Home Blog Page 3168

निवडणूक प्रक्रियेत दिव्यांगांचा सहभाग वाढविण्यासाठी चर्चासत्र

0

पुणे: निवडणूक प्रक्रियेत दिव्यांग व्यक्तींचा सहभाग वाढविण्याच्या हेतूने उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात जिल्हा पातळीवरील चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी निवडणूक शाखेचे तहसिलदार देवदत्त ठोंबरे, मतदार नोंदणी अधिकारी, सहायक मतदार नोंदणी अधिकारी, नेहरू युवा केंद्र, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, ससून सर्वोपचार रुग्णालय तसेच विविध शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अधिकारी, दिव्यांग पुनर्वसन केंद्र, दिव्यांग कल्याणासाठी कार्यरत संस्थांचे स्वयंसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्रीमती मोनिका सिंह म्हणाल्या, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व संबंधितांच्या मदतीने दिव्यांग मतदारांचे प्रभाग, नोंदणी क्रमांकांची माहिती घेण्यात येत आहे. पोस्टर्स, बॅनर्स बरोबरच ब्रेल लिपीतून मतदानाच्या सुविधेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. दिव्यांगांना आवश्यकतेनुसार मदतनीस तसेच या अनुषंगाने रॅम्प्स, व्हिलचेअर जाऊ शकतील असे प्रशस्त दरवाजे असणारी मतदान केंद्रे तळ मजल्यावर उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात येत आहेत. स्वयंसेवी संस्थांनी अधिकाधिक दिव्यांग मतदारांची माहिती जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी. जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघातील दिव्यांग व्यक्तींच्या मतदान केंद्रनिहाय याद्या तयार करण्यात येत असून या सर्व व्यक्तींची मतदार नोंदणी करण्यात येणार असल्याची माहितीही श्रीमती सिंह यांनी चर्चासत्रात दिली.

भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार दिव्यांग व्यक्तींच्या मतदार नोंदणीबाबत तसेच दिव्यांग व्यक्तींना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत यावेळी माहिती दिली. दिव्यांग व्यक्तींना सोयी- सुविधा पुरविण्याबाबतचे नियोजन व अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली. दिव्यांग व्यक्तींना मतदान प्रक्रियेवेळी येणाऱ्या अडचणी व त्यावर करावयाच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. आभार तहसिलदार  देवदत्त ठोंबरे यांनी मानले.

शिवसेना ही गांडुळाची अवलाद…त्याचं तोंड इकडे की तिकडे कळत नाही – अजित पवार

0

कोल्हापूर – भाजपसोबत सत्तेत बसायचं… कॅबिनेटच्या बैठकीत सर्व प्रश्नांना मान्यता दयायची…आणि एखादा प्रश्न निर्माण झाला की विरोध करायचा…अरे शिवसेना ही गांडुळाची अवलाद आहे…त्याचं तोंड इकडे की तिकडे कळत नाही तशी अवस्था शिवसेनेची झाली असल्याची घणाघाती टिका माजी उपमुख्यमंत्री आणि विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी नेसरी येथील जाहीर सभेत केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात नेसरी येथील जाहीर सभेने झाली. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सभेलाही अलोट गर्दी लोटली. या सभेत अजित दादांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या दुतोंडी शिवसेनेवर जोरदार टिका केली. दादांनी आपल्या भाषणामध्ये साडेतीन वर्ष खोटी आश्वासने देणाऱ्या भाजपला साथ देणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला.

साडेतीन वर्ष भाजप आणि शिवसेना यांचा भोंगळ कारभार सुरु आहे. भाजप आणि शिवसेना ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवसेनेला शेतीतलं काय कळतं…या शिवसेनेचे नेते मुंबईत राहतात…त्यांच्या नेत्यांची एक गुंठेही शेती नाही त्यांना शेती काय कळणार अशी खरमरीत टिका अजितदादांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली.

हे सरकार शेतकरी विरोधी आहे.शेतकऱ्यांचे प्रश्न जाणणारे असते तर हे सरकार शेतकऱ्यांसोबत असे वागले नसते.या सरकारची इच्छाशक्ती असेल तर मार्ग निघू शकतो परंतु या सरकारची काही करण्याची इच्छाशक्तीच नसल्याचा आरोप अजितदादांनी केला.

लोकसभा-विधानसभा काही महिन्यावर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार आणि आमदार निवडून द्या…नाही तुमचे प्रश्न सोडवले तर पवारांची अवलाद सांगणार नाही अशी जबरदस्त इच्छाशक्ती अजितदादांनी व्यक्त केली.

नशीब १६ व्या शतकात संघ नव्हता नाहीतर शिवाजीराजांनाही संघाचे असल्याचे यांनी म्हटले असते- धनंजय मुंडे

शहीद राजगुरु हे संघाचे होते अशी चर्चा हे भाजपवाले करु लागले आहेत.स्वातंत्र्यलढयात संघ नव्हता.परंतु ज्यांनी स्वातंत्र्यलढयात आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना संघाचे असल्याचे सांगण्याचे धाडस हे भाजपवाले करत आहेत.नशीब हा संघ १६ व्या शतकात नव्हता नाही तर यांनी छत्रपती शिवाजी महाराजही संघाचे होते असे म्हणायला कमी केले नसते अशी जोरदार टिका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नेसरीच्या जाहीर सभेत संघपरिवारावर केली.

अरे किती महापुरुषांचा अपमान कराल.किती दिवस सहन करायचा महापुरुषांचा अपमान…त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हा हल्लाबोल आंदोलन सुरु केले असल्याचेही धनंजय मुंडे म्हणाले.

सत्तेत असलेल्या भाजपवाल्यांची ट्रिपल तलाक,सबसिडी यावर चर्चा करतात परंतु या देशातील सर्वसामान्य जनतेला दिलेल्या विषयांवर कधी चर्चा करणार असा सवाल धनंजय मुंडे यांनी केला.

इतिहास घडवलेल्या मातीत मी पहिल्यांदा आलो आहे. या मातीत लढाईचे स्फुरण आहे. १६ व्या शतकात नेसरीने जो इतिहास घडवला तोच परिवर्तनाचा इतिहास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या हल्लाबोलच्या माध्यमातून घडवल्याशिवाय राहणार नाही असा आशावाद धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

राज्यातील सरकार सर्व आघाडयांवर नापास झाले आहे- जयंत पाटील

राज्यातील सरकार सर्व आघाडयांवर नापास झाले आहे. पारदर्शक कारभार करण्याचे आश्वासन देणारे सरकार पारदर्शक कारभार करत असल्याचे धाडस करताना दिसत नाही असा आरोप विधीमंडळ गटनेते जयंत पाटील यांनी केला.

फडणवीस सरकारने साडेतीन वर्षात दोन हजाराच्यावर घोषणा आणि आश्वासने दिली आहेत. घोषणा करणे व काम करणे यामध्ये सरकारच्या कामात खूप फरक आहे आहे असेही जयंत पाटील म्हणाले. त्यांनी आमदार श्रीमती संध्याताई कुपेकर यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी राहणाऱ्या जनतेचे आभारही मानले.

सभेत आमदार श्रीमती संध्याताई कुपेकर,आमदार हसन मुश्रीफ यांनीही आपले विचार मांडले. सभेनंतर सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाचे दर्शन प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे,विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे,जयंत पाटील,दिलीप वळसेपाटील यांनी घेतले.

या सभेला प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसेपाटील, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार हसन मुश्रीफ, माजी खासदार निवेदिता माने, आमदार श्रीमती संध्या कुपेकर, आमदार प्रकाश गजभिये, आमदार जयदेव गायकवाड, जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे, मंदा बाभुळकर आदींसह चंदगड, आजरा, गडहिग्लज यातील पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

७ स्पेशालीस्ट डॉक्टरांची उत्तम वैद्यकीय सुविधा डेक्कन क्लिनिकच्यामार्फत पुण्यात उपलब्ध

0

पद्मभूषण डॉ. प्रफुल्ला देसाई यांच्या हस्ते डेक्कन 

क्लिनिकच्या पुण्यातील कामकाजाची अधिकृत घोषणा

 पुणे- आपआपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करीत असलेल्या सात डॉक्टरांनी डेक्कन क्लिनिकची एक आगळीवेगळी आणि अतिशय उपयुक्त अशी संकल्पना मांडली. डॉ. संजय देशमुख, डॉ. अनुपमा माने, डॉ. विश्वनाथ जिगजीन्नी, डॉ. सुजाइ  हेगडे, डॉ. अमित मुळे, डॉ. शैलेश नाईक आणि डॉ. प्रसाद रहाते यांनी पुण्यात डेक्कन क्लीकीन सुरु केले आहे. पुना क्लब येथे आयोजित केलेल्या ह्या समारंभात डेक्कन क्लिनिकच्या स्थापनेमागील संकल्पना, उद्दिष्ट आणि ध्येय उपस्थित पाहुण्यांना आणि शुभचिंतक यांना सांगण्यात आले.

टाटा मेमोरियल सेंटर मुंबईचे माजी संचालक, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या राकोचे माजी चेअरमन, रुरल कँसर सेंटरचे संस्थापक, आणि सध्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये सिनियर ओन्कॉलॉजीस्ट म्हणूनकार्यरत असलेल्या पद्मभूषण डॉ. प्रफुल्ला देसाई यांच्या हस्ते आज डेक्कन क्लिनिकच्या पुण्यातील कामकाजाची अधिकृत घोषणा करण्यात आली.वाढत चाललेले शस्त्रक्रियांचे दर, प्रामाणिक सल्लांचा आणि योग्य शस्त्रक्रियांचा अभाव ही काही मुख्य करणे आहेत ज्याने या डॉक्टरांना एकत्र येण्यास भाग पाडले. डेक्कन क्लिनिक म्हणजे योग्य सल्ला, योग्य खर्चाचे, तुमच्या सगळ्या वैद्यकीय गरजेचे एक उत्तम ठिकाण.

“आमच्यासाठी पेशंट हा प्रथम पेशंट नसून तो एक माणूस आहे आणि त्याप्रकारेच आम्ही त्याला वागणूक देतो असे विधान समारंभात बोलताना डॉ. हेगडे यांनी केले. आम्ही नैतिक पद्धतींवर विश्वास ठेवत असून डोक्यानेविचार करण्यापेक्षा हृदयाने निर्णय घेण्यास प्राधान्य देतो ज्याचा फायदा आमच्या पेशंटला नक्कीच होतो” असेही ते यावेळी बोलताना म्हणाले. डेक्कन क्लिनिक येथे सर्वप्रकारच्या कँसर शस्त्रक्रिया, प्लास्टिक, कॉसमेटीक् सर्जरी, ब्रेस्ट सर्जरी, लॅप्रोस्कोपिक सर्जरी आणि सर्व शस्त्रक्रिया अत्याधुनिक टेक्नोलॉजीच्या सहाय्याने केल्या जातात. अनेक सुविधा ह्या भारतात प्रथम वापरल्या जात आहेत.

सोमवार-शनिवार, सकाळी १० ते रात्री ८ वाजता, ६०-६२, कनॉट पॅलेस, ग्राउंड फ्लोअर, बंड गार्डन रोड पुणे ४११ ००१ येथे डेक्कन क्लिनिकची सेवा उपलब्ध. अपॉइंटमेंटकरिता ०२०-२६१६ ०२६६ वर संपर्क साधा.

सततची पाठदुखी? दुर्लक्ष करू नका आणि तुमचे प्रोस्टेट वेळीच चेक करा

0
पुणे- पुरुषांमधील प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून . आकड्यांनुसार ६ मधील १ पुरुष प्रोस्टेट कॅन्सरग्रस्त आहे. गंभीर आजारांवर मात करण्यासाठी त्यावर लवकरात लवकर उपचार होणे अत्यंत महत्वाचे आहे. ६ एप्रिल २०१८ ते १४ एप्रिल २०१८ ह्या कालावधीत इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सरने मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
जवळपास 60 टक्के रुग्ण डॉक्टरांना भेटतात जेव्हा ते शेवटच्या टप्यावर पोहचलेले असतात, ८०% – ९०% संपूर्ण बरे झालेल्या रुग्णांचे निदान अगदी पहिल्या टप्प्यात झालेले असते. दुर्दैवाने भारतात मात्र ह्यासंबंधी जागरूकता नसल्याने कित्येक रुग्ण अगदी शेवटच्या टप्प्यात उपचाराला येतात जेव्हा उशीर झालेला असतो असे मत आयपीसीचे कन्सल्टंट युरोलॉजीस्ट डॉ. देशमुख हृषीकेश यांनी व्यक्त केले. प्रोस्टेट कॅन्सर हा अत्यंत हळू गतीने वाढत असून अखेर प्राणघातक ठरतो त्यामुळे त्याचे प्राथमिक टप्प्यात निदान होऊन त्यावर उपचार होणे अत्यंत महत्वाचे आहे असेही ते म्हणाले.
इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सर (IPC) मागील ५ वर्षांपासून प्रोस्टेट कॅन्सर आणि त्याचे निदान करण्यासाठी उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञानाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. यासाठी 120 पेक्षा अधिक शिबीरांच्या माध्यमातून ५०,००० पेक्षा जास्त लोकांची जनजागृती करण्यात आली आहे.
प्राथमिक लक्षणे:
• वारंवार लघवी येणे, रात्री वारंवार लघवीला जावे लागणे, लघवीला त्रास होणे, लघवी पूर्ण होत नसल्याची जाणीव होणे व लघवीचा प्रवाह घटणे
• कॅन्सरच्या पूढील टप्यात हाडांमध्ये वेदना होणे, भूक कमी होणे याबरोबरच फ्रॅक्चर आणि अर्धांगवायूचा धोका देखील संभावतो.
भविष्यात प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी 50 वर्षांपूढील पुरूषांनी पीएसए आणि डीआरई तपासणी करण्याचा सल्ला इन्स्टिट्यूट फॉर प्रॉस्टेट कॅन्सरने दिला असून कोणत्याही प्रकारच्या पाठदूखीकडे दुर्लक्ष करू नये असे देखील सुचवले आहे. पूर्व निदान माध्यमातून प्रोस्टेट कॅन्सर असल्याचे कळाले तर बायोअप्सी करणे गरजेचे असते. बायोअप्सी ही एक साधी, सरळ पद्धत असून ही अल्ट्रासाउंड मशीनच्या मदतीने केली जाते. टीआरयुएस (ट्रान्स रेक्ट अल्ट्रासाउंड) च्या मदतीने केली जाणारी बायोअप्सी आदर्श बायोअप्सी समजली जाते. प्रॉस्टेट कॅन्सरच्या अचकू निदानासाठी
जवळपास12 ते 14 तुकडे टिश्यूजची अत्यंत पद्धतशीरपणे तपासणी करावी लागते. आणि एमआरआयद्वारे कॅन्सरचा अधिक अचूक निदान होऊ शकते. जर वेळेत निदान झाले तर हा कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. विशेषत: 50  वर्षे वयानंतर कोणत्याही पाठीच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका.
प्राथमिक टप्प्यात निदान झाल्यास रुग्ण १००% बरा होऊ शकतो. उशीर झाल्यास प्रोस्टेट प्राणघातक ठरू शकतो त्यामुळे तुमच्या सततच्या  पाठदुखीवर दुर्लक्ष करू नका आणि तुमचे प्रोस्टेट वेळीच चेक करा.
तारीख :  ६ एप्रिल २०१८ ते १४ एप्रिल २०१८
ठिकाण : इन्स्टिट्यूट फॉर प्रोस्टेट कॅन्सर,  पुणे ग्राउंड फ्लोअर, कुमार – दि ओरायन, सेंट मिराज कॉलेजजवळ, डॉनबॉस्को युथ सेन्टरच्या विरुद्ध, कोरेगाव पार्क, पुणे
संपर्क : ७७९८५७७५६३ / ९७६६२२७७१२

 

लबाड जोडीती इमले माड्या.. सामान्यांसाठी पार्किंग पॉलीस्या ..

0

पार्किंग लॉट बिल्डरांच्या घशात आणि  शुल्कासाठी मात्र  हाथ नागरिकांच्या खिशात …

पुणे- प्रत्येक वाहनासाठी पार्किंग शुल्क नावाने घराघरातून ,प्रत्येक नागरिकाच्या खिशातून पैसा ओरबाडू पाहणाऱ्या महापालिकेचा कारभार म्हणजे ‘वाईट तितुके इथे पोसले ,भलेपणाचे भाग्य नासले ..प्रजा आंधळी अधांतरी दरबार ‘असल्याचे स्पष्ट होत आहे . पालकमंत्री गिरीश बापट ६२ पार्किंग लॉट बीओटी वर विकसित करण्याची भाषा करत असताना गेल्या दहा वर्षात शहरातील ६२ पार्किंग लॉट कोणकोणत्या बिल्डरांच्या घशात घालण्यात आले त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याचे दिसते आहे . पार्किंग लॉट वर बहुमजली व्यापारी संकुले बांधण्यात आल्याचे ६२ प्रकार पुण्यात घडले असून हा ‘पार्किंग लॉट घोटाळा’ बाहेर काढण्यास का कोणी पुढे येत नाही ? असा ही सवाल या निमित्ताने पुढे येतो आहे .
या पार्किंग लॉट चे पूर्वी कोणी काय केले ? यावर पडदा का टाकला जातो आहे ? अशा प्रश्नांहून मोठा आहे .इथला पार्किंग प्रश्न .. पण मुळातच तो निर्माण देखील राजकीय लोकांनीच केला आहे . बिल्डर आणि राजकारणी यांनी संगनमताने कायद्याच्या पळवाटांचा आधार घेत शहरातील ६२ पार्किंग लॉट लाटून आता पार्किंग शुल्क नागरिकांच्या खिशातून ओरबाडण्यासाठी घाट घातला आहे .
उदाहरणच द्यायचे झाले तर सातारा रस्त्यावर साईबाबा मंदिराशेजारी पार्किंग लॉट चे आरक्षण होते . याठिकाणी मोठ्ठे व्यापारी संकुल उभारले गेले . याठिकाणी पीएमपीएमएल च्या बसेस आणि खाजगी वाहने यासाठी बहुमजली पार्किंग व्यवस्था होण्या ऐवजी तिथे पालिकेच्या ताब्यात तळमजल्यावर पार्किंग व्यवस्था देवून बहुमजली व्यापारी इमारत उभी करण्यात आली .
अशा प्रकरणांकडे का दुर्लक्ष करण्यात आले ? आजूनही त्याकडे का पालकमंत्री बापट आणि भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले लक्ष देत नाहीत ? असे प्रश्न आहेत . आतापर्यंतचे पार्किंग लॉट ज्यांनी खाल्ले त्यांच्यावर प्रथम कारवाई करून नव्याने पार्किंग लॉट विकसित केले   म्हणजे पुढचे पार्किंग धोरण -पॉलीसी व्यवस्थित राबविता येईल .
सातारा रस्त्यावरील ट्रक टर्मिनस च्या आरक्षणाची काय वाट लावून ठेवली आहे  ते हि उघड्या डोळ्याने पाहता येईल . मटका अड्डे , अतिक्रमणे आदी गैरप्रकारांनी हा पार्किंग लॉट बिनकामाचा करून ठेवण्यात आला आहे . हीच बाब लुल्लानगर चौकानजीक कल्याण भेळ येथील पार्किंग लॉट च्या संदर्भात आहे . हा पार्किंग लॉट देखील अशाच पद्धतीने कायद्याच्या पळवाटा पाहून गायब करण्यात आला आहे . बेसमेंट पार्किंग महापालिकेकडे सोपवायचे आणि व्यापारी इमारत उभारायची अशा पद्धतीने हा पार्किंग लॉट ही बिल्डरच्या घशात घालण्यात आला आहे .इथेही महापालिका बहुमजली वाहनतळ करू शकत होती . एक ना अनेक पार्किंग लॉट अशा पद्धतीने हडप करून टाकण्यात आले आहेत . हा पार्किंग लॉट घोटाळा गोगावले आणि बापट यांनी अगोदर बाहेर काढावा त्यानंतर नव्याने पार्किंग लॉट विकसित करावेत आणि असे पुन्हा पुन्हा गैरप्रकार होणार नाहीत याची दक्षता घेणे जरुरीचे ठरणार नाही काय ?

एक विचारपर्व – भाई वैद्य

0
भाई वैद्य उर्फ भालचंद्र सदाशिव वैद्य यांची माहिती
   जन्म – २२ जून १९२७
   पत्ता  – ए १०१, मारव्हेल ऐरीस, कांचन गल्ली (वाडेश्वर लेन), लॉं कॉलेज रोड, पुणे  ४११००४
सध्या खालील पदावर कार्यरत होते
अध्यक्ष, एस.एम.जोशी मेमोरिअल मेडिकल ट्रस्ट, पुणे. (१९९८पासून)
अध्यक्ष, पुणे म.न.पा.सेवा निवृत्त संघ. (१९९५ पासून)
पुर्वी कार्य केलेली पदे.
राष्ट्रीय अध्यक्ष, सोशलिस्ट पार्टी (इंडिया) ( मे २०११ ते २०१६.)
राष्ट्रीय अध्यक्ष, भारत यात्रा ट्रस्ट, दिल्ली. (२००४ ते २०११)
राष्ट्रीय महामंत्री, जनता पार्टी. (१९८६ ते १९८८ )
राष्ट्रीय महामंत्री, समाजवादी जनपरिषद. (१९९५ ते १९९९)
राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्र सेवा दल. (२००० ते २००२)
महापौर, पुणे (१९७४ ते १९७५)
राष्ट्रीय अध्यक्ष, ऑल इंडिया मेयर्स कोंन्फरन्स (१९७५)
राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भारतीय समाजवादी अध्यापक सभा.(२००४ ते २०१३)
अध्यक्ष, खडकी अ‍ॅम्युनिशन फॅक्टरी वर्कर्स यूनियन,पुणे. २०१३ पर्यन्त.
महाराष्ट्र राज्याचे गृह आणि सर्वसाधारण प्रशासन या खात्याचे राज्यमंत्री.  (१९७८ ते १९८०)
या कार्यकाळात पहिले मराठवाडा नामांतर विधेयक विधानसभेत मांडले.
स्मगलरचे सात साथीदार तीन लाख रुपये लाच घेऊन आले असताना गृहराज्य मंत्री म्हणून त्यांना पोलिसांच्या हवाली करून तुरुंगात पाठविले.
महाराष्ट्र राज्य पोलिसांना फूल पॅंट देण्याचा ऐतिहासिक निर्णय.
महाराष्ट्र सेवा निवृतांच्या वेतनामध्ये किमान निवृती वेतन आणि त्याची महागाईशी जोडणी या गोष्टी करून घेतल्या.
 अनेक चळवळीमध्ये सक्रिय सहभाग व तुरुंगवास 
१९४२ साली शालेय जीवनात चलेजाव चळवळीमध्ये सहभाग.
१९५५ मध्ये गोवा स्वातंत्र्य चळवळीमध्ये दुसर्‍या तुकडीत सहभाग आणि जबर मारहाण.
१९५७ साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सहभाग व तुरुंगवास.
१९६१ साली कच्छ सत्याग्रहामध्ये भुज ते खावडा पदयात्रेत सहभाग.
१९७४ ते १९७७ या दरम्यान आणीबाणीमध्ये मिसाबंदी म्हणून १९ महीने तुरुंगवास.
१९८३ मध्ये जनता पार्टीचे अध्यक्ष श्री.चंद्रशेखर यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते दिल्ली दरम्यान निघालेल्या भारत यात्रा मध्ये ४००० किलोमीटर अंतराच्या यात्रेत सक्रिय सहभाग.
आत्ता पर्यन्त सुमारे २५ वेळा सत्याग्रह व तुरुंगवास. शेवटचा सत्याग्रह व अटक डिसेंबर २०१६ मध्ये ८८व्या वर्षी शिक्षण हक्कासाठी.
१९४३ साली राष्ट्र सेवा दलात सामिल झाल्यापासून ‘लोकशाही समाजवादी’   विचारधारा स्विकारली आणि आजतागायत ती निष्ठेने जपली.
१९४६ साली कोंग्रेस सोशलिस्ट पार्टी या जयप्रकाश नारायण, डॉ.लोहिया व एस.एम.जोशी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे प्रथम सदस्यत्व. त्यानंतर समाजवादी पक्षाची जी जी रूपांतरे झाली त्यात सक्रिय सहभाग.
विचारधारे संबंधी आयुष्यभर लेखन, प्रबोधन, संघर्ष व संघटन. एका समाजवाद्याचे चिंतन, मंडल आयोग व अन्य मागासवर्ग, समाजवाद, संपूर्ण शिक्षण: फी विना समान व गुणवत्तापूर्ण :का व कसे, आर्थिक आक्रमणाचे आरिष्ट (भाषांतरीत), परिवर्तनाचे साथी व सारथी, शब्दामागचे शब्द आदी पुस्तके प्रकाशित.
आजवर प्रतिष्ठेचे २५ पुरस्कार प्राप्त. : राजर्षि शाहू जीवन गौरव पुरस्कार, पुणे विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार, पुण्यभूषण पुरस्कार व इतर.
मूळगाव – दापोडे, ता.वेल्हा जि.पुणे
परिवार – मुलगा सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ व राष्ट्र सेवा दलाचे पुर्व कार्यकारी विश्वस्त  डॉ.अभिजीत वैद्य, सुन डॉ.प्रा.गीतांजली वैद्य, मुलगी प्रा. प्राची रावल, जावई प्रताप रावल,   नातवंड सोहिल, डॉ.सलिना व प्रशिला.

लोकशाही मुल्यांचा पुरस्कर्ता गमावला – मुख्यमंत्र्यांची श्रध्दांजली…

0
पुणे– ज्येष्ठ समाजवादी  नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या निधनाने लोकशाही मुल्यांचा निष्ठेने पुरस्कार  करणारे आणि समाजातील  वंचित -उपेक्षितांच्या  हक्कांसाठी आयुष्यभर संघर्षरत असणारे ज्येष्ठ व्यक्तिमत्व आपण गमावले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासह  संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती लढ्यात श्री. भाई वैद्य यांनी दिलेले योगदान  महत्त्वपूर्ण असून सामाजिक समता प्रस्थापित व्हावी यासाठी त्यांचे अखंड प्रयत्न होते. मुल्यांवर निष्ठा ठेवूनही  राजकारण करता येते याचा एक मानदंड त्यांनी निर्माण केला होता. त्यांच्या निधनाने राज्यातील विविध  सामाजिक चळवळींचा  अध्वर्यू आपण गमावला आहे.
– गिरीश बापट ( पालकमंत्री पुणे)

ज्येष्ठ समाजवादी नेते व मानवतेची मूल्ये जतन करणाऱ्या भाई वैद्य यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अस्वस्थ झालो. भाईंनी लोकशाही मूल्ये जतन करण्याचे व्रत अंगिकारले होते. गोरगरिबांच्या हक्कासाठी सतत रस्त्यावर येऊन लढा उभा करणारे भाई पुणेकरांचे श्रद्धास्थान होते. स्वातंत्र सैनिक, गोवा मुक्ती आंदोलनातील नेता शिक्षण हक्कासाठी सत्याग्रह करणारा पुणेकरांचा मित्र आज आपल्यातून नाहीसा झाला आहे. महापौर या नात्याने त्यांनी पुणे शहराचा नावलौकिक सर्वदूर पोहचवला. राज्याचे गृहमंत्री या नात्याने त्यांची कामगिरी महाराष्ट्रातील जनतेच्या सदैव स्मरणात राहील. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर, पोलीस दलाचा बदललेला पोशाख, सेवानिवृत्तांना त्यांनी मिळवून दिलेला आर्थिक लाभ महाराष्ट्रातील जनता कधीच विसणार नाही. भाई वैद्य यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

-अंकुश काकडे (माजी महापौर)
भाई वैद्य यांच्या निधनाने समाजवादी चळवळीचा आधारवड हरपला,निस्पृह,सतत लोकांसाठी चळवळ करणारा नेता म्हणून त्यांची महाराष्ट्रला ओळख कायम लक्षात राहील,नगरसेवक,महापौर, मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द आजही आदर्श अशी होती,अनेकवेळा त्यांचे मला मार्गदर्शन मिळाले,त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर-
भाई वैद्य यांच्या निधनामुळे एक समाजवादी विचारांवर निष्ठा ठेवणारा नेता हरपला. भाई वैद्य आयुष्यभर आपल्या समाजवादी विचारांशी ठाम राहिले आणि शेवटपर्यंत सक‘ीय राहीले.
रमाबाई आंबेडकरांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते करावे यासाठी पाडव्याच्या दिवशी मी जेव्हा पुण्यात होतो ते माझ्याकडे आले होते. राष्ट्रपतींनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असे सांगितल्यानंतर त्यांना आनंद झाला.
त्या दिवशी एका सहकार्‍याला ङ्गोन करायचा होता, त्याचा नंबर कोणालाच आठवत नव्हता, पण माजी शिक्षक आमदार ठाकरे यांचा नंबर भाईंनी बरोबर सांगितला.
आणीबाणीविरोधात तुरुंगात आम्ही एकत्र होतो तेव्हापासून आमचा स्नेह कायम राहीला. त्यांना विनम‘ श्रध्दांजली.

…तर भारताचा सीरिया व्हायला वेळ लागणार नाही-प्रकाश आंबेडकर

0

पुणे-अॅट्रोसिटी कायद्याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून पुकारण्यात आलेल्या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. या बंदमध्ये काही लोकांचा बळी गेला असून त्याला सरकार आणि सुप्रीम कोर्ट जबाबदार आहे अशी टीका भारिपचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. सोशल मीडियावर आज भार बंद बाबतचा मेसेज व्हायरल झाला. त्या बंदला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. अॅट्रोसिटी कायद्याबाबत पुनर्विचार याचिका दाखल झालीच पाहिजे या मागणीत अयोग्य काय? असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. तसेच या सगळ्या प्रश्नांबाबत, दलितांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे येऊन बोलले पाहिजे अशीही मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

देशातील सद्यस्थिती लक्षात घेतली तर देशाचा सीरिया व्हायला वेळ लागणार नाही. दहा दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आंदोलनाबाबत मेसेज फिरला. हा मेसेज कोणत्या संघटनेने फिरवला ते ठाऊक नाही. मात्र सोशल मीडियाची ताकद काय असते आणि दलित बांधव या ताकदीवर देशभरात एकत्र कसे येऊ शकतात हे सगळ्यांनी पाहिले असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. एवढेच नाही तर कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणावरही त्यांनी भाष्य केले. या सगळ्या प्रकरणात सरकार संभाजी भिडेंना पाठिशी घालते आहे. मिलिंद एकबोटेंना अटक झाली तर मग संभाजी भिडेंना अद्याप अटक का करण्यात आली नाही असाही प्रश्न प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला.

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे निधन

0

पुणे-जेष्ठ समाजवादी नेते माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी पुण्यात निधन झाले.त्यांना कर्करोग झाला होता. त्यांच्या याच आजारावर मागील काही दिवसांपासून पूना हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना. मात्र आज अखेर सायंकाळ च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

ज्येष्ठ समाजवादी नेते, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री भाई उर्फ भालचंद्र सदाशिव वैद्य यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा अभिजीत वैद्य, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ समाजवादी नेते, राज्याचे माजी गृहराज्यमंत्री भाई उर्फ भालचंद्र सदाशिव वैद्य यांचे निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या मागे मुलगा अभिजीत वैद्य, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

काही दिवसांपूर्वी भाई वैद्य यांना स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचे निदान झाले होते. तेव्हापासून त्यांच्यावर पुना हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. मात्र, या उपचारांना त्यांचे शरीर हवा तसा प्रतिसाद देत नव्हते. परिणामी, त्यांची प्रकृती आणखी खालावली. वैद्य यांची आठ महिन्यांपूर्वी अँजिओप्लास्टी झाली होती. तीन आठवड्यांपूर्वी वैद्य यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या विकारामुळे त्यांना श्वासोच्छवास घेण्यास त्रास होत होता. त्यांच्यावर कार्डिअॅक अतिदक्षता विभागात (सीसीयू) उपचार सुरू आहेत. त्यांना कृत्रीम श्वसनयंत्रणेवर ठेवण्यात आले होते.

वृक्ष तोडीच्या परवानगीसाठी ४० हजाराची लाच घेताना पुणे महापालिकेचा कर्मचारी रंगे हाथ पकडला .

0

पुणे- झाडे तोडण्यासाठी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी काढून देण्याच्या कामासाठी ४० हजाराची लाच स्वीकारताना पुणे महापालिकेच्या उद्यान निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ताब्यात घेतले.

राजेंद्र पोपट कळसकर (वय 38 रा. रा. सोलापूर टोलनाका कवडी माळवाडी गट नंबर 950, लेन नंबर 5, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर ता. हवेली ) असे या उद्यान निरीक्षकांचे नाव आहे. कळसकर हा पुणे मनपा नगर रोड क्षेत्रीय कार्यालय येथे उद्यान निरीक्षक पदावर काम करतो.

तक्रारदार रहात असलेल्या सोसायटीच्या बाजूला असलेल्या वृक्षांच्या मुळांमुळे तक्रारदार यांच्या घरांचे नुकसान होत होते त्यासाठी तिथली झाडे तोडण्यासाठी कळसकर याने वरिष्ठ अधिकाऱ्याची परवानगी मिळवून देण्यासाठी 60 हजाराची लाच मागितली होती. आज (दि.2) 40 हजार रूपयांचा पहिला हप्ता घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कळसकर याला रंगेहाथ पकडले.

महिंद्रा फार्म इक्विपमेंट सेक्टरने मार्च 2018 मध्ये केली 26,958 युनिटची विक्री

महिन्यात देशांतर्गत विक्रीमध्ये 50% वाढ

 मुंबई 19 अब्ज डॉलर उलाढाल असलेल्या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या फार्म इक्विपमेंट सेक्टरने (एफईएस) मार्च 2018 मधील ट्रॅक्टरविक्रीची आकडेवारी आज जाहीर केली.

मार्च 2018 मध्ये देशांतर्गत विक्री 26,958 युनिटची झाली, तर मार्च 2017 मध्ये ती 17,973 युनिट होती. फेब्रुवारी 2018 मध्ये एकूण ट्रॅक्टरविक्री (देशांतर्गत + निर्यात) 28,277 युनिट इतकी झाली, तर गेल्या वर्षी याच काळात ती 19,337 युनिट होती. फेब्रुवारीमध्ये 1, 319युनिटची निर्यात करण्यात आली.

डिसेंबरमधील कामगिरीविषयी बोलताना, महिंद्रा अँड महिंद्रा लि.च्या फार्म इक्विपमेंट अध्यक्ष राजेश जेजुरीकर यांनी सांगितले, “आम्ही 2018 या संपूर्ण आर्थिक वर्षामध्ये 3 लाखांहून अधिक ट्रॅक्टरची विक्री करून नवा मैलाचा टप्पा निर्माण केला. मार्च 2018 मध्ये 26,958 ट्रॅक्टरची देशांतर्गत विक्री झाली. गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत ही संख्या 50 टक्के अधिक आहे. चौथ्या तिमाहीमध्ये चांगली गती मिळाली आहे आणि ती नव्या वर्षातही कायम राहील, अशी अपेक्षा आहे. निर्यातीच्या बाबतीत आम्ही महिन्यात 1,319 ट्रॅक्टरची विक्री केली.”

 

श्रीमती सुनंदा पटवर्धन यांनी आपल्या कार्यातून समाजापुढे आदर्श निर्माण केला—मुक्ता टिळक

0

पुणे- समाजापासून बाजूला राहिलेल्या उपेक्षित आदिवासी समाजाला आपल्या सेवाभावी कार्यातून वैद्यकीय,
शैक्षणिक, आर्थिक सुविधा उपलब्ध करून देऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य करून श्रीमती
सुनंदाताई पटवर्धन यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे, असे गौरोद्गार पुण्याच्या महापौर
मुक्ता टिळक यांनी काढले.
‘शारदा शक्ती’ महाराष्ट्र प्रांताच्या वतीने ‘शक्तिस्थापना दिवस’ रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन
केंद्र, डेक्कन कॉर्नर, कर्वे रस्ता, पुणे येथे संपन्न झाला. जव्हार येथील वयाच्या ८० व्या वर्षी देखील कार्यरत
असणार्‍या प्रगती प्रतिष्ठानच्या श्रीमती सुनंदा पटवर्धन यांना त्यांच्या प्रदीर्घ सामाजिक सेवेबद्दल व
रचनात्मक कार्याबद्दल ’शक्तिप्रेरणा’ पुरस्काराने यावेळी महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते सन्मानित
करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अत्यंत हलाखीची आर्थिक परिस्थिती असतानाही जिद्दीने
शिक्षण घेणार्‍या पुरंदर तालुक्यातील पिंगारी गावच्या कु. मानसी अरविंद ताकवले हिला ‘आयशक्ति’
पुरस्कार व ५ हजार रुपये रोख देऊन यावेळी गौरविण्यात आले. विज्ञान भारतीचे संघटन सचिव जयंत
सहस्त्रबुद्धे, मिनिलेक इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या अध्यक्षा व कार्यकारी संचालिका स्मिता घैसास,
शक्तीच्या राष्ट्रीय सचिव डॉ. लीना बावडेकर, शारदा शक्तीच्या अध्यक्षा डॉ. राजश्री कशाळकर व सचिव
डॉ. प्रियंवदा हेर्लेकर आदी यावेळी उपस्थित होते.
मुक्ता टिळक, सुनंदाताई पटवर्धन यांच्या भाषणाचा संदर्भ देत म्हणाल्या, आपण मागासवर्गीय,
सामाजिक न्यायाबाबत नेहेमी चर्चा करतो परंतु आदिवासी समाजाचे जीवन हे क्रांतिकारी विचारांचे
असल्याचे आपल्या लक्षात येते. त्यामुळे त्यांना मागासलेले म्हणायचे का असा प्रश्न पडतो. सुनंदाताईंनी
आदिवासी समाजाला एकत्र आणण्याचे एकमेव उद्दिष्ट ठेवले. त्यांच्यासाठी शिक्षणाचा पाया घातला.
विज्ञान व तंत्रज्ञानाची जोड देत त्यांच्यासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या व त्यांना समाजाच्या
मुख्य प्रवाहात आणले. शहरातील जनतेचे जीवन हे फार सुरक्षित आहे. आदिवासी समाजाचे प्रश्न समजून
घेण्यासाठी प्रत्यक्ष अनुभव घेतले पाहिजेत. हे अनुभव विशेषत: तरुणांना दिले पाहिजे असे सांगून म्हणाल्या
उस तोडणी कामगार, तमाशा कलावंत अशा वेगवेगळ्या घटकांचे विविध प्रश्न आहेत. मी समाजाचे
काहीतरी देणे लागतो ही भावना आणि प्रेरणा तरुण पिढीला मिळाली तर त्यातून अनेक सुनंदा ताई तयार
होतील आणि एका सशक्त समाजाची निर्मिती होईल असे त्यांनी सांगितले.
जयंत सहस्त्रबुद्धे म्हणाले, जगात विज्ञानाचा बोलबाला झाला. आपल्या देशातही विज्ञान विकसित झाले.
विज्ञानाने महिलांकडे, महिलांच्या प्रश्नाकडे बघण्याची दृष्टी दिली. त्यातून काही चांगल्या गोष्टीही घडल्या
परंतु आपल्या देशासाठी अनुकूल, अनुरूप नसलेल्या गोष्टीही मिळाल्या. आपल्या देशात महिला व

महिलांचे प्रश्न कसे आहेत, ते कसे सोडवले पाहिजेत याचा विचार विज्ञान भारतीच्या माध्यमातून केला
गेला आणि त्यातून ‘शक्ती’ची निर्मिती झाली. महिलांचा बौद्धिक, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विकास
व्हावा ही ‘शक्ती’ची कल्पना आहे. समाजामध्ये अनेक महिला स्वत: मोठे होऊन समाजाला मोठे करतात
त्यातून ‘शक्तीप्रेरणा’ पुरस्काराची कल्पना आली. सुनंदाताईंकडून प्रेरणा घेऊन अशा पद्धतीने आपले
जीवन चालवता येईल का असा विचार करून समाजाला उपयोगी पडेल असे जीवन जगण्यासाठी सर्वांनी
प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे ते म्हणाले.
सुनंदाताई सत्काराला उत्तर देताना म्हणाल्या, वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा या आदिवासी भागात
मी काम करते. तिथल्या महिलांचे जीवन आणि आपल्याकडील महिलांचे जीवन हे पूर्णत: वेगळे आहे.
आदिवासी समाजात मुलगा- मुलगी असा भेद केला जात नाही, दोघांनाही कुटुंबात व समाजात समानतेने
वाढवले जाते. गावातील दोन तरुण जीवांचे लग्न लावण्याचा मान गावातील विधवेला दिला जातो. ती
कष्टकरी, अत्यंत सामान्य असली तरी तिला हा मान दिला जातो. आदिवासी समाजात लग्न लवकर
होतात. मुलगी शिकलेली नसली तरी तिला माणुसकीची शिकवण दिली जाते. तिला सासरी त्रास दिला
जात असल्यास ती स्वत: माहेरी निघून जाते व आई-वडिलांवर आपला भार न टाकता स्वत: कष्ट करते.
ती तिची तक्रार गावापुढे मांडते. आपण हुंडाबळीच्या बातम्या ऐकतो. आदिवासी समाजात हुंडा तर सोडाच
परंतु मुलीचे पालनपोषण केल्याच्या बदल्यात मुलाकडून मुलीच्या आईवडिलांना धान्य दिले जाते. अज्ञान
आणि वैद्यकीय सुविधा नसल्यामुळे ते लोक भगताकडे जातात. ती त्यांची अंधश्रद्धा नव्हे तर
वस्तुस्थितीला सामोरे जाण्यासाठी काहीतरी केले पाहिजे म्हणून हे लोक भगाताकडे जातात, या भागात
वैद्यकीय सुविधा आम्ही निर्माण केल्या तसे भक्त कमी झाले असे त्यांनी सांगितले. या भागात शैक्षणिक
सुविधा, सौर ऊर्जेद्वारे विद्युत सुविधा, पाण्याच्या सुविधा त्यातून शेतीचा रोजगार कसा निर्माण झाला
याबाबत सुनंदाताईंनी सविस्तर माहिती दिली.
सौ. स्मिता घैसास आणि कु. मानसी ताकवले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यंदाच्या शक्तिप्रेरणा पुरस्काराच्या मानकरी श्रीमती सुनंदा पटवर्धन या मूळच्या सातारा जिल्ह्यातील
वाईच्या. वयाच्या १० व्या वर्षी कृष्णा नदीत बुडणार्‍या एका लहान मुलाचे प्राण वाचविण्याचे धाडस
त्यांनी दाखवले. वयाच्या २८व्या वर्षी त्यांनी नाशिक जिल्ह्यातील भोसला मिलिटरी शाळेतून सैनिकी
शिक्षण घेतले. पुण्यातील हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेकरिता भाऊबीज जमा करण्याचे कार्य त्यांनी कित्येक
वर्ष केले. वाडा, विक्रमगड, जव्हार आणि मोखाडा तालुक्यामध्ये साप्ताहिक फिरते हॉस्पिटल सुरू केले. ठाणे
जिल्ह्यातील झोपडीधारकांना वीज, पाणी, शौचालये बांधून देऊन स्वच्छतेच्या सवयी अंगीकारण्याकरिता
पुढाकार घेतला. दिव्यांग व महिला यांच्या उद्धाराकरिता त्यांनी स्वयंसिद्धा संस्थेच्या अध्यक्ष म्हणून

विशेष कार्य केले. पाणी अडवा – पाणी जिरवा मोहीम राबवून ७५० एकर पडीक जमिनीतून दुबार पीक
घेऊन शेतकर्‍यांना स्वावलंबी बनविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. लीना बावडेकर यांनी केले, सूत्रसंचालन सौ. सीमंतीनी वझे व सौ.
मनीषा कुलकर्णी यांनी केले तर आभार डॉ. राजश्री कशाळकर यांनी मानले.

‘एक सत्य’ चित्रपटाचा मुहूर्त

0

आपल्या अंतरंगातल्या गोष्टींचा वेध घेत जगण्याच्या संवेदना उलगडून दाखवणाऱ्या एक सत्यया वेगळ्या धाटणीच्या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच चित्रपटातील एका गीताच्या चित्रीकरणाने संपन्न झाला. ‘निर्झरा एन्टरटेंन्मेंट ची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन रमेश गंगणे यांनी केले असून लेखन डॉ. दिनेश काळे यांचे आहे.

मंदार चोळकर लिखित जरा जरा अबोल तूया प्रणयगीताचे चित्रीकरण नुकतेच मुंबईतल्या चित्रनगरीत पार पडले. डॉ. दिनेश काळे, सुकन्या सुर्वे, पूजा मळेकर या तिघांवर हे गीत चित्रीत झाले आहे. भगवंत नार्वेकर यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताला वैशाली सामंत व ऋषिकेश रानडे यांचा स्वरसाज लाभला आहे. या चित्रपटाची कथा तसेच हे गीत प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला.

ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर, स्वप्नील राजशेखर यांच्यासह डॉ. दिनेश काळे, सुकन्या सुर्वे, पूजा मळेकर आदि कलावंताच्या या चित्रपटात भूमिका आहेत. ‘एक सत्य हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

शासकीय निवासी शाळेच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

0

पुणे दि. 2– सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र राज्य व सहाय्यक आयुक्त समाजकल्याण यांच्या अधिपत्याखाली अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी व विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये तसेच त्यांची शैक्षणिक प्रगती उंचवण्यासाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील तरंगवाडी येथे निवासी शाळा सुरू करण्यात आली आहे.

इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतचे वर्ग, मोफत शैक्षणिक पुस्तके व स्टेशनरी, मोफत राहण्याची व भोजनाची सोय, मोफत शालेय गणवेश, अंथरुण व पांघरुणाची संपूर्ण सोय, अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक, सुसज्य इमारत व भव्य क्रिडांगण, शालेय उपक्रमांचे आयोजन, सुसज्य प्रयोगशाळा व ग्रंथालय, अश्या सोयी सुविधा या शाळेमध्ये पुरविण्यात येणार आहेत.  शैक्षणिक वर्ष 2018 – 19 च्या प्रवेश प्रक्रियेस सूरवात झाली असून विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

पुणे जिल्ह्याचा 56 हजार 154 कोटी रुपयांचा पत आराखडा जाहीर

0

पुणे – पुणे जिल्ह्याचा सन 2018 या वार्षाचा 56 हजार कोटी रुपयांचा वार्षिक पतपुरवठा आराखडा  जिल्हाधिकारी यांच्या  मार्गदर्शनानुसार बँक ऑफ महाराष्ट्रच्या जिल्हा अग्रणी बँक व जिल्ह्यातील सर्व बँकांच्या पुढाकाराने तयार करण्यात आला असून या पत आराखड्याचे प्रकाशन दि. 2 एप्रिल 2018 रोजी जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक व पुणे जिल्हा परीषदाचे प्रभारी अतिरिक्त सी ई ओ दिनेश डोके यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बँक ऑफ महाराष्ट्र परीमंडल पूर्व क्षेत्राचे क्षेत्रीय व्यवस्थापक संजय मणियार, नाबार्डचे जिल्हा विकास अधिकारी रोषन महाजन, जिल्हा उद्योग केंद्र सरव्यवस्थापक काशिनाथ डेकाटे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक आनंद बेडेकर, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उप सरव्यवस्थापक इंगळे, सहाय्यक सरव्यवस्थापक श्री.जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

पत आराखड्याची वैशिष्ट्ये सांगताना दिनेश डोके म्हणाले, हा पत आराखाडा 56 हजार 154 कोटीरुपयांचा असून मागील वर्षापेक्षा तो 15 टक्क्यांनी अधिक आहे. प्राथमिकता क्षेत्रासाठी 31 हजार 101 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून ती एकून पतपुरवठ्याच्या 62 टक्के आहे. कृषी कर्जासाठी 7394 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्याचे प्रमाण प्राथमिकता कर्जापैकी 21  टक्के एवढे आहे. कृषी कर्जामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय शेती, फ़ुले व फ़ळबाग लागवड, हरितगृह, कृषी निर्यात योजना, कृषी यांत्रीकीकरण, राष्ट्रीय फ़लोत्पादन अभियान तसेच शेतीपुरक व दुय्यम योजनांचा समावेश करण्यात आला आहे. या पतपुरवठा आराखड्यामध्ये व्यापारी बँका, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच महाराष्ट्र ग्रामिण बँकेसह 41 बँकांच्या 1615 शाखांचा सहभाग आहे. जिल्ह्यातील सर्व बँकांनी दिनांक 31 जानेवारी 2018 अखेर पीक कर्जासाठी 2441 कोटी रुपयांचे वाटप करून उदिष्टाच्या 65 टक्क्यांनी पुर्ती केलेली आहे. पतपुरवठा आराखड्यात लघुउद्योजकांसाठी  13 हजार 106 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. स्वयंरोजगार योजनांसाठी, शैक्षणिक कर्जासाठी, गृहकर्जासाठी, छोट्या व्यवसायासाठी 14 हजार 600 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गत वर्षाच्या पत पुरवठा आराखड्यापेक्षा या सन 2018-19 आराखड्या मध्ये लघु उद्योजकां करिता 37 टक्के, इतर प्राथमिकता क्षेत्रा करिता 42 टक्के एकूण प्राथमिकता क्षेत्रा करिता 38टक्के, अप्राथमिकता क्षेत्रा करिता 15 टक्के, एकूण पत पुरवठा आरखड्याच्या 15 टक्के वृद्दी करण्यात आली आहे.