पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगूनवाला हॉटेल मॅनेजमेंट अँड रिसर्च सेंटर चा माजी विद्यार्थी मेळावा चांगल्या प्रतिसादात पार पडला. या मेळाव्याची ‘बॉलीवूड’ थीम होती. मेळाव्याचे दुसरे वर्ष होते.
प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हा कार्यक्रम आझम कॅम्पस येथे झाला.
सहभागी विद्यार्थ्यांनी बॉलिवूड प्रकारचे पोषाख परिधान केले होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आणि अनेक पदवीधर विद्यार्थ्यांना एकमेकांशी, माजी विद्यार्थ्यांशी आणि इतर स्टाफ सदस्यांसह चर्चा करण्यासाठी म्हणून हा उपक्रम होता, असे महाविद्यालयाच्या प्राचार्य अनिता फ्रांत्झ यांनी सांगितले.