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये आझम स्पोर्टस अकॅडमी चे यश

0
पुणे : पुणे महापौर चषक राज्यस्तरीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये पुणे जिल्हा संघाने विजेती पदाची कामगिरी केली आहे. या गटात आझम स्पोर्टस अकॅडमी च्या खेळाडूंचा समावेश होता. 
पुणे महापालिका आणि पुणे शहर सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा स. प. महाविद्यलयाच्या मैदानावर झाली. 
‘आझम स्पोर्टस अकॅडमी’ चे संचालक गुलझार शेख यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले. विजेत्यांचे ‘महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष डॉ. पी. ए.इनामदार, आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य शैला बुटवाला, गफार शेख  यांनी अभिनंदन केले. 
स्पर्धेच्या अंतिम सामन्यामध्ये पुणे जिल्हा संघाने कोल्हापूर संघाचा १२-०१ ने पराभव केला. यामध्ये किरण ला सामनावीर म्हणून गौरविण्यात आले. पुणे जिल्हा संघाकडून बी अलिशा हीने २, हाजिरा शेख ने ३, किरण ने ३, फैजनाने २, फरहाने १, तर अल्फाराने १ होमरन काढला 

ख्रिस्ती सुवार्ता संगीताचा प्रसार व्हावा’ : डॉ. अमित कामले

0

पुणे-डॉ. अमित कामले व सौ. पोर्णिमा कामले त्यांच्या आध्यात्मिक गीतसंग्रहाची (आल्बम) ‘ग्लोरिफाय ख्राईस्ट 3’ ही तिसरी मालिका सादर करत आहेत. हा आल्बम म्हणजे ख्रिस्ती ईशस्तुती व प्रार्थना गीतांचा हिंदी, मराठी व पंजाबी भाषेतील संग्रह असून त्याचा उद्देश ‘ए. के. इंटरनॅशनल टुरिझम’च्या म्युझिक लेबलअंतर्गत संगीत क्षेत्रातील ख्रिस्ती कलाकारांच्या बुद्धिमत्तेला प्रोत्साहन व प्रेरणा देण्याचा आहे.

ख्रिस्ती सुवार्ता संगीताचा (ख्रिश्चन गॉस्पेल म्युझिक) चर्चच्या भिंती, धर्मसभा, चलने व राष्ट्रांच्या सीमा ओलांडून प्रसार व्हावा, या विचाराची प्रेरणा आम्हाला ‘ग्लोरिफाय ख्राईस्ट 3’ हा आल्बम सादर करण्यासाठी मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. अमित कामले यांनी व्यक्त केली आहे.

या आल्बमने तीन जुन्या अभिजात ऋचांची पुनर्निर्मिती आणि तीन नवी गाणी समाविष्ट केली आहेत. ‘होईल वृष्टी कृपेची’ हे गीत साधना सरगम यांनी स्वरबद्ध केले असून ‘ईश्वराची दया’ हे गीत बेला शेंडे यांनी स्वरबद्ध केलेले आहे. त्यांयामागे उपासना संगीताची प्रेरणा आहे. ‘सरेंडर ऑल’ हे इंग्रजी गीत ऋचा पुस्तकातील असून ते ऐश्वर्या भंडारी यांनी गायले आहे.

अधिक माहिती देताना डॉ. अमित कामले म्हणाले, “मी लहान असल्यापासून माझे आजोबा डॉ. मधुकर कामले व आजी इंदिराबाई कामले यांच्याकडून उपासना संगीतातील ‘ईश्वराची दया’ हे पारंपरिक गीत ऐकत मोठा झालो आहे. त्यामुळे हे गाणे मी त्यांना आदरांजली म्हणून अर्पण करायला मला आवडेल. एवढेच नव्हे, तर ‘सरेंडर ऑल’ हे गाणेही माझे आईकडचे आजी-आजोबा श्री. जीवन व मनोरमा हे गात असत. त्याला स्वरमेळाचे (सिंफनी) स्वरुप देण्यात आले असून युवा पिढी त्याच्याशी नक्की समरस होईल. गेल्या महिन्यात ख्रिस्तवासी झालेले सुवार्ता उपदेशक रेव्हरंड बिली ग्रॅहम यांच्या कार्याप्रती कृतज्ञता म्हणून हे गाणे मी त्यांना अर्पण करणार आहे.”

आल्बममधील येशू त्वाडे नाल हे पंजाबी गाणे लोकप्रिय बॉलिवूड पार्श्वगायक जावेद अली यांनी गायले असून ते नक्कीच सर्व संगीतप्रेमींचे मन जिंकून घेईल.

‘येशू ने दी है शिफा’ हे गाणे बाहुबली २ चित्रपटाची गायिका मधुश्रीने गायले असून ‘सहायता’ या कीर्ती सगाथिया हिने गायलेल्या गाण्यामागे ईशस्तुती गीत १२१ ची प्रेरणा आहे. ही दोन्ही हिंदी गाणी श्रोत्यांच्या हृदयाला भिडणारी आहेत.

“ख्रिस्ती संगीतात भाषेचे अडथळे नाहीत. यानंतर आम्ही आगामी आल्बममध्ये प्रादेशिक भाषांत संगीत रचना करण्यावर भर देणार आहोत. त्यासाठी नवे गायक, संगीतकार, गीतकार, वादक यांनी पुढे यावे. त्यांचे स्वागत आहे”, असे पोर्णिमा कामले म्हणाल्या, तर ‘ग्लोरिफाय ख्राईस्ट 3’ या आल्बमसाठी आमचे संगीतकार रविराज व ओबेद यांनी उत्कृष्ट काम केले आहे. असे बुद्धिमान संगीतकार, गीतकार, नियोजक, वादक व ध्वनि अभियंते लाभल्याबद्दल आम्ही प्रभूचे ऋणी आहोत”, असे डॉ. कामले यांनी बोलून दाखवले.

‘ग्लोरिफाय ख्राईस्ट 3’ म्हणजे कल्पक, उत्साहपूर्ण अशा स्वर्गीय गाण्यांचे संकलन आहे, ज्यातून येशू ख्रिस्ताची निरपेक्ष आणि असीम माया अनुभवू देते.

या आल्बममधील सर्व गाणी आयट्युन्स, सावन, हंगामा, स्पोर्टीफाय, गुगल प्ले व ॲमॅझॉन म्युझिकवर उपलब्ध आहेत, तर व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत.

हनुमान जयंती च्या मुहूर्तावर “मंकीबात” या बाल चित्रपटाच्या प्रमोशन ला सुरुवात

0

-१८ मे रोजी होणार संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित

उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांसाठी येतोय धम्माल बालचित्रपट

ठाण्यातील पोखरण रस्त्यावरील बन्सीधर हनुमान मंदिरात हनुमान जयंतीला अचानक एक माकड आले,आणि चक्क त्या माकडाने, हनुमानाच्या मूर्तीला नमस्कार केला.हा चमत्कार बघायला आजूबाजूचे लोक आणि लहान मुलांनी मंदिरात गर्दी केली .हे माकड गाभाऱ्यातून बाहेर आल्यावर माणसांमध्ये सामील झाले, लहान मुले त्याला नमस्कार करू लागली …..

अचानक ते माकड माणसासारखे उभे राहिले आणि चक्क माणसासारखे बोलूही लागले , मग सगळ्यांनी त्याच्या जवळ जाऊन पहिले आणि काय आश्चर्य ? माकडाच्या वेशात आतमध्ये एक कलाकार मुलगा होता .

निमित्त होते लेखक-दिग्दर्शक विजू माने यांच्या आगामी “मंकी-बात” या आगळ्या वेगळ्या बालचित्रपटाच्या प्रमोशनचे.

हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर विजू माने व बॉलीवूड चे प्रसिद्ध रंगभूषाकार विद्याधर भट्टे आणि त्यांनी साकारलेले हुबेहूब माकड यांनी ठाण्यातील बन्सीधर मंदिरात श्री हनुमानाचे दर्शन घेऊन “मंकी-बात” या बाल चित्रपटाचा हटके पद्धतीने प्रसिद्धीचा श्रीगणेशा केला.

परिणीता ,रबने बना दि जोडी ,लगे रहो मुन्ना भाई , इंग्लिश विन्ग्लीश ,शामिताभ अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी “मंकीबात” या बालचित्रपटासाठी हे विशेष माकड तयार केले आहे.

या प्रसंगी भट्टे म्हणाले माकडाचा हा स्पेशल गेट अप करण्यासाठी मला १५ दिवस लागले ,या मास्क साठी सिलिकॉन वापरले आहे ,त्यामुळे ते हुबेहूब माकडाच्या त्वचेसारखे दिसत आहे ,या मास्कमधून आतील कलाकाराला व्यवस्थित श्वास घेता येतो. त्यामुळे शूटिंग करतांना कलाकाराला काही त्रास झाला नाही.

लेखक-दिग्दर्शक विजू माने म्हणाले मी प्रथमच एक बालचित्रपट तयार केला आहे या सुट्टीत आपल्या मुलांनी आपल्या मातीतला अस्सल, मनोरंजनपर धम्माल आणि मस्ती असलेला पण आपली मराठी संस्कृती ,संस्कार जपणारा असा “मंकी–बात” हा बालचित्रपट पहावा ,या चित्रपटात मराठीतील आघाडीचे कलाकार आहेत. यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना धमाल करण्यासाठी आम्ही हा चित्रपट १८ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित करत आहोत.

​ आयएमईडीच्या प्लेसमेंट-95 हून अधिक कंपन्यांचा सहभाग

0
पुणे :‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आयएमईडी) च्या प्लेसमेंटला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
या प्लेसमेंट उपक्रमात सुमारे 95 हून अधिक विविध कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला.
यामध्ये ‘गुगल’, ‘अ‍ॅमेझॉन’, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’, ‘आय.टी.सी.’, ‘आदित्य बिर्ला’, ‘आय.सी.आय.सी.आय.’ ‘सिक्युरिटीज’, ‘विप्रो’, ‘टेक महिंद्रा’, ‘बजाज अलियान्स’, ‘मोतीलाल ओसवाल’ आदी कंपन्यामध्ये विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. 
2017-18 या शैक्षणिक वर्षात आय.एम.ई.डी. चे 160 हुन अधिक विद्यार्थी संस्थेच्या ‘कार्पोरेट रिसोर्स सेल’ मधून विविध कंपन्यांमध्ये नियुक्त करण्यात आले आहेत. 
यामध्ये विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर 48 लाख, व देशपातळीवर 10 ते 12 लाखांचे पॅकेज मिळाले आहे, अशी माहिती डॉ. सचिन वेर्णेकर (‘भारती विद्यापीठ व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’चे संचालक) यांनी दिली.
यशस्वी उद्योजक निर्माण करणे हे ब्रीद वाक्य असणार्‍या आय.एम.ई.डी.मध्ये उच्चशिक्षणाला पोषक वातावरण, उत्तम शिक्षणपद्धती, उच्चशिक्षित शिक्षकवर्ग व विद्यार्थी हा केंद्रबिंदू असल्यामुळे या प्लेसमेंट ला चांगला प्रतिसाद मिळाला’. 
काळाची गरज ओळखून अतिशय दूरदृष्टीने विविध उपक्रमांचे आयोजन आय.एम.ई.डी.मध्ये केले जाते. यामध्ये इंडस्ट्री इन्स्टिट्यूट पार्टनरशीप समीट, एच.आर मिट, माजी विद्यार्थी मेळावा, कौशल्य विकासासाठी मार्गदर्शन कार्यशाळा यांचा समावेळश असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
आय.एम.ई.डी.विषयी :
आय.एम.ई.डी. ला बिझनेस व मॅनेजमेंट क्रोनिकलकडून ’अ’ श्रेणी मिळाली आहे. भारत शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून भारतात 40 वे मानांकन, तसेच भारतातील व्यवस्थापन शास्त्रातील मानाच्या पहिल्या 10 संस्थांमध्ये स्थान मिळाले आहे

गोदरेज इंटेरिओचा पुणे येथे ऑफिस वेलनेस पोर्टफोलिओमध्ये विस्तार

~पहिल्यांदाच मोशन चेअर हे खास उत्पादन दाखल~

पुणे: गोदरेज इंटेरिओ या संस्थात्मक श्रेणीतल्या आणि डिझाइन, उत्पादन व रिटेल यातील शाश्वतता व उत्कृष्टतेविषयक केंद्रे यांसाठी कसोशीने प्रयत्नशील असलेल्या भारतातील आघाडीच्या फर्निचर ब्रँडने पुणे येथे ‘मोशन चेअर’ हे विशेष उत्पादन दाखल केले.

इंटेरिओ विभागाचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अनिल माथुर यांच्या हस्ते उत्पादनाचे अनावरण करण्यात आले. या नावीन्यपूर्ण उत्पादनाच्या मदतीने या रिटेल ब्रँडचे पुण्यामध्ये आरोग्य व वेलनेस श्रेणीला चालना देण्याचे व त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याचे उद्दिष्ट आहे.

दशक किंवा त्याहून अधिक काळाशी तुलना करता, आजकाल कामासाठी ऑफिसमध्ये अधिक तास घालवले जातात. तसेच, ऑफिसमध्ये घालवल्या जाणाऱ्या इतक्या तासांपैकी बराचसा कालावधी कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर व्यतित केला जातो. कामाच्या ठिकाणी बराच वेळ बसून काम करत असताना, ऑफिसला जाणाऱ्यांना बराच वेळ अतिशय अवघडलेल्या स्थितीत बसावे लागते व म्हणूनच अशा व्यक्तींसाठी हे उत्पादन अतिशय उपयुक्त ठरणार आहे.

इंटेरिओ डिव्हिजनचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अनिल माथुर यांनी सांगितले, “आरोग्य व वेलनेस उत्पादनांची लोकप्रियता वाढत असल्याने आधुनिक ऑफिस फर्निचरसाठी मागणी वाढली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात संधी असल्याने आम्ही आरोग्य व वेलनेस श्रेणीतील फर्निचरच्या उत्पादनामध्ये 20 कोटी रुपयांची गुंतवणूक करायचे ठरवले. एकूण संघटित ऑफिस फर्निचर उद्योगामध्ये 16% हिस्सा असलेल्या गोदरेज इंटेरिओच्या एकूण उत्पन्नात पुण्यासह पश्चिम बाजाराचे 26% योगदान आहे. सध्या, महाराष्ट्रातील ऑफिस फर्निचर क्षेत्राचे ब्रँडच्या एकंदर ऑफिस फर्निचर उद्योगाच्या एकूण वार्षिक उत्पन्नामध्ये योगदान 7% आहे.”

भारतात ‘मोशन चेअर’ दाखल करण्यासाठी ठिकाण ठरवण्याबद्दल माथूर यांनी सांगितले, “आमच्यासाठी पुणे ही देशातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. इतक्या उत्तम व वाढत्या बाजारात नवे उत्पादन दाखल करण्यास आमची पसंती असते. तसेच, पुण्यातील ऑफिस फर्निचर श्रेणीमध्ये लक्षणीय व परिवर्तनशील ट्रेंड दिसून येत आहेत. ऑफिस फर्निचर या संकल्पनेचा कल सौंदर्याकडून ह्युमन इंजिनीअरिंगकडे वळला आहे आणि पुण्यातील जाणकार ग्राहकांना हे परिवर्तन पसंत पडले आहे.”

गोदरेज इंटेरिओ या वेलनेस पोर्टफोलिओमध्ये अनेक उत्पादने असून ती वेलनेसच्या पसंतीनुसार विविध गरजा व आवडी पूर्ण करतात. मोशन चेअरविशेष संकल्पनेवर आधारित असून, जेथे उत्पादन युजरच्या बसण्याच्या स्थितीच्या नैसर्गिक गरजेनुसार असेल व युजरचे एकंदर वेलनेस व कार्यक्षमता यासाठी बसणे व शारीरिक हालचाली सहज शक्य होतील.